Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 64

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 64

भाग 64


 

अर्जूनने गाडी तिथेच जवळ असलेल्या एका मुलींच्या  अनाथ आश्रमात घेतली ….. माही आजूबाजूचे सगळे परिसर न्याहाळत होती . हे सुद्धा आश्रम मोकळ्या जागेत होते … त्यामुळे झाडं , मोकळी हवा असे छान वातावरण होते... दोघेही  गाडीतून उतरून आत येत होते ,तेवढयात तिथल्या मॅनेजर चे लक्ष त्यांच्याकडे गेले… तो धावतच त्यांच्याजवळ आला…

 

" नमस्कार मिस्टर पटवर्धन …. प्लीज या. …."....मॅनेजर

 

" हॅलो मिस्टर साई ……".... अर्जुन 

 

अर्जुन आणि माही मिस्टर साई सोबत त्यांच्या ऑफिस कडे जात होते… माही मात्र आश्रमाचे निरीक्षण करत होती...तिची नजर सतत इकडून तिकडे पळत होती….


 

" सर …. सर ….".... माही 

 

" काय ?"..... अर्जुन

 

" तिकडे ऑफिस मध्ये तर माझं काही काम नाही आहे….. मी इथेच…. तिकडे जाऊ..? ….."....माही बोलता बोलता आश्रमाच्या एका साईडला बोट दाखवत बोलली . 

 

ऑफिसकडे जाता जाता  माहीचे  लक्ष आश्रमाच्या बाजूला असलेल्या पटांगणाकडे गेले...तिथे काही मुली लगोरी खेळत होत्या...दहा बारा तेरा वर्षाच्या असाव्या त्या मुली….खेळण्यात दंग झाल्या होत्या….. ते बघून तिला तिचे बालपण आठवले ...ती पण गावात मैत्रिणींसोबत अशीच कौलारू  टिक्कर वैगरे काही जमवून लगोरी खेळायच्या….खूप मस्ती करायच्या…

 

" मिस्टर साई , मॅडमला त्या मुलींसोबत भेटता येईल काय? "..... अर्जुन

 

" सर , हे काय विचारने झाल ?…. ऑफकोर्स …."....साई 

 

" ओके , thank you ….. तुम्ही व्हा पुढे… मी येतो" ….. अर्जुन 

 

" Okay sir "...... साई बोलून तिथून ऑफिस कडे निघून गेला… 

 

" चल ….."..... अर्जून 

 

" तुम्ही….? …. तुम्ही जा … तुमचं काम करा ..मी जाते तिकडे, म्हणजे मी जाऊ शकते तिकडे एकटी.…"..... माही ….  " हे जर सोबत आले तर मला त्यांच्या सोबत खेळता नाही येणार…..आधीच लहान आहे म्हणून चिडवतात परत खेळताना दिसेल तर हैराण करून सोडतील..." माही मनातच विचार करत होती …

 

" I know, तू एकटी बरंच काही करू शकते … but I  want to come …let's go … ".... अर्जून 

 

दोघंही मुली खेळत होत्या तिथे आले….. त्या दोघांना बघून मुली खेळता खेळता थांबल्या….माहीला त्यांचा अवघडलेपण समजले….तिने हसत सगळ्यांसोबत ओळख करून घेतली….आता त्या मुली पण तिच्यासोबत फ्री झाल्या… गप्पा गोष्टी करू लागल्या…

 

" ताई , तुला वेळ असेल तर आमच्यासोबत खेळते काय….? खूप मजा येईल …."...एक मुलगी 

 

तो प्रश्न ऐकून माहीला आनंद तर खूप झाला होता …. पण अर्जून सोबत बघून तिला काय उत्तर देऊ होत होते…. ती एका नजरेने अर्जुनला तर कधी मुलींना बघत होती ….

 

" दादा , ताईला आमच्या सोबत खेळू द्या ना?…..".... दुसरी मुलगी .

 

" हो ना दादा , प्लीज …..प्लीज ….."....सगळ्या मुली घोळक्याने ओरडू लागल्या ..

 

"माहीला  ताई…? मला दादा….? हे असे कसे बोलू शकतात ?  " …अर्जुन त्यांच्यावर नजर रोखत मनात  बोलत होता..... अर्जूनला दादा ऐकून खूप जीवावर आले… थोडासा राग सुद्धा आला होता..,.. त्याच्या चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन बघून माहीला त्याच्या डोक्यात काय सुरू असेल याचा अंदाज येत होता…. त्याच्या चेहऱ्यावर इतके अजीब भाव होते की तिला आता त्याला तसे बघून हसू येत होते...पण तिने आपले हसू दाबून ठेवले होते.. 

 

" दादा …. प्लीज …. खेळू दे ना ताईला आमच्यासोबत ".... परत मुलींचा आवाज आला… आता तर तो पुरताच  वैतागला होता…

 

" Okay sssss……."......" And don't call me dada …".... अर्जुन 

 

"तू मोठा आहेस ना ,  तुला दादा नाही म्हणायचं  तर काय म्हणायचं दादा?"..... एक मुलगी 

 

" अंकल…?...काका ?"..... दुसरी मुलगी 

 

" What?? Uncle…..?... माही यांना सांगून ठेव , हे दादा अंकल वैगरे काही बोलायचं नाही ...नाही तर माझ्या सारखा वाईट नाही कोणी ". ...तो चिडतच तिथून निघून गेला… त्याला इतके चिडलेले बघून माही खळखळून हसायला लागली…. तिला तिचा आवडणारा चिडका अर्जुन बऱ्याच दिवसांनी दिसला होता.. 


 

अर्जुनला काही काम होते म्हणून तो तिथल्या  ऑफिसला निघून आला ...इकडे माही मुलींसोबत लगोरी खेळण्यात मग्न झाली … भान विसरून ती त्यांच्या सोबत खेळत होती. 


 

अर्जुनने सांगितलेले  सगळे कागदपत्र त्यांनी आधीच तयार करून ठेवले होते… अर्जुन ते पेपर वाचत बसला होता… साईला कोणाचातरी फोन आला , बोलायला म्हणून तो बाहेर निघून आला… मुलींच्या खेळण्याचा आवाज आला तसे अर्जुनचे लक्ष खिडकीतून बाहेर गेले...तर तिथून बाहेरचं सगळं दिसत होते … तो खिडकी जवळ येत तिथून बाहेर बघत उभा होता… 

 

माहीने कंबरेभोवती ओढणी गुंडाळून बांधली होती ..केसांची एक साधीशी वेणी पळतांना तिच्या सोबत कधी खांद्याच्या पुढे तर कधी मागे लयबद्धपणे जात होती.. पूर्ण खेळाडू भाव तिच्या चेहऱ्यावर होते...त्या मुलींमध्ये इतकी मिसळली होती की ती सुद्धा त्यांच्या तेवढीच लहान वाटत होती .. तिच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता … तिला असे आनंदी बघून अर्जुनला सुद्धा बरे वाटले … 

 

" जसा प्लॅन केला तसेच होत आहे …. पण हे दादा , अंकल??…. हे नव्हते प्लॅन मध्ये…."..... अर्जूनला मुली त्याला जे बोलल्या होत्या ते आठवले आणि परत डोक्यावर आठ्या पडल्या.... 

 

तेवढयात साई आतमध्ये आले…… त्यांना बघून अर्जुन आपल्या जागेवर येऊन बसला. .. बरेच मोठे पेपर  वर्क होते …. ते सगळं वाचून डिस्कस करून साइन करणे सुरू होते .. इकडे माही मुलींमध्ये छान रमली होती...खेळून झाले … छोटा ब्रेक झाला …. आता त्यांच्या खूप गप्पा गोष्टी सुरू होते. . 

 

अर्जुन काम आटोपून बाहेर आला …माही मुलींमध्ये मस्तच मिक्स झाली होती .. त्यांचे हसणे खिदळणे सुरू होते … ते बघून अर्जुनला पण तिची खूप गम्मत वाटली…. थोड्या वेळ पूर्वी रडणारी माही आता खळखळून हसत होती …. माहीची ही गोष्ट अर्जुनला खूप आवडत होती…. जिथे जाईल तिथे लगेच मिसळून जायचे …. घाव तर लागले होतेच तिच्या मनावर आणि शरीरावर...पण ती तिचे दुःख कुरवाळत नव्हती बसली….. स्वतः मुळे दुसऱ्याला त्रास होईल असे ती नव्हती वागत…हा आता  थोडी खचली होती पण अर्जुनला पूर्ण विश्वास होता ती लवकरच नेहमी सारखी होईल...त्याचीच तो वाट बघत होता…

 

" निघायचं ?"....अर्जुन त्यांच्या जवळ येत बोलला

 

" अं…. हो …"..... माहीने सगळ्यांना बाय केले

 

" बाय दादा…….".....सगळ्या मुली एकत्र ओरडल्या 

 

" परत दादा.? …….".....अर्जुनने नजर रोखत सगळ्यांकडे बघितले… त्याच्या चेहऱ्यावर परत खडूसवाले त्याचे फेवरेट भाव आले …. माही त्याच्याकडे बघत होती...की आता परत हे भडकतील की काय …  

 

" वहिनी बाय …… परत येशील ना….?"....मुली 

 

त्याने मुलींच्या तोंडून वहिनी शब्द ऐकले …. आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरील हावभाव एकदम बदलले... काहीसं लाजरं गोड हसू त्याच्या ओठांवर पसरले….

 

" वहिनी .…?"..... त्याने एक भूवयी उंचावत माही कडे बघितले . 

 

" हो ….. मग तुम्ही इथे सगळ्यांचा दादा झालात ना …..मग मला वहिनीच म्हणणार ना... ……."... माही ,

 

 अर्जुन प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता…. "अशी अचानक ही स्वतःला वहिनी म्हणवून घ्यायला तयारी कशी झाली ?"....त्याला हे सगळं खूप आवडले होते… त्याचासाठी हे मोठं सरप्राईज होते….पण तरीही हा अचानक झालेला बदल त्याचा पचनी पडत नव्हता… 

 

" कोणाला बाहेर काहीच कळणार नाही की मी यांची वहिनी आहे…."....माही डोळे मिचकावत बोलली … " तुम्ही या मुलींचे शिक्षणाची सगळी  जबाबदारी  स्वतः घेतली….त्यांचे भविष्य सुरक्षित केले …. एका मोठ्या भावाचे काम केले…... तर मग तुम्ही यांचे दादा झालात ना ….."...... माही , तो परत तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होता...

 

" आमचा खेळात ब्रेक झाला तेव्हा मी तिकडे पाणी प्यायला आले होते… तुमचं आणि त्या मॅनेजरचे बोलणे मी ऐकले होते….. म्हणून कळलं सगळं…..".....माही , अर्जुन विषयी गर्व वाटावा असे तिच्या चेहऱ्यावर भाव होते. 

 

" ह्मम…. थोड्या वेळ पूर्वीच मला कोणीतरी बोललं, प्रत्येकाला उडण्याचा अधिकार आहे …. बऱ्याच मुली हुशार आहेत तिथल्या … त्यांना योग्य मार्गदर्शन आणि थोडे मदतीची गरज आहे ….. तसे मला हे आयते देणे वैगरे आवडत नाही .. प्रत्येकानं मेहनत करून कमवावं असे माझे मत आहे … पण या तर लहान आहेत…"......अर्जुन 

 

" मला खूप आवडले …..".... माही , त्यावर अर्जुन हसला...हसतच त्याने मुलींना सुद्धा बाय केले .. 

 

" निघायचं ?"....अर्जुन 


 

" हो ….. भूक पण लागली आहे …..".... माही 

 

" Okay…. Let's go …..".... अर्जुन , तेवढयात अर्जुनला फोन आला … okay म्हणत त्याने ठेऊन दिला…. 

 

दोघेही पुढे येत अर्जुनने एका छोट्या घराजवळ कार थांबवली...ती एक छोटी खानावळ होती . 

 

" इथे ?".....माही

 

" जेवायला …...बघ आवडते काय …..".... अर्जुन …

 

" पण तुम्हाला नाही आवडत बाहेर जेवायला ….. आपण घरी गेलो असतो ….".... माही 

 

" घरच्यासारखे आहे ….. "....अर्जुन , अर्जुनने अंजली कडून  माहीला काय आवडते वगैरे सगळी माहिती घेतली होती …. म्हणून जेवायला तो तिला इथे घेऊन आला होता … दोघेही आत मध्ये गेले…. 

 

" या या साहेब …. या मॅडम ….."....एक बाई 

 

" तुम्ही ओळखता यांना ?".... माही अर्जुन कडे बघत बोलली 

 

" हो, साहेबांनी आधी फोन करून सगळं कळवले होते…... तुम्ही हातपाय धुवून घ्या मी वाढायला घेते..." ...ती बाई 

 

छान छोटेखानी रूम होती, त्याला लागूनच एक बैठकी जुन्या पद्धतीची किचन , शेणाने सारवलेली चूल, स्वच्छ पितळेचे भांडे रॅक मध्ये लावले होते…. त्या बाईंनी खाली पाट मांडले… बाजूला पाण्याची छोटी सुरई ( माठासारखी मातीची एक दोन तांबे पाणी मावेल येवढे छोटे उभट मडके …) ग्लास …. सगळं अगदी पद्धतशीरपणे  मांडले होते …. माही अर्जुन दोघंही फ्रेश होऊन जेवायला आले….

 

" तू….तुम्ही खाली बसणार …?"....माही खालची पंगत बसून डोळे मोठे करत अर्जुनकडे बघत होती…

 

 जेवढे आतापर्यंत तिने अर्जुनला ओळखले होते , त्याला बाहेर जेवायला आवडायचे नाही...त्यात खाली बसून….तिला सगळच आश्चर्य वाटत होते . तो किंचितसा  हसला आणि दोघेही पाटावर बसले.. एक आजी चुलीवर गरम गरम भाकरी करत होती… 

 

जेवण बघून माही खूप खुश झाली …. सगळं तिच्या आवडीचे होते … 

 

" पोरांनो , आरामात जेवा …. गरम गरम वाढती बरं का …. "...... आजी भाकऱ्या करत बोलली…  तिच्या आवाजात खूप माया होती , आपलेपणा जाणवत होता. माही तर जेवणावर तुटून पडली..सगळं आवडीचे बघून तिच्या तोंडाला आधीच पाणी सुटले होते…

 

" आज्जी …. खूपच चविष्ट आहे बरं काय जेवण….."....माही बोलता बोलता जेवत होती 

 

" पोरा , बायको चांगली तिखट दिसते…. "....आजी गमतीने बोलल्या...कारण जेवण चांगलच तिखट होते… मिरचीचा ठेचा….आणि माही ते चवीने खात होती . अर्जुन थोडा हसला ,त्याला हसताना बघून माहीने एक कटाक्ष त्याच्यावर टाकला…

 

" आज्जी दही साखर द्या ना  …..".... माही 

 

दुसऱ्या बाईने माहीला दही साखरेची वाटी आणून दिली ….

 

तिने जेव्हा अर्जूनकडे बघितले होते  तेव्हा त्याचे डोळे आणि नाकाचे टोक लाल झाले होते…. तेव्हाच तिच्या लक्षात आले होते अर्जुन साठी जेवण खूप तिखट आहे… आणि म्हणूनच तिने दहीसाखर मागितले होते.

 

" असं नाही हा आज्जी …. यांच्या निरागस , मासूम दिसणाऱ्या चेहऱ्यावर जाऊ नका बरं … हे लवंगी मिरची पेक्षा पण तिखट आहेत हा ….."....माहीने  एक भाकरीचा तुकडा तोडला... दहीसाखरेत बुडवला आणि अर्जुन पुढे खाऊ घालण्यासाठी धरला…

 

" मी तिखट ? ".....अर्जुन 

 

" मग?"..... हसता हसता अर्जुनकडे बघतीले आणि डोळ्यांनीच खा म्हणून खुणावले…. त्याने पण तिच्या हातून खाल्ले… 

 

" आता तिखट नाही वाटत आहे ना ?"....... माही हळूवारपणे बोलली ….. तो तिच्या प्रश्नावर गोड हसला आणि नकारार्थी मान हलवली 

 

" काय गरज होती इतक्या तिखट जेवणाची ऑर्डर द्यायला?"....माही एक एक घास त्याला भरवत बोलत होती ..

 

" तुला आवडते म्हणून …..".... अर्जुन 

 

" पण तुम्हाला त्रास होत होता ना ".... माही 

 

" दॅट्स फाईन …. एका दिवसाने काही फरक नाही पडत …..".....अर्जुन 

 

आजी दोघांना बघून गालात हसत होती…. 

 

" पोरा , बायकोची काळजी घे , पाणी नको येऊ देऊ तिच्या डोळ्यात….. खूप प्रेम आहे तिचं तुझ्यावर ……".... आजी 

 

अर्जुनने पण हसत होकारार्थी मान हलवली…

 दोघांनी जेवण आटोपले …..

 

" आज्जी , खूप छान झाले जेवण , एकदम आईची आठवण आली… आई पण अशीच बनवायची …..".... माही ओघाओघाने बोलून गेली . 

 

" पान खाशील ?"......आजी 

 

" हो हो …. असं जेवण झाल्यावर तर पाहिजेच ….".... माही 

 

आजीने मस्तपैकी गुलकंद , खोबऱ्याचा कीस वैगरे टाकून पान बनवून दोघांसमोर धरले…. माहीने लगेच एक पान उचलत तोंडात टाकला …. अर्जुनने नकार दिला… 

 

" अरे घे ….."....आजी 

 

" आजी ते नाही खात , आजकाल मुलांना  असणारे कोणतेच शौकपाणी नाही साहेबांना….फक्त खडूसपणाचा नाद आहे.  ..,."....म्हणत तिने दुसरा पण पान उचलत तोंडात कोंबला …. आता तिला नीट बोलता सुद्धा  येईना…. 

 

" बरं , आजी येतो …, "... माही

 

" जेवायला येत रहा रे पोरांनो ……".... माहीने मान हलवली आणि आजीचा निरोप घेतला… अर्जुन कार जवळ येऊन उभा होता … माही मात्र आपल्याच तालात इकडे तिकडे बघत , डोलत डोलत येत होती… आपल्या होश मध्ये नसल्यासारखी करत होती .. अर्जुन तिची खूप गंमत वाटत होती… त्याला तिला बघून बरे सुद्धा वाटत होते … त्याची बावळट तिच्या  "बावळट" रुपात परत आलेली होती… 

 

" चला ….. we are getting late ….".... अर्जुन 

 

" Sir  , झोप  येते आहे …मी काय म्हणते इथे झाडाखाली थोडे झोप घेऊन घेते "..... माही एका झाडाजवळ बसत बोलली 

 

" कार मध्ये झोपता येते "...... अर्जुन 

 

" Sir , मला चालता येईना…. पाय जड झालेत "......माही आळस देत बोलत होती …

 

 तिला आज अर्जूनसोबत खूप छान वाटत होते… दिवसभर त्याच्या सोबतच दिवस घालवावा असे वाटत होते …. आता जायचं म्हणजे ऑफिस नाही तर घर…. म्हणून ती तिथे काहीतरी टाईमपास करत वेळ घालवत होती...

 

"माही ssss , नाटक नाही….. चालता येत नसेल तर मी उचलून घेतोय "......म्हणत तो तिच्याजवळ आला आणि तिला उचलायला गेला..

 

" नाही ….. नाही ….."....म्हणत पळतच ती कार मध्ये जाऊन बसली. अर्जुन पण आपल्या सीटवर येऊन बसला आणि कार सुरू केली.

 

माही खिडकीतून बाहेर बघत होती… 

 

" झोप आता ….".... अर्जुन

 

" झोप नाही येत आहे ….".... माही

 

" आता तर येत होती….."....अर्जुन 

 

" तेव्हा येत होती…. झोप मोड केली तुम्ही …."....माही ……" तुम्ही सोबत असताना झोपणे… wrong deal आहे … ".... माही मनातच विचार करत त्याच्या कडे बघत होती.. 

 

" What ….?".... माही एकटक त्याला बघत आहे बघून अर्जुन बोलला. 

 

" ते त्या  …. त्या आजींना कसे माहिती आपण नवरा बायको आहे ते ?".....माही 

 

" तर तू मान्य केले तर आपण नवरा बायको आहे ते ?"..... अर्जुन 

 

" हा ….? … असे काही नाही….तुम्ही गोष्ट फिरवू नका...मी जे विचारते ते सांगा आधी …."... माही 

 

" तू कशी वागत होती …. तुझ्या वागण्यातून … तुझ्या नजरेतून कळत होते ते ….. त्या आजी किती अनुभवी ...त्यांना एका नजरेत कळते….."..... अर्जुन तिची मस्करी करत होता 

 

" माझ्या नजरेतून??  माझ्या डोळ्यात कसे काय ….?? ….. पण काय करू , आज यांच्यावरून नजर हटत नाहीये …. किती गोड दिसत आहेत…असं वाटते आहे ..यांचे गाल ओढावे ….. तिखट खाताना किती लाल झाले होते …. आणि ते नाक…. आधी राग पेलत नाही … किती लाल झाले होते…. ".... माही मनात विचार करत होती.. 

 

" आता परत काय झाले? अशी हँग का होते आहे ?"..... अर्जुन कार चालवत बोलत होता

 

" काही नाही जेवण जास्ती झाले…..ते …तुमच्या कार मध्ये गाणे नाही लागत काय?."..... माही 

 

अर्जुनने साँग सुरू केले … एक इंग्लिश गाणं सुरू होते . 

 

" हे आणि यांचे इंग्लिश मिडीयम ….. त्यापेक्षा तर शांतता बरी होती….."....माही मनातच बडबड करत होती. 

 

……..

 

इकडे.,.

 

" किती वेळ लागला तुम्हाला यायला ….. ? काय फोटो पाठवला त्यात ती मुलगी नीट दिसत सुद्धा नाही आहे ….. आणि हे काय ,तुम्हाला लागलं कसे? पडले की काय?".....

 

" काय , तुझ्या चक्कर मध्ये मार खावा लागला ….."सुनील 

 

" मोबाईल पण फोडलेत त्यांनी "... सुजय 

 

" कोणी ? … काही कळेल असे सांगाल काय ?"....देवेश 

 

" आम्ही त्या अनाथ आश्रम समोर उभे होतो , त्या मुलीचा फोटो पण घेतला… पण तेवढयात  आम्हाला दोन हट्टेकट्टे माणसं आमच्याकडे येताना दिसले…. आम्ही फोनवर बोलायचं नाटक करत गाडीवर बसलो आणि निघालो …. त्यांनी आमचा पिच्छा केला...आणि आम्हाला पकडले…. खूप बदडले… आमचे फोन पण घेऊन फोडून टाकले .. ते तर तो एक फोटो तुला आधी पाठवला म्हणून तेवढा आला तरी … ".... सुनील 

 

" हो, आणि warning पण दिलीये परत दिसलो किंवा एक जरी फोटो बाहेर आला तर आयुष्यातून उठवतील ….".....सुजय 

 

" अर्जुन पटवर्धन sss………".... देवेश 

 

" काय?".....सुजय

 

" अर्जुन पटवर्धन ची माणसं होती ती…. ".... देवेश …… " don't worry Arjun , ती मुलगी कोण आहे मी शोधून काढेलच …… ".... देवेश

 

" हा फोटो मीडिया मध्ये दिला….तरी खूप पैसे मिळतील….न्यूज तर बनेलच "......सुनील 

 

" पण ते ….त्यांना भनक जरी लागली ना येतील परत मारायला …" ...सुजय 

 

" नाही …. माझा याहूनही मोठा प्लॅन आहे …."...देवेश काही विचार करत होता...

 

…….

 

अर्जुन तसा  फेमस होता … त्याला माही सोबत बाहेर दिवस तर घालवायचा होता… पण शहरात नव्हता घालवू शकत.. सतत कोणी ना कोणी नजर ठेऊन असायचे … म्हणून त्याने शहराच्या outside प्लॅन केला होता … ज्यामुळे इकडे त्याला मनसोक्त फिरता येणार होते … 

 

" स्टॉप….स्टॉप ….स्टॉप……"... माही ... कार थांबली तशी माहीने दार उघडत नाहीत उडी घेतली ...एका गावाच्या बाहेर मोठा मेळा लागला होता… तिला तर ते बघून काय करू काय नको असे झाले होते …..

 

" Sir….. जाऊया…? प्लीज….प्लीज…..….".... माही विनवणीचा सुर काढत होती… 

 

" ह्मम ……".... अर्जुन 

 

" ये ssss … तुम्ही खूप छान आहात…."....तिने त्याचा हात पकडला आणि ती त्याला मेळा लागला होता तिकडे ओढत ओढत नेत होती… 

 

" मला कळत नाही आहे मी हिला बाहेर घेऊन आलोय की ही मला ?".....अर्जुन तिचा उत्साह बघून मनात बोलत होता… 

 

माही आपल्या लहानपणीच्या आठवणी सांगत , बडबड करत होती…. तो फक्त ह्मम ह्मम करत होता… 

 

छोटी छोटी दुकानं , खेळ , आकाश पाळणे , खाऊ गल्ली …. असे सगळे तिथे होते...ये सगळ बघून माहीचे तर डोळे दिपून गेले होते .. ती प्रत्येक दुकानात जात होती .. तिथल्या वस्तू हातात घेऊन बघत होती….. पण हिरमुसून वस्तू ठेऊन दिली 

 

" काय झालं?".... अर्जुन 

 

" पैसे नाही आणले….."... माही 

 

" माझ्या जवळ आहेत.,....".... अर्जुन

 

" इथे तुमचे ते कार्ड नसते चालत "..... माही 

 

" माझ्या जवळ पैसे पण आहेत ….तुला जे हवे ते घे…..."...अर्जुन 

 

अर्जुनने आधीच हा सगळा प्लॅन केला होता … त्यामुळे आधीच त्याने कॅश आपल्यासोबत ठेवली होती ..  


 

" खरंच ?"..... माही 

 

" हो …".... अर्जून 

 

माही मनसोक्त शॉपिंग करत होती .. मिरा साठी खेळणे… ओढण्या….बांगड्या...असे बरेच काही घेत होती ….. फार फार तर ५० , १०० , २०० रुपयांच्या वस्तू होत्या त्या … पण तिच्या चेहऱ्यावरचा आनंद असा होता जसा काही करोडोची शॉपिंग केली होती… अर्जुन आजूबाजूचे न्याहाळत होता … मोठमोठ्या मॉल मध्ये गेल्यावर सुद्धा लोकं इतकी खुश नाही दिसत जितकी तिथली लोकं दिसत होती ..

आनंद , खुशी , ओठांवरील हसू पैश्याने विकत घेता येत नाही …. हे कुठे तरी त्या सगळ्यांना बघून तो convince होत होता ..

 

दुपारचं बरच उन झाले होते … अर्जुनला बाहेर असे उन्हामध्ये फिरायची सवय नव्हती…. बहुतेक वेळ तो AC मध्ये असायचा…. त्यामुळे आता तर अक्षरशः त्याला घामाच्या धारा लागल्या होत्या…. तो सतत अधून मधून पानी पित होता… माहीच्या सुद्धा ये लक्षात आले…तिने त्याला हाताला धरून एका झाडाखाली आणले …. एका पेपरचा  पंखा बनवत त्याला हवा घालत होती …. तो प्रेमाने तिला बघत होता … 

 

" काय ?"..... माही हवा घालत 

 

" Nothing ……".....त्याने मान हलवली

 

" गर्मी होते आहे ना ?".... माही

 

" नाही ….. ऑसम वाटते आहे….. AC सुद्धा फिका पडला "..... अर्जुन तिच्या डोळ्यात हरवला होता .

 

" तुम्ही पागल झालात ना? ……" ... माही 

 

" हो…….. ".... अर्जुन 

 

" Sir…."... माही थोडी ओरडत बोलली तसा तो भानावर आला.. 

 

" Sir , तुम्हाला डॉक्टरची गरज आहे….. तुम्हाला दिवसा तारे दिसत आहेत….".... माही


 

" दिवसा चंद्र दिसेल  तर तारे असणारच " …. अर्जुन 

 

" Sir ….. तुम्ही बोर करत आहात…मुळात हे शब्द आणि तुम्ही एकमेकांना मॅच नाही करत आहात…..तुम्ही कार्टून वाटत आहात……".... माही आपलं हसू दाबत बोलत होती… 

 

" Huh ... संगतीचा असर ….. म्हणून मोठे लोकं नेहमी सांगतात संगत चांगली हवी……"... अर्जुन कार कडे चालू लागला...

 

" What do you mean ? "..... माही त्याच्या मागेमागे जात बडबड करत होती …. अन् त्याला तिची खूपच मजा येत होती. कार मध्ये येऊन बसले तरी तिचं आपलं तेच सुरू होते …. आणि तो आणखी आणखी तिला चिडवत होतं.. 


 

आता संध्याकाळ होत आली होती…..सूर्य मावळतीला लागला होता… त्याने गाडी जंगलाच्या दिशेने घेतली … 

 

" इथे ….?"..... माही 

 

" ह्मम …. ये …. महत्वाचं बोलायचं आहे तुझ्यासोबत …..".... अर्जुन 

 

" काय? "....... माही 

 

" आहे काहीतरी …. चल……".... अर्जुन 

 

*******

 

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️