Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 69

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 69

 तू ही रे …. कसं जगायचं तुझ्याविना 69

 

भाग 69

 

अर्जुनने श्रियाला  लग्नाची परवानगी दिली आणि सगळ्यांवर एक नजर टाकत आपल्या रूम मध्ये निघून आला . अर्जुन असे कसे वागत आहे , असे कसे लग्नाला होकार देऊ शकतात ? असे  बरेच प्रश्न माहीच्या डोक्यात सुरू होते . सगळे लग्नाबद्दलच्या चर्चा मध्ये व्यस्त आहे बघून माही अर्जुनच्या रूममध्ये निघून आली. 

 

" सर ….सर…."  आवाज देत ती  अर्जुनचा रूममध्ये आली तर अर्जुन खिडकीमध्ये उभा फोनवर काही बोलत होता,  त्याने माहीला  हात दाखवत थोड्या वेळ थांब असा इशारा केला . माही  शांतपणे चुपचाप उभी अर्जुनला बघत होती. 

 

" हा बोल "...अर्जुन फोन ठेवून तिच्या जवळ आला. 

 

" ते….ते…. तुम्ही श्रियाच्या  लग्नासाठी हो…."..

 

" ह्मम… हळू …..". अर्जुनने त्याच्या रूमचे दार बंद केले. 

 

" आता बोल "...अर्जुन

 

" तुम्हाला तो कसा आहे,  माहित असं असूनही तुम्ही लग्नासाठी होकार दिला?"... माही थोडी चिडतच बोलत होती. 

 

" माही , आधी शांत हो,  असे काही होणार नाही आहे ".....अर्जुन

 

" पण मग तुम्ही एक महिन्यानंतरचे मुहूर्त काढा म्हणून सांगितले ना सगळ्यांना ?" …. माही काहीशा गोंधळलेल्या नजरेने अर्जुनला बघत होती. 

 

" माही ,  त्या दिवशी तू बघितले होते जेव्हा मी श्रियाला  लग्नासाठी नाही म्हणालो होतो,  कशी रिॲक्ट झाली होती ती.  ती काहीच ऐकून , समजून घेण्याच्या मूडमध्ये नव्हती.  त्याने खोट्या चांगुलपणाची पट्टी बांधली आहे श्रियाच्या  डोळ्यावर आणि  आता त्याने हे नवीन लग्नाचं आणि परदेशात जाण्याचे खूळ घातलं आहे श्रीयाच्या डोक्यात .  तिला जर नाही म्हणालो तर ती काही पण करु शकते.  मे  बी लपून त्याच्यासोबत  लग्न करू शकते किंवा आणखी काही घातक ,  मी तिची इन्टेन्सिटी बघितली आहे .  आता कुठली रिस्क  घेणे आपल्याला परवडणारे नाही.  एक महिना यासाठी की तेवढा वेळ मिळेल आपल्याला त्याच्या विरुद्ध पुरावे आणि इतर सगळी प्रोसिजर करायला.  आणि या एका महिन्यात दोघेही बिझी होतील,  श्रिया  पण वाकडे काही पाऊल उचलणार नाही, आणि लग्नाच्या तयारीमध्ये ती बिजी असणार , जास्तीत जास्त वेळ ती आपल्या सोबत असेल ".... अर्जुन

 

" पण तुम्ही खरं कारण सांगा ना घरी , हवे तर मी सांगते".... माही

 

" माही कदाचित लग्न मोडेल,  घरचे मानतील,  पण श्रीया , ती विश्वास ठेवेल?  मला नाही वाटत आणि आपल्याकडे काही प्रूफ पण नाही आहे त्यासाठी . देवेशला माहिती झाले तर तो पण नकार देईल  किंवा कदाचित तोच तुझ्या मानसन्मानावर प्रश्न उपस्थित करेल . आणि मीरा तिच्याबद्दल कोणी गैरसमज करू नये , आपल्या घरी तुम्हा दोघींना विषयी काहीही चुकीचे झालेले मला चालणार नाही, म्हणून वेळ घेतोय "..... अर्जुन

 

माही त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होती. 

 

" म्हणून म्हणालो की आपल्याला असं घाई करून चालणार नाही,  थोडी शांत राहा"..... अर्जुन 

 

माहीने होकारार्थी मान हलवली आणि ती अर्जुनच्या रूम बाहेर पडत होती , तेवढ्यात परत अर्जुनने तिला आवाज दिला. 

 

" आज आपण वकिलांकडे जातोय ,  रेडी रहा "....अर्जुन

 

" पण ...ऑफिस …."... माही

 

" माही , दिस इज मोर इम्पॉर्टंट , आपल्याजवळ वेळ कमी आहे , आकाश बघून घेईल सगळं काही दिवस ".....अर्जुन

 

" पण माझं काम?".... माही

 

" माही,  यु आर इम्पॉसिबल….. आपल्या छोट्याशा डोक्याला त्रास देणं  बंद कर "....अर्जुन तिची मस्करी करत बोलला

 

" पण काम महत्वाचे  आहे ना , तुम्हीच तर बोलत असता नेहमी "..... माही

 

" तुझं काम ऑलरेडी दुसऱ्या कोणाला हांडोवर केलं आहे , डोन्ट वरी "....अर्जुन

 

माही काही  विचारांमध्ये दिसत होती. 

 

" माही भीती वाटते काय?"... अर्जुन तिचा हात आपल्या हातात घेत बोलला. 

 

" मिराची काळजी वाटते आहे,  ती या सगळ्यात नको यायला . तिचा या सगळ्यात काहीच दोष नाही.  तिला काहीच कळत नाही.  ती खूप निरागस आहे.  तिला काही होणार नाही ना?  मला काही झालं तरी चालेल,  पण तिला काही नको व्हायला."...... मीराच्या काळजीने माहीच्या डोळ्यात पाणी यायला लागले होते. 


 

" नाही , मिराला काही होणार नाही,  ट्रस्ट मी "...अर्जुनने महिला आपल्या कुशीत घेतले. 

 

" मीरा तर आहेच निरागस,  निष्पाप.  पण तुझा सुद्धा काहीच दोष नाही आहे . तू  दोषी नाहीस , तू काही चुकीचे केले नाही आहे,  हे डोक्यातून काढून घे ".....अर्जुन तिला समजावत होता. 

 

श्रीयाने  देवेशला  लग्नाबद्दल कळवले होते . आपण फेकलेल्या सापळ्यात श्रिया  आणि तिच्या घरचे फसले , हे बघून  देबेशला  एक असुरी  आनंद झाला . आजी , आई आणि घरातील बाकी जणांना खूप घाई घाईत निर्णय घेतला जातोय असे वाटत होते.  मामी तर तयार नव्हती.  श्रिया मात्र  लग्नासाठी  मुहूर्त काढण्यासाठी घाई करत होती. 


 

ठरल्याप्रमाणे माही आणि अर्जुन घरी ऑफिसचे सांगून ॲड. शेखर कडे जायला निघाले. कार मध्ये बसणार तेवढयात आशुतोष सुद्धा कार मध्ये येऊन बसला. 

 

" तुम्ही ?".... अर्जुन 

 

" मी पण येतोय सोबत "..... आशुतोष 

 

" पण आम्ही ….."....

 

" ॲड. शेखर कडे चालला आहात, मला माहिती आहे "..... अर्जुन पुढे बोलायच्या आतच आशुतोष बोलला. 

 

आशुतोषला तिथे बघून माहीला थोडं अवघडल्या सारखे झाले होते. आधीच अर्जुन माहीच्या नात्याबद्दल आशुतोषला माहिती म्हणून तिला त्याला नजर मिळवणं कठीण जात होते , त्यात आता ते वकीलाकडे चालले होते, आशुतोष सोबत येणार म्हणजे त्याला माही बद्दल सगळं माहिती पडणार आणि तो त्यावर कसा रिॲक्ट करेल या सगळ्या गोष्टींचं टेन्शन माहीला आले होते. 

 

तिच्या चेहऱ्यावरचा अवघडलेपण अर्जुनने अचूक टिपले होते , त्याने डोळ्यांनीच तिला टेन्शन नको घेऊ म्हणून खुणावले होते. 

 

आशुतोषने अर्जुन आणि माही मधले बोलणे ऐकले होते  की ते वकीलाकडे जात आहेत . अर्जुन गरम डोक्याचा, आणि वकील नको ते सगळं विचारतात , त्या सगळ्यांवर अर्जुन शांतपणे ऐकून घेईल याचा त्याला डाऊट होता…. म्हणून तो सुद्धा त्यांच्या सोबत वकिलाकडे जायला आला होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याने माहीला आपली बहीण मानले होते , त्यामुळे तिची जबाबदारी सुद्धा त्याने घेतली होती. 

 

" ओके ".... म्हणत अर्जुनने कार स्टार्ट केली, थोड्या वेळातच ते शेखरच्या ऑफिसमध्ये येऊन पोहचले. 


 

माही ते भव्य ऑफिस बघून थोडी गडबडली होती.  एडवोकेट शेखर नावाजलेले वकील होते . त्यांच्या हाताखाली बरेच वकील काम करत होते . आजपर्यंत एकही केस ते हरले नव्हते . सहजासहजी त्यांची अपॉइंटमेंट मिळत नसे. अर्जुन सुद्धा नावाजलेली हस्ती होती त्यामुळे त्याला नकार देणे एडवोकेट शेखरला सुद्धा परवडणारे नव्हते . पण काहीच प्रूफ नाही म्हटल्यावर केस तशी अवघड होती. 


 

अर्जुन,  माही आणि आशुतोष शेखरच्या केबिनमध्ये आले . थोड्या औपचारिक गोष्टी झाल्या आणि नंतर शेखरने  डायरेक्ट विषयाला हात घातला.   केस बद्दल अर्जुनने शेखरला माहिती पुरवली होती,  पण त्याने परत पहिल्यापासून सगळे माहीला  विचारायला सुरुवात केली.  

" एस्क्युज मी एडवोकेट शेखर ,  मी हे सगळं तुम्हाला आधीच सांगितले आहे.  तुम्ही पुढच्या प्रोसिजर  बघाल काय?" ….  अर्जुन,  

 

एडवोकेट शेखर जेव्हा महिला प्रश्न विचारात होते , तेव्हा माही खूप कम्फर्टेबल झाली होती,  तिला काय झालं आहे हे सांगताना सुद्धा लाज आणि किळसवाणे वाटत होते. 


 

" मिस्टर पटवर्धन , मी माझ्या प्रोसिजर प्रमाणेच बघतोय सगळं ".....शेखर

 

आशुतोषने अर्जुनला शांत केले , अर्जुन चूप बसला होता. 

 

शेखरने माही ला  बरेच प्रश्न विचारले.  माहीला  जसे सांगता येत होते तसे प्रत्येक विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर ती देत होती. 

 

" सो  मीस माही ,  जेव्हा हे घडले तेव्हा तुम्ही एकटे होते काय?" …. शेखर

 

"हो "....माही

 

"  परत आठवून बघा एकदा "....  शेखर

 

" हो मी एकटी होते,  कॉलेजमधून घरी जात होते"..... माही

 

" बाकी कोणीच नव्हते तिथे?" …. शेखर

 

" नाही नाही, "....बोलता बोलता तिला परत काहीतरी  आठवले"  तो मुलगा आणि त्याच्यासोबत आणखी दोन मुलं होते "...माही

 

" ओके गुड,  परत कोणी रस्त्याने येताना जाताना भेटले  अथवा दिसले होते?" …. शेखर

 

ती  परत बराच वेळ विचार करत होती ,  तिला काहीतरी आठवल्या सारखे झाले. 


 

" हो , मी कॉलेजच्या बसमधून उतरून त्या रस्त्याने येत होते तर आमच्या गावचा  सत्या काका भेटला होता,  पाऊस येत होता तर तो एका झाडाखाली उभा होता" ... माही

 

" तेव्हा ही तीन मुलं होती का तिकडे ?".....शेखर

 

" अ….हो….. ती मुलं सत्त्या  काका सोबत काहीतरी बोलत होती".... माही


 

" सुपर,  आणखी काही आठवते?" ….. शेखर

 

" हो ती मुलं बोलून गेल्यावर काका मला म्हणाले पावसाचे रंग बरोबर नाही , लवकर घरी जा . तो मला सोडून देतो पण म्हणाला होता,  पण तो खूप कामात होता म्हणून मीच त्याला नको म्हणाले होते".... माही 

" ओह शीट …..".... ते ऐकून अर्जुनने बाजूला भिंतीवर आपला  हात आपटला. 


 

" मा,  तू  का नाही घेतली त्यांची हेल्प?  हे सगळ घडलेच नसते".... अर्जुन चिडतच  बोलला . 

 

कदाचित त्या वेळेला तिने त्या काकांची मदत घेतली असती तर आज हे सगळं घडले नसते ,  असे अर्जुन ला  वाटत होते आणि म्हणूनच त्याला आता राग येत होता.  त्याचा राग बघून माही थोडी घाबरली,  तिच्या डोळ्यात आसवे जमायला लागली होती. 

 

" अर्जुन प्लीज शांत हो,  जे व्हायचं होते  ते घडून गेले आहे . आता त्यावर चिडण्यात काहीच अर्थ नाही , प्लीज ती घाबरली बघ.".... आशुतोष 

 माही कडे बघून त्याने स्वतःला शांत केले. 

 

" मला खरंच नव्हते माहिती असे काही होईल . तो काका खरच कामात होता , मला घरी पोचवून तो परत येईल , तो काम करेल मग त्याचे घरी जाईल,  त्याला सुद्धा उशीर झाला असता आणि माझा तो नेहमीचा रस्ता होता म्हणून मी त्याला नको बोलले ".... माही  रडत रडत स्पष्टीकरण देत होती. 


 

" सॉरी माही".... अर्जुन

 

एका असिस्टंटने माहीला  पाणी वगैरे आणून दिले.  माही आता थोडी शांत झाली होती.  थोडावेळ रिलॅक्स झाल्यावर परत शेखरने प्रश्न सुरू केले . त्याने आधी साधी साधी प्रश्न केले , आता मात्र तो थोडे कठीण आणि फिजिकल प्रश्न विचारू लागला,  जसे कि त्या मुलांनी कुठे हात लावला,  आणखी काय काय केले,  कसे केले , असे बरेच प्रश्न विचारत होता. ते सर्व ऐकून अर्जुनला आता अस्वस्थ होत होते. नकळतपणे तो सीन डोळ्यांपुढे येऊ लागला. 


 

" व्हॉट रबीश मिस्टर शेखर" ….  ते ऐकून अर्जुनचा पारा खूप चढला होता , त्याचा राग अनकंट्रोल झाला ,  त्याने हाताची मुठ आवळली   आणि त्याच्या समोर असलेल्या काचेच्या टेबलावर जोरदार आपटली  . त्याचा प्रभाव इतका स्ट्रॉंग होता की टेबल वरच्या काचेला तडा गेलेल्या आणि क्षणार्धात त्याचे तुकडे तुकडे होत ते खाली पडले.  हे सगळं इतक्या अचानक झाले होते की कोणाला काहीच  कळले नव्हते . तुटलेल्या काचांच्या  आवाजाने मात्र बरेच लोक तिथे जमले होते.  माही,  शेखर,  आशुतोष जागीच उठून उभे राहिले होते. 

 

" मिस्टर पटवर्धन , प्लीज काम डाऊन,  हे आमच्या तपास कार्याचा एक भाग आहे आणि तसे पण कोर्टात असे प्रश्न परत विचारले जातील , यापेक्षा ही भयानक प्रश्न असू शकतात, तिथे तुम्हाला असे वागणे चालणार नाही. केस बलात्काराची आहे , पुढील व्यक्ती अब्रुवर चिखल फेक सुद्धा करू शकतात , आपल्या रागावर कंट्रोल ठेवा. मला माहिती हे असे ऐकणे सोपी नाही आहे , पण तरी सुद्धा मनाची तयारी ठेवावी लागेल, संयम ठेवावा लागेल   "....  शेखर


 

" सॉरी मिस्टर शेखर "....आशुतोष प्रकरण सांभाळण्याचा प्रयत्न करत होता. 

 

अर्जुनच्या हातातून रक्त येत होते , ते बघून माहीसुद्धा घाबरली होती . शेखरने  लगेच डॉक्टरला कॉल केला आणि डॉक्टरांना ऑफिसमध्ये बोलावून घेतले.  सगळे दुसऱ्या केबिनमध्ये जाऊन बसले.  

 

डॉक्टरांनी अर्जुनच्या हातातील काचा काढल्या आणि त्यावर मलमपट्टी करत होते ,  पण अर्जुनच्या चेहऱ्यावर लागल्या मुळे वेदनेचे एकही  चिन्ह दिसत नव्हते,  पण डोळ्यात मात्र राग स्पष्ट दिसत होता.  त्या काचांपेक्षा   माहीला विचारलेले  प्रश्न त्याला जास्त टोचले होते .  माही साईडला एका कॉर्नरला उभी हे सगळं बघत होती.  अर्जुनला बघून तिचे डोळे वाहत होते . अर्जुन तिच्याकडे बघत होता,  तिच्या डोळ्यात अश्रू बघून तो शांत होत होता.  थोडा वेळ कोणीच कोणासोबत बोलले नाही. 


 

" Mahi, let's go ,आपल्याला हे सगळं नाही करायचं, त्या देवेशचे काय करायचे मी बघून घेईल"..... अर्जुन


 

माहीच्या डोळ्यांपुढून आतापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टी जात होत्या,  देवेशमुळे उध्वस्त झालेले तिचे आयुष्य,  त्याच्यामुळे वडिलांनी तिला घराबाहेर काढलेले,  तिचे शिक्षण तिचे स्वप्न तुटले होते ,  तिच्या  प्रेग्नेंसी मुळे आजूबाजूच्यांनी  , समाजाने तिच्या चारित्र्यावर लावलेले आरोप ,  मीराचे भविष्य आणि आता त्याची नजर श्रीयावर होती,  हे सगळं खूप त्रासदायक होते.  असे परत कोणासोबत घडू नये आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवीच,  मनात माहीने  काही निश्चय केला. 


 

" सर,  मला ही केस लढायची आहे , त्याला त्याने जे केले आहे त्याची शिक्षा मिळायला हवी . त्याला पण कळायला हवे त्याने किती मोठा गुन्हा केला आहे ते"..... माही काहीसा निर्धार करत बोलली. 

 

" माही , अर्जुन  ठीक बोलतो आहे , आपण त्याला वेगळ्या प्रकारे हँडल करू शकतो"..... आशुतोष 

 

" नाही जिजाजी , आपल्या समाजात नेहमी या गोष्टी लपवाल्या जातात म्हणूनच हे गुन्हे वाढत चालले आहेत,  हा गुन्हेगार समोर यायला हवा , आपण ही केस लढू"..... माही


 

" गुड ,brave girl".... शेखर

 

" मिस्टर पटवर्धना शी  इज राईट "....शेखर

 

" पण… माही ".... अर्जुन

 

" सर , मी तयार आहे ".....माही

 

माहीचा निर्धार  बघून अर्जुन मनाला होता .  आता अर्जुनने सुद्धा तिला मूकसंमती दिली होती. 

 

" सो  तुमचं नाव काय?" …. शेखर

 

" माही …."...माही

 

" पूर्ण नाव?".... शेखर

 

आता मात्र माही खोळंबली ,  वडिलांनी कधीच तिच्यासोबत नातं तोडले होते  , त्यांचे नाव सांगितले तर समाजात त्यांचे नाव तर खराब नाही होणार?".... माहीच्या डोक्यात बरेच विचार सुरु होते. 


 

" मिस माही , नाव सांगा? ".... शेखर

 

" मिसेस  माही अर्जुन पटवर्धन "...अर्जुनने उत्तर दिले

 

अर्जुनचे उत्तर ऐकून तर आशुतोष पुरताच उडाला होता . शेखर  सुद्धा शॉक  झाला होता , कारण अर्जुन बॅचलर आहे हेच दुनियेला माहिती होते. 


 

" अर्जुन , हे काय?….."....

 

" शी इज माय वाईफ ,  माही अर्जुन पटवर्धन ".....आशुतोष बोलायच्या आत अर्जुनने परत नाव रिपीट केले . ते ऐकून शेखर ने  नोट डाऊन केले. 

 

" मिस्टर पटवर्धन,  मला मिसेस  पटवर्धन सोबत थोडं एकट्यात काही बोलायचं आहे"....शेखर 

 

अर्जुनने माहीकडे बघितले तर तिने डोळ्यांनीच होकार दिला. 

 

" ओके?".... अर्जुन


 

शेखर आणि माही एका वेगळ्या केबिनमध्ये गेले , बऱ्याच वेळी ते लोक तिथे काही बोलत होते. 

 

" अर्जुन,  माही तुझी बायको?  तुमचं लग्न झालं आहे ? "...आशुतोष काहीश्या  रागात बोलत होता. 

 

" हो , आमचे  कोर्ट मॅरेज झालं आहे".... अर्जुन

 

" आणि हे तू लपवून ठेवले सगळ्यांपासून?  हे तू बरोबर नाही केले ?  माही कडून  सुद्धा अशी अपेक्षा नव्हती".... आशुतोष थोड्या रागातच बोलत होता. 


 

" आशुतोष,  तुम्ही समजत आहात , असे काही नाही.  आणि प्लीज गैरसमज नको,  यात माहीचा काहीच दोष नाही आहे , मी सांगतो तुम्हाला सगळं"... म्हणत अर्जुनने  त्याच्या आणि माहीच्या,  माहीच्या सुद्धा नकळत केलेल्या लग्नाबद्दलची सगळी गोष्ट सांगितली. 


 

" बापरे,  ग्रेट आहेस तू "....आशुतोष डोक्याला हात लावत बोलत होता. 

 

" आशुतोष , मला कुठलीच रिस्क नको होती म्हणून मी हे सगळे केले आहे .  तुम्ही समजून घ्याल आणि अपेक्षा करतो की यातले घरी कोणाला काही कळणार नाही "...अर्जुन

 

" ओके "....आशुतोष

 

शेखर आणि माहीचे सुद्धा बोलणं झालं होते . देवेश सोडून इतर दुसऱ्या मुलांची नाव माहीला माहिती  नव्हते , पण त्यांचे चेहरे आठवत होते त्यावरून त्यांचे स्केच बनवायला सांगितले होते . सोबतच सत्या काकाचे पण स्केच बनवले.  ज्या ठिकाणी हे सगळं घडलं होतं त्या ठिकाणी जाण्याचा ठरले .  सोबत सत्याची  विचारपूस पण करायची ठरली. 


 

" मिस्टर शेखर,  मीडियामध्ये हे सगळं जायला नको , होप  तुम्ही याची काळजी घ्याल"... अर्जुन

 

" डोन्ट वरी, मिस्टर  पटवर्धन , माझ्या केसेसच्या डिटेल्स माझ्या मर्जीशिवाय बाहेर जात नाही".... शेखर 

 

" बेटर "... अर्जुन

 

" मिसेस  पटवर्धनच्या गावाला जावे लागेल , तुम्हाला पुढला प्लॅन  कळतोच"... शेखर

 

" sure "... अर्जुन

 

अर्जुनच्या हाताला लागल्यामुळे आशुतोष गाडी चालवत होता.  गाडीमध्ये एक वेगळीच शांतता होती . पुढे काय होईल असेच विचार तिघांच्या डोक्यात सुरू होते. 

*****

 

क्रमशः 


 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️