तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 54

माही अर्जुन

भाग 54

"त.....तुम्ही फार आगाऊ झाला आहात" ........म्हणतच माही बाहेर जाण्यासाठी वळली....

"माही , wait..........I have something for you"...... अर्जुन

"मला नकोय काही" ...... माही

" तुझा  हक्क तुला देतोय.......आणि ते तुला घ्यावेच लागणार"........अर्जुन,

" माझा हक्क...???...म्हणजे.....???.....मला नाही कळले...??".......माही काहीच न समजल्या सारखे त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरने बघत होती.....

"खरं तर तुझ्यापासून लपवून ठेवायचे होते हे.......नव्हते सांगायचे मला...तू चिडशील, कदाचित खूप रागावशिल ही........पण खूप विचार केला....आणि  तुझा हक्क आहे हे जाणून घ्यायचे असे मला वाटले.....आणि म्हणूनच तुला सांगतोय...... infact दाखवतोच" .........म्हणत त्याने खिशातून एक बॉक्स काढत तिच्या पुढे धरला...

"नक्कीच काहीतरी महत्वाचे आहे......माझ्याशी संबंधित......मी चिडेल, रागवेल म्हणजे नक्कीच मी नाही म्हणत असलेले काहीतरी, माझ्या मनाविरुद्ध काहीतरी"........आणि विचार करतच तिच्या मनामध्ये धडकी भरली.......त्याच्या बोलण्याचा ती विचार करत होती...नी एकटक त्याच्या कडे बघत होती....

त्याच्या लक्षात आले होते की तिच्या मनात खूप प्रश्न निर्माण झाले  आहेत....जास्ती वेळ न घालवता त्याने तिचा हाथ आपल्या हातात पकडत दुसऱ्या हाताने तिच्या हातात तो बॉक्स ठेवला.......

ती एकदा बॉक्सकडे एकदा त्याच्याकडे बघत होती.....

" Open it " ....... त्याने नजरेनेच तिला खुणावले...

माहीने घाबरतच तो बॉक्स  उघडला.....  ती शॉक झाली.....आणि  अर्जुनकडे बघायला लागली......त्यात एक नाजूक सुंदर असे मंगळसूत्र होते..... काळे नाजूक छोटे मनी प्लॅटिनम धातू मध्ये गोठवले होते आणि मध्ये डायमंडचे AM लेटर्सचे  सुंदर डिझायनर पद्धतीचे पेंडंत होते.......त्यातले लेटर्स खूप निरखून बघितले की ते A M आहेत लक्षात येत होते ..... अन्यथा ते एक खूप सुंदर युनिक डिझाईन दिसत होते...

" मी डिझाईन केले आहे ते.....मी डिझायनर नाही ,पण  मी शिकलो थोडे....and  I tried my level best.......... कसे आहे...?....तुला आवडले काय....??"...... अर्जून

माही तर ते बघून गडबडली होती.....तिला काय बोलावे काही कळत नव्हते......आणि मग बराच विचार करून ती बोलली

" छान आहे......खूप छान डिझाईन केले आहे .....पण मी हे घेऊ नाही शकत.....मी तुम्हाला सांगितले आहे मी आणि लग्न,  शक्यच  नाही आहे " ..........माही

" का पॉसिबल नाही आहे..??.....लग्न करायला जे महत्वाचे आहे ते आहे आपल्याजवळ.....माझं तुझ्यावर  प्रेम आहे, आणि तुझं माझ्यावर...... I think this is enough to get marry"............ अर्जून

" तुम्ही खूप मोठे आहात........मी नाही तुमच्यासाठी योग्य".....माही

" माही तू बकवास करते आहेस........तू माझ्यासाठी योग्य नाही हे कोणी ठरवले...?? Anyways.... मला या फालतू आणि बकवास गोष्टींमध्ये पडायचे नाही आहे.....आणि हे जे तू पॉसिबल इम्पॉसिबल  लाऊन ठेवलंय तर सांगतोय.....हे पॉसिबल आहे....आणि हे झाले सुद्धा आहे" .......त्याने त्याच्या बॅग मधून काही पेपर काढले आणि तिच्या हातात दिले......"  read it.".....

" काय.....???" ... माही ते पेपर चेक करत होती.....

" हे.....हे .....क.....काय आहे..???" ...... माही घाबरल्यासारखी प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती....

"Our marriage certificate..........now legally we are husband and wife" ......... अर्जुन शांतपणे बोलला.....आणि तिच्याकडे ती कशी रिॲक्ट करते ते बघत होता....

"हे.....हे.....कसे होऊ शकते......??? ...माझं.....तुमचं ...लग्न......हे....हे..... खोटं आहे ".......माही अडखळत बोलत होती......तिला काहीच कळत नव्हते.....हे काय होत आहे ....

" हो .....आपलं लग्न झालं आहे एक मंथ आधीच.....दोन दिवस आधीच हे सर्टिफिकेट मिळाले  आहे...... सॉरी तुला न विचारता , न कळवता हे केलंय.....पण हे करणे गरजेचं होत" .......... अर्जून

माहीला तर तिच्या पायाखालील जागा सरकल्यासारखी वाटली.......तिला भीती वाटत होती....हजारो प्रश्न डोक्यात उपस्थिती झाले होते....या परिस्थितीला आणि घरी सगळ्यांना कसे सामोरे जायचे.....कोण काय म्हणेल.... असे असंख्य प्रश्न तिच्या पुढे उभे राहिले होते.... आणि सोबतच तिला आता अर्जुनाचा राग सुद्धा यायला लागला होता

" का....??..का इतकी घाई केली तुम्ही???..... तुम्हाला माहिती होते मला हे लग्न नव्हते करायचे......मग ....खोटं का वागले तुम्ही माझ्यासोबत........???" ....तिचे  अंग आता थरथर कापत होते......सगळ्यांना कळेल तर काय होईल याची भीती तिला वाटत होती........तिच्या डोळ्यांपुढे अंधारी येत होती.......ती डोक्याला हाथ लावत डोळयांच्या पापण्या उघडझाप करत होती.....,....

" माही......MAHI are you okay.....??... माही काय होते आहे तुला" ......... अर्जून बोलतच होता की माहीला चक्कर आली.....ती खाली पडतच होती की अर्जुनने तिला पकडले.....आणि  उचलून घेत त्याच्या केबिन च्या आतमधल्या रूम मधल्या बेड वर नेऊन तिला झोपवले.....

"माही...... माही" .....अर्जुन तिचा एक हात आपल्या हातात पकडत....दुसऱ्या हाताने तिच्या गालावर मारत तिला उठवत होता.......पण ती उठत नव्हती...त्याने त्याच्या टेबल वरून पाण्याचा ग्लास आणला आणि थोडंसं पाणी माहीच्या डोळ्यांवर शिंपडले........पाणी चेहऱ्यावर पडल्याने माही शुद्धीत येत होती.....

" Maahi , are you okay...??" .......  अर्जून काळजीने विचारत होता...

" तुम्ही......तुम्ही खूप वाईट  आहात.......तुम्ही फसवले मला.....आता सगळ्यांना काय सांगू..??...कशी सगळ्यांच्या समोर जाऊ..??..आई, आत्याबाई...तुमच्या घरी आजी, आई....काय बोलतील मला??.....माझ्यामुळे सगळ्यांना त्रास होत असतो.....मी किती प्रयत्न करते की माझ्यामुळे कोणाला काही दुःख नको व्हायला पण तुम्ही....तुम्ही का केले असे....??...तुम्ही........तुम्ही खूप खराब आहात...... I don't like you" ...........माही रडत रडत बोलत  होती.......तिला नीट बोलता पण येत नव्हते..... तिचं मन खूप दाटून आले होते.........रडता रडाता हुंदके देत.........अर्जुन पण तिला तिचं मन हलके करू देत होता......त्याला अपेक्षित होते माही कदाचित या सगळ्या प्रकाराने दुखावली जाईल .... ती हे सगळं स्वीकारणार नाही .....

" मी.....मी कशाच्याच लायकीची नाही.......मी सगळ्या साठीच श्राप आहे, माझे बाबा बरोबर म्हणाले होते , माझ्यामुळे सगळ्यांना फक्त दुःख मिळते........मला जगायचा अधिकारच नाही........नाही जगायचं मला.....नाही जगायचं......हरली मी.....हरली मी." ..........

" Sh ssss " ......... अर्जूनने तिला  टाईट हग केले.......माही त्याला ढकलन्याचा प्रयत्न करत होती....पण त्याने तिला आपल्या मिठीत घट्ट पकडून ठेवले होते.......

बाजूला असलेला फोन एका हाताने अर्जुनने उचलला...दोंनतीन काही नंबर दाबले....

" Send two pineapple juice..... quick" ........म्हणत त्याने फोन ठेवला...

" माही , हे बघ लिगली आपण नवरा बायको आहोत आता.....पण फक्त कागदावर........मी तोपर्यंत तुझ्या जवळ नाही येणार जोपर्यंत तू मला तुझ्या मनाने  पूर्णपणे नवरा म्हणून स्वीकारशील नाही.....जोपर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत आपण आता राहतो तसेच राहणार आहोत....तू तुझ्या घरी, मी इकडे शांतीसदन......आणि  जोपर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत घरी, बाहेर कुठेच कोणाला हे माहिती होणार नाही.......हे फक्त आपल्या दोघांमध्ये च असणार आहे .......मला माहिती आहे लग्न हे तुझं खूप मोठ स्वप्न आहे............ज्या वेळी तू आपल्या लग्नासाठी तयार होशील तेव्हा मी तुमच्या असलेल्या सगळ्या चालिरीतीप्रमाणे   तुझ्यासोबत सर्वांसमोर लग्न करेल......... I promise you..... पण आता हे करणे खरंच गरजेचं होते.....तुझ्यासाठी,  मीरासाठी.......आणि माझ्यासाठी पण.......तू एकतर इतकी अतरंगी आहेस ....तू सोनियासारखी अजून कुठली मुलगी माझ्यासाठी शोधून आणली असती....आणि परत मला तुझ्या emotions मध्ये ब्लॅकमेल केले असते.....किंवा अजून काही प्लॅन्स केले असते.....कदाचित माझ्या सुखासाठी तूच कुणासोबत लग्न सुद्धा  केले असते.....तुझ्या डोक्याचा काहीच भरवसा नाही आहे...........आणि मला हे सगळं नेहमीसाठी  थांबवायचं होते.....मी फक्त तुझा, नी तू फक्त माझी आहेस येवढेच मला क्लिअर करायचे होते......मला माहिती आहे तू कधीच माझ्यासोबत लग्न साठी तयार नसती झाली....तुला असे वाटते की तुझ्यामुळे मला त्रास होईल......तुझ्या सोबत झालेल्या गोष्टीमुळे तुला माझ्या आयुष्यात यायचे नाही आहे......तुला असे वाटते की तू माझ्यासाठी योग्य नाही आहे.........माही ...हे सगळं तुझं खूप प्रेम आहे माझ्यासाठी....मला माहिती आहे....तू तुझ्या प्रेमापोटी माझ्या लाईफ मध्ये यायला तयार नाहीस.......पण तुला हे का कळत नाही आहे मी नाही जगू शकत तुझ्याविना......खूप त्रास होतो तू जवळ नसली की.......तू आणि फक्त तूच परफेक्ट मॅच आहे माझी.......तू वेगळी आहे, सगळ्यांपेक्षा वेगळी.....तू खूप चांगली मुलगी आहे.....आणि मला तुझ्यापेक्षा दुसरी कुठलीच चांगली मुलगी भेटणार नाही.....आणि मला दुसरी कुठली नकोय सुद्धा......मला फक्त तू नी मीरा हवे आहात.......तुम्हा दोघिंसोबत च माझं लाईफ कंप्लीट आहे" .........अर्जुन तिच्या डोक्यावरून , पाठीवरून हात फिरवत तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता......

माही काहीच ऐकण्याचा मूड मध्ये नव्हती.....तिने पूर्ण शक्ती एकवटून तिच्याभोवती असलेले त्याचे हाथ बाजूला केले आणि  त्याचा दूर झाली.....

" मी कधीच , कधीच नाही येणार तुमच्याजवळ....तुमची बायको बनून" ........माही रागात बोलत होती.....

" मी वाट बघेल" .........अर्जुन शांतपणे बोलला

" तुम्ही वाट बघून थकाल, तरीपण येणार नाही" ........ माही

मी माझ्या लाईफच्या अखेर पर्यंत तुझी वाट बघेल..............so I don't care..... तुला जितका वेळ घ्यायचा... घे....मला कसलीच घाई नाही.... I will wait.".......अर्जुन

" तुमचं डोकं ठिकाणावर नाही.......मला तुमच्यासोबत काहीच बोलायचं नाही....आणि मला हे लग्न सुद्धा मान्य नाही " ........रागातच बोलत माही परत जायला वळली....

" माही...,हे  सर्टिफिकेट ....." ......म्हणात त्याने काही पेपर्स तिच्या पुढे ठेवले....


"

आणि हे.....मिराचे पेपर......now she is legally my daughter......Meera Arjun Patwardhan ..... तुला तिला स्कूल मध्ये किंवा बाहेर कुठे घालायचं असेल तर तू आता तिला घालू शकतेस" .........म्हणतच त्याने मिराचे सगळे पेपर्स माहीच्या पुढे ठेवले...........

त्याचं ते बोलणं ऐकून आता माहीला खूप गहिवरून आले.......त्याचे  तिच्या  आणि  मिरा प्रतीचे  प्रेम त्याच्या वागण्यातून नेहमीच दिसत होते......पण आज त्याने मिरा साठी जे केले होते.......तिला त्याच नाव देऊन.......मिराचे भविष्य त्याने सुरक्षित  केले होते.......तिच्यावर उठणारे बोट , त्यानं मोडून काढले होते........साक्षात देवाच्या रूपानं तो तिच्या आयुष्यात आला होता..........माही त्यासाठी त्याची आयुष्यभर ऋणी राहणार होती......पण तरीही त्याने लग्न तिला न सांगता केले होते...आणि मुळात तिच्यासोबत का केले..... त्याचा तिला राग होताच........पण ती आता शांत झाली होती......तिने शांतपणे समोर ठेवलेले सगळे पेपर उचलून घेतले........एकदा अर्जूनकडे बघितले आणि  परत जात होती.....


"

माही.... हे मंगळसूत्र........तुला घालायची अजिबात जबरदस्ती नाही आहे......जेव्हा तुला माझी बायको बनायची खरंच मनापासून इच्छा होईल तेव्हा घाल ते.........तसे तर मला स्वतःला हे असे काही अजिबात  आवडत नाही.....पण तुझा या सगळ्या गोष्टींवर विश्वास आहे , त्याचा मी रिस्पेक्ट करतो ......आणि म्हणूनच  असेच सेम AM initials डिझाईनचे लॉकेट मी घातले आहे......तुझ्यासोबत कमिटेड आहो मी ........आणि हे मी कधीच काढणार नाही" .....म्हणत त्याने त्याच्या शर्टच्या वरच्या दोन बटन काढत त्याने घातलेली चेन तिला दाखवली....

तिला ते बघून खूप वाईट वाटले......तिने चुपचाप ते मंगळसूत्र हातात उचलून घेतले नि आपल्या मुठीत बंद केले.........आणि  तिथून त्याच्यासोबत काहीच न बोलता बाहेर निघून गेली...

तसे तर हे लीगल डॉक्युमेंट्स बनवणे सोपी नाही .... त्याच्या काही प्रोसिजर असतात...पण अर्जूनसाठी हे कठीण नव्हते... त्याने आपले कॉन्टॅक्ट वापरून सगळे पेपर्स पटापट तयार करून घेतले होते.

अर्जुनला माहिती होते यावेळी ती त्याच्यावर खूप नाराज झाली आहे.....पण ती नक्कीच त्याच्याजवळ येईल त्याला विश्वास होता.......

एक महिना आधी माही काही कारणामुळे रविवारी तिच्या ड्रेस डिझायनिंगचा कामासाठी शांतीसदन ला  जाऊ शकली नव्हती,  आजीने काही ड्रेस डिझायनिंगच सामान अर्जुन बाहेर तिकडेच कुठे  जात होता तर माहीच्या घरी पोहचवायचे सांगितले होते......तो ती बॅग घेऊन दाराजवळ गेला तर त्याला आतमधून काही बोलणे ऐकू आले होते तर तो तिथेच थांबला.


"

बऱ्याच शाळा बघून आली मिरा साठी....पण सगळीकडेच वडिलांचे नाव विचारतात आहे....काय करू काही कळत नाही आहे" .........माही हताशपणे बोलत होती


"

अग....पण अजून ती लहान आहे......काय घाई एवढी....??.....आई


"

अग आता ती चार वर्षाची होईल....जुलै पासून तिला शाळेमध्ये जायला लागेल ना...... अडमिशन आताच सुरू होतात पुढल्या वर्षी साठी....आणि तसेही आता नाही पण नंतर तर  घालावे लागेलच ना तिला शाळेत......प्रत्येक ठिकाणी Father name विचारतात आहे ग" .........माही


"

किती वाईट आहे हा समाज....आणि या समाजाचे नियम........चूक कोणी करायची, आणि भोगायच कुणी......माझं तर जाऊ दे....पण ही निष्पाप माझी  मिरा....तिची काय चूक होती ग.......??? का तिला सुद्धा आता हा समाज हिणावणार?.....तिला बाबा नाही म्हणून तिला सुद्धा बोलणार......काय वाईट केलेय ग माझ्या या बाळाने समाजाचे....??.......का शाळेमध्ये वडिलांचे नाव महत्वाचे आहे.??.....का फक्त आईच्या नावावर का एडमिशन नाही भेटू शकत मुलांना.....?....का वडिलांचं नाव नसले नावामागे तर का सन्मान नाही मिळत  या समाजामध्ये...??....खूप वाईट आहे हा समाज.....ज्याने चुकी केली तो बिनधास्त आनंदाने जगतोय....आणि जे निष्पाप आहेत....समाज त्यांनाच शिक्षा देतोय......खूप वाईट आहे हे सगळं" ...........माही उर दाटून येत होता..


"

माही , तुझं लग्न झाले की हे सगळे प्रश्नच मिटतील" .......आई


"

आई मी अशी, कोण मला स्वीकारणार आहे....??.आणि समजा कोणी तयार ही झाले तर मिरा ला स्वीकारेल काय..??....तिला तो सर्व प्रेम मान मिळेल काय..??...आणि तसे पण मला मुळात लग्नच नाही करायचे" .......माही


"

अग पण." ........आई


"

आई मला खरंच लग्न नाही करायचे......दुसऱ्या कुठल्या व्यक्तीसोबत  मी नाही राहू शकत" ......माही


"

मग आता काय करणार आहे....??".....आई


"

काहीच कळत नाहीये ......विचार करून डोकं दुखायला लागले....."....माही

अर्जुन बाहेर उभा हे सगळं ऐकत होता......ते ऐकून त्याला मिराची खूप काळजी वाटली.....आणि  वाईट पण वाटत होते....माहीच्या हट्टपणामुळे मिराचे आयुष्यं खराब व्हायला नको.....त्याला माहिती होते माही खूप जास्ती इमोशनल आहे.....ती प्रॅक्टिकल विचार करत नाही.......आणि तेव्हाच त्याने माहिसोबत  लग्न करायचा निर्णय घेतला होता.....आज ना उद्या , लग्न तर तो तिच्यासोबतच  करणार होता.....पण आता गरज आहे म्हणून आणि  माहीच्या डोक्यात फालतूपणा काही यायला नको म्हणून त्याने आताच तिच्या सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.....तिला जर सांगून केले असते तर ती कधीच तयार झाली नसती.....कारण जेवढ तिचं मिरावर प्रेम होते तेवढेच अर्जुनवर सुद्धा होते......आणि तिच्या डोक्यात कुठूनतरी हे फिट बसले होते की ती जर अर्जुनच्या आयुष्यात आली  तर त्याला त्रास होईल........आणि म्हणूनच त्याने तिला काहीच कळू न देता त्या दिवशी तिच्याकडून सगळे पेपर्स साइन करून घेतले होते.......


"

खूप कठीण जाणार आहे परत या stupid ला मनवणे........ अर्जुन पटवर्धन लागा कामाला ,... माही अर्जुन पटवर्धन ची मनधरणी करणे म्हणजे हे साधसुध  प्रकरण नाही.... गिफ्ट दिले तर विरघळून  जाईल.......हे एक जगावेगळं अँटीक पिस आहे....very tough task " .............अर्जुनने एक मोठा श्वास घेतला, एकदा बाहेर माहीकडे  बघितले  नि त्याच्या काऊचवर जाऊन पडला.......सकाळीच ट्रावेलिंग करून आला होता...त्यात आता हे....पडल्या पडल्या त्याचा डोळा लागला.......

इकडे माहीचे  सुद्धा चित्त थाऱ्यावर नव्हते.....हे सगळं इतके अचानक आणि अनपेक्षित घडले होते की त्यावर कसे रिॲक्ट करावे तिला कळत नव्हते.....वरून तिला घरच्यांची  काळजी वाटत होती.....घरी जर हे सगळे माहिती झाले तर......ते परत एक वेगळं प्रकरण होत........ माही तिच्या डेस्कवर....मिराचे certificates बघत बसली होती......


"

Meera Arjun Patwardhan" .............. वारंवार ती त्या नावावरून मायेने हाथ फिरवत होती.......आणि तिच्या डोळ्यातून दोन अश्रू बाहेर पडले......

*******

क्रमशः

🎭 Series Post

View all