Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 65

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 65

तू ही रे …. कसं जगायचं तुझ्याविना 65


 

माहीने मेळ्यामध्ये खूप मनसोक्त एन्जॉय केले … आपल्या आवडीनुसार छोटीमोठी खरेदी केली …. सकाळपासून आतापर्यंत सगळे तिच्या आवडीचे झाले होते …. बाप्पाचे मंदिर , अनाथ आश्रम मधील मुलींसोबत घालवलेला वेळ तिला तिच्या बालपणात घेऊन गेला होता … खूप वर्षानंतर ती अशी जगली होती … तिच्यासाठी तिच्या आवडीचे…. दुसऱ्यांचे पैसे सुद्धा कधी  न घेणारी पण आज तिने अर्जूनचे पैसे सुद्धा घेतले होते…. आज सगळ्या जगाचा तिला विसर पडला होता … आज फक्त ती आणि अर्जुन येवढेच होते …. खूप आनंदी होती ती आज…. आणि तिला खुश बघून अर्जुनला सुद्धा समाधान वाटत होते ..


 

आता संध्याकाळ होत आली होती. .. सूर्य मावळतीला आला होता …. वातावरण शांत झाले होते …कार मध्ये सुद्धा माही आपल्याच विश्वात हरवली होती…... अर्जुन ने गाडी एका छोट्या टेकडी  पण थोड्या जंगली एरिया जवळ कडे घेतीली…. कार बंद केली…. 

 

" गाडी का बंद पडली?" …… माही अचानक गाडी बंद झालेली बघून बोलली ….. तिला मागे एकदा ती अर्जूनसोबत पावसात अडकली होती...आणि मग एका आजीबाईच्या घरी रात्र काढली होती ते सगळे आठवले…. आणि ती वरती आकाशाकडे बघू लागली….

 

" पाऊस येण्यासारखं नाही  काही …..". ... अर्जुन हसत बोलला…. तिच्या डोक्यात काय आले असेल याचा तो अंदाज घेत होता.  


 

" आणि आला तर…?... कधीही काही होतं"..... माही 

 

" आला तर आला….. पाऊस सुद्धा एन्जॉय करूया …… ".....अर्जुन 


 

" पेट्रोल संपले…..? ".... माही 

 

अर्जुन मिश्कीलपणे तिच्याकडे फक्त बघत होता …. 

 

" Ohh तर तेव्हाचा  बदला घेणार तर……. हे बघा तेव्हाचा माझा हेतू शुद्ध होता …. चांगला होता …… होणाऱ्या नवरा बायकोला एकमेकांसोबत  वेळ घालवता यावा म्हणून ते सगळं प्लॅन केलं होते …. तुम्ही हे असे माझ्यासोबत वागू नाही शकत……."..... माही 

 

" माझा पण हेतू सुद्धा  शुद्धच आहे …एकदम प्युर… "...... अर्जुन , अर्जुनने कार सुरू केली आणि थोडी पुढे घेतली .. 

 

" Hushh…… पेट्रोल नाही संपले …. "... माही 


 

" तुला काय वाटले प्लॅन्स फक्त तुला करता येतात ….? "...... अर्जुन ने कार साईड ला पार्क केली. … 

 

" परत …. परत बंद पडली ….."....., माही परत डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती . 

 

" पार्क केली …… ".....तो उतरत बोलला 


 

" इथे कोणीच नाही आहे "...... माही आजूबाजूला बघत बोलली … बऱ्यापैकी सामसूम होती तिथे … 

 

" हम्म ….. चल …."..... अर्जुन थोडा पुढे निघाला 

 

" नाही….नाही…. मी नाही येणार ……".... माही 

 

" ठीक आहे बस इथे ….. मी चाललो ….."....अर्जुन 

 

तिने इकडे तिकडे बघितले… कोणीच नव्हते… अर्जूनसोबतच जाण्यात शहाणपण आहे हा विचार करून ती त्याचा मागे पळत आली….

 

" हे बघा मी काही कशाला घाबरत नाही ….. दिवसभर सोबत होती म्हणून आता पण येते आहे ….. उगाच भलता अर्थ काढू नका हं तुम्ही …." ... माही 

 

" I know …... आणि उगाच तुझ्या छोट्याश्या मेंदूवर जोर नको देऊ ….. "..... अर्जुन 


 

" पण इथे का ? हे जंगल सारखं दिसतंय "......माही 

 

" ह्मम जंगलच आहे ...  चहा कॉफी घेऊया…. चल "...... अर्जुन 

 

" ह्या….?? इथे …..? ...वाघोबा आणून देणार आहे काय इथे तुम्हाला चहा कॉफी ? " …… माही 

 

तिच्या बोलण्यावर तो हसला….' sir नक्कीच पागल झाले आहे असे तिच्या चेहऱ्यावर वरून स्पष्ट भाव दिसत होते' … 

 

" ह्मम … तसेच काही समज ……."......अर्जुन पुढे चालायला लागला ..

 

" त्यासाठी इथे जंगलातच येण्याची काय गरज होती ….? ..आता अंधार पण पडत आला आहे ….."..... माही बडबड करत त्याच्या चालण्याचा स्पीडला मॅच करत त्याच्या सोबत चालत होती.. 

 

"मी असताना  तुला भीती वाटते आहे.?".....अर्जुन 

 

" बरोबर आहे ड्रॅक्युला वाघोबा पेक्षा पण खतरनाक असतो……"..... माही … बडबड करता करता तिचे लक्ष समोर गेले… 

 

" ड्रॅक्युला…. How sweet …. After a long time ……".... अर्जुन 

 

" पागल झालात आज तुम्ही….. काय काय आवडते आहे " …...माही 

 

दोघांचीही बडबड सुरु होती ….पुढे जाता जाता माही एका जागेवर थांबली… 

 

" वाह….. किती सुंदर …. ".....माहीचे समोर दिसणाऱ्या मावळत्या सूर्याला बघत होती…. खूप मोठा असा तांबडा शेंदरी असा वेगळाच सुंदर रंग दिसत होता….. डोळ्याचं पारणं फिटेल असं ते सौंदर्य होते…. माही जेव्हा सूर्याकडे बघत होती तेव्हा सूर्याची ती तांबडी किरणं माहीच्या चेहऱ्यावर पडली होती त्यात तिचे अस्मानी सौंदर्य खूप निखरून येत होते…… माही मंत्रमुग्ध होत ते बघत होती … आणि अर्जुन माहीकडे तिचं तांबड शांत सौंदर्य …… 

 

" खूप छान वाटतेय ….खूप फ्रेश…...…."... माही अर्जुन कडे बघत बोलली… तो फक्त हसला… 

 

" चल तिकडे बसुया…..".....अर्जुन एका खडका कडे बोट दाखवत बोलला.  

 

दोघंही तिथेच टेकडीच्या उंचवट्यावर असलेल्या एका मोठ्या खडकावर जाऊन बसले…. थोडा वेळ शांततेत सूर्य बघण्यात गेला .. 

 

" Sir ….. चहा ?"..... माही 

 

" Seriously …?" ... अर्जुन 

 

" तुम्हीच म्हणालात ना चहा कॉफी प्यायला चाललो …..".... माही 

 

" माही , इथे दूरदूर पर्यंत तुला कोणी दिसतंय काय? की कुठलं चहाचं दुकान दिसते आहे ?". …. अर्जुन 

 

" मी पण तेच म्हणाले होते ना मघाशी….. तर तुम्ही हसत होता …".... माही नाटकी नाटकी राग दाखवत बोलत होती… 

 

" तुला आवडले नाही इथे….?' ….. अर्जुन 

 

" खूप आवडले…… खरं तर आजचा पूर्ण दिवस आवडला … आयुष्यभर आठवणीत राहील असे होते सगळे…… माझं हरवलेले काही क्षण मला आज परत मिळाले ….. "..... माही

 

" चहा तर नाही पण काहीतरी आहे माझ्या जवळ ….. बघ आवडते काय ….."....म्हणत अर्जुन ने त्याच्या खिशातून काहीतरी काढून हत तिच्या पुढे धरला…. 

 

" Kiss me ssss ……."..... माही , 

 

अर्जुन च्या  हातात parle g चे kiss me (आम्ही लहान होतो तेव्हा मिळायचे , बहुतेक सगळ्यांचे fev होते तेव्हा )  चॉकलेट्स होते…. माहीचे आवडते….ते बघून ती आनंदाने त्याच्या पुढे उभी राहिली ...

 

" Are you sure?  …..".... अर्जुन 

 

" हो…. हवे आहे मला….. "....माही 


 

" Okay …… मग रागवायचे  नाही "..... अर्जुन आपल्या जागेवरून उठत तिच्या पुढे उभा राहत बोलला

 

" मी का रागवेल ..? मला आवडते ते …माझे फेवरेट आहे ते …..आणि या सुंदर गोड वातावरणात त्याच्या गोडीची साथ….. .".... माही , तिला बघून अर्जुन गालात हसला….. 

 

" Okay ……"... अर्जुन तिच्या जवळ जात एक हात तिच्या कंबरेमध्ये टाकत तिला जवळ घेतले…..आणि एक हात तिच्या मानेचा  मागून टाकत माहीच्या मानेला पकडत तिचा चेहरा वर केला … आणि तिच्या डोळ्यांमध्ये आपली नजर स्थिरावली…. 

 

" तू…..तुम्ही …..क…..काय…..करताय…?" .... त्याच्या स्पर्शाने पहिलेच तिच्या हृदयाच्या तारा twisted होत स्पार्क करत होत्या…. त्यात तो येवाढा जवळ….तिच्या तोंडून शब्द सुद्धा नीट  निघत नव्हता...

 

" तू आता म्हणाली तेच …… ".... अर्जुन 

 

" म…... मी…...काय …...."......माही 

 

" Kiss me ...…".... अर्जुन 

 

" त….. तसं नाही…..ते..चॉकलेट ……"....माही , पण तो तिच्या  इतका जवळ आला होता की तिला आता काहीच सुचत नव्हते .. 

 

" मला नको मिळायला ….माझं चॉकलेट ….. "..... अर्जुन 

 

" हां..?".... माही 

 

" माझं फेवरेट ……".... अर्जुन , असं म्हणत अर्जूनची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली….. 

 

त्याची पकड तिच्याभोवती इतकी घट्ट झाली होती की तिचे आपोआप डोळे मिटले गेले … त्याचे श्वास तिला तिच्या गालावर जाणवत होते …. तशी तिच्या पोटात एक कळ उठली … तिची त्याच्या हातावर पकड घट्ट झाली…

 

" माही , please ' हो ' म्हण ना आपल्या नात्यासाठी …...आता तुझ्यापासून दूर राहणे त्रासदायक होत आहे.  ….."..... तो तिच्या कानाजवळ जात बोलला … 

 

त्याचा आवाज आला तसे तिने डोळे उघडले...तो तिच्याकडे बघत होता … त्याच्या डोळ्यात तिला प्रेम , तिच्या विषयी काळजी …कुठेतरी एक भीती ….ती दूर असल्याचा त्रास ......सगळं दिसत होते….. 

 

या पाच सहा दिवसात तिने अर्जुनला खूप जवळून अनुभवले होते…. एक वेगळाच अर्जुन तिने बघितला होता ….. तिला होणारा त्रास त्याला होत होता…… दुखत तिला होते पण अश्रू त्याच्या डोळ्यात होते….. तिला जवळ ठेवण्यासाठी , तिची काळजी घेण्यासाठी त्याला किती गोष्टी लपवाव्या लागत होते …. तो किती मजबूर होता …त्याला हे किती असह्य होत आहे तिला जाणवत होते. …. हे सगळं करताना त्याचं निस्वार्थ प्रेम …. आणि तो तिच्यामध्ये किती गुंतला आहे हे सुद्धा तिला कळत होते .. आणि या दिवसात तिला हे मात्र कळलं होते की अर्जुन आता पुढे कधीच दुसऱ्या मुलीचा विचार सुद्धा करणार नाही…. जर माही नाही आली तरी तो दुसऱ्या कोणाला त्याच्या आयुष्यात डोकावूं सुद्धा देणार नाही …. त्याचे सगळे प्रयत्न तिला दिसत होते ….. आता तिला त्याला अजिबात त्रास द्यायची इच्छा झाली नाही….आणि आज शेवटी तिने पण निर्णय घेतला 

 

माहीने आपल्या टाचा उंचावल्या …… आणि त्याच्याजवळ जात हळूच त्याला काही कळायच्या आधी त्याच्या गालावर किस केले….. 

 

" हो ……".....माही 

 

" खरंच?" ... अर्जुन 

 

माहीने मान हलवित होकार दिला …. ते ऐकून त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद पसरला …..त्याने लगेच जाऊन तिला  मिठी मारली… 

 

" Thank you Maahi …. Thank you  ….. I am the happiest person in the world now …..".... अर्जुन तिला आपल्या मिठीत लपवत बोलत होता…. …. तो तिला कधी गालावर किस करायचा ..परत मिठीत घ्यायचा ..परत कधी कपाळावर किस करायचा परत मिठीत घ्यायचा ….. बराच वेळ त्याचा हाच खेळ सुरू होता….त्याला तर आता काय करू अन् काय नको असे झाले होते….तिने पण त्याला अडवले नाही…. तो जे करत होता ते करू देत होती… 

 

" Sir , खूप अंधार  झाला …" …माही 

 

" हम्म…..".... अर्जुन तिला आपल्या मिठीत पकडून उभा होता

 

" Sir…. कोणीच नाहीये इथे……"....माही 

 

" ह्मम ……".... अर्जुन 

 

" Sir ….. मला भीती वाटते आहे ….. वाघोबा येईल …..".... माही 

 

" मला पण भीती वाटते वाघाची …..".... अर्जुन 

 

" What ….?"..... माही त्याला दूर करत ओरडलीच 

 

" हो…. मला पण भीती वाटते …तुला काय वाटलं तो येईल इथे तर मी काय त्याच्यासोबत फाईट करेल आहे …..?...."... अर्जुन

 

 " हो……".....माही .

 

" ओ मॅडम , मी काय तुला टारझन वगैरे

 दिसतोय का…? ".... अर्जुन मिश्कीलपणे हसत बोलत होता. .

 

" नाही …. अर्जुन पटवर्धन ….तुम्हाला तर सगळं येतं ना ...."....माही 

 

" पण हे नाही येत….."... अर्जुन 

 

" Sir… चला …. खूप उशीर झाला आहे…."...माही 

 

" अहं…… आता तर सुरुवात झाली आहे … "..... अर्जुन तिथे दगडावर बसत बोलला. 

 

" सुरुवात झाली ना …. चला आता …. नाही तर the end होईल तो आला तर …..".... माही 

 

" पण तुला तर  आवडते ना असे संध्याकाळी टेकडीवर सूर्यास्त बघत भविष्याच्या गोष्टी discuss करायला ….."....अर्जुन 

 

" हां??".....माही 

 

" माही don't worry ….. हे tested jungle आहे…..".... अर्जुन 

 

" म्हणजे …..?'....माही 

 

" म्हणजे इथे हिंसक प्राणी नाही आहेत ….. आपण येऊ जाऊ शकतो " ...अर्जुन 

 

" अच्छा "......तिने सुटकेचा श्वास सोडला .

 

"  हा पण इथे तुझे फेवरेट पाल , कॉकरोच वगैरे आहेत …...असतीलच इथे कुठे खाली एवेनिंग वॉक करत. …."....त्याला तिची मस्करी करायचा मूड झाला….

 

" काय ….?..."...तिने परत घाबरतच उडी मारत होती की एका छोट्या दगडाला तिचा पाय अडकला आणि ती समोर बसलेल्या अर्जूनच्या मांडीवर बसल्यासारखी पडली …… पाय पण तिने घाबरून वरती आपल्या पोटाजवळ पकडले ….आणि खाली बघत होती कुठे पाल वैगरे दिसते काय …. 

 

अर्जुनने पण तिला आपल्या मांडीवर नीट आपल्या कुशीत पकडून घेतले होते … 

 

" I love पाल and कॉकरोचेस " ….. अर्जुन 

 

माहीने त्याच्याकडे बघितलं तर तो गालात हसत होता. ….. तेव्हा तिच्या लक्षात आले की तो तिची मस्करी करतोय …. तिने त्याच्या मिठीतुन उठायचा प्रयत्न केला पण त्याची पकड इतकी घट्ट होती की तिला हलता सुद्धा आले नाही. 

 

" आता माझी आहेस तू …. कधीच सोडणार नाही …. शांत बस "..... अर्जुन , माही डोळे  मोठे करत त्याला बघत होती… 

 

" मग बोल …. काय काय करायचं फ्युचर मध्ये ….? आणखी काय काय होतं ?" ….हा...किती मुलं हवेत …..?" …. अर्जुन 

 

" मुलं " शब्द ऐकला आणि तिने त्याच्या छातीत आपला चेहरा लपवला……पाहिले तो असा का बोलत आहे तिला कळले नाही….पण मग सकाळपासून एक एक क्षण तिच्या डोळ्यांपुढे सरकत होता ….. आणि मग तिला आठवले…. एकदा आकाश अंजलीसाठी प्रपोज सरप्राइज प्लॅन करण्यासाठी तिला आयडिया विचारत होता तेव्हा तिने हेच सगळं त्याला सांगितले होते….

 

" म्हणजे सरांच्या लक्षात होते सगळे ….. माझी मनस्थिती ठीक करण्यासाठी …. झालेल्या गोष्टींतून बाहेर काढण्यासाठी   … त्यांना उन्हाचा त्रास होत होता...तिखट जेवण जात नव्हते….. त्या छोट्या गल्ल्यांमध्ये माझ्यासोबत शॉपिंग जेव्हा की त्यांना हे काही आवडत नाही ….हे सगळं फक्त माझ्या आनंदासाठी ...   ही सगळी खटाटोप फक्त माझ्या साठी ….. सगळा विचार करून तिला गहिवरून आले… 

 

" हे एवढं सगळं फक्त माझ्यासाठी?  … ".... माही

.

" अहं …. माझ्यासाठी ….."....अर्जुन 

 

" तुम्ही खूप ……."....

 

" अगाऊ आहात ….. I know …..".... अर्जुन 

 

" खूप गोड आहात…….".... माही , ते ऐकून अर्जूनच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरले .. 

 

" माही , Are you happy ?'..... अर्जुन 

 

" तुम्ही खुश आहात ?"....., माही 

 

" हो …. खूप ….."...... अर्जून

 

" मग मी पण खुश आहे ….."..... माही 

 

" माही , तू तुझ्या शब्दावरून फिरणार तर नाही ? नाही म्हणजे मला अनुभव काही चांगला नाही ….".....अर्जुन 

 

" तुम्ही मला फिरू देणार आहात काय….? कुठले कुठले पेपर साइन करून मला अडकवून ठेवले आहे……"..... माही 

 

" गरज होती ती …. तुझ्या स्टुपिड डोक्यावर मला अजिबात विश्वास नाही आहे……"....अर्जुन 

 

" Sir , माझा जीव तुमच्यातच अडकला आहे…….".... माही त्याच्याकडे बघत मनातच विचार करत होती. . 

 

" काय ?"..... अर्जुन 

 

" तुम्ही खूप छान दिसत आहात ….. "...... माही … तसा तो हसला 

 

" काय काय करावं लागतं एक होकार मिळवण्यासाठी ….. हे असं इथे कॉलेज च्या मुलांसारखे…. घरच्या पासून लपून….... such a madness ….. "..... अर्जुन 

 

" Sir….. तुम्ही सगळ्याच बाबतीत परफेक्ट आहात….. तुम्हाला तर विश्व सुंदरी पण मिळू शकते ….. मग मीच का ?"...... माही 

 

" ह्मम….. राईट….. पण Love येवढं स्मार्ट नसते ना …….. बावळट असते "..... अर्जुन 


 

" Sir ………"... ती लटक्या रागात त्याच्या छातीवर ठुसे मारत होती… 


 

" माही …. तुला जे हवे आहे , जसे हवे आहे …. सगळं तुझ्या आवडीप्रमाणे होईल …. मी लवकरच घरी सगळ्यांना आपल्या बद्दल सांगतोय…. आणि मग रीती प्रमाणे तुझ्या घरी लग्नासाठी मागणी घालायला येतोय ……".... अर्जुन …. माही त्याचं बोलणं ऐकत होती...पण ती काहीतरी विचार करत होती.. 


 

" Sir ….. सगळं माझ्या मताप्रमाणे होणार काय ?"..... माही

 

" हो ….. ".... अर्जुन 

 

" Sir … मग माझी इच्छा आहे की आधी श्रिया चं लग्न होऊन जाऊ द्या …… उगाच माझ्यामुळे तिच्या लग्नात काही प्रोब्लेम नको …. एकदा तिचे लग्न झाले की मग कोणाचंच भविष्य माझ्यामुळे खराब नाही होणार …. श्रियाचे लग्न झाले की कोणीच नाही मग ज्यामुळे कोणाच्या लाईफ मध्ये काही अडथळा येईल.…. तिच्या लग्न नंतर तुम्ही घरी आपल्या बद्दल बोला….आपण श्रिया च्या लग्न नंतर लग्न करू. ……"..... माही 

 

 आतापर्यंत  आपल्याच विश्वात असलेले दोघंही अचानक भानावर आले….. ती एक विसरलेली गोष्ट दोघांनाही आठवली .. 

 

" Sir ……"....

 

" माही…. चल निघुया आता …. घरी डिनर साठी सगळे वाट बघत असतील ….." …, अर्जुन 

 

" पण ….."....

 

" माही , आपण पुढले आता नंतर डिस्कस करू…. उशीर होईल आता ….."....अर्जुन 

 

अर्जुन खरं तर आज तिला इथे एकांतात देवेशबद्दल सांगायला घेऊन आला होता …. पण तो दिवसभर पासून हे सगळंच विसरला होता…. आणि आता सुद्धा तो तिच्यात हरवला होता आणि ओघाओघाने काहीच प्लॅनिंग नसतांना  त्याने तिला परत त्यांच्या लग्नाबद्दल विचारले होते…. आणि क्षणाचाही विलंब न करता, कसलेच आढेवेढे न घेता तिने लग्नाला होकार दिला होता … त्याला आताचा हा इतका अविस्मरणीय, आनंदी  क्षण दुःखात कन्व्हर्ट करायचा नव्हता…..आताचा हा क्षण , हा दिवस फक्त सेलिब्रेशन चा होता ….. आणि म्हणूनच त्याने विषय बदलला... 

 

" ठीक आहे ….. ".... माही त्याच्या मांडीवरून खाली उतरली … दोघंही कार कडे जायला निघाले … अर्जुन मात्र आपल्याच विचारात हरवला होता…. चालता चालता माहीने हळूच अर्जूनच्या हातात हात घातला…. तसा तो आपल्या विचारातून बाहेर आला… 

 

त्याने भुवया उंचावत काय म्हणून विचारले …. 

 

" Kiss me ….. आता तरी द्या ना..…"....माही छोटासा चेहरा करत बोलली …. ते ऐकून तो हसला….. kiss me ने आज किती मोठे काम केले होते …. त्याने लगेच आपल्या दोन्ही  खिशात हात घालत दोन मुठ्ठी चॉकलेट्स बाहेर काढले आणि तिच्या पुढे धरले….. 

 

" तसे तर मी दुसरे वाले kiss me म्हणाली होती …..पण ठीक आहे … हे पण चालेल".....  म्हणत तिने त्याच्या हातातले सगळे चॉकलेट्स घेतले….. 

 

" What?"...... अर्जुन 

 

" तेच …. जे तुम्ही ऐकले…...पण तुम्ही चांस घालवला आता …..."....ती एक चॉकलेट तोंडात टाकत बोलली . 

 

" तू ना…… फार आगाऊ  झाली आहे ……"....अर्जुन 

 

" संगतीचा असर ……"..... माही पळतच कार मध्ये जाऊन बसली ….तो पण स्वतःशीच लाजत , हसत ड्रायव्हिंग सीट वर जाऊन बसला …. 

 

आज दोघेही खूप आनंदात होते …… अनपेक्षितपणे आज माहीने अर्जुनसोबत असलेल्या तिच्या नात्याची मंजुरी दिली होती …. तिने ते नाते स्वीकारले होते ….. अर्जुनही खूप खुश होता ..पण उद्या जेव्हा माहीला देवेश बद्दल कळेल ….तर काय होईल याची मात्र रुखरुख त्याच्या मनाला लागून होती… आणि माही मात्र आपल्या भविष्याची स्वप्न रंगवत होती ...… 

 

*****

क्रमशः 

 

  

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️