Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 60

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 60

भाग 60

अर्जुन पूल साईडला  रूम मधली माही दिसेल अशा ठिकाणी बसून माहीकडे बघत काहीतरी विचार करत होता. माही अजून उठायची होती..  रात्री माहीची हालत ठीक नव्हती,तिला त्याची गरज आहे त्याला माहिती होते, रात्री सुद्धा तिने त्याला एक सेकंद साठी सुद्धा सोडले नव्हते, तिला घरी एकटे  सोडून त्याला ऑफिसमध्ये जायचे मन नव्हते झाले, म्हणून आज  डोकं दुखत आहे बहाणा पुढे करून  तो ऑफिसला गेला नव्हता, आणि पुढे काय करायचे विचार करत होता.

***

" माही थोडे खाऊन घे, काल पासून काहीच खाल्ले नाही आहे तू, परत चक्कर येईल,  औषध पण घ्यायचे आहे......" अंजली तिच्या पुढे चम्मच धरत तिला खाऊ  घालयाचा प्रयत्न करत होती...पण माही काही खात नव्हती.....तिला कालचे आठवत होते आणि त्यामुळे भीती वाटत होती. पण तिच्या लक्षात आले की ती शांतीसदनमध्ये आहे ....त्यामुळे भावनावर कंट्रोल करणे गरजेचे आहे .....नाहीतर सगळ्यांना सगळं माहिती होईल....आणि त्यामुळे कदाचित अंजलीला प्रॉब्लेम होईल....पण तिच्या डोक्यातून तो जात नव्हता......तिला जेवायची सुद्धा काहीच इच्छा होत नव्हती.

" माही काय झाले आहे?? का अशी अचानक तब्बेत बिघडवून घेतली तू.??...किती घाबरवले काल तू आम्हा  सगळ्यांना...अर्जुन सर तर रात्रभर झोपले नाही आहेत.....इथे तुझ्या डोक्या जवळ बसून होते........" अंजली

माही तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती....

" ताई डोकं खूप दुखते आहे ग?? नको मला ते, नाही खायचं " ........ माही

" माही....थोडसे खाऊन घे." .......अंजली

तेवढयात अर्जुन तिथे आला आणि त्याने अंजलीच्या हातातली प्लेट घ्यायला हाथ पुढे केला.......अंजलीने पण काही न बोलता त्याचा हातात प्लेट दिली.....आणि  उठून बाजूला झाली .

अर्जुनने राइसचा एक चम्मच तिच्या पुढे धरला.... माही त्याच्याकडे बघत होती.....त्याला बघून आतापर्यंत दाबून धरलेल डोळ्यातले पाणी गालांवर ओघळू लागले.......तिला तसे बघून त्याला सुद्धा वाईट वाटले...त्याला तिला जवळ घ्यावेसे वाटत होते, पण अंजली तिथे होती , तो शांतपणे तिच्याकडे बघत होता.....त्याने तिला डोळ्यांनीच रडू नको म्हणून मान हलवली......आणि  खा म्हणून खुणावले......पण ती मात्र एकटक त्याच्याकडे भरल्या डोळ्यांनी बघत होती......

" अंजली बाकी घरचे कुठे आहे, दिसले नाही बऱ्याच वेळ पासून??" ...अर्जुन

" सगळेच आपल्या कामाने बाहेर गेले आहेत.....बाबा आहेत घरी , ते त्यांच्या रूममध्ये आहेत.....आणि आजी आराम करतात आहेत...." ...अंजली

" ह्मम "......अर्जुन

"मी.....मी पाणी आणते....." म्हणतच अंजली तिथून निघून गेली.....तिला अर्जुनचे  अवघडलेपण कळले होते, त्या दोघांना वेळ द्यावा म्हणून ती तिथून पाण्याचा बहाणा करत निघून गेली...

अंजलीला गेलेले बघून अर्जुनने रूमचे दार बंद केले, आणि माही जवळ जात उभा राहिला होता की तिने त्याच्या कंबरेला पकडत त्याला बिलगली आणि  रडायला लागली ....अर्जुन  तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत होता..त्याने तिला मनसोक्त रडू दिले.

" माही, जितकं रडायचे आहे तितके रडून घे....मी अजिबात अडवणार नाही तुला , पण नंतर मला माझी स्ट्राँग, सेल्फ डीपेंडेंट माही हवी आहे.....जी कुठल्याच परिस्थितीमध्ये हार नाही मानत. " ....अर्जुन तिला जवळ घेत प्रेमाने पण थोड्या कडक आवाजात बोलला. त्यालाही हरलेली माही बघायला खूप त्रास होत होता. म्हणून तिला नॉर्मल करणे त्याला गरजेचे वाटत होते. माही बऱ्याच वेळ त्याला पकडून रडत होती.

" अर्जुन, खूप डोकं दुखत आहे" ... माही त्याच्या पासून दूर होत पालथ्या हाताने डोळे पुसत बोलत होती.

" ह्मम, ते तर होणारच आहे  , कालपासून काहीच खाल्ले नाही आहे तू, फक्त रडते आहे . रडल्याने आणखी डोकं दुखते. चल खाऊन घे आधी थोडं , मग औषध घेतले की बर वाटेल आहे तुला " ....अर्जुन तिच्या पुढे बसत तिच्या पुढे राइस चमचा धरत बोलला.... माही फक्त त्याच्याकडे बघत होती.

"घे ......" ....अर्जुन

माहीने आ केला व ती त्याच्याकडे बघत त्याच्या हाताने खाऊ लागली.......आता परत तिचे डोळे भरून आले.....

" काय झालं?? आवडलं नाही काय? दुसरे काही मागवू? " ...अर्जुन

माहीने नकारार्थी मान हलवली.

" मग काय झालं?? काय बघत आहे? " ...अर्जुन

" तुम्हाला  " ......माही

" बरं, हवं तितके बघ नंतर, इथेच तुझ्या जवळ आहो मी, आता पटापट हे खाऊन घे" ..अर्जुन एक एक घास भरवत होता. त्याने तिला मेडिसिन दिले , आणि बेडवर झोपवले. आणि  तिच्या पुढे सोफ्यावर जाऊन लॅपटॉप उघडत फोनमध्ये काहीतरी करत बसला.....माही एकटक त्याच्याकडे बघत होती.

" माही , मी इथेच तुझ्याजवळ आहो . तुला सोडून कुठेच जाणार नाही , झोप आता....." अर्जुन.

अर्जुनला बघत बघत कधीतरी तिचा डोळा लागला. तिला झोपलेले बघून अर्जुन लगेच उठला आणि  बाहेर जाण्यासाठी तयार झाला.

" अंजली , माही आणि मिराकडे लक्ष दे . मी बाहेर जातो आहो, जर माही उठली तर मला लगेच फोन कर, आणि ती जर माझ्याबद्दल विचारेल तर इथे घरीच दुसऱ्या रूममध्ये आहो सांग ." अर्जुन बाहेर जायला निघाला होता, जातांना अंजलीला बऱ्याच सूचना  देऊन गेला.

" अर्जुन, बाहेर निघाला? " ....आशुतोष अर्जुनला गाडी मध्ये बसतांना बघून बोलला, आणि साईडचे डोअर ओपन करत कार मध्ये बसला . त्याला अर्जुन  खूप रागात दिसत होता, म्हणून त्याला एकटे सोडणे आशुतोषला ठीक नाही वाटले, आणि म्हणूनच तो त्याचा कारमध्ये जाऊन बसला.

" हो , तुम्हाला कुठे जायचे आहे ??" .....अर्जुन

" ह्मम, हो, तुझ्यासोबत " ....आशुतोष

अर्जुनने प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघितले...आणि कार स्टार्ट केली.

" अर्जुन हळू, खूप फास्ट चालवतो आहे तू. मला माहिती तू सद्ध्या कोणाचाच ऐकण्याच्या मूडमध्ये नाही आहे, पण कार हळू चालव, घरी कोणीतरी वाट बघत आहे " ...आशुतोष

आशुतोषच्या बोलण्याने अर्जुनने कारची स्पीड कमी केली.

" कोण आहे तो? " ...... आशुतोष

अर्जुन काहीच न बोलता त्याने कार एका घरा समोर थांबवली. कार थांबलेली बघून आशुतोषने खिडकीतून नजर बाहेर फिरवली.

" देवेशचे घर?" .....आशुतोष प्रश्नार्थक नजरेने त्याला बघत होता..अर्जुन काहीच बोलला नाही, पण त्याच्या डोळ्यात आशुतोषला भयंकर राग दिसत होता, आजपर्यंत त्याने अर्जुनला बरेचदा रागात बघितले होते, पण जेव्हा तो बोलायचा, अर्जुन त्याच्यासोबत शांत राहत बोलत होता, पण आज, असे त्याने अर्जुनला कधीच बघितले नव्हते, आणि तो विचार करत होता...

" देवेश??? की त्याचा भाऊ¿?" ...आशुतोष एकदम शॉक झाला होता, हे सगळं त्याचा विचाराच्या पलीकडे होते.

" देवेश" ....म्हणतच तो कारचे दार उघडत बाहेर जाणार तोच आशुतोषने त्याचा हाथ पकडला आणि त्याला आतमध्ये ओढले ...

" अर्जुन , शांत हो " .....म्हणतच आशुतोष कारच्या बाहेर आला आणि अर्जुनच्या साईडने आला...

" Move " ...... आशुतोष

" What??, मी इथे काहीतरी कामाने आलोय, Let me go  " .... अर्जुन

" Yeah, I know  but now move that side " .... आशुतोष

" Ashutosh ???" ..... अर्जुन थोडा मोठ्या आवाजात बोलला.

" I said move " ....... आशुतोष

आशुतोष एक चांगली व्यक्ती आहे , समजदार आहे ,. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या पेक्षा मोठा आणि त्याच्या बहिणीचा नवरा आहे . नात्याचे भान अर्जुनला सुद्धा  होते,  आणि तो काहीच न बोलता चुपचाप साईडच्या सीटवर जाऊन बसला, पण एकही शब्द तो त्याच्यासोबत बोलला नाही.

आशुतोषने कार सुरू केली आणि थेट अर्जुनच्या हॉटेलमध्ये पार्क केली.  तिथे प्रायव्हेट सेक्शनमध्ये गेले. आशुतोषने कॉफी ऑर्डर केली आणि अर्जुनकडे बघत बसला होता, त्याला शांत व्हायला तो वेळ देत होता.  अर्जुन चुपचाप काही न बोलता बसला होता.

" अर्जुन , कॉफी घे " ...आशुतोष

वेटरने कॉफी समोर आणून ठेवली होती, पण अर्जुन आपल्याच विचारात होता.

" अर्जुन, मला माहिती तुला माझा राग आला आहे , आपण त्यावर बोलूच, पण आधी कॉफी घे , बरं वाटेल तुला " ...आशुतोष

अर्जुनने चुपचाप कॉफीचा कप हातात घेतला.....बऱ्याच वेळ  दोघेही शांत होते. शांतता भंग करत आशुतोषने बोलायला सुरुवात केली.

" माही कशी आहे आता ?" ...... आशुतोष

" ठीक नाही आहे....घाबरली आहे खूप......."  अर्जुन

" ह्मम , होईल ठीक सगळं " ...आशुतोष

" तेच करायला जात होतो, तुम्ही अडवले " ...अर्जुन

" अर्जुन, काय करणार होता तू त्याला?" ....आशुतोष

" मी आज त्याला जिवंत नसते सोडले " ....अर्जुन

" त्याने काय झालं असते?? तू जेलमध्ये गेला असता.....मान्य आहे तुला कोणाची हात लावायची हिम्मत नाही, तू लगेच बाहेर सुद्धा येशील........पण माही ठीक नाही आहे , तूच म्हणाला ना?? मग तिला आता सगळ्यात जास्त कोणाची गरज आहे ??? मीराला कोण सांभाळणार?? तू विचार केला आहेस???... आशुतोष

आशुतोषच्या बोलण्याने अर्जुन थोडा शांत झाला.

" माहीची हालत किती खराब आहे , तिच्याकडे बघूनच कळते ते, ती किती त्रासातून जात आहे. तिच्याजवळ तिला सांभाळून घेणारे असे कोण आहेत??? आधीच आईवडिलांनी साथ सोडली आहे, त्यानेच इतकी मोडून पडली आहे, त्यात जर तू पण तिच्या जवळ नसशील तर ती किती खचून जाईल आहे, कदाचित परत कधी उठून चालायची हिम्मत नाही करणार ती? आम्ही सगळे आहोत, पण तिच्यासाठी तू महत्वाचा आहेस. तुझ्याकडे आणि  मिराकडे बघून जगतेय ती , इतकी साधी गोष्ट  तू समजू नाही शकत? " आशुतोष

अर्जुन शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होता.

" मला इतकेच म्हणायचे आहे , तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नको, जे पुढे चालून तुझ्या , सोबतीने माही आणि मिराच्या जीवनावर वाईट परिणाम करतील , कळते आहे काय तुला , मी काय सांगतोय ते??  " .....आशुतोष

" हम..." ..,अर्जुन विचार करत होता. कुठेतरी त्याला आशुतोषचे बोलणे कळत होते, आणि तो आता बऱ्यापैकी शांत झाला होता.

" आणि मुळात मला तुला हे सांगायची गरजच का पडते आहे? .... तू नेहमीच विचारपूर्वक समोर पाऊल टाकतो, आता हे असा अविचारी का वागतोय? असं भाऊक होऊन नाही चालणार अर्जुन .... "...... आशुतोष

" ह्मम.....".....अर्जुन

" तुला जे करायचे ते कर , पण शांत डोक्याने" ..आशुतोष

" ह्मम" .....अर्जुन

" दुसरी गोष्ट,  तो खरच देवेश आहे??? देवेश सारखा  दिसणारा दुसरा कोणी असू शकतो, म्हणजे तिला भास झाला असावा......ते लोक होते तेव्हा माही नव्हती आली...." ..... आशुतोष

" तोच आहे , माहीने फोटोवरून ओळखले आहे त्याला..."... अर्जून

" ह्मम "...आशुतोष तिथे काहीतरी विचार करत होता

" अर्जुन , त्याचा विरुद्ध काही प्रुफ आहेत काय??? म्हणजे माही सोबत वाईट करणारा हाच आहे ते....? कारण कोणालाही ही गोष्ट सांगू, तेव्हा सर्वांनी विश्वास ठेवायला हवा......" आशुतोष

" प्रुफ, ते असो वा नसो, माझा पूर्ण विश्वास आहे माहीवर....... I don't need any proof...... मी त्याचे आयुष्य बर्बाद करून सोडेल , nothing is impossible for me "..... अर्जुन

" तुझं म्हणणं ठीक आहे, आपल्याला बाहेरच्यांसाठी  नाही घरच्यांसाठी प्रुफ हवे, .." आशुतोष

" I don't care ,  " अर्जुन

" असे म्हणून कसे चालणार आहे? आणि श्रियाबद्दल काय?? या गोष्टीचा श्रियावर किती वाईट परिणाम होऊ शकतो?? ती त्याच्या प्रेमात आंधळी झाली आहे, तिचा त्याच्यावर अंधविश्वास आहे , आणि तो असा कोणीतरी फसवले म्हणून जेलमध्ये गेला,  हे जर कळले तर तिची त्याच्यासाठी सिंपथी जास्ती वाढेल, किंवा तो नाही म्हणून  ती डिप्रेशनमध्ये सुद्धा  जाऊ शकते , तिला खरं कारण कळले पाहिजे , तो कसा आहे ते कळले पाहिजे, तेव्हाच ती त्याला तिच्या लाईफ मधून काढू शकेल आहे , अन्यथा ती आयुष्यभर त्याच्यासाठी कुढत बसेल "......आशुतोष

" I can't see Mahi in pain " ... अर्जुन

" आणि जर माहीला कळले की तिच्यामुळे श्रियाचे लाईफ खराब झाले आहे , तर ती स्वतःसोबत  नजर मिळवू शकणार नाही " ....आशुतोष

" तुम्ही लोकं इतके भावनिक होत का विचार करत असता?? त्याने गुन्हा केला आहे , त्याला त्याची शिक्षा व्हायलाच पाहिजे . हे तुमचे पोलिस, कोर्ट, त्याने केस तर लवकर सोलव्ह होत नाही, वरतून ज्याच्यावर अत्याचार झाला आहे त्या मुलीलाच  खूप त्रास देतात....कितीतरी मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत...नियमांनी गेले तर ती फक्त एक फाईल बंद केस बनून राहते . आणि मला माहीला त्रास झालेला चालणार नाही. " ...अर्जुन

" अर्जुन, बघ, आपल्याला सगळं विचारपूर्वक करायचे आहे . तू घाई करू नकोस . " आशुतोष

" Why you people making this so complicated  ?,it's so easy, I want to see him in the hell" ... अर्जुन

अर्जुनने फोन काढला आणि कोणालातरी फोन केला .

"Sending you name and photo , spoil his career , family, life everything   "  अर्जुनने फोनवर काही सांगून फोन ठेवून दिला.

" Why family?? त्यांची काय चूक?? " ...आशुतोष

" त्यांची पण चूक आहे , त्यांच्या मुळेच हे झाले आहे. त्याच्या फॅमिलीचे काम होते त्याला काय चूक काय बरोबर शिकवायचे. It's all their fault. मला तर ते लोकच अजिबात आवडले नव्हते. मला फूल डाऊट आहे पैशासाठी त्याने श्रियाला फसवले आहे . " अर्जुन

" आधी माहीला सावर. तिला मनाने पक्क कर , तिच्या मनातली भीती घालव, मग पुढे बघू. " आशुतोष

दोघेही बोलत होते की अर्जुनचा फोन ब्लिंक झाला...त्याने नाव बघितले आणि फोन लगेच पिकप केला.

" अंजली , माही ठीक आहे??" ...अर्जुन

" ती मिरा सोबत बसली आहे, शांत आहे  , ती घरी जायचे म्हणते आहे???. " .....अंजली

" What??? ....no.... ती इथेच राहणार आहे , I am comming " ..... अर्जुनने  बोलून फोन ठेऊन दिला

" आशुतोष , घरी जायला हवे..." ...अर्जुन उठत बोलला

" ह्मम...... चल " .....आशुतोष

दोघंही घरी निघून आले.

अर्जुन घरी येऊन सरळ रूममध्ये गेला, मिरा आणि माही गप्पा करत होत्या. मीरा मस्ती करत होती, माही फक्त हो, नाही करत होती.

" अर्जुन, बघ ना , माऊ खेळत नाही आहे माझ्या सोबत ?" ......मिरा अर्जुनला दारात आलेला बघून पळतच त्याच्या जवळ गेली. त्याने सुद्धा तिला पकडून उचलून घेतले, आणि  तिच्या गालावर पापी केली.

" मीरा , माऊला बर नाही वाटत आहे , तिला आराम करू दे , आपण खेळू " ....अर्जुन माहीकडे बघत बोलला. पण माही आपल्याच विचारात कुठेतरी हरवलेली दिसत होती.

" Okay मिरा, तू थोड्या वेळ बस इथे , कार्टून बघ , मी आलोच थोड्या वेळात " .... अर्जून, त्याने रिमोट हातात घेतला आणि कार्टून चॅनल बघत होता, आणि त्याला डोरेमॉन दिसलं...त्याला आठवले माही ऑफिसमध्ये हेच लाऊन बघायची, आणि त्याने ते कार्टून सुरू केले. थोडे तरी ती तिच्या विचारातून बाहेर यावी असे त्याला वाटत होते. मीरा माहीजवळ बसत कार्टून बघत होती.

" अंजली , मला थोड महत्वाचे बोलायचे आहे ? " .....अर्जुन अंजलीच्या रूममध्ये जात , रूमचे दार लावत बोलला.

" बोला सर ?" .....अंजली उठून उभी राहत बोलली.

" माही , काही दिवस इथेच राहील, दहा पंधरा दिवस तरी मिनिमम " .......अर्जुन

" सर , पण ....घरी??" .......अंजली

" कसे ते तू बघायचे? " .......अर्जुन

" हे बघ , मी कधीच कोणाला रिक्वेस्ट करत नाही  , पण तुला करतोय ..... , हे बघ मी वेगाळ्या काही  ट्रिक्स वापरून तिला माझ्या सोबत ठेऊ शकतो, पण तुम्ही सगळे फॅमिली इश्यू करता म्हणून तुला सांगायला आलो आहे . " ...अर्जुन

" अर्जुन सर, माहीला काय झाले आहे??? मी तिच्या सोबत बोलली, पण ती काहीच बोलत नाही, फक्त चुपचाप बसली आहे " ......अंजली

" सांगतो नंतर सगळं, आता ही वेळ नाही बोलायची , मी सांगितले आहे तेवढे कर " .... अर्जून

" ह्मम, घरी बोलून बघते " .....अंजली

" Okay"........ अर्जून, अर्जुन बोलून बाहेर निघून आला.

चार पाच वर्ष होऊनही माही झालेली गोष्ट विसरली नव्हती, रात्री झोपताना घाबरायची, बोलता बोलता मीराने एकदा अर्जुनला सांगितले होते . मग आता तर त्याला बघून  ती परत चार पाच वर्ष मागे झालेल्या गोष्टीत गेली होती,  ती खूप जास्ती घाबरली होती. अर्जुनला  ती त्या दिवशी नाशिकला रस्त्यावर भेटली तो दिवस ही आठवला, ती अशीच खूप पनिक झाली होती, घाबरली होती , तेव्हा पण तिची तब्बेत खराब झाली होती, डॉक्टर म्हणाले होते मिरा आठवा महिन्यातच झाली होती. . म्हणून आता त्याला तिला एकटे सोडायचे नव्हते. दिवसभर कसेही त्याने ऑफिसमध्ये तिला सावरले असते, पण रात्र....ती कशी सावरली असती, आणि म्हणूनच हा विचार करत त्याने माही इथेच राहील असे सांगितले होते.

*****

क्रमशः

*****

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️