Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 62

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 62

( कथा आतापर्यंत : माही अर्जुनाच्या ऑफिसमध्ये काम करत असते .... दोघांचं अजिबात पटत नाही...सतत काही ना काही कारणानंवरून दोघांमध्ये भांडण होत राहतं. अर्जुन स्त्ट्रीक्ट, चुका केलेल्या  त्याला चालत नाही ... पण त्याचच त्याला कळत नसते तो माहीच्या बाबतीत नरम का पडतो... आणि त्याचा लक्षात येते की त्याला माही आवडायला लागली आहे ... तो तिला लग्न बद्दल विचारतो , पण माहीच्या असलेल्या भूतकाळमुळे ती त्याला लग्नासाठी नकार देते.... अर्जुनचे लग्न सोनिया सोबत आणि अर्जूनचा भाऊ आकाश याचे लग्न माहीच्या मोठ्या बहिणीसोबत ठरते... या काळातच माही सुद्धा अर्जूनवर प्रेम करायला लागते ... पण आपण त्याच्यासाठी योग्य नाही आणि आपल्यामुळे आपल्या ताईचे लग्न नको मोडायला म्हणून ती अर्जुनला नकार देते.... आकाशचे लग्न व्यवस्थित पार पडते..... आणि ऐन वेळी सोनिया लग्नाला नकार देते.... सोनियाच्या लक्षात आले असते अर्जुनचे माहीवर प्रेम आहे..... काही व्ययक्तिक कारणं पुढे करून लग्न मोडते .... पुढे माही परत भावनिक लेव्हलवर ब्लॅकमेल करून अर्जुनला दुसऱ्या मुलीसोबत लग्न करायला लावेल किंवा अजून काही तिचे अतरंगी डोक्यात येऊ शकते .....तो सिक्रेटली माहीला न सांगता कोर्ट marriage करून घेतो....जेव्हा माहीला हे कळते ती त्याच्यावर खूप नाराज होते ... अर्जुन पण तिला आश्वासन देतो जोपर्यंत ती लग्नासाठी होकार देणार नाही तोपर्यंत तो त्यांचं लग्न पब्लिकली कोणाला सांगणार नाही .. श्रियाचे लग्न देवेश सोबत ठरते... जेव्हा माही त्याला बघते तेव्हा तिला तिच्यासोबत घडलेले सगळे आठवते आणि तो मुलगा देवेश आहे हे अर्जूनला कळते...) आता पुढे.......

भाग 62

अर्जून सगळ्यांसमोर श्रियाच्या लग्नासाठी विरोध करतो....पण श्रिया काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती ....यावरून अर्जुन आणि श्रियामध्ये थोडा वाद होतो...ते बघून घरातील बाकीच्यांना पण थोडी काळजी वाटते... माही वरतून हे  सगळं बघत होती ....आशुतोष अर्जुन आणि श्रिया यांच्यामध्ये पडतो आणि प्रकरण आटोपते घेतले ....अर्जुन चीडतच त्याच्या रूममध्ये निघून आला ... श्रिया सुद्धा तिच्या रूममध्ये निघून येते. 
 

अर्जुन नुकताच ऑफिस मधून आला होता..त्यात श्रियासोबत वाद झाला ती काहीच समजून घ्यायला तयार नव्हती....अर्जुन  वरती आला, रूममध्ये जात हातातील बॅग बेड वर भिरकावली , आणि  तो काऊचला टेकून डोक्यावर हात ठेवत डोळे बंद करून बसला होता.  त्याच्या पाठोपाठ माही त्याचा रूममध्ये आली. अर्जुनकडे बघितले तर तो खूप थकला वाटत होता. तिने दार बंद केले नी त्याच्या जवळ गेली.

" अर्जुन, दमलात?" .....माही त्याच्या जवळ बसत  बोलली.

" हम्म......" तो तिचा हाथ पकडत, तिच्या मांडीवर डोकं ठेवत बोलला. ती त्याच्या केसंमधून हात फिरवत होती

" घरातले प्रॉब्लेम्स सोडवणे किती कठीण असतात...." ....अर्जुन

" ह्मम......कारण इथे प्रत्येकाच्या भावना जपायचा असतात......" माही

"  कम्पलिकॅटेड .....करून ठेवतात"....अर्जुन

त्याने आपली कूस बदलली, माहीच्या  कंबरेमध्ये हाथ घालत तिला पकडत झोपी गेला. अगदी एखाद्या लहान मुलासारखा तो तिला वाटत होता...... माही त्याच्या लोभस चेहऱ्याकडे बघत कुरवाळत शांत बसली होती.

माही त्याच्याकडे बघत  अर्जुन इतका स्ट्रेस का आहे याचा विचार करत होती....

त्याला झोपलेले बघून तिने त्याचं  डोकं खाली ठेवत डोक्याखाली उशी ठेवली..... त्याच्या अंगावर पांघरून टाकले....

" माझ्यामुळे खूप त्रास होतो आहे ना तुम्हाला...त्यात श्रिया सोबत पण हे काहीतरी झाले आहे, पण मला विश्वास आहे तुम्ही काहीतरी विचार करूनच बोलत होता.... मी आता नाही देणार तुम्हाला त्रास ...." .... त्याच्याजवळ येत त्याच्या कपळवर किस केले.....नी आपल्या रूममध्ये निघून आली.

इकडे खाली हॉलमध्ये सगळे बसले होते...सगळेच आपापल्या परीने अर्जुन लग्नासाठी का नकार देत आहे याचा विचार करत होते ..... आशुतोषला तर याची काळजी वाटत होती की अर्जुन रागाच्या भरात भलतंच काही करून बसायला नको... अर्जूनचा स्वभाव त्याला माहिती होता एकदा जर तो कोणावर चिडला , कोणी  त्याचा फामिलीच्या वाकड्यात शिरला तर तो त्याला बरबाद करून सोडत होता ..पण हे प्रकरण खूप काळजीपूर्वक हाताळने गरजेचे होते .. त्यामुळे श्रियाला सुद्धा समजावणे आशुतोषला गरजेचे वाटले आणि तो तिच्या रूममध्ये जाऊन तिला शांत करत काही गोष्टी समावून सांगितल्या... ती पण भयंकर चिडली होती... अर्जुनवर तिचा राग दिसून येत होता.... पण आशुतोषने तिला कसेबसे समजावून शांत केले .

अर्जुन रात्री आठ वाजता उठला .......तो कधी असा भलत्या वेळेला झोपत नसे...पण आज त्याला खूप थकवा जाणवला होता.....एक दीड तासाची शांत झोप झाली होती... त्यामुळे त्याची चिडचिड आता थोडी कमी झाली होती...त्याने अपाला लॅपटॉप उघडला आणि त्यात काहीतरी करत होता ..

" अर्जून, तुझं हे काय सुरू आहे? .... ".....आशुतोष त्याच्या रूममध्ये आला...

" आशुतोष..... "......अर्जुन उठून उभा राहिला..

" अर्जुन हे प्रकरण इतकं इझी नाही आहे.... येवढे अग्रेसिव होऊन नाही चालणार ... खाली तू काय करत होता?.... तुला आधी पण सांगितले आहे विदाउट प्रूफ कोणीही आपलं म्हणणं समजून घेणार नाही आहे....घरातले जरी मान्य करतील तरी श्रिया नाही... आणि हे जे काही खाली सांगायला जात होता...ते सगळं ऐकून घरातील लोकं माहीला सुद्धा चुकीचे ठरावतील.... तुझे आणि माहीचे नाते तू  आणखी कठीण करून ठेवशील....."......आशुतोष समजावनीच्या सुरात बोलत होता..

" आशुतोष मला श्रियाची काळजी आहे..... तो व्यक्ती काहीपण करू शकतो..."...... अर्जून

" मला कळते आहे तुझी काळजी .... मला पण हेच वाटत होते... तू नको काळजी करू मी आधीच श्रियाच्या मागे दोन सिक्रेट बोदडीगार्ड्स ठेवले आहेत..... आणि अनन्याकडून त्या दोघांचे नाते कुठपर्यंत आले आहे हे सुद्धा माहिती केले आहे....... So everything is fine till now ...... पण जे पण करायचं ते काळजीपूर्वक आणि लवकर  करावे लागेल...श्रियाला पण समजावून आलोय...उगाच आपल्या घरातील गोष्टी त्याच्यापर्यंत पोहचायला नको...... ".....आशुतोष

" Sorry.....मघाशी जरा मी जास्तीच चिडलो... आता विचार केल्यावर लक्षात येतंय... Thanks तूम्ही वेळीच सगळं सावरले... "...... अर्जून

" बरं आणखी एक   ... माहीला लवकरात लवकर नॉर्मल कर.... म्हणजे आपल्याला पुढली स्टेप लवकरात लवकर घेता येईल...आपल्या जवळ जास्ती वेळ नाही आहे ........ "....आशुतोष

" ह्मम ... "..... अर्जून

" अर्जून, मला माहिती राग कंट्रोल करणे कठीण आहे , पण प्लीज थोडं शांततेने घे .... आणि कुठली पण स्टेप घ्यायच्या आधी माहीचा विचार आधी कर ....."......आशुतोष

" ह्मम ......"... अर्जून

" बरं येतो..... आणि हो ... मी आहो सोबत....always...".... आशुतोष बोलून बाहेर निघून आला.....

****

श्रियाने  काही चुकीचे पाऊल उचलू नये याची अर्जुनला खूप भीती वाटत होती... त्यात तो तिच्यासोबत थोडा रुडली वागला होता .. म्हणून रात्री जेवण आटोपल्यावर तो  तिच्या सोबत बोलायला  तिच्या रूममध्ये आला ..

" श्रिया ..... "...... अर्जून

" दादा ,मला काही बोलायचं नाही ....".....श्रिया

" श्रिया...... मी तुझ्या सोबत असे बोलायला नको होते ..... I am sorry " ..... अर्जुन

" दादा .... प्लीज ..... सद्ध्या माझा काहीच मूड नाही बोलायचा"..... त्याचं सॉरी ऐकून श्रियाचा आवाज थोडा नरमला.... तो कधीच कोणाला सॉरी म्हणत नाही तिला माहिती होते....पण तरीही ती त्याच्यावर थोडी चिडलीच होती...

" श्रिया .... काळजी वाटली  तूझी .... म्हणून बोललो ... "...... अर्जुन

" ठीक आहे .... कळली तुझी काळजी".....श्रिया

" प्रत्येक भावाला वाटते , आपली बहीण सुरक्षित हातात असावी....त्यात तू आमची लहान बहीण... सगळ्यांची लाडकी.... काळजीपोटी आम्ही बोलून जातो..... येवढे मनाला लावून घ्यायचे असते काय ..? तुला माझा स्वभाव सुद्धा माहिती आहे...तुला तर माहीत आहे मी रागात असलो की मग खुप काही बोलून जातो...... ".....अर्जुन खूप शांततेने बोलत होता.

त्याचं बोलणं ऐकून आता श्रिया बरीच शांत झाली होती...त्याच्या आवाजातली काळजी तिला जाणवत होती....इतक्या प्रेमाने तो कधीच कोणाला  समजावत नसे... आपला निर्णय देऊन हुकूम सोडून मोकळा व्हायचा....पण आज तिला वेगळाच अर्जुन भासत होता.... बदलेला अर्जुन.... त्याच्या बोलण्याने तिला पण तिची चूक कळली होती ..

" सॉरी दादा..... मी पण थोडे उद्धट वागले तुझ्यासोबत "..... ती त्याच्या कुशीत जात बोलली... त्याने पण तिला एका हाताने आपल्या जवळ घेतले ....

" पण दादा माझं खरंच खूप प्रेम आहे देवेशवर.... मी त्याला सोडून नाही राहू शकत ... दादा तो खरंच खूप चांगला मुलगा आहे .... तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे त्याच्याबद्दल..... ".....श्रिया
 

" तू सेफ राहावी , हीच काळजी आहे ....".... अर्जून

" You don't worry , I am very much secure with him .... आणि तो मला काहीच होऊ देणार नाही....."....श्रिया खूप आत्मविश्वासाने बोलत होती..

तिच्या बोलण्यातून त्याला समजत होते की श्रियाच्या  डोळ्यांवर त्याने त्याच्या चांगुलपणाचा चांगलाच पडदा टाकला आहे ... आणि श्रिया खरंच त्याच्यामध्ये गुंतली आहे ..... त्यामुळे माही सोबतच श्रियाचा विचार करूनच हे प्रकरण हाताळावे लागणार होते ....

" ठीक आहे .... काळजी घे .....".....अर्जुन

" हो ....."..... श्रिया

अर्जुनची आजी तिथून जात होती....त्यांच्या कानावर यांचं बोलणं पडले....ते ऐकून अर्जुनचे हे बदलेले रूप बघून आजी सुद्धा शॉक झाली....

" आणि हो , जे काही आज झाले ते त्याला नको सांगू ... उगाच गैरसमज होतील...."...अर्जुन

" हो दादा , कळते मला ते ......"....श्रिया

" Good....."..... बोलून तो तिच्या रूम बाहेर पडला तर बाहेर त्याला आजी दिसली....

" अर्जुन , तू कोणावर प्रेम करतो काय ?" ..... आजीने डायरेक्ट मुद्याला हात घातला...

" What ?" ..... आजीचा अचानक अशा प्रश्नाने तो थोडा दचकला ....

" नाही , म्हणजे तू हा असा .... इतका प्रेमळ कधी पासून वागायला लागला....?" ... आजी मस्करीच्या सुरात बोलल्या...

" You are impossible .... तुम्हा लोकांचा  खूप प्रॉब्लेम आहे.... म्हणजे कसे वागावे , कळत नाही"..... अर्जून

" अरे ... तुझं सॉरी ... अजूनही कानावर विश्वास बसत नाही..."....आजी हसत बोलल्या

" आजी , रात्र झालीय..... गुड नाईट .....".....आजीचा मूड बघून  अर्जूनने थोडक्यात प्रकरण निपटावले

" ह्मम .... आणि हो तू पण काळजी घे".... बोलत हसत आजी आपल्या रूममध्ये निघून आल्या...

" अजब आहेत हे लोकं ..... थोडंसं शांतीने वागलो  तर प्रेमात आहे काय विचारतात ....कठीण आहे सगळं  ".....अर्जुन स्वतःशीच बडबडत माहीच्या रूममध्ये आला तर माही  झोपली होती..... या चार पाच दिवसात आज ती त्याच्याशिवाय झोपली होती ...

" मी खरंच येवढा बदललो.... की आता दुसरे लोकं नोटीस करायला लागले....."..... माहीकडे बघत त्याच्या डोक्यात विचार येत होते...  " मूव्हीजमध्ये दाखवतात तसेच व्हायला लागले.... अजब आहे हे प्रेमप्रकरण  ....... अर्जून , तू तर कामातून गेला .... या स्टुपिड सारखं तू पण बडबडायला लागला...."......अर्जुनला आता स्वतःचेच हसू आले....  त्याने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला..... तिचं पांघरून सारखं केले... आणि बाजूला सोफ्यावर जाऊन झोपला ...

" आज माही थोडी ठीक वाटत आहे .... उद्या तिच्या सोबत बोलून बघायला पाहिजे .....".....असे बरेच काही विचार करत त्याला कधीतरी झोप लागली .

*****

दुसऱ्या दिवशी अर्जुनने माहीला ऑफिसला येण्यासाठी तयार केले... तिने आधी थोडे आढेवेढे घेतले पण त्याने समजावून सांगितल्यावर ती तयार झाली ... अर्जुन सोबतच ती ऑफिसला जायला निघाली...

" हे काय .... आपण इथे का आलो ??.. आपण तर ऑफिसला जातोय ना ?"..... माही

" तुला माझ्यासोबत वेळ घालवायला नाही आवडणार काय ?".....अर्जुन कार पार्क करत बोलला.

" तसं नाही , पण काम? , तुमच्या मीटिंग.....?."... माही

" आज सगळं कॅन्सल केले आहे .... आज फक्त तू आणि मी ....."....अर्जुन हसत बोलला...... माही तर शॉक होत त्याच्याकडे बघत होती...

" ठीक आहे .... तुला नसेल आवडले तर ओके.... पण मला मिसेस अर्जुन सोबत क्वालिटी टाइम स्पेंड करायचा  आहे ....".....अर्जुन मस्करीच्या सुरात बोलला ... ते ऐकून तिचे नाक तोंड वरती झाले...ती अजब नजरेने त्याला बघत होती....पण ती  गालात हसत  आहे असे त्याला तिला बघून जाणवत होते....... तिचा तो क्यूट फेस बघून त्याला ही हसू आले.... आज पाच सहा दिवसानंतर माहीला असे फ्रेश बघून त्याला सुद्धा रिलॅक्स वाटत होते ....

*******


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️