तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 73

Maahi

तू ही रे …. कसं जगायचं तुझ्याविना 73

भाग 73


 

"  ही ? इथे ? ही  आणि अर्जुन पटवर्धन एकत्र , ते पण इतक्या क्लोज ? ती हीच तर मुलगी नाही आहे,  जी त्या दिवशी अर्जुन सोबत अनाथाश्रम मध्ये गेली होती ".....देवेश तिला बघून शॉक झाला  , त्याच्या डोक्यात बऱ्याच गोष्टी आणि विचार सुरू झाले होते . 

अर्जुन आणि माही कार मध्ये बसून निघून गेले . देवेश मात्र आपल्याच विचारात हरवला होता . तिला बघून खुश व्हावे की दुखी , की अर्जुन सोबत बघून आश्चर्य चकित व्हावं , त्याला काहीच कळत नव्हते.  ती अर्जुनच्या एवढ्या क्लोज , अर्जुन कोणाला स्वतःभोवती फिरकू  देत नाही , पण मग ती त्याच्या मिठीत होती,  काय रिलेशन असेल त्यांचे ? त्याची ही गर्लफ्रेंड असेल का ? नाही नाही ही गावठी मुलगी त्याची गर्लफ्रेंड नाही असू शकत आणि श्रिया पण बोलली होती की त्याची कोणी गर्लफ्रेंड नाही आहे , मग फ्रेंड असेल काय ? पण ही इथे आली कशी ? आणि मुख्य म्हणजे याला भेटली कश " 

.. अशी बरीच कोडी त्याला  पडली होती . 

" हे दोघे फ्रेंड असतील तर हिने अर्जुनला माझ्याबद्दल सांगितले तर नसेल?  नाही,  तिने मला बघितले कुठे,  तिला माझं नाव सुद्धा माहिती नाही आणि सांगितले असेल तरी तिची गोष्ट खरी असण्यासाठी  तिच्या जवळ पुरावे  तरी कुठे आहे.  पण त्यांच्या क्लोसेनेस वरून  तरी वाटत नाही सांगितले असेल,  नाहीतर अर्जुनने तिला जवळ घेतले नसते.  देवेश काळजी करू नको , ती तुझं काहीच बिघडवू शकत नाही , उलट तुला तिचा  फायदा कसा घेता येईल ते बघ . पण त्यासाठी या दोघांची रिलेशन काय आहे याची खोलात जाऊन माहिती काढावी लागेल "...स्वतःशीच विचार करतो आणि त्याचा मित्र तिथून निघून आले. 

…………...

शांतीसदन मध्ये लग्नाची तयारी सुरू होती.  मुहूर्त सव्वा  महिन्यावर निघाले होते. 


 

" आकाश , आपल्याला लोकेशन,  हॉटेल बुक करावे लागतील आणि हो पत्रिकेचे  पण बघ , वेळ कमी आहे तर तू पर्सनली इन्व्हिटेशन द्यायला जा"..... मामा

"आकाश , हे सगळं मी बघतो आणि इंविटेशन्स कार्ड्स पण मी बघतो . तुम्ही बाकीचे काम बघा".... अर्जुन

" ठीक आहे,  चालेल"...... मामा

" ओके भाई, काही मदत लागली तर सांग "......आकाश

"Sure ".... अर्जुन

अर्जुनने  मुद्दाम ही काम स्वतःकडे घेतली होती . कार्ड , इन्विटेशन वगैरे  पाठवले तर सगळ्यांना देवेश आणि श्रीयाबद्दल माहिती होईल . अजून पर्यंत तरी देवेश श्रीयाचा रिलेशनशिप बद्दल कोणालाच काही माहिती नव्हते.  त्यामुळे देवेश जरी जेलमध्ये गेला तरी श्रियाचे  नाव खराब होणार नव्हते आणि याचीच काळजी अर्जुनला घ्यायची होती.  लवकरात लवकर देवेशला अरेस्ट करायचं अर्जुनचा प्लान होता.  

देवेश ने  अर्जुन आणि माही बद्दल माहिती काढली .  त्याला कळले होते माही अंजलीची बहिण आहे,  अर्जुनच्या ऑफिस मध्ये काम करते , आणि महत्त्वाचे म्हणजे माही अर्जुनची गर्लफ्रेंड आहे . त्याला सगळी माहिती मिळाली आणि त्याला खूप काही जिंकल्यासारखे वाटत होते.  त्याने माहीचा फोन नंबर सुद्धा मिळवला होता .  आता त्याचा डोक्यात काहीतरी मोठा प्लान शिजत होता. 

………...

अर्जुनने फोनवर बोलून फोन ठेवला. 

" माही,  गेट रेडी , आपल्याला एडवोकेट शेखर कडे जायचे आहे"..... अर्जुन

" सर , आता इथून पुढे जे काही वकील , कोर्ट किंवा पोलिसांची कामं असतील ,  तर तिथे  मी एकटी जाईल ".....माही काही विचार करत बोलली. 

" व्हॉट"..... अर्जुन

"हो , मी एकटी सगळीकडे जाणार आहे".... माही

" नो "......अर्जुन

" हो,  उगाच हट्ट करायचा नाही,  ही माझी लढाई आहे आणि ती मीच लढायला हवी".... माही

"आपली लढाई आणि मी तुला एकटे सोडणार नाही "...... अर्जुन 

" सर , प्रत्येक ठिकाणी तुम्ही माझ्यासोबत येऊन मला कमजोर बनवत आहात आणि मला आता आणखी दुबळे बनायचे नाही.  आई बाबा कोणीच माझ्यावर विश्वास ठेवला नाही ,  तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा".... माही

" माही,  इथे ट्रस्ट अँड ऑल कुठून आले ?".....अर्जुन

" तुमचा माझ्यावर विश्वास आहे की नाही?".... माही

" माही , बकवास करू नको ".....अर्जुन

" म्हणजे विश्वास नाही आहे"..... माही

" मी असे काही म्हणालो नाही "....अर्जुन

"म्हणजे मला एकटीला जायची तुम्ही परवानगी दिली आहे तर ".....माही

" नाही "......अर्जुन

" म्हणजे तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे ".....माही

" माही , मला या फालतू शब्दांमध्ये उगाच फिरवू नको "....अर्जुन

" सर,  प्लीज शेवटचे काही मागते असे समजुन द्या ".....माही

" शेवटचे शेवटचे करत , ब्लॅकमेल करत तू माझ्याकडून बरेच काही करून घेतले आहे ".....अर्जुन

" मी तुम्हाला विनंती तरी करते, तुमची परमिशन मागते ,  तुम्ही तर मला न सांगता माझ्याकडून लपवून खूप काही करवून घेता"..... माही


 

"मी असे  काय केले ?" अर्जुन एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत होता. 

"लग्न केले तुम्ही"..... नाही

"माही ,आता तू हे मध्येच काय काढले,  इट्स ओल्ड टॉपिक"...... अर्जुन

" ओल्ड असेल नाहीतर न्यू,  जे खरं आहे ते खरं आहे "....माही


 

" माही ,  उगाच कुठला विषय कुठे नेऊ नकोस ".....अर्जुन थोडा चिडत बोलत होता. 

" सर , आपले नवरा बायको सारखं भांडण होते आहे , किती गोड !"......माही चिडलेल्या अर्जुनचे गाल ओढत बोलली. 

"माही मी काय बोलतोय,  तू काय बोलते आहे ,  उगाच टाइमपास करू नको, आपल्याला उशीर होतोय".... अर्जुन

" आय लव यू "....माहीने त्याच्या गळ्यात आपले दोन्ही हात टाकले आणि त्याच्याजवळ गेली. 

" माही , मस्करी नाही करायची , माझं डिसिजन फायनल आहे ".....अर्जुन

"माझे पण ठरलंय "..... माहीने पुढे जात त्याच्या गालावर हळूवारपणे कीस केले. 

" उगाच लाडीगोडी लावू नको "...अर्जुन

"प्लीजsss ,  ऐका ना "...माही

"नो ".....अर्जुन

माही ने हळूच त्याच्या दुसर्‍या गालावर किस केले…...

"प्लीज!".... तिने आपला बिचारा चेहरा केला . तिचा असा पपी फेस बघून त्याला हसू येत होते , पण त्याने कंट्रोल केले आणि फक्त तिच्याकडे बघत होता.  तो परवानगी देत नाही आहे बघून तिने आता तिची नजर त्याच्या ओठांकडे वळवली. त्याच्यावर एक नजर टाकत ती हळूहळू त्याच्या ओठांजवळ जाऊ लागली. 

"ओके!"..... ती त्याच्या ओठांवर ओठ टेकवनार तेवढ्यात त्याने होकार दिला. 

"थँक्यू".... म्हणत  आनंदाने तिने त्याला गच्च  मिठी मारली. 

" मला माहिती माही , तू एकटे जायचं  का म्हणते आहे,  मला किंवा आपल्या परिवाराला मीडिया चा  त्रास व्हायला नको म्हणून करते आहे हे सगळं"....मनातच बोलत त्याने तिच्याभोवती आपली मिठी घट्ट केली . 

" सर , मीडिया तुमच्या मागावर आहे , तुमचं नाव जरी या प्रकरणात आले तरी खूप मोठा बावल होईल आणि मला तुमचं नाव खूप प्रिय आहे , तुमच्या नावावर उठले बोट मला चालणार नाही . माहिती नाही मी किती तुम्हाला या सगळ्यांपासून दूर ठेवू शकते  , पण जितके शक्य असेल तितके नक्कीच या प्रकरणापासून तुम्हाला दूर ठेवेल "...माही त्याच्या मिठीत स्वताशीच बोलत होती. 

माहीला  त्यादिवशी एडवोकेट शेखरने बर्‍याच गोष्टी समजावून सांगितल्या होत्या.  जरी अर्जुन आणि माही नवरा-बायको होते,  तरी बाहेर जगाला हे माहित नव्हते . अर्जुनचे नाव यात आले तर पोलीटीशियनस , बिझनेसमॅन , इत्यादी सगळे या गोष्टीचा खूप फायदा उचलतील  आणि ही केस खूप कॉम्प्लिकेटेड होईल.  त्यात यामुळे पटवर्धन परिवाराला सुद्धा खूप त्रास होईल,  श्रिया च्या लाईफ मध्ये प्रॉब्लेम,  मीराचे भविष्य आणि बाकी घरातील सगळ्यांवरच वाईट परिणाम होईल.  एकंदरीत देवेशला शिक्षा तर होईल,  पण अप्रत्यक्षरीत्या घरी सगळ्यांनाच याचा त्रास होईल , शिक्षा होईल . म्हणून एडवोकेट शेखरने माहीला तिच्या वडिलांचे नाव वापरायचे सजेशन दिले होते आणि अर्जुन शी रिलेटेड कुठल्याच व्यक्तींबरोबर बाहेर फिरायचं नाही असेही समजून सांगितले होते . माहीला  सुद्धा ते पटले होते आणि म्हणूनच तिने सगळीकडे एकटीने  जाण्याचा निर्णय घेतला होता. 


 

"ठीक आहे , पण तुझ्यासोबत आपले बॉडीगार्ड असतील आणि लेडी बॉडीगार्ड पण असेल".... अर्जुन 

"हो चालेल ".....माही त्याच्या मिठीत बोलत होती

" मग आता दे ".....अर्जुन

"काय?".. माही

"हेच,  मी आता बोलायचे आधी जे  देणार होती तू,  ते ".....अर्जुन

" ते तुम्ही ऐकत नव्हता म्हणून"... माही

"आता ऐकले "....अर्जुन

" थँक्यू !"...माही

" थँक्यू नाही,  ते "......अर्जुन

" देत होते तेव्हा का घेतले नाही?".... माही

" माझ्याकडून तुला काही घ्यायला कुठलीच किंमत मोजायला नको , म्हणून"..... अर्जुन

" किती क्युट आहात तुम्ही"... माही

"पण आता दे"..... अर्जुन

" आत्ताच तर नाही बोललात ना तुम्ही "....माही

" माझी बायको आहेस , म्हणून आता "......अर्जुन , अर्जुनने तिच्या हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला,  त्याने तिला आपल्या नजरेत कैद केले आणि तो तिला किस करण्यासाठी तिच्या जवळ जात होता , तेवढ्यात माहीने  त्याला त्याच्या पोटावर गुदगुल्या केल्या , तसा तो हसायला लागला आणि त्याची तिच्या भोवतीची पकड ढिली झाली . वेळेचा फायदा घेत माही  त्याचा मिठीतून  दूर पळाली. 

" यू अल्वेज स्पोईल माय रोमँटिक मोमेंट ,"......  अर्जुन

" तुम्हाला भलत्याच वेळेला काहीही सुचते ".... माही 

" कोणी सांगितले आहे ऑल टाइम टेन्शन मध्ये राहायचं असते , लाईफ मध्ये प्रॉब्लेम्स तर येतील जातील, त्यासाठी मी काय रोमान्स नाही करायचा ? नेक्स्ट टाईम  सोडणार नाही मी तुला".....अर्जुन  

" पुढचं पुढे बघू "....बोलतच माही बाहेर पळाली...


 

……………


 

माही एकटीने एडवोकेट शेखरच्या ऑफिस मध्ये जायची.  आधी तिला थोडी भीती वाटत होती पण हळूहळू तिची भीती कमी झाली होती आणि तिच्यात एक आत्मविश्वास निर्माण होत होता.  ती जरी एकटी जात होती तरी अर्जुन चे पूर्ण लक्ष तिच्यावर होते.  माही आणि अर्जुनने मीराला या सगळ्यात नको आणायला म्हणून एडवोकेट शेखरला रिक्वेस्ट केली होती .  मीराच्या डी एन ए टेस्ट वरून केस अजून स्ट्रॉंग होणार होती , पण एडवोकेट शेखर मीराला यापासून दूर ठेवले होते. 


 

दोन-तीनदा देवेशला माही एकटी दिसली होती . त्याला बघून माही घाबरून पळत  होती , पण देवशने तिचा पिच्छा करणे सोडले नव्हते.  ती अजूनही त्याला घाबरते आहे बघून त्याला मज्जा वाटत होती. 

………...

" मला येऊन भेट "....एका अननोन नंबर वरून माहीला  मेसेज आला. 

" कोण आहे?"..... माही

" भेटल्यावर कळेलच"..... अननोन नंबर

" मी अनोळखी लोकांना भेटत नाही , परत मेसेज करू नको"...... माही

तेवढ्यात एक फोटो माहीच्या फोनवर आला,  तो बघून  तिच्या पायाखालची जमीन सरकली, देवेश माही वर जबरदस्ती करताना तो फोटो होता,  पण त्यात त्याचा चेहरा ब्लर दिसत होता.   पण माही मात्र त्यात स्पष्ट दिसत होती. 

" संध्याकाळी दिलेल्या लोकेशन वर ये , अन्यथा हा फोटो अर्जुन पटवर्धन कडे जाईल.  मग तुझ्यासोबत जे काही होईल,  त्यासाठी तू स्वतः जबाबदार असशील ".... अननोन नंबर 

एडवोकेट शेखरने तिला हो म्हणून सांगितले ,   तसे माहीने त्याला ओके लिहून पाठवले. 

त्याच्याकडे अजूनही हे फोटो आहेत हे क्लिअर झाले होते . 


 

ठरल्या प्रमाणे माही देवेशने सांगितलेल्या लोकेशनला पोहोचली . माहीला  तिथे आलेले बघून देवेश आणि त्याचा मित्र तिथे आले. 

" वेलकम माही मॅडम ".....देवेश 

" का बोलावले येथे?".... माही थोडी रागातच बोलली. 

" बापरे,  किती तो राग,  घाबरलो हा मी"..... म्हणत देवेश तिच्या खांद्याला हात लावायला गेला. 

"हात लावायचा नाही "....तिने त्याचा हात झटकला. 


 

"तुला काय मी पहिल्यांदा हात लावत आहो काय ? तू काय आहेस आम्हाला काय माहिती नाही काय ? मोठं पोट घेऊन फिरत होती ना ? कोणाचं होते ते ? हे सतीसावित्रीवाले रूप आपल्या बॉयफ्रेंड समोर दाखवायचे "......., देवेश


 

" मुद्द्याचे बोल , तुझ्या फालतू गोष्टी ऐकायाला आली  नाही येथे"... माही थोडी  चिडत बोलत होती. 

"वाह , त्याच्या सोबत राहून त्याच्या सारखीच बोलायला लागली"....देवेश

" काम ?"....माही 

" आवाज खाली ठेवायचा,  नाही तर तुला माहितीच आहे मी काय करू शकतो ते".... देवेश

" काय करशील ? हिंमत असेल तर हात तर लावून दाखव?"..... माही


 

" वा अर्जुनाच्या नावाचा खुप माज चढला तुला .  आता तर अजुन मजा येईल , तेव्हा तर रडत होती,  सोडा मला , घरी जाऊ द्या,  हातपाय जोडत होती,  तेव्हा शांततेने करू दिले असते तर त्रास नसता झाला".... असे बोलत तो त्या दिवशी झालेले सगळे राक्षसी हसू आणत बोलत होता , माहीला  ते सगळं ऐकून खूप घान  वाटत होते. 

" तुझी बकवास झाली असेल तर काम काय आहे बोल"..... माही

"10 लाख "..... देवेश

" काय? कशाचे ?".... माही

"त्या फोटोचे "....देवेश

"माझ्याकडे नाही आहेत "....माही

"ठीक आहे, मग  फोटो अर्जुन आणि त्याच्या घरचरी पोहोचतील"..... देवेश

" नाही,  प्लीज नको,  नको असे करू,  मी काय बिघडवले आहे तुझे?"..... माही गयावया करत बोलत होती. 


 

"मग दहा लाख आणायचे "....देवेश

" पण खरंच  माझ्याकडे इतके पैसे नाही आहे ".....माही

"तो आहे ना तुझा मिलेनियर बोयफ्रेंड , त्याच्यासाठी दहा लाख  काहीच नाही ".....देवेश

"मी त्यांच्याकडे एवढे पैसे कसे मागणार आहे "....माही

"जो व्यक्ती मुलींना जवळ भटकू देत नाही , त्याची तू गर्लफ्रेंड आहे , म्हणजे तू किती हुशार असशील?  तुला त्याचाकडून पैसे काढणं  काही जड जाणार नाही"...... देवेश

माहीला  तर त्याचा एक एक शब्द एकूण खूप राग येत होता. 

"जर तुला पैसे दिले तर तू हे फोटो?".... माही

"हे सगळे फोटो तुला मिळेल ".....देवेश

" काय भरोसा तुझा".... माही

" मला मिळेलच पैसे फोटोचे कुठून तरी , लॉस तुझा आहे , या  दहा लाखांसाठी तुझा   मिलेनियर बॉयफ्रेंड हातातून जाईल ".....देवेश

"नाही,  मी आणून देते , पण हे फोटो बाहेर जायला नको"... माही

" हो ".....देवेश

माही  तिथून निघून गेली. 

 युसी सिली गर्ल "....देवेश हसायला लागला


 

ठरल्याप्रमाणे माही ने  देवेश ला  पैसे आणून दिले.  त्याने  तिला फोटो दिले.  हे सगळं करताना देवशचे  मित्र त्याच्या सोबत होते , त्यामुळे त्यांना  देवशच्या हालचालींवर लक्ष ठेवता येत होते . ठरलेल्या प्लान प्रमाणे देवेश कडून  फोटो आणि व्हिडिओ मिळवण्यात यश आले होते.  हे सगळं खूप फास्ट करण्यात आले होते . देवेश विरुद्ध केस फाईल परफेक्टली तयार झाली होती . आता देवेशच्या विरोधात पोलीस मध्ये कंप्लेंट फाईल करता येणार होती . 

अर्जुनने हे सगळं घरी सांगायचे ठरवले . या सगळ्या गोष्टींचा त्रास होईल हे अर्जुनला माहिती होते , पण श्रेयासाठी सगळं सांगावे लागणार होते. 


 

घरी सगळ्यांना देवेश बद्दल त्याचं खरं रूप सांगायचं म्हणून अर्जुन बाहेर आला,  तर देवेशची  फॅमिली आली होती , त्यात देवेश  सुद्धा होता. 

" हे लोकं,  आता ?".....अर्जुन त्याच्या आईजवळ जात बोलला. 

"हो, ते थोडं लग्नाबद्दल डिस्कस करायचं आहे, म्हणून  बोलावले होते "......आई

" मला कोणी काय सांगितलं नाही , "..…अर्जुन नाराजीच्या स्वरात बोलत होता. 

"तू घरी असतोस कुठे आणि असला तरी कामात असतो.  तुला या गोष्टीत काही इंटरेस्ट नाही म्हणून राहून गेले सांगायचे.  बरं आता आला आहे तर ये खाली"... आई

"आई,  मला तुझ्यासोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे "......अर्जुन


 

"हा बोल "....भाई

" आई,  ते मला माही  बद्दल थोडं बोलायचं होतं "....अर्जुन

"अच्छा बोल काय बोलायचं माही बद्दल?"..... आई


 

" आई,  ते मी आणि माही …"... अर्जुन  पुढे बोलणार होता की आईला आजीने आवाज दिला. 

"अर्जुन,  आता सध्या हे पाहुणे  महत्त्वाचे आहे . आपण नंतर आरामात बोलु ".....बोलतच आई खाली निघून आली. 

घरी पाहुणे आहेत आणि सगळ्यांपुढे  काही तमाशा नको म्हणून अर्जुन खाली येत कॉर्नरला सोफ्यावर जाऊन बसला होता,  पण त्याचे  पूर्ण नजर देवेश वर  होती . देवेश घरी आलेला अर्जुनला   अजिबात सहन झाले नव्हते , पण हा विषय पहिले फक्त घरच्यांसमोर बोलू असा विचार करून तो शांत बसला होता. 

तिकडे देवेश आणि त्याच्या घरच्यांचे आवभगत ,  नाश्तापाणी असे सुरू होते.  माही पण श्रिया , अनन्या  सगळ्यांना मदत करत होती . तिने ट्रेमध्ये सगळ्यांसाठी चहा आणला आणि सगळ्यांना देत होती.  माही देवेशला चहा द्यायला गेली.  तिने चहाचा कप पुढे केला , तशी देवेशने माही वर एक नजर टाकली.  त्याची ती नजर खूप घाणेरडी होती. माहीकडे बघतच त्याने तिच्या हातातला कप घेतला , कप घेताना मुद्दाम तिच्या हाताला घाणेरडा स्पर्श केला.  हे सगळं अर्जुनने  बघितले आणि एक जोरदार तिडीक त्याच्या डोक्यात गेली.   क्षणाचाही  विचार न करता तो जागेवरून उठला आणि देवेश जवळ येत एक जोरदार देवेशच्या कानशिलात वाजवली.  देवेश बसल्याजागी खाली पडला . ते बघून सगळे शॉक झाले.  अचानक हे काय झाले ते कोणालाच कळत नव्हते. 

"तिला स्पर्श करायची तुझी हिंमत झालीच कशी?".... अर्जुन ने त्याच्या दुसर्‍या गालावर परत एक जोरदार ठेवली.  देवेश भेदरलेल्या नजरेने अर्जुन कडे बघत होता.  कोणाला नाही पण देवेशला मात्र काय झालं ते चांगलंच समजलं होते. 

"हे …..हे काय सुरू आहे?  होणाऱ्या जावयाचा असा मान केला जातो काय ?".....देवेश ची  आई चिडली

"अर्जुन , हे काय आहे ?".....आजी

"दादा तू……"... श्रिया 

" मी परत काही करायच्या आधी बाहेर हो"..... अर्जुन देवेश वर  नजर रोखत बोलत होता.  त्याचे डोळे रागाने लालबुंद झाले होते . 

घरात सगळ्यांना अर्जुनचा चिडका स्वभाव माहित होता , पण आज तो सगळ्यांना वेगळा भासत होता.  अर्जुनचे रूप बघून माही सुद्धा घाबरली होती.  तो काय करेल या विचाराने तिची  धाकधूक वाढली होती. 

देवेशला मात्र कळले होते आता आपली काही खैर नाही . त्याने मी काही केले नाही या आविर्भावात श्रिया कडे  बघितले. 

"दादा,  तू हे काय बोलतो आहे,  तो माझा होणारा नवरा आहे,  त्याचा तू अपमान करतो आहे "....श्रिया

" हे लग्न होणार नाही , मी आज सगळ्यांसोबत बोलणार होतो,  पण हे लोकं होती म्हणून चूप होतो".... अर्जुन

" अर्जुन , हे काय बोलतो आहे ?लग्नाची तयारी झाली,  इंविटेशन्स गेले आहे आणि हे अचानक मध्येच?"..... आजी

" इन्व्हिटेशन पाठवले नाही की वेन्यू पण बुक केलेला नाही.  कोणालाच माहिती नाही श्रियाच्या लग्नाबद्दल"..... अर्जुन

" काय?  पण तू स्वतः हे सगळं बघत होता , सगळं झाले हे पण बोलला होता ".....मामा

"ते सगळं खोटं होते"..... अर्जुन

ते ऐकून सगळे शॉक झाले.

"अरे पण….".... आई

"दादा , तू माझे लग्न मोडू शकत नाही"...... श्रेया

" तुझ्यासोबत काय,  हा ज्या पण मुली सोबत लग्न करायला गेला असता , मी ते लग्न सुद्धा होऊ दिले नसते.  हा चांगला मुलगा नाही आणि तू तर माझी बहिण आहेस,  मी तुझं लग्न याच्या सोबत कधीच होऊ देणार नव्हतो"......अर्जुन


 

"मी काही केले नाही आहे,  ही….. ही मुलगी हिच माझ्या मागे लागली होती.  या गरीब मुलींचे हेच काम असते , आता तिला दुसरा श्रीमंत मुलगा मिळाला तर मला वाईट बनवून मोकळी झाली"......देवेश

देवेश बोलला तशी परत त्याच्या गालावर पडली. 

माही  इथे या विषयात मध्ये कशी आली हेच कोणाला कळत नव्हते.  श्रेया सुद्धा त्याच्या बोलण्याने शॉक झाली होती . सगळे माही कडे संशयी नजरेने बघत होते.  


 

"ही मुलगी तुम्हाला माहिती नाही कशी आहे,  ती चेहऱ्याने जरी साधी दिसत असली तरीही खूप चालू मुलगी आहे.  ती तुम्हाला फसवते आहे.  ती तुमच्या लायकीची नाही".... देवेश अर्जुन ला समजावण्याचा प्रयत्न करत होता. 

"तुला सांगितले कळले नाही वाटते, तिच्या बद्दल एकही शब्द काढायचा नाही"..... अर्जुन

"मला माहिती ,ती तुमची गर्लफ्रेंड आहे , पण खरंच ती तुमच्या योग्यतेची नाही".... देवेश चांगुलपणाचा आव आणत बोलत होता.


 

घरी सगळ्यांना तर एकावर एक धक्के  बसत होते. अर्जुनच्या आईला सुद्धा अर्जुन थोड्यावेळापूर्वी माही बद्दल बोलत होता ते आठवले. 

"गेट आऊट फ्रॉम माय हाऊस ".....अर्जुनने सिक्युरिटीला आवाज दिला


 

" थांब  अर्जुन , माही तु देवेशला ओळखते काय ?खोटं बोलायचं नाही"..... आई

माहीने अर्जुनकडे बघितले आणि होकारार्थी मान हलवली. 

"तिला मी चार वर्षे आधीपासून ओळखतो.  ही तिकडे नाशिक जवळ एका लहान गावात राहत होती . ही खरंच चांगली मुलगी नाही आहे ".....म्हणत देवेश तोल सोडून मनाला येईल तसे बोलत होता. 

श्रियाला तर माहीचा खूप राग येत होता . सगळ्यांना त्याच्या बोलण्यावर विश्वास बसत होता ,असे दिसत होते. 


 

" माझ्या बोलण्यावर तुम्हाला तुम्हाला विश्वास नसेल बसत तर मी तुम्हाला काही फोटो दाखवतो, ते बघून  तुम्हाला विश्वास बसेल ".....म्हणत देवेशने आपला मोबाईल काढला आणि सगळ्यांना त्यातले काही फोटो दाखवले. 

माहीचे  ते फोटो बघून सगळे शॉक झाले , महिला वर्गाने तर ते बघून डोळे मिटून घेतले. अर्जुनने त्याच्या हातातून फोन हिसकला आणि खाली जमिनीवर फेकत फोडला. 

 सगळ्यांच्या मनात मात्र माही बद्दल शंका कुशंका निर्माण झाल्या होत्या.  ते सगळं बघून माहीच्या डोळ्यात पाणी तरळले. ती अश्रुपूर्ण नजरेने अर्जुनला बघत होती.

"माही , वर रूममध्ये जा "....अर्जुन

"नाही,  मला काही विचारायचे आहे , ती इथेच थांबेल"..... आई

"Maahi , I said go "...... अर्जुनच्या आवाजात जरब होती, त्याने डोळ्यांनी तिला शांत राहा आणि वर जा  खुणावले , तशी ती चुपचाप वरती गेली. 

"अर्जुन,  हे सगळं काय सुरु आहे ?हे माहीचे फोटो?  तू आणि माही?हे सगळं काय आहे?".... आई 

" दादा,  तू हे असल्या मुली साठी माझं लग्न मोडायला निघाला होता?"... श्रेया अर्जुनला जाब विचारत होती.

"श्रेया,  तुला काहीच माहिती नाही , शांत हो"....अर्जुन

"कसं काय शांत बसणार,  तीन आठवड्यांनी लग्न आहे आणि आज तू हे सगळं काढतोय ? आणि त्या छप्री मुलीसाठी तू माझं लग्न मोडतोय ?".....श्रेया

" Shriya , mind your language"..... अर्जून

"का? आता तिच्याबद्दल बोललं तर तुला राग आला आणि तू मघापासून बोलतो आहे ते? तू देवेश् वर  हात उचलतोय ते? तरी मला तू शांत बस म्हणतो"..... श्रेया

" श्रेया , आय नो व्हॉट इस बेटर फोर यू "....अर्जून


 

" नाही,  तुला फक्त तुझ्या मताचे करायला आवडते. ती माही किती घाणेरडी आहे  , बघितले ना….. तरी तू तिची साईड घेतोय ?".....श्रेया मनात येईल ते बोलत होती

"श्रिया ssss"......अर्जुन तिच्यावर हात उगारता उघडता थांबला. 

" आता तू तिच्यासाठी सगळ्यांसमोर मला मारणार आहेस?".... श्रिया चे डोळे रागाने लाल झाले होते. 

" ही इज रेपिस्ट ".....अर्जुन

अर्जुन चे शब्द ऐकून एक भयानक शांतता घरामध्ये पसरली.  अंजली , आत्याबाई , छाया यांच्या डोळ्यात सुद्धा आता पाणी आले होते. 

" माझ्यावर नको ते आरोप करत आहे तुम्ही….. मी मानहानीचा केस करू शकतो तुमच्यावर .  मी सांगितले ना तिने तिच्या प्रेमाच्या जाळ्यात मला फसवले होते,  नंतर माझ्याकडून पैसे उकळत होती . आता तिने  अर्जुन पटवर्धन ला पटवले आहे,  आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले आहे.  तिला कळले माझे श्रिया सोबत लग्न होत आहे,  तर तिचे या घरात चालणार नाही,  तिचे सत्य उघडकीस येईल म्हणून तिने हा सगळा प्लॅन रचला.  तिने तुमच्याकडून दहा लाख घेतले ना….. ते पण तिने मलाच दिले होते ,की मी माझे तोंड  तुमच्या सगळ्यांसमोर बंद ठेवावे,  पण मी ते घेतले नाही,  तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात,  मी मी तुम्हाला कसे फसवू शकणार होतो?"...... देवेश

त्याचे बोलणे ऐकून  आता आशुतोषला सुद्धा राग आला. 

" अर्जुन खरं  बोलतो आहे ".....आशुतोष पुढे आला. 

" तुम्हाला पण तिने गोड बोलून फसवले दिसतेय  ".....देवेश कुत्सितपणे हसला.

" वाह जिज,  मी तुम्हाला किती मानत होते , तुम्ही पण तिची साईड घेत आहात?"..... श्रिया 

श्रीयाचा आपल्यावर,  आशुतोषवर विश्वास नाही बघून अर्जुनला खूप वाईट वाटत होते.  देवेशच्या चेहर्‍यावर मात्र जिंकल्याचे हसू होते. 

" श्रेया तुला तुझ्या भावावर,  जिजाजी वर विश्वास नाही पण  या बाहेरच्या व्यक्तीवर विश्वास आहे,   खरच हो आपल्या नात्याची हार आहे.  तुला काही दाखवतो,  इनफॅक्ट सगळ्यांना कारण तुझ्यासोबत बाकीच्यांच्या डोक्यात अविश्वास निर्माण झाला आहे"..... बोलत त्याने त्याचे पॅन्टच्या खिशातून एक पेनड्राईव्ह काढला आणि तो टीव्हीला लावला.  रिमोट हातात घेत टीव्हीवर काही व्हिडिओ लावले.  त्यात देवेश त्याच्या मित्रांसोबत बोलताना दिसत होता,  त्यात त्याने माहिसोबत  जे घान  कृत्य केले होते ते सांगत होता , श्रीया सोबत खोटं प्रेम,  श्रीया सोबत पैशासाठी लग्न करतो हे सुद्धा तो बोलताना दिसत होता.  माही  त्याला भेटायला गेली तेव्हाचे  सगळं संभाषण दिसत होते. त्यात  देवेशने केलेला गुन्हा त्याने स्वतःच्या तोंडाने कबूल केला होता. 

घरातील सगळे टक लावून ते व्हिडिओ बघत होते. ते बघून सगळेच शॉक झाले होते.

देवेश सुद्धा ते बघून शोक झाला होता.  आपण आता पकडले गेलो आहे हे त्याला लक्षात आले होते . आणि आता आपल्याला अर्जुन जिवंत सोडणार  हे सुद्धा समजले होते. 

सगळे टीव्हीवर व्हिडिओ बघण्यात व्यस्त आहे बघून संधीचा फायदा घेत देवेशने बाजूला उभा असलेल्या अर्जुनला  जोरदार धक्का मारला आणि स्वतःला वाचवण्यासाठी  बाहेर पळाला. 

अर्जुन बेसावध असल्यामुळे जोरदारपणे समोरच्या टेबलावर डोक्याच्या भागावर जाऊन आदळला.  त्याच्या डोक्यातून रक्त वाहायला लागले . आणि कुणाला काही कळायच्या आत तो जमिनीवर कोसळला आणि त्याचे डोळे बंद झाले….. 

*****

क्रमशः 

🎭 Series Post

View all