तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 55

माही अर्जुन

भाग 55

माही अजूनही शॉक मध्ये होती....कसे काय अर्जुन असे अचानक काहीच न सांगता तिच्यासोबत लग्न करू शकतो.....तिला राग तर भयंकर आला होता....पण सोबतच मिराला त्याने स्वतःचे नाव दिले होते.....मिरा वर  आणि  माहीवर उठणाऱ्या वाईट नजरा घालून आता त्यांना पण समाजामध्ये मान मिळणार  होता.... मिराचे भविष्य सोनेरी झाले होते....... अर्जुनचे बाहेरच्या जगात इतके मोठे नाव होते की , त्यांच्या मागे फक्त त्याचे नावच जुळल्याने त्यांचे आयुष्याचे 70-80 टक्के प्रॉब्लेम्स तर त्याच्या नावानेच सुटणार होते.......आयुष्य जगण्याची वाट त्याने खूप सोपी करून दिली होती.........त्यामुळे तिला त्याचा राग आला असूनही मनातल्या मनात ती त्याचे आभार सुद्धा मानत होती...पण त्याने जे तिला न विचारता केले होते त्यासाठी ती सहजासहजी त्याला सोडणार नव्हती.......आणि त्यामुळेच आता तिने त्याच्यासोबत अबोला धरला होता...... ऑफिसमध्ये तो एकही चांस सोडत नव्हता तिच्यासोबत बोलण्याचा , तिला मनवण्याचा.....पण ती काहीच बोलत नव्हती.....आणि  त्याचाकडे दुर्लक्ष करत होती......लग्न कसे कॅन्सल करता येईल सतत माहीच्या डोक्यात तेच सुरू होते.....

" जाऊ की नको आतमध्ये??......स्वतःहून आतमध्ये गेली तर वाघाच्या जबड्यात स्वतःहून डोक दिल्यासारखे होईल.....किती बोलायला लागले हे.....आणि  काही झाले की मॅरेज सर्टिफिकेट दाखवत असतात, अक्षरशः फ्रेम करून ठेवली आहे त्याची...जसेकाही मोठे प्रमाण पत्रच .....म्हणजे आपली बोलती बंद.....सतत आठवण करून देत असतात मी त्यांची बायको आहे ते..... अरे यार काय करू यांचं??....आतमध्ये गेले तरी प्रॉब्लेम , नाही गेले तर बोलू तरी कशी.....???? ".....माही करांगळीचे  नख कुरतडत अर्जुनच्या कॅबिन पुढे उभी राहत विचार करत होती......अर्जुन आतूनच तिचे भाव बघत होता....त्याला तिला तसे बघून त्याला हसायला येत होते......

"माही तू आतमध्ये येऊ शकते" ........अर्जुन

अर्जुनच्या आवाजाने तिची विचारांची शृंखला तुटली......आणि  ती हळूच दार उघडून आतमध्ये गेली

" बोला मिसेस अर्जुन?" .............अर्जुन

" व्हॉट...???" ..........माही डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती..

" "व्हॉट".......nice progress" ......... अर्जुन गालातच हसत तिच्याकडे बघत होता...

" क.....काय.......??..हसायला काय झाले....?" ..माही भुवया उंचावत बोलत होती..

"माझ्यासारखी होते आहे तू आता......माझ्यासारखी बोलायला लागली आहेस" .........अर्जुन

" क....कोण....??...मला नाही बनायचे तुमच्यासारखे" .......माही

" Okay....... तू कशी पण आवडते मला" .........अर्जुन

"माही जे बोलायला आली ते बोल.....नाही तर बोलण्यात हे आपल्याला गुंडाळून ठेवतील" .......माही मनातच विचार करत होती

" ह,.....बोला.,..जे डोक्यात येत आहे ते........ येवढुष्या डोक्याला येवढा मोठा त्रास दिलेला मला चालणार नाही"........अर्जुन

" तुम्ही परत........जाऊ दे......मला divorce घ्यायचा आहे"........ माही खूप शक्ती एकवटून बोलली.......

अर्जुन चूपचाप तिच्याकडे बघत होता.......माही त्याच्याकडे बघत त्याची काही बोलण्याची वाट बघत होती.........थोडा वेळ असाच शांततेत गेला......अर्जुन काही बोलत नाहीये बघून माही परत बोलली...

"मला तुमच्यापासून वेगळं व्हायचं आहे".........माही

माहीचे ते शब्द त्याच्या जिव्हारी लागले होते.....पण तरीही त्याने त्याचा तोल ढळू दिला नाही.... स्वतःवर संयम ठेवत तो तिच्याकडे बघत होता....

" Good....... ॲक्च्युअली चांगलं सांगितले.....wait, I will call our lawyer........he will explain you all the process'" ........... अर्जून

"हा.???....इतक्या लवकर मानले??".......माही विचार करत अर्जुनकडे एकटक बघत होती..

"स्वीटहार्ट.....तुझा  एक एक शब्द माझ्यासाठी अनमोल  आहे........तुझं नाही ऐकणार तर कोणाचं ऐकणार??.......happy married life चा rule च हा आहे....'बायकोचं ऐका, सुखी राहा'" ......अर्जुन तिची मस्करी करत होता...

" आगाऊ !!" ......... माही स्वतःच पुटपुटली..

अर्जुन हसला.....आणि त्याने कंपनीच्या वकीला फोन करून केबिन मध्ये यायला सांगितले.

"बसा मिसेस अर्जून......... तुमचंच ऑफिस आहे"........ अर्जून

" माही......मी माही आहे" ........माही

"Okay...... मिसेस माही अर्जुन....... प्लीज बसा"......आणि त्याने परत फोन केला..

" One ginger tea and one coffee........send fast"....... बोलून अर्जुनने फोन ठेऊन दिला..

माहीने डोळे फिरवत अर्जुनकडे बघितले.... परत काही बोललो तर यांची नॉनस्टॉप चटरपटर सुरू होईल....माही चुपचाप बसली....तेवढयात लॉयर तिथे आले........

"Oh come Mr Rai ....please come"...... अर्जुन

तसे रॉय आतमध्ये  आले.....

" सर....काही issues आहेत काय......??" ... रॉय

"ह्मम.....बसा".......अर्जुन

"Thank you sir......... बोला काय इश्यू आहेत......??" ... रॉय

" Mr Rai.... एक महिन्या आधीच रजिस्टर लग्न झालं असेल, आणि divorce घ्यायचा असेल तर काय रुल्स आहेत....??" .....अर्जुन

" Okay...... सर,  सहा महिने कपलला divorce नाही घेता येत, दुसरं म्हणजे कपलला अटलिस्ट सहा महिने एकत्र राहावं लागेल" ... रॉय बोलतच होते .....आणि माही शॉक होत त्यांच्याकडे आणि  अधूनमधून अर्जुनकडे बघत होती.....

" सहा महिने नुसते सोबतच नाही, तर त्यांना त्यांच्या मध्ये फिजीकल नातेसंबंध सुद्धा प्रस्थापित करायला लागेल......एकंदरीत म्हणजे पूर्णतः नवराबायको सारखे राहावे लागेल....मग divorce साठी अपील करू शकता....आणि कोर्ट परत त्यांचे काही नियम सांगतील" .... रॉय

" Okay thank you Mr Rai.....you may go now"...... अर्जुन

"Thank you" ...... म्हणत रॉय बाहेर निघून गेले...

अर्जुन एक भुवई उंच करत माहीकडे बघत होता..... माही तर एकदम स्तब्ध झाली होती...

" तर सांग कधी येऊ तुला घ्यायला....??" .....अर्जुन

" कुठे..??" ...माही

" तुझ्या घरी.....??" ....अर्जुन

" कशाला..??" ....माही

" तू ऐकले ना रॉय काय म्हणाले ते....??..तुला सहा महिने माझ्यासोबत माझी पूर्णतः, पूर्णतः या शब्दावर जोर देत....तुला माझी बायको बनून माझ्या सोबत माझ्या घरी राहावे लागेल......नंतर अपील करता येते.......तर कधी येते आहे राहायला.....??" .....अर्जुन

" नकोय मला divorce....... सहा महिन्यांनी बघू" .....म्हणतच चिडतच ती बाहेर जायला निघाली..

" माही " ..........अर्जुनने आवाज दिला...

" आता परत काय राहिले?? " .......माही

" माही........जरी कधीही कुठल्याही कारणाने आपला divorce झाला तरी मीराची कस्टडी फक्त माझ्याकडे असेल आहे" ........अर्जुन

" क.....काय...??" ......माही

"हो..... फ्युचरमध्ये काही झाले तरी मिरा फक्त माझ्याकडेच राहील.....तू साइन केले आहेत ते पेपर्स" ......त्याने तिला पेपर दाखवले.....

माही शॉक होत ते बघत होती....

" कसं आहे ना माही.....आता मी तुला पूर्ण ओळखायला लागलो आहे.....तुझ्या डोक्यात,  मनात ज्या गोष्टी येतात ना , त्या तुझ्या डोक्यात यायच्या आधीच  माझ्या डोक्यात येतात आता.....त्यामुळे तू काय काय करू शकते, बोलू शकते , मला माहिती आहे .....आणि काहीपण अयोग्य  व्हायच्या आधीच मी ती सोय करून ठेवलेली आहे" ....... अर्जून

" म.....मी.....हे पेपर फाडून टाकते.....म्हणजे मग काहीच प्रॉब्लेम राहणार नाही"........माही

"Yeah, sure....go ahead....... it's already registered in office and I have lots of copies of these  papers".......... अर्जुन

" तू....तुम्ही खूप वाईट आहात......खूप वाईट आहात"........तिचा राग अनावर झाला......तिने हाताची मुठ्टी आवळली आणि रागातच  टेबलवर मारली..........पण तिच्याच हाताला लागले होते......आणि  तिच्या डोळ्यात पाणी आले...

अर्जुनला तिचा राग कळत होता.....अर्जुनने एकही रस्ता तिच्यापुढे मोकळा सोडला नव्हता.......पण तिच्या डोळ्यात असे पाणी आलेले बघून त्याला सुद्धा वाईट वाटत होते.......

" माही........ I am sorry ......मला खरंच तुला हर्ट नव्हते करायचे" ........म्हणतच तो तिच्या जवळ जात त्याने तिचा लागलेला हाथ आपल्या हातात घेतला..... माहीने त्याचा हातातून आपला हात काढून घेतला...त्याने परत तिचा हात पकडला....आणि यावेळी थोडा घट्टच पकडला....तिची वळवळ सुरू होती पण त्याच्या पुरुषी ताकदी पुढे तिची शक्ती कमी पडलीच.......तो तिच्याकडे बघतच  टेबलच्या ड्रॉवर मधून एक क्रीम काढून तिच्या बोटांना फुंकर घालत हळूवारपणे लावत होता......आणि  प्रेमाने मायेने तिच्या हातावरून हाथ फिरवत होता.......तिच्या डोळ्यात अजूनही पाणी होते........

" माही तुला जितके मारायचे आहे ना,  मला मार.......तुला जेव्हा पण राग येईल  मला सांग , मी तुझ्यासमोर तुझा मार खायला नेहमीच उभा असेल......खूप मार, मन मोकळं होईपर्यंत तुझा राग काढ ...........पण प्लीज स्वतहाला असा मार नको देऊस........खूप त्रास होतो" ......त्याने तिच्या हाताला ओढत तिला आपल्या कुशी मध्ये घेतले......आणि  घट्ट आपल्या मिठीमध्ये पकडून घेतले.....

" तुझं चिडणे, रागावणे साहजिकच आहे .....तूच काय कोणालाही असे न विचारता त्यांच्या आयुष्याचे इतके मोठे निर्णय दुसऱ्यांनी घेतले तर त्याला रागाचं येईल आणि सहन पण होणार नाही......पण खरंच माझ्यावर विश्वास ठेव ......हेच आपल्या तिघांसाठी चांगलं आहे ......यातच आपल्या तिघांचे भले आहे.......समजून घे ना तू.......मला माहिती तू स्वतःपेक्षा पण माझ्यावर जास्ती प्रेम करतेस.......तुला खरंच सांगतोय माझं सुख फक्त तुझ्यासोबत  आहे.....बाकी दुसरं मला काहीच नको आहे........मला फक्त तू हवी आहे...... प्लीज समजून घे .........तुझं किंवा मिराचे  काही वाईट होईल असे मी काहीच आणि  कधीच वागणार  नाही....मला खूप insecured वाटत होते....खूप भीती वाटत होती की तू कधीही मला एकट्याला सोडून निघून जाशील.....म्हणून फक्त मी हे सगळं केले आहे.....आणि दुनिया समोर पतिपत्नी तू म्हणशील तेव्हाच समोर येऊ.....माझं प्रॉमिस आहे तुला.........फक्त एकदा स्वतःला माझ्या जागेवर ठेऊन बघ....आणि  मग तू काय करशील मला सांग" .......अर्जुन तिला आपल्या मिठीत पकडून तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत तिच्या पाठीवर थोपटत समजावण्याचा प्रयत्न करत होता......

माहीला त्याचे बोलणे समजत होते....पण तिचं मन मानायला तयार होत नव्हते.....

*******

" आजी देवेशच्या घरचे म्हणत आहेत की फक्त लग्न जमले आहे....तर एखादं काही फंक्शन करून लग्न पक्क करून घेऊ" ........श्रिया

" श्रिया अजून तुझं शिक्षण पूर्ण व्हायचं आहे...... एवढी  काय घाई आहे....?? तू अजून लहान आहेस " ........अर्जुन

" भाई बरोबर बोलतोय .......इतकी घाई का करायची??....आणि त्याचा जॉब अजून पक्का नाही झालेला...ते होऊ दे ....मग बघू  पुढे" .......आकाश

" हो...ते काही साखरपुडा  किंवा लग्न नाही म्हणत आहे..... घरातलेच सगळे एकत्र जमून  टिळक लाऊन, नारळ देऊन फक्त लग्न पक्क करून ठेऊया...... लग्न नंतर आरामात सगळं सेट झालं की करू " ........श्रिया

" बरं......बघू ते.......आम्ही सगळे मोठे विचार करतो.....आणि कळवतो म्हणून सांग त्यांना" .......आजी

" ठीक आहे " ........श्रिया आनंदातच उड्या मारत आतमध्ये पळाली..

" मला देवेश बद्दल  काही positive फिलिंग येत नाही " .......... अर्जून

" तुला कोणीच चांगलं दिसत नाही......तू सगळ्यांकडे तुझ्या बिजनेस आणि  पैशांच्या लेव्हलने च बघतो......एखादा पैशाने कमी असला की तुला आधीच त्याच्यावर डाऊट येतो" .......आई

" असं नाही आहे......श्रिया माझी बहिण आहे तिचं लाइफ चांगलं असावे असे मला वाटते........आशुतोष पण काय श्रीमंत होते काय....??.....पण त्यांना बघितले तेव्हाच कळलं की अनन्या ताईसाठी परफेक्ट आहे .....ताईची चॉईस उत्तम आहे ते.......तसे देवशला बघून नाही वाटले" ......अर्जुन

" भाई त्याची माहिती काढली आहे.....ठीक वाटत आहे सगळं" .........आकाश

"ह्मम.....पण तरीही काहीतरी मिस करतोय असे वाटत आहे......होऊ शकते ,आई म्हणते तसेच असेल....माझा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे म्हणून तस वाटत असेल मला"......अर्जुन

"नाही भाई...तू म्हणतोय तर परत एकदा बघतो मी त्याचे डिटेल........आजी लग्नासाठी सध्यातरी घाई नको......असे मला पण वाटते......श्रिया आधी पूर्ण सेल्फ डेपेंडेंट असावी......नंतरच लग्नाचा काय तो निर्णय आपण घेऊ" .....आकाश
 

" बरं.....आम्ही करतो यावर विचार......पण त्यांचंपण बरोबर आहे.....त्यांना वाट बघणे जड जात असेल.....एकदा सगळ्यांसमोर पक्क केलं की ते मोकळे.....बघू विचार करू.....नाहीतर परत एकदा भेटूया सगळे" .......मामा

"श्रियाला सद्ध्या आपल्यातले बोलणे सांगू नका, ती खूपच पझेसिव आहे त्याच्या बद्दल....मागेच तर किती गोंधळ घातला होता तिने....लग्न करेल तर यांच्यासोबतच, नाहीतर कोणासोबत नाही......तर थोड तिचं मन सांभाळून करावं लागेल " ........आई

" माझं तर नशीबच फुटके आहे.........किती स्वप्न होते माझे मुलांच्या लग्नाला घेऊन.....पण या पोरांनी सगळे तुडवून टाकले......त्याने अशी फुटकी बायको आणली.....पण ठीक आहे आपल्याच घरी आहे , काळजी नाही काही....पण ही श्रिया.....हिने पण असा भिकारी मुलगा बघितला......असे कसे हे मूल प्रेमात आंधळे होतात.....आणि आपलीच मनमानी करतात.....अजिबात ऐकत नाही" .....मामीची बडबड सुरू होती...

मामीच बोलणं ऐकून आकाश अंजलीकडे बघत होता....." मी ठीक आहे "....अंजलीने त्याला डोळ्यांनीच सांगितले..

"अरे आम्ही काय बोलतोय....तुझं आपलं वेगळंच दुःख आहे" ........मामा

" माझी तर कोणालाच पडली नाही आहे.".....मामी धुसपुसत आतमध्ये चालली गेली

"ओके तुम्ही सगळे  जो निर्णय घ्याल तो बरोबरच असेल.....चला मी ऑफिस ला निघतो" .....अर्जुन

.........

माहीला काही टॉपिक कळत नव्हता, अर्जुन कडून समजून घ्यायचा म्हणून ती अर्जूनच्या कॅबिन जवळ आली ... दोनदा डोअर नॉक करूनही आतून आवाज आला नाही म्हणून माहीने दार थोडे किलकिले करून आत डोकावून बघितले.....तर अर्जुन त्याच्या खुर्चीला मागे टेकून डोळे बंद  करून बसला होता.... गळ्या भोवतीची टाय सुद्धा बरीच लूज दिसत होती.... शर्टच्या वरच्या बटन ओपन केलेल्या होत्या....बाह्य सुद्धा वरपर्यंत फोल्ड केल्या होत्या.....

माहीला अर्जुन कधीच ऑफिस मध्ये झोपलेला दिसला नव्हता....तो नेहमीच काम करत दिसायचा....तिला काहीतरी शंका आली आणि तो लगेच आतमध्ये जात अर्जूनच्या कपाळावर , मानेवर हात लाऊन बघत होती.....

" I am perfectly fine  Mahi ...".... अर्जून तिचा हात पकडत बोलला....तो तिच्या स्पर्शाने जागा झाला होता...

" पण मग असे का........".....माहीच्या आवाजात काळजी दिसत होती..

" तर तुला माझी काळजी वाटते तर.....  Very good....".... अर्जून

" ती तर नेहमीच असते...."....माही त्याच्याकडे बघत मनातच बोलत होती....

" Thank you "..... अर्जूनने तिच्या तळ हातावर किस केले.....आणि नीट बसत तिचा हात सोडला...

" काही नाही , असेच काही प्रॉब्लेम्स होते.... काय करावं काही कळत नव्हते....."... अर्जून ...माहीच मात्र त्याच्या बोलण्याकडे काहीच लक्ष नव्हते ती अर्जुनने किस केले तो हात आपल्या हातात पकडत त्या कडेच बघत होती ...

" माही , तुझे काही प्रॉब्लेम्स सुटत नसले तर तू काय करतेस ?" ......अर्जुन , पण माहीचे मात्र सगळं लक्ष तिच्या त्या हाताकडे होते....त्याचा तो स्पर्श अजूनही ती अनुभवत होती ...  

" खूप हट्टी आहेस माही....तुला हवे तर तेच आहे जे मला हवे आहे.....पण ॲक्सेप्ट नाही करणार तू ....." .... अर्जुन तिच्याकडे बघून हसला....

" माही .... कुठे हरवली ?".... अर्जून

" हा....?? काही नाही .... काय बोलत होते तुम्ही ,?'....माही आपला हात मागे लपवत बोलली

" मी विचारत होतो, तुझे जर  प्रॉब्लेम्स सुटत नसतील तर तू काय करते.....?"..... अर्जून

" मी तुम्हाला बघते " .... माही एकदम बोलून गेली ...

अर्जुनला त्यावर हसू आले .... ते बघून माहीला तिची चूक कळून आली

" म्हणजे , तू....तुम्हीच किती मोठा प्रॉब्लेम आहात....Unsolved biggest issue....... तुम्हाला इथे झेलू शकते तर बाकी प्रॉब्लेम्स तर छोटेच  आहेत तुमच्यापुढे ......."...... माही
 

अर्जून त्यावर खळखळून हसायला लागला.....

" खरं तर तुम्ही आहात म्हणूनच प्रॉब्लेम नसतो काहीच......तुमच्याकडे बघितले की जगण्यासाठी आपोआपच बळ मिळते..... ".....माही त्याच्याकडे बघत मनातच विचार करत होती...

" माही , मी एकदम सिंपल अँड स्ट्रेट फॉरवर्ड आहो...."....अर्जुन

" हो , एकदम जिलेबी सारखे सरळ .....".... माही

" म्हणून जिलेबी तुझी फेवरेट आहे तर.... आता कळले मला.... Thanks a lot ....."....आता तर मात्र तो पोट धरून हसत होता.....

आता माही ला पण हसायला येत होते, पण ती जाणूनबुजून आपलं हसू दाबत होती...

" माही you are so sweet yar ..... That's why I like your company ..... तू आजूबाजूला असली ना की सगळं स्ट्रेस हलका होता.... ".....त्याने तिला दुरूनच फ्लाईंग किस दिले.....

" माही , नेहमीच कशी ग तू माती खाते......काहीही बोललं तरी हे आपल्यावरच हाणून पाडतात सगळं .....".....माही त्याच्याकडे बघत मनातच विचार करत होती....

अर्जुन पुढे ठेवलेल्या ग्लास मधले पाणी पिले आणि आपले हसू आवरते घेतले....आता त्याला खूप फ्रेश वाटत होते....

" मी विसरलोच.....तुला बसायला सुद्धा बोललो नाही "..... अर्जुन

" ठीक आहे सर .....".... माही

" माही , काही काम होते काय ?"..... अर्जून

" अ ... हो .... ते मला एक टॉपिक समजत नव्हता, ते विचारायचं होते .... पण तुम्ही करा तुमचे काम, मी नंतर येते.....".....माही

" It's okay.... विचार काय विचारायचे आहे?" ....अर्जुन

माहीने एक फाईल त्याच्या पुढे ठेवली आणि त्यातले काही मुद्दे त्याला विचारात होती.....

" माही बस......"....अर्जुन
माहिने त्याच्याजवळ एक खुर्ची सरकवली आणि बसली....तो ती विचारत होती ते सगळं तिला समजावून सांगत होता..... कामाच्या बाबतीत दोघंही खूप समर्पित होते....त्यात मात्र कुठलीच हयगय , किंवा कोणताच पर्सनल प्रॉब्लेम त्याच्या मध्ये येत नव्हता....दोघंही खूप मन लावून काम करत होते....

माहीचे काम आटोपले तशी ती परत जायला निघाली ... परत काहीतरी आठवून थांबली..

" सर , तुम्ही खरंच ठीक आहेत ना ?".... माही.

" हो ..... श्रिया बद्दल विचार करत होतो .... बाकी काही नाही ....."..... अर्जून

" ठीक आहे "......बोलून ती बाहेर निघून आली ...

तसे तर हे छोटे छोटे कामामधले डाऊट माही डीपारमेंट मधल्या इतर लोकांना पण विचारू शकत होती....पण अर्जुन ज्या पद्धतीने तिला समजावून सांगायचा तिला ते खूप सोपी वाटायचे.....आणि त्याच्या सोबत तिला कंफर्टेबल सुद्धा वाटायचे.....अर्जुनला सुद्धा या छोट्या कामांसाठी वेळ नसायचा, ...पण माहीसाठी तो वेळात वेळ काढायचा....आणि तेवढेच त्याला कामाच्या निमित्ताने का होईना, माही सोबत वेळ घालवायला मिळत होता....

माही गेल्यावर अर्जूनने एक फोन कॉल केला..... आणि देवेश बद्दल माहिती गोळा करायला सांगितले..... आकाश तर बघतच होता हे काम, पण तरीही स्वतःच्या समाधानासाठी अर्जुन आपल्या लेवेलवर माहिती गोळा करत होता....

********


क्रमशः

🎭 Series Post

View all