Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 79

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 79

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 78

 

भाग 79

 

अर्जुनने माहीला समजावण्याचा बराच प्रयत्न केला होता , पण माही ने नलीनीला शब्द दिला होता म्हणून ती तो पाळत होती. अर्जुनला होणार त्रास तिला सुद्धा दुखावून जात होता पण तिचा नाईलाज होता. तेवढं समजावण्याचा प्रयत्न करूनही ती ऐकत नाहीये बघून आता अर्जुनला सुद्धा राग आला होता . त्याचेही पेशन्स सुटले होते … तो सुद्धा चिडला होता , त्यामुळेच तो आता बराच शांत झाला होता. ऑफिसच्या कामात पण त्याचं फार लक्ष लागत नव्हते… खूप महत्वाच्या मीटिंग असल्या तरच तो जॉईन करत होता , नाहीतर तो आपल्या केबिन मध्ये बसून समोर दिसणाऱ्या माहीला बघत बसायचा. तिच्यावर तो चीडायचा , पण परत तिचा तो गोड चेहरा बघून तो शांत व्हायचा. 

 

घरात पण अर्जुन खूप शांत झाला होता , तसे तर तो आधी पण जास्त बोलत नव्हता , तरी तेव्हाचा शांतपणा आणि आताचा त्याचा शांतपणा , यात जमीन आसमानचा फरक होता. आधी त्याचा घरामध्ये चिडचिडपणा तरी सुरू असायचा , आता तर ते सुद्धा नव्हते . त्याचा आवडीचे नसले काही तरी तो सपशेल दुर्लक्ष करत तिथून निघून जायचा. तो घरात असूनही नसल्यासारखा असायचा. 

 

इकडे माहीची पण हालत काही वेगळी नव्हती , एकट्यात बसून अश्रू गाळून घेत होती, पण अर्जुन समोर असला की ती जास्तीत जास्त आनंदी राहण्याचा प्रयत्न करायची . तिला माहिती होते तिला आनंदी बघून अर्जुनला चांगले वाटते , म्हणून त्याच्या पुढे ती हसत खेळत असायची , पण एकही शब्द बोलायची नाही . काम असले तरी मोजके दोन शब्द बोलुन तिथून निघून जायची. नलिनी ला आवडत नाही म्हणून ती अर्जूनच्या दूर राहत होती , अर्जुन पण आपल्या पासून दूर रहावा अशीच ती वागत होती. 

 

 तिचं आणि अर्जुनचे लग्न झाले आहे माहिती झाल्यापासून आई आणि आत्याबाई पण तिच्यावर खुप रागावल्या होत्या , पण एक चांगले होते की त्यांनी तिला आपल्या घरी आपल्या मुली प्रमाणेच ठेवले होते, बोलत नसल्या तरी काळजी मात्र होतीच, मिरा वर सुद्धा त्यांचा खूप जीव होता . 

 

असेच दिवस जात होते.

 

******

ऑफिस मध्ये एक डील झाली होती, त्याचाशी संबंधित मीटिंग सुरू होती.. सगळे एक एक करत आपले पॉइंट्स सांगत होते. अर्जुन एका जागेवर बसला अधून मधून माहीला बघत होता. माही तिचे पॉइंट्स सांगत होती , बोलता बोलता तिला ठसका लागला… आपोआपच अर्जुनचा हात पाण्याच्या ग्लास कडे गेला आणि तो तिला देणार तेवढयात तिने अर्जुनकडे दुर्लक्ष करत बाजूला बसलेल्या कलिग ने ती ग्लास घेतला… झालं ते बघून अर्जुन ला चांगलाच चिडला होता , आधीच ती बोलतांना त्याचाकडे बघत सुद्धा नव्हती , आणि आता हे , तिचे असे इग्नोर केलेले त्याला अजिबात आवडले नव्हते. 

 

मीटिंग संपली, सगळ्यांपुढे स्नॅक्स आयटेम ठेवण्यात आले होते …खाता खाता माही सगळ्यांसोबत हसून बोलत होती, बघून अर्जुन आणखीच चिडत होता …. समोर प्लेट मध्ये काय आहे त्याकडे त्याचे लक्ष नव्हते …. माही कडे बघतच त्याने प्लेट मधले काही उचलायला गेला तर त्याचा हाताला मिरची लागली , तो तिला बघत तेच खात होता...त्याला ते तिखट आहे हे सुद्धा कळत नव्हते. 

 

" भाई , ते … तुला अलर्जी….".... आकाश , आकाश चे लक्ष अर्जूनकडे गेले , तसे त्याचा लक्षात आले की अर्जूनचे लक्ष नाही आहे ते. 

 

आकाशच्या आवाजाने अर्जुन भानावर आला… माहीचे सुद्धा लक्ष त्याचा कडे गेले...बघते तर अर्जुनला चांगलंच तिखट लागले होते , डोळे सुद्धा लाल झाले होते ….

 

" I am leaving … you all continue…."... येवढे बोलून अर्जुन तडक उठून तिथून बाहेर निघून गेला .. 

 

माहीच्या लक्षात आले होते , अर्जुन तिच्यावर नाराज आहे ते , थोड्या वेळातच कामाचं काही कारण सांगून माही पण तिथून बाहेर पडली. 

 

माहीने अर्जूनच्या कॅबिन चे दार नॉक केले आणि आतमध्ये गेली … अर्जुन त्याच्या चेअर वर डोळे बंद करून बसला होता , जवळपास 4-5 पाण्याचे ग्लास तिथे दिसत होते …. 

 

" Get out "..... अर्जुन थोडा चिडतच बोलला. , त्याला माहिती होते माही आतमध्ये आली आहे ते. 

 

माही त्याचा बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याचा जवळ जाऊन उभी राहिली आणि तिने हातात पकडून असलेल्या वाटी मधली दही साखरेचा चमचा त्याचा पुढे धरला… 

 

" I said , get out "...... अर्जुन , तरी ती तशीच शांत उभी होती .. तिचा अबोला त्याला आणखीच त्रास देत होता …. उभा होत त्याने तिच्या हाताला जोरदार झटका देत तिच्या मनगटाला पकडत ,तिचा हात मागे नेत , तिला स्वतः कडे ओढले आणि स्वतःचा बाहुपाशात बंदिस्त केले ....तसे तिच्या हातातील दह्याची वाटी बाजूला जाऊन पडली… त्याने तिचा हात इतका करकचून पकडला होता की तिला ते चांगलंच दुखायला लागले होते , ती भेदरल्या नजरेने अर्जुन ला बघत होती… 

 

" त्या दहीसाखरेने खरंच वेदना कमी होणार आहे काय ? असा अबोला धरून , इग्नोर करून , खरंच दूर होणार आहोत का आपण?या सगळ्याची गरज आहे काय ? का ताणत आहे सगळं ? उगाच गोष्टी का वाढवते आहे ? " …. अर्जुन 

 

माही फक्त त्याच्याकडे बघत होती … येवढं सगळं बोलूनही ती चूप आहे बघून आता तर राग त्याचा डोक्यात गेला… 

 

" तुझ्यामुळेच तिखट लागलं आहे , तूच औषध असशील यावर ".... म्हणत आपल्या एका हाताने त्याने तिच्या मानेमागे पकड घट्ट करत तिचा चेहरा वरती केला.....आणि तिच्या ओठांवर नजर स्थिर करत तिच्या जवळ येऊ लागला…. 

 

तो चांगलाच चिडला आहे , हे माहीच्या लक्षात आले होते ….तो जवळ येत आहे बघून तिने तिचे डोळे मिटून घेतले… 

 

" मला आवडत नाही जबरदस्ती करायला , पण माझे पेशन्स चेक करू नको ….".... अर्जुन बोलला , तिला आपल्या पकड मधून दूर केले आणि तिथून तनतन करत केबिन च्या बाहेर चालला गेला… माही त्याचा पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभी होती. 

 

त्या नंतर अर्जुन च तिला इग्नोर करायला लागला होता. ऑफिसर मध्ये रस्त्यात क्रॉस जरी झाली तरी ओळख नसल्या सारखे तो दाखवत होता. 

 

 

**********

 

 

अर्जुन रात्रीचे जेवण सुद्धा कमी केले होते. अगदीच नावासाठी जेवत होता. जेवण आटोपून तो आपल्या रूम मध्ये आला. बाहेर पूल जवळ तो लॅपटॉप उघडून काही करत बसला होता. पण त्याचं कशातच मन लागत नव्हते. मीरा तर त्याचा जवळ होती , त्याला हवे तेव्हा तो तिला भेटायला जायचा , तिला बाहेर फिरायला घेऊन जायचा … पण माही सोबत नव्हती… माही जितकी जितकी त्याचा दूर जायची, त्याला तेवढीच ती जवळ हवी असायची , त्याला आता ती खरंच हवी होती . ती आपली असूनही तिच्यावर हक्क सांगता येत नाही आहे , तिला जवळ घेत येत नाही आहे , आपली असून आपल्या पासून दूर आहे, तेही काहीच लॉजिक नसलेल्या फालतू कारणामुळे , हेच कितीतरी वेदनादायी होते… त्याने लॅपटॉप मध्ये तिचे फोटो ओपन केले , आणि बराच वेळ तो ते बघत होता. तिचा दुरावा असह्य झाल्यामुळे आपोआपच त्याच्या डोळ्यात पाणी साचू लागले… 

 

 

" नलिनी , तुझा एक हट्ट ….. बघ पोराची काय हालत होऊन बसली आहे ?अर्जुन असा कधी होता काय ? किती खचला दिसतो ? कधीच हरला नव्हता , पण आज आपल्याच आईच्या हट्टापुढे हार मानून बसला आहे . ".... आजी , नलिनी आणि आजी त्यांच्या रूम कडे निघाल्या होत्या की पूल साईड ला बसलेल्या अर्जुनला बघून त्या तिथे थांबल्या होत्या . 

 

" असं काही नाही ".... नलिनी 

 

" अगं , रडतोय तो …. आई आहेस ना ? दिसत नाही आहेत काय त्याच्या डोळ्यांतील अश्रू? वेळीच सांभाळ "..... आजी बोलून आपल्या रूम मध्ये चालली गेली. नलिनी अर्जुन जवळ आली. 

 

" अर्जुन …..".... नलिनी 

 

" मला काम आहे ".... अर्जुन तिच्याकडे न बघता लॅपटॉप उचलून आपल्या रूम मध्ये निघून आला. 

 

त्याला असे तुटक वागताना बघून नलीनीला थोडे वाईट वाटले , तुला त्याचे असे वागणे आवडले नाही. नाही .. 

 

असेच दिवस जात होते.

 

******

 

आज सकाळपासून मिरा तिला सोडत नव्हती. तिला नीट खायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता. मिरा थोडी जास्त कुरकुर करत होती म्हणून माहीला ऑफिसला यायला थोडा उशीरच झाला होता. ती आपल्या डेस्क वर जात होतीच की न्यूज चॅनल वर काही न्यूज फ्लॅश होत होत्या…ऑफिस मधील मंडळी तेच बघत बोलत उभे होते . न्यूज बघून तर तिच्या पाया खालची जमीनच सरकल्या सारखी झाली . तिच्या कपाळावर घाम साचू लागला. ती चांगलीच घाबरली होती. ती झपाझप पावले टाकत अर्जूनच्या केबिन मध्ये गेली , पण तो तिथे नव्हता….ऑफिस मध्ये ती त्याला शोधत फिरत होती, आणि शेवटी तो सेमिनार रूम मध्ये दिसला. सगळ्यांच्या पुढे उभा तो प्रोजेक्ट बद्दल बोलत उभा होता… 

 

जसा बाहेरून माहीला तो दिसला , ती पळतच मागच्या दाराने त्या हॉल मध्ये आली… अर्जूनचे सुद्धा तिच्याकडे लक्ष गेले ... अर्जुनला बघून अर्जूनकडे पळत जाणार तेवढयात तिचे लक्ष पुढे बसलेल्या लोकांकडे गेले आणि तिचे पाय तिथेच थांबले. मान खाली घालून , परत फिरत ती तिथे दारा मागे जाऊन उभी राहिली, पण डोळ्यांसमोर अजूनही तिच्या तीच न्यूज येत होती … ज्यामुळे तिचे पाय लटपटत होते, भीतीने हृदयाची धडधड पण वाढली होती… 

 

" presentation Rescheduled…. Pls "....…. म्हणत अर्जुनने समोर असलेल्या दाराकडे हात दाखवला. अर्जुनचा इशारा समजुन सगळे लगेच पुढल्या दाराने बाहेर पडले. जसे सगळे लोकं बाहेर पडले , माही पळतच येत अर्जुनला जाऊन बिलगली. तिने अर्जुनला खूप घट्ट पकडले होते… आणि त्याचा छातीवर आपले कपाळ घासत होती, तिचे शरीर थरथरत होते. 

 

" Calm down ".... अर्जुनने तिला आपल्या मिठीत घेतले , आणि तिच्या डोक्यातून हात फिरवत तिला शांत करत होता. 

 

" Sir …. ते…. ते….देवेश…….. त्याचे बाबा….. ".... माही रडत रडत , अडखळत बोलत होती. तीच्याने नीट बोलल्या सुद्धा जात नव्हते. 

 

" I know ….. "..... अर्जुन 

 

" पण….. ".... माही 

 

" त्याला त्याच्या कृत्याची पनिशमेंट मिळाली आहे … "... अर्जुन 

 

" पण …. त्याचे वडील ? ".... माहीला बोलता बोलता आणखीच रडू कोसळले… अर्जुनने तिला आपल्या हातांवर उचलले आणि तिथेच बाजूला असलेल्या चेअर वर तो जाऊन बसला , आणि तिला आपल्या मांडीवर नीट बसवून तिला आपल्या कुशीत घट्ट पकडून ठेवले. तिला मनसोक्त रडू देत होता. आज तिचे आयुष्य खराब करणाऱ्याचा अंत झाला होता. तिच्या चांगल्या आयुष्याला कीड लावलेल्या व्यक्तीचा अंत झाला होता. तिची आयुष्याची सुंदर स्वप्न तोडणाऱ्याचा अंत झाला होता. तिचं फुलासारखं शरीर कुच्करण्याचा अंत झाला होता. तिचा गुदमरला श्वास आज मोकळा झाला होता . ती खूप रडत होती .. आतापर्यंतचे सगळे आयुष्य तिच्या डोळ्यांपुढे सरकू लागले होते … सगळं आठवत ती रडत होती .. आणि तो तिला रडू देत होता …. मनसोक्त …. तिचं मन हलकं करायला…. फक्त आपल्या स्पर्शातून ती एकटी नाहीये ही जाणीव तो तिला करून देत होता. 

 

आज सकाळीच देवेश पळून जायचा प्रयत्न करत असताना एन्काऊंटर मध्ये देवेश मारल्या गेला होता. तो रेपिस्ट आहे , आणि तो मारल्या गेला आहे हे सगळीकडे पसरले होते. यामुळे समाजात झालेला अपमान सहन न झाल्याने देवेश च्या वडिलांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. देवेशच्या मोठ्या भावाची बायको आधीच त्याला सोडून गेली होती. हे सगळं देवेशच्या आईला सहन न झाल्याने तिला अटॅक आला होता. ती हॉस्पिटल मध्ये होती. सगळ्या नातेवाईकांनी साथ सोडली होती. देवेशच्या भावाने देवशचा मृतदेह घेण्यास नकार दिला होता. 

 

एक चांगलं झालं होते की हे सगळं रेप केस कोर्टात सुरू व्हायचा आधी झाले होते , त्यामुळे माहीचे नाव बाहेर नव्हते आले, तासेपण माहीचे नाव बाहेर येणार नाही याची अर्जुन ने पुरेपूर काळजी घेतली होती. 

 

हीच न्यूज बघून माही घाबरली होती. आणि अर्जुन जवळ आली होती. 

 

*******

 

क्रमशः 

 

 

नमस्कार फ्रेंड्स 

 

सगळ्या आधी सॉरी , भाग पोस्ट करायला उशीर झाला. काल पोस्ट करेल सागुनही काही वयक्तिक कारणांमुळे जमले नाही. 

 

देवेशचा शेवट वर काही तर्क , laws वैगरे लावू नका ही विनंती . गेल्या काही दिवसात बरेच मेसेजेस आले , त्यांनीच देवेशचा शेवट असा ( हैदराबाद केस) करा म्हणून सुचवले,तुमचा देवेश वर असणारा राग दिसून येत होता … आणि अश्या केस मध्ये असेच निर्णय व्हायला हवे असे त्यांचे म्हणणे होते.. तसे मी त्याला जन्मठेप वैगरे दाखवणार होते , पण मेसेज मध्ये म्हणणं होते रिअलमध्ये तर अशा केसेस खूप रेंगाळतात , या बाबतीत निर्णय लवकर व्हायला हवे , कमीत कमी कथेत तरी दाखवा ,तर आपल्या सगळ्यांच्या इच्छेचा मान ठेवत मी देवेशचा अंत या पद्धतीने केला आहे. होप तुम्हाला आवडला असेल. 

 

होऊ शकते देवेशच्या वडिलाचे उचलेले पाऊल कोणाला आवडणार नाही…. पण घरातील एका व्यक्तीच्या गुन्ह्याची सजा पूर्ण घराला भोगावे लागते आणि हे सत्य आहे . रेप सारख्या घृणास्पद गुन्ह्याचा अंत किती वाईट , जीवघेणा असू शकतो हेच सांगायचे होते. एकाच्या आयुष्याला किती आयुष्य जोडलेली असतात , आपलं एक चुकीचं पाऊल , एक गुन्हा आपलं पूर्ण घर बरबाद करतं . घरातील प्रत्येकाला किती जबाबदारीने वागणे गरजेचे आहे , हेच सांगायचं होते. देवेशच्या भावाची काही चूक नव्हती , तरीही त्याची बायको त्याला सोडून गेली… घरातील एखादा व्यकी रेप केस मध्ये आहे , हेच किती लज्जास्पद आहे , यामुळे निर्दोष लोकांचे पण आयुष्य खराब होते. 

 

 

नलिनी ( अर्जुनाची आई ) …. किती तो राग काढत आहात तिच्यावर …. बाप रे बाप …. आवडलं हा पण आपल्याला…. ( एखाद्याची चीड यावी , writing जमली तर ) 

 

बाकी नलिनी आई मानते , की नाही… पुढे काय होते , हे पुढल्या भागात बघू. 

 

या भागाबद्दल नक्की कळवा कसा वाटला ते. घेतलेले निर्णय बरोबर होते की नाही ?

 

Stay safe , stay healthy … 

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️