Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 53

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 53

भाग 53

" शी......हा ड्राक्युला समोर असला तरी त्रास देतो.....आता नाही आहे तरी पण त्रास होतोय" ........माही स्वतःशीच बडबड करत पेपरवर काही डिझाईन काढत परत तो पेपर चुर्गाळून फेकत होती......आता पर्यंत तिने आठ नऊ कागद फेकले होते......अर्जुन ऑफिसच्या कामाने पंधरा दिवसांसाठी ऑस्ट्रेलियाला गेला होता.......तो ऑफिस मध्ये  नसल्यामुळे माहीचे कुठल्याच कामात मन लागत नव्हते...

अर्जुन आजकाल माहीच्या खूप खोड्या काढायचा....तिची मस्करी करायला लागला होता......वारंवार लग्नाचे विषय काढून तिला त्रासावून सोडत होता.....आजकाल त्याच्यावर रोमान्स करायचं पण भूत खूप चढल होते....ती एकट्यात भेटली की तिला पकडल्याशिवाय सोडायचा नाही........तिच्यासोबत फ्लर्टिंगचा तर एकही चांस सोडत नव्हता........त्याचे वाढते मस्तीचे प्रमाण वाढत होते...त्याने    माहीला पार वेडावून सोडले होते.......आता तिला त्याची सतत आजूबाजूला असण्याची खूपच सवय झाली होती.....आणि आता तो काही दिवसांपासून ऑफिसमध्ये आला नव्हता तर तिची चिडचिड भारीच वाढली होती.....आणि कुठल्याच कामात तिचे अजिबात मन लागत नव्हते.....आणि कामात पण बऱ्याच चुका होत होत्या....

डिझाईन बनवत बसली होतीच की तेवढयात तिचा फोन वाजला.......फोनवर झळकणार नाव बघून माहीच्या ओठांवर हसू आले.......

"हॅलो "......... माही

" काय स्वीटहार्ट....आज कामात मन नाही लागत दिसतय........???" .....अर्जुन

"असे काही नाही आहे.....आणि ते स्वीटहार्ट म्हणू नका.... मला खूप इरिटेट होते"....... माही

"आता तू आहेच इतकी स्वीट,  त्यात माझी हार्ट बिट्स..... स्वीटहार्टला,  स्वीटहार्ट नाही म्हणणार तर काय म्हणायचं??........" जान"..... हा जान पण मस्त आहे....तुला स्वीटहार्ट नाही आवडत ??.....ठीक आहे मग जान म्हणेल आता"........अर्जुन तिची मस्करी करत होता...

"शी ssss.... ते कसं वाटते.....किती फिल्मी....ते तर अजूनच कसतरी होतेय"....... माही

"This is trendy one sweety" ......... अर्जुन

" हे थांबणार नाही....मला माहिती असून सुद्धा ,का यांच्या सोबत उलझते मलाच कळत नाही" .......माही मनातच विचार करत होती.....

"बोला काय काम होते..?? फोन का केला..??" .....माही

" पेपर फ्री मध्ये भेटत आहेत तर काय इतके फेकायचे??.......बिचारे.....किती त्रास होत असेल त्यांना....किती चुराळून राहिली त्यांना" .....अर्जुन

" हा.....यांना कसे कळले मी पेपर फेकते आहे ते...?? आले की काय परत.....??" ..माही विचार करतच इकडे तिकडे बघत होती....

" इकडे तिकडे काय बघतेय ....आपल्या हृदयात डोकावून बघ.....तिथेच आहो मी" .......अर्जुन

आता तर तिला नक्कीच डाऊट आला की अर्जुन तिच्या आजूबाजूलाच आहे.......तिला तसे करतांना बघून अर्जुनला हसू आले.....

"  So, you are  missing me...ha......??"  अर्जून

"मी .....का ....का..करू मिस कोणाला...??..

"मला......bcoz you loves me" ........ अर्जून

" मी.....मी कोणालाच मीस नाही करत आहे" ......माही

"खोटं.............खोटं बोलतेय आहे तू.......मी बघू शकतो तुला" ........अर्जुन

" तुम्ही आला आहात काय ऑफिस मध्ये......??....मग असे लपून का बसले आहेत??.....समोर या" ........माही

" मी पुढे आलो तर.....??? What I will get????"...... अर्जुन तिची मस्करी करत होता..

"मी....मी का...कशाला काही देईल.....तुमचं ऑफिस आहे.....तुम्ही येऊ शकता" .....माही

" आपलं " ............अर्जुन

" काय...??"..... माही

" आपलं ऑफिस आहे" .........अर्जुन

" काय....??....तुमचं डोकं खराब झालंय वाटते...की ठिकाणावर नाही आहे??" ....... माही

" सगळं ठीक आहे...जागेवरच आहे......उत्तम काम करत आहे........मी तुझा.....तर माझं सगळं तुझंच आहे आणि पुढे पण असणार आहे" .......अर्जुन

" तुम्ही खरंच पागल झाला आहात......मला काम आहे खूप....काम करायचे" .......माही

" माही...जे आहे ते ॲक्सेप्ट कर....तेव्हाच कामात मन लागेल" ....... अर्जून

" म्हणजे...??" ....... माही

" Say , I love you " ....... अर्जून

" तुम्ही कॉलेज मध्ये  असल्यासारखे का वागत आहात...??...तुम्ही विसरलात काय तुम्ही एक बिझनेसमन आहे ते..??" ........माही

" तुझ्या समोर सगळेच विसरायला होत माही...... कूछ कूछ होता है माही....तुम नही समझोगी" ......अर्जुन

" हा sss ........ आता तर शाहरुख पण घुसला यांच्यामध्ये......" ......... माहीला तर काहीच कळत नव्हते आता काय बोलावं.........

अर्जुनला तिला त्रास देण्यात भयंकर मजा वाटत होती....

" कॉलेज मध्ये अस्तांना हे सगळं राहुन गेले होते......म्हणून आता करतोय.......एकच आयुष्य मिळते .......सगळं करायला हवे ना.......म्हणून" ........अर्जुन

" सर....तुम्ही......"

"पागल झाला आहात" ........अर्जुन, ती बोलायच्या आधीच बोलला

माहीने डोक्यावर हात मारून घेतला....

" सर....तुमचं हे never ending aahe,  मला आता मीटिंगला जायचं आहे"  ........

" Okay baby.....see you soon......bye" ...... अर्जून

" सोनिया madam सारखेच करायला लागले हे.......त्या अशा बोलायच्या तर चिडत होते हे.....आता स्वतःच असे बालिश बोलत आहेत....".माही विचार करत होती..

माहीच मन तर त्यांच्यासोबतच बोलायचं होते.....पण मीटिंग असल्यामुळे तिचा नाईलाज झाला होता....

" Bye........

" सर.....सर.........

" हा बोल..." ......अर्जुन

"तुम्ही ठेवला नाही फोन......??" ....माही

"तू ठेव"  .......अर्जुन

" सर कधी परत येणार आहात.......??"..... माही

" First say I love you, then only will tell you." ...... अर्जून

" खडूस.......bye" ..... माहीने बोलून फोन ठेऊन दिला...

"खडूस......हा हा हा....सो स्वीट ऑफ यू माहि" ......अर्जुन मनाशीच बोलून फोन ठेवला,,, अर्जुनकडे संध्याकाळ होत आली होती...तो त्याचे काम आटोपून ऑफिस मधून हॉटेल मध्ये आला होता , फ्रेश होऊन त्याने लॅपटॉप ऑन केला...आणि  त्याला माहीला बघायची इच्छा झाली आणि त्याने cctv च्या व्यतिरिक्त काही कॅमेरा फक्त माही बसते तिथे लाऊन घेतले होते...आणि स्वतःकडे त्याचा access घेतला होता....आणि तो माही सोबत बोलत होता तेव्हा त्यात बघूनच त्याला कळत होते ती काय करतेय ते......आणि त्याने तिला खूपच पिडले होते..

"यांना मनातले तर कळतच होते...आता दिसायला पण लागले की काय.....का इतके बदमाश झाले हे??.....आधी बोलत नव्हते.....आता बोलायचे थांबत नाही.... पार लाजाऊन सोडतात" ..... माही मनातच बोलत होती...तिने तिचे  आवरले नी ती मीटिंग साठी निघून गेली...

******

शांतीसदनमध्ये आता श्रिया आणि देवेशचा लग्नाचे वारे वाहत होते.....आता पर्यंत फक्त लग्न पक्क झाले होते, पण बाकी सगळे ठरायचे बाकी होते.....आकाश अंजलीचे पण दिवस छान आनंदात जात होते..... मामी (आकाशची आई) काही ना काही कारणावरून अंजलीच्या मागे पडली असायची....कधीतरी तिला टोचेल असे बोलत होती .....पण आजी , मामा,  बाकी घरातले लोक बऱ्यापैकी सांभाळून घ्यायचे...आणि आकाशच्या कुशीत नी प्रेमात ती सगळं विसरूनही जायची......घरातल्या बाकी सगळ्यांचे प्रेम आणि काळजी इतकी जास्ती होती की मामिंच्या बोलण्याकडे आपोआपच तिचे दुर्लक्ष व्हायचे ......आणि ती दुर्लक्ष करायची सुद्धा..

इकडे माही, मिराचे पण अगदी छान सुरळीत  सुरू होते....आत्याबाई आणि आईची पण खूप मदत आणि सोबत  होतीच...आत्याबाई सोबत तिच्या छोट्या छोट्या कुरबुरी सुरू असायचा,  पण तेवढच  तिच्या नी मिरा मुळे घरात  चालतं  बोलतं वातावरण राहत होते.....माही आपली जबाबदारी अगदी पुरेपूर पार पाडत होती...

*******

"किती दिवस झाले सर.....कधी परतणार.....या ना हो लवकर......फोन पण नाही केलात तुम्ही तीन दिवसांपासून........मला माहिती तुम्ही तिकडे काम करायला गेले आहात.....पण झालं ना आता....खूप आठवण येते आहे तुमची..... तुमची आजूबाजूला असण्याची खूप  सवय झाली " ..........माही अर्जुनच्या केबिनमध्ये काही फाईल घ्यायला गेली होती....आणि एका साईड  वॉलवर अर्जुनचा एक मोठा फोटो लावलेला होता...त्याकडे बघत बोलत होती...

अर्जुन नसतांना आकाश आणि नमन सोडून बाकी कोणालाच त्याचा कॅबिन मध्ये  जायची परमिशन नसायची......पण आता त्याने माही साठी all doors ओपन ठेवले होते....आता ते दोघं सोडून माही तिसरी व्यक्ती  होती जी त्याच्या केबिन मध्ये पाहिजे तेव्हा जाऊ शकत होती......आणि आता ऑफिसमध्ये सगळ्यांना येवढे तर माहितीच होते की माही आकाशची आणि  इंडिरेक्टली अर्जुनची नातेवाईक आहे.....त्यामुळे कोणालाच तिच्या येण्याजाण्यावर काही आक्षेप नसायचा....आणि ऑफिस मध्ये सुद्धा तिने स्वतःच्या बोलक्या स्वभावाने आणि  कामाने एक वेगळी अशी प्रतिष्ठित ओळख निर्माण केली होती...

"सर फोटो मध्ये सुद्धा तुम्हाला हसता येत नाही ना.....किती ते रागाने बघत आहात" .......माही फोटो कडे बघत बोलत होती

"काय फायदा ..प्रेमाने बघून....??"

" सगळं काय फायद्यासाठीच करायचं असते काय...??...कधी कधी दुसऱ्यांना आवडते म्हणूनही काही गोष्टी  करायचं असते" ..... माही

" दुसऱ्यांसाठी....??"

" दुसऱ्यांसाठी नाही तर कमीत कमी माझ्यासाठी तरी...??....हसले की किती क्यूट दिसता तुम्ही...... असं वाटते तुमचे गालच ओढावे." ......माही

"अजून.....अजून काय छान दिसते....??" ......

" अजून ना....अजून तुमचे हे सिल्की शाईनी केस.....कसले भारी चमकतात........आणि ना जेव्हा तुम्ही काम करत असता ना...ते असे तुमच्या कपाळावर येऊन डान्स करत असतात.....खूपच भारी वाटते ते बघायला" ...... माही

" आणखी......??.." .

" उम्मम....आणखी.......आणखी ना तुमचे हे डोळे......फारच डेंजर आहेत बाबा.......तुम्ही बघितले ना माझ्याकडे की असं वाटते की हे माझं ह्रदय बाहेरच उडी मारेल.......इतकं जोऱ्याने धडधडायला लागतं......आणि हे तुम्हाला पण माहिती आहे....म्हणूनच तुम्ही ना मुद्दाम माझ्या जवळ येत असता........आणि मग माझं सगळच काम करायचे बंद होते........आणि आता तर तुम्हाला मी काय करत असते ते पण कळते..... जाम फसवे डोळे आहेत तुमचे " ......

" आणखी...??"

" आणखी बस झालं आता......आता लवकर या हो" ......माही

"तुला लीप्स नाही आवडत......??"

" नाही......अजिबात नाही........तुमचे ओठ मिटले असले की च चांगले वाटतात......पण आजकाल तसे होतच नाही......तुमचे ओठ उघडले की बंद व्हायचं नावच घेत नाही.......किती बोलायला लागलात तुम्ही...... व्हॉट व्हॉट बोलायचे आधी फक्त........आता नॉन स्टॉप बोलत असता..... बरं आता काय फोटो मधूनच बोलणार आहेत काय.....या ना लवकर......खूप आठवण येते आहे.....मला ना तुमच्या कुशीत यायचे आहे......बघा ना किती दिवस झालेत कुणी माझे लाडच केले नाहीत".......... माही

"मग थांबवलं कोणी आहे , ये मिठीत...... I am also missing " ........

" पागल झालात काय तुम्ही.....फोटो मध्ये कशी येणार आहे" .....माही

"नको येऊ फोटो मध्ये......अशीच ये" ........

" सर मी काय म्हणते , तुम्हीच तुमच्या डोक्याचं चेकप का करून घेत नाही?" ........माही

" काय करू हीच?" .... ...अर्जुनने डोक्यावर हात मारला......

माही अर्जुनच्या फोटो सोबत बोलत होती तेव्हाच अर्जुन त्याच्या केबिनमध्ये आला होता.....तो सकाळीच ऑर्ट्रीलिया वरून परत आला होता...थोडा फ्रेश होऊन तो लगेच ऑफिसमध्ये आला होता.....केबिन मध्ये आला तर माही मॅडम त्याला त्याच्या फोटो सोबत बोलतांना दिसल्या.....तो तिच्या सोबत एवढा बोलला तरी  मॅडमला ते कळलच नव्हते.....मॅडम आपल्याच विश्वात....????????

" अर्जुन तुला पण या  जगावेगळ्या आयटमच्याच प्रेमात पडायचं होत.....पण जगावेगळी आहे म्हणूनच तर आवडलं ना हे कार्टून....पण जशी पण आहे माझीच आहे..... I love her".... अर्जुन मनातच बोलत पुढे पुढे जात होता.....आणि तिच्या  मागे जाऊन उभा राहिला...

माही बोलता बोलता अचानकच शांत झाली.....तिला काहीतरी जाणवत होते.....

"मला असं का वाटत आहे ....सर तुम्ही इथे आहात.......माही सावर स्वतहाला , वेड लागायची च वेळ येईल नाही तर" ........माही

"मी इथेच आहो".........अर्जुनने तिच्या हाताला धरून तिला त्याच्या केबिन मधल्या प्रायव्हेट रूममध्ये ओढले........अचानक झाल्यामुळे माहीला काहीच कळले नाही आणि ती त्याच्या कुशीत जाऊन पडली होती.......तिने त्याच्या शर्टची कॉलर दोन्ही हातानी पकडून घेतली होती.......

त्याचा तो स्पर्श तिचा ओळखीचा हवाहवासा होता....तिच्या हार्ट बिट्स वाढल्या होत्या........थोड्या वेळ साठी तिला काहीच कळत नव्हते......ती तशीच त्याच्या मिठीमध्ये होती...

"तुम्ही खरंच इथे आहात....की मी स्वप्नात आहे?" ........माही

" तुला अजूनही डाऊट आहे?" ........अर्जुनच्या कपाळावर आठ्या पडल्या

" नाही म्हणजे........

"Okay wait, I will prove that I am here" .......... अर्जुन,  त्याच्या डोक्यात खट्याळ प्लॅन आला.....त्याने तिचा हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर केला......तिच्या कपाळावरील एक केसांची बट कानाजवळून पुढे आली होती......ती मात्र त्याच्या डोळ्यात हरवली होती.....पूर्ण २० दिवसानंतर तो तिच्या पुढे होता......अर्जुनने हळूवारपणे  फुंकर घालत तिची केसांची बट मागे उडवली ........त्याच्या असे फुंकर घालण्यामुळे तिच्या शरीरावर शहारे आले........आता तो हळुहळू तिच्या ओठा जवळ येत होता.......

"स.....सर.....कसेतरी होत आहे.......बहुतेक चक्कर आल्यासारखे" ...........माही खूप बिचारा चेहरा करत त्याच्या डोळ्यांमध्ये बघत बोलत होती.....

तिला असे बघून त्याला हसायला आले....... " क्युटीपाय माझी" .......... त्याने तिला परत ओढून आपल्या कुशी मध्ये घट्ट पकडून घेत तिच्या डोक्यावर किस केले.......आणि तिच्या डोक्यावरून मायेने हाथ फिरवला....ती पण खूप दिवसांनी त्याची मिठी फील करत होती.......तेवढयात अर्जुनचा फोन वाजला.....फोंनच्या आवाजाने माही भानावर आली.....आणि ती त्याच्या दूर होत होती......अर्जुन एका हाताने तिला पक्क आपल्या मिठीत पकडून ठेवले नी दुसऱ्या हाताने फोन रिसिव्ह केला.....

"Will call u later" ......म्हणत अर्जुनने लगेच फोन ठेऊन दिला...

" काय घाई आहे दूर जाण्याची.....??.....आताच तर म्हणत होती ना आठवण येते आहे.....आणि आता दूर जायची घाई" .......अर्जुन एका हाताने फोन खिशात ठेवत बोलत होता...

" असे काही नाही......मी कधी म्हणाली असे?" .......माही त्याच्या मिठीतुन दूर होत बोलली..

"हे , आताच.....माझ्या फोटो पुढे गप्पा करत होती".......अर्जुन

" तुम्हाला भ्रम होतोय".......माही

" Ohh really???.... मग हे काय आहे......??" .. अर्जुन...अर्जुन ने आपल्या मोबाईल मध्ये एक व्हिडिओ ऑन केला......नी तिच्या पुढे धरला.....

ती ते बघून अवाक झाली.....ती अर्जुनच्या फोटो सोबत बोलत होती तेव्हा त्याने ते त्याचा फोन मध्ये रेकॉर्ड केले होते....

"त.....तुम्ही फार आगाऊ झाला आहात" ........म्हणतच माही बाहेर जाण्यासाठी वळली....

" माही , wait..........I have something for you" ...... म्हणत त्याने खिशातून एक बॉक्स तिच्या पुढे धरला...

" मला नकोय काही" ...... माही

" तुझं हक्क तुला देतोय.......आणि ते तुला घ्यावेच लागणार"........अर्जुन, त्याने तिच्या हातात तो बॉक्स ठेवला...

माही ने तो उघडला.....आणि  ती शॉक झाली...

*****

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️