तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 70

माही अर्जुन

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 70

भाग 70

ॲड. शेखर कडून तिघेही घरी पोहोचले . अर्जुन चे कशातच मन नव्हते , तो सरळ आपल्या रूम मध्ये जायला निघाला. 

" अर्जुन , हे हाताला काय झालं ?" नलिनी (अर्जुनची आई)

" काही नाही"... एवढं उत्तर देत तो पुढे जायला लागला , तसेही त्याला जास्त काही बोलण्याचा मूड नव्हता. 

" अर्जुन , मी तुला काहीतरी विचारते आहे.  मला तुझी नीट उत्तर हवी"... आई थोडी रागावत बोलली तरी त्याने दुर्लक्ष केले. 



 

अर्जुनच्या पाठोपाठ आशुतोष आणि माही घरात आले. 

" माही , काय झाले त्याच्या हाताला?  तू होती ना त्याच्या सोबत ऑफिसमध्ये?" …  आई

" का…. काकी….. ते….. माही….."... अडखळत बोलत होती . माहीला  त्यांना काय उत्तर द्यावे काहीच कळत नव्हते. 

" आई , तुम्हाला त्याचा राग आणि चिडका स्वभाव तर माहितीच आहे . संयम शब्दाचा तर त्याला अर्थ सुद्धा माहिती नाही . कंट्रोल नाही  त्याचा स्वत:वर,  म्हणून मग हे असे काही घडत असते "....आशुतोष माहीचे  अवघडलेपण बघून बोलला. 

" हो ते माहिती , पण झालं काय ते स्पष्ट सगळं सांगाल काय?  तो सांगायला तयार नाही आणि तुम्ही गोल गोल फिरवत बोलणार . तुम्हा मुलांना आईचं मन कधीच कळत नाही"... आई 

" तो पाणी पीत होता,  त्याच्या हातात ग्लास होता , तेव्हा त्याला कुठलातरी फोन आला , त्याच्या प्रोजेक्टशी रिलेटेड काही मॅटर झाला होता . बोलत असताना काहीतरी प्रॉब्लेम झाला , त्यात त्याचा राग इतका अनावर झाला की , त्याच्या राग हातातल्या ग्लासवर निघाला . बिचारा ग्लास चकणाचुर होत याचा रागाचा शिकार झाला"..... आशुतोष विषय सांभाळत बोलत होता. 

" काय करू या मुलाचं?  कितीदा सांगितले की रागावर नियंत्रण ठेव.  इतका अडकून पडतो  कामात की,  त्याला कशाचंच भान राहत नाही "......आई

" काळजी नका करू , छोटीशी जखम झाली होती,  डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो,  ठीक आहे आता." ….. आशुतोष

" बरं , आकाश नाही दिसत तुमच्यासोबत?"... आई 

" आकाश सरांना आज जास्ती मीटिंग होत्या, म्हणून त्यांना लेट होईल".... माही 

" बरं , ठीक आहे,  फ्रेश व्हा,  जेवायला घेते "......आई

फ्रेश होण्यासाठी सगळे आपल्या रूममध्ये निघून आले. 

जेवणाच्या टेबलावर श्रियाची  बडबड सुरू होती . लग्नात हे करायचे , लग्नात अशी तयार होईल , कुठला डिझायनर कडून कपडे घ्यायचे,  तिची लिस्ट बनवणे सुरू होते.  तिने आपल्या दोन्ही भावांनीकडे वेगवेगळी डिमांड केली होती.  मध्येच अनन्या  सुद्धा तिची  काही ना काही लिस्ट सांगत होती . आजी,  आई सुद्धा लग्नाच्या मुहूर्त वगैरे बद्दल बोलत होत्या.  अर्जुन मात्र खूप शांत होता,  त्याच्या उजव्या हाताला लागल्यामुळे त्याला नीट जेवता सुद्धा येत नव्हते.  हळूहळू डाव्या हाताने राईस खात होता . माहीचे  सगळं लक्ष अर्जुनकडे होते. 

" अंजली,  आत्याबाई आणि छायाताईची तीर्थयात्रा कशी सुरु आहे ?" ….आजी

" छान सुरु आहे.  खुश आहेत दोघेही , त्यांच्या मनासारखे होत आहे तर ".... अंजली

" छान , कधी परत येत आहेत?" .. आजी

" बस पाच सहा दिवसांनी परत येतील "...अंजली

ते ऐकून अर्जुनला थोडे वाईट वाटले.  अंजलीची आई परत आली तर माही  तिच्या घरी परत जाईल, आणि आता तिला घरी थांबवून घेण्यासाठी काही कारण सुद्धा त्याला दिसत नव्हते.  माही त्याला आता कायमची त्याच्या नजरेसमोर, त्याचा जवळ हवी होती , त्याचा चेहरा परत उतरला.


 

" वा!  छान , श्रियाच्या  लग्नासाठी आपल्याकडे दिवस कमी असल्यामुळे काम खूप आहेत , त्यांना पण मदतीला बोलवावे लागेल"... आजी

" हो हो येतील त्या,  मी त्यांना तसे फोनवर आयडिया दिली आहे ".....अंजली

" छान , मस्तच , बरं मी काय म्हणते माही ,  आता श्रियाचे लग्न होईपर्यंत तू इथेच थांब.  या मुली काहीच कामाचा नाही , नुसता खिदडण्यात वेळ घालवतात.  अंजलीवर खूप कामं  पडतील , तर तू इथे असली की तिला मदत होईल आणि तू काम सुद्धा भराभर करते"..... माही परत जाणार म्हणून  आजीने अर्जुनचा उतरलेला चेहरा बरोबर टिपला होता. 

" तुम्ही काही काळजी करू नका आजी,  मी येऊन करेल मदत "....माही 

" नाही नाही , येण्या-जाण्यामध्येच  खूप वेळ निघून जाईल . ऑफिस- घर थकून जाशील . त्यापेक्षा इथेच राहा काही दिवस,  काय बरोबर बोलतेय ना मी अर्जुन ?"... आजी 

आजीचे बोलणे ऐकून अर्जुनचा चेहरा थोडासा खुलला होता . 

" मला काय विचारता,  तुम्ही बघा तुमचं "....अर्जुन


 

" अरे तूच  तर महत्त्वाचा आहे ".... आजी पूर्णपणे त्याची खीचाई  करण्याच्या मूडमध्ये होती. 


 

" हो हो,  आजी बरोबर बोलत आहेत , अर्जुन काही ऑफिसचे काम कमी करणार नाही , उगाचच माहीला दगदग होईल.  माही तू इकडे थांब , तसे पण अरसिक लोकांची कंपनी मला बोर होते ".....आशुतोषने आजीच्या री मध्ये आपली री ओढली. 


 

" मी बोर काय ?....जेवण होऊ दे थांब , तुला सांगतेच बोर होणे काय असते ते ".... अनन्या बसल्याजागी आशुतोषला टशन देत होती. 

" अरे यार,  कहीपे निशाना कहीपे निगाहे झाले वाटते , बोंबला आशुतोष, भोगा आता".... आशुतोष

त्याचे असे बोलणे ऐकून सगळे हसायला लागले . घरातील वातावरण वरून वरून तर पूर्ववत दिसत होते,  पण घरात मोठे वादळ डोकावत होते . काय होणार होते , प्रत्येकाच्या आयुष्यात ही नाती अशीच राहणार की बदलणार , हे तर आता वेळ ठरवणार होते. 


 

जेवण आटोपून सगळे आपापल्या रूममध्ये निघून आले होते. 

अर्जुन आज खूप लो फील करत होता . सुस्तपणे बेडवर डोळे मिटून पडला होता . एडवोकेट शेखरचे प्रश्न,  त्याचे बोलणे , सगळे त्याच्या डोक्यात फिरत होते . तसे त्याला आयडिया तर होती की हे सगळं सोपे नसणार आहे.  कोर्टात काय होऊ शकतं याची थोडीफार कल्पना होती.  पण तरीही अशा न्युज पेपर , टीव्हीच्या माध्यमातून  ऐकणे आणि स्वतःसोबत घडणे हे खूप वेगळे होते . एखादी न्यूज बघून " अरेरे खूप वाईट झाले "...असे अभिप्राय देणे खूप सोपे होते आणि स्वतः ते  अनुभवने,  खूप कठीण होते. आपण त्याची कल्पना सुद्धा करावणार नाही इतके जास्ती ते वेदनादायक असते.   पिडीत  व्यक्ती तर वेदनेतून जातच असतो,  पण तिच्या घरचे , तिच्यावर प्रेम करणार्‍यांची अवस्था सुद्धा मेल्याहून मेल्यासारखे होते.  आज अर्जुन प्रत्यक्ष ते सगळं अनुभवत होता . माही खंबीरपणे परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार होती,  पण आज तो खचला होता.  पहिल्यांदा आयुष्यात तो तुटला होता,  जेव्हा त्याचे वडील त्याला आणि त्याच्या आईला सोडून दुसऱ्या बाईकडे गेले होते,  तेव्हा पण तो इतका खचला नव्हता.  आता पर्यंत तो प्रत्येक परिस्थितीत खंबीरपणे उभा होता , अगदी सगळ्यांना हरवत तो पुढे गेला होता. 


 

त्याला ही केस वगैरे काही नको होते . तो डायरेक्ट देवेशचा बंदोबस्त करणार होता.  पण देवेश सगळ्यात आधी माहीचा गुन्हेगार होता आणि म्हणूनच माहीच्या  इच्छा , विचारांचा त्याने मान ठेवला होता.  बेडवर झोपल्या झोपल्या विचार करताना त्याच्या डोळ्यांच्या कोनातून  पाणी कधी आले,  त्याला सुद्धा कळले नव्हते. 


 

" अर्जुन sss……"...आवाज देत मिरा अर्जुनचा रूममध्ये येत त्याच्या बेडवर चढत त्याच्या पोटावर जाऊन बसली. 

" अरे प्रिन्सेस,  तू कधी आली?".... त्याने एका हाताने तिला नीट आपल्या पोटावर बसवले. 

" हे काय,  आत्ताच,  तू झोपला होता ना  तेव्हा " …...मीरा

 " झोप नाही आली आज?".... अर्जुन

" ती माऊ काम करत आहे ना , मग मला कोण झोपून देणार ?" …..मीरा

" अरे बापरे , मोठाच प्रॉब्लेम झाला दिसतोय ,  ये मी झोपवतो तुला "..... अर्जुन

" अर्जुन , तुझ्या हाताला बाऊ झाला ना ? बघू दे , मी फुंकर मारली  ना की तुला बरे वाटेल".... मीरा आपल्या चिमुकल्या इवल्याश्या  हातामध्ये अर्जुनचा हात घेत त्यावर फुंकर घालत होती. 

" माझ्या हाताला काही लागलं ना , तर माऊ  सुद्धा अशीच करते , मग बाऊ  छूमंतर होऊन जातो ".....मीरा

" हो ?".....अर्जुन 

" हो , माझी माऊ खूप छान आहे , तिला जादू येते , मग मी लवकर बरी होते "..... मीरा

" हो , ते तर आहे "....अर्जुन 

मीरा त्याचा हातावर फुंकर घालण्यात बिझी झाली होती. 

त्या छोट्या पिल्लूला सुद्धा त्याची एवढी काळजी करताना बघून,  त्याचे मन  भरून आले आणि ओठांवर हसू उमलले. 

" आता बरे वाटते ना?"... मीरा

अर्जुनने होकारार्थी मान हलवली. 

" बघ मी म्हणाली होती ना,  मॅजिक आहे माझ्याकडे"..... मीरा

" हो खरच की , मी उगाच डॉक्टर कडे गेलो "....अर्जुन

" बापरे ! मग डॉक्टर मामांनी तुला सुई टूच केली असेल ना ?".....मीरा

" डॉक्टर मामा?".... अर्जुन

" माऊने सांगितले आहे,  सगळे आपले मामा असतात" ….. मीरा

" ग्रेट आहे तुझी माऊ"..... अर्जुन मीराचे बोलणे ऐकून खळखळून हसायला लागला.  

इतक्या वेळचा खचलेला,  सुस्तावलेला तो मीराच्या येण्याने एकदम हसायला लागला होता.  माहीने मुद्दाम मीराला  त्याच्या जवळ पाठवले होते . थोड्यावेळ मीरा सोबत त्याचा मूड चांगला होईल तिला वाटत होते.  माही रूम बाहेर उभी त्या दोघांची मस्ती बघत होती.  दोघही एकमेकांसोबत खूष बघून ती खाली निघून आली. 

" माही , एवढ्या उशिरा किचनमध्ये काय करते आहे? "....आजी

" आजी,  मीरासाठी दूध बनवत होते , तर ते अर्जुन सर आज बरोबर जेवले नाही ना, ते आठवले ,  पोट नसेल भरले त्यांचे,  म्हणून मग त्यांच्यासाठी बदाम मिल्क बनवत आहे".... माही

अर्जुनची काळजी करताना बघून आजीला माहीची  खूप गंमत वाटली. 

" अग पण दादा दूध नाही पीत,  त्याला अजिबात आवडत नाही"..... श्रिया 

" ओह,  मला माहीत नव्हते"..... श्रिया च्या  बोलण्याने माहीचा चेहरा उतरला. 

" अगं घेऊन जा तू , बदाम घातलेस ना त्यात , घेईल कदाचित तो  तसेही त्याचे आज हातामुळे नीट जेवण झाले नाही आहे"..... आजी

" हो , घेऊन जाते ".... माहीने  एका ट्रे मध्ये मीरासाठी आणि अर्जुन साठी दुधाचे ग्लास ठेवले आणि ती ते घेऊन वरती आली. 

आजीच्या डोक्यात मात्र वेगळेच चक्र फिरायला सुरुवात झाली.  माही अर्जुनचा विचार करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू पसरले. 

" काय झाले आजी ? अशी एकट्यात का हसते आहे?".... श्रिया 

" काही नाही , चल जा झोप , खूप काम करायची आहेत".... आजी

 तशी श्रिया  आपल्या रूम मध्ये पळाली . आजी  आपल्या रूमकडे जायला निघाल्या तर,  त्यांच्या डोक्यात एक विचार डोकावला आणि त्या अर्जुनच्या रूम जवळ आल्या.  त्याच्या रुमचे दार उघडेच होते. 


 

माही अर्जुनचा रूममध्ये दूध घेऊन गेली तर अर्जुन आणि मीरा दोघेही झोपले होते,  मीरा अजून छातीवर झोपली होती आणि अर्जुनाने  आपल्या एका हाताने तिला नीट पकडून ठेवले होते. 

माहीने  ट्रे बाजूला ठेवला आणि मीराला अर्जुनच्या कुशीतून उचलायला गेली . जसा तिने हात मीराला घ्यायला पुढे केला तसे अर्जुनने तिचा हात पकडला. 

" झोपू दे तिला".... अर्जुन

" पण ... तुम्हाला नीट झोपता येणार नाही . तुमच्या हाताला सुद्धा लागले आहे . अवघडल्यासारखे होईल तुम्हाला"..... माही

" आय एम वेरी मच कम्फर्टेबल ".....अर्जुन

" पण , मी ते तुमच्यासाठी दुध आणले होते".... माही

" का ? मला नाही आवडत "....अर्जुन

" ते…. तुम्ही…. आज नीट जेवलात ना….ही . मी त्यात बदा….".... माही 

" दे ".....माहीचे बोलणे पूर्ण व्हायच्या आतच तो बोलला. 

त्याने दे  म्हटले,  तर तिच्या चेहऱ्यावर समाधान कारक भाव पसरले. 

मीराला घेऊनच तो थोडा नीट उठून बसला आणि त्याने ग्लास घेण्यासाठी हात पुढे केला . माहीने त्याच्या हातात ग्लास दिला.एकटक   माहीकडे बघत त्याने तो ग्लास  गटकन संपवला सुद्धा. 

" अर्जुन , प्रेमात पडतोय तर…..".... आजी त्या दोघांना बघून स्वतःशीच हसली आणि आनंदाने आपल्या रूममध्ये निघून आली. 

माही तर  आजींना  पहिल्या भेटीपासून आवडली होती , पण अर्जुनचे  विचार बघता आणि नंतर सोनिया सोबत , लग्न या सगळ्यांमुळे आजीने माहीचा  विचार डोक्यातून काढला होता.  नंतर त्यांनी नलिनी (अर्जुनच्या आई) पुढे पण हा विषय काढला तर नलीनीने  सुद्धा  नकार दिला होता.  पण काही दिवसापासून अर्जुन मध्ये आजीला फरक जाणवत होता.  आणि आज अर्जुन माही  दोघांना सोबत बघून आजीच्या मनात चाललेली ही गोष्ट खरी झाली होती.  श्रियचे  लग्न झाल्यावर अर्जुन जवळ माहीचा  विषय काढायचा,  त्यांनी ठरवले  आणि स्वतःशीच काही स्वप्न रंगवत त्या  निद्राधीन झाल्या. 


 

" तुम्ही ठीक आहात ?"... माही

" हो".... अर्जुन

" हात दुखत तर नाही?"... माही 

" माझ्या प्रिन्सेसने मॅजिक केले आहे हातावर , आता अजिबात दुखत नाही ".....अर्जुन

ते ऐकून माही हसली...

" मीराला घेऊन जाऊ?"... माही

" नको "....अर्जुन 

" मी जाऊ?"... माही

" नको"..... अर्जुन

" मी जाते,  तुम्ही आराम करा".... माही

" जायचं होते तर विचारले कशाला ?"... अर्जुन 

" डोकं खूप चालायला लागले ना तुमचे ?"... माही 

" ते नेहमीच चालते"... अर्जुन 

" आगाऊ "....माही 

तसा तो गालात हसला. 

" यु टू आर द मॅजिशियन, तुमच्यासोबत लगेच मूड चेंज होतो,  थँक्स!"... अर्जुन


 

" तुमचं एवढं भारी  बोलणं पचत नाही,  झोपा,  शुभ रात्री!"... माही .

 माही तिच्या  रूमच्या बाहेर जायला वळली. 

" माहीsss..."... अर्जुन 

" हा ?"...माही त्याच्या आवाजाने जागीच थांबली आणि मागे वळून बघितले. 

" आय लव यू".... अर्जुन

माही त्याचे  ते तीन शब्द ऐकून गोड लाजली आणि हसतच आपल्या रूममध्ये निघून आली. तो पण स्वतःशीच हसला आणि मीराच्या डोक्यावर किस करत झोपी गेला. 

*****

एडवोकेट शेखरने देवेश सोबत असलेल्या बाकी दोन मुलांचे फोटो बनवून घेतले होते आणि त्या तिघांची सगळी माहिती जमा केली होती . त्यांची पर्सनल लाईफ,  त्यांची प्रोफेशनल , कार्पोरेट लाइफ,  त्यांचे मित्र , परिवार अशी सगळी माहिती अडवोकेट शेखरने जमा  केली होती . आता केसमध्ये थोडी होप होती दिसत होती.  त्यांनी त्यांच्या लेव्हलवर केस फाईल तयार करणे सुरू केले होते.  माही च्या  गावाला जाऊन माहिती मिळवण्याचे ठरले हो ते एडवोकेट शेखरने  आपले काही हुशार दोन वकील पाठवले होते. 

माही ला  अर्जुन गावाला जायला एकटे सोडणार नव्हता.  दुसऱ्या गावाला मिटिंगचा बहाणा करत माही ची  पण आवश्यकता आहे सांगत अर्जुनने घरून परवानगी घेतली होती . घरी पण कोणी काही आढेवेढे घेतले नव्हते,  कारण अर्जुन नेहमीच कामानिमित्त बाहेर असायचा.  पण माही बद्दल थोडी काळजी वाटत होती,  माहीच   हा प्रोजेक्ट बघते त्यामुळे , तिथे जाणे महत्त्वाचे आहे,  आकाशने सुद्धा समजावून दिले होते . अर्जुन माही  सोबत आहे म्हणून आजीने सुद्धा परवानगी दिली होती.  

अर्जुन माही  त्यांच्या गाडीने,  तर वकील आपल्या वेगळ्या गाडीने निघाले होते.  अर्जुनच्या गाडचा  कोणीतरी पाठपुरावा करत होते,  पण जसे ते लोकं  शहराच्या बाहेर आले , पाठपुरावा करणारी गाडी अर्जुनच्या बॉडीगार्ड ने गायब केली.  आता गाडी नाशिकच्या रस्त्याने लागली.  माहीच्या  गावाला जाऊन , गुन्हा झालेल्या ठिकाणी जाऊन परत झालेल्या गोष्टींचा उजाळा होणार होता.  परत परत तोच त्रास होणार होता . पण कायद्याने गोष्टी पुढें न्यायाच्या म्हणजे या सगळ्यांचा सामना तर करावाच लागणार होता.


 

******

क्रमशः 

हॅलो फ्रेंड्स 

लाइक्स आणि कॉमेंट्स साठी खूप खूप thank you . कधी कधी वेळे अभावी प्रत्येक कॉमेंट ला रिप्लाय देता येत नाही त्यासाठी Sorry . 

एक मेसेज आला होता , की खरंच माहीचे देवेश विरोधात  केस करणे गरजेचे आहे का कथेत ? … 

तर actually आधी मी पण असाच विचार केला होता , की अर्जुनला  आपण खूप strong personality दाखवली आहे ,त्याचा पॉवरचा वापर करून तो  एका झटक्यात तो देवेशचा आयुष्याचे वाटोळे करेल, त्याला शिक्षा करेल. आणि अर्जुन  त्याचं आणि माहीचे आयुष्य सुरळीत करेल. 

 पण कुठेतरी चुकीचा मेसेज जाईल असे वाटले, कधीकधी मुलगी सामना करायला तयार असते , पण घरील मंडळी तुटून पडली असतात . त्यात कोर्टाचे प्रश्न , process ,  असली नसली हिम्मत तोडून टाकते . मुलीला आणि तिच्या परिवाराला तिच्यासोबत खंबीरपणे अशा गोष्टींचा सामना करायला खंबीर दाखवायचे होते  आणि कथानक थोडे चेंज केले. बलात्कार हा खूप मोठा गुन्हा आहे आणि त्याची शिक्षा झालीच पाहिजे . काही चूक नसताना मुलीचे character ठरवून मोकळे होतो , अन् ज्याचे खऱ्या अर्थाने character बाहेर यायला हवे तो बिनधास्त , सुसंस्कृत मिरवत असतो. 

कथेत कोर्टाची वगैरे प्रोसेस दाखवणार नाही , कारण एवढ माझा अभ्यास नाही. पण ज्या व्यक्तीवर असे काही घडते, तर तो व्यक्ती, त्याचा परिवार कशा कठीण परिस्थितीतून जातो हेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. लोकं मुलींना आणि क्रमाने आईवडिलांनी चांगले संस्कार केले नाही , दोष देऊन मोकळे होतो , होणाऱ्या गॉसिप्स मध्ये सहभागी होतो . फार फार तर वाईट झाले येवढे सांगून मोकळे होतो. 

Google , news, movies  मधून जितकी माहिती गोळा करता आली तेवढी केली, आणि खरंच हे काम सोपे नाही . ही परिस्थिती आपण सामान्य व्यक्ती खरंच समजू शकत नाही, जो या परिस्थितून गेलाय त्यांनाच माहिती त्यांचं दुःख , त्यांचा त्रास. 

आपण मदत तर नाही करू शकत, पण आपल्या शब्दांनी त्यांची लढण्याची शक्ती, त्यांचा धीर खचवू नाही तेवढी तरी काळजी घेऊ शकतो. 

कथेतून कुठलाच गैरसमज ,चुकीची माहिती,  किंवा वाईट असे काही पसरवण्याचा हेतू नाही आहे . कथा फक्त मनोरंजनासाठी लिहिली आहे , त्यामुळे कुठलाही गैरसमज करून घेऊ नका ही विनंती. 

एका वाचक मॅडमचा मेसेज आहे  , त्या corona positive आहेत आणि नंदिनी आणि ही  कथा वाचत आहे , तेवढेच त्यांचे मन गुंतले असते , डोक्यात negative विचार येत नाही … खूप खूप आभार मॅडम तुमचे , अशा कॉमेंट्स मधून खूप प्रोत्साहन मिळते आणि काहीतरी चांगलं लिहितोय असा विश्वास होतो. 


 

काळजी घ्या , स्वस्थ राहा . 

🎭 Series Post

View all