तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 77

माही अर्जुन

तू ही रे …. कसं जगायचं तुझ्याविना 77

भाग 77

अर्जुनाला उद्या हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होते. अर्जुन घरी येणार म्हणून सगळे आनंदी होते. नलिनीला सुद्धा आपला मुलगा सुखरूप आहे त्यामुळे आनंद होताच पण त्याची दुसरी बाजू तो माही वर प्रेम करतो हे त्यांना आवडले नव्हते की मान्य सुद्धा नव्हते. जेव्हा नलिनी ने हॉस्पिटल मध्ये मिरा आणि माहीला अर्जूनच्या खूप जवळ बघितले , त्यांना ते आवडले नव्हते , त्यांनी आधीच त्यांचा नवरा गमावला होता … आता त्यांना परत तीच भीती वाटू लागली होती…. आणि भरपूर विचार करून शेवटी त्यांनी माहीला भेटायचं ठरवले. त्यांनी माहीला बाहेर एका पार्क मध्ये एकटे यायला सांगितले. 

नलीनीला भेटायला जायचं म्हणून माहीला थोडी भितीच वाटत होती. त्या दिवशी घरी अर्जुनला डोक्याला लागल्या पासून नलिनी माहीवर खूप रागावली होती… त्या नंतर त्या तिच्यासोबत एकही शब्द बोलल्या नव्हत्या… त्यामुळे आता तिला थोडे धडधडायला झाले होते. खूप हिम्मत करून ती नलिनीला भेटायला गेली. 

" काकी , कश्या आहात ?"..... माही थोडी घाबरतच बोलत होती , त्यांच्या डोळ्यात तिला राग स्पष्ट दिसत होता. 

" ठीक , हे बघ मी खूप महतत्वाचं बोलायला आले आहे ".... नलिनी 

" हो , बोला ".... माही 

" मला तुझं आणि अर्जूनचे नाते स्वीकार नाही आहे …. ".... नलिनी 

ते ऐकून माहीच्या डोळ्यात पाणी जमू लागले. 

" हे बघ , जे झालं आहे तुझ्यासोबत , खरंच खूप वाईट झाले आहे …. कुठल्याही मुलीसोबत असे व्हायला नको, देवाकडे हीच प्रार्थना आहे … तू वाईट मुलगी आहे असे मी म्हणणार नाही … तू चांगलीच आहे , पण माझ्या मुलासाठी योग्य नाही. तुमची मैत्री पण ठीक आहे , मी काही बोलणार नाही, पण मला तू त्याची बायको म्हणून स्वीकार नाही … मैत्री दोघांमध्ये असते , पण लग्न म्हटलं की नातं घरातील प्रत्येकासोबत जुळते … घरचा काही ऋतबा असतो , तुला माहितीच आहे आमचं , खास करून अर्जुनचे नाव आपल्या सोसायटी मध्ये मानाने घेतले जाते… आणि मला अजिबात आवडणार नाही की कोणी आमच्या नावावर बोट सुद्धा उचलाव, नाव कमवायला अख्खं आयुष्य जाते , माझा विखरलेले घर सावरायला मी माझं आयुष्य दिले आहे , आता थोड्या चुकांनी मी परत माझं घर तुटताना नाही बघू शकत …. आणि मुळात त्याला खूप चांगल्या त्याच्या लेव्हलला मॅच होणाऱ्या मुली आरामात मिळतील...फक्त प्रेमाने आयुष्य चालत नसते ….."..... नलिनी 

नलिनी बोलत होती , तिचा एक एक शब्द माहीला हृदयाला टोचत होता…. 

" तुझ्या सोबत जे झालंय त्याचा अर्जुनला जरी फरक पडत नसेल तरी मला पडतो … मला तू त्याचा आयुष्यात नको आहे ….".... नलिनी

" अर्जुन सर , त्यांना खूप त्रास होईल "..... माही 

" दोन दिवस होईल , मग तो पण विसरून जाईल …. तसेही हे प्रेम वगैरेच्या भानगडीत तो कधीच पडला नव्हता, त्याला आवडत नव्हतेच…. "..... नलिनी 

" मी नाही जाणार त्यांना कधीच सोडून ".... माही 

" वाटलच मला … देवेश बरोबर बोलला होता … श्रीमंत मुलगा भेटला , त्याने थोडी काळजी दाखवली , लगेच त्याला फसवले … तुला माहिती होते तुझ्यासोबत कोणी लग्न करणार नाही , अर्जूनच्या चांगुलपणाचा तू फायदा घेतला. मला वाटलं तू घर जपणारी मुलगी आहे … पण छे , तू तर स्वार्थी निघाली….".... नलिनी 

" तुम्ही सरांचा विचार का नाही करत आहात? तुम्ही तर त्यांच्या आई आहात ना …तुम्हाला तर त्यांचं सुख, आनंद बघायला पाहिजे … ".... माही 

" तेच बघतेय, त्याची आई आहे , त्याच्यासाठी काय चांगलं आहे तेच करतेय…. तुमच्या पेक्षा चार उन्हाळे पावसाळे जास्ती बघितले आहे …. खडतर आयुष्य ची वाट चालले आहे , पायाला किती काटे रुततात , किती वेदना होता माहिती मला… चांगल्या पद्धतीने तुझ्या सोबत बोलायला आले होते , नाहीतर मला वेगळ्या पद्धती पण माहिती...तुला अर्जूनच्या आयुष्यातून काढायला मी काही पण करू शकते...हे लक्षात ठेव… एक आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी काहीही करू शकते… तुझ्यामुळे आताच तो मरणाच्या दारातून परत आला आहे … परत मी त्याला तिकडेच ढकलू नाही शकत…. त्याचं काय तो तर तुझ्यासाठी स्वतः ला पण विकायला मागेपुढे करणार नाही की स्वतःचा जीव द्यायला पण मागेपुढे बघणार नाही ...त्याला काही झालं तर देणार आहेस का माझा मुलगा मला परत आणून? दिवाळीची रात्र मी विसरली नाही आहे…. त्या दिवशी पण हेच झाले होते … आणि आता परत तेच घडले आहे… तू सोबत असशील तर वारंवार हेच घडेल….तुझं प्रेम आहेस म्हणते ना त्याचावर?.. मग हेच प्रेम का तुझं? प्रेम असे जीव घेण्यावर उतरतं काय?".....तू जिथे जिथे गेलीय , वाईटच झालंय, तुझ्या आई वडिलांनी सोडलं तुला… अंजली चे बाबा गेले… आता अंजली…"..... नलिनी 

नलिनीच बोलणं ऐकून सगळी दृश्य माहीच्या डोळ्या समोर येऊ लागली आणि आपोआप तिच्या डोळ्यांतून पाणी खाली गालांवर ओघळू लागले…. अर्जुनच आयुष्य, अंजलीचा संसार सगळं विचार करून तिला घाबरायला झाले … 

" काय मग, काय आहे तुझा निर्णय ? ….नलिनी 

" मी कुठेही गेली तरी अर्जुन सर मला शोधून काढतीलच "..... माही 

" ते मी बघून घेईल …. मला तुझा निर्णय सांग ? माझ्या जवळ तुझ्यासाठी चांगल्या नोकरीच्या ऑफर आहेत….. तुला कधीच कशाचा प्रॉब्लेम होणार नाही… राहणं , खाणं … सगळी सोय अगदी व्यवस्थित असेल … फक्त अर्जुन ला सोडायचं "...... नलिनी 

" अर्जुन सरांना थोडा सुद्धा त्रास व्हायला नको …. जर त्याची काळजी तुम्ही घेऊ शकत असाल तर मी जायला तयार आहे ".... माही 

" त्याची काळजी घ्यायला त्याची आई आहे ".... नीलिमा 

" अंजली ताईला घरी घेऊन याल ?".... माही

" हो , ती आकाश ची पत्नी आहे , ती आमच्या घराची लक्ष्मी आहे ".... नीलिमा

" कधी जायचं ?" ….. माही 

" उद्याच ".... नलिनी 

" उद्या ?".... माही शॉक होते .

" येवढ्या लवकर मी कशी जाऊ शकते… म्हणजे काहीच तयारी नाही ".... माही 

" काहीच करायची गरज नाही, सगळच तयार असेल आहे… संध्याकाळच्या तिकीट आहेत…..".... नलिनी

" पण ?".... माही 

" उद्या सकाळी अर्जुन घरी येतोय… तर लवकरात लवकर निघायचं ".... नलिनी 

ते सगळं ऐकून आता माहीचा जीव घशात आला होता … तिला आता बोलायला सुद्धा होत नव्हते. 

" ताईला उद्याच घरी बोलवा ".... माही

" बरं "..... नलिनी 

" एक शेवटचं ?"..... माही

" बोल "..... नलिनी .

" मला अर्जुन सरांना एकदा भेटायचं, मग तुम्ही म्हणाल तिथे जाईल , एकदा भेटू द्या ".... माही गयावया करत होती. 

" ठीक आहे , उद्या तो हॉस्पिटल मधून आला, की अंजलीला या पोहचवायला , तेव्हा भेटून घे , पण हा , घरात कोणाला कळायला नको की तू माझ्या सांगण्यावरून बाहेर जात आहे , आणि तू कुठे जात आहे ती स्थळ अंजली, आत्याबाई आणि आईला सुद्धा कळायला नको ".... नलिनी 

माहीने होकारार्थी मान हलवली…. 

" उद्या तुझ्यासोबत एक महिला येईल ती तुला पोहचवून देईल… सगळं सेट करून देईल...तुझी काळजी आहे मला, फक्त तू मला अर्जुनच्या आयुष्यात नको येवढच हवे आहे ".... नलिनी

माहीने फक्त मान हलवली...आणि जड मनाने घरी निघून आली. घरी काय सांगावं याच विचारात ती होती…. शेवटी घरी तिने तिला दुसऱ्या ब्रांचला ट्रान्स्फर मिळाली आहे असे सांगितले. ती इथून जाणे योग्य कसे आहे हे तिने समजवून सांगितले, आणि प्रत्येकाच्या आनंदी आयुष्यासाठी हे करणं गरजेचे आहे हे पण सांगितले. आत्याबाई आणि आई जरी तिच्यावर चिडल्या होत्या तरी सुद्धा त्यांनी माही ला मुली सारखेच मानले होते. पण तरीही कुठेतरी अंजली वर असलेले त्यांचे प्रेम भारी पडत होते , अंजली ने तिच्या घरी सुखाने संसार करावा असेच त्यांना वाटत होते… म्हणून मग त्यांनी सुद्धा संमती दिली… आणि अंजली ला काही कळणार नाही याची खबरदारी सुद्धा घेतली. 

********

ठरल्याप्रमाणे अर्जुनला दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली. अजूनही डोक्याला पट्टी होतीच, थोडा अशक्तपणा होता , डॉक्टरांनी स्त्रिक्टली फक्त आराम करायला सांगितला होता… 

आकाशने अर्जुनला हात पकडून त्याच्या रूम मध्ये पोहचवले…आजपर्यंत अर्जूनवर अशी वेळ कधीच आली नव्हती .. कधीच तो तब्बेतीच्या नावाखाली घरात बसला नव्हता .. आणि असा विक पण झाला नव्हता .. त्याला बघून सगळ्यांना वाईट तर वाटत होते , पण श्रिया ला खूप जास्त वाईट वाटत होते… ती अजून पर्यंत त्याच्यासोबत मनमोकळे पणाने बोलली नव्हती. 

" दादा ….".... श्रियाने अर्जूनच्या रूमचा दरवाजा नॉक केला. 

अर्जुनने तिच्याकडे बघून स्मित केले तशी ती पळतच येत त्याचा गळ्यात पडली. 

" Sorry दादा "..... श्रिया त्याला बिलगून रडायला लागली. 

" Shriya , everything is fine now ….right ".... अर्जुन तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत बोलला. 

" माझ्यामुळे तुला इतका त्रास सहन करावा लागला …. मी विश्वास नाही ठेवला तुझ्यावर , माझा दादा माझं कधीच वाईट नाही करणार माहिती असून सुद्धा मी त्या खोट्या प्रेमामध्ये वाहवत गेली …..".... श्रिया रडत रडत बोलत होती. 

" श्रिया , सगळं ठीक आहे , काही वाईट नाही झालं , हे महत्त्वाचं आहे …. don't cry now ... आणि मी फिट आहे , दोन दिवस आराम झाला की सगळं ठीक होईल …. तू ठीक आहेस ?".... अर्जुन 

" हो …".... श्रिया 

" Good ".... अर्जुन 

" तू आराम कर , नंतर बोलू …".... श्रिया आपले डोळे पुसत कसेबसे चेहऱ्यावर हसू आणत त्याच्या रूम मधून बाहेर पडली. 

ती ठीक जरी असली तरी ती आतून थोडी तुटली होती…देवेश ने जरी खोटं प्रेम केले होते तरी तिचे मात्र खरं प्रेम होते … त्यामुळे या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणे खूप त्रासदायक होत होते तिला… थोडा वेळ तर लागणार होता .. 

********

माहीने स्वतःची आणि मिराची जाण्याची तयारी करून ठेवली. आज संध्याकाळी नलिनीने सांगितल्याप्रमाणे ती जाणार होती. 

ठरल्याप्रमाणे माही आणि सगळे अंजलीला पोहचवायला आणि अर्जूनच्या तब्बेतीची विचारपूस करायला आले होते. सगळ्यांचे औपचारिक बोलणं झालं . पण सगळे मात्र माहीवर नाराज होते. तिच्यासोबत कोणीच बोललं नाही. अधून मधून आशुतोष बोलायचा पण सगळे नाराज असल्यामुळे परत तो शांत होत होता. अर्जुनला झोप लागली आहे म्हणून कोणी त्याला डिस्टर्ब केले नाही. माही ला मात्र कधी कधी अर्जुनला भेटते असे झाले होते …. तिची सुरू असलेली तळमळ आजी, आशुतोषच्या लक्षात आली होती. आशुतोषने तिला बहाण्याने वरती घेऊन गेला. नलिनीच्या ते लक्षात आले , पण तिनेच माहीला अर्जुनला शेवटचे भेटायची परवानगी दिली होती ..सो ती पण शांत राहिली… 

" जा , भेट त्याला ".... आशुतोष

" पण सगळे ?".... माही 

" मी आहो …. काळजी नको करू ".... आशुतोष 

माहीने होकारार्थी मान हलवली आणि ती अर्जूनच्या रूम मध्ये गेली. अर्जुन झोपला होता.. अर्जुनची झोपमोड होऊ नये म्हणून तिने आवाज न करता दार बंद केले… अर्जूनच्या बेड वर त्याचाजवळ जाऊन बसली… खूप वेळ त्याला डोळेभरून बघून घेत होती. आता दूर जायचं होतं , त्याचा पासून दूर… दूर जायचा विचारानेच तिचे मन तडफडू लागलं…. हळूहळू ती त्याचा जवळ सरकायला लागली….त्याच्या डोक्यातून मायेने हात फिरवला … त्याचा कपाळावर ओठ टेकवले… त्याचा गालावर हळूवार स्पर्श करत किस केले….. 

" सॉरी सर ,पण तुम्ही सुखरूप असावे हीच इच्छा आहे . शरीराने दूर असणार आहे , पण नेहमीच फक्त तुमचीच असणार आहे ..."..…मनातच ती त्याची माफी मागत होती. परत तिथे जास्त वेळ थांबले तर पुढे पाऊल टाकण तिला कठीण होणार होते . तिचे डोळे पाण्याने भरून आले होते...तिने त्खाली बेडजवळ वाकून त्याचा हातावर किस केले.. आणि परत जाण्यासाठी वळली . तेवढयात तिच्या हाताच्या मनगटावर पकड घट्ट झाली आणि ती अर्जुनकडे ओढल्या जात डायरेक्ट त्याच्या कुशीत बंदोबस्त झाली होती… 

" मला न भेटता कुठे जात होती?".... अर्जुन

" तुम्हाला कसं कळलं ? "... माही 

" ह्मम… मला कळतं ".... अर्जुनने तिच्या डोळ्यांमध्ये आपली नजर स्थिरावली...

" मी , ते…. तुम्हाला….भेटायला….तुम्ही झोपले होते म्हणून…..".... माही अडखळत बोलत होती. 

" ह्मम ….".... अर्जुन 

" तुम्हाला बरं वाटते आहे आता ?"... माही 

" ह्मम "..... अर्जुन 

" काळजी घ्या स्वतःची …".... माही 

" ह्मम , तू आहे माझ्या काळजी घ्यायला, मला काही काळजी नाही "..... अर्जुन 

" असं नाही , स्वतःची काळजी स्वतःला घ्यायला हवी ".... माही 

" No …तू घ्यायची …. It's my order ".... अर्जुन

" नाही तर काय कराल ?.. पगार कट कराल काय ?"..... माही 

" माही , काहीही झालं , आभाळ कोसळलं तरी तू नाही बदलणार …. हो ना".... अर्जुन 

माही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती.. 

" मग आपल्या दोघांमध्ये salary कुठून आली ? तू तुझं डोकं वापरायचं नाही , असेच ठरवले ना…? "..... अर्जुन 

" हां ? … तुम्ही ऑर्डर म्हणाले ना..?"..... माही 

" प्रेमाने दिलेली ऑर्डर आहे ती …. माझा तेवढा तर अधिकार आहेच तुझ्यावर ".... अर्जुन 

" हो …. "..... माही 

" काय झालं आहे ? काही प्रोब्लेम झाला आहे का ? डोळे असे का दिसतात आहे ? परत रडली काय ? कोणी काही बोललं काय ?".... अर्जून 

माहीने नकारार्थी मान हलवली , आणि त्याच्या गळ्यात हात घालत त्याला घट्ट बिलगली…कदाचित ती तिची त्याला मारलेली शेवटची मिठी होती. 

**********

क्रमशः 

**********

हॅलो फ्रेंड्स …

भाग 76 वाचून खूप जणांना राग आला…. परत माही च्या आयुष्यात वादळ , अर्जुन माहीला दूर करणार काय ? आणि बहुतेकांनी नलीनीे वर राग काढला, की नलिनी एक स्त्री असून माही ला का समजून घेत नाही आहे ..इत्यादी वगैरे 

आपल्या मुलासाठी मुलगी शोधतांना एका आईला साधं काळी सावळी मुलगी चालत नाही, गोरी मुलगीच priority असते , विधवा , divorcee मुलगी नको असते …. मुलगा खूप शिकला असेल , चांगल्या पदावर काम करत असेल तर मुलगी पण चांगली शिकलेली , नोकरी करणारी हवी असते….मुलाने स्वतःहून पसंत केलेली मुलगी सुद्धा घरात स्वीकारताना खूप आढेवेढे घेतले जातात मुलगी चांगली असली तरी…love marriage साठी पण लगेच घरातून होकार मिळत नाही.... वरून तोलामोलाचे घर हवे असते …. एका लग्नात अशा कितीतरी अपेक्षा असतात….

मग आता इथे नलिनी चे काय चुकले ? …. जिथे मुलगी काळी आहे म्हणून नकार दिल्या जातो…. तिथे जिच्यावर बलात्कार झाला आहे ती मुलगी स्वीकारणं खरंच सोपं असेल काय? त्यात आपल्या मुलाचं आयुष्य धोक्यात होते , हे बघून ती स्वीकार करेल काय ? आई चं मन आहे शेवटी ते … आपल्या मुलांना बेस्ट मिळावं , ते सुखरूप राहावं एवढीच इच्छा असते ना एका आईची ….. बघा एका आईच्या दृष्टिकोनातून विचार करून बघा . 

कथा आता संपत आली आहे …. End happy असेल …. Thank you ! 

********

खूप खूप धन्यवाद कॉमेंट्स आणि लाईक साठी ! 

पुढील भागांच्या अपडेट साठी फॉलो करा ईरा

http://www.facebook.com/irablogs