Jan 27, 2022
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 63

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 63

भाग 63

 

दुसऱ्या दिवशी अर्जुनने माहीला ऑफिसला येण्यासाठी तयार केले... तिने आधी थोडे आढेवेढे घेतले पण त्याने समजावून सांगितल्यावर ती तयार झाली ... अर्जुन सोबतच ती ऑफिसला जायला निघाली...

 

" हे काय .... आपण इथे का आलो ??.. आपण तर ऑफिसला जातोय ना ?"..... माही

 

" तुला माझ्यासोबत वेळ घालवायला नाही आवडणार काय ?".....अर्जुन

 

" तसं नाही , पण काम? , तुमच्या मीटिंग.....?."... माही

 

" आज सगळं कॅन्सल केले आहे .... आज फक्त तू आणि मी ....."....अर्जुन हसत बोलला...... माही तर शॉक होत त्याच्याकडे बघत होती...

 

" ठीक आहे .... तुला नसेल आवडले तर ओके.... पण मला मिसेस अर्जुन सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा  आहे ....".....अर्जुन मस्करीच्या सुरात बोलला ... ते ऐकून तिचे नाक तोंड वरती झाले...ती अजब नजरेने त्याला बघत होती....पण ती  गालात हसत  आहे असे त्याला तिला बघून जाणवत होते....... तिचा तो क्यूट फेस बघून त्याला ही हसू आले.... आज पाच सहा दिवसानंतर माहीला असे फ्रेश बघून त्याला सुद्धा रिलॅक्स वाटत होते ....

 

" इथे .....? आपण .....".... माही आजूबाजूला बघून बोलली.

 

" ह्मम .... आज फक्त तू आणि मी "..... अर्जून कार पार्क करून खाली उतरत बोलला.

 

" पण .... ?"..... माही ... आणि मग तिचे त्याच्या कपड्यांकडे लक्ष गेले, त्याने अगदी साधे कपडे घातले होते ,  ऑल टाइम त्याचा फेवरेट रंग व्हाइट प्युर कॉटन कॅज्यूआल शर्ट , आणि लाईट ब्ल्यू कॉटन जीन्स घातली होती, पायात स्पोर्ट शूज , हातात घड्याळ आणि डोळ्यांवर ब्लॅक गॉगल , केस तिला आवडतात तसे थोडेसे समोर आलेले अस्ताव्यस्त झालेले, तसेही त्याचे केस सिल्की , जेल लावल्याशिवाय कधीच जागेवर राहत नव्हते...आज त्याने अगदी तिच्या आवडीचे साधं लूक कॅरी केले होते, त्यातही तो भयंकर हँडसम दिसत होता..........

 

" म्हणजे यांचं आधीपासूनच प्लॅनिंग होते तर "....माही त्याला बघून मनातच विचार करत होती

 

" माही , आजकाल तुझ्या डोक्याला बरेच प्रश्न पडतात....."...त्याने तिच्या साईडचा दरवाजा ओपन केला..

 

" पण सर , इथे ....? तुम्हाला नाही आवडत ".... माही

 

अर्जूनने तिला तिच्या आवडत्या बाप्पाच्या मंदिरात आणले होते... तसे शहरात तर होते मंदिर....सगळे मंदिर, सगळे बाप्पा  सारखेच ...पण हे खूप सुंदर कोरीव होते, थोडे गावाच्या बाहेर , मोकळ्या ठिकाणी , खूप रम्य वातावरणात होते.... काही दिवसांपासून माही खूप त्रासात होती... दुःखी होती..... तिचं मन दुसरीकडे वळवावे , तिच्या आवडीचे काही केले तर तिच्या डोक्यात सुरू असणाऱ्या गोष्टी काही काळासाठी तरी थांबतील.... तिला झालेल्या गोष्टींतून बाहेर काढावं .... पुढे घडणाऱ्या गोष्टींसाठी तयार करावं........घरी सगळे असल्यामुळे हवा तसा वेळ त्याला तिच्यासोबत मिळत नव्हता.....हा सगळा विचार करून त्याने तिला बाहेर आणले होते....

 

" तुला आवडते , येवढं sufficient आहे ....".... अर्जून

 

माहीला पण ती जागा आवडली होती...तिला तिथे खूप प्रसन्न वाटत होते ... माही दर्शन घेण्यासाठी आतमध्ये गेली.... अर्जून मात्र बाहेरच पायाऱ्यांजवळ थांबला..

 

" Sir ......."... ती पुढे काही बोलायच्या आत तो आतमध्ये तिच्या शेजारी येऊन उभा राहिला..

 

" तुम्ही ......."....

 

" माझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाही.... but I trust you..... ".... अर्जून

 

अर्जूनचं बोलणं ऐकून तिच्या ओठांवर हसू उमलले..... तिने भक्तिभावाने बाप्पा समोर हात जोडले... तो मात्र कधी बाप्पांच्या मूर्तीकडे तर कधी माहीच्या  प्रसन्न निरागस चेहऱ्याकडे बघत होता......आणि त्याला गंमत सुद्धा वाटत होती.... ज्या देवावर तिचा इतका विश्वास आहे त्यानेच तिचं रक्षण नाही केले.....तरी सुद्धा त्याच्या दारात तिचं चित्त शांत वाटत होते...

 

" बाप्पा, तुझे खूप खूप आभार , आयुष्यात खूप काही  वाईट घडले पण प्रत्येकवेळी समोर आलेल्या परिस्थिती सोबत लढण्यासाठी तू शक्ती दिली.... अर्जुन सरांच्या रुपात तू वेळोवेळी मदतीला धाऊन आलास......एक गोष्ट देशील मला ..... अर्जुन सरांना खूप खूप आनंदी ठेव "...... माही हात जोडून, डोळे मिटून मनोमन बाप्पांसोबत बोलत होती....

 

मनोभावे प्रार्थना करून तिने डोळे उघडले तर अर्जुन तिलाच बघत होता...

 

" काय ? "..... माही

 

" काय......काय?"..... अर्जुन

 

" काय बघत आहात..,?? ".... माही

 

" झाल्या लवकरच त्यांच्यासोबत गप्पा करून...?".... अर्जुन

 

ते ऐकून तिला हसू आले...

 

" तुम्हाला कसे कळले मी गप्पा करते आहे?".... माही

 

" तुझं फेवरेट काम आहे  ते.... बडबड करणे ....".... अर्जून मस्करी करत बोलला

 

" Sir sss ....... "..... तिचे डोळे चमकले आणि ती लटक्या रागाने त्याच्याकडे बघत होती ...

 

" Okay..... पण जे बोलत नाही त्यांच्यासोबत इतक्या गप्पा मारायच्या , आणि इकडे आमचे कान दोन गोड शब्द ऐकायला आसुसले आहे....this is not fare.......".... अर्जुन

 

त्याच्या गप्पा ऐकून ती मात्र आता खळखळून हसायला लागली .... हा असा अजब गजब बोलणारा अर्जून ती पहिल्यांदा अनुभवत होती..

 

प्रसाद घेऊन दोघंही मंदिराबाहेर पडले...आजूबाजूचा थोडा परिसर फिरून परत कारमध्ये येऊन बसले..... आणि कार वेगाने पुढे जायला निघाली..

 

" सर.... सर ..... थांबवा .....".... माही खिडकीतून बाहेर बघत ओरडली.....काय झाले म्हणून त्याने करकचून ब्रेक दाबला.....

 

" Everything is okay?  What happened ?"..... अर्जून

 

" हा .... सगळं ठीक आहे "....म्हणत तिने खिडकीतून बाहेर इशारा केला....बाहेर रस्त्याच्या एका कडेला एका मोठ्या वृक्षाखाली एक पक्षी विकणारा बसला होता..... माही उतरून त्याच्याजवळ गेली , तिथे रंगीबेरंगी पक्षी, पोपट एक एक पिंजऱ्यात होते.....

 

" मॅडम , कोणता पक्षी दाखऊ ? हा पोपट खूप छान बोलतो , कोणतेही प्रश्न विचारा...सगळी उत्तरं देतो... येणाऱ्या जाणाऱ्यांचे स्वागत सुद्धा करतो .."...... पक्षी विकणारा बोलतच होता की माहीने एक पिंजरा हातात घेतला.....आणि हळूच त्याचा दरवाजा उघडला.....जसा दरवाजा उघडला त्यातला पक्षी भरभर करत आकाशात उंच उडाला....त्याला उडतांना बघून तिच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक आनंद पसरला...... अर्जून कारला टेकून उभा तिला बघत होता......

 

आता माहीचे लक्ष दुसऱ्या पक्षाकडे गेले...... ती तो पिंजरा उचलणार तेवढयात पक्षी विकणारा ओरडला....

 

" ओ sss ... ओss ..... मॅडम .... आमच्या पोटावर लात नका मारू.... आमच्या पोटापाण्याचा सवाल आहे....."...ओरडत तो तिच्या जवळ जाणारच होता की त्याच्या डोळ्यांसमोर  पाचशेच्या नोटांचे बंडल आले..... त्याने बघितले तर अर्जुनने ते  त्याच्या पुढे धरले होते, मात्र तो बघत माहीकडेच होता....

 

बंडल पकडत अर्जुनने इशाऱ्यानेच त्याला माहीला डिस्टर्ब नको करू, आणि  जा म्हणून खुणावले.....तसे त्या पक्षी विक्याने ते पैसे घेतले आणि तो चुपचाप  तिथून निघून गेला...

 

आता माही एक एक करत पिंजऱ्यातील सगळे पक्षी उडवत होती...... अर्जूनला नुकताच जडलेला त्याचा नवीन छंद फोटोग्राफीचा त्यात पण फक्त माहीचेच फोटो काढण्याचा  ... त्याने आपला मोबाईल घेतला आणि माहीचे फोटो क्लिक करायला लागला......त्या पक्षांना उडतांना बघून माहीच्या चेहऱ्यावर इतका आनंद होता की जसे काही तिला तिच्या लाईफमध्ये सगळं मिळालं असावे ..... जगाचं, आजूबाजूचे सगळे भान विसरून ती अक्षरशः आनंदाने उड्या मारत होती......आनंदातच  ती अर्जुन जवळ आली....

 

" किती मस्त वाटते आहे ना ...... एकदम मोकळं.... फ्री ..... कुठल्याच गोष्टींचं ओझं नाही........"....माही

 

" Happy ?"..... अर्जुन

 

" हो ... खूप ...किती आनंदी आहेत ते.... किती मस्त आवाज येतोय त्यांचा......"....माही

" ह्मम ..... आवाजातूनच कळत आहे आनंद......"..... अर्जुन ... माही पक्ष्यांना बघून त्यांच्या बद्दल बोलत होती तर तो माहीला बघत होता....

" आमच्या गावी शेतीमध्ये आम्ही जात होतो..... तिथे खूप रंगीबेरंगी फुलफाखरू असायचे....त्यांचा एकमेकांना पकडण्याचा खेळ चालयाचा,  या फुलांवरून त्या फुलावर बागडत असायचे .. .....मला खूप आवडत होतं त्यांना बघायला.... मी तासंतास त्यांना बघत बसायचे....खूप छान होतं बालपण..."...माही स्वप्नवत बोलत होती ...

" ह्मम.......".... अर्जून

 

" आपण किती स्वार्थी असतो ना , आपल्या थोड्या वेळच्या एन्जोयमेंटसाठी, ते आपल्या जवळ राहावे म्हणून आपण त्यांना अपंग करतो... आपण त्यांचे पंख छाटतो...त्यांना पिंजऱ्यात बंद करून जे त्यांचे जग नाही तिथे घेऊन जातो....किती मोठी क्रूरता आहे ही...... ती बिचारी असहाय , चिमुकली , आपल्याकडे पॉवर आहे म्हणून आपण अशी क्रूरता करावी..? ..... त्यांचा जगण्याचा , उडण्याचा हक्क आपण हिरावून नाही घेऊ शकत ......सगळ्यांना का कळत नाही हे ?? का ते दुसऱ्याचं आयुष्य बरबाद करतात?..."...... बोलता बोलता माहीचा आवाज जड झाला ... आतापर्यंत इतकी आनंदात असलेली माही क्षणार्धात तिच्या डोळ्यांत आसवांनी जागा घेतली... तिच्या बोलण्याचा एक एक शब्दाचा अर्थ अर्जूनला कळत होता....तिच्या डोळ्यांतले अश्रू बघून त्याला आजूबाजूचा विसर पडला...आणि एक क्षणाचाही विलंब करता तिला आपल्या कुशीत घेतले.....

 

" माही , हे जग तुझ्यासारखे इनोसंट नाही आहे .... इथे प्रत्येकालाच आपल्या हक्कासाठी फाईट करावच लागते.... जो लढायाचा थांबला.... तो संपला....."... अर्जून तिला आपल्या कुशीत घट्ट पकडत तिला प्रेमाने समजावत होता... ती मात्र मुसमुसत त्याच्या छातीवर आपलं डोकं घासत होती ...

 

" दुनियेची हीच टेंडेन्सी आहे माही , कमजोरांनाच आधी  टार्गेट केले जाते... प्रत्येक पाखराला उडण्यासाठी अशी माही नाही येणार मदत करण्याकरिता..... आपल्याला खूप स्ट्राँग , तुला खूप स्ट्राँग बनावे लागेल..... are you getting what I am saying?? ... We need to fight back ...... माही जिंकायचं असेल तर लढावेच लागेल..... असे रडत बसून फार फार तर सिंपथी मिळेल ...बाकी काही नाही .....".... अर्जून

 

माहीला त्याचा एक एक शब्द कळत होता आणि पटत सुद्धा होता..... माहिने त्याच्या मिठीतच होकारार्थी मान हलवली....आणि आपले डोळे पुसत त्याच्या मिठीतुन दूर झाली....

 

" Good ... निघायचं ?? ... आज आपल्याला भरपूर पागलपंती करायची आहे ..... "..... अर्जून

 

" पागलपंती ? .....".... माही

 

" मग ....तुझ्यासोबत दुसरं काय असते ...?"..... अर्जून

 

" म्हणजे मी पागल आहे ....?".... माही

 

" नाही ..... मी ..... The great माही सोबत outing ला निघालोय ..... " ..... अर्जून

 

" सर ssss....??...".....

 

" Okay..... "... म्हणत त्याने कारचे दार उघडले... माही आतमध्ये बसली..... त्याने डोळ्यांवर गॉगल चढवला आणि पलीकडून येऊन बसत कार सुरू केली....

 

" तू त्यांचे फोटो का क्लिक केले..?"....एक

 

" तो अर्जुन पटवर्धन होता......"...दुसरा

 

" Ya , I know that ...... But why did you click the photos?  "..... पहिला

 

" काय मजा असते या श्रीमंत मुलांची..... आताच त्याचं लग्न मोडले , आणि लगेच नवीन मुलगी पण पटवली...."....दुसरा

 

" त्याला मुली पटवायची काय गरज , मुलीच स्वतःहून पटायला तयार असतात त्याच्यासाठी .... मला वाटते ती त्याची गर्लफ्रेंड होती....".....पहिला

 

" I don't think so .... तिचे कपडे बघितले ?.... किती डाऊन मार्केट होते.....जेवढे मला त्याच्याबद्दल माहिती आहे ,  त्याला तश्या मुली नाही आवडत.......आणि मुळातच त्याला मुली आणि गर्लफ्रेंड वैगरेमध्ये इंटरेस्ट नाही....."....दुसरा

 

" Then I am damn sure.... She is his  girlfriend .... असं भर रस्त्यात कोण असे जवळ घेतं ? या लोकांना आपले स्टेटस पण खूप महत्वाचं असते... मीडिया तर सतत नजर ठेऊनच असते, सो तो असा कोणालाही  पब्लिकली जवळ घेण्याची रिस्क  घेणार नाही.... I think ती रडत होती  " .... पहिला

 

" ह्मम .... इंटरेस्टिंग  .... पण तिचा चेहरा नाही दिसला..... माहिती काढावी लागेल....खूप कामात येईल.....खूप पैसे मिळतील......त्यांच्या मागे घे गाडी "....दुसरा

 

अर्जुनने माहीला आपल्या मिठीत घेतले तेव्हा हे दोघं रस्त्याने जातांना अर्जुनला बघून रस्त्याचा पलीकडल्या साइडला थांबले....त्यातल्या एकाने लगेच पटापट मोबाईलमध्ये त्या दोघांचे फोटो क्लिक  केले होते  ...पण माहीची त्यांच्याकडे पाठ असल्यामुळे  तिचा चेहरा त्यांना दिसला नव्हता.....पण अर्जुन मात्र क्लिअर दिसत होता ...

 

तिथून माही आणि अर्जुन , तिथेच जवळ असलेल्या एका मुलींच्या अनाथ आश्रमात आले .... ती दोघं सुद्धा पाठलाग करत तिथे पोहचले....आणि बाहेरच एका चहा टपरी जवळ उभे अर्जुन माहीची वाट बघत होते ..पण बराच वेळ झाला तरी अर्जूनमाही बाहेर आले नव्हते..

 

" चल आतमध्ये जाऊ...."....पहिला

 

" नाही , नको ..... त्याने मला ओळखले तर खूप गडबड होईल.....इथेच थांबू "....दुसरा

 

तेवढयात त्याचा फोन वाजला... खूप महत्वाचं काम असल्यामुळे त्या दोघांना तिथून जावे लागले...

 

******

 

क्रमशः
 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️