तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 56

अर्जुन माही

भाग 56

संक्रांतीचा महिना सुरू होता.... अंजलीचा पहिली संक्रांत . रविवार , सुट्टीचा दिवस बघून आज   शांतीसदनमध्ये अंजलीच्या तीळव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता ....  आसपासचे नातेवाईक , शेजारी , मैत्रिणी अश्या सगळ्या बायकांना आमंत्रित केले गेले होते...

तीळव्याचे डेकोरेशन घरीच करायचे ठरले होते ..अंजलीसाठी हलव्याचे दागिने बनवायची जबाबदारी माही ने घेतली होती , अगदी केसांपासून नखांपर्यंत लागणारे सगळे दागिने माहिने डिझाईन केले होते, सोबतीला घरातील बाकीच्या महिला मंडळची मदत होतीच .. घरात कार्यक्रमाचा उत्साह पसरला होता...

माहीने ड्रेस डिझायनिंगचे काम पटापट आवरून घेतले होते...घरात आता सगळ्यांना डेकोरेशनमध्ये मदत करत होती.... कामं कमी आणि गोंधळच जास्ती सुरू होता ... माही , श्रिया आणि अनन्या खूप धिंगाणा घालत होते, आणि आकाश आणि अंजलीला टार्गेट केले होते .... चिडवून चिडवून अंजलीला पार हैराण करून सोडले होते....आशुतोष पण आज घरीच होता ....तो पण अनन्या ला त्रास द्यायचा एक चान्स सोडत नव्हता ...अधूनमधून आजी आणि मामा पण त्यांच्यामध्ये शामिल होत होते.....मामीचे नाक मुरडने सुरू होते....नलिनी किचन मध्ये सगळं खाण्यापिण्याचे बघत होती ... छोटी रुही कागदांचे काही पतंगी , क्राफ्ट्स करत बसली होती..... घर कसं बोलकं वाटत होते .. अर्जुन वरतून हे सगळं बघत होता.....ते सगळं बघून त्याच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू पसरले.... प्रत्येक व्यक्ती एक happy family ची अपेक्षा करतो... ती हीच तर होती.... हसरे खेळते घर....आणखी काय हवय आयुष्यात..... अर्जुनाच्या नकळत  त्याच्या डोक्यात हा विचार चमकून गेला... आणि त्याला त्याचंच हसू आले की तो असे पारिवारिक विचार करू लागला... त्याचा फोन वाजला तसा तो आतमध्ये निघून आला...

कार्यक्रमाची सगळी तयारी झाली होती.... नलिनी तिळगुळाच्या वड्या बनवत होत्या.... तेवढयात माहीला आठवले... तिने  सुद्धा  घरून सगळ्यांसाठी  वेगवेगळ्या शेपचे ( खेळण्याचे पत्ते मध्ये जे शेप असतात तसे शेप.. हार्ट, चिडी, इस्पिक , विट)  तिळगुळाच्या वड्या बनवून आणल्या होत्या.....

" तिळगुळ घ्या, गोड गोड बोला....." म्हणत ती  प्रत्येकाला एक एक वडी देत होती... तेवढयात अर्जुन सुद्धा तिथे आला.... सगळ्यांच्या देण्याच्या धुंदीत ती अर्जुनजवळ जवळ गेली...

" तिळगुळ घ्या , गोड गोड बोला..."...म्हणत तिने अर्जुन पुढे एक वडी धरली....नी मग तिचे लक्ष गेले तर अर्जुन तिच्याकडे एक भूवयी उंचावत बघत होता...

" ति....ळ.....गुळ घ्या......गो ......."... माही अडखळत बोलत होती....

" एवढयाने काय होणार??...... "....अर्जुन हळूच कोणाला ऐकू जाणार नाही असे माहीकडे बघत बोलला....

" बरोबर आहे , तुमच्यापुढे अख्खा डब्बा रीता केला तरी काही फरक पडणार नाही...".... माही पण हळू बोलली..

" माही , तुझा बॉसवर तिळगुळचा पण इफेक्ट होणार नाही ...."......अनन्या मस्करीच्या सुरात बोलली..... ते ऐकून माहीला हसू आले...ती पण आता तेच बोलली होती त्याला..... अर्जुनाच्या डोक्यावर आठ्या पडल्या....

" आले खडूस रुपात ....."....माही

सगळे हसायला लागले......

" Very stupid..... illogical things....."..... एक कटाक्ष टाकत तो जायला निघाला...

" Sir ... तिळगुळ "........ माही

" तुम्हीच खा .... आणि बोलत बसा गोड ...".....तो चिडत निघून गेला...... माहीचा मात्र चेहरा पडला..

" अगं येवढं काय त्यात.... तो तसाच आहे .... नंतर दे त्याला.....तसेही त्याला फार आवडत नाही .... ".... अनन्या तिला समजावत म्हणाली...पण माहीच्या मनाला मात्र हुरहूर लागून गेली....

सगळे कार्यक्रमासाठी तयार झाले .... घरातील बायकांनी काळया साड्या नेसल्या होत्या ... माही पण घरून साडी घेऊन आली होती...तिने पण तिथेच कपडे बदलले, आणि कार्यक्रमाच्या अनुरूप तयार झाली.... आत्याबाई, आई आणि मिरा सुद्धा आले होते....आता हळू हळू बायका पण यायला लागल्या होत्या. हळदीकुंकू चा कार्यक्रम छान सुरू होता...बायकांच्या गप्पागोष्टी , कार्यक्रमाचे कौतुक , असे सगळं सुरू होते ... माहीसुद्धा मदत करत होती...  माहीने शिफॉनची प्लेन काळी साडी त्याला  गोल्डन वर्क असलेली नाजूक बॉर्डर , सेम रंगाचे कोपरापर्यंत ट्रांस्परंट बाह्य असलेले ब्लाऊज... केस बांधलेले... मेकअप नसल्यासारखाच , कपाळावर छोटीशी लाल चुटूक टिकली ... हातात मॅचींग बांगड्या.... साधीच पण त्यातही ती सुंदर दिसत होती .. अर्जुनचे वरती उभे राहून माहीला न्याहाळणे सुरू होते...

" नलिनी , ही कोण..? अर्जुनची बायको काय ?".... मिसेस मेहता , मिसेस मेहता लग्नाला नव्हत्या... दोंनदिवस आधीच परदेशातून परत आल्या होत्या...त्यामुळे अर्जुनचे लग्न मोडले होते हे त्यांना माहिती नव्हते...

ते ऐकून माहीच्या हृदयात धडकीच भरली....तिच्या हातात असलेला ट्रे खाली पडणारच होता की अनन्याने सांभाळून घेतला...

" त्यांना काय माहिती , इथे तर छत्तीसचा आकडा आहे .....नवरा बायको काय इथे मित्र बनने पण अशक्य आहे ....."... अनन्या हसत बोलली

माहीच्या चेहऱ्यावर एकदम भांबावलेले भाव होते ...इकडे तिकडे बघत असताना तिचे लक्ष वरती गेले तर अर्जुन हसत उभा होता.... तिला बघून त्याने तिला एक डोळा मारला...

" नाही मिसेस मेहता ... ही माही , अंजलीची लहान बहीण, तुम्ही बाहेर होत्या त्यामुळे कदाचित तुम्हाला माहिती नसावे , त्याच लग्न नाही झाले , ते लग्न मोडले...."....नलिनी

" ओह. .. सॉरी नलिनी ...."...मिसेस मेहता

" अहो ठीक आहे ...."....नलिनी

" सॉरी बेटा .... मुझे पता नहीं था "....मिसेस मेहता माहीला बोलल्या ... माहीने जबरदस्ती एक स्मायल दिले...काय बोलावं तिला काही कळत नव्हते...बोलल्या तर त्या बरोबरच होत्या ..

आता मात्र वेगळाच टॉपिक सुरू झाला बायकांमध्ये... तिथल्या दोन तीन बायकांना माही आवडली होती तर त्या तिच्या बद्दलची विचारपूस करायला लागल्या....ते बघून अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला नी मान हलवत तिथून निघून गेला.... आत्याबाई , छाया यांना मात्र काय बोलावं , काय उत्तर द्यावे त्या बायकांना काही कळत नव्हते... त्या फक्त हो नाही येवढेच बोलत होत्या ..

कार्यक्रम व्यवस्थित सुरू होता... खूप वेळ चालणार होता.... बायका एकत्र आल्या म्हणजे काही लवकर आतोपणारे नव्हते....

आजीसाहेबांचा फोन वाजला...त्यांनी फोनवर बोलत फोन ठेवून दिला..

" माही ....."....आजी

" हो .....".... माही

" माही आपला तो जो शो होणार आहे , त्याचे पेपर उद्याच भरायचे आहेत.... त्यासाठी  पेपरवर अर्जुनचे साइन घ्यायचे आहे , तर आताच घेऊन घे नाहीतर परत या कार्यक्रमात  विसरेल...."...आजी

" हो , ठीक आहे ....".... माही , माहिने आजीच्या रूमामधून पेपर घेतले आणि अर्जूनचा रूम मध्ये गेली... पण अर्जुन तिथे नव्हता... तिने त्याच्या गार्डन एरियामध्ये सुद्धा चेक केले... तिथे पण नव्हता तो ...

" माळी काका , अर्जुन सर कुठे आहेत माहिती काय??" ....माही

" ते वरती जीम एरिया मध्ये आहेत ....."...

" ठीक आहे....."....बोलत ती सगळ्यात वरच्या मजल्यावर गेली ....तिथे एका बाजूला प्रशस्त असा जिम एरिया होता ..तिथे रोज लागणारे असे काही बेसिक व्यायामाचे उपकरणे होती... अर्जुन तिथेच एका ठिकाणी मोठ्या आरसा पुढे बसला weight लिफ्टींग ,  खूप हेवी वेट डंबल्स एका हातात पकडत एक्जरसाईज करत होता....ते वजन उचलतांना त्याच्या हाताच्या , कपाळाच्या नसा उठून दिसत होत्या....

माही दारात उभी होती.... त्याला बिझी बघून  आतमध्ये  जाऊ की नको विचार करत होती.

" माही , इतका विचार करायची गरज नाही .... Come inside.....".... अर्जूनने   आवाज दिला... तशी ती आतमध्ये त्याच्याजवळ जात उभी होत त्याच्याकडे बघत होती...तिने हातातले पेपर बाजूच्या स्टूलवर ठेवले.

" बापरे , किती भारी दिसतेय ते ....... इतके वजन उचलण्याची काय गरज ?"......माही

" ते काय आहे ना , माझी बायको सतत इकडे तिकडे धडपडत असते , नेहमी तिला उचलावे लागते.... Practice makes man perfect...."

माही डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती...त्याला तिची गंमत वाटत होती...त्याला तिच्या खोड्या काढायचा मूड झाला होता..

" आणि तसंही गोड खायचं म्हटले तर कॅलरीज बर्न करायला नको? .....तुला तर माहिती आहे I am very much health conscious ..."... ... अर्जून

" काय??? गोड?? तुम्ही कुठे खाल्ले , तसेच तर निघून गेलात ".....माही

" ह्मम.... आता खाणार ना "....हातातील वजन खाली ठेवत तिच्या पुढे उभा राहिला..... माहीचे लक्ष गेले तर तिला आता लक्षात आले होते तो शर्ट लेस होता....तिने आपली नजर बाजूला करत खाली झुकावली ..

" काय झाले...?? तिकडे का बघते आहे ?"....अर्जुन

" ते ..... तू....तुम्ही .... शर्ट .....ना.....".....माही

" तू मला आधी पण बघितले आहेस असे ..... माझ्या जवळ पण आली आहेस "....अर्जुनने बाजूला ठेवलेली त्याच्या टीशर्ट उचलली आणि घालतच बोलत होता

" तेव्हा वेगळे होते, परिस्थिती वेगळी होती ....आता वेगळं आहे ..."... माही

" ह्मम ते पण आहे ... तेव्हा वेगळं होतं , आता तू माझी बायको आहेस  .... आता तर पूर्ण हक्क आहे.... "....अर्जुन थोडा तिच्याजवळ जात बोलला , तसे तिने आपले एक पाऊल मागे घेतले... तो थोडा हसला... माहीचे हे नेहमीचेच होते ... तो पुढे यायला लागला की ती मागे जायला लागायची .

" तू.....तुम्ही असे जवळ नका येऊ ....... "....माही

" तू स्वतःहून येशील जवळ..... "....अर्जुन

" स्वप्न बघा..... " ....माही

" स्वप्न बघून ती पूर्ण करायची हिंमत ठेवतो .... पण हे तर नंतरची गोष्ट आहे , मी आतासाठी बोलतोय ".....अर्जुन

" शक्यच नाही ....."....माही

" Challege?? मला चॅलेंज करते आहे .....?? मी जे बोलतो ना माही ,ते करून सुद्धा दाखवतो  ".... अर्जुन तिच्या डोळ्यात एकसारखं बघत बोलत होता.

" मला घाबरवू नका.... आणि तसे पण मी तुम्हाला घाबरत नाही .....".....माही

" परत चॅलेंज ?"....अर्जुनने हसतच  हाताने एक चुटकी वाजवली .....तसा त्यांचा कुत्रा तिथे भुंकत आला ...कुत्र्याचा आवाज ऐकून माही चांगलीच घाबरली.....तिला काही सुचले नाही आणि तिने घाबरतच  अर्जुनला मिठी मारली  .

" आ ssss .... त्याला जायला सांगा....."....माही डोळे बंद करून ओरडत होती....आणि कुत्रा आणखीच तिच्या जवळ येत भुंकत होता .... ती अर्जुनला आणखी आणखी घट्ट पकडत होती .

" ब्रुनो shss.....".... अर्जुन ने कुत्र्याला शांत केले...

" सोडा मला......"....माही

" मी पकडलेच नाही आहे स्विटी ......".... अर्जून

ते ऐकून तिच्या लक्षात आले की तिनेच त्याला पकडले आहे ... आणि ती त्याचा दूर झाली ..

" म्हणालो होतो ना तू स्वतः येशील जवळ....."...अर्जुन मिश्कीलपणे हसत बोलला

" तुम्ही चीटिंग केली आहे ...... ".... माही

" I already told you sweetheart  , everything is fare in war and love ......❤️" ..... अर्जून

"Uh sss " ..... तिने पाय आपटला , तसा कुत्रा परत भुंकायला लागला.... परत घाबरत तिने अर्जुनचा हात पकडला....

" Bruno ....stop now  .... She is our family member...."..... अर्जुन बोलला तसा तो परत शांत झाला

" हा.....त्याला इंग्लिश पण समजते ?......या खडूसने या बिचाऱ्याला पण धमकावून ठेवले आहे ...."....माही

" काही म्हणाली ?".....,अर्जुन

" नाही....कुठे काय ....तुमच्या पुढे बिचारे हे पण शांत बसले आहे ..... माझी काय हिम्मत.....".....

कुत्रा मात्र  त्या दोघांच्या पायांभोवती फिरू लागला...तशी माही सुद्धा अर्जुनाच्या भोवती गोल फिरत होती ..आणि कुत्रा तिच्या मागे... माही खूप घाबरली होती .

" माही , थांब , तो काही नाही करत आहे .... फक्त तुझी ओळख पटवून घेत आहे .... "....अर्जुन

" नाही , मला भीती वाटते.....".... माही

" Wait, तुमची मैत्री करून देतो... मग नाही वाटणार भीती....."..म्हणत त्याने तिचा हात पकडला आणि कुत्र्याजवळ खाली बसला...आणि एका हाताने कुत्र्याच्या डोक्यावरून हात फिरवत होता....

" तू पण कर ....".... अर्जून

" नाही .... मला भीती वाटते ".... माही

" मी आहे , कर ....  ... निष्पाप जीव आहेत ते ...काही करत नाहीत ".....अर्जुनने तिचा हात हातात पकडत ब्रूनोच्या अंगावरून हात फिरवत होता ..... ब्रुनो पण आपली जीभ बाहेर काढत त्यांना बघत होता.... तशी ती थोडी रिलॅक्स झाली ....

" see I told you ...... उगाच घाबरत असते ..."...अर्जुन , माही थोडी हसली.

" तुम्हाला माणसं नाही पण हे झाडं , फुलं , कुत्रं , मनिमाऊ  हेच खूप आवडतात ना?".... माही

" They are more  loyal , ते विश्वासघात करत नाहीत....

मनिमाऊ चं तर माहिती नाही , पण मला मिराची माऊ भयंकर आवडते हा ... ".... अर्जून

माही कश्यातरी नजरेने त्याच्याकडे बघत होती...ते बघून त्याला हसू आले...

" ब्रुनो ....."....म्हणत तिने तिचा हात पुढे केला...तसा त्याने पण त्याचा एक पाय माहीच्या हातात दिला....

" किती गोड आहे हा ...."....माही

" Bruno,  meet my wife Mahi ......".... अर्जुन

माही परत अवाक् होत त्याच्याकडे बघत होती....

" Don't worry , तो कोणाला सांगणार नाही ...."...अर्जुन

" ब्रुनो, मी माही .....".... माही

" Bruno , she is my wife ...".... अर्जुन

" ब्रुनो , माही ....."....माही थोडा आवाज मोठा करत बोलली

" Bruno , my wife ....."..

" ब्रुनो , माही "....

" My wife "....

" माही ".... आता त्या दोघांचा वाद सुरू झाला...ते बिचारे कुत्रं आळीपाळीने त्या दोघांकडे केविलवाण्या नजरेने बघत होते.... शेवटी दोघांचा वाद वाढलेला बघून ते तिथून उठून बाहेर पळालं.... आणि ते बघून थोड्यावेळ दोघंही एकमेकांना बघत होते....

" Good , आता आपण दोघच इथे.....हा तर काय म्हणत होती तू?".... अर्जून

" माही , आज यांचा मूड काही ठीक दिसत नाहीये.... जे काम करायला आली आहेस ते कर आणि पळ इथून .... ".…..माही मनातच विचार करत जागेवरून उठली...

" Sir , हे पेपर साईन करून पाहिजेत, आजींनी दिले आहेत  ".....

" माही मी आपल्या बद्दल बोलतोय, हे काय मध्येच पेपर आणतेस...."..... अर्जून

" Sir , खूप महत्वाचे आहे ... प्लीज "...... माहीने पेन पुढे केला...

" You are so unromantic .....".....त्याने तिच्या हातून पेन घेतला आणि पेपर्स वाचत साईन करत होता....

" Done ".....त्याने पेपर बाजूला ठेवले..

" धन्यवाद " ....माही ते पेपर उचलायला गेली ...

" Wait ...... घाई कशाची आहे ......" म्हणत त्याने तिचा हात पकडत तिला स्वतःकडे ओढले....

" काय ?".... माही

" माझं स्वीट ??"..... अर्जून  हळूच तिच्या कानाजवळ फुंकर मारत बोलला

" म्हणजे ??" ...... माही आपला कान आपल्याच खांद्याला घासत बोलली ..

" मघाशी देत होती ते ..... तिळगुळ घ्या ...गोड गोड बोला असे काहीतरी .....".....अर्जुन

" तेव्हा का घेतले नाही ?"....माही

" आता नाहीये ......"....माही

" पण मला तर हवे आहे ....."....अर्जुन

" घेऊन येते ......"....माही

" मी बोललो होतो , त्याने माझे काय होणार ....?"....अर्जुन

" मग ?"..... माही

" अहां... ते नाही ..... "....म्हणतच त्याने तिच्या कंबरेमध्ये हात घालत तिला आपल्या जवळ ओढले.......

" कोणीतरी येईल .....".... माही

" नाही ....".... अर्जून तिच्या खालच्या ओठांवर अंगठा फिरवत बोलला..... आता मात्र तिला त्याचा बोलण्याचा अर्थ कळला होता......त्याची पकड इतकी घट्ट होती की तिला त्यातून निसटता सुद्धा येत नव्हते.....त्याला जवळ येताना बघून तीनेंडोले गच्च बंद केले.... तो पुढे जाणार तेवढयात त्याला त्याच्या कंबरेवर गुदगुल्या जाणवल्या....आणि त्याची तिच्याभोवती असलेली पकड सैल झाली....तोच फायदा उचलत तिने त्याला दूर ढकलले आणि तिथून पळाली.....

" मिस्टर पटवर्धन .... तुम्ही कडूच बरे आहात....."...ओरडतच ती बाहेर पळाली .....

तिच्या शब्दांनी त्याला हसायला आले ..... केसंमधून हात फिरवत तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत उभा होता....

माही तिथून पळत पायऱ्या उतरत खाली येत होती....आणि तिला काहीतरी आठवले ...

" माही .... बुल्लकड...जे काम करायला गेली होती , ते तर विसरली ....".....ती परत वरती जिम एरिया मध्ये आली...

" तुला मला सोडवून नाही राहता येत , मान्य का करत नाही .....?"....अर्जुन

" मी ...ते ....."..... माही

" कशाला हवेत बहाणे .....??.."....अर्जुन

" मी पेपर घ्यायला आली आहे .... गैरसमज नको  हा ...."....तिने पेपर उचलले आणि परत जायला वळली...

" माही , एक मिनिट ....."....अर्जुन

" काय ??" ..... माही

" तसे तर हा अंजली प्रमाणे तुझा देखील पहिला सण आहे ..... मी काही दिले तरी तू घेणार नाहीस....आणि मला काही देणार सुद्धा नाही....."...अर्जुन

" हो बरोबर आहे .......पण ठीक आहे ,आज सणाचा दिवस आहे , काय हवे आहे ?....."....माही

अर्जुन तिच्या डोळ्यात बघत होता....

"  मला या सुंदर दिसणाऱ्या मुलीसोबत एक सेल्फी हवा आहे " .....अर्जुन , तसे तिच्या ओठांवर गोड हसू पसरले...आणि ती त्याच्या जवळ जाऊन उभी राहिली...त्याने लगेच आपला मोबाईल हातात घेतला आणि एक छानसा सेल्फी काढला....

" Thank you... Stay always happy "... त्याने तिच्या डोक्यावर किस केले आणि तिला सोडले....

" जाऊ ?"....माही

" ह्मम ..."....अर्जुन , तिने पेपर घेतले , एकदा त्याच्याकडे हसून बघितले आणि खाली निघून आली .

शांतीसदन मध्ये तिची सगळ्यांसोबत मैत्री झाली होती...फक्त एक ब्रुनो राहिला होता.... दोघंही एकमेकांसमोर आले की आरडा ओरडा, भुंकाभुंकी सुरू असायची ....आज त्यांची सुद्धा मैत्री झाली होती...

माही आजींना पेपर द्यायला त्यांच्या रूम मध्ये जात होती की तिला बोलण्याचा आवाज आला त्यात माही नाव ऐकू आले , आणि ती तिथेच थांबली..

" नलिनी , मिसेस मेहता जे बोलल्या त्यावर आपण विचार करू शकतो "....आजी

" काय ?"....नलिनी

" अर्जूनसाठी माहीचा विचार करू शकतो. पोर सुंदर आहे , गुणी आहे .....आणि आपल्या घरात छान रुळली सुद्धा आहे " ....आजी

ते ऐकून माहीला आनंद झाला.....

" मला नाही वाटत अर्जुनला माही आवडेल .....".... नलिनी

" का ?" .....आजी

" त्याचं आणि तिचं अजिबात पटत नाही , सतत भांडत असतात. आणि जेवढी मला त्याची चॉईस माहिती आहे , त्याला साधारण घरच्या मुली नाही आवडत . तो नेहमीच अश्या मुलींवर चिडत असतो.....आणि तसे पण  शिकलेली , मॉडर्न त्याला शोभेल अशी मुलगी आपण शोधायला हवी ..... माही चांगलीच मुलगी आहे पण अर्जुनाच्या तोलाची नाही, जास्ती शिकली सुद्धा नाही आहे . .....आणि आई , माहीचे आई वडील कोण दुसरे आहेत म्हणे.... ते येत जात नाही, लग्नात पण नव्हते, काहीतरी प्रोब्लेम असावा असे मला वाटते ......"....नलिनी

" ह्मम .....पण मुलगी चांगली आहे ...."....आजी

" आई , आपण तिच्यासाठी चांगला मुलगा शोधू , पण अर्जुंसाठी नको....आणि आता हा विषय सुद्धा नको " ....नलिनी

" बरं .....".....आजी

नलीनीचे  बोलणे ऐकून माहीच्या डोळ्यात पाणी तरळले....आपले डोळे पुसत ती खाली निघून आली ...

कार्यक्रम चांगला पार पडला होता.... आत्याबाई , छाया सगळ्यांचा निरोप घेत होते.....मिरा अर्जुनाच्या खांद्यावर झोपली होती...... माही मात्र शांत खाली बघत उभी होती...

" आता पर्यंत तर आनंदी दिसत होती....आता हीचा चेहरा का उतरल्यासारखा दिसतोय...."....अर्जुन तिच्याकडे बघत मनातच विचार करत होता..

" बरं येतो आम्ही ....."....छाया , माही मिराला घे "...

माही मिराला घ्यायला अर्जुन जवळ आली..

" माही , are you okay?? "... अर्जुन

" हो "....तिने मिरा ला आपल्या खांद्यावर घेतले..

" मग , मला का तू ठीक वाटत नाही आहे ....?"...अर्जुन

" दिवसभर खूप कामं झालीत, थकली थोडी ".... माही

" Okay ..... उद्या ऑफिसला नाही आली तरी चालेल....आराम कर ....".... अर्जून

" उद्या बघते.....".... माही

" Okay , take care ......"... अर्जुन

सगळे निरोप घेऊन आपापल्या घरी निघून आले...

******

त्या दिवसानंतर माही अर्जूनपासून दूर दूर राहू लागली होती......अर्जुनाच्या लक्षात येत होते पण जबरदस्ती लग्न केल्यामुळे ती चिडली आहे , म्हणून ती दूर राहते ...आणि कामाचं प्रेशर म्हणून पण बिझी असावी  असेच त्याला वाटत होते.तरी सुद्धा तो तिला मनावयाचा खूप प्रयत्न करायचा , तो जवळ आला की तिला नलिनी चे बोलणे आठवायचे , आणि मग  ती जास्ती रागवायची , चिडचिड करायची......अर्जुनने सगळच आपल्या हातात  ठेवले होते , ती सगळी कडून अडकली होती ....काय करावं तिला काहीच कळत नव्हते....

आजकाल ती शांतीसदन मध्ये सुद्धा कामापुरते जायची.... जास्ती कोणासोबत बोलत नव्हती....पण आपले काम मात्र चोख करत होती...

*********

ऑफिसमध्ये माहीचे काम उत्तम सुरू होते.... ती डिझायनिंग फिल्डमध्ये असल्यामुळे तिला आता धातू, माणिक, मोती , हिरे असे बऱ्याच गोष्टींची माहिती मिळत होती. आता ती कॉम्प्युटर वापरण्यात पण चांगलीच पारंगत  झाली होती....तिला जे काही कळायचं नाही त्याची माहिती घ्यायला  लागली....आता तिचं वाचन सुद्धा वाढले होते... ऑफिसमध्ये लायब्ररी होती, त्यातून ती तिच्या field चे बुक्स वाचून माहिती गोळा करत होती... जे समजले नाही ते इतर टीम मेंबर सोबत विचारून क्लिअर करायची.... 

दागिने जिथे बनायचे ते ऑफिस दुसरे होते.....तिथे  कोणालाही जायला परवानगी नव्हती..... माहीने अर्जुनकडून त्यासाठी परवानगी घेतली होती.... तिला प्रत्यक्षात दागिने कसे बनतात ते बघायचे होते...एखादा खडा कसा कापतात, किती साईडने , कोणत्या कोणात  कापला म्हणजे त्यांच्या चमकवर कसा फरक पडतो,  अशा अनेक गोष्टींचे बारकावे ती शिकत होती...धातू बद्दल पण तिने डिटेल माहिती शिकत होती....या सगळ्यांमुळे तिला उत्तमत्तोम दागिने डिझाईन करायला मदत होत होती....

*********

ऑफिसमध्ये एक छोटेसे अवॉर्ड फंक्शन ऑर्गनायझ केले होते...वर्षभरात उत्कृष्ट काम केलेल्या बेस्ट कँडिदेट्सला अवॉर्ड देण्यात येणार होते......त्यासाठी अर्जुनच्या हॉटेलमध्ये प्रोग्राम ठेवला होता..... ऑफिस स्टाफ विथ फॅमिली आमंत्रित केले  होते......काही नाच गाण्याचे रिफ्रेशमेंट प्रोग्रॅम्स पण ठेवले  होते......संध्याकाळचे सात वाजत आले होते, हळू हळू सगळे हॉटेलमध्ये जमायला लागले होते.....अर्जुन, आकाश, अंजली , अनन्या, आशुतोष रूही , श्रिया असे अर्जुनच्या घरून आले होते.....सगळे आपापल्या जागी जाऊन बसले होते....समोर स्टेजवर कार्यक्रम सुरू होते........अर्जुंचे मात्र सगळं लक्ष दाराकडे होते......म्हणजेच माहीकडे......माही अजून आलेली नव्हती......आणि फायनली माही आली........अर्जुन तर तिला बघतच ब्लँक झाला होता......इतकी सुंदर ती दिसत होती....

माहिने बेबी पिंक कलरची  शिफॉनची प्लेन सारी..... सेम कलरचे ब्लाऊज... फुल ट्रांस्परेंट स्लीवज, थोडेसे केस मागे घेत क्लच मध्ये अडकवले होते.....कानात सिंगल ग्रीन स्टड, गळ्यात सिंपल नाजूक चेन.....चेहऱ्यावर मेकपच्या नावाखाली फक्त डोळ्यात थोड काजळ, नी ओठांवर लाईट पिंक लिपस्टिक , कपाळावर मिडीयम साइजची डार्क ग्रीन टिकली......ती खूप गोड दिसत होती.....अर्जुन तर भान हरपून तिला बघत होता.......

माही सोबत मिरा, आई आणि आत्याबाई आल्या होत्या.....सगळ्यांसाठी असा हा पहिलाच मोठा कार्यक्रम होता........कुणालाही डिस्टर्ब न करता माही आपल्या जागेवर जाऊन बसली.....अंजलीचे लक्ष गेले तशी अंजली पण त्यांना जॉईन झाली......सगळे समोर सुरू असणारे कार्यक्रम एन्जॉय करत होते..........

" Excuse me mam.." .....म्हणत एक हॉटेलची स्टाफ माही जवळ आली.....माहीने तिच्याकडे बघितले...

" थोड काम होते, इकडे याल प्लीज" .........स्टाफ

" हो.." ...म्हणत माही तिथून उठून तिच्या सोबत गेली......तिथेच दुसऱ्या एका फ्लोअरला एक्झिक्युटिव्ह सेक्शनला त्या स्टाफने तिला तिथे सोडलं......

" Mam, that side , sir is waiting for you...." .... स्टाफने तिला सांगितले तसे तिने त्या साईडला बघितले तर अर्जून तिथे तिची वाट बघत उभा होता.......तिला बघून त्याने तिला स्मायल केले.......माही तर काहीच न कळल्या सारखे त्याला बघत होती.....आज तो पण परफेक्टली ड्रेसअप , सुपर हँडसम दिसत होता.....थोड्यावेळ साठी ती त्याच्यावरचा राग पण विसरली होती.....इतकी ती त्याला बघण्यात गुंतली होती....

"Anything else sir......??" .... स्टाफ

"Make sure no one will come on this  floor" ....... अर्जून

" Sure sir.." .....म्हणत ती निघून गेली..

माही त्याला बघण्यात गुंतली आहे...हे अर्जुनच्या लक्षात आले ....तिला तसे बघून त्याच्या चेहऱ्यावर गोड हसू पसरले.....

" उगाचच रुसायच नाटक करत असते तू माही....तुला पण माहिती आहे तू माझ्याशिवाय नाही राहू शकत......ठीक आहे,  मला तुझं असं हे रुसने पण आवडले आहे..... सगळच गोड गोड कसे असणार ना नात्यामध्ये?.......तुझा हा रुसवा....हा राग पण मला खूप गोड वाटतो आहे" .....तो तिच्याकडे बघतच, चेहऱ्यावर गोड स्मायल ठेवत तिच्या जवळ येत होता......नी तिच्या समोर येऊन उभा राहिला...

"मी खूप हँडसम दिसतो आहे ना ?".......अर्जुन दोन्ही हात आपल्या खिष्यामध्ये घालून उभा राहत तिच्या कानाजवळ थोडा वाकून बोलला

"हो........तुम्हालाच बघत राहावं वाटत आहे........" माही पूर्णच हीपनोटाइज झाली होती त्याला बघण्यात...

अर्जुनच्या चेहऱ्यावर खोडकर हसू आले.....त्याला तसे हसतांना बघून ....आपण काय बोलून गेलो ते माहीच्या लक्षात आले....आणि  ती त्याच्यापासून सरकत थोडी मागे झाली...

" का बोलावले इथे.....??" ......माही

अर्जुन काहीच न बोलता तिच्या जवळ  येत होता....ती त्याला पुढे येताना बघून मागे मागे सरकत होती...

" हे बघा.....तुम्ही हे ठीक नाही करत आहात?" ......माही

अर्जुन परत सेम काहीच न बोलता महिकडे बघत पुढे येत होता......मागे सरकत सरकत माही आता एका खिडकी जवळच्या भिंतीजवळ अडकली....आता मागे जायला काहीच जागा नव्हती...... अर्जुनला असे जवळ आलेले बघून तिच्या हृदयाची धडधड आता वाढली होती.....ती आता टेन्शन आलेल्या नजरेने अर्जुंनकडे बघत होती.....

" हे बघा तुमचं हॉटेल आहे म्हणून तुम्ही असे काहीही करू शकत नाही."......माही

" आपले " .........अर्जुन

" काय.......??" ....माही

" आपलं हॉटेल आहे.........तू आता या हॉटेल ची owner आहेस.........सो तुला जे वाटते ते तू सुद्धा इथे करू शकतेस.....कधीही, केव्हाही....कुठेही......तू कधीही इथे येऊ शकतेस.....पाहिजे ती रूम, पाहिजे ते हॉल कधीही बुक करू शकते.......जे पाहिजे ते तू करू शकतेस"......म्हणत अर्जुन अजून तिच्या जवळ आला....

" तुम्ही असे जवळ येऊ नका.......मला काहीच सुचत नाही" ......माही

" तू अशी इतकी गोड माझ्या पुढे असशील......माझी बायको..........कसे काय कोणी कंट्रोल करावं? .........किती अवघड जाते आहे दूर राहायला...... कसं कळणार तुला?"  ........ अर्जून

" मला सगळं कळते सर......माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय ते पण कळते मला......खरंच मला तुम्हाला कुठलाच त्रास द्यायचा नव्हता.....त्यासाठीच तर दूर राहत होते" .............माही मनातच विचार करत होती.......आणि  काहीच न बोलता त्याच्याकडे बघत होती.......

" तस तर माझी माही सगळ्याच अवतारात खूप सुंदर दिसते....पण मला तिचे हे सिल्की केस मोकळेच खूप आवडतात" ......म्हणतच अर्जुनने तिच्या केसांना लावलेले क्लच काढून आपल्या खिशात ठेवले आणि दुसऱ्या हाताने तिचे केस मोकळे करत सारखे केले........तिच्या डोळ्यांमध्येच बघत त्याने तिचा डावा हात आपल्या हातात घेतला.......ती त्याच्या नजरेत कैद झाली होती.....खिडकी मधून थंड फ्रेश हवा आतमध्ये येत होती.......आता तिचे केस हवेसोबत खेळत होते.....अर्जुनने तिचा हाथ आपल्या (हार्टवर) छातीवर  ठेवला......आता तिला त्याचा हार्ट बिट्स स्पष्टच जाणवत होत्या.....अर्जुनने आपल्या खिशातून एक डायमंडचे नाजूक  ब्रेस्लेट ज्यात थोड्या थोड्या अंतरावर छोटासा हार्ट शेप मध्ये लाईट पिकं डायमंड होते ते काढले नी तिच्या नाजूक हातामधे फिक्स केले........

"हे खूप महाग आहे" .........माही त्याच्याकडे बघत बोलली

" Nothing is expensive than you.....this is for the most gorgeous lady on the earth.....this is for my Love........ I Love you Sweetheart"........म्हणतच तो तिच्या ओठाजवळ जात होता...

" उशीर होत आहे" .........माही

तिचं ते बोलणं ऐकून अर्जुन गालातच हसला......आणि  तिच्या दूर झाला.......तो दूर झालेला बघून माही जायला निघाली तर परत थांबली.....

" काय.....??" ...अर्जुनने डोळ्यांनीच इशारा केला

माहीने पण त्याला डोळ्यांनीच हाताकडे इशारा केला.....त्याने बघितले तर त्याच्या हातात तिचा हाथ त्याने पकडून ठेवला होता.......तो हसला.......त्याने तिचा हाथ वर करत तिच्या हातावर किस केले आणि  तिचा हाथ सोडला...........आणि  तिच्याकडे बघून हसला...

माहीच्या हृदयाचे ठोके इतके वाढले होती की आता तिलाच ऐकू यायला लागले होते........ती त्याच्याकडे बघतच मागे मागे जात होती.....

"माही......नीट बघून" .......अर्जुन बोलतच होता तेवढयात.......ती आपटलीच,  भिंतीवर जाऊन.........

" Maahi, are you okay......???" .... अर्जून तिच्या जवळ जात बोलला.....

"परत हे जवळ आले तर माही तू इथून निघायची नाही".....विचार करतच माही कपाळाला चोळतच तिथून पळाली........

" माही.....का इतकी गोड आहेस?" .........अर्जुन पळत जाणाऱ्या माहिकडे बघत स्वतःशीच लाजला होता....

*******
क्रमशः


********

नमस्कार मित्रांनो

ईरा वरील सदाबहार कथा आम्ही pdf स्वरूपात तुमच्या समोर  सादर करत आहोत. होंगे जुदा ना हम, quarantine लव्ह स्टोरी, कळत नकळत, घरकोन, लूप होल, सनकी आणि अश्या अनेक गाजलेल्या कथा त्यात आहेत. प्रचंड गाजलेल्या आणि मनाचा ठाव घेणाऱ्या या कथा आपल्याला नक्कीच आवडतील. संग्रही ठेवण्यासारख्या या कथा आहेत. बऱ्याच वाचकांनी नोंदणी केली आहे त्यांना अंक दिला गेला आहे. ज्यांना अजूनही हवा आहे त्यांनी 8087201815 या नंबर वर 35/- शुल्क भरून पेमेंट स्क्रीनशॉट याच नंबर वर व्हाट्सअप्प करावा. तिथे तुम्हाला अंक देण्यात येईल.

धन्यवाद !!

*******