तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 61

अर्जुन माही

भाग 61

" छाया , अंजली बरोबर बोलत आहे , राहू दे माहीला तिथे , आपण जाऊन येऊ देवदर्शनाला. तू पण नवस बोलली होती अंजलीच्या लग्नासाठी, लवकरात लवकर पूर्ण केलेला बरा. बऱ्याच वर्षात तू किती टेन्शनमध्ये होती, आता सगळं चांगलं होत आहे बघ, त्या निमित्याने तीर्थयात्रा पण होईल. माझी खूप दिवसांची इच्छा आहे , जाऊन येऊ दोघी. मीरा अनायसे रुळली आहे तिथे  , माहीची पण खूप दगदग होते, अंजलीची मदत होईल तिला , तिचा पण आराम होईल. मग परत आलो की माहीच्या लग्नाचं बघू, मग पुन्हा आपल्याला वेळ नाही मिळणार . आताच जाऊन येऊ. " .....आत्याबाई

" ताई , तुमचं बरोबर आहे , पटतेही मला. पण पोरगी अशी दुसऱ्यांच्या घरी , इतके दिवस ठेवायची म्हणजे ???" ..... छाया

" आता परके घर कुठे राहिले ते, आपल्या मुलीचं घर आहे, माहीच्या  मोठ्या बहिणीचे , आपलेच लोक आहे ते आता. तू काही तेवढा विचार करू नको , आपण उद्याच निघू , म्हणजे एकादशीला पोहचू तिथे, नवस पूर्ण होईल " ....आत्याबाई

" ठीक आहे , तुम्ही म्हणता तसेच करू " ..... छाया

अर्जुनने अंजलीवर माहीला शंतिसदनमध्ये राहायला सांगितले होते. अंजलीला बऱ्याच वेळ काही कळत नव्हते , मग अचानक तिला आठवले आई तिच्या लग्नासाठी नवस बोलली होती, तोच बहाणा करत तिने आत्याबाईंना पंधरा  दिवसाच्या तीर्थयात्रेसाठी तयार केले होते. आणि आकाश कडून त्यांच्या तिकीट , राहण्याची सोय सगळी बुक करून घेतली होती. इकडे घरी पण तिने आजी , नीलिमा सगळ्यांना असेच कारण, आणि मिराकडे लक्ष देता येईल असे  सांगत, माहीला इकडे राहू देण्याची परमिशन घेतली होती. सगळं अर्जुनला पाहिजे होते तसेच तिने आकाशची मदत घेत केले होते.

ठरल्या प्रमाणे आत्याबाई आणि छाया तीर्थयात्रेला गेले होते, आणि माही शंतिसदन मध्येच राहायला थांबली होती. गेस्टरूम मध्ये अंजलीने तिची सोय केली होती. मीरा पण खूप खुश होती.

दोन दिवस झाले होते तरी माहीमध्ये काही जास्ती चेंजेस झाले नव्हते. ती खाली सगळ्यांमध्ये यायला पण तयार नव्हती. वरती रूममध्ये बसून राहत होती. तिला अशक्तपणा जाणवतो आहे कारण पुढे करून  अंजलीने वेळ मारून नेली होती , आणि वरती रूममध्येच जेवण घेऊन जायची. कधीतरी ती जेवायची, कधी नाही. आजूबाजूला कोणी नसले की मग अर्जुन तिला जबरदस्ती खाऊ घालत असायचा. घरात सगळे असल्यामुळे सतत तिच्या सोबत असणे त्याला जमत नव्हते. तो तर जगाची परवा न करणारा व्यक्ती होता, पण माही, तिच्याबद्दल विचार करूनच तो तिच्या दूर रहात होता . पण ती डोळ्यांपुढे आहे , आणि रात्री तिच्याकडे लक्ष देता येते , त्यातच त्याला समाधान होते.

*****

" माही , ऑफिस कधी जॉईन करते आहे ?" ....अर्जुन माही खिडकी जवळ उभी बाहेर बघत होती , तिच्या जवळ येत बोलला.

" मला नाही जायचे कुठेच" ......माही

" माही किती दिवस तू अशी घाबरून घरी बसणार आहे ? " ....अर्जुन

" तो येईल परत, परत मला काही करेल. मी नाही जाणार कुठेच" ......माही

" माही , असे लाईफवर रुसून बसणार आहे काय??? ती बघ मिरा, तीन दिवसापासून तुझी वाट बघते आहे, " माझी माऊ कधी खेळेल माझ्या सोबत ?? ती हसत काबर नाही ?? तुझ्याकडे बघून तिचा   चेहरा छोटा  होतोय. ती लहान आहे, तिला या गोष्टी नाही कळत...फक्त तिला तिची माऊ हवी आहे हसरी खेळती . आता पर्यंत तिने मला 30-35 दा विचारले आहे , माऊ माझ्यासोबत का बोलत नाही " ....अर्जुन खिडकीतून खाली रुही आणि अंजली सोबत खेळत असलेली मिरा  दाखवत बोलत होता...त्याचे बोलणे ऐकताना तिच्या डोळ्यात पाणी जमा झाले होते.

" मी काय करू सर, मी विसरू शकत नाही आहे . वारंवार तेच माझ्या डोळ्यांसमोर येत आहे . मी स्वतःला सावरले होते, जगायचा प्रयत्न करत होते, सुंदर आयुष्याची स्वप्न रंगवायला लागले होते....पण..पण तो परत समोर आला आणि त्याने मला माझी रिॲलिटी आठऊन दिली . सर खूप भीती वाटते आहे , खूप मोठ्या मुश्किलीने मी हे सगळं कमावलं  आहे, कोणी हिरावून घेईल माझ्याकडून , माझा परिवार, माझी मिरा , माझे तुम्ही........"..... माही बोलता बोलता थांबली.

" माही मिरा आणि मी फक्त तुझे आहोत, आणि  तुझ्या सोबत आहोत..... कोणाचीच हिम्मत नाही आहे मिराला तुझ्यापासून दूर करायची , आणि मी , तू म्हणशील तरी मी कुठेच जाणार नाही आहो,  आता कायद्याने पण आपण एक आहोत  " .....अर्जुन तिला स्वतःकडे वळवत , तिचा चेहरा आपल्या दोन्ही हातात घेत, तिच्याकडे बघत  तिची भीती घालवायचा प्रयत्न करत होता

" माझं नशीब इतकं फुटकं  आहे , कधी काय होईल, कशाचाच काही भरवसा नाही " ......बोलता बोलता तिच्या डोळ्यातले अश्रू तिच्या गालांवर ओघळले.

" माही,  नको रडू  आता, मला खूप त्रास होतो आहे . I can't bare this pain now . तुझ्या डोळ्यातले पाणी मला विक बनवते " ....अर्जुन

"sorry " .... म्हणतच ती त्याच्या मिठीत शिरली.

तो तिला थोड्या वेळ तसेच मिठीमध्ये पकडून होता. 

" माही , हे नशीब वैगरे काही नसते, कमजोर लोकं नशिबाचे नाव घेत त्याला दोष देत बसतात. तू कमजोर नाही आहे, आपल नशीब आपण लिहिणार आहो .  आता फाईट करायची वेळ आली आहे, असे घाबरून घरात बसायची नाही. तू फायटर आहेस , आणि मला तिच माही आवडते, जी न घाबरता प्रत्येक प्रसंगाला सामोरे जाते. आता त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची वेळ आली आहे . आता तू एकटी नाही आहे, मी आहो सोबत" ....अर्जुन तिला कुरवाळत बोलत होता...

" माऊ ....." ....आवाज देत मिरा रूममध्ये आली. अंजली तिला घेऊन आली होती, पण माहीला अर्जुनाच्या मिठी मध्ये बघून बाहेरच थांबली होती आणि मिराला आतमध्ये सोडले होते.

" अल्ले माझं शोणुल " ........म्हणत माहीने मिराला कडेवर वरती उचलून घेतले.

" माऊ, तुला आता बर वाटते ना ?" .....मिरा

" हो...." ....माही

" तू माझ्याशी बोलशील ना आता?" ....मिरा

" हो....." ... माही

" माझ्यासोबत खेळशिल?" ......मिरा

" हो........" ....माही  ,निरागस मिराला बघून माहीच्या चेहऱ्यावर स्मायल आले .

माहीच्या चेहऱ्यावर स्मायल बघून , अर्जुनला सुद्धा आनंद झाला, तो त्या दोघींना बघत होता.

" सॉरी पिल्लू, माऊने त्रास दिला ना मिराला, आता नाही देणार" .....माही

" नाही माऊ, अर्जुनने मला सांगितले होते माऊला आराम करू दे, तो खेळला माझ्यासोबत, मला खाऊ पण घातले, आणि मला गोष्ट पण सांगितली. " ....मिरा

मीराचे बोलणे ऐकून माही अर्जुनकडे खूप प्रेमाने बघत होती .....

" माऊ आता आपण अर्जुन जवळच राहणार आहो, मी आता रोज अर्जुन जवळ झोपेल. मिराला फक्त अर्जुन पाहिजे.... I love you ... " ... मिराने त्याच्याकडे जाण्यासाठी त्याच्याकडे हात पसरवले.... त्याने तिला लगेच आपल्या जवळ घेतले....

" Love you sweety " ....त्याने तिच्या गालावर किस केले, आणि एका हाताने माहीचा हाथ पकडत तिला पण आपल्या कुशीत घेतले....आणि  तिच्या डोक्यावर किस केले. दोघींनाही त्याने आपल्या मिठीमध्ये घट्ट पकडले होते.....कधीही न सोडण्याकरिता.

दाराआडून अंजली त्यांना बघत होती....त्या तिघांना तसे बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते .माहीला अर्जुन जवळ बघून तिला बरे वाटले होते, माही आणि मीराला त्यांच्या हक्काचं माणूस भेटलं होतं, त्यांच्या हक्काचे प्रेम मिळालं होत....

"अर्जुन सर , कसं हे प्रेम तुमचं , नक्कीच माहीने खूप पुण्य केले असणार, जे तुम्ही तिला भेटलात. " ....अंजली मनातच बोलत आपले डोळे पुसत जायला मागे वळली तर तिच्या मागे आकाश उभा होता.

" काय झालं?" .....आकाशने डोळ्यांनीच विचारले

" काही नाही , मी खूप आनंदी आहे आज"......हसतच ती त्याचा मिठीत शिरली.

*****

देवेशचा जॉब गेला होता ... त्याने काही कंपनी मध्ये रिझुम पाठवला होता पण सगळीकडून रिजेक्शन येत होते. इकडे देवेश भावाच्या हातातून पण सगळे प्रोजेक्ट्स गेले होते... ज्या कंपनीन्नी त्याच्या सोबत डील साइन केल्या होत्या त्या पण कॅन्सल झाल्या होत्या. बँकमधून लोन घेतल्यामुळे त्यांचा पण तगादा सुरू झाला होता... फायनांशियली त्यांच्या घरची परिस्थिती बरीच बिघडली होती...

" हे काय होत आहे , काहीच कळत नाही आहे .... सगळे प्रोजेक्ट हातातून गेले".....देवेशचा भाऊ चिंतित होता..

" असं वाटते आहे हे कोणीतरी मुद्दाम करत आहे.... माहिती करायला लागेल "..... देवेश

" कोण कशाला मुद्दाम करेल....आपली कोणासोबत दुष्मनी आहे ?" .....देवेश वडील

" हे सगळं , असे एकदम झाले , दादाचे डील कॅन्सल झाल्या , माझा जॉब गेला.... काहीतरी घोळ नाही वाटत ?"....देवेश

" तू इतक्या नोकऱ्या धरपकड करतो.... कुठे एका ठिकाणी थांबत नाही .... विचित्र स्वभाव आहे तुझा.... आता पुढे काय?"....देवेश आई

" मला पण टेन्शन आले आहे .... आणि देवेश च्या लग्नाचं काय?? ते तर देवशचा जॉब पक्का व्हायची वाट बघत होते , त्यांना जर हे सगळं कळले तर , ते लग्नाला होकार देतील की नाही हाच डाऊट आहे ".....देवेश भाऊ

देवेश बऱ्याच वेळ काही विचार करत असतो...

" आपण , त्यांना हे काही सांगायचं नाही .... आणि आपण साखरपुडा करणार होतो, ते न करता डायरेक्ट लग्न करू..... आणि नंतर माहिती पडले तर मग त्यांच्याच कंपनी मध्येजॉब मिळेलच..... त्यांना द्यावाच लागेल.... श्रियाचा पण हिस्सा आहेच त्यात ....".....देवेश

" असं कोणाला खोटं सांगणं, फसवण योग्य नाही .... नाती अशी नसतात जोडत".....आई

" आई ..... हे नातं बित काही नसते..... पैसे असले की सगळं असतं..... आणि ती सोन्याची अंडी देणारी मुर्गी आहे.... तिला मी असा घालवू नाही शकत "..देवेश

" मला तुमचं हे काहीच पटलेले नाही आणि आवडलेले सुद्धा नाही ....."...आई थोडी चिडत बोलली.

" तू नको लक्ष घालू, मुलं बघतील...आपल्याला काही हे कळत नाही..... "...बाबा

" पण ते मला नाही वाटत मानतील.... And Arjun Patwardhan , very smart parson ..... तो लगेच पकडेल सगळं "......देवेशचा भाऊ

" तोच एक प्रॉब्लेम आहे .... आकाशला तर मी सहज गुंडाळतो .... अर्जुन .... हाच थोडा टफ आहे.... लक्ष ठेवावं लागेल त्याच्यावर.... ap industries मध्य मला एन्ट्री तर मिळवायची आहे.... श्रिया पूर्णपणे माझ्या म्हणण्यात आहे  ... अर्जुनला हे सगळं माहिती पडायच्या आधीच मी श्रियाला लग्नासाठी पटवेल आहे ...".... देवेश च्या डोक्यात काही प्लॅनिंग सुरू असते...

...........

अर्जुनाची एका हॉटेलमध्ये ऑफिस मीटिंग होती.... मीटिंग आटोपल्यावर तिथून बाहेर पडत होता तर त्याला श्रिया आणि देवेश तिथेच लंच घेतांना दिसले.... देवेशला बघून तर त्याची तळपायाची आग मस्तकात गेली .... तिथेच जाऊन त्याला त्याची कॉलर पकडत चांगला चोप द्यायची इच्छा झाली, आणींतो रागाने पुढे सुद्धा गेला....पण श्रियाला बघून परत थांबला.....या सगळ्यामध्ये श्रियाचं नाव नको खराब व्हायला... पब्लिक प्लेस , न्यूज बनायला वेळ लागत नाही त्याला माहिती होते........ आधी  श्रिया सोबत बोलावं विचार करून तो मागे फिरला होता....

देवेश श्रियाचा काही फायदा तर नाही घेणार हा प्रश्न अर्जुनला खूप सतावत होता......... ऑफिस आटोपून याच विचारात तो घरी आला..... बघतो तर श्रिया घरी सगळ्यांना देवेशचे गुणगान गात ,  लवकरात लवकर लग्न करून द्यावे यासाठी मनवत होती..... ते सगळं ऐकून तर त्याचं डोकंच सटकलं. ...
 

" मला तुमच्या सगळ्यांसोबत काही बोलायचे आहे , मी सरळ मुद्द्यावर येतो. श्रियासाठी मला देवेश अजिबात आवडला नाही आहे , हे लग्न होऊ शकत नाही " ......अर्जुन

" का..? का आवडत नाही??? ..." ...श्रिया, अर्जुनचे बोलणे ऐकून शॉक झाली होती.

" सांगितले न एकदा , तो नाही आवडत, चांगला व्यक्ती नाही तो , पैशांसाठी फसावतो आहे तो तुला " ......अर्जुन थोडा रागातच बोलला.

"कशावरून तो मला फसावतो आहे ??, तो आपल्यासारखा श्रीमंत नाही म्हणून??  की आपल्या स्टेटसला शोभत नाही म्हणून?? दादा, तुझं नेहमी असेच मत असते सगळ्यांबद्दल , तुला लोक पैस्यांनी कमी असली की तुला ते लोक आवडतच नाही. पण माझं खूप प्रेम आहे त्याच्यावर, त्याचे ही माझ्यावर आहे. मी लग्न करेल तर त्याच्या सोबतच, बाकी कोणासोबत नाही. " ....श्रिया ठामपणे बोलत होती.

" श्रिया, मी एकदा नाही म्हणालो, म्हणजे नाही, आता यावर मला अजून काही नको आहे " ...अर्जुन

" तू सगळ्यांना पैष्यांमध्येच तोलतो....तू कधी प्रेम केले नाही, तुला कसे कळणार प्रेम काय असते ते ? तुला फक्त बिजनेस कळतात, तुला काय समजणार प्रेम काय ते? मी देवेश सोबतच लग्न करणार" ....श्रिया रागात बोलत होती.

" मला प्रेम कळते की  नाही कळत, ते नंतर बघू...देवेश पासून दूर राहायचं, मी त्याला या घरात पाय ठेऊ देणार नाही  " ....अर्जुन

माही वरतून खाली चालेले हे सगळे बघत उभी होती.  " अर्जुनला प्रेम काय असते , समजत नाही" ..हे वाक्य ऐकून माहीला खूप वाईट वाटले. खरं प्रेम काय असते , त्याला जपणे, सांभाळणे हे सगळं तर ती अर्जुन पासूनच शिकली होती...इतकं निरागस आणि निस्वार्थी प्रेम होते त्याचे माहीवर.

" श्रिया....., तो तुझ्यापेक्षा मोठा आहे , काहीतरी विचार करून बोलत असेल आहे ? " ....मामा

" हो, मोठा आहे, मालक आहे सगळ्यांचा...पण म्हणून त्याचेच ऐकायचे काय??? तो प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा बघत असतो. नक्कीच देवेशमध्ये त्याला काही फायदा दिसला नसेल, म्हणून नाही म्हणतो आहे " .....श्रिया मनाला येत होते ते बोलत होती.

" तुला जे समजायचे ते समज, पण हे लग्न होणार नाही , that's final" ..... अर्जून

" तू कारण सांग, नाहीतर मी हे घर सोडायला पण मागे पुढे बघणार नाही" .....श्रिया

" कारण की तो....."......अर्जुन काही बोलणार तेवढयात आशुतोष मध्ये पडला.

" अर्जुन शांत हो,  तू तुझ्या रूममध्ये जा , नंतर बोलू आपण हा विषय , माही ऐकते आहे सगळं, प्लीज " ..... आशुतोष त्याला वरती माहिकडे इशारा करत बोलला.

अर्जुनने वरती माहीकडे बघितले, नी तो चूप बसला....आणि एकदा श्रियाकडे बघत वरती निघून आला.

" श्रिया, हे काय वागणं झालं??? आम्हाला अजिबात आवडले नाही आहे " ......आजी

" आजी तुम्ही शांत व्हा, श्रिया आतमध्ये जा " .....आशुतोष

तशी श्रिया रागातच आतमध्ये निघून गेली.

" अर्जुन अचानक लग्न तोडायचे का म्हणतो आहे ?" .....आजी

" ते तर तोच सांगेल. पण त्याची पोहाच दूर दूर पर्यंत आहे, कदाचित देवेश ठीक नसावा, त्याला कळले असेल काही. अर्जुन उगाच काही बोलत नाही, तो नेहमीच सगळ्या गोष्टी खूप विचारपूर्वक करतो. सद्ध्या शांत राहूया....बघुया तो काय म्हणतोय .... मग बघू " .....आशुतोष सगळ्यांना समजवायचा प्रयत्न करत होता.

" मला पण नाही आवडले ते लोकं, मी अर्जुनच्या साईडने आहे , अर्जुन बरोबरच बोलतोय ...." ....मामी

" बरं बरं, बघू नंतर" ......आजी

अर्जुन वरती आला, रूममध्ये जात तो काऊचला टेकून डोक्यावर हात ठेवत डोळे बंद करून बसला होता.  त्याच्या पाठोपाठ माही त्याचा रूममध्ये आली. अर्जुनकडे बघितले तर तो खूप थकला वाटत होता. तिने दार बंद केले नी त्याच्या जवळ गेली.

" अर्जुन, दमलात?" .....माही त्याच्या जवळ बसत त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली.

" हम्म......" तो तिचा हाथ पकडत, तिच्या मांडीवर डोकं ठेवत बोलला. ती त्याच्या केसंमधून हात फिरवत होती

" घरातले प्रॉब्लेम्स सोडवणे किती कठीण असतात...." ....अर्जुन

" ह्मम......कारण इथे प्रत्येकाच्या भावना जपायचा असतात......" माही

"  कम्पलिकॅटेड .....करून ठेवतात"..अर्जुन....त्याने आपली कूस बदलली, माहीच्या  कंबरेमध्ये हाथ घालत तिला पकडत झोपी गेला. अगदी एखाद्या लहान मुलासारखा...... माही त्याच्या लोभस चेहऱ्याकडे बघत कुरवाळत शांत बसली होती.

माही त्याच्याकडे बघत  अर्जुन इतका स्ट्रेस का आहे याचा विचार करत होती....

त्याला झोपलेले बघून तिने त्याचं  डोकं खाली ठेवत डोक्याखाली उशी ठेवली..... त्याच्या अंगावर पांघरून टाकले.... त्याच्या जवळ येत त्याच्या कपळवर किस केले.....नी आपल्या रूममध्ये निघून आली.

******

क्रमशः

🎭 Series Post

View all