Jan 27, 2022
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 58

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 58

भाग 58
 

" ड्रॉवरकडे असे बघत बसल्याने ते आपोआप उघडत नसते......you can open it, you don't need any permission here in my,....sorry in our room"............ मागून एक आवाज आला.....

"खरंच.....मी उघडू शकते हे ड्रॉवर??" ........ माही आनंदाने  बोलली, पण तिला हे नव्हते कळले की पाठीमागून कोणी आपल्यासोबत बोलत आहे...

" Yess , you can." ......

माहीने लगेच ड्रॉवर ओपन केले....... आणि  ते बघून तर ती अजुनच शॉक झाली....

" हे.??...हे......तर माझ्या केसांचे क्लच पिन आहेत.....पण हे इथे काय करत आहेत??".........तिथे ठेवलेल्या जवळपास आठ - दहा क्लच पिन बघून ती बोलली....बोलतच होती की तिच्या लक्षात आले की आपण आता कुणातरी सोबत बोललो....त्यानेच आपल्याला ड्रॉवर उघडायची परमिशन दिली होती........

" अर्जुन सर.??"..... आपल्या चेहऱ्यावरून हाथ फिरवत  ती मागे वळली......

"त.... त....... तूम्ही???....तुम्ही इथे काय करत आहात...??" .... माही

"का.....?.....मी इथे का नाही येऊ शकत?.....ही माझी सुद्धा रूम आहे" ..........अर्जुन , जो नुकताच शॉवर घेऊन बाहेर आला होता....तो हळू हळू चालत माही जवळ जात बोलत होता......आणि त्याने तिच्या पुढे येत आपलं डोकं/केस  हलवले......त्यामुळे त्याच्या केसांमधले  पाण्याचे तुषार  तिच्या चेहऱ्यावर उडाले होते.....

आधीच तो तिच्या जवळ आला होता, त्यामुळेच तिचे हर्ट बिट्स वाढले होते, त्यात त्याचे हे असे वागणे .....तिला तर सगळेच सुचेनासे बंद झाले होते......आणि आता बघता बघता तिच्या लक्षात आले की त्याने कंबरेभोवती टॉवेल गुंडाळला  होता , आणि वरती  गळ्यामध्ये एक  टॉवेल होता.....तो नुकताच आंघोळ करून आला होता.....केस आणि अंगही त्याने नीट पुसले नव्हते...... त्याला बघून तिने आपले डोळे गच्च मिटले ......पण त्यातही त्याच्या बॉडीचा फ्रेश मेंथोलचा सुगंध....... तिला वेड लावत होता ......हृदयात होणारी धडधड तिला वेगळाच त्रास देत होती.....त्यात तो असा जवळ.......काय करावं तिला काहीच कळत नव्हते.........अर्जुनने तिच्या नकळत जाऊन रूमचा दरवाजा बंद करत परत तिच्या जवळ येऊन उभा राहिला..

" तू अशी नेहमीच मला बघून डोळे का मिटते ....??" .....अर्जुन

"ते......ते.....तुम्ही उघडे.......ते तुम्ही शर्टलेस आहात" ..,......माही अडखळत बोलत होती...

" हो तर मग काय होतंय त्याने ?? मी काय वेगळा दिसतोय काय?? की मी तुला आवडत नाही असा ?" ...  अर्जुन

" हो.....नाही......म्हणजे हो"..........माही

" हळदीच्या दिवशी आली होती तु माझ्या मिठीमध्ये.....तेव्हाही मी असाच होतो"........म्हणतच त्याने त्याच्या गळ्यातला टॉवेल काढत तिच्या भोवती टाकत टॉवेलला ओढत त्याने तिला परत आपल्या जवळ ओढले होते......तिला सुद्धा काय झालंय न कळल्याने त्याच्या कुशीत जाऊन आदळली होती.........जशी ती त्याच्या जवळ आली, त्याने तिच्या कंबरेमध्ये हाथ घालत तिला आपल्या मिठीत फिक्स केले........ती त्याचा मिठीतुन सुटायचा प्रयत्न करत होती......पण त्याच्या मजबूत पकडमध्ये माहीचे नाजूक जोर कमी पडत होता.......

" त...तेव्हा वेगळं होत....मी भानावर नव्हती .......".........माही कशीबशी बोलली....

"मग आता पण विसरून जा स्वतःला , माझ्या नजरेने बघ माझी माही ......आणि काहीच वेगळं नव्हतं, तेव्हा पण आता पण......तेव्हा पण मी तुझाच अर्जुन होतो, आता पण मी तुझाच अर्जुन आहे.......फरक येवढाच आहे त्या दिवशी तू स्वतःहून आली होती माझ्या मिठीत, आज मी घेतले आहे तुला माझ्या मिठीमध्ये....माझ्या बायकोला घेतले आहे मी जवळ" ............ अर्जून हळूवारपणे खूप प्रेमाने बोलत होता......त्याचे एक एक शब्द तिच्यावर जसे काही जादू करत होते......आतापर्यंत त्याच्या मिठीमधून सुटायचा तिचा होणारा प्रयत्न अचानक कमी होत होता.....ती चुपचाप त्याच्या छातीवर डोकं टेकून खाली बघत उभी होती.......
थोडा वेळ तसाच शांततेत गेला...

" प्लीज सोडा मला.....कोणी बघेल, कोणी येईल......?" .... माही

" दार बंद आहे.....कोणी नाही बघणार.....आणि तसेही  सगळे कामात बिझी आहेत " ........अर्जुन

" दार का बंद केले?" ........... माही

" तुला  भीती वाटते आहे  माझी ?  " .... अर्जुन

" नाही .... "..... माही

" मग ??" ..... अर्जुन

माही काहीच बोलत नाही....

" मला माझ्या माही सोबत थोडा वेळ घालवायचा होता, म्हणून बंद केले दार " ........अर्जुन

" कोणी असं उघडं फिरत काय....??..घरात मुली बायका येत असतात" ........ माही

"आपली रूम आहे..... आपल्या रूममध्ये मी कसाही राहू शकतो........आणि काळजी नको करू,  मी फक्त माझ्या बायको पुढेच असा येत असतो....., येऊ शकतो ना...??" ...अर्जुन , 

" आपली....???" .... माही

" हम, आपली....आता ही आपली रूम आहे......मी तुझा, रूम पण तुझी........आणि हो तू इथे कधीही येऊ शकते, इथे यायला तुला कुणाच्या परमिशनची गरज नाही आहे.....आणि तू कुठे ही हात लावू शकतेस.....अगदी हे कपाट सुद्धा" .........अर्जुन

" माही , मला माझी प्रत्येक सकाळ अशी तुझ्यासोबत हवी आहे.......तुझा हा गोड चेहरा बघुन उठायचे आहे..... बोल ना,  कधी येतेस माझ्याजवळ.??" ......अर्जुन,
त्याने तिच्या कपाळ पासून खाली येत कानाजवळ फुंकर मारली......... त्याचं असे करण्याने तिच्या अंगावर शहारे आले.....आणि  नकळत तिचे हाथ सुद्धा त्याच्या भोवती घट्ट झालेत....... तिची घट्ट झालेली मिठी अनुभवून  त्याला हसायला आले...

"वेडाबई, एका फुंकरमध्ये पिघळतेस.....किती दिवस असा माझा राग धरून ठेऊ शकणार आहेस तू?......तुला जवळ घेण्यासाठी जास्ती काहीच करावं लागणार नाही मला......माझ्या एका स्पर्शाने तू पूर्ण माझ्यामध्ये विरघळून जाशील.....इतकं तुझं प्रेम आहे माझ्यावर..........पण मला ते नकोय......मला तू पूर्ण तुझ्या  मनापासून माझ्या जवळ हवी आहेस......आणि  त्यासाठी मी  तुझी  वाट बघू शकतो..........माझं तुझ्या शरीरावर नाही तर तुझ्या मनावर प्रेम आहे.....आणि मला तुझं मन जपायचे आहे..... तुला सांभाळायचं आहे" ......विचार करतच त्याने त्याची मिठी  टाईट केली, आणि  तिच्या डोक्यावर केसांवर किस केले....

" सर..... सर प्लीज सोडा ना........मला करंट लागतोय" ........ माही

" हा हा हा हा ...."....... माहीचे बोलणे ऐकून अर्जुनला खूप हसायला आले.......अर्जुनने तिला सोडले आणि  थोडा मागे झाला...

" कसली ग  गोडंबी तू ...... कसं व्हायचं माझं.....अर्जुन साहेब अवघड आहे तुमचं या रसगुल्ला पुढे" ........... म्हणतच अर्जुनने तिचे गाल आपल्या चिमटीमध्ये धरत ओढले.....

" गोडंबी.......??" ...माही नाकाची एक साईड वर करत अर्जुनकडे बघत होती..... " हे अचानक काय झाले सरांना...आधी खडूस, मग अकडू,  मग केरिंग, मग रोमँटिक वरून हे असे अजब गोडंबी वैगरे वाले रूप कसे काय आले? .......हा खडूस अर्जुन असा अजब गजब का वागतोय? .........माही अर्जुनकडे बघत मनातच विचार करत होती.....

"मी लहान होतो तेव्हा आई मला अशीच गोडंबा वैगरे काही काही म्हणत माझा लाड करायची......मला पण वाटायचे आई हे असे अजीब शब्द कशी काय बोलते लाड करतांना, पण आता कळले.....हे असे क्यूट ढेमसं समोर असेल तर आपोआपच येतात असे शब्द"........अर्जुन

"ढेमसं...... ई sss"...... माही

"तुला माहिती तू अंक  मिरा दोघीही सारख्या आहात.....निरागस, निष्पाप....खूप गोड......l am so lucky having you and Mira in my life" ........ अर्जुन  परत तिच्या जवळ जात हळूच तिच्या गालावर किस केले.......

" परत........??" ....माही त्याने किस केलेल्या गालावर हाथ ठेवत तिच्याकडे बघत होता....

" यार माही , इतकं तर करूच शकतो....you don't even imagine how I am controlling myself to stay away from you , really it's very difficult.........first time I am in  Love..... आणि  प्रेमात माणूस वेडा होतो ते ऐकले होते......पण आता खरंच ते अनुभवतो आहो......नाहीतर हे असे बोलणे, असे वागणे मी कधीच केले नव्हते.....आणि दुसरे करायचे तर मला खूप अजीब सुद्धा वाटायचं....की लोकं अशी कशी डोकं बाजूला ठेऊन वागतात......पण आता कळते आहे ते " ........त्याने कपाटातून टीशर्ट काढली आणि  घालतच बोलत होता.....माही तर फक्त त्याच्याकडे बघत त्याचं बोलणं ऐकत होती.....तो असे त्याच्या लहानपणीचे, त्याच्या मनातले, त्याचा भावना असा पहिल्यांदा नॉर्मल माणसा सारखा बोलत होता.......नॉर्मल गप्पा करत होता......तिला पण त्याला तसे बघून खूप छान वाटत होते...

बोलता बोलता त्याचं लक्ष तिच्याकडे गेले....तर ती त्याला बघत तिच्याच विचारांमध्ये हरवलेली दिसली..

" काय झालं....??" .....अर्जुन

" ह......काही नाही" ....... माही

" तू लग्नासाठी  कधी होकार देशील ...??" ...... अर्जून

" माहिती नाही " ........माही

" Not bad......... good progress...... अटलिस्ट नाही तरी नाही म्हणाली" ..........अर्जुन तिच्या डोळ्यात बघत मिश्कीलपणे हसत बोलला..

" असे काही नाही आहे"  ..........माही

" Oh really...... माझी आठवण येत होती ना.??....... म्हणून आली होती ना इथे??" ......अर्जुन

त्याच्या बोलण्याने माहीला आठवले ती त्याच्या रूममध्ये का आली होती.......नाहीतर आतापर्यंत तर ती सगळेच विसरली होती...

"मी तर विसरलेच.....ते....ते....काकी ती फाईल" ......आणि परत तिला अचानक काही आठवले....

" ते.....माझ्या केसांचे क्लच , ते पण येवढे , तिथे ड्रॉवर मध्ये.......????" ..... माही

" ते sss...........

" तुम्ही आता त्याचा पण बिझनेस सुरू करणार आहात काय......??......पण....पण माझे क्लच परत करा.....तुम्ही दुसरे घ्या ...मार्केटमध्ये मिळतात खूप" ........माही

अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला............" तरीच वाटलं The real Mahi आतापर्यंत जागी कशी नाही झाली?........तुला excellency चा अवॉर्ड कसा काय मिळाला ना कधी कधी मलाच डाऊट येतो"........अर्जुन कसेतरी नजरेने तिच्याकडे बघत होता.....

" मग हे, इथे कसे?".........माही

" तू तर मला किस करू देत नाही.....मग मी त्यांनाच किस करतो"..........अर्जुन

" ह्या......??".....माही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती

" बावळट..........तुझेच आहेत ते.......तुझ्या केसंमधून काढलेले.......तुझे मोकळे केस आवडतात मला म्हणून काढले आहे ना मी बरेचदा......तुला आठवत नाही काय???" .....अर्जुन

" ते....तुम्ही ......जवळ........आ.....आल्यावर माझं डोकं कुठे काम करते.........मला माहिती नाही असे का होते पण असेच होते......डोक्यात सगळं काळ काळ होऊन जाते" .............माहीचा चेहरा आता खूप बिचारा झाला होता.......... परत तिचा क्यूट फेस बघून अर्जुन गालात हसला

" Bcoz.....you love me.....you want to feel me whenever I am around you......you want to only think about me " ....... म्हणत परत तो तिच्या जवळ आला.......ती परत त्याच्या डोळ्यात हरवली...

" मग इथे का आली होती?.......काही काम होते काय....??".... अर्जून

"अ.....हो........ते काकीनी फाईल मागितली होती"........माही

" ओके".......म्हणत त्याने ड्रॉवरच्या खालच्या सेक्शन मधून फाईल काढून माहीच्या हातात दिली..

"Thank you...... म्हणत ती रूमच्या बाहेर जायला निघाली, आणि  परत काहीतरी आठवत परत अर्जुन जवळ आली......

"काय...?? "........अर्जुनने भुवया वरती करत डोळ्यांनीच तिला विचारले...

"तुम्ही फाईल नीट चेक केली ना....? ते बेस्ट टेन डिझाईन्स सिलेक्ट केले ना?? आणि तुमची साइन.....तुम्ही पेपर साइन केले काय...???"  ......माही

" तुला माझ्या जवळच रहावेसे वाटते आहे ना?" ........अर्जुन मस्करी करत बोलत होता..

" हां....???".......माही

" मग नेहमीच  हे असे स्टुपिड कारण घेऊन का येते????"........अर्जुन

"नाही......खरंच..... काकिंनी सांगितले होते विचारायला" ....... माही

"Okay......then let me check them once" .......म्हणतच तिच्या जवळ जात तिच्या पाठीमागून आपले दोन्ही हात पुढे करत तिच्या हातातच फाईलचे एक एक पेज चेक करत होता.......चेक काय करत होता, चेक करायचे नाटक करत होता.....तेवढेच तिला मिठीमध्ये घेण्याचा त्याला चांस मिळाला होता.....

" खूप सुरक्षित वाटते तुम्ही असे जवळ असलात की......तुमची मिठी जगातली सगळ्यात safe place आहे माझ्यासाठी.......तुमच्या स्पर्शात पण खूप काळजी जाणवते.....कुठेच वासनेचा लवलेशही नाही...... काश दूनियेमधली सगळी मुलं तुमच्यासारखी असती.....माझ्यासारख्या माही कधीच कुचकरल्या गेल्या नसत्या....... काश त्याने पण थोडा विचार केला असता.......ताठ मानेने तुमच्या आयुष्यामध्ये आले असते....कोणालाही माझ्यावर आणि  माझ्यामुळे तुमच्यावर बोट उचलण्यासाठी चुकूनही चांस मिळाला नसता.......तुमचं नाव Arjun Patwardhan माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे......तुमच्या नावावर थोडासुद्धा चिखल उडवलेला मला चालणार नाही......सत्य कितीही लपवले तरी ते कधीना कधी बाहेर येणारच, त्यात ही अशी घृणास्पद गोष्ट लपून सुद्धा राहत नाही....खूप भीती वाटते ही जर बाहेर आली तर.........??.....तुमच्या पासून दूर जावं लागलं तर....??.....कशी जगेल मी तुमच्या शिवाय......आता कमीतकमी तुम्ही माझ्या अवतीभोवती तरी आहात.......हे सगळे बाहेर माहिती झाले तर?? ....तर कल्पना पण नाही करवत आहे ....स्वार्थी झाले आहे मी अर्जुन......तुम्हाला गमावण्याची शक्ती आता माझ्यामध्ये नाही आहे.......म्हणून लग्नसाठी हो म्हणायला मन पुढे धजत नाही आहे , दूर पळते आहे तुमच्यापासून....तुमच्या जवळ राहण्यासाठी.......माफ करा मला अर्जुन "..........मनात विचार करत परत जुनी गोष्ट आठवून तिचं मन भरून आले....तिच्या डोळ्यात दोन अश्रू जमा झालेच होते........ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून  एकटक अर्जूनकडे  बघत मनातच बोलत होती.....अर्जुन फाईल बघत होता.....त्याचे सुकलेले केस , अस्ताव्यस्त कपाळावर येत होते आणि तो मधून मधून केसांमध्ये एक हात टाकत ते मागे  करत होता.. ..... ती त्यालाच बघत होती, त्याला बघतांना तिचे  मन कधीच भरायचे नाही....

" काय झालं....?? " अर्जुनचे लक्ष माहीकडे गेले.....आणि  तिच्या डोळ्यातले पाणी त्याला दिसले...

डोळे पुसत तिने नाही म्हणून हसत मान हलवली

" तुम्ही हे मुद्दाम करत आहात ना....???" .......माही

" काय.....??".....अर्जुन

" हेच.......फाईल चेक करायचं नाटक......??" .... माही

अर्जुन हसला...." तर तुला कळले ......, तुला तर माहिती आहेच मी कुठली पण फाईल पूर्ण स्टडी केल्याशिवाय पुढे पाठवत नाही......तरी तू परत मला विचारायला आली.......मग आता बायकोने काही म्हटल्यावर तिचं ऐकायला नको काय....??....."..अर्जुन, अर्जुनला तिला बघून कळलं होत ती त्याचाच विचार करते आहे आणि तिला जुने  काही आठवले आहे ते.....तिला हसावण्याठी म्हणून तो तिची मस्करी करत होता...

"तुम्हाला नाटक सुद्धा करता येत नाही".......त्याच्या हातातून फाईल घेत तिने तिचा हात त्याच्या केसांमध्ये   घालत परत ते अस्ताव्यस्त केले....... "नेहमीच परफेक्ट दिसायला हवे असे काही नाही, कधी कधी असे पण क्यूट दिसता"....हसत त्याच्याकडे बघत , फाईल घेऊन माही बाहेर निघून गेली.......

"you are mad Arjun.... completely mad for her."........ तिच्या अश्या वागण्याने तो स्वतःतच खूप लाजला होता.....ओठांवर आपोआपच हसू आले होते.....तो परत परत आपले केस अस्ताव्यस्त करत स्वतःला  आरसामध्ये वेगवेगळ्या अँगलने बघत होता......त्याला स्वतःची च खूप गंमत वाटत होती....तो असा कधीच वागला नव्हता..

********

माही फाईल नलिनीला दाखऊन बाहेर ड्रेस डिझायनिंगच्या ऑफिसमध्ये जे तिथेच मागच्या बाजूला होते तिथे बायकांना काम समजावयला, आणि थोडेफार जे काम होते करायला निघून गेली...

इकडे सगळी तयारी झाली होती.......पाहुणे मंडळी सुद्धा आले होते.....देवेश, देवेशचे आईवडील, देवेशचा मोठा भाऊ आणि त्याची बायको......पटवर्धन फॅमिलीने सगळ्यांचे आदरपूर्वक  स्वागत केले..... जेवणं आटोपून, अश्याच अवांतर गप्पा झाल्या.....अर्जुन थोड्या वेळ तिथे थांबला होता......त्याला त्यांच्या गप्पांमध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता..... ऑफिसच्या कामाचं कारण सांगून तो वरती आपल्या रूममध्ये निघून आला....

" आजिसहेब, देवशचा जॉब आता पक्का झाला आहे, त्यात आमच्या मोठ्या मुलाचा बिझनेस सुद्धा आता छान सुरू आहे ....आणि श्रियाचे पण या उन्हाळ्यामध्ये शिक्षण पूर्ण होते आहे....तर मला असे वाटते की आपण या दोघांच्या लग्नाचा आता विचार करू शकतो" .......देवेशची आई

"अरे वाह छान......अशीच प्रगती होऊ द्या" .......आजी

"सॉरी मध्ये बोलतोय, पण मला वाटते की श्रियाने आधी आपल्या पायावर उभे व्हावे......तिला जॉब करायचा आहे ......तर शिक्षणानंतर जर तिने आधी थोड त्याकडे लक्ष दिले तर बरं होईल"........आकाश

" हो, आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तिचा जॉब करण्याचा." ......देवेश आई

" ते तर तिला कधीही मिळू शकतो.....तुमच्या स्वतःच्याच तर एवढया कंपनी आहेत......मला तर वाटते तिने हे जॉब वैगरे  करण्यापेक्षा तुमचा एखादा बिझनेस जॉईन करावा" .....देवेश

" ह्मम....पण तिचीच इच्छा आहे की तिला आपल्या कंपनी सोडून बाहेर स्वबळावर काही करायचे" .....मामा,  श्रियाचे बाबा

" हो, मला तिने मला सुद्धा असेच सांगितले आहे" ....देवेश

अंजली, श्रिया बाकी महिला मंडळ आपले किचन काम आटोपून सगळ्यांसोबत येऊन बसले

" ठीक आहे जशी तुमची इच्छा, पण मग लग्न नाही तर कमीत कमी आपण साखरपुडा करू शकतो" .....देवेशची  आई

साखरपुड्याचे नाव ऐकून श्रियाला लाजल्या सारखे झाले.

" बरं ठीक आहे, आम्ही सगळे घरी सगळे विचार विनिमय करतो आणि तुम्हाला  ठरवून सांगतो.......तुम्ही पण सगळे विचार करा" .......आजी

" हो चालेल" .........देवेश आई

अशा बऱ्याच त्यांच्या , काही लग्नाच्या, जॉबच्या , बिझनेसच्या अवांतर गप्पा सुरू होत्या....

माही आपलं काम आटोपून फाईल परत द्यायची म्हणून घरात यायला निघाली होती.....समोर  कार बघून तिच्या लक्षात आले की पाहुणे आले असणार.....उगाच त्यांच्या पुढे आपण बाहेरच नको म्हणून मग ती घराच्या मागच्या दारातून आतमध्ये आली......आणि वरती नलिनीच्या रूममध्ये फाईल ठेवायला जात होती......रूमकडे जाता जाता तिला गप्पा गोष्टींचा आवाज आला , आणि सहज श्रियाचा होणारा नवरा कोण म्हणून तिने कुतूहलाने खाली बघितले.......आणि जसे तिने खाली बघितले तिचे अंग थरथर कापायला लागले....डोळ्यात पाणी साचायला लागले.......तिच्या हातातली फाईल खाली पडली.....फाईलचा आवाज झाला तशी ती भानावर आली......तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडणारच की तिने आपल्या दोन्ही हातांनी आपलं तोंड गच्च  दाबून धरले आणि  घाबरतच कोणी बघू नये म्हणून पुल साईडला पळत सुटली....

अर्जुन पुल साइडला टेबलवर लॅपटॉप मध्ये काही काम करत बसला होता.....काम करता करता त्याच लक्ष पुढे गेले......

" माही ! " ...........म्हणतच तो त्याच्या जागेवरून उठून उभा राहिला......माही मागे बघत बघतच पुढे धावत येत होती.....आणि अर्जुनवर जाऊन आदळली.....

" अर्जुन !" .........तिच्या तोंडून त्याचं  नाव बाहेर आले...........रडतच ती त्याच्याकडे बघत होती, तिच्या कपाळावर खूप घाम जमा झाला होता......तिने त्याच्या शर्टाची कॉलर पकडली आणि ती स्वतःच अंग चोरुन घेत त्याच्या कुशीत त्याच्या शर्टमध्ये आपला चेहरा घुसवत होती....ती पूर्णपणे स्वतःला त्याच्या हातांमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करत होती....तिच्या अंगाचा  सगळीकडून तिला फक्त अर्जुन हवा होता.......

तिचं अंग थरथरत आहे त्याला जाणवत होते....तिला तसे घाबरलेले बघून त्याने तिला स्वतःजवळ घेत आपल्या हातामध्ये घट्ट पकडून धरले....

"माही.........काय झालं??? कोणी काही बोलले काय?? काय झालं घाबरायला??? कोणी रागावले काय??"..... अर्जुन तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलत होता.....

ती काहीच न बोलता तिचे डोकं  त्याच्या छातीवर घासत त्याला परत परत घट्ट पकडत होती....ती इतकी त्याला घट्ट पकडत होती की आता त्याच्या मानेला तिचे नखं रुतत  होते........इतकी ती घाबरली होती........तिच्या  होणाऱ्या या  स्पर्शाने त्याला काहीतरी वाईट घडले आहे हे कळायला लागले होते.....आजपर्यंत माही कधीच इतकी घाबरलेली त्याला दिसली नवहती....ती अशी कधीच वागली नव्हती........आणि आता तो पण घाबरला होता....

" माही ...इकडे बघ.....माझ्याकडे, मला सांग काय झालं आहे....??.....हे बघ मी तुझ्याच जवळ आहो"...अर्जुन बोलत होता तरीसुद्धा ती वर बघत नव्हती , तिचं तसेच सुरू होते ......" माही...... इकडे बघ" ......म्हणत त्याने तिला आपल्या एका हाताने पकडून घेत, दुसऱ्या हाताने तिचा चेहरा वर केला.........आणि  तिच्या डोळ्यात बघितले तर त्याला सेम त्या वेदना  दिसत होत्या  ज्या  त्याने पहिल्यांदा माहीला नाशिकला बघितले होते,  तेच दुःख , तोच त्रास त्याला तिच्या डोळ्यामध्ये दिसत होते..........आणि आता त्याच्या पण हृदयात धडकी भरली होती..

" माही...... माही काय झालं आहे.......??" ...आता तो थोड्या  कडक आवाजात तिला स्वतःपुढे सरळ उभ करत बोलला...

"  तो......तो.." ......तिच्या गळ्यातून आवाज सुद्धा निघत नव्हता...ती हाताने मागे काही इशारा करत बोलण्याचा प्रयत्न करत होती......, तिला नीट  बोलता ही येत नव्हते......डोळ्यातून पाणी सतत वाहत होते......"तो ......तो......

" तू त्याला बघितले.....??"......अर्जुन

माहीने  होकारार्थी मान हलवली...........अर्जुनच्या हाताच्या मुठी आपोआप आवळल्या गेल्या.....आणि  तो बघायला म्हणून पुढे जात होता तेवढयात माहीने परत जाऊन त्याला पकडून घेतले.......आणि  त्याचा कुशीमध्ये त्याला बिलगली...

"म...... मला.......मला......सोडून जाऊ नका........तो.....तो....परत येईल..........तो परत मला हात लावेल.......नाही.......नाही......मला एकटीला सोडून जाऊ नका.......मला सोडून जाऊ नका........तो परत मला त्रास देईल........तो परत माझ्या शरीराला ओरबडेल........जाऊ नका......मला तुमच्या जवळ रहायचं........मला तुमच्या जवळ घ्या......खूप जवळ घ्या......मी कोणाला दिसायला नको......मला लपवा....मला कोणी बघायला नको.........मला सोडु नका.....प्लीज मला सोडु नका" .......ती त्याच्या शर्टमध्ये आपलं तोंड लपवत, रडत रडत, हुंदके देत बोलत होती.........तिच्या या असहाय्य त्रासाने अर्जुनला सुद्धा त्याच्या हृदयावर कोणी तलवारीने घाव घालत आहे असे वाटत होतं........तिला होणारा त्रास आता त्याला सुद्धा असहाय्य होत होता.....तिला त्या दिवशी झालेला त्रास आता त्याला फील होत होता.....तिच्या आवाजात इतक्या वेदना होत्या  की त्यादिवशी ती किती पेन मध्ये होती तो फील करू शकत होता.......

" माही ....... See I am here ....with you  .........मी तुला अजिबात माझ्यापासून वेगळं करणार  नाही आहे ....".....त्याने तिला आपल्या मिठीमध्ये इतकं घट्ट पकडून घेतले की तिला फक्त त्याचाच स्पर्श जाणवला पाहिजे....हवा सुद्धा तिला स्पर्श करू शकत नव्हती ...इतकं त्याने तिला जवळ घेतले होते.......तो तिच्या सोबत आहे,  ती एकटी नाही....तो वारंवार तिच्या कपाळावर , गालावर किस करत तिला आपल्या कुशीत घेत होता.......

*******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️