तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 66

Maahi Arjun

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 66

भाग 66

आज दोघंही आनंदात होते …. नेहमीप्रमाणे माही झोपल्यावर अर्जुन ती नीट झोपली आहे की नाही ते बघायला तिच्या रूममध्ये आला तर माही गाढ झोपली होती……. तिच्या चेहऱ्यावरील भाव प्रसन्न होते…. कुठेच भीतीचे नामोनिशाण दिसत नव्हते…. माही सोबत वेळ घालवण्याचे  सार्थक झाल्यासारखे त्याला वाटले…. तरी थोडावेळ तिथे बसून तो त्याचे ऑफिसचे काही राहिलेले काम करत होता. … अधून मधून तिच्याकडे बघत होता….. या पाच सहा दिवसात झोपेत तिची बरीच चुळबुळ चालायची, कधी कधी घाबरून, घामाझोकळ होत उठून बसायची  …. पण आज तसे काही दिसत नव्हते…..आज ती खूप शांत वाटत होती …. काम आटोपून एकदा तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तो आपल्या रूम मध्ये निघून आला … हे काही दिवस तो तिथेच सोफ्यावर झोपला होता…. माहीची हालत बघता त्याला झोप सुद्धा नीट लागली नव्हती …..पण आज सगळं ठीक वाटत होते म्हणून तो आपल्या रूम मध्ये निघून आला … 


 

आज बऱ्याच वर्षांनी माहीला खूप गाढ झोप लागली होती … मिरा सुद्धा अंजली सोबत झोपत असल्यामुळे तिला काही काळजी नव्हती …. आज दिवसभर फिरून झालं होते…. त्यामुळे  थकवाही होता , त्यात आजचा दिवस अगदी मनासारखा , हसण्या खेळण्यात गेला होता …. सगळ्या जुन्या छान छान आठवणी सोबत तिचे  मन रमले होते ….. आज तिला तिच्यासोबत काही वाईट झाले याची आठवण सुद्धा राहिली नव्हती … त्यात दिवसभर अर्जुन सोबत होता…. त्यात त्याचे तिच्या खोड्या काढणे ….. मस्करी करणे….. सगळंच तिने खूप एन्जॉय केले होते ….. आणि शेवटी तिने त्याचा सोबत असलेले तिचे नाते, हे सुद्धा स्वीकार केले होते ….. सगळ्या गोड गोड आठवणीत रमत ती आज झोपी गेली होती …. 


 

रात्रभर चांगली झोप झाल्याने पहाटे लवकरच माहीला जाग आली….तिला खूप फ्रेश वाटत होते …..  काल अर्जुन सोबत घालवलेले सगळे क्षण  आठवत माही बेडवर बसल्या बसल्या स्वतःशीच लाजत हसत  होती…..

 घरातील सगळेच 7 च्या सुमारास उठत होते ….. अर्जुनला लवकर उठायची सवय होती…. बाहेर जॉगिंग , वॉक , एक्सरसाईज असे त्याचे मोर्निंग रूटीन असायचे ….फ्रेश होऊन माही  पूल साईडने रूमचा बाहेर पडली….बाहेर फ्रेश हवा, अर्जुन ने लावलेल्या फुलझाडांच्या फुलांचे सुगंध चहूकडे दरवळत होता ….. डीम लाईटचा  मंद मंद प्रकाश पसरला  होता ….बाकी बाहेर तसा काळोखच होता…...तिने घरातून एक चक्कर मारली ….. बाकीचे उठायचे होते …. तिला बोर झाले ….

 " अर्जुनच्या रूम मध्ये जावे काय…?  नको नको ...उगाच त्यांची झोप मोड होईल ...नाही मी कशाला झोप मोड करेल त्यांची….मी त्यांना फक्त बघेल….त्यांना झोपू देईल….."....मनात विचार करत ती अर्जुनच्या रूम जवळ पोहचली.. 

" रागावतील काय …? माही तुझा होणारा ….. पण कायदेशीर लग्न तर झाले आहे … माही तुझा नवरा आहे ते …. तुझा हक्क आहे …. चल जाऊ आतमध्ये…" …..स्वतःशीच विचार करत ती अर्जुनच्या रूमध्ये गेली … कोणी बघायला नको म्हणून तिने आवाज न करता रूमचे दार बंद केले…. आणि अर्जूनचा शेजारी बेडवर जाऊन बसली … बराच वेळ ती फक्त त्याला बघत होती…. त्याला आपल्या जवळ बघून एक वेगळेच आत्मिक समाधान तिला वाटत होते. 

" बापरे , झोपेत तर एकदम मीरा सारखेच दिसतात …. एकदम गोंडस गोड ….. कोण विश्वास ठेवेल  याच  गोड रूपाचे रूपांतर ड्रेकुला मध्ये होत असते …. सगळ्यांवर फुत्कारत असतात …. नाही हा माही , असे नाही हा …. काल किती क्यूट होते ते …. तुला आवडते अगदी सगळं तसेच केले त्यांनी ….आणि ते शेवटी kiss me ……"...... माही मनात बोलत होती … आणि तिला तो kiss me वाला किस्सा आठवून हसू आले … 

" खूप गोड दिसत आहेत हे ….. यांच्या गालांचा चावा घ्यावा वाटतोय …..पण उठतील अशाने ते ….एक किस करू का ….?? तसेही ते झोपले आहेत….त्यांना कळणार तर नाही ….".... माहीच्या मनात हे छोटेसे द्वंद्व सुरू होते … 


 

त्याचा कपाळावर आलेले केस तिने मागे सारले…...आणि खाली त्याच्या चेहऱ्याजवळ झुकत तिने हळूच त्याच्या गालावर किस केले…. झोपेत त्याच्या ओठांच्या कडा रुंदावल्या…. त्याचं पांघरून नीट करून ती परत जायला वळली….. आणि तिला कळायच्या आत तिच्या कंबरेवर हातांची पकड घट्ट झाली आणि ती डायरेक्ट बेडवर अर्जूनच्या मिठीत होती ….. पण त्याचे  डोळे मात्र बंद होते .. 


 

" तर तुम्ही जागे होता??……."..... माही 

" तू माझ्या जवळ असणार आणि मला कळणार नाही …. असे होऊ शकते काय ….?" …. अर्जुन झोपेत बोलला…..

माही जेव्हा रूममध्ये आली आणि तिने दार लावले तेव्हाच तिच्या बांगड्यांचा आवाजाने त्याने डोळे  उघडून बघितले होते , आजकाल त्याला गाढ झोप लागत नव्हती ..थोडासाही आवाज झाला की तो माहीच्या काळजीने जागा व्हायचा. ...त्याने तिला रूममध्ये आलेले बघितले तर होते, तिला बघून तो रिलॅक्स झाला   ..…. त्याच्या डोळ्यात झोप होती...तिला बघून परत तो झोपला होता…. 

" Sir , प्लीज सोडा ना …. कोणीतरी बघेल …?..आणि तुम्ही अजूनही झोपले आहात?….तुम्हाला मॉर्निंग वॉकला नाही जायचं काय ?  "..... माही त्याच्या मिठीतुन सुटायचा प्रयत्न करत होती ..

" Shut up Maahi …don't move…...my wife is in my arms….  let me sleep now..… I am too tired …. "..... अर्जुन आळसावल्या आवाजात बोलत तिच्या कानाजवळ आपलं कपाळ घासत झोपला.. …मीरा पण झोपेत अशीच आपलं डोकं माहीच्या कुशीत घासायची…... त्याचे तसे करण्याने  तिला खूप गंमत वाटली …… तिने परत चुळबुळ केली … 


 

" Sh..sssssss माही ….. प्लीज स्विटी … पाच सहा दिवसांपासून झोपलो नाही आहो …. ".......त्याने तिच्या भोवती हात घट्ट केला आणि तिला पकडुन झोपी गेला…. 

" झोपलो नाहीये ….. ".... त्याचं वाक्य ऐकून तिला वाईट वाटले…….तिला तिच्यासाठी ..दोन अश्रू तिच्या गालांवरून ओघळले ....

 " खरंच मी माझंच  दुःख कुरवाळत बसली … माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना माझ्या अश्या वागण्यामुळे किती त्रास झाला आहे…. मीरा , इतकी लहान,  माझी परी … तिनं सुद्धा समजून घेतले….. अर्जुन ...मला नीट झोपता यावे , मी झोपेत घाबरावे नाही ….म्हणून स्वतः झोपले नाही …. , माही, बस आता….. आता परत असे खचायचे नाही, घाबरायचे नाही.… अर्जुन आणि मीरासाठी कुठल्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी माझी तयारी आहे….. माही तुला यांच्यासाठी मजबूत बनावेच लागेल. .. "......  अर्जुनकडे बघत मनाशीच एक निश्चय करत तिने पण अर्जुन भोवती आपली मिठी घट्ट करत त्याच्या कुशीत शांत झोपली …… 

आठ साडे आठच्या सुमारास अर्जुनला जाग आली ….. आपल्या मिठीत माहीला बघून त्याच्या ओठांवर हसू उमलले…. ती सुंदर तर होतीच …. पण त्याही पेक्षा  तिची निरागसता , नेहमीच त्याला आवडणारा तिचा बावळटपणा त्याला नेहमीच भुरळ पाडत असे … आणि तो तिच्या प्रत्येक नौटंकीच्या नव्याने प्रेमात पडत असे…. 

" किती विकृत आणि घाणेरडी मानसिकता असते लोकांची…. एखाद्या निरागस मुलीला कुच्करण्यात काय सुख मिळते यांना??….किती छोट्या मुली या राक्षसी प्रवृत्तीच्या लोकांच्या शिकार झाल्या आहेत…… प्रत्येकीला माही सारखा परिवार नसेल भेटत … त्यांना सावरायला…..God .. that's why I don't believe in you….. if you are here ...then why  are you  not showing your presence…? …. " ...

"  किती क्यूट आणि नाजूक आहे ही ….. स्पर्श करायला सुद्धा भीती वाटते की चुकून सुद्धा छोटासा ओरखडा  पडावा नाही ….. माही , मी आता कुठलेच दुःख  तुझ्या जवळ सुद्धा भटकू देणार नाही …… "...... त्याने तिच्या कपाळावर किस केले आणि उठून बसत तिच्याकडे बघत होता...….. त्याच्या हालचालीमुळे तिला जाग आली ….. समोर बघितलं तर अर्जुन तिच्याकडे बघत होता …. 

" Good morning Mahi  …….. "..... अर्जुन , माही त्याला बघत एक स्माईल दिले….उठून बसत  इकडे तिकडे बघत होती…. 



 

" ही तर यांची रूम आहे. ….मी तर तिकडे त्या दुसऱ्या रूम मध्ये झोपली होती….."....., माही त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती…


 

" मॅडम अश्या संशयास्पद नजरेने माझ्याकडे बघू नका….. early morning तुम्हीच आलात इथे …  "..... अर्जुन 

माहीने एकदा बेड कडे बघितले…..नंतर दाराकडे …..

" बंद आहे दार …. तूच केले होते बंद ….".... अर्जुन 

" हा तर….. मी...मी बंद करू शकते दार …..मी कधीही येऊ शकते इथे……"... माही अडखळत अर्जुनला उत्तर देण्यासाठी म्हणून  बोलत होती .

" Yes offcourse ….,.. मी कधी नाही म्हणालो ….तू इथे येऊ शकते, तू माझ्या जवळ येऊ शकते…. तू मला पकडून पण झोपू शकते…."....अर्जुन मस्करीच्या आवाजात बोलत होता. 



 

थोडा डोक्यावर ताण दिल्यावर तिला पहाटेचे आठवले , त्याचे बोलणे ऐकून ती ब्लश करत आहे तिला बघून अर्जुनला वाटले.  

"मी नाही…. तुम्ही मला पकडले होते ……"....माही 

" हो तर एकूण एक सारखंच आहे ……तसही आपली डील झाली आहे आता….."...अर्जुन 

 ....माही 


 

" डील….? ..बापरे साडेआठ वाजलेत  …..तू…..तुम्ही …..मला उठवले का नाही……?....."..... माही बेड वरुन उडी घेत खाली उतरत ओरडली.   

" Seriously…..?... तुला वाटते मी तुला उठवेल…?... त्यात तू माझ्या जवळ होती…. शक्यच नाही …...मी हा चांस कसा सोडणार ...…".... अर्जुन 

" बाहेर सगळे काय म्हणत असतील?" ….. माही 

" कोण काही नाही म्हणत…… सकाळची वेळ आहे , प्रत्येकजण आपल्या कामात असतो , आणि तसेही तुला बरे नाही आहे ….कोणी इतका विचार करत नाही"…… अर्जुन 

" पण … पण…. मी इथे तुमच्या रूम मध्ये …..".... माही 

" माही , रिलॅक्स ……. Everything is fine …..  ".... तिच्या गालावर थोपटत तो बोलला. 

" बरं , मी फ्रेश होऊन खाली जातो ….. तुझ्यासाठी breakfast वरती आणायचा की येतेय खाली …?"..... अर्जुन 


 

" नको , मी जातेय … तुम्ही या ….."..... म्हणत ती पूल साईडने  बाहेर पळाली… 

माही पूल साईडच्या दरवाज्याने पहाटेला बाहेर आली होती…. त्यामुळे तिचा रूमचे मुख्य  दरवाजा बंद होता….. ती झोपली असेल म्हणून कोणी तिला डिस्टर्ब केले नव्हते …..  आणि अर्जुन…. त्याला तर विचारायची घरात कोणाला काहीच हिंमत नसायची . .. 

………. 


 

ब्रेकफास्ट साठी सगळे खाली जमले होते…. माही सुद्धा येवढ्या दिवसात आज पहिल्यांदा खाली आली होती … रोज ती तिच्या रूम मध्येच असायची …. आज ती अगदी आधीसारखी वागत होती … एकदम फ्रेश दिसत होती... घरात ती नेहमीप्रमाणे सगळ्यांना मदत करत होती . मिराचा पण गोंधळ सुरू होता ….दोघींना खुश बघून अर्जुन सुद्धा रिलॅक्स होता….. त्याची नजर त्या दोघींच्या मागे मागे फिरत होती...


 

" काय अर्जुनराव….. गोकुळ खुश दिसत आहे तुमचं आज ?".....आशुतोष 

" गोकुळ ?"...... अनन्या 

अर्जुन कसानुसा चेहरा करत आशुतोषकडे बघत होता 

" अर्जुन आणि  त्याचे विश्व…. एक गोकुळच आहे ….. म्हणजे तो त्याच्याच विश्वात रमतो ….. असे म्हणायचे ".....आशुतोष 

" हो बरोबर आहे आशू तुझं …. आज त्याचे ओठ दोन इंच जास्ती रुंदावले दिसत आहे ….."..... अनन्या 

" काय …. काय …..दादू हसतोय …..?"..... श्रिया आश्चर्यचकित झाल्यासारखे भाव दाखवत बोलली 

सगळे अर्जुनला चिडवत आहे बघून माहीला सुद्धा हसू येत होते …… तो जितका चिडला तितकी माहीच्या चेहऱ्यावर स्माईल ब्रॉड होत होती …. 

" त्याच्या आयुष्यात स्पेशल एन्ट्री जी झाली आहे …… तुमने मारी एन्ट्री और दीलमे बजि घंटी यार …. टन टून टिन टिन ……."....आशुतोष माही जी चहाचा ट्रे घेऊन येत होती तिच्या मागे मागे येत चिडवत होता … 

" कोण …. ? "...... श्रिया , अनन्या संशयी नजरेने माही कडे बघत होती… आणि अर्जुनची नजर मात्र चिडकी झाली होती. 

" अगं चहाची एन्ट्री ग ….. आजकाल तुझा भाऊ चहा प्यायला लागला…. त्यात माहीच्या हाताचा चहा असेल तर मग काय बघावं लागते …..".....आशुतोष 


 

" Thank God , ही चहा घेऊन आली, नाहीतर हिच्या अर्जुनाने मला कच्च खाल्ले असते ….." ….. आशुतोष मनातच अर्जुनचे चेहऱ्यावरील भाव बघत बोलला. 

माहीने सगळ्यांना चहा दिला….नंतर ती अर्जुन जवळ गेली….. आणि त्याच्या पुढे चहाचा कप धरला…

" खूप हसू येते ना …? Will see you in office …….."..... अर्जुनने कप घेतला सगळ्यांवर एक जळजळीत कटाक्ष टाकला आणि आपल्या रूममध्ये गेला….

" ड्रॅक्युला ……"..... माही हळूच पुटपुटली 


 

जाता जाता तिचा शब्द त्याच्या कानावर पडला ….. " Be ready in ten minutes , don't be late "...... त्याचा नेहमीचा सुर लागला… 


 

" काय सडू बॉस आहे ग तुझा …."....आशुतोष 


 

" माहीचे काही खरे नाही आता आणि ऑफिसवाल्यांचे सुद्धा "....आकाश 


 

" Maahi see you soon ……".... अनन्या श्रिया एकमेकींना टाळ्या देत हसत होत्या 

सगळ्यांची थट्टा मस्करी सुरू होती….


 

अर्जुन आणि माही दोघेही ऑफिससाठी निघाले … 

" काय …. खूप हसायला येते ना तुला …..".....अर्जुन कार ड्राईव्ह करता करता बोलत होता .

 " आता जोकवर कोणी पण हसणारच ना?….".... माही 

" Seriously …. ? .. जोक सुरू होता? … "... अर्जुन 

" मग काय होते ?".... माही 

" ते सगळे मला बोलत होते ….".... अर्जुन 

" हा... मग काय झाले ? …. गंमतच करत होते ."..... माही 


 

" गंमत नाही ते मला चिडवत होते…..आणि त्यावर तू हसत होती ...."....अर्जुन परत चिडला


 

" चिडलात की किती भारी क्यूट दिसतात तुम्ही …. असं वाटतंय की तुमचा गाल ओढवेत आणि क्युटसे छोटेसे किस करावे …. "...... माही आपल्याच तालात बोलत होती …. तेवढयात गाडीचा करकचून ब्रेक लागला …. 

" क…..काय झालं…? कोण पुढे आले काय ?".... माही काचेतून पुढे बाहेर बघत होती.. 


 

" कोणीच तर नाही पुढे …. मग अचानक असं ".......बोलता बोलता माहीने अर्जूनकडे बघितले … तर त्याच्या डोळ्यात चमक होती आणि चेहऱ्यावर खट्याळ भाव होते  


 

" what did you say?"....... अर्जुन 

" कधी ?"..... माही

" आता ….."..... अर्जुन 

" ते ssss…… ते सगळे गंमत करत होते ….".... माही 

" नाही ….. नंतर …."..... अर्जुन

" ते …. कारच्या पुढे कोणी आले काय ….."....माही 


 

" नाही , त्या आधी …….."..... अर्जुन 

" त्या आधी ?....काय ? …"....माही , आता माहीला कळले होते अर्जुनला काय विचारायचं आहे ते……. अन् ती गालात हसली

" तेच काहीतरी ….. मी चिडलो की……".... अर्जुन 


 

" हा ….. तुम्ही चिडले की कोणाचंच ऐकून घेत नाहीत ….. फारच चिडचिड करत असता…..".... माही 

" ते नाही ….. दुसरं …..".... अर्जुन 

" दुसरं??....काय दुसरं ? , तुम्ही चिडलात की मला सगळंच विसरायला होते … आता मला काही आठवत नाही आहे "...... माही 


 

" Oh really ?……. ठीक आहे , तुला आठवले की बोलूया …..तोपर्यंत no talking .."..... अर्जुनने कार सुरू केली आणि सरळ ऑफिसला आला…. माहीला मात्र हसू येत होते...पण तिने हसू दाबून ठेवले होते…. कारण ती जर परत हसली तर तो परत चिडला असता.. 

ऑफिसला आल्यावर दोघेही आपापल्या कामात व्यस्त झाले.. 

माही एक दोनदा कामाने त्याचा कॅबिन मध्ये गेली होती…. yes no शिवाय दुसरे काहीच तो बोलला नव्हता …. त्यावरून तिच्याही लक्षात आले होते की साहेब भयंकर नाराज आहेत …. 

" तो मुलगा शांतीसदन मध्ये कसा काय आला होता ? … काय करत होता….? आणि सरांच्या मोबाईल मध्ये त्याचा फोटो कसा ?  "..... असे प्रश्न माहीच्या डोक्यात घोंगावत होते…. इतके दिवस ती स्वतः तच होती त्यामुळे तिचं लक्ष नव्हते….. पण आज ती नॉर्मल होती… शांततेने तिचे विचार सुरू होते...पण उत्तर मिळत नव्हते…. " सरांनाच विचारू …. पण आज नाराज आहेत  ते, yess no च्या पुढे काही गाडी जाईना साहेबांची…. झाले काय..तूच केले त्यांना नाराज... …. चला मिसेस माही अर्जुन मिस्टर अर्जूनांना कसे पटवायचे …. आयडिया शोधा…..".... माही आपल्या जागेवर बसून काय करायचं विचार करत होती . 

काही वेळाने आशुतोष ऑफिसमध्ये अर्जुनला भेटायला आला होता ...

" माही कशी आहे आता ?".....आशुतोष 

" पहिले पेक्षा खूप ठीक आहे …..".... अर्जुन 

" ह्मम…. ते दिसत होते आज तिच्या चेहऱ्यावरून …… खूप खुश दिसत होती….तू पण खुश दिसतोय…... something special ?"..... आशुतोष 

" हो ….. तिने लग्नासाठी होकार दिला….." ….. अर्जुन 


 

" इतकी ऑसम न्यूज तू इतकी थंडी थंडी सांगतोय , सेलिब्रेशन तो बनता है यार…."....आशुतोष 

" माहीची इच्छा आहे की श्रियाचे लग्न आधी व्हावे , नंतर आमच्या बद्दल घरी सांगावे ….."... अर्जुन 

" श्रिया आणि तुझं , दोन्ही वेगळे  विषय आहे …. "..... आशुतोष 

" तिला असे वाटते की तिच्यामुळे श्रियाच्या लग्नात काही अडथळा नको …. ती अजूनही दुसऱ्यांचा विचार आधी करते …. ".... अर्जुन 

"ह्ममम ….. निस्वार्थ मनाची आहे ती …. माहिती नाही तुला कसे काय हो म्हणाली ….?".... आशुतोष त्याची मस्करी करत बोलला.

" What do you mean ?'...... अर्जुन 

" काय बाबा तुला गंमत पण समजत नाही  , कठीण आहे माहीचे …. ".....आशुतोष 

" परत ?"..... अर्जुन 

" गंमतीचा भाग सोड …. पण माही खरंच खूप भाग्यवान आहे की तुझा साथ तिला मिळाला आहे… तू तिला निवडले आपली जीवनसाथी म्हणून …. She is really luckiest girl… नाहीतर जे तिच्या सोबत घडले आहे , असे असताना कोणी साधं साथ देत नाही …. तू तर तिचा जीवनसाथी व्हायला निघाला आहे …. Great …. तू कामानेच ग्रेट नाही तर तुझ्या विचारांनी पण ग्रेट आहेस ….नाहीतर मोठमोठी लोकं सुद्धा आजकाल माणुसकी विसरले आहेत……अभिमान वाटतो मला तुझा  .. ".....आशुतोष 

" I am the luckiest one …. जे माही माझ्या आयुष्यात आली , तिने मला मनापासून खळखळून हसायला शिकवले…. प्रेम करायला शिकवले….. तिच्यासारखी निरागस, पवित्र मनाची, निष्पाप  मुलगी मी कधीच बघितली नव्हती…. ज्या पण यायच्या त्या सगळ्या स्वार्थी होत्या…..म्हणून मी लकी आहे तिने मला निवडले तिच्यासाठी आणि मीरा साठी …..".... अर्जुन 

" Speechless ….. "...... आशुतोष , अर्जुन थोडा हसला..

"  तू देवेश बद्दल बोलला तिच्यासोबत ?".... आशुतोष 

" नाही , खरं तर काल बोलायचं होते…. आम्ही बाहेर गेलो होतो…. पण ती खूप आनंदी होती ….. मला तिला दुखावावेसे नाही वाटले…. आज After office  बोलतो "..... अर्जुन 

" Okay ….. काय करायचे ठरवले आहे मग ?"....आशुतोष 

" मला तर तर त्याला जिवंत नाही सोडायचं …. पण तो माहीचा सगळ्यात जास्त गुन्हेगार आहे , त्याला शिक्षा देण्याचा अधिकार तिला आहे …. माझी इच्छा आहे की तिने स्वतः त्याचा सामना करावा….... तिला या बाबतीत स्ट्राँग होणे खूप गरजेचे आहे ….आणि ती आहेच फक्त तिला त्याची जाणीव करून द्यायची आहे…. ..…. ".... अर्जुन 

" हो तुझं बरोबर आहे … मुलींनी आता कणखर बनण्याची गरज आहे आता….आणि आपण आहोच तिच्यासोबत  …".... आशुतोष 

" हो ….".... अर्जुन 

" बरं आणखी एक , ॲड शेखर …. बेस्ट लॉयर आहेत…. कधीच कुठली केस हरले नाही आहेत …. त्यांची ॲपॉइंमेंट घेऊन ठेवतो ".....आशुतोष 

" मी आधीच घेतली आहे …. "...  अर्जुन 

" Great ….. चल आकाश आणि माहीला बोलव, सेलिब्रेट करूया .....".... आशुतोष 

" सेलिब्रेशन इथे ?? " ….. अर्जुन 

" तुझ्या ऑफिस मध्ये कॉफी घ्यायला  पण नाही चालत ??…..तू नक्कीच बॉस आहे ना इथला ..?...".... आशुतोष 

अर्जुन ने आकाशला फोन करून माहीला सोबत  घेऊन यायला सांगितले…. आणि ऑफिस कॅन्टीनला कॉफी , चहा आणि जिलेबीची ऑर्डर दिली 

त्याची ऑर्डर बघून आशुतोष गालात हसला …. 

" काय झालं?'.....अर्जुन फोन खाली ठेवत बोलला…. 

" अर्जुन आईचे , अनन्याचे फेवरेट डिश काय आहे ? …...,".....आशुतोष , अर्जुन एक भुवयी  उंचावत त्याला बघत होता….. 

" गुड , चांगला नवरा बनण्याची प्रॅक्टिस सुरू झाली तुझी …."....आशुतोष 


 

" तिला आवडते चहा सोबत जिलेबी …..म्हणून ....".... अर्जुन 

" मी कुठे तुला काही विचारतोय ..? तिच्याच साठी असेल…… असे अजब गजब कॉम्बिनेशन तू तर नाहीच खाणार….. ".... आशुतोष ….. 

आकाश आणि माही येईपर्यंत आशुतोष त्याला पूर्ण सतावून सोडत होता…. 

इकडे देवेशने श्रियाला फोन केला .. 

" देवेश….. बोल ….. दोन दिवसांपासून कुठे होता …?. किती फोन केले, ते पण नाही उचलले ?".....श्रिया 

" अगं कामात होतो बाबा ….. मीटिंग होती …. काम वाढले आहेत सद्द्या " ….देवेश 

" माझ्या पेक्षा महत्वाचं काम होते ….?"....श्रिया 

" अरे जानु …… तुझ्यासाठीच करतो ना सगळं …. आपलं फ्युचर बेस्ट पाहिजे "....देवेश 

" बरं …. कधी भेटतो आहे? "....श्रिया 

" भेटू लवकरच….."....देवेश 

देवेश आणि श्रियाचे बरेच अवांतर बोलणे सुरू होते….हळूहळू तो घरचा विषय आणि नंतर अर्जूनवर आला….

" तुझा अर्जुन दादा काय म्हणतो ? बिजनेस वर्ल्ड मध्ये तर रेकॉर्ड ब्रेक करणे सुरू आहे त्याचे….. जोरदार कामं आहेत त्याचे.."....देवेश 

" हो ना , आहेच तो हुशार  … पण  आजकाल चिडचिड करतो थोडा  ".....श्रिया 

" काय ग , त्याची कोणी गर्लफ्रेंड आहे काय ?? "....देवेश अंदाज घेत होता .. 

" नाही रे"..... श्रिया 

" असेल ग …. तुला नसेल माहिती ".....देवेश 

" अशक्य ….. त्याचा या गोष्टीवर काही विश्वास नाही आहे ….. स्वतःही नाही करत…. दुसऱ्यांना पण नाही करू देत….."....श्रिया 

" म्हणजे ?".....देवेश 

" काही नाही असेच…. त्याला कळत नाही प्रेम म्हणजे काय ….. काश तो पण प्रेमात पडला असता….."....श्रिया 

" मग लग्न? नाही म्हणजे आधीच मोडले तर ?".....देवेश 

" काय तो लग्न करण्यात इंटरेस्टड नाही ….. त्याला तर आजकाल फक्त मिरा दिसते…. तिच्यासोबत खुश असतो तो …."....श्रिया 

" मीरा ??... ही कोण?"....देवेश 

" अरे….. तो ४ वर्षाची लहान मुलगी आहे …. अंजली वहिनी आहेत ना त्यांच्या चुलत भावाची मुलगी आहे …. खूप गोड आहे…. दादा तिच्यासोबत च खेळत असतो…."....श्रिया

" ती तिथेच राहते काय तुमच्या घरी?"....देवेश 

 " नाही रे ती अंजली वहिनीच्या आईकडे राहते… पण आता आले आहेत ती आणि माही …. अंजली वहिनीची आई आणि आत्या तीर्थयात्रेला गेले आहेत म्हणून "......श्रिया 

" ही माही कोण ?"....देवेश

" अंजली वहिनीची लहान बहीण आहे…."....श्रिया 

" Ohh अच्छा , काय करते ? ".....देवेश 

" दादाच्याच ऑफिसमध्ये आहे…. काय रे तुला भारीच इंटरेस्ट दिसतोय दादा मध्ये…..आणि माझ्या बद्दल विचारायचं सोडून त्या माहीबद्दल विचारतोय ".....श्रिया 


 

" अरे आता तो माझा साळा होणार … माहिती नको का…..म्हणून आपलं सहज विचारत होतो…... बरं तुझ्याबद्दल बोलूया बस...."....देवेश 

थोडेफार बोलून त्याने फोन ठेऊन दिला…. 

" माही !!! इंटरेस्टिंग !!!  ….. "....देवेश

देवेश काही विचारात गढून गेला होता .….

******* 

क्रमशः 



 

🎭 Series Post

View all