Oct 16, 2021
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 67

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 67
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 67

 

भाग 67

 

अर्जुन , आकाश , माही आणि आशुतोष यांची कॉफी पार्टी सुरू होती… सोबत त्यांच्या गप्पा . 

 

" किती बोर आहे ...कामाच्या गप्पा करायच्या होत्या तर मला कशाला बोलावले इथे…".... माही त्यांचा गप्पा ऐकत स्वतःशीच बडबडत होती. 

 

" ऑफिसमध्ये काम करायचे असते …. "..... अर्जुन एक भुवयी उंचावत माही कडे बघून बोलला  , अर्जुनने माहीचे बोलणे ऐकले होते…

 

"खडूस …!"... माही हळूच पुटपुटली , ते ऐकून  अर्जूनच्या ओठांची एका साईड थोडी रुंदावत वाकडी झाली….

 

" हो , बरोबर आहे इथे मला सुद्धा बोर होत आहे …. अरे हो माही आता तुझ्या लग्नाचं बघावं म्हणतोय ? .. माझ्या एका मित्राने एक चांगला मुलगा सुचवला आहे …."...... आशुतोष आकाशला एक डोळा मारत बोलला. , ( तुम्हाला माहिती तर आहेच ,  आपल्या आशुतोष ला उगाचंच शांत वातावरण तापवायला आवडते ) 

 

ते ऐकून अर्जुन आणि माही दोघांना ही कॉफी चहा पिता पिता ठसका लागला.

 

" क…...काय ? हे अचानक मध्येच  लग्न कुठून आणले तुम्ही ?"..... माही डोळे विस्फारून बोलत होती. 


 

 अर्जुन तर खाऊ की गिळू नजरेने आशुतोष कडे बघत होता….. आकाश ला हसू येत होते पण त्याने आपले हसू दाबून ठेवले होते. 


 

" मध्ये कुठून आणले म्हणजे ? मी तुझा मोठा भाऊ आहो , माझी जबाबदारी आहे ती … आता अंजलीचे लग्न झाले , तुझं पण आता लग्नाचं वय झाले आहे, उगाच उशीर केला तर म्हातारा मुलगा भेटेल … आपल्याला रिस्क नको"....आशुतोष 


 

" म्हातारा ? …. म...मला ….मला लग्नच नाही करायचं "...... माही  

" काय , लग्न नाही करायचं म्हणजे ? म्हणजे कधीच करणार नाही काय ? बापरे मावशी सोबत बोलावे लागेल मला "..... आशुतोष 


 

" म्हणजे , तसे नाही ….."..... माही 

 

" मग कसे ? ".....आशुतोष 

 

" म्हणजे करेल, पण सध्या नको , म्हणजे आता ऑफिसचे पण खूप काम असतात…. मग नंतर बघू "...... माही 

 

" ऑफिस चे काम असते म्हणजे? ऑफिस मध्ये काम करणारे लग्न नाही करत काय ? की ऑफिस ने विकत घेतले आहे तुला ? काय रे अर्जुन , तू तयार नाही आहेस काय ?" ….. आशुतोष 


 

" I am ready …… "..... अर्जुन 


 

" What?"...... माही 


 

" I mean , तीला वाटेल तेव्हा ती करू शकते … ऑफिस कडून असे काही बंधन नाही ….".... अर्जुन 


 

" See , तुझ्या बॉस ने सुद्धा होकार दिलाय …. आता काय प्रोब्लेम आहे ? मी काय म्हणतो तू एकदा माझ्या मित्राने सुचवलेल्या मुलाला भेट एकदा … एकदम परफेक्ट आहे आणि मुख्य म्हणजे अजिबात खडूस नाही आहे "..... आशुतोष 

 

" What ??"..... अर्जुन खडूस शब्द ऐकून बोलला 

 

खडूस शब्द ऐकून आता माहीला हसू आले होते , कारण आता अर्जुनाचा चेहरा बघण्या सारखा झाला होता. 


 

" तुला कुठे बोललो मी …. मी त्या मुलाबद्दल बोलतोय, ".....आशुतोष 


 

" हां माही , सांग मग कधी भेटते त्याला ?".....आशुतोष 


 

" कधीच नाही ……".... माही


 

" का…? तुला कोणी आवडते काय ? ".....आशुतोष 


 

" नाही …. हो ….म्हणजे नाही ….. म्हणजे माहिती नाही ….. " ….. माही बावरली होती. 


 

आता मात्र आकाशला खूप हसायला येत होते , तो अर्जुन कडे बघून हसायला लागला…. माहीचे चेहऱ्यावरचे हावभाव बघून आता अर्जुनला सुद्धा हसायला आले होते ,पण तो तसे काही न दाखवता चुपचाप बसला होता. 

 

" माझी खूप कामं राहिली आहेत, मी जाते ….".....  माहीने तिथून काढता पाय घेतला… 


 

" काय जिजाजी , तुम्ही पण …. किती घाबरली ती "......आकाश


 

" अरे मस्करी करत होतो….. इतना तो हक बनता है यार अपना …."..... आशुतोष 


 

थोड्या वेळ गप्पा मारून सगळे आपापल्या कामासाठी  निघून आले… 
 

माहीचे ऑफिसचे काम आटोपले होते … काही फाईल्स देण्यासाठी ती अर्जूनच्या कॅबिन मध्ये आली. 


 

" Sir , एकदा फाईल चेक करून काही चेंजेस असतील तर सांगा , लगेच करते "..... माही अर्जुन पुढे फाईल ठेवत बोलली. 

 

" हम्म ….. "..... अर्जुन फाईलचे एक एक पान बघत होता…. त्याचं काम खूप हळूहळू सुरू होते … तो मुद्दाम हळूहळू करत होता. 

 

" Sir , जरा लवकर , घरी जायला उशीर होतो आहे "..... माही 


 

" आपण बाहेर जातोय डिनर साठी "..... अर्जुन 

 

" काय ? …. मला नाही यायचे तुमच्या सोबत "..... माही तोंड वाकडं करत बोलली 


 

" मी विचारत नाही आहो , सांगतो आहे … आणि तसे पण मी नाराज आहे सकाळपासून , तू माझा रुसवा काढायला आली सुद्धा नाही "..... अर्जुन 


 

" Excuse me ! ….. मी का काढू तुमचा रुसवा ? ..मी तुमच्यावर रुसले आहे …. "..... माही 


 

" व्हॉट ? सकाळचे तू विसरली वाटतं ".....अर्जुन 


 

" ते जुनं झालं , माझं ताजं आहे ….. ".... माही


 

" काय ? मी काहीही केलेलं नाही , उगाच नौटंकी नाही करायची हा माही "......अर्जुन  


 

" मी नौटंकी करते आहे ? … मग आता आशुतोष जिजाजी बोलत होते तेव्हा कोण हसत होते ….? "...... माही 


 

" मी ? मी कुठे हसलो …? "..... अर्जुन 


 

" तुम्ही गालात हसत होता , मी बघितले होते . आणि परत काय ते '  I am ready'  …. कोण बोललं ते? " ….. माही 

 

आता तिचा चिडका चेहरा बघून अर्जुनला खरंच हसू येत होते …. " हे बरं आहे , माझा रुसवा घालवायचा सोडून , माही मॅडम रुसून बसल्या .. काय वाटले की एखादा किस वगैरे मिळेल रुसलोय तर, हिचेच भलते सुरू झाले…. " … अर्जुन तिला बघत मनाशी बोलत होता.  

" हो तर मी खरं काय ते बोललो …. मी रेडी आहोच लग्नासाठी ….. "..... अर्जुन तिची मस्करी करत होता. 


 

" ते जिजाजी एवढे बोलत होते लग्नासाठी , तुम्हाला त्यांना रोकता नाही आले ? कोण कुठला मुलगा शोधून आणला आहे त्यांनी …. आता काय सांगू त्यांना ?"..... माही 


 

" माही ते गंमत करत होते , चिडवत होते … it's okay "...... अर्जुन 


 

" Oh really ?? ( माहीवर आजकाल अर्जुनाच्या शब्दांचा खूप प्रभाव पडत होता, त्यांच्यासारखेच शब्द आजकाल ती वापरायला लागली होती )  सकाळी मी तुम्हाला हेच सांगत होते तर तुम्ही चिडलात ना …. मग आता मी पण रुसले "..... माही , टेबल वरची फाईल उचलली आणि परत जायला वळली , तेवढयात अर्जुन ने तिचा हात पकडला आणि तिला स्वतः कडे ओढले , असे अचानक ओढल्यामुळे माही त्याच्या मांडीवर जाऊन बसत आदळली … तिला तो पकडून बसला

 

" sir , हे ऑफिस आहे ….."....माही 

 

" I know … "...... अर्जुन 

 

" इथे काम करतात , असे थोड्या वेळ आधी कोणीतरी म्हणाले होते "..... माही 

 

" It's my office , my rules , and who will dare to ask me ?  " ….. अर्जुन तिच्या डोळ्यांमध्ये बघत बोलला. 


 

" वाह , हे बरं आहे तुमचं … तुम्हाला हवे ते तुम्ही कराल …. आणि आम्ही , आम्ही तुमचं ऐकायचं "...... माही 


 

" तू करू शकते , तुला हवे ते "..... अर्जुन तिच्या कानाजवळ फुंकर मारत बोलला , त्याचे एवढेच करण्याने नेहमीप्रमाणे तिचे डोकं ब्लॉक झाले ….. जी काही तिची आतापर्यंत कुरकुर सुरू होती ती एकदम बंद झाली , ओठातून शब्द फुटेना झालेत….


 

" sir….. ".....माही 

 

" ह्मम ….."...... अर्जुन 

 

" जाऊ द्या ना …."..... माही 

 

" रुसवा गेला ? "...... अर्जुन 

 

" नाही ….. "..... माही 

 

" Okay no problem … "..... म्हणत तो तिच्या गालाजवळ येत होता…. 


 

" गेला …. गेला … गेला….. रुसवा गेला  ….." ...ती त्याला जवळ येताना बघून एकदम बावरत ओरडली….. 

 

" Cool …. नाहीतर सांग , मी घालवू शकतो …."..... अर्जुन 

 

" न….नाही …. नको ….. रुसने काय असते मला माहिती पण नाही ….."..... माही अडखळत बोलली….. अर्जुनला तिला बघून हसू येत होते …. 

 

" आशुतोष आणि आकाशला आपल्या दोघांबद्दल माहिती आहे …..  आशुतोष मस्करी करत होते तुझी "....... अर्जुन .

 

" काय ? … त….त्या….त्यांना माहिती आपलं लग्न झाले आहे ते ? तुम्ही प्रॉमिस …..".....माही ला आता खूप मोठा शॉक बसला होता . 


 

" नाही , त्यांना आपलं लग्न झाले आहे ते नाही माहिती , पण आपल्या रिलेशनशिप बद्दल माहिती आहे …. ".....अर्जुन 


 

" पण तुम्ही का सांगितले त्यांना आपल्या बद्दल ? हे तुम्ही ठीक नाही केले …. ".... माही चिडत त्याच्या छातीवर मारत होती . 


 

" ते काय म्हणतील ? , मी त्यांच्या नजरेला नजर कशी मिळवू "...... माही 

 

" अंजलीला सुद्धा माहिती आहे …..".....अर्जुन 

 

 " काय ? ताईला माहिती ? "..... माही थोडी रडकुंडीला आली होती 

 

" Sh Sssss ….. कोणी काही नाही म्हणत , infact they are happy with our relationship "........ अर्जुन ने तिला आपल्या जवळ घेतले , तिच्या डोक्यावर हात फिरवत बोलत होता .. 


 

" पण तुम्ही का सांगितले त्यांना ?…."..... माही 


 

 " माही मी नव्हते सांगितले , आकाश आणि आशुतोषने ओळखले …. त्यांनी विचारले तेव्हा मला त्यांना खरं सांगावे लागले…. ".... अर्जुन 

 

" पण का ? "...... माही 

 

" माही , तुला माहिती आहे मी खोटं नाही बोलू शकत , फार फार तर लपवू शकतो ….and they are our family ... " अर्जुन 


 

" तुम्ही खूप वाईट आहात …कट्टी…… ".....माही 

 

माही अर्जुनच्या मांडीवरून उठत , त्याच्याकडे कट्टीचे बोट दाखवत त्याच्या कॅबिन मधून बाहेर पळाली. 


 

आपल्याला देवेश बद्दल अर्जुनला विचारायचे होते हे ती सपशेल विसरली होती. आता तिच्या डोक्यात आशुतोष, आकाश , अंजलीला सामोरे  जायचे हेच सुरू होते. या विचाराने तिच्या मनात धडकी भरली होती. 


 

इकडे देवेश माही बद्दल माहिती गोळा करणे  सुरू होते … आजकाल बहुतेक लोकं सोशल मीडिया वर असतात तर त्याने माही ला तिथे पण शोधून बघितले होते , पण त्याला काही यश आले नव्हते… इकडे फोटोमध्ये अर्जूनसोबत असलेल्या मिस्टरिअस गर्लला पण शोधायचं काम सुरू होते …. त्याने आपली काही माणसं कामाला लावली होती पण अर्जूनच्या ऑफिस मध्ये घुसून माहिती काढणे सुद्धा सोपी नव्हते … तरी देवेश कुठला चांस मिळतो काय शोधात होताच . त्याचा जॉब सुटला होता , नवीन जॉब मिळत नव्हता , जर श्रिया च्या घरी माहिती झाले तर लग्नासाठी प्रॉब्लेम येईल , आणि बिजनेस वर्ल्ड मध्ये अर्जुन आकाश असल्यामुळे ही गोष्ट फार काळ लपवून ठेवता येणार नव्हती म्हणून त्याचे श्रिया सोबत लग्न लवकर करायचं म्हणून फोर्स सुरू होता . … त्यात त्याने एक युक्ती लढवली …. प्रोजेक्टच्या कामाने ऑफिसकडून बाहेर देशात एक वर्षासाठी जायचे आहे असे सांगितले…. तर लवकर लग्न करून श्रियाला सोबत न्यायचा बहाणा त्यानें बनवला. काही करून त्याला श्रियाला लग्नासाठी तयार करायचे होते.. श्रियाच्या डोक्यात आता हीच गोष्ट सुरू होती….… आनंदाने ती ही गोष्ट सगळ्यांना सांगायला गेली..  

ऑफिस आटोपल्यावर अर्जुन आणि माही अर्जूनच्या हॉटेल मध्ये डिनर करायला आले होते. त्याने आपल्या executive suit मध्येच वरती जेवण वगैरे सगळं मागवले होते…. खरं तर त्याला माही कॅबिन मध्ये आली होती तेव्हाच तिला देवेश बद्दल सांगायचे होते, पण नंतर ती कशी रिॲक्ट करेल त्याला माहिती नव्हते , रिस्क नको म्हणून इथे सगळं हाताळणे सोयीचे होते.… त्याने घरी मीटिंग असल्यामुळे उशिरा येण्याचे कळवले… माहीला सुद्धा उशीर होईल आधीच सांगून ठेवले… आधी माहीने हो नाही केले…. पण मग घरी प्रोपर सांगून ठेवले आहे सांगितले तर ती  तयार झाली. 


 

" इथे रूम मध्ये का ? जेवण आपण तिथे खाली करू शकत होतो ना ?"..... माही 

 

" प्रायव्हसी साठी …..मी फ्रेश होतो .. "..... म्हणत त्याने त्याचे ब्लेझर काढून ठेवले…. टाय काढून टाकला , शर्टच्या बाह्या दुमडत तो बाथरूम मध्ये फ्रेश व्हायला गेला. 


 

"  यांच्या डोक्यात काय सुरू असते , काहीच कळत नाही ….. माही सकाळी उगाच तू आगाऊपणा केला…. त्याचाच बदला तर नाही घेणार आता …? अर्जुन पटवर्धन काय आहे माहिती असूनही तू त्यांच्या खोड्या काढते … भोग आता …. पण नाही हा , मी ओळखते यांना , हे माझ्या मर्जी विरुद्ध काही करणार नाही ….. पण आता मी लग्नासाठी पण हो म्हणाले आहे , लग्न पण झाले आहे , नाही म्हणायला पण कुठले कारण नाही आहेत . बाप्पा काय करू "..... माही स्वतः सोबत बडबड करत रूम चे निरीक्षण करत होती. आणि तिला अर्जूनसोबत झालेली दुसरी भेट रॅम्प वॉक , मग असेच एका रूममध्ये तिला बंद करून ठेवले होते, मग रागाने लालबुंद झालेला अर्जुन ….असे  आठवत होते. अर्जूनसोबत घालवलेले सगळे क्षण , सगळ्या आठवणी तिच्या डोळ्यांपुढे येत होत्या …. आणि ती एकट्यातच हसत होती.  


 

" वेड आहे हे कार्टून ….. आताच रुसून फुगली होती, आता हसते आहे "..... अर्जुन बाहेर येत तिला हसतांना बघून स्वगत हसला. 

 

तेवढयात जेवण आले…. रूमचा ओपन टेरेस मध्ये खूप छान सजवून जेवणाची सोय केली होती…. सिंपल साधं हेल्थी जेवण ऑर्डर केले होते .... माही ते  बघूनच भारावून गेली… पण जेव्हा टेबल कडे नजर गेली तर मात्र तिचा सगळा उत्साह कमी झाला.


 

" हे काय ? हे खायला बाहेर आलो ? हे तर घरी पण जेवलो असतो "...... माही 

 

" माही it's healthy food , आता रात्र आहे , रात्री लाईट फूड घ्यायचे असते. ".....अर्जुन 


 

" असे नियम   तर म्हाताऱ्यांच्साठी असतात ….".... माही 


 

" माही sss ….".... अर्जुन 


 

" माही , तुझं नि यांची कोणतीच आवड सारखी नाही ….. एकदम विरुद्ध …. कसं व्हायचं ".... माही मनात बोलत होती. 


 

" झाले माझ्या नावाने खडे फोडून …. बसा आता जेवायला "..... अर्जुन तिच्यासाठी चेअर मागे सरकवत बोलला. 


 

" हो ….. "... तिने पलिकडली चेअर ओढली आणि बसली. 


 

" Impossible …".... स्वतःशीच मान हलवत तो पण जेवायला बसला. 

 

सॉफ्ट सॉफ्ट म्युझिक सुरू होते … दोघांनी पण शांततेत जेवण आटोपले. 

 

"आटोपले मोठे काम ….. चला आता घरी जाऊया "...... माही बोलत पुढे जात होती. 


 

" माही "..... अर्जुन 

 

" काय काढा वगैरे राहिला का आता रात्री झोपायच्या आधी घ्यायचा ?".... माही 


 

" what ?"..... अर्जुन 

 

" नाही , म्हणजे ते तुमचे खाण्यापिण्याचे म्हातर्यांचे नियम "...... माही 

 

" तू ना ….. " 


 

" Impossible आहे "..... माही थोडी हसली , त्याचे पण ओठ रुंदावले…. तो थोडा ब्लश करतोय असे सुद्धा वाटत होते… 

 

दिवस इतका छान झाला होता की त्याला माहीला देवेश बद्दल सांगणं परत जीवावर आले होते .. पण आता जास्ती वेळ घेणे चालणार नव्हते… म्हणून मग त्याने बोलायचा निर्णय घेतला. 


 

" माही ….. "..... अर्जुन 

 

" हो …… "..... माही , ती पुढे ठेवलेल्या सोप मिश्री चे बाउल हातात घेत त्यातल्या मिश्री निवडून खात बोलली . 

 

" माही , तो मुलगा देवेश आहे …. ".... अर्जुन ने एका झटक्यात सांगून दिले… 

 

" हो देवेश ना , श्रियाचा होणारा न ……"..... ती बोलतच होती की अर्जूनच्या डोळ्यात वेगळे भाव दिसले … आणि मग तिच्या डोळ्यांसमोर तो दिवस आला ज्या दिवशी तिने देवेशला शांतीसदन मध्ये बघितले होते …  तिच्या हातातील बाउल खाली जमिनीवर पडले…. तिच्या चेहऱ्यावर राग , पण डोळ्यात अश्रू जमा झाले होते ….  

******

 

क्रमशः 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

" Simplicity is also a fashion ,but everyone can't affort it ! "