तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 75

माही अर्जुन

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 75

माही आतापर्यंत अर्जुनला भेटली नव्हती . रडून रडून तिचे प्राण कंठाशी आले होते . माहिने आकाशला फोन केला होता आणि त्याला अर्जुनला भेटायचे म्हणून विनवणी करत होती . आकाश सुद्धा तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता … बाजूला उभा आशुतोष त्यांचे बोलणे ऐकत होता. 

" माही , आकाश घ्यायला येतो आहे "....आशुतोष ने आकाशच्या हातातून फोन घेतला आणि माही सोबत फोनवर बोलत होता. 

" जिजाजी, पण आत्या ?"....आकाश

" मी बघतो , माही , आकाश येतोय तुला घ्यायला, ये त्याच्यासोबत लवकर ".... आशुतोषने फोनवर बोलून फोन ठेवून दिला. 

जिजाजी तुम्ही काय केले आत्याला माहिती पडले तर ती खूप नाराज होईल तिला आवडणार नाही हे सगळं आकाश

" आकाश , अर्जुन शुद्धीवर आला नाही आहे , या क्षणाला त्याचे लवकरात लवकर शुद्धीत येणे गरजेचे आहे , वेळ हातातून निसटत चालली आहे . माहीची हालत बघितली ना , कशी आहे ? तिला जर काही झालं तर , अर्जुनला शुद्धीत आल्यावर काय उत्तर देशील ? तिने काल पासून स्वतःला कसे सांभाळले असेल काय माहिती ...सध्या तरी अर्जुन आणि माही दोघांनाही एकमेकांची गरज आहे . जा घेऊन ये .तसही आता कोणी नाही आहे इथे, होईल हँडल "....आशुतोष

आता आकाशला सुद्धा आशुतोषचे बोलणे पटले आणि तो माहीला घ्यायला निघाला. 

माही आशितोष सोबत बोलून फोन ठेवून दिला , आणि तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला . एक-दीड दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता तिला अर्जुनला बघता येणार होते. 

थोड्यावेळातच आकाश माहीच्या घरासमोर पोहोचला. रात्र बरीच झाली होती , जवळपास बारा वाजत आले होते. आकाशने बाहेरुनच अंजलीला फोन करून तो बाहेर आला आहे हे कळवले. 

" माही, आकाश बाहेर आले आहेत , तुझी वाट बघत आहेत "....अंजली

" ताई... घरी..? आत्याबाई..? आई..?"... माही

" नको काळजी करू , मी सांभाळते. तसेहि सगळे झोपले आहेत . तू जा आणि हो सकाळ व्हायच्या आत परत येऊन जा"..... अंजली

" थँक्यू ताई "....माहिने तिला घट्ट मिठी मारली आणि जायला निघाली. 

" माही , मागच्या दाराने जा , उगाच कोणी उठून परत ठोकायला नको "...अंजली 

अंजलीचे बोलणे ऐकून माहीच्या चेहऱ्यावर विचित्र हसू उमटले. 

" काय झालं?'... अंजली

" सगळीच लोकं माझी आपली , तरीही क्षणार्धात परकी झाली….. आपल्या व्यक्तीला भेटायचं , ते पण सगळ्यांना पासून लपवून….. मी नव्हते केले ताई काही चुकीचे , तरी सगळ्यांनी मला चुकीचे ठरवलं …."..माहीचे डोळे पाणावले. 

" माही , आता फक्त अर्जुन सरांना बघायचं…. या सगळ्या गोष्टी नंतर सुद्धा डिस्कस करता येतील. जा आता लवकर , कदाचित ते सुद्धा तुझीच वाट बघत आहेत ".....अंजली तिचे डोळे पुसत बोलली…" आणि हो , तिथे असे रडत बसू नको , अर्जुन सरांना पण अशी रडकी माही आवडणार नाही"..

 माहीने होकारार्थी मान हलवली आणि मागच्या दाराने पळत जात आकाशच्या कार मध्ये जाऊन बसली . भरधाव वेगाने थोड्यावेळात कार हॉस्पिटलमध्ये पोहोचली. रात्रीची वेळ असल्यामुळे काहीच वर्दळ नव्हती. हॉस्पिटलच ते , तिथली शांतता सुद्धा जीवघेणी वाटत होती . आशुतोष गाडी पार्क करत होता . माहीला अजिबात धीर धरवत नव्हता आकाशला रूम नंबर विचारत झपाझप पावले टाकत, पळतच नाही निघाली. अर्जुनला बघायची ओढ तिला लागली होती .अर्जुनच्या रूम जवळ ती येत दार उघडणार तेवढ्यात तिला तिथे असलेल्या नर्सने अडवले. 

" तुम्ही कोण आहात?? आतमध्ये जायला कोणाला परवानगी नाही? "..... नर्स

"मी…. मी…."....

" लेट हर गो!".... माही काही बोलायच्या आतच आशुतोष तिथे येत बोलला.

"पण... सर.. डॉक्टर..?"..... नर्स

"सिस्टर, प्लिज तिला जाऊ द्या , मी बोलेल डॉक्टरांसोबत".... आशुतोष

"ठीक आहे, मॅडम तुम्ही जाऊ शकता".... नर्सने रूमचे दार उघडले…... माही लगेच आतमध्ये गेली. समोर बेडवर अर्जुनला निपचित पडलेले बघून तिचे पाय तिथे थिजले. अर्जुनला बघून तिचे मन खूप भरून आले…. भरल्या डोळ्यांनी तिने मागे वळून आशुतोषकडे बघितले. 

" शुद्ध आली नाही आहे त्याला अजूनपर्यंत….. बहुतेक तुझीच वाट बघतोय, जा त्याच्याजवळ, बोल काहीतरी, उठाव त्याला"..... आशुतोषचा आवाज जड झाला होता . माहीला अर्जुनला उठाव म्हणून सांगत तो बाहेर निघून आला . माही लगेच अर्जुनच्या बेड जवळ गेली. 

 सतत चिडके , खडूस भाव चेहऱ्यावर घेऊन फिरणारा, कामासाठी सगळ्यांना त्रासावून सोडणारा अर्जुन, शांतपणे बेडवर पडला होता . डोक्याला बांधलेली मोठी पट्टी , मिटलेले डोळे , निस्तेज चेहरा, हाताला सलाइन बघून तिला रडू कोसळले. 

अर्जुनच्या आयुष्यात आपण आलो नसतो तर , आज अर्जुनवर ही वेळ आली नसती...उगाचच तिच्या डोक्यात विचार येऊन गेला . पण आता तिला रडून चालणार नव्हते . तिने आपल्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि त्याच्या जवळ जात त्याच्या डोक्यावरून हात फिरवणार तेवढ्यात तिचे त्याच्या डोक्यावरील पट्टीकडे लक्ष गेले आणि तिने आपला हात मागे घेतला . त्याचा हात आपल्या हातात घेत तिने त्याच्या हातावर कीस केले आणि त्याच्या जवळ बसली. 

" हे बघा मिस्टर ड्राकुला, आता फार खडूसपणा करायचा नाही हा ...आमच्या सगळ्यांची झोप उडवून , किती वेळ झाला झोपला आहात... इतका वेळ कोणी झोपत असते काय? सोबत राहण्याचे प्रॉमिस केले होते ना तुम्ही , तुम्हाला नसेल निभावता येत तर तसे सांगा... मी निभवेल , पण तुमचं प्रॉमिस तुटू देणार नाही…. जिथे पण जाणार , दोघं मिळून जाणार लक्षात ठेवा ".....माही त्याच्यासोबत खूप बोलत होती, पण त्याच्यामध्ये जरा पण हालचाल होत नव्हती. ते बघून माहीचा कंठ दाटून आला होता . आता तिला पुढे बोलल्या जात नव्हते. आता ती आतून खचत चालली होती. तिला आता खूप घाबरल्यासारखे होत होते . काय करावे काही सुचत नव्हतं. डोळ्यात अश्रू जमू बघत होते . ती थोडी पुढे त्याच्या अगदीजवळ सरकली. एक हात त्याच्या गालावर ठेवत , त्याच्या चेहऱ्याजवळ झुकली . तिच्या केसांचा स्पर्श त्याच्या चेहर्‍याला , कानाला, मानेला होत होता . तिच्या डोळ्यातून अश्रू तिच्या गालावरून घरंगळत त्याच्या गालावर पडत ओघळत त्याच्या कानात गेला. त्याचा जवळ जात रडतच हळुवारपणे तिने त्याच्या गालावर आपले ओठ टेकवले आणि त्याच्या मानेत एक हात घालत तिने त्याच्या माने जवळ त्याला मिठी मारली. 

" अर्जुन, उठा ना हो आता ...प्लीज …"...त्याच्या भोवती आपला हात घट्ट करत त्याच्या मानेजवळ किस करत बोलत होती. 

" अर्जुन , उठा आता , नाहीतर मी पण…..".... ती पुढे काही बोलणार तेवढ्यात तिच्यापाठीवर तिला गरम मायेचा स्पर्श जाणवला आणि हळूहळू ती पकड घट्ट होत असल्याचे तिला जाणवले. माहिने आपला चेहरा वर करत बघितले तर अर्जुनने डोळे उघडले होते आणि तो तिच्याकडे बघत होता . त्याला जागे झालेले बघून तिला खूप आनंद झाला , डोळ्यात अश्रू ओठांवर हसू... अशी काहीशी तिची स्थिती झाली होती. ती लगेच पळत बाहेर येत आवाज देऊ लागली . तिच्या आवाजाने नर्स , आशुतोष , आकाश धावत आले. अर्जुनला बघून नर्सने लगेच डॉक्टरांना आवाज दिला, डॉक्टरांनी येऊन अर्जुनला चेक केले आणि तो out of danger आहे म्हणून सांगितले. ते ऐकून आकाश, आशुतोष , माही सगळेच खूप आनंदी झाले. 

डॉक्टरांनी तिथे असलेल्या फाईल मध्ये काही नोट डाऊन करत नर्सला काही इन्स्ट्रक्शन्स देत अर्जुनला आराम करायला सांगून बाहेर निघून आले. रात्रीचे जवळपास दोनच्या सुमारास अर्जुन शुद्धीत आला होता . आशुतोषने घरी फोन करून अर्जुन शुद्धीत आला असून , तो ठीक असल्याचे कळवले. 

आकाश , आशुतोष अर्जुनच्या बेडजवळ गेले . अर्जुनला शुद्ध आलेली बघून माहीच्या जीवात जीवात जीव आला होता . ती तिथेच उभी अर्जुनकडे बघत होती. 

" अर्जुन, बरं वाटते काय आता?"... आशुतोष

"ह्मम.."...अर्जुन

" डोकं दुखत आहे काय भाई ?"...आकाश

" हो.. थोडं ".....अर्जुन बोलत तर इकडे होता पण तो एकटक माही कडे बघत होता. 

" एक सर्जरी झाली आहे , काही दिवस थोडा त्रास होईल... पण मेडिसिन सुरू आहे तर बरे वाटेल".... आशुतोष

"ह्मम "....अर्जुन

" नाही नाही मेडिसिनची अजिबात आवश्यकता नाही….अर्जुन सर 1-2 जणांवर ओरडले , फाईल मधल्या चुका काढून फाईल फाडून फेकल्या... की लगेच त्यांना बरं वाटेल "....माही मस्करी करत बोलली .. ते ऐकून आकाशला हसू येत होते…. तो अर्जुनकडे बघत गालात हसत होता. 

" या कोण ?'....अर्जुन

"कोण ?"....आशुतोष

"या मॅडम, काकूबाई सारख्या दिसत आहेत त्या?"..... अर्जुन अनोळखी नजरेने माही कडे बघत बोलत होता. 

त्याचं ते बोलणं ऐकून तिघही शॉक झाले…. 

" अरे... ही…. माही".... आशुतोष

" कोण माही?"..... अर्जुन

ते ऐकून माहीचे डोळे पाण्याने काठोकाठ भरून आले होते…. ती भरल्या नजरेने त्याला बघत होती. 

" भाई , अरे ही माही.. आपल्या ऑफिसमध्ये काम करते"..... आकाश

" अर्जुन , अरे काही त्रास होतो आहे काय? डॉक्टरांना बोलवू काय ?"....आशुतोष त्याच्या जवळ जात बोलला. तेवढ्यात अर्जुनाने त्याला एक डोळा मारला. आशितोशच्या लक्षात आले होते अर्जुन काही विसरला नाही आहे . 

" अरे आकाश, अरे होतं असं कधी कधी ...डोक्याला मार लागला आहे , तर मेमरी लॉस होतो... हळूहळू होईल ठीक "...आशुतोषने माहीच्या नकळत आकाशला डोळा मारला. 

" पण... पण ….ते तुम्हा दोघांना ओळखतात ना …..मला का ओळखत नाही आहे?".... माही टेन्शनमध्ये आली होती. 

" अच्छा ते..?.... ते कधीकधी काय होते जुने लोकं आठवतात... पण नुकतेच नवीन भेटलेली व्यक्ती लक्षात नाही राहत"..... आशुतोष

" काय असं कसं होऊ शकते?. सर मला कसे विसरू शकतात?"....माही 

" त्यासाठी तुला आधी यायला हवे होते त्याचा आयुष्यात...का आली नाहीस? चूक सर्वस्वी तुझी आहे "..... आशुतोष 

ते ऐकून आता अर्जुन ला सुद्धा हसू येत होते …. पण त्याने आपला चेहरा अगदी निर्विकार ठेवला होता. 

" हो भाई, अरे ही ती माही आहे …. जिने आपल्या ऑफिस मध्ये सगळ्यात जास्ती तोडफोड केली आहे... तिला तू कसा विसरू शकतो ?"....आकाश

"व्हॉट ?"....अर्जुन

" अरे भाई, ही तीच मुलगी आहे जिने तुझ्या झाडांच्या कुंड्यांमधून माती चोरली होती ".....आकाश

" काय?".....अर्जुन शॉकिंग नजरेने तिला बघत होता. 

" आणि हो , हिने तुला चहा सुद्धा पाजला आहे ….तुला आवडत नाही तरी तिने जबरदस्ती तुला चहा दिला होता "..... आकाश

" आकाश सर , तुम्ही हे काय करताय? तुम्ही त्यांना माझी आठवण करून देत आहे की मलाच हाकलण्याचा प्लॅन करताय?".... माही कळकळीने म्हणाली. आकाश , आशुतोषला हसू येत होते पण त्यांनी आपले हसू दाबून ठेवले होते. 

" सर मी माही आहे ना …..तुम्ही मला एक वर्षापासून ओळखता".... माही तिच्या परीने त्याला तिची ओळख पटवून देण्याचा प्रयत्न करत होती . पण त्याच्या चेहर्‍यावरचे भाव बघून , त्याला काहीच कळत नाही आहे असे दिसत होते. त्याला काहीच कळत नाही आहे , बघून आता तिच्या हृदयात दुखायला लागले होते. 

" माही, असू दे ...आपण उद्या परत आठवण करून देण्याचा प्रयत्न करू . आता आराम करू दे त्याला"..... म्हणत आशुतोषने आकाशला बाहेर चलण्याचा इशारा केला . माही पण जड मनाने बाहेर जायला मागे वळली. 

" माही….!!"... अर्जुनचा आवाज आला तसे तिने आशुतोषकडे बघितले ….आशुतोषने तिला बघून डोळे मिचकावत जा त्याच्याजवळ म्हणून खुणावले आणि हसतच दोघेही रूमच्या बाहेर पडले. 

" मिसेस माही अर्जुन पटवर्धन".... आवाज देत अर्जुनने त्याचा एक हात तिला मिठीत घेण्यासाठी पसरवला ….त्याला सगळे आठवते बघून तिच्या भरल्या डोळ्यात आनंदाच्या , खुशीच्या चांदण्या चमकायला लागल्या होत्या . क्षणही वाया न घालवता तिने त्याला जाऊन मिठी मारली आणि त्याच्या मिठीत रडायला लागली. 

" सगळी दुनियाभरची ओळख सांगत होती …...माझी बायको आहेस ना, मग ही ओळख का सांगितले नाही?".... तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत अर्जुनने झोपल्या झोपल्या माहीला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत होता. 

" तुम्ही काहीच विसरले नव्हते ना"... माही त्याच्या छातीवर डोके ठेवत त्याच्या मिठीतच रडत रडत बोलत होती. 

"ह्मम.."....अर्जुन

" तुम्ही मुद्दाम माझी मस्करी करत होते ना?".... माही

" ह्मम …"....अर्जुन 

" पण का? इकडे माझ्या जीवाची घालमेल होत होती आणि तुम्हाला मस्करी सुचत होती ?"....नाही

" " नाहीतर मी पण….."... अशी फालतूची बकवास कोण करत होतं? मी इतका महत्त्वाचा होतो की तू मीराला सुद्धा विसरलीस? मला अजिबात आवडलेले नाही ते "....अर्जुन 

" सॉरी , पण म्हणून मग तुम्ही माझा जीव घेणार काय?".... माही 

" आय हेट सुसाईड".... अर्जुन

" म्हणजे ?"...माही

" लव यु , स्वीटहार्ट".... म्हणत तिच्या केसांमध्ये तिचा लपलेल्या चेहर्‍यावरचे केस त्यानं बाजुला सारत तिच्या कपाळावर किस केले. 

तसे तिच्या ओठांवर गोड हसू पसरले… 

" खूप त्रास झाला ना तुला ?".... अर्जुन 

" नाही ….."... माही , तिच्या उत्तराने त्याचे ओठ रुंदावले…. त्याला अपेक्षित हेच होते तिच्याकडून… 

" तुम्ही आराम करा "...म्हणत ती त्याच्या कुशीतून उठायला गेली , तसे त्याने तिच्यावरील आपली पकड आणखी घट्ट केली. 

" दूर नको जाऊ , जवळ रहा ".... अर्जुन

तिला पण त्याच्या कुशीतून दूर जायचं नव्हते . मधातली ही कालची एक रात्र , तो जीवघेणा दुरावा युगाप्रमाणे तिला भासला होता. हे दोन दिवस ती जेवली नव्हती की झोपली नव्हती…. खूप थकली होती . आयुष्यात आता पुढे तर बऱ्याच गोष्टी वाढवून ठेवल्या होत्या …..पण अर्जुन ठीक आहे बघून तिची काळजी मिटली होती. त्याच्या कुशीत पडल्यापडल्या तिला शांत झोप लागली ...बसल्या बसल्या ती अर्जुनच्या मिठीत विसावली होती. अर्जुन ला सुद्धा खूप कमजोरी होती, पण माही वरची त्याची पकड सैल झाली नव्हती. 

*********"

क्रमशः 

🎭 Series Post

View all