Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 59

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 59

भाग 59

" डॉक्टर, घाबरण्यासारखे काही नाही ना ?? कशी आहे माही...??" ....आकाश

" थोडी विकनेस आहे,  स्ट्रेस घेतला आहे कशाचातरी खूप, आणि घाबरल्या दिसत आहे . तश्या त्या ठीक आहे पण एकटे नका सोडू त्यांना , आणि जास्तीत जास्त आराम करू द्या. इंजेक्शन दिले आहे, आणि हे काही मेडीसिन आहेत, वेळेवर द्या......काही वाटलं तर कॉल करा ".......डॉक्टर

"Thank you very much!" ........ आकाश

" ठीक आहे, येतो मी" ........ डॉक्टर

जेव्हा माही पळत अर्जुन जवळ आली होती तेव्हा खूप घाबरली होती, आणि त्यातच ती बेशुद्ध झाली होती......अर्जुनने  उचलून घेत तिला त्याच्या रूम मध्ये बेड वर झोपवले होते आणि अंजलीला फोन करून वरती बोलावले होते...

"सर, काय झालं माहीला??".....अंजली

" अंजली , ती खूप घाबरली होती, आणि इथे पूल साईडला बेशुद्ध झाली.....मी डॉक्टरला फोन करतो
....... अर्जून

"अशी, अचानक??, आतापर्यंत तर ठीक होती"......अंजलीला काळजी वाटत होती

" ती सांगेल, तेव्हा कळेल.....पाहुणे गेले???" ....अर्जुन..

" हो, आता थोडा वेळ झाला".......अंजली..

" ओके, इथेच थांब....मी डॉक्टरांना कॉल करतो " .....अर्जुन

अर्जुनने फोन करून डॉक्टरला बोलाऊन घेतले होते..

डॉक्टरांना  अचानक घरी बघून घरातले बाकीचे पण त्यांच्या मागे वरती रूममध्ये आले होते.....डॉक्टर तिला चेक करून गेले होते.

आजी, नलिनी, मामा....घरातले सगळेच तिची विचारपूस करत तिथे थांबले होते......

अर्जुन एका कोपऱ्यात उभा माहीला बघत होता.....वारंवार त्याच्या डोळ्यापुढे थोड्या वेळ पूर्वीची माही येत होती, खूप घाबरलेली, असह्य त्रास, वेदना तिला होता होत्या.....अर्जुन भयंकर चिडला होता, पण त्यातही त्याला तो खूप हेल्पलेस वाटत होता.....तिला इतक्या वेदना होत आहे आणि आपण काही करू शकत नाही, त्याला तर स्वतःवरच राग येत होता .......तिच्या वेदना, त्रास आठवून त्याच्या पण चेहऱ्यावर स्पष्टपणे त्याला काहीतरी त्रास होतो आहे दिसत होते.......

आशुतोष अर्जुनला बघत होता.....अधूनमधून माहीकडे, अधूनमधून अर्जुनकडे तो बघत होता, आणि नक्कीच काहीतरी वाईट घडले आहे हे त्याला कळत होते.......कारण इतके असह्य अर्जुनला  त्याने कधीच बघितले नव्हते.....

" आकाश, माहीला ठीक नाही आहे तर मी तिच्यासोबत आज घरी जाऊ...??".....अंजली

अंजलीच्या वाक्याने अर्जुन भानावर आला.... त्याने आकाश आणि आशुतोषकडे बघितले ...आकाश आशुतोषला त्याचा नजरेत खूप काहीतरी वेगळं त्रासदायक आहे असे दिसत होते .......तो जरी वरतून शांत दिसत होता...तरी आत्मधून त्याचे अंग जळत होते......"दिवस तर ठीक आहे ,पण रात्र, रात्री कोण असेल तिच्या जवळ........ती एकटी स्वतःला सांभाळू नाही शकत" ........अर्जुनच्या डोक्यात तेच सुरू होते.
 

" अंजली , माही इथेच राहील, तिला जोपर्यंत बरे नाही वाटत ती इथेच राहील. तिथे आत्याबाई, आई एकट्या आहे , इथे आपण सगळे आहो...तिची नीट काळजी घेऊ शकतो" ......आकाश

" पण??" .........अंजली.

"अंजली,  आकाश बरोबर बोलतो आहे" ........आशुतोष

" ठीक आहे, पण मिरा...??,. ती त्रास देईल त्यांना"  .... अंजली

" तिला घेऊन येतो......आपण आहोत सगळे इथे"  ......आकाश

" ठीक आहे"  ...अंजली

ते ऐकून अर्जुनला थोड बरं वाटले , माही आपल्या नजरसमोर राहील, तिच्याकडे आपण लक्ष देऊ शकतो.....तिची काळजी घेऊ शकतो..मनोमन आकाशला धन्यवाद करणे सुरू होते त्याचे.

" पण, ही अचानक......??" ....नलिनी

" दगदग खूप सुरू आहे तिची, बघितले ना किती काम करते....... ऑफिस, घर, इथले काम, काय काय क्लासेस आहेत तिचे, कामाचा स्ट्रेस असेल.  बरे केले आकाश , तिला इथेच राहू दे, थोडा आराम होईल तिचा..........मी तर म्हणते दोन तीन दिवस राहू दे  तिला इथे, बरं वाटले की मग जाईल ती घरी" ........आजी

" हो....ठीक आहे आजी " ......आकाश

" बरं मी काय म्हणतो, डॉक्टरने तिला आराम करायला सांगितले आहे, आपल्या आवाजामुळे तिला डिस्टर्ब व्हायला नको....आपण बाहेर जाऊन बोलू" .......आशुतोष

" आकाश , माहीला आपल्या रूम मध्ये घेऊन जाऊ...इथे अर्जून सरांना उगाच डिस्टर्ब होईल" ......अंजली

"माही इथेच राहील.......I mean मला डिस्टर्ब नाही होणार....तसेच काही वाटलं तर मी गेस्टरूम मध्ये करेल माझे काम....you don't worry.....let her sleep here only........she needs rest" ...... अर्जुन

" ठीक आहे" ......... आकाश

बाकी सगळे बाहेर निघून आले.......अर्जुन तिथेच साईड टेबलवर आपला लॅपटॉप काढून बसला......पण डोक्यात मात्र तेच विचार सुरू होते...कोण होता?....कुठे दिसला माहीला तो?....सकाळी तर ठीक होती, आताच झालं आहे जे पण झाले आहे ....बाहेरच्या ऑफिसमध्ये गेली होती, म्हणजे बाहेर कुठे बघितले ????? ....त्याला बाहेर जाऊन चेक करायची पण इच्छा झाली होती....पण तिला या अवस्थेत सोडून जायला त्याचे मन धजत नव्हते...तरी त्याने इंटरकॉम फोनवरून बाहेरच्या ऑफिसमध्ये , सेक्युरीटी गार्डकडे थोडी विचारपूस केली...ऑफिसमध्ये ती ठीक होती हेच कळले होते.....अर्जुनच्या डोक्यात विचारांचं तुफान आले होते.....पण माही उठल्या शिवाय काहीच कळणार नव्हते......त्यामुळे तिची वाट बघण्या खेरीज सध्यातरी त्याच्याकडे दुसरे ऑप्शन नव्हते....तो माहिकडेच बघत बसला होता....तिचा चेहरा निस्तेज दिसत होता..आतापर्यंत हसरी खेळती माही , अचानक कोमेजली होती...आपल्या जवळ इतकं सगळं असूनही,  तिची भीती आपण घालाऊ शकत नाही आहोत याचे त्याला वाईट वाटत होते..

" आकाश, तुम्ही अर्जुन सरांना बघितले काय..?खूप टेन्शनमध्ये दिसत होते ते" .....अंजली

" ह्मम....मी पण तोच विचार करतोय" .......आकाश

" अर्जुन सर तर माहीला रागावले नसतील....??..म्हणून तर माही घाबरली नसेल.???...म्हणजे त्यांची day one पासून भांडणं  होत होती ......म्हणून" ........अंजली उगाच विचार करत बोलली

" अंजली....ते तर नॉर्मल आहे त्यांचं.......आणि तो तिला कधीच  काहीच त्रास देऊ शकत नाही......she is his life" ....... आकाश

" क.....काय.....???.....काय म्हणालात तुम्ही..??"  ....अंजली शॉक होत त्याच्याकडे बघत होती...

" हो खरं आहे......bhai loves Mahi ....... मी सांगणारच होतो तुला....पण कामात विसरलो" ....आकाश

" माही पण...??...म्हणजे मला तिने तसे काही सांगितले नाही म्हणून विचारते आहे" .......अंजली

" माहिती नाही, त्याने तिला लग्नासाठी विचारले होते, पण तिने नकार दिला होता...येवढे माहिती मला" ....आकाश

" ह्मम ".....अंजली माहीला अचानक काय झाले याचा विचार करत होती...

" तू काळजी नको करू, आराम झाला की बरे वाटेल तिला...आपण तर आहोच, पण अर्जुन आहे तिच्यासोबत , तो तिला काहीच होऊ देणार नाही" ......आकाश

"ह्मम.....मला तिची खूप काळजी वाटते तिची..तिने खूप वाईट काळ बघितला आहे" .......अंजली

" मला माहिती आहे " ......आकाश

" क....काय" ....?? अंजली

" हो.... माही बद्दल , मिरा बद्दल........सगळं माहिती आहे " ......आकाश

" अर्जुन सर????" ........अंजली

" त्याला पण माहिती सगळं" ..........आकाश

" तरी पण ते.........??" .....अंजली

" हो, तरी सुद्धा त्याच्या तिच्यावरच्या प्रेमामध्ये थोडासाही फरक पडला नाही आहे" ......आकाश

" माझ्या माहीने  खूप भोगले आहे.., आम्ही काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी" ........अंजलीच्या डोळ्यात आता पाणी यायला लागले होते.

" अंजली....तुम्ही तिची सपोर्ट सिस्टिम आहात.....आणि आता अर्जुन आहे तिच्यासोबत ....आता अजिबात काळजी करायची नाही, सगळं ठीक होईल" ..... आकाशने अंजलीला जवळ घेतले आणि  तिला धीर देत होता...

***
" आशुतोष ...तू बघितले काय....?? अर्जुन खूप रागात वाटत होता.....खूप टेन्शन, त्रास दिसत होता त्याचा चेहऱ्यावर...तो शांत होता, चूप होता, पण आतून तो ठीक नव्हता" .........अनन्या काळजीच्या सुरात बोलत होती..

आशुतोष पण तोच विचार करत होता........

" अर्जुनने तर रागावले नसेल माहीला......??" ...अनन्याला सुद्धा तेच प्रश्न पडत होते जे अंजलीला पडले होते...

" आशुतोष.....मी तुझ्यासोबत बोलत आहे"  ......अंजली आशुतोषचे तिच्याकडे लक्ष नाही बघून त्याला हलवत बोलली

" तुझ्या भावाचा चेहराच तसा आहे....रागीट......पण तो नसेल रागावला माहीला ......असेल कुठलं दुसरे ऑफिस मधले वैगरे टेन्शन.......बोलतो मी त्याच्यासोबत" .....आशुतोष, आशुतोष ने वेळ मारून नेली... पण नक्की काय झाले असेल हाच विचार तो सुद्धा करत होता.

" ह्मम" ..,.....अनन्या..

" त्याचा डोळ्यातले प्रेम नाही दिसत यांना....राग मात्र बरोबर दिसतो" .......आशुतोष मनातच विचार करत होता.

***

" अर्जून!"...............आशुतोष अर्जुनच्या रूममध्ये आला

" हा....या आशुतोष" .......तो आपल्या जागेवरून उभा होत बोलला

" अर्जुन, डॉक्टरांनी  सांगितले तेवढेच कारण नाही आहे ,   तू पण स्ट्रेसड दिसत आहे ...काय झालं??"...आशुतोष

" ह्मम.......बाहेर बोलू "...,.म्हणत अर्जुन आणि आशुतोष बाहेर बाल्कनीमध्ये गेले.....अर्जुनने आशुतोषला शोर्टमध्ये काय झाले ते सांगितले......

" तू चेक केले....??" ...आशुतोष

" मी जात होतो बाहेर बघायला....पण ती इतकी जास्ती घाबरली होती की , नाही जाऊ शकलो बाहेर . तुम्हाला फोन करून सांगणार होतो, पण ना तर फोन जवळ होता, आणि  खाली पाहुणे पण होते.......पण आऊट ऑफिसमध्ये आणि सेक्युरिटीला विचारले, पण ती ठीक होती, आणि बाहेरचं कोणी नव्हते आले " .....अर्जुन हताशपणे बोलला..

" ओके....होऊ शकतो तिचा काही भास झाला असेल" ....आशुतोष

" माहिती नाही, पण तिची जी हालत होती त्यावरून तरी तिला भास झाला असे वाटत नाही.....ती आजपर्यंत कधीच अशी , इतकी घाबरली नव्हती. दिवाळीला आग लागली होती तेव्हा सुद्धा ती घाबरली नव्हती......आज तिची अवस्था खूप वाईट होती........मला माझाच खूप राग येतो आहे, मी काही करू शकत नाही आहो. मला तिची ही अवस्था बघवत नाही आहे , I am dieing from inside....I want my happy, childish, smiley, naughty  Mahi back" ......... अर्जून एका हाताने आपल्या डोळ्यांच्या कडा पुसत बोलला..

" अर्जून, ठीक होईल.....ती इथे आहे, आपण लक्ष देऊ शकतो , don't worry" ...... आशुतोष

***

औषधांमुळे, माही ग्लानीत होती..... तिचं  जेवण सुद्धा झाले नव्हते...अंजलीने तिला कसेबसे ज्यूस पाजले होते...आणि  औषध दिले होते, ज्यामुळे तिला परत झोप लागली होती.

अंजलीने आत्याबाई आणि आईला नीट समजावून सांगत मिराला शंतिसदनला सोबत घेऊन आली होती.....मिराला हसतांना खेळतांना बघून अर्जुन थोड्यावेळसाठी त्याचा त्रास विसरला होता......मिराने पण त्याच्यासोबत खूप मस्ती केली होती...त्याच्याच हातून तिला जेवायचे होते....त्याने पण खूप मायेने तिला खाऊ घातले.....अंजलीला त्याचं खूप कौतुक वाटत होते....अंजली सुद्धा सगळ्या सारखीच अर्जुनला घाबरून असायची, पण त्याचं हे दुसरं रूप तिला आज कळलं होते...चेहऱ्यावरून, वागण्यावरून कुठल्याच व्यक्तीचा मनाचा ठाव आपण घेऊ शकत नाही, हेच तिला आज कळले होते...

" अर्जून, थोडे कमी काम देत जा रे त्या पोरीला ....लहान आहे रे ती, काय फार फार तर 22-23 वर्षाची असेल, आपल्या श्रिया येवढीच....पण किती कामं करते, तिची गरज आहे म्हणून इतकं सगळं करते, पण आता ती आपल्याच घरची आहे ...आपण नको काय तिला समजून घ्यायला?" ........आजी

" हो." .......... अर्जून

" पोर तशी गोड आहे, फक्त देणे समजते तिला...कुणाकडून कशीच अपेक्षा नाही... ज्या घरी जाईल,  सुख आनंद वाटेल घरात" ........आजी

आजीचे बोलणे ऐकून अर्जुनच्या डोळ्यात दोन अश्रू जमलेच........आणि माहीबद्दल आजीचे विचार ऐकून त्याला चांगले वाटले.......
अंजलीला सुद्धा भरून आले होते..

" काय झालं अंजली....??? तुझ्या डोळ्यात पाणी...??"  आजी

" ह....काही नाही , असेच आपलं, माहीची काळजी वाटत होती थोडी.....पण आता नाही आहे काळजी" .......अंजली एक नजर अर्जुनवर टाकत डोळे पुसत बोलली...जेव्हा आजी बोलत होती तेव्हा तिला अर्जुनाच्या पण डोळ्यात पाणी दिसले होते, आणि तिला खात्री झाली होती की अर्जुन माहीला काही होऊ देणार नाही, तिची तो खूप काळजी घेईल....,.

" अग काळजी नको करू ती ठीक आहे, थकली आहे ...दोन दिवस आराम झाला की बरं वाटेल तिला...फक्त लक्ष दे दोन दिवस तिला अजिबात घराबाहेर जाऊ नको देऊ......आणि अर्जुन तू पण, तिला दोन चार दिवस सुट्ट्या दे, काम सांगायचं नाही" ....... आजी

" हो आजी" .......अंजली

रात्री जेवतांना सगळे माहीबद्दल बोलत होते..आणि माहीबद्दल आजीचे विचार ऐकून अर्जुनच्या मनावरचा बराच तान कमी झाला होता....

दिवसभर पाहुण्यांची गडबड, काम , सगळेच थकले होते...लवकरच सगळे आपापल्या रूममध्ये आराम करायला गेले..

" आकाश,  मी माही जवळ झोपते आज.....ती रात्रीतून घाबरते कधी कधी" ....अंजली

" भाई आहे तिथे........तू मिराकडे लक्ष दे" ......आकाश

"पण....अर्जुन सर............घरी बाकीचे काय..........म्हणतील?" ........अंजली

" अंजली,  तू अर्जुनवर विश्वास ठेऊ शकते.....तो असं काहीही करणार नाही , आणि तिच्यापासून दूर त्याला  सुद्धा झोप लागणार  नाही.  तिला नजरे समोर ठीक बघून तो तिथे सोफ्यावर झोपेल आहे.....त्याची रूम कॉर्नरमध्ये ,  दूर आहे सगळ्यांच्या रूम पासून   आणि तुला हव तर तू सकाळी जा तिच्या रूममध्ये, तो येईल इकडे......त्याला राहू दे आता तिथे, तुझ्यापेक्षा जास्त चांगली काळजी घेईल तो तिची" ......आकाश

" पण, घरचे काय विचार करतील......??"  अंजली

" कोणाला काही कळणार नाही, तू काळजी नको करू" ....आकाश

" ह्मम......"

***

" आकाश , मी माही जवळ आहो, अंजली ला काही प्रोब्लेम नाही ना ....??....अर्जुन

नाही भाई......तिला माहिती सगळं.......आकाश

Okay...... मिराची काळजी घे......good night ...... अर्जून

Good night भाई.......आकाश

***

अर्जुन तिचा हाथ आपल्या हातात घेत बऱ्याच वेळ तिच्या जवळ बसला तिच्याकडे बघत होता...

" माही, आता मी तुझं काहीही ऐकणार नाही आहो, मला असे हे चोरून तुझ्या जवळ राहायला नाही आवडत आहे. मी आता लवकरच आपल्याबद्दल घरी सांगणार आहो, आता मी तुझ्या होकाराची वाट नाही बघू शकत,  मी तुला असे त्रासात नाही बघू शकत , तुला बरे वाटले की बोलूया आपण" .........अर्जुनने तिच्या हातावर किस केले, तिच्या कपळवरून , केसांमधून मायेने हाथ फिरवला....तिच्या अंगावर पांघरून नीट केले, आणि  बाजूला सोफ्यावर जाऊन झोपला......झोप तर येत नव्हती, तिच्याकडे बघतच  नंतर कधीतरी त्याला झोप लागली.

" प्लीज मला सोडा, मला घरी जाऊ द्या......मला जाऊ द्या" .......आवाजाने अर्जुनला एकदम जाग आली.....बघतो तर पुढे माही झोपेतच आपले पाय पोटाजवळ घेत , बेडवरची चादर हातात घट्ट पकडून रडत रडत बडबडत होती....

"माही " ...... आवाज देतच अर्जुन तिच्या जवळ गेला....

" माही, उठ..... माही मी आहो, उठ" ......अर्जुन तिच्या गालावर हळू हळू चापट मारत तिला जागे करण्याचा प्रयत्न करत होता .... माही मात्र झोपेतच बडबड करत होती...ती खूप घाबरली होती, इतक्या थंडीमध्ये पण ती पूर्णपणे घामाघूम झाली होती......

" माही " ......त्याने थोडा जोराने आवाज दिला, तसे माहीने डोळे उघडले.......आणि अर्जुनकडे बघत होती.....ती ताडकन उठून बसली..

"मला जाऊ दे, मी तुझं काय वाईट केले आहे? जाऊ दे".......माही त्याच्यापुढे हाथ जोडत विनवण्या करत रडतच बेडला मागे मागे टेकत बोलत होती....

" माही....मी आहो अर्जुन, माझ्याकडे बघ.....इथे दुसरे कोणी नाही आहे........ माही , अर्जुन......तुझा अर्जुन" ......त्याने तिचा एक हात आपल्या हातात घेतला आणि  तिचा हाथ स्वतःच्या चेहऱ्यावरून फिरवला..........

त्याच्या स्पर्शाने ती भानावर आली........

" अर्जुन ".........म्हणतच ती त्याच्या गळ्यात हाथ टाकत त्याला बिलगली.... आणि  त्याला खूप घट्ट पकडून घेतले.....

" अर्जुन.......ते...ते मला मारतील, त्याने मला मारले इथे ...इथे गालावर.....ती त्याच्याकडे बघत आपल्या गालाकडे इशारा करत बोलत होती.....खूप मारले त्याने मला, माझे केस पण ओढले.....त्रास होतोय अर्जुन.....मला नीट चालता पण येत नाही आहे .....खूप वेदना होत आहेत......खूप दुखत आहे अर्जुन.......मला खूप दुखत आहे इथे"  ...ती आपल्या पोटाकडे हाथ दाखवत रडतच बोलत होती........

तिचं बोलणं ऐकून त्याचे हृदय दुखायला  लागले,  त्याच्या पण डोळ्यात पाणी जमा होऊ  लागले.....त्याने तिला आपल्या मांडीवर घेत मिठीमध्ये घट्ट पकडून घेतले........तिने पण आपले दोन्ही पाय आपल्या पोटाजवळ घेत, आपले अंग चोरत त्याच्या शर्टच्या कॉलरमध्ये आपला चेहरा लपवण्याची प्रयत्न करत होती......आणि रडतच बडबड करत होती...

" माही, calm down.....इथे कोणी नाही आहे, फक्त मी आणि तू आहोत, कोणीच तुला मारत नाही आहे , मी आहो बघ , तुला काहीच होऊ देणार नाही" ......तिची हनुवटी वर करत तिच्या डोळ्यात बघत तिला ती सुरक्षित आहे याचे आश्वासन देत होता.....

" कोणी नाही.....तो नाही इथे.....??"......माही त्या रूमवर सगळीकडे नजर फिरवत होती...

"नाही .... इथे कोणी नाही.......तू आपल्या घरी आहे".....अर्जुन

" पण.....पण.....तो होता इथे.....मी बघितले त्याला......तो कधी पण येईल.....तो येईल" .......माही

" कुठे होता.....??".....अर्जुन

"तिथे....तिथे खाली" ........ माही

" तिथे ....कुठे???" ......अर्जुन

" इथे..... खाली हॉलमध्ये" ........माही

"काय....??....इथे...??...आपल्या घरात...??..... माही घरात फक्त आपल्या घरातलीच लोक आहेत.....तुला काही भास झाला काय???" ....अर्जुन

" नाही....तो होता इथे.....तो होता....मी खोटं नाही बोलत आहे........होता तो" .......माही, माही खूप पॅनिक झाली होती...

" बरं बरं......शांत हो" .....अर्जुन तिला जवळ घेत तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या बोलण्याचा विचार करत होता..........आणि त्याला काही आठवले.....

" माही.....तू त्याला कधी बघितले....??" ..अर्जुन

" दुपारी....इथे वरती येत होती तेव्हा".......माही

अर्जुनने आपला फोन काढला...त्यात काहीतरी केले नि मोबाईल मध्ये तिला एक फोटो दाखवला..........."माही,  हा आहे तो??? " ......अर्जुन

"नाही" ..............माही

त्याने परत फोन मध्ये काही केले आणि  परत तिला फोटो दाखवला.............माहीने फोन कडे बघितले.....आणि  खूप शक्ती एकवटून तिने त्या फोनला धक्का मारत फोन दूर फेकला.,....

तो फोटो बघून माही परत आधीसारखीच करायला लागली.....परत तिला खूप घाम सुटला......तिने परत अर्जुनच्या गळ्याजवळ कॉलर पकडत होती.......

तो फोटो बघून त्याच्या डोक्यात तिडीक गेली.....

" देवेश".............. अर्जुनच्या आपोआप मुठी आवळल्या गेल्या....हाताच्या नसा फुगून ताठर झाल्या........डोळे लाल झाले...जसे काही ते आग ओकत होते......

" तो येईल परत इथे, परत मारेल मला" ...........माहीच्या आवाजाने अर्जुन भानावर आला........आणि थोडा नॉर्मल झाला.....आताच्या क्षणाला माहीला संभाळणे जास्ती गरजेचे होते.........

" मला सोडून जाऊ नका " ......ती त्याच्या कुशीतच बडबड करत होती......ती परत जर पॅनिक झाली तर डॉक्टरांनी एक गोळी द्यायला सांगितली होती......अर्जुनने तिला ती गोळी दिली....आणि  आपल्या हाताने पाणी पाजले.....तिला आपल्या मांडीवर घेऊन बसत तिच्या पाठीवरून हात फिरवत होता.....,थोड्या वेळाने ती शांत झाली....तिला झोपलेले बघून त्याने तिला बेडवर नीट झोपवले आणि  पांघरून देऊन सोफ्याकडे जायला वळला.....तेव्हढ्यात मागून तिने त्याचा हाथ पकडला....,

" मला सोडून जाऊ नका " .........तिच्या आवाजाने तो मागे वळला...तिच्या डोळ्यात त्याला खूप भीती दिसत होती.......तो परत मागे वळला......आणि  तिच्या शेजारी जाऊन बसला.......

" मी इथेच आहे.......झोप" .......तिच्या माथ्यावर थोपटत बोलला

" मला तुमच्या जवळ घ्या.....मला तुमच्या जवळ राहायचं....मला तुमच्या जवळ घ्या" .........माही बडबडत होती

अर्जुनने तिचे पांघरून वर करत तिच्या शेजारी जाऊन झोपला.....तिच्या मानेखालून आपला एक हाथ टाकत तिचं डोकं आपल्या हातावर घेतले.....तिला आपल्या कुशीत घेत...अंगावरून पांघरून नीट केले.....

" झोप शांत.....तुला सोडून कुठेच जात नाही आहो".....त्याने तिच्या कपाळावर किस करत तिच्या भोवती आपली मिठी घट्ट केली......तिने सुद्धा त्याचा कंबरेमध्ये हाथ घालून त्याला घट्ट पकडून ठेवले.....आता हळू हळू ती झोपत होती.......अर्जुन मात्र आपल्याच विचारात गढला होता..

" देवेश.......you need to pay for this........

****

क्रमशः


******

✨????निरोगी आरोग्याला साद!
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा???? ✨

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️