Aug 16, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 74

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 74

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 74

 

 ( आधीच्या भागात : अर्जून ॲड शेखरच्या मदतीने देवेशच्या विरोधात सगळे पुरावे जमा करतो. सगळी फाईल केस नीट तयार झाल्यावर अर्जुन घरी देवेश बद्दल , माही आणि त्याचा नात्याबद्दल सांगायचं ठरवतो. तो सांगणार असतो की देवेशचा परिवार लग्न संबंधी काही डिस्कस करायला घरी आले असतात. सगळ्यांसमोर काही नको म्हणून अर्जुन चूप बसतो पण देवेशचे वाईट वागणे बघून शेवटी अर्जुनाचा कंट्रोल जातो आणि तो देवेश्र्वर हात उचलतो. आणि देवेश बद्दल सगळं बाहेर येते. आता पुढे ) 

 

 

भाग 74

 

 

 

आपण आता पकडले जाऊ , पोलीस आपल्याला पकडतील , अर्जुन आणि बाकी कोणीच आपल्याला सोडणार नाही , या विचाराने देवेश चे डोकं सुन्न झाले होते . काय करावे त्याला कळत नव्हते , डोळ्यांपुढे त्याला त्याचं अख्ख आयुष्य जेलमध्ये , फाशी ...त्याला त्याचे मरण त्याच्या डोळ्यापुढे दिसत होते . तिथून पळून जाणे हाच उपाय त्याला दिसत होता . पण सहजासहजी तिथून पळता येणार नाही हे पण त्याला कळत होते . त्याने बाजूला उभा असणाऱ्या अर्जुनकडे बघितले , अर्जुन मुळेच हे सगळं घरातील लोकांपुढे आले होते , त्यामुळे त्याला अर्जुनचा भयंकर राग आला होता . अर्जुन मुळे त्याचं इझी चालणारे आयुष्य संपणार होते , त्याचा प्लॅन धुळीस मिळाला होता , त्यात हे रेप चे प्रकरण पण समोर आहे होते . आणि याच रागात त्याने क्कशाचाही विचार न करता देवेशने अर्जुनला खूप जोराने धक्का दिला होता , असा की त्याच्या जीवाचे वाईट झाले पाहिजे . हे असे झाल्यामुळे सगळ्यांचे लक्ष अर्जुनवर गेले होते आणि याच वेळेचा फायदा उचलत , क्षणाचाही विलंब न करता देवेश घरातून पळाला होता . 

 

देवेश बद्दल हे सगळं ऐकून देवेशची फॅमिली सुद्धा शॉक झाली होती . तो पैशासाठी काहीही करू शकतो त्यांना माहिती होते , श्रीया सोबत पण तो पैशासाठी लग्न करतोय हे पण माहिती होते . पण तो कुठल्या मुलीचा रेप करेल हे त्यांना कधीच वाटले नव्हते . त्यामुळे हे सगळं बघून ते सुद्धा घाबरले होते. 

 

झालेला प्रकार श्रियाच्या तर डोक्यावरून गेला होता , सगळंच तिच्या समजण्यापलीकडे होते . तिच्या हा सगळ्यात मोठा धक्का होता. प्रेम फसलं की फसावल्या गेलो , तिला समजत नव्हते. देवेशचा राग करावा, माहीचा , अर्जुनाचा की स्वतःचा तिला काहीच कळत नव्हते . पण देवेशने अर्जुंवर जो हल्ला केला होता ते तिला सुद्धा आवडले नव्हते. जे काय नजरेसमोर सुरू होते ते ती उघड्या डोळ्यांनी बघत होती. 

 

 

 अर्जुनच्या डोक्याला चांगलाच मार लागला होता . घळघळ रक्त वाहू लागले होते आणि काही कळायच्या आत तो जमिनीवर कोसळला होता . त्याला असे बघून घरात एकच आरडाओरडा झाला . सगळे घाबरून अर्जुन जवळ आले . त्याला आवाज देत , हलवत उठवण्याचा प्रयत्न करत होते . पण तो काहीच उत्तर देत नव्हता…

 

वरती माहीच्या कानावर हा आवाज गेला होता , माही पळत खाली आली तर समोरचे दृश्य बघून पुरतीच घाबरली, तिचे पाय लटपटायला लागले होते . ती अर्जुन जवळ जाणार तेवढ्यात नलिनी (अर्जुनची आई ) तिच्यावर ओरडली आणि तिला अर्जुनच्या जवळ यायचं नाही अशी ताकीद दिली . 

 

थोडासाही वेळ न घालवता आशुतोष, आकाशने अर्जुनला कारमध्ये घातले आणि हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले . कार मध्येच आशुतोषने फोनवर कोणाला तरी काही इन्स्ट्रक्शन्स देत होता . 

 

आत्याबाई, छाया यांच्यासाठी पण या सगळ्या गोष्टी त्यांच्या डोक्याच्या बाहेर गेल्या होत्या. त्यात अर्जुन आणि माही दोघं एकत्र , हा तर सगळ्यात मोठा धक्का होता त्यांच्यासाठी . 

 

 नलिनी आणि मामी , माही आणि अंजली वर खूप चिडल्या होत्या. मामी तर अंजलीला तोंडात येईल ते बोलत होत्या . माहीला आणि बाकी सगळ्यांना नलीनीने घरातून चालते व्हायला सांगितले होते . इनडायरेक्टली अंजली वर पण त्यांचा राग निघत होता . अंजली डोळे भरल्या नजरेने बघत होती . आजीला प्रत्येकाची मनस्थिती समजत होती , पण आता तरी शांत राहणे हेच सोलुशन आहे, हेच त्यांना वाटत होते, सगळे समजण्याच्या परिस्थितीत नाही हे आजीला कळत होते, आणि नाही म्हटलं तरी जे झालं ते आजींना सुद्धा आवडलेले नव्हते . त्यांनी अंजलीला डोळ्यांनीच काळजी करू नको म्हणून खुणावले आणि सध्या प्रकरण शांत होईपर्यंत तिकडे जा म्हणून सांगितले . आत्याबाई ,छाया ,अंजली , माही जड अंत:करणारे घरी निघून आले. 

 

 घरातील बाकी सगळे हॉस्पिटलला निघून आले . हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी अर्जुनला ऑपरेट करायला घेतले होते. ब्लड लॉस पण खूप झाला होता . 

 

 

" तुला घरात येऊ दिले , हीच सगळ्यात मोठी चूक झाली आमची . कोण कुठली तू , ना रक्ताची ना नात्याची … बालपणीच्या चांगल्या मैत्रिणीची मुलगी म्हणून तुला घरात घेतले आणि तू माझ्याच मुलीचं घर मोडायला निघाली आहे ?".....छाया (अंजलीची आई ) रागाने माहीला बोलत होती . माही अश्रू ढाळत मान खाली घालून ऐकत होती. 

 

 

" तरी म्हटलं होते , एवढे प्रेम नका लाऊ बाहेरच्या पोरीला …. तर माझं कोण ऐकते आहे ? नारायणने सुद्धा नाही ऐकले , आपल्याच हाताने आपल्या घराचे वाटोळे करून घेतले ".....आत्याबाई चिडत होत्या. 

 

" आई , आत्याबाई , तिची काय चूक आहे ? तिला का दोष देत आहात तुम्ही ?".....अंजली

 

" तिच्यामुळे तुझा संसार उध्वस्त झाला नाही म्हणजे मिळवलं".... आई

 

" तुझ्या घरावर डोळा ठेवायची काय गरज होती हिला? ते अर्जुनसर आकाशरावांचे भाऊ आहेत , हे काय माहिती नव्हते हिला ? त्यांच्या सोबत संबंध जोडण्याचा जोडायला गेली ही …. हिला आम्हीपण घरात अशी नव्हतोच ठेवणार , तुझ्याप्रमाणे एखादा चांगला मुलगा बघून हीच सुद्धा लग्न करणार होतो . पण नाही , हीलाच खूप घाई झाली आणि त्यांच्याकडे …...शिशी बोलवल्या सुद्धा जात नाही "......आत्याबाई

 

" आपल्या माही बद्दल सगळं माहिती असून सुद्धा, खऱ्या अर्थाने अर्जुन सरांनी तिला स्वीकारले आहे . त्यांचं खरच माही वर खूप प्रेम आहे . ते तिला खूप सुखात ठेवतील . आपण खुश व्हायचं सोडून तिलाच दोष देत बसलोय आणि आज तिच्यामुळे श्श्रीयाचं सुद्धा आयुष्य खराब होण्यापासून वाचले आहे, हे महत्त्वाचं नाही का?".... अंजली आई आणि आत्याबाईंना समजावत होती. 

 

" अर्जुन सर स्वीकारतीलही , पण त्यांच्या घरचे ,स्विकारणार आहे का? हिला कळायला नको आपण कोण आहोत? आपल्या सोबत काय झाले आहे? आपली काय परिस्थिती आहे ? अशा मुलींना कोण स्वतःहून हौशीने आपल्या घरची सून करून घेणार आहे? त्यात ते तेवढे श्रीमंत , प्रसिद्ध , हुशार , खरंच घरच्यांना हे नातं मान्य तरी होणार आहे का? हा विचार करायला नको हिने ? आता हीच्यामुळे त्या पोराचा जीव पण धोक्यात आहे, त्यांना काही बरे वाईट झाले तर दोष कोणाचा यात?".... आई

 

" आई sss, असे काही बोलू नको , त्यांना काही होणार नाही, ते सुखरूप असतील आहेत "..... माही रडत रडत बोलत होती . "त्यांना काही बरे वाईट झाले तर "...हे आईचे शब्द ऐकून माहीच्या काळजाचा ठोका चुकला होता . त्या भीतीने तिचा थरकाप उडाला होता. 

 

" माझ्या अंजलीच्या संसाराचे काही वाईट झाले तर तुला सोडणार नाही , या घरचे दार तुझ्यासाठी कायमचे बंद होतील "....आत्याबाई चिडत बोलत होत्या. 

 

"आत्याबाई , ही काय वेळ आहे काय ..हे सगळं बोलायची? ती आधीच किती घाबरली आहे , आपण सगळ्यांनी तिला धीर द्यायचं सोडून तिलाच दोष देत आहोत ? तिच्या मनाचा थोडा तरी विचार करा, कुठल्या परिस्थितीतून जात आहे ती ? कोणीच तिला जीव लावेना आणि ज्याने लावला आहे तो हॉस्पिटल मध्ये आहे ".... अंजली समजावत होती. 

 

" तेच तर , ज्याचा आयुष्यात जाते त्याचा आयुष्याचं वाटोळं होते , देवा पोराला काही होऊ देऊ नको ….".... आत्याबाई देवापुढे हात जोडत बोलत होत्या. 

 

यांना समजावून काहीच फायदा नाही , अंजलीच्या लक्षात आले होते …. 

 

अंजलीच्या बोलण्याने आई आत्याबाई शांत झाल्या...जास्ती काही आता पुढे बोलल्या नाहीत. लहानग्या मीराला घरात काय घडत आहे , काहीच कळत नव्हते.

 

अर्जुनच्या डोक्याला खूप लागले, त्याची ती हालत बघून माही अपाली सगळी सुधबुध विसरली होती ...आई ,आत्याबाई, अंजली काय बोलत आहे , तिला काहीच कळत नव्हते , तिचं सगळं लक्ष अर्जुन मध्ये अडकले होते. त्याच्या काळजीने तिचे मन रडून उठत होते . ती खाली आली होती तेव्हा अर्जूनची अवस्था खूप वाईट झाली होती , डोक्यातून रक्त वाहत होते , तो जमिनीवर कोसळला होता , माही त्याचा पुढे आली आणि त्याने डोळे बंद केले होते , तेव्हा नलीनीने तिला बेशुद्ध पडलेल्या अर्जुन जवळ जाऊ दिले नव्हते, कि त्याला नीट बघून सुद्धा दिले नव्हते . ते सगळं आठवून माहीला आणखी गहिवरून येत होते . 

 

 

हॉस्पिटलमध्ये अर्जुनवर सुरू असलेली सर्जरी संपली होती . तो अजूनही बेशुद्ध होता. त्याला शुद्ध येईपर्यंत तरी तो कसा आहे हे सांगता येणार नव्हते . पुढल्या 48 तासात त्याला शुद्ध येणे गरजेचे होते , नाही तर त्याचा आयुष्याला धोका निर्माण होऊ शकतो , असे सांगितले होते डॉक्टरांनी त्याला अंडर ऑपरेशन ठेवलं होतं . त्यामुळे सगळेच आता टेन्शनमध्ये आले होते . 

 

अर्जुनच्या काळजीने नलिनीचे मन घाबरेघुबरे झाले होते . त्यांच्या डोळ्यासमोर काही तासांपूर्वी घडलेल्या गोष्टी येत होत्या आणि अर्जुनची ही हालत माही मुळेच झाली आहे , यावर त्यांचे मत ठाम झाले होते. त्यामुळे नलिनीला माहीचा खूप राग येत होता. 

 

माहीने आशुतोषला फोन केला होता तेव्हा तिला कळले होते, अर्जुन ऑपरेशन थेटरमध्ये आहे. त्यानंतर माहीने बरेच फोन केले होते पण कोणी फोन उचलला नव्हता. माहीच्या जीवाची घालमेल वाढली होती.

तिने परत फोन लावून बघितला तर आकाशचा फोन लागला . 

 

" हॅलो माही "....आकाशने फोन उचलला तेव्हा तिथे सगळे होते . माहीचे नाव ऐकून अर्जुनची आई परत चिडली. त्यांनी आकाशच्या हातातून फोन काढून घेतला. 

 

" दूर राहायचं माझ्या मुलांपासून, नाही तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल ".....नलीनीने फोनवर ओरडून बोलले आणि फोन ठेवून दिला. 

 

" कोणी तिच्या सोबत बोलणार नाही आणि ती इथे यायला नको ".... तिने सगळ्यांना ताकीद दिली. नलिनीचा तो अवतार बघून सगळे गप्प बसले होते. 

 

नलिनीचे बोलणे ऐकून माही आणखी रडायला लागली , तिच्या डोळ्यातील अश्रू व्हायची थांबत नव्हते . ती आपल्या पायात चेहरा खुपसून रडत बसली होती. 

 

रात्र गेली पण अर्जुन शुद्धीत आला नव्हता . सगळ्यांची काळजी आता वाढायला लागली होती . सगळ्यांच्या देवाजवळ धावा सुरू होत्या . रात्र होत आली होती सगळ्यांचा धीर आता सुटत चालला होता . माहीच्या सुद्धा जीवात जीव नव्हता. तिला कोणी अर्जुनला भेटू देत नव्हते. तिचे सगळेच लक्ष अर्जुनच्या वाटेकडे लागले होते . तिने एक-दोनदा अर्जुनला भेटण्यासाठी बाहेर जाण्याचा प्रयत्न केला होता पण आत्याबाईन्नी तिला बाहेर जाण्यापासून अडवले होते. 

 

कालपासून नलिनी हॉस्पिटलमध्ये होती . कसेबसे समजवून , तिथे जास्त कोणाला थांबता येणार नाही सांगून , आशुतोषने नलिनी आणि बाकी सगळ्यांना घरी पाठवले . तो आणि आकाश दोघेच तिथे थांबले होते. 

 

" माही , चल थोडं खाऊन घे , दिवसभरयापासून तू काहीच खाल्लं नाही आहे . अशाने तुझी तब्येत बिघडेल"..... अंजली माहीच्या डोक्यावरून हात फिरवत होती. 

 

" ताई , भूक नाही आहे …ताई आकाश सरांना प्लीज फोन कर ना ".... माही 

माहीची अवस्था खूप वाईट झाली होती . अंजलीला तिला बघवल्या जात नव्हते , शेवटी तिने आकाशला फोन केला. 

 

" अंजली , आत्या खूप चिडली आहे , माही इथे आली तर माहिती नाही परत काय होईल "....आकाश

 

" आकाश सर , एकदाच भेटायचं अर्जुन सरांना , त्यांना बघितले पण नाही , एकदा बघू द्या… प्लिज समजून घ्या ना ".....माही खूप विनवणी करत होती. 

 

" माही इकडची परिस्थिती ठीक नाही आहे , भाई अजूनही शुद्धीत आला नाही आहे ,तू इथे आली तर सगळेच कंट्रोलच्या बाहेर जाईल ".....आकाश माहीला समजवण्याचा प्रयत्न करत होता आणि माहित याला रडत रडत वारंवार विनंती करत होती. 

 

______________________

 

क्रमशः 

 

_______________________

 

 

नमस्कार फ्रेंड्स 

 

जागतिक मैत्री दिनाचा शुभेच्छा ! 

 

थोड कथे बद्दल …

 

माही तिच्या घरी गेली आणि तिचे वडील , मंजू तिच्या सोबत जे वागले ते आवडले नाही , कुठला बाप असा वागू शकतो काय असे प्रश्न पडले , मंजू चे वागणे सुद्धा खटकले .. 

माही ही लहान खेडे गावातील मुलगी दाखवली आहे . अजूनही तिथे, तिथेच काय शहरात सुद्धा बरीच अशी लोकं आहेत , जे आपल्या अब्रूसाठी , आपल्या नावासाठी जगतात . समाजात आपल्याला कोण काही बोलू नये याची काळजी असते , आणि मग आपला मान जपण्यासाठी ते काहीही करू शकतात . तसेच अजूनही मुलीमुळे जर नाव खराब होत असेल तर तिलाच जबाबदार ठरवल्या जाते . तर माहीचे वडील पण असेच आहेत … अजूनही गावांमध्ये नवरा बायको सुद्धा बाहेर हात धरून दिसले तर कोणाच्या पचनी पडत नाही , मग माही अर्जुनाचा हात धरून उभी होती हे तिच्या वडिलांना आवडले नव्हते , त्यामुळे ते भयंकर चिडले होते , आणि म्हणूनच ती घरी आली तर त्यांना लोकं काय बोलतील , हा विचार येत त्यांनी तिच्यावर हात उचला होता . माहीच्या आईला कळत होते ,तरी सुद्धा ती माहीची बाजू घेऊ शकली नाही…. अजूनही बायकांना नवऱ्याचा विरोधात जायचे धाडस नाही , किंबहुना नवराच सगळं असतो हे प्रत्येक स्त्रीवर बिंबावल्या गेले असते , जर त्याचा विरोधात गेले तर समाज आपल्यालाच नावं ठेवतील हीच भीती. काही असले तरी पती परमेश्वर हीच संकल्पना रुजवली गेली असते , आणि म्हणून माहीची आई तिला support करू शकली नाही. 

 

मंजुचे वागणे पण खटकले … मंजू आपल्या बहिणी सोबत अशी कशी वागू शकते ते …. तर मंजुचे वागणे अगदी बरोबर होते … जेव्हा माहीने घर सोडले तेव्हा माही 17 वर्षाची होती ,मंजू 13… तेव्हापासून मंजू वडिलांनी माहिमुळे तिचं शिक्षण बंद केले , बाहेर यायला जायला पाबंदी ठोकली. मंजुची काहीच चूक नसताना तिचं स्वातंत्र्य तिला घालवाव लागले… त्यात त्यांनी तिचं लग्न पण ठरवले….तर साहजिकच आहे माही मुळे हे होत होते,तर तिच्या मनात माही विषयी द्वेष निर्माण झाला होता. आणि कधीतरी ही मनातील भडास निघणार च होती … माही दिसली आणि मग तिला वाटले तसे ती बोलली. 

 

 

श्रियाला आपल्या भावावर विश्वास नाही, हे पण खटकले…….अशा श्रिया खूप आहेत आपल्या आजूबाजूला …. खूपदा मैत्रीण , कधी मोठी ताई सांगत असते तो मुलगा चांगला नाही, नको करू त्याचसोबत मैत्री , प्रेम …. तरी सुद्धा आपण प्रेमात इतकं आंधळ झाले असतं माणूस की कोणी कितीही सांगितले तरी आपला विश्वास बसत नाही…. ती व्यक्ती आपल्याला चांगलीच भासते …. त्या व्यक्तीची वाईट बाजू आपल्याला कधीच दिसत नाहीं . आई वडीलही खूप समजावण्याचा प्रयत्न करतात तरी आपल्याला ते कळत नाही, सगळे आपले दुश्मन आहे हीच आपली समजूत असते…आपली रक्ताची नाती सोडून आपण त्या तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो . तसेच श्रियाचे झाले आहे ….

 

 

घरात जेव्हा देवेश बद्दल बोलल्या जात होते सगळ्यांची संशयित नजर माही वर होती… हेच तर घडते ना घरात, बाहेर …. एखादं साधं उदाहरण घ्या एखाद्या मुलीचे साखरपुडा होऊन लग्न तुटते किंवा divorce होतो तर सगळे काही न जाणून घेता सरळ बाई ला दोष देतो… हीचंच लफड असेल कुठे…. हीचाच स्वभाव खराब … जुळवून घ्यायला नको, संस्कारच नाही …जेव्हा अशा काही गोष्टी घडतात तेव्हा बाई वर विश्वास कोणी ठेवत नाही…. पुरुषावर मात्र विश्वास ठेऊ लागतात …. आणि जाब विचारायची वेळ येते तेव्हा आधी बाई लाच विचारल्या जाते...अगदी घरातील व्यक्ती सुद्धा ….. तसेच इथे माहीच्या बाबतीत होत आहे … जेव्हा देवेश ला बाकीच्यांना बघून कळले की माही वर विश्वास बसत नाही आहे , याचाच त्याने फायदा घेत तो माही वर आळ लावत होता. तेव्हा पण स्त्री ला आपली पवित्रता सिद्ध करावी लागली होती…. आता पण अर्जुनला माही निर्दोष आहे याचे प्रूफ द्यावे लागले होते .. 

 

नलिनी अर्जुनाच्या आईचे पण वागणे बरोबर आहे ….. कोणीच आपल्या मुलाला त्रासात बघू शकत नाही ….. 

 

छाया , आत्याबाई ….. यांचे पण वागणे बरोबर आहे …. आता तुम्ही म्हणाल माही पण त्यांच्यासाठी , सगळ्यांसाठी काय काय करत असते …. तर जगाची रीत च आहे दहा कामं तुम्ही चांगली की आणि एक काम वाईट… लोकं ती सगळी चांगली कामं विसरून फक्त वाईट कामच लक्षात ठेवतात. 

 

होप आपले कन्फ्युजन दूर झाले असतील….

बघुया पुढल्या भागात...पुढे काय होते ते …. 

 

धन्यवाद 

 

*******

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️