Aug 16, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 72

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 72

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 72

 

भाग 72


 

अर्जुन माही कार मध्ये बसले आणि कार  पुढच्या दिशेने निघाली . पुढे जायचा रस्ता माहीच्या गावातून जात होता. 

 

" सर …"...माही

 

" ह्म्म्म"... अर्जुन

 

" सर , मला घरी जायचं".... माही

 

" नो...".... अर्जुन

 

" सर एकदाच "..... माही 

 

" आय डोन्ट लाईक देम"..... अर्जुन

 

" सर,  एकदाच भेटायचं  मला माझ्या आई वडिलांना , बहिण भाऊला ,  खुप आठवण येते आहे त्यांची .  एकदाच शेवटचं प्लीज... प्लीज…".... माही आर्जवी स्वरात बोलत होती. 

 

 अर्जुनला  तिची इच्छा मोडायला जीवावर आले आणि त्याने तिला तिच्या आईवडिलांकडे परवानगी दिली, पण तरीही त्याला कुठेतरी ते ठीक वाटत नव्हते. 

 

" ओके …"...अर्जुन

 

घरच्यांना भेटायला मिळते आहे  विचार करूनच तिच्या चेहऱ्यावर  आनंद पसरला.  तिने ड्रायव्हरला पत्ता सांगत कार तिच्या घरासमोर थांबवली. 

 

" सर ….."...माही

 

" मी थांबतो कार मध्ये,  तू जा "..... अर्जुन

 

माहीने एक्साइटमेंट मध्ये कारचे दार उघडले आणि तिच्या घराकडे धाव घेतली.  तिची लहान बहीण तिला अंगणात दिसली,  तिचं लक्ष माही कडे  गेले,  ती एकटक माहीकडे  बघत होती . माहीला तिला बघून खूप आनंद झाला,  ती तिच्याजवळ गेली पण तिच्या चेहऱ्यावर काहीसा रागीट भाव दिसत होता.  नेहमी ताई ताई  करत तिच्या मागे फिरणाररी  मंजू आज इतक्या वर्षांनी माहीला बघून सुद्धा तिला आनंद झालेला दिसत नव्हता. 


 

" मंजू,  कशी आहेस?  किती मोठी झाल ?  किती सुंदर दिसते"... माही  बडबड करत तिच्या  जवळ जात तिच्या चेहर्‍याला हात लावत बोलली. 


 

" हात नको लावू मला , दूर हो ".... मंजुने तिचा हात झटकला. 

 

" मंजू,  काय झालं?  बरं वगैरे नाही काय ? माझ्यावर रागावली काय?  मी तुझी ताई , मला ओळखले नाही काय?".... माही

 

" तुला कसे विसरणार मी , तुझ्यामुळे तर माझे आयुष्य नर्क बनले आहे,  तुझ्यामुळे बाबांनी माझं शिक्षण सोडवलं,  कुठे येऊ जाऊ देत नाही,  घराच्या बाहेर पाय ठेवू देत नाही,  इथे घरात कोंडून ठेवले आहे , माझी इच्छा नसताना माझं लग्न मला न आवडलेल्या माझ्यापेक्षा  दुप्पट वयाच्या  मुलासोबत पक्के केले आहे"....  मंजू रागात बोलत होती.  ते सगळं ऐकून माहीला  खूप वाईट वाटले. 

 

 माही सोबत घडलेल्या घटनेमुळे तिच्या वडिलांनी भीती वाटून त्यांनी माहीच्या  लहान बहिणीचे मंजुचे  शिक्षण बंद केले होते,  तिला एकटीला बाहेर वगैरे जाण्याची बंदी घातली होती.  तिचं लवकरात लग्न व्हावे आणि आपण मुलीच्या जबाबदारीतून मुक्त व्हावे ,  म्हणून  तिचं लग्न तिच्या पेक्षा 16-17 वर्षाने मोठ्या असलेल्या माणसासोबत ठरवून मोकळे झाले होते . 


 

" आई , तुझी मुलगी आली".... ओरडतच मंजू माही कडे न बघता आतमध्ये निघून आली. 

 

 मंजुचा  आवाज ऐकून तिची आई धावत धावत घराच्या पडवीत आली.  माहीला बघून त्यांना खूप आनंद झाला . माहीने लगेच जाऊन आईला मिठी मारली . आई माही दोघांच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते,  पोरीला सुखरूप बघून आईच्या जीवात जीव आला होता. 

 

" माही , कशी आहेस ?"...आई

 

" ठीक आहे आहे,  तू कशी आहे ?".... माही 

 

" आम्ही सगळे ठीक आहोत, ये आतमध्ये"....  आई तिला घेऊन आतमध्ये येत होती. 

 

" इथे कधी आली ? एकटी आली काय? तुझ्यासोबत कोणी…..?"... आई तिला प्रश्न विचारतात मध्ये घेऊन येत होती. 

 

" एकटी नाही आहे, चार तास झाले गावात येऊन  , फिरत आहे कोणत्यातरी  पोरा बरोबर …..उरलीसुरली माझी  अब्रू गावात सगळ्यांसमोर घालवायला निघाली आहे ही…. कुलक्षणी…. बिलकुल घरात पाय नाही ठेवायचा "......माहीचे  वडील ओरडले. 

 

" बाबा , अहो तुम्ही चुकीचे समजत आहात , असे काही नाही"..... ती बोलत बोलत त्यांच्या पाया पडायला गेली. 

 

" काही गरज नाही,  चल  माझ्या घरातून बाहेर  हो …."... त्यांनी माहीच्या  हाताला पकडले आणि तिला दाराकडे भिरकावले. 


 

" अहो , हे काय करताय?  किती वर्षांनी पोर घरी आली,  जे काही झाले होते ,  त्यात पोरीची काय चुक होती ?"......आई


 

" ती मुलगी आहे ,हीच तिची चूक होती , त्यामुळेच हे सगळं भोगावं लागलं . तेव्हाचे  जाऊ दे,  आता जे करते आहे  त्याचं काय? मघाशी  सतीश चा फोन आला होता,  तेव्हाच पाहून आलो होतो,  कुठल्या मुलाचा हात पकडून उभी होती , माझ्या अब्रूचे धिंडवडे काढत "....तिच्या वडिलांचा राग अनावर झाला आणि ते माही वर हात उगारयला गेले. 

 

"Don't dare to touch her "...... अर्जुनने त्यांचा माहीवर उठलेला  हात आपल्या हातात रोखून धरला.  अर्जुनचे डोळे रागाने लाल झाले होते. 

 

" बघ म्हणालो होतो ना , हा…. हाच आहे तो , याच्यासोबत आली आहे गाव फिरायला"......बाबा 

 

" मी तिला हाकलेल ,  नाहीतर मारेल…. तुम्ही कोण होता मला अडवणारे?".... बाबा


 

" तुम्ही कोण होता तिच्यावर हात उचलणारे ? तिच्यावर हात उचलण्याचा हक्क मी कोणालाही दिला नाही आहे , कोणालाही म्हणजे कोणाला...ही नाही ".....म्हणत अर्जुनने माहीचा हात पकडला आणि तिला बाहेर  घेऊन जाऊ लागला. 

 

" बाबा,  तुम्ही समजत आहे तसं काही नाही, अहो हे माझे…."....

 

" माही,  लेट्स गो ".... अर्जुनने तिला पूर्ण बोलू दिले नाही . 

 

" सर …..".....माही केविलवाण्या नजरेने त्याला बघत होती. 

 

" No Mahi , they don't deserve "..... अर्जुन तिला  कार जवळ घेऊन गेला . माही भरल्या डोळ्यांनी आपल्या आई-वडिलांना बघत होती . अर्जुनने  तिला आतमध्ये बसवले आणि कार तिथून पुढे निघाली. 

 

" ती ….माही ताई  होती ना?".... मनीष माहीचा  भाऊ पळत पळत घरात आला . आईने होकारार्थी मान हलवली. 

 

" आणि ते तिच्या सोबत होते ना?".... मनीष

 

"हो , माहिती नाही कोणासोबत तोंड काळ करत फिरत आहे"..... बाबा चिडत बोलत होते

 

"बाबा,  तो असा तसा कोणी नाही,  अर्जुन पटवर्धन होता,  तो मोठा बिझनेस मॅन आहे.  मी ज्या फॅक्टरीमध्ये काम करतो,  तिथला माल त्यांच्याच  इंडस्ट्रीजमध्ये जातो ".....मनीष

 

" या पोरीने माझी सगळी इज्जत विकून टाकली , आपला काही संबंध नाही तिच्या सोबत आणि आता मला तिचा विषय सुद्धा नको या घरात "......बाबा

 

माही कार मध्ये शांत बसली होती,  पण डोळ्यातून येणारे अश्रू मात्र थांबायचं नाव नव्हते घेत.  तिची काही चूक नसताना सुद्धा विधात्याने तिला इतकी मोठी शिक्षा दिली होती,  की तिचे आई-वडील , बहिण-भाऊ तिचा परिवार तिच्या कडून हिरावून घेतला होता.  ती मूकपणे अश्रू गाळत चुपचाप बसली होती. 

 

माहीचे  तिच्या  परिवारावर किती प्रेम आहे आणि आपल्या परिवाराच्या आनंदासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते ,  अर्जुनला माहिती होते.  कितीही  आधार दिला,  दुःख वाटून घ्यायचा प्रयत्न केला , तरी काही गोष्टी अशा होत्या ज्या तिच्या  तिला सहन कराव्या लागत होत्या.  अर्जुनला तिला बघून खूप वाईट वाटत होते. 


 

अंधार पडत होता , घरी परत जाणे तरी आता शक्य नव्हते.  नाशिकला अर्जुनच्या हॉटेलमध्ये ते थांबले होते.  ते थांबले होते त्या एकझिक्युटिव्ह रूमचा पूर्ण फ्लोअर लॉक  करण्यात आला होता.  तिथे कोणाला यायला परवानगी नव्हती.  माहीचा  जेवण्याचा थोडा मूड नव्हता ,  अर्जुनने जबरदस्ती तिला थोडं खाऊ घातले होते. 

 

अर्जुनला एडवोकेट शेखरचा फोन आला होता , तो फोनवर काहीतरी डिस्कस करत होता.  त्यानंतर आशुतोषचा पण फोन आला तर तो त्याच्याशी फोनवर बोलत होता.  माही  खिडकीत उभी एकटक बाहेर चांदण्यात बघत होती आणि तिच्या डोळ्यातून परत अश्रू वाहत होते. 

 

" माही sss …."... अर्जुनने  माहीला पाठी मागुन मिठी मारली. त्याचा स्पर्श जाणवला तसा  तिने पण वळून त्याला करकचून पकडून घेतले. 

 

" मी तुला तुझ्या घरी थांबू नाही दिले म्हणून वाईट वाटत आहे काय?  I am Sorry "..... अर्जुन, तिला रडतांना बघून त्याला हेच वाटत होते की त्याने तिला तिच्या घरी थांबू नाही दिले म्हणून तिला वाईट वाटत आहे ..

 

" तुला माझा राग आला असेल,  पण ते तुझं एक्सप्लेनेशन डिझर्व  नव्हते करत.  तू इतक्या वर्षांनी त्यांना भेटायला गेली,  तू कशी आहे त्यांना विचारावेसे पण वाटले नाही . परत तुझ्यावर आरोप करायला लागले आणि तुझ्यावर कोणी हात उचललेला मला चालणार नाही , मग ते कोणीही असू दे".... अर्जुन तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तिला समजावत होता. 

 

माही त्याच्या मिठीत होती,  तिचा डोक्यात ती घरी गेली होती ते सगळं सुरू होते आणि ती  त्याच्या मिठीत मुसमुसत होती. 


 

" माही , प्लीज डोन्ट क्राय , तुला माहिती आहे तू रडलेली मला आवडत नाही  "....अर्जुन


 

" सर,  माझ्यामुळे दुसऱ्याचे आयुष्य खराब झाले, मी कसे स्वतःला माफ करू ".... माही रडत रडत बोलत होती. 

 

"माही  डोन्ट ब्लेम युवर सेल्फ,  प्लीज….. मी तुला रोज तेच सांगतोय,  पण तुला कळत नाही आहे"..... अर्जुन

 

" पण मी काय करू सर , नाही होत  मला हे सहन  ".....नाही

 

" माही काय झाले आहे?"... अर्जुन

 

" सर , मी तुम्हाला काही मागितले तर द्याल ... प्लीज….".... नाही

 

"तुला त्रास होणार नसेल तर तू म्हणशील ते सगळं  देईल "....अर्जुन

 

" सर , बाबांनी मंजू चे लग्न ठरवले , ते पण तिच्यापेक्षा सोळा-सतरा वर्षांनी मोठ्या माणसांसोबत "...माही

 

"व्हॉट ? शी इज हार्डली  17-18 ईयर ओल्ड "......अर्जुन

 

" माझ्यासोबत जे घडले , त्यामुळे बाबांनी तिची शाळा बंद केली,  तिला कुठेच घराबाहेर नाही जाऊ देत , त्यांना फक्त तिचे लवकरात लवकर लग्न करायचे आहे आणि त्यांनी काहीच विचार न करता या अशा माणसासोबत लग्न फिक्स केले . माझ्यामुळे तिचे बालपण , तिचे शिक्षण , तिचे स्वप्न,  सगळे  मातीमोल झाले . ती पण खूप हुशार होती,  तिला पण खूप शिकायचं होते , माझं तर ठीक आहे पण तिला कशाची शिक्षा मिळत आहे ? माझी बहीण असण्याची  की मुलगी असण्याची?  ती तर निष्पाप होती  तर  तिला या सगळ्यांची का शिक्षा?  सर तुम्ही तिचे लग्न मोडाल काय?".... माही

 

माहीचे बोलणे ऐकून तर अर्जुन शॉक झाला . तो आधीच आई-वडिलांवर खूप चिडला होता , आता हे सगळं ऐकून त्याला  त्यांच्या भयानक राग आला होता . 


 

" पण माही ,  जर त्यांनी ठरवलेच आहे तिचे लग्न करायचे,  तर हे लग्न मोडले तर ते दुसरा मुलगा शोधून आणतील".... अर्जुन

 

"सर,  प्लीज काही पण करा,  पण मंजूला या सगळ्यातून बाहेर काढा.  मी तुमचे हात जोडते , सर प्लीज तुम्ही काही पण करू शकता,  प्लीज काहीतरी करा ना , तिला दुःखात बघून मला खूप त्रास होतोय सर…. ऐका ना माझं,  प्लीज काहीतरी करा,  मला माझी बहीण परत हवी आहे , माझी मंजू मला परत हवी आहे…".... माही विनंतीच्या सुरात बोलत होती…..

 

"  सर , मला काही नको,  तुम्ही जे म्हणाल ते सगळं करते,  पण माझ्या मंजुचे  आयुष्य असे अंधारमय नका होऊ देऊ ".....माही  रडत रडत बोलत होती , तिला तिचे रडणे तिच्या भावना कंट्रोल होत नव्हत्या. 


 

" श sssss …. माही रडू नको , करतोय मी काहीतरी "....अर्जुनने तिचे  डोळे पुसले  आणि तिला आपल्या जवळ घेतले . त्याने त्याच्या खिशातून फोन काढला आणि कोणाला तरी फोन केला , त्याला माहीच्या  परिवाराची,  भावाची,  मंजुरच्या होणाऱ्या लग्नाची , सगळ्यांची माहिती काढायला सांगितले. 


 

" माही , डोन्ट वरी , होईल सगळं ठीक आणि आता प्लिज रडू नको , खूप रडली आहे आज , डोकं दुखेल आता ".....अर्जुन

 

" दुखत आहे …..".... माही

 

रडून रडून माहीचे  डोळे , नाक लाल झाले होते . तिची अवस्था खूप वाईट झाली होती . त्याने तिला आपल्या हातांवर , आपल्या कुशीत उचलून घेतले आणि बेडवर आणून झोपवले . तिच्या शेजारी बसत तिचे डोकं आपल्या मांडीवर घेतले.  तिचे केस मोकळे केले आणि तिच्या डोक्यातून हात फिरवत तिचे डोके दाबून देत होता . माही हळूहळू झोपी गेली. 

 

तिला झोपलेले बघून त्याने तिचे डोके खाली उशीवर ठेवले,  पण  तिने त्याच्या कमरेला पकडून ठेवले होते,  शेवटी तो तिथेच तिच्या शेजारी पडला.  त्याला सुद्धा बऱ्याच वेळ झोप लागत नव्हती.  दिवसभर घडलेल्या गोष्टीनी  त्याच्यावर सुद्धा मानसिक आघात झाले होते . सत्याने  सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्याच्या डोक्यात फिरत होत्या . एका पॉईंटला त्याला सुद्धा अनावर झाले आणि त्याने बाजूला झोपलेल्या माहीला  करकचून मिठी मारली आणि तिला आपल्या छातीशी कवटाळून झोपला. 


 

सकाळी उठल्यावर माहीला  थोडं ठीक वाटत होते , पण ती तशीच अर्जुनच्या कुशीत पडून होती.  त्याला बघत होती.  तिला अजिबात त्याच्याजवळून उठावेसे वाटत नव्हते.  उठून काही करावे तिची इच्छा होत नव्हती . तिला बरेच  सुस्त वाटत होते . त्याची उबदार मिठी तिला जगातली सगळ्यात सुरक्षित जागा वाटत होती . 

 

" आयुष्य इतकं कठीण का असते? का आपल्या आयुष्यासोबत हि सगळी लोकं जुळली असतात ?   एकच आयुष्य मिळते ,  ते सुखाने  का जगता येत नाही?  का जगणं इतकं का कठीण होते ? का कधी कधी जगणं नकोसे होते "..... विचार करत माही  पडल्यापडल्या अर्जुनकडे बघत होती.

 

" हाऊ आर यू फिलिंग नाऊ?"...अर्जुन ,  अर्जुनची झोप उघडली तर माझी  त्याला त्याच्याकडे बघताना दिसली. 

 तिने डोळ्यांनीच ठीक वाटते खुणावले. 

 

"गुड"... बोलत तो उठायला गेला. 

 

" नको"..... माहीने मान हलवली.  त्याला उठतांना बघून माहीने परत त्याच्या मानेत हात टाकला आणि त्याला बिलगली. 

 

त्याने तिला आपल्या जवळ घेतले आणि परत उशीवर डोकं ठेवून पडून राहिला,  त्याला सुद्धा काहीच कराव असे वाटत नव्हते,  फक्त माहीला  घेऊन शांत पडावेसे वाटत होते. 


 

थोड्या वेळाने फोन वाजला , अर्जुनने  फोनवर बोलून फोन ठेवून दिला. 

 

अर्जुन त्याच्या एकदम परफेक्ट ऑफिस लूकमध्ये तयार झाला , एकदम कडक , चेहऱ्यावर सेम कॉन्फिडनट एटीट्यूड… 

 

" माही थोडे काम आहे,  मी खाली जाऊन येतो,  तोपर्यंत तू फ्रेश हो "....अर्जुन स्वतःला आरशात बघत तयारी करत माही सोबत बोलत होता . माही मात्र बेडवर बसून अर्जुनची एकेक हालचाल टिपत होती.  जेव्हा माही सोबत असतो तेव्हा  एक वेगळा हळवा अर्जुन असतो,  पण बाकी पूर्ण जगासाठी तो एक खूप स्ट्रॉंग असा अर्जुन असतो.  तिला त्यालाच बघत बसावेसे वाटत होते.  त्याला बघून तिला खूप फ्रेश वाटत होते,  ती अगदी पापण्या न  मिटता त्याला बघत होती. 

 

" माही , कुठे हरवली?".... माहीचे लक्ष नाही बघुन अर्जुन तिच्या जवळ येत तिच्या गालावर थोपटत बोलला. 


 

" हां..... काही नाही,  तुम्ही खूप छान दिसत आहात".. माही

 

तो गालात हसला… 

 

" खरंच,  मला तर अजूनही हे कळले नाही की तुम्हाला मी का आवडले?"... माही

 

अर्जुनला तिच्या बोलण्याचा अंदाज समजला होता. 

 

" दिल आया गधी पे , तो  परी भी क्या चीज है"...... वातावरण खेळीमेळीचे करण्यासाठी तो तिची मस्करी करत बोलला. 

 

"  काय ?.....मी गधी ?"......त्याचे बोलणे ऐकून माहीचे डोळे मोठे झाले.  तिने बाजूची छोटी उशी उचलली आणि त्याला मारून फेकली , बेडवरून उठत त्याला मारायला लागली.  त्याला तिला असे लहान मुलांसारखे करताना बघून हसू आले. 

 

" ओके ओके , सॉरी "....हसतच बोलत त्याने तिला आपल्या जवळ मिठीत ओढून घेतले. 

 

" तयार हो,  मी येतो थोड्या वेळात,  खाली थोडे काम आहे".... बोलत त्याने तिच्या डोक्यावर कीस केले आणि खाली निघून आला. 


 

थोड्या वेळापुर्वी त्याला मॅनेजरचा फोन आला होता , काही पत्रकार लोक खाली आले आहेत आणि त्याची वाट बघत आहेत.  कितीही सांगून ते जायला तयार नाहीत,  त्यांना अर्जुन पटवर्धन सोबत बोलायचं.  मीडियाला अवोईड केले तर ते काही पिच्छा सोडणार नाही म्हणून तो त्यांना भेटायला खाली आला होता. 

 

मीडियाला  माहिती पडले होते की अर्जुन एडवोकेट शेखरच्या ऑफिस मध्ये गेला होता.  एडवोकेट शेखर कडे गेला म्हणजे प्रकरण लहान नाही, याचा अंदाज पत्रकारांना आला होता.  पण त्यांना कुठूनही काही माहिती मिळत नव्हती . त्यांना कळले होते की अर्जुन नाशिकला हॉटेल मध्ये थांबला आहे आणि म्हणून ते येथे आले होते. 


 

अर्जुन सगळ्या समोर येऊन उभा राहीला . पत्रकार सुद्धा त्याला प्रश्न विचारू लागले. 

 

" सर , तुम्ही अडवोकेट शेखरकडे का गेले होते"....पत्रकार

 

" काही लीगल काम होते"... अर्जुन

 

" कोणते?".... पत्रकार

 

" बिझनेस रिलेटेड".... अर्जुन 

 

" पण एडवोकेट शेखर म्हणजे नक्कीच काही मोठे प्रॉब्लेम असतील , तुमचे कोणा सोबत काही वाद?".... पत्रकार

 

" बिजनेस मोठा  आहे तर काही ना काही प्रॉब्लेम होत असतात आणि एडवोकेट शेखर  इज माय फ्रेंड,  फ्रेंड ला भेटायला तर जाऊ शकतो , राईट ?"...अर्जुन त्त्यांच्यावर नजर रोखत बोलत होता. 

 

" सर , तुमच्या सोबत कोणी लेडी पण होत्या , म्हणजे त्या तुमच्या गर्लफ्रेंड वगैरे?"..... पत्रकार

 

" ऑफिस मध्ये भरपूर लेडीज काम करतात.  मिटिंगच्या कामाने आम्हाला बाहेर सोबत जावे लागते.  आणि गर्लफ्रेंड …..इट्स माय पर्सनल लाईफ ,मी  तुमच्या सोबत डिस्कस करायला हवी , असे नाही वाटत ".....अर्जुन

 

" पण सर".... पत्रकार

 

" तुमच्या कामाच्या प्रश्नांचे उत्तर मी दिले आहेत , असे मला वाटते,  तर आता तुम्ही जाऊ शकता आणि आय होप यू  पीपल विल रिस्पेक्ट माय पर्सनल लाईफ,  थँक्यू"... बोलून तो आत मध्ये चालला आला. 

 

माही वरून खिडकीमधून हे सगळं बघत होती . त्यांचा मजला बराच वरती होता,  तिला ऐकू तर काहीच नव्हते आले,  पण पत्रकार आणि मीडियाने अर्जुनला घेरले होते,  हे तिच्या लक्षात आले होते. 

 

मीडिया पर्यंत एवढे पोहोचले म्हणजे हे देवेश  प्रकरण पण लपून राहणार नाही,  आणि मग त्यामुळे पाहिजे तसे हे  सोपे होणार नव्हते. मोठा बिझनेस मॅन म्हटलं तर बरेच दुश्मन पण आपोआप तयार झालेले असतात आणि ती लोकं सुद्धा काही माहिती मिळते का याचा शोधात असतात.  अर्जुनचे नाव जर या केस मध्ये आले तर ही हाय प्रोफाईल केस होणार होती , ज्याचा फायदा ओप्पोझिशन वाले नक्कीच उचलणार होते.  परत त्यावरून पॉलिटिक्स होणार होते  आणि माहीची  ही केस हाताबाहेर जाण्याची शक्यता जास्त होती आणि माहीसाठी पण प्रॉब्लेम वाढणार होते.  अर्जुनच्या डोक्यात बरेच प्रश्न येत होते,  तो विचार करतच वरती रूममध्ये आला.  माहीने पण त्तिला काही माहिती नाही असेच दाखवले. 

 

दोघांनीही सोबत लंच घेतला.  एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला.  देवेश केस बद्दल सोडून इतर गोष्टींवर डिस्कशन केले . अर्जुन माहीची  खूप गंमत घेत होता . तिला पण खूप छान वाटत होते . पुढे जे होणार होते त्यासाठी मनाची पक्की तयारी केली होती, एकमेकांच्या विश्वासाने,  एकमेकांच्या साथीने आयुष्याचा हा पुढला खडतर प्रवास करण्यासाठी दोघंही सज्ज झाले होते.   संध्याकाळपर्यंत ते शांती सदन ला पोहोचले. 

 

………….. 

 

एडवोकेट शेखरने बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास करून केस फाईल तयार केली.  सत्याने सांगितलेल्या माहितीच्या आधारे त्याने देवेश चे मित्र शोधून काढले होते , त्यांची सगळी माहिती मिळवली होती आणि आता तो त्याच्या मित्रांचा देवेश विरुद्ध वापर करणार होता.  सत्याने सांगितल्यानुसार त्यांच्याकडे या घटनेचे फोटो /व्हिडिओ असल्याची शक्यता होती.  हे फोटो आणि व्हिडिओ मिळवण्याचा अडवोकेट शेखरचा प्रयत्न होता आणि हे खूप सांभाळून मिळवावे लागणार होते,  नाहीतर एक तर ते फोटो प्रूफ डिलीट होण्याची शक्यता होती,  नाहीतर सोशल मीडियावर वायरल होण्याची भीती.  आणि देवेश कडे हे आहेत की नाही हे पण तपासून बघायचे होते,  त्यामुळे हा गेम थोडा काळजीपूर्वक  खेळावा लागणार होता.  

 

…………….

 

देवेशचा जॉब गेला होता,  त्यात त्याच्या भावाचा बिजनेस मध्ये त्याचे काही प्रोजेक्ट सुद्धा गेले होते , पण लग्न म्हणून पैसे तर लागणार होते . पैसे कुठून आणावे,  देवेशच्या डोक्यात सुरू होते . अर्जुनबद्दल पण त्याला पाहिजे तशी माहिती मिळत नव्हती . शेवटी देवेशच्या मित्रांनी जो अर्जुन आणि माहीचा फोटो पाठवला होता ,  ज्यात माहीचा  चेहरा नीट दिसत नव्हता,  तो फोटो वापरायचे ठरवले.  एका अनोन नंबर वरून देवेश ने  अर्जुनला तो फोटो पाठवला आणि एक करोडची मागणी केली,  अथवा फोटो मीडियामध्ये देण्याची धमकी दिली. अर्जुनने आधी थोडे आढेवेढे घेतले पण  नंतर त्याने त्याला पैसे पाठवून हे प्रकरण तिथेच मिटवले होते.  देवेश  सुद्धा आपल्या खेळलेल्या चालीवर खुश झाला आणि त्याला आता पैसे सुद्धा मिळाले होते. 

 

…………


 

 माहीच्या  बहिणीचे मंजुचे  लग्न मुलाकडील लोकांनी मोडले होते.  त्यामुळे माहीचे वडील चांगलेच वैतागले होते.  पुढे काय करावे त्यांना कळत नव्हते . ते मंजुवर खूप चिडचिड करत होते . अशातच माहीच्या  भावाला त्याच्या फॅक्टरी मधून चांगल्या नोकरीची ऑफर आली होती.  इथे शहरात त्याला एका मोठ्या कंपनी मध्ये जॉब मिळाला होता. 

 

"आई,  मला  H&S कंपनी मधून खूप छान ऑफर आली आहे "...मनीष आनंदात घरी आला होता

 

" हो छान,  पण तू तर इंटरव्यू वगैरे द्यायला गेला नव्हता तिकडे".... बाबा

 

" त्यांनी आमच्या फॅक्टरी मधून बेस्ट थ्री कँडिडेट  आतापर्यंत केलेल्या कामावरून निवडले आहे बाबा , पगार पण खुप चांगला देत आहे "....मनिष आनंदाने सांगत होता. 

 

" किती पगार देत आहेत?".... बाबा

 

" 40000"...... मनीष 

 

" बापरे ….."....बाबा 

 

" अरे पण तू एकटा तिथे शहरात , आपले कोणीच ओळखीचे नाही तिथे ".... आई काळजी करत होती

 

" हो आणि माझी शेती आहे , आम्ही  पण शेती सोडून येऊ शकत नाही".... बाबा

 

" आई-बाबा खूप छान संधी मिळाली आहे , आपले  सगळं भविष्य सुधारेल बघा ,  आणि ते कंपनीकडूनच राहण्यासाठी कॉर्टर देणार आहेत , त्यामुळे राहण्याची काही चिंता नाही आणि मी मंजुला घेऊन जातो , म्हणजे खाण्यापिण्याची पण सोय होईल.  तसे पण तिचे लग्न मोडले आहे , उगाच इथे गावात राहून दुसऱ्याची बोलणे ऐकण्यात काही अर्थ नाही.  तिला पण तिकडे थोडे मोकळे वाटेल आणि कॉर्टर एकदम सेफ आहे तिकडे सिक्युरिटी पण खूप जबरदस्त असते.  तुम्ही मंजूची काळजी करू नका,  मी तिची एकदम चांगली काळजी घेईल आणि मग एखादा चांगला मुलगा बघून करू लग्न आरामात , घाई काय,  अजून ती लहान आहे"..... मनीष त्यांना आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करत होता , त्यात आईची पण साथ मिळत होती. 


 

शेवटी हो-नाही करता करता त्याचे वडील तयार झाले.  ते ऐकून मंजू सुद्धा खूप खुश झाली.  आज चार पाच वर्षात पहिल्यांदा ती हसली होती , पहिल्यांदा ती खूप खुश झाली होती,  या पिंजर्‍यातून ती मोकळी होणार होती. मनीषचा  सुद्धा तिच्यावर त्याचा लहान बहिणीवर  जीव आहे तिला माहिती होते,  पण वडिलांच्या धाकामुळे तो काही बोलू शकत नव्हता.  पण त्याने आज बरीच हिम्मत केली होती , माहीची आई पण तिच्या मनीष आणि मंजुरीसाठी खूप खुश झाली होती . 

 मनीष आणि मंजूची इथे शहरात यायची तयारी सुरू झाली होती. 

 

 अर्जुनने एकदम परफेक्ट प्लान करून हे सगळे घडवून आणले होते.  पण हे सगळं अर्जुन ने केले आहे हे कुठेच त्यांना माहिती पडू दिले नव्हते . मंजू इकडे आल्यावर त्याने तिच्या पुढच्या शिक्षणाची सुद्धा सोय केली होती,  मंजुला आपल्या पायावर उभे  होता येईल ,  तिला आयुष्य तिच्या आवडीने जगता  येईल असा प्लॅन केला होता . मनीष साठी पण नोकरी सोबत हायर एजुकेशनचा प्लान केला होता.  हळू हळू हे सगळं तो त्या कंपनीच्या नावाखाली करणार होता. 


 

जेव्हा मंजूचे लग्न मोडले आणि मनीष मंजू  दोघे इकडे येणार आहे , सगळं माहीला कळले,  तेव्हा ती खूप खुश झाली होती .  त्यांचे  आयुष्य खराब होण्यास ती स्वतःला जबाबदार मानत होती .  तिचे ते  दुःख आता काही प्रमाणात अर्जुनने वाटून घेतले होते. 

 

………..


 

अर्जुन आणि माही त्यांची मिटिंग आटोपून  हॉटेल बाहेर पार्किंग एरियामध्ये आले होते . त्यांच्यामध्ये काही बोलणं सुरू होते , माही  भाऊक झाली होती आणि तिला तसे बघून अर्जुनने तिला आपल्या मिठीत घेतले. 

 

"ही …? ही इथे….?  ही आणि अर्जुन पटवर्धन एकत्र … ते पण  इतक्या क्लोज?"...... तो तिला बघून शॉक झाला होता.

 

*******

क्रमशः 

एखाद्या (वाईट )  घटनेचे पडसाद फक्त त्या व्यक्तीवर नाही तर त्याच्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर पडतात .... आणि त्यामुळे बाकीच्यांचे सुद्धा आयुष्य उद्ध्वस्त होते ...

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️