Jan 27, 2022
मनोरंजन

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 52

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 52

भाग 52

आकाश अंजलीच्या लग्नाच्या सगळ्या विधी व्यवस्थित पार पडल्या होत्या.......अर्जुन सोनियाचे लग्न कॅन्सल झाल्यामुळे  आकाश अंजली चा मूड सुद्धा थोडा डाऊन झाला होता, त्यांनी  हनीमूनसाठी जायचं कॅन्सल करत होते पण सोनिया आणि घरी बाकी सगळ्यांनी  समजवल्यामुळे आकाश अंजली स्विझरलांडला फिरायला गेले होते......सोनिया सुद्धा तिचे पुढील  शिक्षण पूर्ण करायला लंडनला निघून गेली......

सगळं ठीक सुरू असले तरी घरात अर्जुनवर  थोड्या, कमी, प्रमाणात सगळेच नाराज होते.......त्यामुळे त्याच्या बाबतीत पाहिजे तसे वातावरण निवळले नव्हते.......त्यामुळे माही बद्दल घरी बोलायची घाई त्याने केली नव्हती........पण अर्जुनला लवकरात लवकर माही सोबत लग्न करायचे होते....कारण माहीचा स्वभाव बघता त्याला माहिती होते की परिवाराचा प्रभाव तिच्यावर खुप आहे , घरतल्या कुठल्याही व्यक्तीसाठी ती काहीही करू शकते.......आणि तिचे  त्याचावर असलेले प्रेम.....त्यामुळे जर कोणी अर्जुनाच्या प्रेमाखातर काही करायला लावले तर ती ते नक्कीच करेल......त्याला माहिती होते अशा फालतू बाबतीत माहीचे डोके काम करत नाही.....भावनिक पातळीवर जाऊन ती काहीपण निर्णय घेते..........आणि त्यामुळेच परत त्याला त्यांच्या दोघांच्या आयुष्यामध्ये तिसरा कोणी नको होता........पण घरात एक आशुतोष सोडला तर बऱ्यापैकी सगळ्यांचीच नाराजी होती......म्हणून तो योग्य वेळेची वाट बघत होता......

अंजली नसल्यामुळे घरात माहीची काम थोडी वाढली होती..........मिरा कधी कधी त्रास द्यायची.......पण आई बऱ्यापैकी सांभाळून घ्यायची...... ऑफिसमध्ये पण अर्जुनने तिचे बरेच काम वाढवले होते........माहीने सुद्धा  जे काम येईल  त्या कामासाठी स्वतः ला  तयार ठेवले होते........प्रत्येक गोष्ट आवडीने आणि लक्षपूर्वक  ती शिकून घेत होती...... आजी आणि नलिनी सोबत सुरू असलेले ड्रेस डिझायनिंगचे पण काम एकदम मस्त सुरू होते.....मिरा त्रास देते म्हणून रविवारी माही मिराला आपल्या  सोबत शांतीसदन ला घेऊन यायची.......मिराला सांभाळायला अंजली तर होतीच पण मिराचा फेवरेट अर्जूनही होता.......त्याला पण मिरा सोबत वेळ घालवायला आवडत होते......तिच्या सोबत तो अगदी तिच्या एवढा बनून जायचा.......एकंदरीत माहीचे सगळं निट सुरू होते....थोडी धावपळ होत होती तिला..
पण ती ते सर्व आनंदाने म्यानेज करत होती.........फक्त तिला काळजी अर्जुनची वाटायची.....घरात कोणी त्याचा सोबत नीट बोलत नाहीये बघून तिला थोड वाईट वाटायचे......आणि कुठेतरी या सगळ्यांसाठी ती स्वतः ला जबाबदार  समजत होती.......

श्रियाचा बॉयफ्रेंड देवेश आता लग्नसाठी तिच्या मागे लागला होता.......घराचे लग्नासाठी  फोर्स करत आहेत.....तू घरी बोल आपल्याबद्दल.....म्हणून तो श्रियाला वारंवार सांगत होता.....श्रियाला पण त्याच म्हणणे पटत होते.....अर्जुन, आकाशच लग्न झाल्यावर ती बोलणारच होती पण अर्जुनचे हे असे मध्येच झाले तर कसा विषय काढायचा तिला कळत नव्हते......पण अचानक एक दिवस घरात श्रियाच्या लग्नाचा विषय निघाला ......ओळखितली काही लोक तिच्या लग्नाबद्दल विचारत होती....आणि मग तेव्हा तिने तिच्या  आणि देवेश बद्दल घरी सांगितले.......घरात आधी थोडे आढेवेढे घेतले, पण मग घरचे तयार झाले होते.....देवेशच घर एक प्रतिष्ठित लोकांमध्ये   येत होते, श्रिया पेक्षा श्रीमंत नव्हते, पण ठीक होते म्हणून घरचे देवेशच्या घरच्यांना भेटायला तयार झाले होते......पण अर्जुनच्या लग्नाआधी श्रियाचे लग्न कसे करायचे, अजून मोठ्या भावाचे व्हायचे ....म्हणून घरच्यांचं थोड मागे पुढे सुरू होते.........पण मग अर्जुनच्या लग्नाचं काहीच भरवसा नाही, किती दिवस वाट बघायची म्हणून शेवटी घरचे श्रियाचे लग्न करायला तयार झाले होते.......आणि देवेश आणि परिवाराला भेटून लग्न पक्के झाले होते.....

...............

" भाई.....".....आकाश अर्जुनचा केबिन मध्ये आला...

" हा आकाश बोल " .......अर्जुन लॅपटॉप मध्ये काही काम करत बोलला

"You loves Mahi.....right????" ............. आकाश, आकाशने सरळ  अर्जुनला प्रश्न केला...

आकाश आज त्याच्या लग्नानंतर   पहिल्यांदा ऑफिसमध्ये आला होता....आणि त्याला ऑफिसमध्ये झालेले बदल  माहिती झाले होते.........आणि म्हणूनच बोलायला म्हणून अर्जुनच्या कॅबिनमध्ये आला होता......

आकाशच्या या बोलण्यावरून अर्जुनला कळले होते आकाश काय बोलायला आलेला आहे.......त्याने हातातले काम बाजूला ठेवले आणि  आकाशकडे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलला...

" Yess.......I love Mahi" ......... अर्जुन

"म्हणून तू लग्न नाही केले सोनिया सोबत...?"......आकाश

" ह्मम " .......... अर्जून

" ही कंपनी तुझं स्वप्न होत.......आणि तीच तू माहीच्या नावावर केलीय...............??" ....आकाश

" हो......कारण आता माही माझी लाईफ आहे........ती खूप इन्सेक्युर्ड फील करत होती......की तिला कोण ऑफिस मधून काढून टाकेल.......मला तिची भीती घालवायची होती.........सो आता ती ओनर आहे" ...........अर्जुन

लग्नाच्या आधी जेव्हा माहीने त्याला विचारले होते की तो तिला  नोकरी वरून काढणार तर नाही......??.....त्या वेळेस त्याने काही पेपर बनवले होते.....आणि माहीची साइन घेतली होती......तेव्हाच अर्जुनने त्याच्या  या  कंपनीचे शेअर्स जे त्याचा  नावावर होते ते सगळे  तिच्या नावावर ट्रान्स्फर केले होते......ती या कंपनीमध्ये काम करत होती ...आता हे ऑफिस तिचे झाले होते.....बाकी बरेच त्याच्या कंपनी चे   ब्रांचेस होते  जे अजूनही अर्जुनचेच होती.........फक्त त्याने ही कंपनी तिच्या नावे केली होती.....तसे तर तिला कधीच कोणी इथून काढले नसते....पण तरीही भविष्यात कधीच कोणाची हिम्मत नको तिला काढायची  ......आणि  आपल्या सगळे सोडतील किंवा सोडून जातील ही तिच्या मनातली भावना त्याला दूर करायची होती....आणि त्यासाठीच त्याने हे पहिले पाऊल उचलले होते....

" तिला माहिती हे सगळं....??.कारण जितके मी तिला ओळखतो , तिला हे सगळं आवडणार नाही आहे" ...........आकाश

" नाही..........तिला सांगून केले असते तर तिला हे कधीच मान्य नसते झाले " .........अर्जुन

" भाई....तू तिच्यावर खूप प्रेम करतो हे तर मला बऱ्याच दिवसापासून वाटत होते....पण मग सोनिया सोबत तुझं लग्न होणार होते म्हणून मलाच गैरसमज झाला असावा असे वाटले...........तू तिला का सांगत नाहीस.....तू तिच्यावर प्रेम करतो ते....??...तू तिला लग्नासाठी का विचारत नाही...?? तसेही घरी ती सगळ्यांना आवडतेच.....आणि अंजलीला आपल्या घरची सून बनवून घेतलीये....तर तिच्या बाबतीत पण घरच्यांना  काही प्रोब्लेम नसेल आहे" ............आकाश

" तिला माहिती , that I love her" ......... अर्जुन

" काय....??" .. आकाश शॉक होत त्याच्याकडे बघत होता...

" हो तिला माहिती आहे ......आणि ती माझ्यासोबत लग्न करायला तयार नाही.......आणि लवकर तयार होईल,  हे  पण कठीण वाटते आहे" ....,....अर्जुन

" पण का...??तिला काय प्रोब्लेम आहे.....??....तू तिच्यावर प्रेम करतोय.....तिला कळतंय काय.........भाई ती अल्लड आहे......तू तिला नीट समजावून सांग......... मानेल ती.....पण ती का नाही म्हणते आहे.....??.....म्हणजे तू थोडा रागीट आहेस....तिच्यावर सतत राग काढत असतो......म्हणून नाही म्हणते आहे काय....??" ......आकाश

" असं काही नाही आहे........ती तर घाबरत पण नाही मला" ...........अर्जुन

" हो तेही बरोबरच आहे........आतापर्यंतच्या पूर्ण लाईफ मध्ये मी बघितले आहे फक्त तिच उत्तर देते तुला......आणि  तुला चूप बसवते" ..............अर्जुन त्याला कसनुस चेहऱ्याने बघत होता... आकाशला त्याला असे बघून आता हसू येत होते.

" ह्मम "............अर्जुन

" तिला सगळ माहिती आहे तर मग प्रॉब्लेम काय आहे......??" ....आकाश

"मीरा माहीची मुलगी आहे"...........अर्जुन

" क......काय.........??.....हे कसे शक्य आहे..??....ती तर त्यांच्या कझिनची मुलगी आहे ना.....??" ......आकाश

" मीरा माहीची मुलगी आहे, she is single parent" ......... अर्जुनचा बोलण्याचा टोन आता बदलला होता.......त्याच्या आवाजात आकाशला काहीसा राग, तिच्याबद्दल ची काळजी जाणवत होती.......आणि तो प्रश्नार्थक नजरेने अर्जुंनकडे बघत होता.....

त्याला पडललेले प्रश्न अर्जुनला कळत होते....आणि त्याने आकाशाला  माही सोबत घडलेले थोडक्यात सांगितले........आणि तो काबर सोनिया सोबत लग्न करत होता ते पण सांगितले....

ते सगळं ऐकता ऐकता......आकाशचे मन सुद्धा हेलावले होते.......

" भाई....you are really a great person........ तू दाखवतो तसा नाही आहेस......तू मला नेहमीच आवडत होता.....पण आता तुझ्याबद्दलचा आदर पण खूप वाढला आहे..........तुला उगाचच सगळे ग्रेट म्हणत नाही.......तू रिअल लाईफ हिरो आहेस" ..........आकाश अर्जुनाच्या गळ्यात जाऊन पडला....आणि त्याला हग केले

" भाई ..... माही ठीक आहे..??" ....आकाश त्याच्या पासून दूर होत बोलला

" ह्मम........इथेच आहे बघ" .....अर्जुनने डोळ्यांनीच त्याला खुणावले...

" अरे बापरे.......राम भरत मिलाप सुरू आहे वाटत..... सॉरी सॉरी डिस्टर्ब केले" ..,.... माही अर्जुनाच्या कॅबिनमध्ये येत बोलली

"नो नो.... it's okay" ....... आकाश

" काय हो आकाश सर.... हनिमूनला गेले नि इतकं मिस केले तुम्ही अर्जुन सरांना??.......की ताईने त्रास दिला?"..........माही आकाशची मस्करी करत होती

" हो ना,  भाई आहेच तसा, हवाहवासा................हो ना माही?".....आकाश माहीवर  नजर रोखत  बोलला

अर्जुन खूप प्रेमाने तिला एकटक बघत  उभा होता.......ती पूर्ण गोंधळलेली  दिसत होती.......त्याही अवस्थेत  ती त्याला भारीच क्यूट वाटत होती....तिला बघून तो गलातच हसत होता....

" अ.........,....हो....... म्हणजे नाही" ..........माही गोंधळलेल्या नजरेने आकाशकडे तर कधी  अर्जुनकडे बघत होती......अर्जुन तिच्याचकडे बघतोय बघून तिला तर आता काहीच सुचत नव्हते.......

" तुम्ही तुमचं चालू द्या....मी नंतर येते" ......म्हणतच माही परत जाण्यासाठी वळली......

" माही काय काम होते........??" ..अर्जुन

" ते मला हा नवीन टॉपिक कळत नव्हता म्हणून थोड विचारायचं होत....पण मी नंतर येते" .........माही

" तू तुझं काम कर....मी निघतच होतो" .........बाय म्हणत आकाश तिथून बाहेर पडला .....

"ह्मम , बोल माही ,काय हवे होते?" .........अर्जुन

माहीने तिच्या हातातली फाईल पुढे केली आणि  त्याला कामाशी निगडित काही मुद्दे विचारत समजून घेत होती.......तो पण तिला खूप चांगल्या प्रकारे समजाऊन सांगत होता.........

" Thank you sir....... आता बाकीचं मी करून बघते" ......म्हणत तिने फाईल उचलली नी परत जाणार तेवढयात अर्जुनने तिला आवाज दिला..

" हा सर" .......माही

" इथेच बसून कर ते, काही प्रोब्लेम आला तर लगेच क्लिअर करता येईल" .........अर्जुन......

" ठीक आहे" ..... माही त्याच्या पुढल्या चेअरवर बसून तिचे  काम करत होती.....अर्जुन पण त्याच्या लॅपटॉपमध्ये त्याचे काम करत होता.....माही पुढे नजरेसमोर असल्यावर त्याच कुठे कामात मन लागणार होते.......तो आता फक्त तिला बघत बसला होता......माही खूप आत्मतियेने तिचे काम करत होती.......ती तिच्या कामात अगदी गढून गेली होती.........अर्जुन तिच्याकडे बघतोय हे सुद्धा तिला कळले नव्हते......

" माही" .............अर्जुनने आवाज दिला

" हो सर " .............माही

" I love you "........... अर्जुन

" आता अचानक यांना काय झालं?".....माहीच्या डोक्यावर आठ्या पडल्या होत्या..

" सर काही हवे आहे काय....??" ......माही काहीतरी विषय बदलायला म्हणून बोलली..

" तू.........तू.....हवी आहेस" ........... अर्जून शांतपणे बोलला

" सर हे अचानक तुम्हाला मध्येच काय होत...??" ....माही

" माही लग्न कधी करायचं...??" ....आता अर्जुनच्या आवाजात थोडी जरब होती..

" सर मी आधीच तुम्हाला सांगितले आहे.......लग्न आणि मी,  आमचं काहीच कॉम्बिनेशन नाही आहे" ........माही

" माही.....का येवढा हट्टपणा करते?" .........अर्जुन

"हट्टपणा नाही सर.,...जे तुमच्यासाठी योग्य आहे ते बोलतेय"........माही

" You are impossible " ............ अर्जुन

" ह्मम........संगतीचा असर तर होणारच ना" .........माही

" व्हॉट....??.....तू मला बोलतेय...??? How dare are you..????" ............... अर्जून

त्याला रागात येताना बघून माहीला हसू येत होते........

"" हसायला येतय ना?? ....हस..... हट्टी म्हणते आहेस ना मला....आता तुला दाखवतो  माझा हट्टीपना.........बघ  आता तुझ्यासोबत कसे लग्न करतो ते.............by hook or crook" .... अर्जुन त्याच्या जागेवरून उठून तिच्या पुढे येत टेबलवर आपले दोन्ही हात ठेवत तिच्या डोळ्यात बघत बोलत होता.......माही त्याच्याकडे बघत होती...त्याच्या डोळ्यात तिला खूप आत्मविश्र्वास दिसत होता.....जसे काही जे तो बोलतोय ते तो करूनच दाखवणार.....

अर्जूनने एका हाताने तिच्या मानेजवळ पकडत तिचा चेहरा वर केला.......आणि  तिच्या डोळ्यात आरपार बघत होता......."Anything is fare in Love and war.......right....... ??"

त्याचे  असे जवळ आल्याने तिच्या हृदयाची धडधड वाढली होती......" उगाचच यांच्यामधला ड्रॅक्युला जागृत केला " ..,....माही त्याच्याकडे बघत मनातच विचार करत होती.......आणि तो जेव्हा त्याच्या या खडूस रूपामध्ये येतो तेव्हा तो भारी डेंजरस असतो हे तिला चांगलंच ठाऊक होते.........तिला काय बोलावं आता काहीच कळत नव्हते.....तेवढयात दारावर नॉक झाले नि त्या आवाजाने अर्जुन माही पासून दूर झाला आणि आपल्या जागेवर जाऊन बसला.....पण नजर मात्र माही वरच होती....

"येस , कम इन" ............अर्जुन

" Yes Mr Raman" .........?? अर्जून

अर्जुनची नजर वळलेली बघून माहीने रोखून ठेवलेला श्वास बाहेर सोडला......." वाचली बाबा " ......माही  मनातच विचार करत होती

" सर, माही मॅडम जवळ काम होते" .........रमण

" Okay......go ahead" ...... अर्जुन

" माही मॅडम हा न्यू प्रोजेक्ट,  जो तुम्ही सांभाळत आहात......त्याचे काही पेपर्स आहेत, तुमची साइन हवी आहे........त्या शिवाय काम पुढे जाणार नाही" ....... रमण

" ठीक आहे,  द्या ती फाईल" ........माही

रमणने फाईल तिच्या पुढे ठेवली .... माही एक एक पान वाचत साइन करत होती.....तिला फारच वेळ लागत होता....

"Mr Raman , you may go now..... collect file after half hour" ..... अर्जुन

" Sure sir" ........ रमण बाहेर निघून आला

" त्याला का पाठवलं?.....देतच होते ना मी फाईल" .......माही

"रोमान्स मध्ये अडथळा येत होता" ........अर्जुन परत तिच्या जवळ येत तिच्या पुढे टेबलवर बसत बोलला...

"हा.... र.... रो..".....माही डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती...

"हो रोमान्स.......आज माझा अजिबात काम करायचा मूड नाहीये.......फक्त तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे." .......बोलताच त्याने हळूच तिच्या कानातल्या एका झुमक्यावर  त्याच्या बोटांनी टिचकी मारली........तिच्या त्या झुमक्याचा स्पर्श तिच्या मानेला झाला.........त्यात तो इतक्या जवळ.....तिला तर काहीच सुचत नव्हते.....तिचे डोकं काम करत नव्हते..

" स.....सर.......मला ते पेपर साइन.,......रमण सर येतील ........ते पेपर वाचायचे" .........माही अडखळत बोलत होती...

" साइन इट....मला माहिती आहेत ते पेपर्स.....do fast..... everything depend on it" ........ तो तिच्या डोळ्यात बघत एक हाताने पेपर टर्न करत होता..,......

आता मात्र माही पूर्णतः त्याच्या डोळ्यात कैद झाली होती.......माही त्याच्याकडे बघतच तो सांगेल तिथे साईन करत होती........फाईल साईन करून झाली तशी त्याने ती बाजूला ठेवली.......

" माही.....सोड हा हट्टपणा..........आणि तसे पण तुला आकाश अंजलीच्या लग्नाची भीती होती.....ते पण झाले आहे आता.......आता कशाची भीती आहे?"..........अर्जुन तिचा हाथ आपल्या हातात घेत बोलत होता....

माही चुपचाप मान खाली घालून बसली होती......

" ठीक आहे, काही घाई नाही.......हवा तितका वेळ घे....my arms always open for you........ कधी पण येऊ शकतेस तू माझ्या जवळ,मी नेहमीच तुझ्याजवळ फक्त तुझ्यासाठीच असणार आहो ,.....just remember.......my life is incomplete without you" .........म्हणतच त्याने तिच्या पुढ्यात वाकत तिच्या गालावर किस केले....आणि  आपल्या जागेवर जाऊन बसला नी फोन केला...." mr Raman collect the file"......

"My life is incomplete without you "....... हे त्याचे बोललेले वाक्य तिच्या डोक्यात फिरत होते.......आणि  तिच्या डोळ्यात आसवे जमायला लागली होती......पण तिला तिचे अश्रू त्याला दिसू द्यायचे नव्हते आणि डोळ्यांची उघडझाप करत तिने अश्रू डोळ्यातच निवळले होते......तिने कितीही प्रयत्न केला तरी त्याला ते दिसलेच होते..........

"May I" ..... रमन डोअरवर नॉक करत होता

" Yes Mr Raman "......... अर्जुनने त्याला फाईल दिली.....

" Sir , need your signature also"....म्हणत त्याने फाईलची काही पेजेस उघडून अर्जुन पुढे धरली..,अर्जुनने पण पटापट त्यावर साइन केले....

माही अर्जुनकडे बघत होती...........

"Thank you sir"....... रमण

" Proceed it fast" ..... अर्जुन

"Yes sir"..... रमण फाईल घेऊन निघून गेला..

" वन कॉफी, वन जिंजर टी अँड जलेबिज"........अर्जुनने फोनवर ऑर्डर दिली.......त्याच्या आवाजाने चमकून तिने त्याच्याकडे बघितले.....

" तुझ्या या डोळ्यात पाणी आणले मी , तर या ओठांवर हसू आणायचं काम पण माझेच ना?" ......,..अर्जुन तिच्याकडे बघत होता

त्याच्या बोलण्याने तिच्या ओठांवर स्मायल आले.....

" I really sometimes feeling jealous , that jalebis are more close to you, than me  "..... अर्जून

" Sir ..... " ... माही

" ओके........"..... अर्जून

थोड्यावेळ दोघेही शांत होते....

"Mahi.....now I am all yours......you can do anything with me" ............... अर्जून तिच्या मिश्कीलपणे बघत बोलत होता.....

"परत......?? परत सुरू झाला तुम्ही.....??....तुम्ही बिघडत चालले आहात" ............माही आपला बिचारा चेहरा करत त्याच्याकडे बघत होती

अर्जुनला तिला बघून हसायला येत होते....

" तू आता बोलली ना .... काय ते......हा...संगतीचा असर....."....अर्जुन, अर्जुनच्या चेहऱ्यावर खट्याळ भाव होते...

" मी बिघडली आहे.....?".....माही मोठे डोळे करत अर्जुन कडे बघत होती....

"वेड तर करतेस ना......पण हा.....आता मी असाच असणार आहो........याहूनही जास्ती बिघडणार आहो....तू म्हणते तसा आगाऊपणा सुद्धा करणार आहो.........जास्ती वेळ लावू नको....लग्नासाठी लवकर हो बोल .......नाहीतर जास्ती बिघडलो तर मग मला म्हणायचं नाही" ......,..

माहीला अचानकच त्याचे डोळे बदलल्यासारखे वाटत होते.......त्याच्या डोळ्यांमध्ये एक वेगळीच चमक होती.....आनंद दिसत होता......माही त्यालाच बघत बसली होती...

******

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️