तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 57

माही अर्जुन

भाग 57

माही आपल्या जागेवर येऊन बसली.......स्टेज परफॉर्मन्स सुरू होते....माहीच्या फ्रेंड्सने  तिला डान्स साठी विचारले होते, दोन दिवस तिने प्रॅक्टिस सुद्धा केली होती....पण हे मध्येच अर्जुनने तिच्या कोर्ट मरिएजचे मध्येच आले त्यात वारंवार नलीनीने बोलणे तिला आठवत होते, नाही म्हटले तरी त्यांच्या बोलण्यामुळे  ती डिस्टर्ब झाली होतीच , त्यामुळे  तिचे  लक्ष डान्समध्ये लागत नव्हते, म्हणून तिने बॅकआउट केले होते......थोड्या वेळाने अर्जुन तिला येताना दिसला.......तिचे  सगळं लक्ष अर्जुनकडेच होते.....कधी अर्जुनकडे तर कधी त्याने तिच्या हातात घातलेल्या ब्रेसलेटकडे ती बघत आपल्याच विश्वात हरवली होती..

आता अवॉर्ड देणे सुरू झाले होते... प्रत्येक  टीमचे मॅनेजर त्यांच्या टीम मेंबरला  अवॉर्ड देत होते.....बऱ्यापैकी सगळेच अवॉर्ड देणे आटोपत आले होते.....आता शेवटचे स्टार परफॉर्मन्सचे काही अवॉर्ड राहिले होते....ते द्यायला अर्जुनला स्टेजवर बोलावण्यात आले होते.....हेच दोन तीन काही अवॉर्ड होते जे अर्जून स्वतः  देत होता.......कारण या लोकांनी त्यांच्या क्षमते पेक्षा वर उठून चांगले काम केले असते आणि त्याचा कंपनीला सुद्धा खूप चांगला फायदा झालेला असतो.....

" And the most standout performance employee of the year goes to Ms Maahi Desai"  .... अँकरने नाव अंनाउन्स केले...........

माहीने खरंच  खूप मेहनत घेतली होती.....पहिल्या दिवशी जॉईन झालेली माही आणि  आजची माही,  या दोघींच्या कामाच्या लेव्हलमध्ये खूप जमीन आसमानचे अंतर होते.....आता तिचा कॉन्फिडन्स खूप वाढला होता, इंग्लिश बोलायला ती शिकली होती, ज्वेलरी डिझायनिंगमध्ये तर तिचा चांगलाच हातखंडा बसला  होता. तिचे  कॅलेंडर प्रोजेक्ट पण हिट झाले होते ......

माहीचे नाव ऐकून अर्जुनला सुद्धा खूप आनंद झाला ...त्याच्या डोळ्यापुढे पहिल्यांदा भेटलेली माही ते आतापर्यंतची माही , सगळ्या आठवणी डोळ्यांपुढे पटापट सरकत होती.........तो आपले दोन्ही हात  खिशात  घालून   स्टेजवर पुढे बसलेल्या माहीकडे बघत होता......आणि  तिला बघून त्याच्या ओठांवर एक हलकीशी स्मायल आली .....नेहमी प्रमाणेच  ती त्याला गोंधळलेली दिसत होती......तिच्यामध्ये बराच बदल झाला असला तरी तिचा हा बावळटपणा , धांदरटपणा जसाच्या तसा होता...... त्याचंच त्याला जाम कौतुक वाटत होते.... माही कितीही पुढे गेली तरी तिचा हा कार्टूनपणा बदलणार नाही, तो शंभर टक्के शुअर होता...

अचानकपणे माहीचे नाव ऐकून माही फारच गोंधळली होती....तिच्या पोटात गोळाच आला होता.........तिने असं काही होईल विचार केला नव्हता....तिला या कंपनीमध्ये येऊन १०-११ महिने झाले होते.....त्यामुळे आपल्याला काही असा अवॉर्ड वैगरे मिळेल , तिच्या ध्यानीमनीही नव्हते....

" माही.....जा .. तुझं नाव अंनाउन्स झाले आहे" .......अंजली

" अ......हो" ...ती थोडी घाबरली होती.... असं सगळ्यांसमोर इतक्या लोकांमध्ये स्टेजवर जायला तिला थोडी भिती वाटत होती........भांबावलेल्या नजरेने तिने पुढे स्टेजवर बघितले.......तर तिला अर्जुन दिसला....तिच्याकडे बघत असलेला....... तिचं नरवसनेस त्याला कळत होते.....त्याने डोळ्यांनीच तिला ' calm down....and come here ' असा इशारा केला......त्याच्याकडे बघून तिला बऱ्यापैकी धीर आला ....आणि  ती जागेवरून उठून स्टेजवर जात होती......टाळ्यांच्या जल्लोष आणि डोळ्यांपुढे   अर्जुन......आता तिला ती सातव्या आसमानवर असल्यासारखे वाटत होते..... अर्जुनकडे बघत एक   एक पाऊल पुढे टाकतांना तिला तिचा कॉन्फिडन्स वाढल्यासारखा वाटत होता......

" सो welcome Ms Maahi Desai.........the star performer of the year........I am requesting Mr Arjun Patwardhan, please present the award" ........ अँकर

एका बाईने  अर्जुन जवळ एक ट्रॉफी आणि एक सर्टिफिकेट आणून दिले..... अर्जूनने ते  माही समोर धरले .... तश्या सगळीकडे टाळ्या गडगडल्या.... मीराला पण खूप मजा वाटत होती..... माहीच्या आईच्या डोळ्यात तर आनंदाश्रू आले होते, आत्याबाईने दुरूनच बोटं मोडून तिची दृष्ट काढली .....जरी हा एक ऑफिसचा छोटासा अवॉर्ड असेल पण तो माही आणि तिच्या परिवारासाठी खूप मोठी सन्माननीय गोष्ट होती.....आज जवळपास पाच वर्षानंतर तिला चारचौघात असा मान मिळत होता......सगळे लोकं तिला  आदराने  बघत होते..... अंजली पण माहीसाठी खूप खुश होती ...... ती दुःखाला  कवटाळून बसली नव्हती .....सगळ्यांना तिचं कौतुक वाटत होते......

अर्जुनने ट्रॉफी तिच्या पुढे धरली........

" Thank you sir" .......... माही ती हातात घेत बोलली......पण तिच्या तोंडून ' सर ' ऐकणे त्याला जड गेले ....????

" Congratulations Mrs Mahi Arjun" ....... अर्जुन सर्टिफिकेट तिच्या हातात देत बोलला.........माही त्याच्याकडे कसेतरी बघत होती....

" Very well done.....proud of you sweetheart" ....... अर्जून हळु आवाजात कोणाला ऐकू  जाणार नाही ,  अश्या आवाजात बोलला.....माही त्याच्याकडे बघत होती......

" मला तुला माझ्या जागी बघायचे आहे" ........अर्जुन

" मला नाही बनायचं तुमच्यासारखे " खडूस " Mr Arjun"   ........... माही

अर्जुनला तीच बोलणं ऐकून हसायला आले......

" Thank you everyone ! " ....... माही बोलतच होती की अँकरने तिच्या हातात माईक दिला.....

" मी काय बोलू.....मी स्वतःच शॉक झाली आहे.....मी अपेक्षा नव्हती केली की मला हे असे काही मिळेल ....या यशासाठी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद. बऱ्याच गोष्टी मी इथेच, बऱ्याच काय सगळच म्हणा ना, मी इथेच शिकले, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने शिकले, त्यासाठी खूप आभार. माझा परिवार जो नेहमीच माझ्या मागे उभा आहे , त्यांच्या आशीर्वादामुळेच मी इथे आहे....परिवार तर आहेच पण एका व्यक्तीचे मला सगळ्यात जास्ती आभार मानायचे आहे ते म्हणजे अर्जुन सर" .....बोलतांना ती अर्जुन कडे बघत होती...." त्यांनी माझ्यामध्ये असलेली कामाची क्षमता ओळखली आणि मला काम, चांगलं काम करायचं नेहमीच प्रोत्साहन दिले.  माझ्यावर विश्वास ठेवला.....कधी ओरडून तर कधी चिडून तर कधी  रागावून म्हणजे रागावूनच जास्ती ( ते ऐकून अर्जूनच्या ओठांच्या कडा थोड्या रुंदावल्या, तो गा हसल्यासारखा वाटत होता ) पण मला नवनवीन काम शिकण्यात प्रोत्साहन दिले....त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने मी आज माझी वेगळी ओळख बनवू शकले.....thank you Arjun Sir! ....... मला माझं अस्तीवाची जाणीव करून दिल्याबद्दल" ......तिच्या डोळ्या दोन अश्रू जमा झाले होते.....

अर्जूनने डोळ्यांनीच तिला डोळ्यात पाणी नको म्हणून खुणावले.......तसे तिने अलगद डोळे पुसले आणि  छानशी स्मायल तिच्या ओठांवर आली...

" परत एकदा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद" .....बोलून माही खाली आपल्या जागेवर येऊन बसली...

" Good evening all.... congratulations to all of you .....keep Hard working , keep winning .....all the best for ahead work" ....... अर्जून बोलला आणि तो सुद्धा त्याच्या जागेवर येऊन बसला....

" So friends.... प्रत्येक वर्षी आपण आऊटस्ट्यानडींग परफॉर्मरला काहीतरी स्पेशल गिफ्ट देत असतो......यावर्षी थोड वेगळं करण्यात आले आहे.....Ms Maya please" ... अँकर

मायाने अर्जुन जवळ एक रिमोट आणून दिले.... अर्जुनने त्यात कुठलेतरी बटन प्रेस केले तसे स्टेजवर एका वॉलवर एक पोस्टर आले......" Mahi diamond  Collection" ....

" We are launching our new diamond collections with the name of our outstanding star employee Ms Mahi Desai" ......... अँकर

सगळीकडे टाळ्या वाजवायला लागल्या..... माही तर शॉक झाली होती... एकावर एक असे अनेक धक्के तिला मिळत होते...

" आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की मिस माहीने ज्वेलरी डिझायनिंग डिपार्टमेंट जॉईन केले आहे" ........ अँकर बोलत असतानाच वॉलवर वेगवेगळ्या ज्वेलरीचे फोटो येत होते........सगळे डोळे मोठे करत ते डिझाईन्स बघत होते  इतके ते सगळे डिझाईन्स अप्रतिम होते....

" तर या सगळ्या डिझाईन्स मिस माही यांच्या आहेत.......यातल्या काही exclusive designs international लेव्हलवर टॉप टेन मध्ये  आल्या आहेत , which is very much  beneficial for our business....... म्हणून आता आपण एक नवीन सेक्शन सुरू करतोय..... ' Mahi Diamond collection' ...... आणि हे certificate of excellence मिस माही यांना मिळत आहे.......यामुळे त्यांना कधीपण कुठल्याही कंपनीमध्ये easily एन्ट्री ऑर जॉब मिळेल" ....... अँकर , त्याने परत माही आणि अर्जुनला स्टेजवर बोलावले...

" तुम्ही मुद्दाम करता ना असे?......तुम्ही खूप वाईट   आहात" ...... माही स्टेजकडे  अर्जुनच्या बाजूने जातांना बोलत होती..

" I know it, tell me something different sweety" ........ अर्जुनने हळूच तिला एक डोळा मारला...

" I want to see you on top of the world....and you deserve it.......... I am just creating a way for you ..... but whatever you are getting , or in future you will get, it's only because of your hard work" ........ तिच्याकडे बघत हसतच तो थोडा फास्ट चालत स्टेजवर गेला....

" सर.....मी परत नव्याने तुमच्या प्रेमात पडायला लागली आहे......का आहात तुम्ही असे?" ...... माही मनातच विचार करत पुढे जात होती....

अर्जुनचे माहीवर प्रेम तर होतेच.....त्याची बायको बनल्यावर तिला  सर्व मानपान मिळाला असता , पण ते अर्जुनाच्या नावामुळे.....अर्जुनला तिचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचं होते....ज्यात लोकांनी तिला माही म्हणून ओळखावे, तिच्या कामासाठी तिचे  नाव व्हावं , तिचं वेगळं अस्तित्व निर्माण व्हावे,  त्यासाठी त्याची अशी बरीच धडपड सुरू होती.... आणि माही सुद्धा खूप मेहनती होती...तिला जर योग्य मार्ग दाखवला तर ती नक्कीच त्याचा योग्य वापर करू शकते , ती नक्कीच जिंकेल यावर त्याचा खूप विश्वास होता....

******

" Sir , सध्या येवढे इन्फॉर्मेशन मिळाली आहे.... कार्पोरेट ऑफिसेस मधली , बिजनेसची माहिती लवकरच मिळेल ..."...फोनवर

" Okay .... ".... अर्जून

अर्जुनला एक फोन आला , फोनवर बोलून त्याने फोन ठेवून दिला .... अर्जुनला देवेश बद्दल काही  माहिती मिळाली होती ... बाकी सगळं ठीक होते , फक्त  त्याला खूप पार्टीज करायची सवय होती त्यामुळे त्याचं फ्रेंड सर्कल बरेच मोठे होते , त्यात काही बिघडलेले श्रीमंत बापाची मुलं होती.. आणि त्याची आधी एक गर्लफ्रेंड होती ,... हेच अर्जुनला थोडे खटकले होते .... श्रिया सोबत बोलून बघावं म्हणून तो तिच्या रूममध्ये गेला....

अर्जुनने दार नॉक केले ....

" अरे दादा ...तू??.... ये ना ..."....श्रिया

" श्रिया , थोडं बोलायचं होते .....".....अर्जुन

"हो बोल ना दादा .... त्यात येवढं काय विचारायचं ?".....श्रिया

" थोडं पर्सनल आहे .....देवेश बद्दल ... ".... अर्जून

" ह्ममम... बोल ना .... ?? "..... श्रिया

" He had a girlfriend .....".... अर्जून

" अच्छा ते ..... ते मला माहिती आहे ... त्याचा पहिल्या ऑफिसला होती ती ..."... श्रिया

" Okay ..... ".... तिचा कॉन्फिडन्स् बघून मग तो पुढे काही बोलला नाही..

" दादा , मला माहिती तुला माझी काळजी आहे .... पण देवेश चांगला मुलगा आहे ... ती मुलगीच त्याला सोडून गेली,  तिला कोणी दुसरा श्रीमंत मुलगा मिळाला तर .... लोकांचे प्रेम पण कसे ना पैसे बघून बदलतं... तू बरोबर म्हणत असतोस , पैश्यासाठी लोकं बदलतात..... पण देवेश नाहीये तसा.....खूप केरिंग आहे ... ".....श्रिया

" ह्मम ....".... अर्जून

" तुझं समाधान झालेलं दिसतं नाही .... माझ्यावर विश्वास ठेव , सगळं ठीक आहे .... एखाद्याचं पास्ट वाईट असले म्हणून तो व्यक्ती तर वाईट होत नाही ना ?? परिस्थिती वाईट असू शकते.....माणूस नाही ना ...??" .... श्रिया

श्रियाचे बोलणे ऐकताना माही त्याचा डोळ्यांसमोर आली ...

" आणि त्याने स्वतः सांगितले आहे मला सगळं... तो लपवू पण शकला असता ना ...?? आणि दादा आता काळ बदलला आहे , लग्नाआधी बॉयफ्रेंड , गर्लफ्रेंड असणे एकदम नॉर्मल झाले आहे ......"...श्रिया

" Okay ..... Take care.....".... अर्जून बोलून बाहेर निघून आला... श्रियाच्या बोलण्याने त्याचे समाधान तर नव्हते झाले... पण काही गोष्टी ती बरोबर पण बोलली होती...... आणि प्रत्येकाला आपला जीवनसाथी निवडण्याचा अधिकार हवा... विचार करत तो आपल्या रूममध्ये निघून आला...

" मला देवेशबद्दल फक्त येवढेच कळले तर , मला  ते ॲक्सप्ट करायला जड जात आहे .... माही बद्दल घरात कळेल तर?? .... घरचे पण असेच रिॲक्ट करतील ?? माहीला ॲक्सेप्ट करतील काय??? नाही पण माही चांगली मुलगी आहे , घरच्यांना स्वीकार करावेच लागेल...  ...."..... झोपल्या झोपलाय अर्जूनच्या डोक्यात बरेच विचार सुरू होते.....

" Oh , I don't care ...... कोणी स्वीकारेल की नाही .... .. I love Mahi , she is my wife and that's the only reality ...."..... विचार करत तो झोपी गेला. 

******

ऑफिसचे कामचांगले सुरू होते, माहीच्या कामाची क्वालिटी दिवसेंदिवस शार्प होत चालली होती..... कामाचं सोडलं तर माही आणि अर्जुन मधली नोंकझोक तशीच सुरू असायची.......त्याचा फ्लर्टीपणा वाढला होता....पण त्याने त्याची लिमिट कधीच क्रॉस केली नव्हती....अर्जुनचे हे बदलेले रूप फक्त माही पुरतेच मर्यादित होते, बाकी ऑफिसमध्ये आणि घरी तो तसाच खडूस , रुड टाईपवाला लूकच घेऊन फिरत  होता.......त्यामुळे सगळे त्याला घाबरूनच असायचे ...

..........

" मिस देसाई .... "..... अर्जून आपल्या केबिन मधून बाहेर येत आवाज दिला...

माहीचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते, ती तिच्या एका कलिग सोबत काहीतरी बोलत उभी होती......

ज्वेलरी बनवण्याचा ऑफिसमध्ये एक महत्वाची  मीटिंग होती , तिथे अर्जुनला जायचे होते .  ज्वेलरीशी संबंधित मीटिंग असल्या की अर्जुन माहीला सुद्धा त्यात इन्वोलव्ह करत होता.....अर्धा तास आधीच माहीला मीटिंग साठी तयार राहायला सांगितले होते तरी तिचं आपलं भलतंच काम सुरू होते ... आणि आता आवाज देऊनही तिचे लक्ष नाहीये बघून त्याला राग आला....

" मिस देसाई ... "...... अर्जून थोडा जोर्यानेच ओरडला ... त्याच्या आवाजाने माहीची बोलण्याची तंद्री भंग झाली ... आणि तिने अर्जूनकडे बघितले ...

" Sir , पाच मिनिट..."...... माहीने हात दाखवत विनवणीच्या सुरात म्हटले...

" मला तुम्ही एका मिनिटात बाहेर पाहिजे ..... Otherwise I will cut your half month salary  .... ".... अर्जून


अर्जूनचा आवाज ऐकून 

बाकीचे स्टाफ मेंबर चुपचाप आपल्या जागेवर  काम करत होते.......

" No...no ..no .... मी आलेच "..... माहीने आपली बॅग उचलली , कलिगला हातातला  फोन दाखवत इशारा करत पुढे पळत येत होती की  बाजूच्या टेबलला धडकलीच....त्यावरची फाईल खाली पडली...त्यातले पेपर पण विखुरले....ते बघून माही खाली बसून ते उचलत होती.... अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला...

" राजू ....."....अर्जुन

तसा राजू पळतच तिथे आला.....अर्जुनने त्याला इशारा केला...

" माही मॅडम , तुम्ही राहू द्या,  मी करतो ते ....."..... राजू , त्याने तिला इशारा करत अर्जुन सर वाट बघत आहे खुणावले... तसे तिला ' I will cut your salary' शब्द आठवले....आणि तशी उठत ती अर्जूनच्या मागे पळाली...

अर्जुनने पुढे जात माहीसाठी कारच्या मागच्या सीटचा उघडला.....माही पळत पळत येत त्याच्याकडे बघितले आणि पलीकडे जात तिकडच्या साईडचा दरवाजा उघडत कारमध्ये जाऊन बसली....... अर्जुनने तिला बघून डोळे फिरवले.... आणि आतमध्ये बसला...

" सॉरी सर , ते मंगेश .... "......माही

" तुझा भाऊ असेल तो......".....अर्जुन

" हो , मग काय , ऑफिस मधले सगळे माझे भाऊ आहे ......"......माही

अर्जुन एक भुवई उंचावत तिच्याकडे बघत होता....

" एक सोडून .... बाकी सगळे माझे भाऊ आहे .... ". ...माही

तिचं तसे बोलणे ऐकून त्याला हसू आले .....

" तुला माहिती होते महत्वाची मीटिंग आहे , तरी तू टाइम पास करत होती...... मला कामात हलगर्जीपणा आवडत नाही ... तुला माहिती आहे .....पुढल्या वेळेपासून मला तू वेळेवर उपस्थितीत हवी आहे ...and this is the last warning......otherwise you need to pay penalty  ? .. "..... अर्जून

" नाहीतर ....तुम्ही पगार कट कराल ..... माहिती मला....".... माही

" नाही ........ मला वेगळ्या प्रकारे पण वसूल करता येतं ....."....अर्जुन

" Okay"......... .. अर्जुन तिला थोडा गालात हसल्यासारखा वाटला......आणि नंतर तिला त्याचा बोलण्याचा अर्थ कळला....." कायSSS ?".....ती डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती.....त्याला तिची गंमत वाटत होती...

" मी काही time pass नव्हते करत .... ते मंगेश ,त्याला मदत करत होती...... त्याची बायको प्रेग्नंट आहे .... तिला काही त्रास होत होता तर मी त्याला घरगुती उपाय सांगत होते ... त्याचं लव्ह मॅरेज आहे ... तर त्यांना दोन्ही घरून काहीच सपोर्ट नाहीये .... एकटे पडले आहेत बिचारे..... मिरा होणार होती तेव्हा मला पण असाच खूप त्रास होत होता.... पाय सुजयाचे, चालता नाही यायचं , हात पाय दुखायचे... कंबर ठणकायची , जेवण नाही जायचं .... त्यात मी नोकरी पण करत होते ...त्यामुळे जास्तीच त्रास होत होता....तेव्हा आई , बाबा , अंजली ताई सोबत होते.... आई काही काही घरगुती गोष्टींचे उपाय करत होती..... ताई पाय दाबून द्यायची .... तेल लाऊन द्यायची......शारीरिक त्रास तर होताच , मानसिकरित्या पण खूप त्रास होता...बाबा कितीतरी गोष्टी सांगून माझे मन वळवायचा प्रयत्न करायचे ...... "...बोलता बोलता तिला त्या जुन्या आठवणी आठवायला लागल्या.....त्यामुळे तिच्या डोळ्यांत पाणी जमायला लागले होते........


"

ते  सगळंच किती घाण होते ........किळसवाणे होते....ओकारी आल्यासारखे होत होते.....किती वेदनादायी होते .......स्वतःचीच स्वतःला घिन येत होती, किळस येत होता....खूप रगडले अंगाला आंघोळ करतांना , अंगाची सालपट निघाली , स्वतःला स्वच्छ करायचा खूप प्रयत्न केला , पण नाही झाली .....गर्दीत कधी चुकून कुठल्याही पुरुषाचा स्पर्श झाला तरी मन घाबरायला व्हायचं , अंगवर काटे यायचे ....भीती वाटायची.....पुरुष जातीचा राग यायचा......पण जेव्हा तुम्ही त्या रात्री सावरलं , तुमच्या स्पर्शात कुठेच वासना नाही जाणवली .....खूप सुरक्षित वाटत होते.....आणि मग आपोआप निश्चिंत होत डोळे बंद केले होते ...".. माही

आपल्याला देवानं मुलगी का बनवलं , याचासुद्धा तिला राग येत होता.....का लोकांना मुलगी नको त्याचे हे कारण आता कळले होते , मी स्वतः मुलगी असून मला मुलगी नको होती...... ......... मिराच्या जन्माच्या वेळेस पण खूप त्रास झाला... त्या दिवशी घाबरून खूप धावल्यामुळे पण .... तिचा जन्म होतांना असे वाटत होते की आता आपला जीव जातोय की  ...." ..... माही बोलत होती तेवढयात अर्जूनने तिच्या ओठांवर हात ठेवला.....आणि डोळ्यांनीच मान हलवत ' असे काही नको बोलू ' म्हणून खुणावत होता..... माहीला त्याच्या डोळ्यात तेवढयाच वेदना दिसत होत्या जेवढ्या तिने त्या दिवशी अनुभवल्या होत्या.... आणि ती चूप झाली .... 

मातृत्व हे एका बाई साठी वरदान आहे ,... पण जेव्हा ते अश्या चुकीच्या पद्धतीने , तिच्यावर अन्याय करून लादल्या जाते तेव्हा तो  तिच्यासाठी श्राप ठरतो.. तिच्या संमतीने , प्रेमाने तिला मिळालेलं मातृत्व , त्याचा प्रत्येक क्षण ती साजरा करत असते , कितीही त्रास होत  असला तरी सगळं हसत हसत सहन करते....तो त्रास पण तिला गोड वाटत असतो , तो त्रास सहन करण्यासाठी सुद्धा तिला आत्मिक बळ मिळते ..... ... पण हे अश्या पद्धतीने जबरदस्तीने लादल्या गेलेले मातृत्व , प्रत्येक क्षण वेदनेने भरला असतो , क्षणाक्षणाला ती मरत असते....

" परत जाऊया  ?? कॅन्सल करतोय मीटिंग" .... अर्जून 

" नको.....sir , किती बोलता तुम्ही?? तुमच्यामुळे सगळं विसरायला होते .....मंगेशला मेसेज करायचा होता... विसरले ना मी " ..... माहीने हातात फोन घेतला आणि त्यात काहीतरी टाईप करत बसली....

" मला वाईट वाटते आहे बघून लगेच नॉर्मल असण्याचे नाटक करते आहे तू.....आता पर्यंत होणारा त्रास तुझा लगेच कशी काय विसरली??..... वेगळी आहेस तू .... तुझ्या हसऱ्या खेळत्या चेहऱ्यामागे किती वेदना दडल्या आहेत... मला कळतंय माही....."..... अर्जूनने मान वळवली आणि मनातच तो विचार करत खिडकीतून बाहेर बघत होता.... माहीसोबत हे कृत्य करणाऱ्या मुलाला शोधून त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळावी ....पण तो विषय निघाला तरी तिला किती त्रास होतो , आणि त्याबद्दल आणखी डिटेल विचारले तर तिला किती त्रास होईल..... अर्जूनच्या डोक्यात विचार सुरू होता ...

"माहीला खूप प्रेमाने खुलवावे लागेल .....माझ्या होणाऱ्या प्रत्येक स्पर्शात तिला फक्त प्रेम , आपुलकी, काळजी दिसायला हवी....तिच्या सगळ्या वाईट आठवणी मला मोडून काढायच्या आहेत......she deserves best "........ विचार करतच त्याने माहीकडे बघितले तर ती अजूनही मोबाईलमध्ये बिझी दिसत होती ..... आपोआप त्याचा हात तिच्या डोक्यावर गेला आणि मायेने फिरला....

" काय ?? " ...... माहिने भुवया उंचावत विचारले .... त्याने पण मानेने काही नाही म्हणून सांगितले .... त्याने आपला लॅपटॉप सुरू केला आणि काहीतरी काम करत बसला...  मीटिंग असणारे ऑफिस बरेच दूर होते म्हणून तो आपले काम करत बसला...... माहीचे अधून मधून बाहेर तर कधी मोबाईल तर कधी अर्जूनकडे बघणे सुरू होते....

*********

शांती सदनमध्ये मोठ्यांच्या बऱ्याच विचार विनिमय नंतर श्रीया आणि देवेशबद्दल पुढले पाऊल घ्यायचा विचार सुरू होता...अर्जुन आणि आकाशला घाई नको वाटत होती, पण श्रीया आणि देवेशच्या घरच्यांनी वारंवार बोलल्यामुळे समोरासमोर भेटून बोलून पुढे  काय करायचं,ते   ठरत होते...आणि म्हणून पुढल्या येणाऱ्या  रविवारी घरी एक छोटासा गेटटुगेदरचा कार्यक्रम  ठरला होता....आणि देवेशच्या परिवाराला आमंत्रित केले होते..

रविवारी माहीने घराचे आणि  मिराचे पटापट आवरले....आत्याबाई आणि आई मिराला पार्कमध्ये घेऊन जाणार होत्या म्हणून मिरा पण खुश होती...इकडे घरी  श्रियासाठी पाहुणे येणार आहेत म्हणून माहीला ड्रेस डिझायनिंगचे काम लवकर आटोपून अंजलीला कामात मदत सुद्धा करायची होती.....म्हणून ती घरचे सगळं आवरून लवकरच शांतीसदन मध्ये  गेली होती....

" माही, आपलं बहुतेक काम आता संपत आले आहे, तर फिनिशिंग वर्क आणि थोडेफार जे काही राहिले आहे तेवढे तू बघ आता.......घरात पण पाहुण्यांची गडबड आहे , तर मला काही सद्ध्या वेळ देता येणार नाही"..........नलिनी

" ठीक आहे काकी....तुम्ही काळजी नका करू.....मी बघते सगळं" .......... माही

" हो, आणि एक, तुला सांगितलेच आहे की आपण एका फॅशन शो मध्ये भाग घेत असतो दरवर्षी....यावर्षी सुद्धा असणार आहे तो शो...हा आम्ही जरी करत असलो तरी दोन वर्षापासून सगळे लीगल व्यवहार अर्जुन  बघतोय....तर त्याला काही पेपर्स दिले आहे, बेस्ट टेन डिझाईन आणि एक शोज टॉपर साठीचे डिझाईन त्याला दिले आहे , तर त्याने ते बघितले काय, आणि फायनल केले काय ते  विचारून ये , म्हणजे पेपर साईन करून पुढल्या तयारीला लागता येईल" ......नलिनी

"ठीक आहे...." ......माही, "बापरे त्यांच्या रूममध्ये जायचं......माझ्या मागेच का येते हे काम....कुठलेही पेपर साइन करायचे , काम किती छोट असते पण ते महाशय त्याला किती मोठं करतात......दुसरे कोणाला पाठाऊ काय...?? पण इथे कोणी दिसत नाही आहे, अरे मी कसे काय विसरली , आज पाहुणे येणार आहेत, सगळे त्याच तयारी मध्ये असतील" .....माहीचे  स्वतः सोबतच मनात बोलणं सुरू होते...

" अग  जा ....बघून ये........काय विचार करत आहेस....??.....आणि हो ते झाले की ज्या मॉडेल रॅम्पवर उतरणार आहेत त्यांचे मेझरमेंट आले की नाही ते पण चेक करून घेशील, मी आता बिझी असेल आहे"...........नलिनी

" हो ठीक आहे" .......म्हणतच माही विचार करत करतच अर्जुनच्या रूमचा दिशेने जात होती.....

"हे काकीने कुठे फसवले, सरांना तर काय चान्सच हवा असतो ...कुठे वाघाच्या गुहेत धाडलं काकी तुम्ही मला.....शंभर कामं परवडली, पण अर्जुन सर सोबतच एक छोटं काम अंगावर येते " .......विचार करतच ती त्याच्या रूमसमोर येऊन उभी होती, आणि आतमध्ये जाऊ की नको विचार करतच तिने हळूच दारातून डोकावून बघितले....

" अरे वाह.... ड्राकुला आतमध्ये नाही......very good माही , आज देव पण तुझ्यासोबत आहे ....जा आतमध्ये ,आणि  पटकन घेऊन ये फाईल" ......मनातच बोलत ती दबक्या पावलाने आतमध्ये गेली.....आणि इकडे तिकडे बघत फाइल शोधत होती......पण तिला फाईल कुठेच दिसत नव्हती....

" माही तू पण ना बुद्धू आहेस,  महत्वाची फाईल अशी वरती ठेवतील काय सर... कुठेतरी आतमध्ये कपाटात, ड्रॉवरमध्ये वैगरे ठेवली असेल.......घे ना, खूप खुश होत होती ना सर रूममध्ये नाहीत म्हणून, आता बसा बोंबलत.....एकतर सरांची वाट बघा नाहीतर इथले कपाट बघा......दोन्ही अवघडच" .....विचार करत ती इकडे तिकडे बघत होती....

"हा......या ड्रॉवरमध्ये असू शकते.....झोपताना जर फाईल चेक केली असेल तर याच ड्रॉवरमध्ये ठेवली असेल......" बेड जवळ असलेल्या ड्रॉवरकडे तिचे  लक्ष गेले ,  विचार करतच ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली..... आणि ड्रॉवर उघडण्यासाठी म्हणून दोन तीनदा हाथ पुढे केला आणि  परत मागे केला....

" Maahi, this is bad thing........ अस दुसऱ्यांच्या ड्रॉवर , कापटांना न विचारता हाथ लावणं म्हणजे bad manners असतात" ........ती विचार करत त्या ड्रॉवरकडे बघत उभी होती.......

" हा..... माही ...आता तू विचारसुद्धा इंग्लिशमधून करायला लागली........ संगतचा असर इतक्या लवकर व्हायला लागला माही तुझ्यावर??........सर बोलतात ते खरंच आहे की काय??......मी त्यांच्यासारखी होते आहे??.......नाही नाही.....मी नाही त्यांच्यासारखी खडूस........अरे माही हे काय तू फालतूचे विचार करत बसली..... फाईल वर फोकस कर.......आणि  या ड्रॉवरमधून फाईल बाहेर कशी येईल त्याचा विचार कर"  ........

" ड्रॉवरकडे असे बघत बसल्याने ते आपोआप उघडत नसते......you can open it, you don't need any permission here in my,....sorry in our room"............ मागून एक आवाज आला.....

"खरंच.....मी उघडू शकते हे ड्रॉवर??" ........ माही आनंदाने  बोलली, पण तिला हे नव्हते कळले की पाठीमागून कोणी आपल्यासोबत बोलत आहे...

" Yess , you can." ......

माहीने लगेच ड्रॉवर ओपन केले....... आणि  ते बघून तर ती अजुनच शॉक झाली....

*******

क्रमशः

🎭 Series Post

View all