Jan 22, 2022
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 68

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 68

तू ही रे …. कसं जगायचं तुझ्याविना 68

 

भाग 68


 

" माही ….. "..... अर्जुन 

 

" हो …… "..... माही , ती पुढे ठेवलेल्या सोप मिश्री चे बाउल हातात घेत त्यातल्या मिश्री निवडून खात बोलली . 

 

" माही , तो मुलगा देवेश आहे …. ".... अर्जुन ने एका झटक्यात सांगून दिले… 

 

" हो देवेश ना , श्रियाचा होणारा न ……"..... ती बोलतच होती की अर्जूनच्या डोळ्यात वेगळे भाव दिसले … आणि मग तिच्या डोळ्यांसमोर तो दिवस आला ज्या दिवशी तिने देवेशला शांतीसदन मध्ये बघितले होते …  तिच्या हातातील बाउल खाली जमिनीवर पडले…. ते फुटून त्याचा काचा पसरल्या...तिच्या चेहऱ्यावर राग , पण डोळ्यात अश्रू जमा झाले होते …. 


 

माही खाली फुटलेल्या बाउल कडे ,विखुरलेल्या काचांकडे  बघत होती .  त्यादिवशी तिने त्याला हॉलमध्ये बघितलं होतं,  तोच श्रियाला  आलेला मुलगा होता आणि म्हणून तो तिथे होता हे आता तिला क्लियर झालं होतं. त्यानंतरचे पुर्ण क्षण तिच्या डोळ्यासमोरून जसेच्या तसे जात होते. 

देवेशच  तो मुलगा आहे हे ऐकून तिला खूप मोठा शॉक लागला होता  . त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तिला श्रिया  तिच्या डोळ्यांपुढे दिसत होती . श्रियाचे  भविष्य तिला दिसत होतं.  सगळे नातीगोती हातातून निसटत  चालली आहे , तिच्यामुळे या तुटलेल्या काचांप्रमाणे अर्जुनचे घर विखरेल  ,  असे अनेक विचार तिच्या डोक्यात  येत होते . तिच्या डोळ्यात जमलेले अश्रू आता तिच्या गालांवर ओघळत होते.  तिला ग्लानी आल्यासारखे वाटत होते ,  तिचा बॅलन्स जाऊन ते खाली पडणार तेवढ्यात अर्जुनने तिला सांभाळत सोफ्यावर नीट बसवले. 

 

" माही….. " …. अर्जुन तिला आपल्या कुशीत घेत बाजूचा पाण्याचा ग्लास तिच्या  हातात देत बोलला. 

 

" सर ,  ते….. ते….. श्रिया ….. तो...तो... तिला पण त्रास…."..... माहीला बोलणं  आता जड झालं होतं . 

 

" She is fine …... "...... अर्जुन


 

" माझ्या मुळे  सगळ्यांना त्रास होतो , माझ्यामुळे सगळ्यांची आयुष्य खराब होतात , आतापर्यंत मी सगळ्यांना त्रास देत आली आहे   आई बाबा नंतर अंजलीताई ,  अंजली ताईचे लग्न माझ्यामुळे तुटू शकते , तुम्ही … तुम्हाला तर मी खूप त्रास दिला , माझ्यामुळे घर तुटेल तुमचं,  श्रिया …..श्रियाचे  आयुष्य खराब होईल ...श्रियाला  तिचा प्रेम मिळणार नाही , मीरा माझ्यामुळे मीरावर बोटं उठतील …. मी फक्त सगळ्यांना दुःखीच करते…. देवाने मला का जन्माला घातलं ?" …. माही मनात येईल तशी बडबड करत होती….माही  आपल्या पालथ्या हाताने डोळे पुसत होती ,  पण डोळ्यातलं पाणी थांबायचं नाव घेत नव्हत ,  ते सतत अश्रू बनून वाहत होतं ….. अर्जुनला तिला असे बघितल्या जात नव्हते ,  त्याने लगेच तिला आपल्या कुशीमध्ये घट्ट पकडून घेतले . तसे त्याला माहिती होते असेच काही होईल , नेहमीप्रमाणे ती स्वतःला दोष देईल आणि म्हणूनच तो तिला  इथे घेऊन आला होता , घरी सगळ्यांसमोर त्याला असे तिला सांभाळता आले नसते . माहीची  अजूनही बडबड सुरू होती स्वतःला दोष देणे सुरू होते.  

 

या दोन दिवसात तिने अर्जुन सोबत तिच्या सुखी संसाराची सुंदर स्वप्ने रंगवली होती. खूप मोठे धैर्य एकवटून तिने अर्जुनच्या घरच्यांना सामोरे जाण्याची  तयारी केली होती. ते सगळे स्वप्न तिला  तुटताना दिसत होते . मोठ्या मुश्किलीने तिने नवीन काही स्वप्न बघण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्यांदा  स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, सुखासाठी  तिने काही निर्णय घेण्याचे धाडस केले होते . कालच तर तिने अर्जुनला लग्नासाठी होकार दिला होता. ती सगळी विखुर्तांना दिसत होती. आणि न राहून तिने एक मोठा हंबरडा फोडला. अर्जुन तिच्या डोक्यावरून मायेनं हात फिरवत होता.  मनसोक्त रडून झाल्यावर तिला नक्कीच हलकं वाटेल , त्याला माहिती होते म्हणून तो काहीच बोलत नव्हता , पण ती एकटी नाही हे तो त्याचा  स्पर्शातून तिला जाणवून देत होता.    

रडून रडून आता तिला बरच हलकं वाटत होतं. आणि आता तिच्या डोळ्यांपुढे श्रिया आली . तिच्यासोबत जे झाले आहे ते श्रियासोबत व्हायला नको , आता तिला श्रियाची जास्ती काळजी वाटायला लागली होती. 

 

" सर…. सर….. चला लवकर , श्रियाला  आपल्याला त्याच्यापासून वाचवायला हवे ".... माही त्याच्या मिठीतून दूर होत म्हणाली. 

 

" हो… रिलॅक्स "....अर्जुन 

 

" नाही ,  चला लवकर,  तो तिला त्रास देईल,  तो राक्षस आहे ".... माही 

 

" हो , माही तू मदत करशील? मला साथ देशील?".... अर्जुन 

 

" हो , श्रीयाला काही व्हायला नको ".... माही 

 

" तू त्याला बघून घाबरशील नाही ना? "... 

 

" नाही ".... माही 

 

" मी जे सांगेल ते ऐकशील ?" … अर्जुन 

 

" हो" …. माही 

 

" तुला भीती तर नाही वाटणार ना?" …. अर्जुन 

 

" तुम्ही सोबत असताना मला  कशाची भीती ?  चला त्याला पोलिसात देऊ,  मी पोलिसांना सगळे सांगायला तयार आहे,  मी पोलिसांसमोर सुद्धा अजिबात घाबरणार नाही,  चला लवकर ."..... माही 

 

" माही  wait , घाई करून नाही चालणार " ….. अर्जुन 

 

" पण ...मग... तोपर्यंत…. तो…."....माही 

 

" माही रिलॅक्स ,  काही होणार नाही,  फक्त तू स्ट्रॉंग राहा.  सगळं ठीक होईल .".....अर्जुन 

 

" मी आता नाही घाबरणार सर  , मला माहिती आहे , तुम्ही मला काहीच होऊ देणार नाही . आणि काही झाले तरी माझी मिरा , जीची मला खूप काळजी लागून असायची , तिची काळजी घेणारा कोणी आहे , ती सुरक्षित हातात आहे .".... माही 


 

" माही , प्लीज , ही अशी सेंटी आणि फालतू बकवास नाही करायची , I request you ".... अर्जुन , ' मला काही झालं तर ' … हे तिचे शब्द त्याचा जिव्हारी लागले होते. 


 

" नशिबाचा काही भरवसा नाही , भविष्यात पुढे काय उभं ठाकेल , काहीच सांगता येत नाही , जसे हे एक वादळ आता ".....माही 


 

" आपलं नशीब आपण आपल्या हाताने लिहीत असतो , जे हार मानतात ते नशिबाला दोष देतात . आपल्या मनगटात शक्ती असायला हवी आपलं भविष्य घडावण्याची आणि सुंदर करायची . आणि हे वादळ , हे संकट म्हणशील तर ते आपण सोबत मिळून मार्ग काढू. मी तर  त्याला कधीच गायब केले असते , पण तो तुझा गुन्हेगार आहे , त्याची शिक्षा तू ठरवावी असे वाटते , आणि दुसरे म्हणजे श्रिया याप्रकरणात अडकली आहे , म्हणून विचारपूर्वक पाऊल उचलावे लागणार आहे ….. फक्त तुझी साथ हवी आणि तू स्ट्राँग हवी, मग मी काही पण करू शकतो "...... अर्जुन 

 

" ह्मम "..... माही , ती तयार तर झाली होती तरी तिला तिच्या नशिबावर विश्वास नव्हता. 

 

अर्जुन सोबत बोलून आता माही बरीच शांत झाली होती.  तिला तिच्या सोबत जे घडले होते त्या पेक्षा श्रियाला  वाचवणे महत्त्वाचे वाटत होते. 

 

अर्जुनला एक फोन आला , ओके बोलून त्याने फोन ठेवून दिला,  नंतर लगेच त्याने एक फोन करून एक ड्रायव्हर आणि गाडी तयार ठेवायला सांगितली. 


 

इकडे देवेशला कळले होते की अर्जुन एका मुलीसोबत हॉटेलमध्ये आला आहे.  तो लगेच हॉटेल समोर पोहोचला होता. अर्जुनचे हॉटेल असल्यामुळे आ मध्ये जाणे त्याच्यासाठी रिस्की होते म्हणून तो बाहेर एका आडोशाला दोन लोकांसोबत  उभा राहात अर्जुनची बाहेर निघायची वाट बघत होता. आज  अर्जुन कुठल्या कार ने आला आहे , त्याला  गाडीचा नंबर आणि रंग कळवला  होता. थोड्या वेळातच त्याला सेम तीच कार अर्जुनची बाहेर येताना दिसली . ती कार बघून एक असुरी  आनंद त्याला झाला . जशी ती कार पुढे डाव्या बाजूला वळली तशी त्यामागे एक  ब्लॅक कार होती ती उजव्या बाजूला वळली. देवेश  व्हाइट कारच्या मागे गेला होता.

 

" आपण दुसर्‍या कार ने  आलो होतो ना?" … माही 

 

" ह्मम , काही काम निघाले म्हणून ती गाडी ड्रायव्हर घेऊन गेला" ….. अर्जुन 

 

" अच्छा…."... माही 


 

अर्जुन जेव्हा हॉटेलमध्ये माही  सोबत रूममध्ये होता,  तेव्हा त्याला कळले होते की देवेश बाहेर आहे . तो नक्कीच गाडीचा पिच्छा करेल आणि त्याचा अंदाज बरोबर ठरला होता. 


 

अर्जुन माही घरी आले तेव्हा रात्रीचे साडेनऊ झाले होते.  गाडी पार्क करून दोघेही आत मध्ये आले. 

 

" काय रे अर्जुन , आज बराच उशीर झाला ?" … आजी जेवण झाल्यानंतर हॉलमध्येच फेऱ्या मारत होती. 

 

"ह्मम ,  मीटिंग होत्या " …. अर्जुन 

 

"कामामुळे तुला दिवस अन् रात्रीचा फरक कळत नाही , आम्हाला माहिती , पण माहीला  तरी येऊ द्यायचे असते घरी लवकर ."...... आजी 

 

" तो प्रोजेक्ट माही हँडल करते म्हणून तिचं जाणं गरजेचं होतं " ….. अर्जुन 

 

" मग लवकर ठरवत जा मीटिंग ".... आजी 

 

" मीटिंग लवकरच होती पण तिकडे मला प्लांटवर जायचे होते , म्हणून तिकडे गेलो होतो".... अर्जुन , आजीचे प्रश्न वाढतच होते , अर्जुन वैतागत होता. 

 

" अरे पण तू ,  तिला सुद्धा   तुझ्यासोबत त्रास देतो ".... आजी 

 

" नाही आजी,  त्रास असा काही नाही , काम पण महत्त्वाचे आहे ".... माही 

 

" अग हे काय,  तुझे डोळे का बरं असे  सुजले दिसतात आहेत ?  रडले की काय?  अर्जुन ओरडला की काय ?" …. आजीची विचारपूस सुरू होती. 

 

" अर्जुन तुला किती वेळा सांगितले आहे आपल्या रागावर कंट्रोल ठेवत जा , नीट समजावून सांगितले तर शिकेल ती  ".... आजी 

 

" नाही नाही,  ते रागावले नाही .  मीच दमले होते , कार मध्ये झोपली होती .  थकव्यामुळे तसे  दिसत असतील ".... माहीने सांभाळून घेतले. 

 

" बरं बरं जेवण ?".... आजी 

 

" आम्ही बाहेरून करून आलो आहे , मी आईला तसं कळवले होते "..... अर्जुन 

 

" बरं ठीक आहे,  जा आराम करा"..... आजी 

 

" काहीतरी गडबड आहे या दोघांची शांतीदेवी "..... आजी त्यांना बघून स्वतःशीच हसली. 

 

माही पळत वरती आली . अंजलीच्या रूममध्ये जाऊन बघितलं तर मीरा अंजली जवळ झोपली होती . मीराच्या डोक्यावरून मायेचा  हात फिरवत तिने मीराच्या कपाळाला किस केले. अजाऊबजुला नजर टाकली तर आकाश बाल्कनी मध्ये लॅपटॉप घेऊन बसला होता. 

 

" उद्या पासून मीरा ला आपल्या सोबत झोपवेल , किती दिवस असा ताई , आकाश सरांना त्रास द्यायचा '... विचार करत एकदा परत मीरा वर नजर टाकत ती  आपल्या रूममध्ये निघून आली. . 

 

माही बेडवर झोपल्या झोपल्या झालेल्या गोष्टींचा विचार करत होती. त्या सगळ्या गोष्टी आठवून तिने कितीही विचार केला की आता घाबरायचं नाही तरी तिला मनातून एक वेगळीच भीती जाणवत होती. विचार करता करता तिला अर्जुनच्या येण्याची चाहूल लागली तसे तिने आपले डोळे गच्च बंद केले आणि झोपायचे नाटक करू लागली. अर्जुनने रूम मध्ये येऊन बघितले तर माही  शांत झोपली होती.  त्याने तिच्या अंगावरचे पांघरूण सारखं केलं . तिच्या डोक्यातून हात फिरवला  .  रुमचं दार लोटून तो आपल्या रूम मध्ये निघून आला. 


 

माही बऱ्याच वेळ झोपायचा प्रयत्न करत होती पण तिला झोप येत नव्हती . रात्रीचा एक वाजून गेला होता तरी झोप येत नव्हती आणि जशी जशी रात्र वाढत होती तिच्या मनातील भीती सुद्धा वाढत होती. शेवटी न राहवून रूमच्या बाहेर आली ,तर सगळे झोपले होते , सगळीकडे सामसूम झाली  होती. ती दबक्या पावलाने हळूहळू चालत अर्जुनच्या रूम जवळ गेली . आत  डोकावून बघितले तर अर्जुन झोपला होता. ती आतमध्ये गेली , तिने दाराची कडी लाऊन घेतली. आणि हळूच आवाज न करता अर्जूनच्या शेजारी जाऊन झोपली .  बऱ्याच वेळ ती अर्जुनच्या चेहरा बघत होती. 


 

" जो चुका करतो ,  गुन्हा करतो  , त्याने घाबरायचे असते ….खरी माणसं सामना करतात..…. झोप आता , फार विचार करू नको "..... झोपेतच बोलत अर्जुनने तिच्या कंबरेत हात घालत तिला आपल्या कुशीत घेतले . तो जवळ असल्यामुळे तिला पण आता बरे वाटत होते. आणि त्याच्या कुशीत ती शांत झोपी गेली. 

 

*******

 

दुसऱ्या दिवशी देवेशच्या आईचा फोन आला. देवेश परदेशात जाणार आहे  तर लग्न लवकरात लवकर करावे अशी त्यांनी त्यांची इच्छा दर्शविली . श्रिया पण देवेश चे कौतुक करून थकत नव्हती . तिने पण देवेशचा घराच्या प्रस्तावाला दुजोरा देत लवकर  लग्नासाठी हट्ट करू लागली. पण काही दिवस आधी अर्जुनने श्रिया देवेशच्या लग्नासाठी नकार दिल्याने आजी , मामा काही बोलले नव्हते . पण श्रियाचे सगळ्यांना समजावणे सुरू होते. ती खूप कळकळीने सगळ्यांना विनंती करत होती.

 

 माही एका कॉर्नर ला चेअर वर बसली श्रियाकडे बघत होती. लग्नाचे नाव काढल्यामुळे तिच्या चेहऱ्यावरचा आनंद , पण कोणीच लवकर होकार देत नाही आहे म्हणून विनवणी करतानाचा तिचा केविलवाणा झालेला चेहरा ….स्वप्न तुटताना त्यात लग्नाचं , मुलींना चं सगळ्यात गोड स्वप्न,   किती त्रास होतो  हे माहीला कळत होते , ते सगळं बघून तिला तिच्या हृदयात वेदना जाणवत होत्या . 


 

" दादू , तू तरी समजव ना यांना . तू त्या दिवशी मला बोलला होता , माझ्या आनंदात तुझा आनंद असेल, आता  तू तुझ्या शब्दांवरून फिरू नाही शकत ….. प्लीज सांग ना यांना , तू तयार झाला की सगळे तयार होतील ".... श्रिया खूप केविलवाण्या आर्जवी सुरात अर्जुनला म्हणत होती. 

 

" हो .."..... अर्जुन 


 

अर्जूनचा होकार ऐकून श्रियाला खूप आनंद झाला . ती आनंदाने त्याच्या गळ्यात पडली. सगळे आश्चर्यचकित होत अर्जूनकडे बघत होते. काही दिवसांपूर्वी हा नाही म्हणत होता आणि असा अचानक हो म्हणाला , सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. 

 

" अर्जुन , तू आधी नाही म्हणाला होता . मला पण हे लग्न मान्य नाही . "..... मामी 

 

" जे पण होईल ते श्रियाच्या सुखी भविष्यासाठी  होईल. आणि तिच्या आनंदाची सुखाची जबाबदारी माझी , तुम्ही नका काळजी करू . ".... अर्जुन  

 

" हे बरोबर नाही अर्जुन , तू असा पालटू नाही शकत . तू त्या दिवशी नकार दिला म्हणून मी श्रियासाठी छान छान स्थळ शोधून आणली आहेत . एकशे एक चांगले मुल आहेत .आता मी त्यांना काय उत्तर देणार ?".... मामीच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. 


 

" मी म्हणालो ना , जे होईल ते श्रियाच्या सुखासाठी , तिच्या हिताचे होईल. ".... अर्जुन बोलून तो आपल्या रूमकडे जायला निघाला. 

 

" आणि हो , लग्नासाठी देट एक महिन्या नंतरची काढाल आहात. मी या महिन्यात  थोडा बिझी आहो . चालेल ना श्रिया ?"..... अर्जुन 

 

" हो हो …. चालेल काय , धावेल sssss…… ".... श्रिया आनंदाने उड्या मारत होती. 

 

आता अर्जुनने होकार दिल्यावर बाकी कोणाचा काही बोलण्याचा प्रश्नच नव्हता. 


 

" याचं डोकं सटकले की काय ?".....माही. अर्जुनच्या तोंडून हो ऐकून माही तर शॉक झाली. हे सगळं ऐकून अर्जुन काय करतोय , की त्याचं डोकं फिरले आहे ….. तिला काहीच कळत नव्हते. 


 

*****

 

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️