Login

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 76

माही अर्जुन

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 76

भाग 76

अर्जुन ला शुद्ध आल्यामुळे सगळे आता रिलॅक्स झाले होते ... दोन दिवसांच ते टेन्शन थोडं कमी झाले होते . आशुतोष ने घरी फोन करून सांगितलं तर नलिनी अर्जुनला भेटायला यायचं म्हणत होती , रात्र खूप असल्यामुळे त्याने अर्जुन ठीक आहे सांगत, घरीच आराम करायला सांगितले आणि सकाळी येण्याचे सुचवले.... नलिनीला पण आशुतोषच म्हणणं पटलं.... 

दोन दिवसाची सगळ्यांचीच खूप दगदग झाली होती… मन आणि डोकं सुद्धा दमले होते… अर्जुन ठीक आहे म्हटल्यावर घरी सुद्धा सगळ्यांना शांत झोप लागली , इकडे आकाश आणि आशुतोष अर्जूनच्या रूमच्या बाहेर बसल्या जागी पेंगले…. आतमध्ये माही अर्जूनच्या मिठीत सुखावली होती तर अर्जुन औषधांच्या ग्लानीत …. 

………….

आशुतोष चा फोन वाजला तसा तो खडबडून जागा झाला…. नलिनी , आजी , मामा अर्जुनला भेटायला येत आहे म्हणून त्याला कळवले…. ताणें फोन बघितला तर पहाटेच साडेपाच झाले होते….. आणि एकदम त्याचा लक्षात आले माही इथे आहे …. घरच्यांनी तिला इथे बघितले तर ते परत चिडतील. …. त्याने आकाश ला आवाज दिला आणि माही ला घरी सोडायला सांगितले…. 

" माहीला उठवले तर भाई ची पण झोप मोड होईल , खूप शांतपणे झोपला आहे "..... आकाश आशुतोषला अर्जूनकडे इशारा करत बोलला. 

" ह्मम , पण आई , आजी येत आहेत …. उठावावे तर लागेल , नाहीतर खूप गोंधळ होईल … ".... आशुतोष 

" ठीक आहे , तुम्ही माहीला उठवा , मी फ्रेश होऊन येतो पाच मिनिटात ".... आकाश म्हणत आकाश फ्रेश व्हायला गेला… 

आशुतोष अर्जुन च्या रूम मध्ये आला …. तर माही आपले दोन्ही पाय पोटाशी पकडत अर्जुनला बिलगून त्याच्या कुशीत झोपली होती…. अर्जुनने पण ती बेड वरून खाली पडू नये म्हणून एका हाताने तिला पकडून ठेवले होते….

" वेदनेत स्वतः आहे , पण त्यातही काळजी मात्र माहीचीच….नक्कीच पेशंट कोण आहे कळत नाही …अर्जुन तुझ्याकडे बघून अजिबात वाटत नव्हते तू इतका बदलू शकतो ...पण इतकी गोड मुलगी आयुष्यात असल्यावर दगडाला ही पाझर फुटेलच "..... आशुतोष त्या दोघांना बघत मनातच विचार करत होता...आशुतोषला माहीला उठवणे खूप जड जात होते …. तो माही जवळ जात त्याने मायेने माहीच्या डोक्यावरून हात फिरवला … तशी माही डोळे उघडून बघू लागली तर आशुतोष होता… 

" बापरे , मी सरांच्या मिठीत .."... विचार करत ती ताडकन उठायला गेली … तर आशुतोष ने तिला हळू उठायला खुणावले…. 

" हळु , त्याची झोपमोड नको व्हायला …. ".... आशुतोष … माहीने होकारार्थी मान हलवली आणि अर्जूनचा तिच्या भोवतीचा हात काढायचा प्रयत्न करत होती … पण त्याने तिला चांगलंच घट्ट पकडून ठेवले होते . 

" आई , आजी येत आहेत , म्हणून तुला उठवले …. हळूवार पणे उठ , ये बाहेर , मी आहो "..... बोलत आशुतोष रूमच्या बाहेर निघून आला. 

माहीने अर्जुन उठणार नाही याची काळजी घेत तिच्या भोवतीचा त्याचा हात हळुवारपणे बाजूला करत ती बेडवरून उठली….अर्जुनला डोळेभरून बघून घेत होती. घरच्यांचा राग कधी शांत होईल आणि परत कधी भेट होईल हेच तिच्या डोक्यात येत होते … तिने हळूच त्याचा हातावर आपले ओठ टेकवले .. आणि बाहेर निघून आली. 

" माही, मी काय म्हणतोय…..".....

" हो , मी जाते घरी ……".... आशुतोष बोलायच्या आतच ती बोलली. 

" Sorry "..... आशुतोष 

" सॉरी नका म्हणू , मला कळतेय सगळं …. उलट मलाच तुम्हाला thank you म्हणायला हवे…. तुमच्यामुळे आज सरांना भेटता आले…."... माही 

" अर्जुनला बरं होऊ दे , घरातील वातावरण लवकरच तो ठीक करेल …आणि मी आहो तुझ्या सोबत , अगदी एकटं वाटून घ्यायचं कारण नाही...काहीपण असलं की मला सांगायचं .".... आशुतोष 

माहिने त्याला स्मायल केले….

" आकाश तुला घरी पोहचवेल ….".... आशुतोष 

" ठीक आहे "...... 

********

साडेसहा च्या सुमारास घरील सगळे अर्जुनला भेटायला आले होते….अर्जुन झोपला होता म्हणून कोणी डिस्टर्ब केले नाही , सगळे त्याची उठायची वाट बघत होते . सकाळी नर्स एकदा सगळं चेक करून गेली. थोड्या वेळाने अर्जुनला जाग आली …. तेवढयात सगळे अतामध्ये आले … 

 त्याला ठीक असलेले बघून सगळ्यांना खूप आनंद झाला …. 

" बरं , वाटते आहे ना अर्जुन आता ?".... नलिनी त्याच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत बोलल्या…. त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आले होते … 

" हो…. Perfectly fine … काही नाही झालं आहे ".... अर्जुन , अर्जुनला आईच्या डोळ्यात अश्रू बघून वाईट वाटत होते . 

प्रत्येकजण त्याच्या तब्बेतीची चौकशी करत होते , तो हो नाही मध्ये उत्तर देत होता … पण त्याची नजर इकडे तिकडे भिरभिरत होती … असे वाटत होते कुणाला तरी शोधतोय … 

" काही पाहिजे काय ? कोणाला शोधतोय?".... आजी 

" माही ….. ".... अर्जुन 

अर्जुनच्या तोंडून माहीचे नाव ऐकून नलीनीला राग आला… 

" ती ? ती नाही आहे ".... नलिनी. 

" कुठे गेली ? आतापर्यंत होती इथे "..... अर्जुन 

त्याचं बोलणं ऐकून आकाश , आशुतोष च्या डोक्यावर आठ्या पडल्या… दोघंही एकमेकांकडे बघू लागले…. 

" हो अर्जुन ती घरी गेली आहे , मिराचा फोन आला होता म्हणून , आई डॉक्टरांनी अर्जुनला आराम करायला सांगितला आहे …. अर्जुन तू आराम कर …. आम्ही बाहेर आहो….".... म्हणत आशुतोष सगळ्यांना बाहेर काढत होता .. 

" अरे पण ….".....

"आई , जास्त बोलण्याने डोक्यावर प्रेशर येऊ शकते , तब्बेतीवर परिणाम होईल… आपण बाहेर बोलू ".... आशुतोष 

" अर्जुन , आराम कर … आम्ही बाहेर आहोत".... आशुतोष 

 माही ला सांगा , मीराला घेऊन ये …. तिला बघायची इच्छा आहे ….".... अर्जुन 

" हो "..... आशुतोष 

सगळे बाहेर निघून आले … 

 आशुतोष , हे काय बोलत होता अर्जुन ? माही इथे आली होती ?".... नलिनी रागात बोलत होत्या

" हो "...... आशुतोष 

" मी सांगितले होते , ती मुलगी इथे यायला नको … तरी ती इथे कशी ?"..... नलिनी 

" हो हो … सांगतो… तुम्ही आधी शांत व्हा ".... आशुतोष

" नलिनी, शांत हो , बस बघू इथे ".... आजी 

आजीच्या बोलण्याने नलिनी थोडी शांत झाली. 

" हे बघा आई , तुम्हाला माहिती होते तो शुद्धीत येत नव्हता…. आपण सगळ्यांनी त्याच्यासोबत बोलून बघितले होते …. त्याचा काहीच रिस्पॉन्स नव्हता … वेळ निघत चालली होती … काय करावं काहीच सुचत नव्हते….. तो ज्यांना आपले मानतो, ते सगळे त्याला भेटून गेले, माही च एक राहिली होती … म्हणून मग तिला बोलावले …. बहुतेक तो तिचीच वाट बघत होता…… ती आल्यावरच त्याला शुद्ध आली ... किंवा तिच्या मुळे तो शुद्धीत आला ,असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरू नये ….. त्याचं खरंच खूप प्रेम आहे तिच्यावर … त्यापेक्षा ही जास्ती त्याला तिची काळजी आहे … तिच्या विरोधात जर काही बोललो तर त्याला सहन होणार नाही, मग तो काहीही करेल आहे …. सद्ध्या त्याला टेन्शन नाही द्यायचं असे डॉक्टर बोलले आहे. एकदा बरा होऊन घरी आला की बोला तुम्ही …. सध्या त्याच्या मताप्रमाणे असू द्या…. ".... आशुतोष सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न करत होता…. 

" आशुतोष , तुम्हाला कळते काय, तिच्यामुळेच आज त्याची ही हालत झाली आहे ….".... नलिनी 

नलिनी काहीच ऐकून घेण्याचा मूड मध्ये नव्हत्या , आशुतोष हवालदिल होत आजी कडे बघत होता …. 

" नलिनी , आशुतोष एकदम बरोबर बोलत आहेत … अर्जुन सुखरूप असणे हे आपल्यासाठी महत्वाचे आहे …. ".... आजी 

" पण आई …."....

" आता पण नको …. अर्जुन लवकरात लवकर घरी कसा येईल याकडे लक्ष द्यायला हवे ".... आजी 

" नलिनी , आई , आशुतोष बरोबर बोलतात आहे ….."... मामा

त्यांचं ऐकून नलिनी शांत झाली. 

माही घरी पोहचली तेव्हा सगळे झोपलेच होते . त्यामुळे तिला फार काही विचारणा झाली नव्हती. आकाश ने अंजलीला समजावले , अर्जुन हॉस्पिटल मधून घरी येयीपर्यंत त्याने तिला इकडे घरीच राहायला सांगितले. माही घरी येऊन मीराला बिलगून झोपली. मीरा आता तिला अर्जूनचाच अंश वाटायला लागली होती… इतकी माया अर्जुन तिला लावत होता… आणि तिची काळजी , कदाचित खरा बाप पण असता तर नसती केली येवढं काळजी तो तिची करायचा…. " जन्म दिल्यानेच बाप बनतो " हे अर्जुन ने खोटे ठरवले होते …. मीरा मध्ये माहीला अर्जुन दिसायचा … ती जवळ असली की अर्जुन जवळ आहे असेच तिला आता भासू लागले होते… तिने मिरा ला करकचून मिठी मारली आणि निद्रेच्या अधीन झाली.  

*********

इकडे देवेशला पोलिसांनी पकडले होते . तो पळाला जरी होता तरी अर्जूनची माणसं त्याच्यावर नजर ठेऊन होतेच , त्यामुळे त्याला पकडणे कठीण नव्हते गेले. त्याला बेल सुद्धा मिळणार नाही अशी सोय करण्यात आली होती. 

**********

अर्जुनची recovery फास्ट होत होती. नलिनीच्या धाकामुळे दोन दिवस माही अर्जुनला भेटायला आली नव्हती. काहीतरी कारण देऊन वेळ निभावून नेली होती. पण आज तो माही आणि मिराला भेटण्याचा हट्टच धरून बसला होता .. कोणाचंच काही ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हता. शेवटी नलिनी सुद्धा माहीला येऊ देण्याची परवानगी दिली … आजीने घरी फोन करून माहीला पाठवायला सांगितले त्यामुळे आत्याबाई आणि छायाला तिला अडवण्याचा काही कारणच नव्हते. इकडे अर्जुनला भेटायचं म्हणून मिरा पण खूप खुश होती…. आकाश त्यांना घ्यायला आला , अंजली , माही आणि मीरा हॉस्पिटलला पोहचले . अर्जुनची रूम फैव स्टार हॉटेलच्या रूम पेक्षा कमी नव्हती … त्यामुळे इतर पेशंटला डिस्टर्ब व्हायचं काही काम नव्हते.

" अर्जुन sssss "...... मीरा पळतच त्याचा बेड जवळ गेली. 

" Hey sweetheart …."..... अर्जुन नीट उठून बसला…. एका हाताला अजूनही सलाईन सुरू होती. मीरा त्याचा पुढे हात उंचावत त्याला कुशीत घे म्हणून खुणावत होती. 

" मीरा नाही , सरांना बरं नाही आहे , बघ त्यांच्या डोक्याला बाऊ झाला आहे , आपण इथे चेअर वर बसून बोलूया "..... माही तिच्या पाठोपाठ रूम मध्ये येत बोलली. 

" नाही , मला अर्जुन जवळ जायचं ….".... मीरा हट्ट करू लागली. आणि माही तिला रागवत होती. अर्जुन त्या दोघींची सुरू असलेली शब्दाशब्दी ऐकत होता…. 

" दोघी ही सारख्याच …. मीरा लहान तरी आहे … ही माही कधी मोठी होईल ".... विचार करत त्याला त्या दोघींना बघून त्याची स्मायल ब्रॉड झाली ….. 

" माही , दे तिला माझ्या जवळ ".... अर्जुन 

" नाही , तुम्हाला त्रास …"....

" I am fine ….. दे तिला , मला खाली वाकता येणार नाही …..".... अर्जुन 

माहीने मीराला उचलले आणि त्याचा जवळ बसवले…… " इथे शांत बसायचं , अजिबात त्यांना त्रास नाही द्यायचा "..... माहीच्या मीराला instructions देणे सुरू होत्या . दोघींच्या पण चेहऱ्यावरील क्यूट क्यूट हावभाव बघून त्याला खूप गम्मत वाटत होती. 

पण ती मिराच , ऐकतेय कुठे , थोड्या वेळ ती मान हलवत माही च बोलणं ऐकत होती…. तिला शांत झालेले बघून लगेच अर्जूनच्या गळ्यात हात घालत त्याला बिलगली …. 

" मीरा ssss "...... माही तिला दूर करायला गेली. 

" माही , असू दे "..... अर्जुन , त्याने पण मीराला एका हाताने आपल्या कुशीत घेतले. माही तिथे त्यांच्या जवळच उभी दोघांना बघत होती.

नलिनी बाहेर दाराच्या काचेतून हे सगळं बघत होत्या. माही आली तेव्हा त्या तिच्यासोबत काहीच बोलल्या नव्हत्या…. माही बोलायला गेली तरी त्या रागाने तिथून निघून गेल्या होत्या. 

" या दोन तीन दिवसात तुम्ही त्याला इतकं आनंदी , किंवा हसतांना बघितले काय ? त्या दोघी त्याचं लाईफ झाल्या आहेत ".... आशुतोष 

" सवय झाली आहे त्याला तिची , बाकी काही नाही …. त्याचं हे प्रेम वैगरे सारख्या फालतू गोष्टींवर विश्वास नाही आहे. ".... नलिनी 

" तो कॉलेजला जाणारा मुलगा नाही आहे आई , की त्याला सवय आणि प्रेम यातला फरक कळणार नाही …. ".... आशुतोष 

नलिनी काही बोलल्या नाही आणि तिथून चालल्या गेल्या. 

" अर्जुन , हा बाऊ खूप दुखतो का ?".... मीरा त्याचा डोक्यावर असलेल्या पट्टीला हात लावत बोलली. 

" नाही ….. "..... अर्जुनने तिचा चिमुकला हात आपल्या हातात घेत त्यावर किस केले. 

" हा बाऊ कसा झाला ? तू पडला काय?".... मीरा 

" ह्मम पडलो…".... अर्जुन

" लक्ष देऊन नाही चालले की असेच होते … तू बघून का नाही चालला ? तू काय लहान आहे का माझ्यासारखा ? माऊ तू फक्त मलाच रागावते…. अर्जुनला पण रागव , त्याला पण नीट चालायचं कळत नाही…."..... मीराची बडबड सुरू होती …. अर्जुन हो नाही करत तिला उत्तर देत होता . 

" अर्जुन , तू बोलला होता ना , तू माझ्यासोबत राहशील ….. मग कधी सोबत राहू ?…. ही माऊ पण मला तुझ्याजवळ घेऊन येत नाही …. मला तुझी खुप आठवण येते….. मी काल खूप रडली होती …..ही रागावली मला … ".... मीरा 

" Mahi , this is very bad ….. मिराने रडलेले मला अजिबात आवडत नाही ….. "... अर्जुन 

" हट्टी झालिये ती , म्हणून रागावले ".... माही

" मला फक्त तुझ्याजवळ यायचं होत"..... मीरा केविलवाणा चेहरा करत बोलली. 

" Oh बच्चा….. मी हॉस्पिटल मधून घेरी आलो की आपण सोबत राहू… okay ".... अर्जुन तिला आपल्या छातीशी कवटाळले आणि तिच्या कपाळावर किस केले… 

" काय झालं ? अशी का बघतेय ? "... अर्जुन , माही एकटक त्या दोघांकडे बघत होती…मिरा तिच्या कंप्लेंट करत होती… 

" ती जेलस झाली ".... मीरा खुदकन हसली 

" का ?".... अर्जुन 

" कारण तू मला कुशीत घेतले , तिला नाही घेतले , तू मला किस केले तिला नाही केले ...म्हणून "..... मीरा , ते ऐकून अर्जुनला हसू आले…. माही तर डोळे मोठे करत तिच्याकडे बघत होती. 

" तुला एक सिक्रेट सांगू का? ".... मीरा 

" हो ".... अर्जुन 

" इकडे ये , माझ्या जवळ कान दे तुझा ".... मीरा क्यूट हातवारे करत खुसुरपुसुर करत बोलत होती पण ऐकू मात्र माहीला सुद्धा जात होते .

" सांग ".... अर्जुन तिच्याजवळ थोडा खाली वाकला… 

" माऊला तू आवडतो ".... मीरा 

" तुला कसे माहिती ?".... अर्जुन 

" ती ना मोबाईल मध्ये तुझाच फोटो बघते … आपल्याला जे आवडते तेच मोबाईल मध्ये बघतो ना जसे मी डोरेमॉन बघते…. तशी माऊ ना फक्त तुझाच फोटो बघते…. तुला बाऊ झाला ना तर ती रडत होती त्या दिवशी खूप आणि जेवण पण नव्हती करत "..... मीरा 

मीरा सांगत होती , तसे अर्जुन ने माही कडे बघितले…. नजरानजर झाली नि माहीने मान वळवली. 

" तरी तू फक्त माझा लोभ करतो, तिचा नाही करत …. म्हणून ती रुसली ".... मीरा

" अरे बापरे …. पण मग आता काय करायचं?".... अर्जुन 

" तिचा पण लोभ कर, तिला पण कुशीत घे ना तू ".... मीरा 

" Okay sweety …. Maahi come ".... म्हणत अर्जुनने तिचा हात पकडला आणि आपल्याकडे ओढले… आपल्या एका हाताने दोघींनाही त्याने आपल्या मिठीत घेतले…. 

" ये ssss , मिराची फॅमिली ".... मीरा आनंदाने टाळ्या वाजवत होती ….

" आणि बाबाची प्रिन्सेस मिरा "..... अर्जुन , तशी मिरा गोड हसली…. " तू माझा बाबा आहे ?"..... मिरा

" Yess my baby ".... अर्जुन 

" मी तुला बाबा म्हणू ?" ….. मिरा 

" हो "..... अर्जुन 

" माझा बाबा …..".... परत मिरा खूप आनंदली. तिला इतकं खुश बघून माहीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले…

" मीरा ची माऊ रडते आहे …. आता काय करायचं ?".... अर्जुन 

" मीरा रडली की माऊ तिला किस्सी करते , मग मिरा हसते ….. तू पण कर तिला किस्सी , मग ती पण हसेल "..... मीरा 

तिचं बोलणं ऐकून माही ला हसू फुटलं…. मिराची आणि अर्जुन ची मस्ती सुरू होती. माही बाजूला चेअर वर बसून दोघांना बघत होती. 

" Hello Mr Arjun , how are you feeling now ?".... डॉक्टर आतमध्ये येत बोलले.. 

" Better "..... अर्जुन 

" अरे वाह , ही छोटी स्वीट परी कोण आहे ?".... डॉक्टर 

" मी मिरा ….".... मीरा 

" गोड परीच गोड नाव ".... डॉक्टर अर्जुनला चेक करत होते…. मीरा त्यांच्याकडेच बघत होती. 

" डॉक्टर मामा , अर्जुनला इंजेक्शन नाही देत ना तुम्ही ? "..... मीरा 

" तू सांग , द्यायचं की नाही द्यायचं ?".... डॉक्टर

" नको , त्याला दुखेल ".... मीरा चेहरा पाडत बोलली. 

" अरे …. बरं तू म्हणतेय तर नाही देत … पण मग यांना सांगायचं healthy food खायचं , म्हणजे मग मी इंजेक्शन नाही देणार , okay ".... डॉक्टर

" हो ….डॉक्टर मामा आम्ही अर्जुनला घरी घेऊन जाऊ ?".... मीरा 

" अजून दोन तीन दिवस , मग घेऊन जा …. "..." She is so cute, तुमची काळजी आहे तिला ".... डॉक्टर हसत बोलले

" She is my daughter ".... अर्जुन 

ते ऐकून डॉक्टर अजब प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघू लागला…. 

" Adopted …..".... माही डॉक्टर चे हावभाव बघून लगेच बोलली. 

" Oh , very nice ".... बोलत डॉक्टर बाहेर निघून आले… 

" असं का सांगितले?".... अर्जुन 

" खरं काय ते सांगितलं".... माही 

" बरं , पुढे आता असं काही सांगू नको ".... अर्जुन 

माहीच्या लक्षात आले होते त्याला ते काही आवडले नाही… तिने होकारार्थी मान हलवली. 

************

अर्जुनला पाच दिवस झाले हॉस्पिटल मध्ये… आता त्याचा तब्बेतीत बरीच सुधारणा होती. उद्या हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळणार होता. 

इकडे नालिनीची चलबिचल वाढली होती. माही ला अर्जुन च्या इतके जवळ बघून त्यांना त्रास होत होता. शेवटी मनाशी काही ठरवून त्यांनी बाहेर माहीला भेटायला बोलावले. 

*************

ठरल्या वेळेत एका जवळच्या पार्क मध्ये दोघी भेटल्या. 

" अर्जुनच्या आयुष्यातून निघून जायचं …. नलिनी 

ते ऐकून माहीच्या पाया खालील जमीनच सरकली. 

***********

क्रमशः