Aug 16, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 51

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 51

भाग 51

लग्नाच्या सगळ्या विधी आटोपल्या होत्या.....जेवण, विहिनीची पंगत सगळं झालं होते......नाही म्हटले तरी सकाळ पासून बरीच धावपळ सुरू होती....एका मागून एक असे विधी सुरू होते, त्यात अर्जुन सोनियाने दिलेला धसका.......सगळेच बऱ्यापैकी दमले होते......संध्याकाळी निघायचे होते, म्हणून सगळेच थोडाफार आराम करत होते......मिरा मात्र अर्जुन सोबत मस्ती करत होती......

माही वरातीची तयारी करत होती.......

" अर्जुन आणि सोनियाचे पण झाले असते लग्न, सगळे किती खुश असते?"........अंजलीची आई बॅग पॅक करत आत्याबाई सोबत बोलत होती.

" हो ना....ही आजकालची मुलं.....घटक्यात हो म्हणतात, घटक्यात नाही......काय तर बोलावं.......पण ते अर्जुन....त्यांचं तर काहीच कळत नाही.......कोणाला बोलायची हिंमत पण नाही त्यांच्या समोर" .........आत्याबाई

" हो.......खूप कडक वाटतात नाही ते?"..........आई

माही काम करताकरता यांच्या गप्पा ऐकत होती...

"काय तर कारण असावे एवढे वेळेवर लग्न मोडायच..??... दुसरं काही तर नसेल...?? ते काय ते गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड वैगरे काही चक्कर.......असे त काही नसेल ..? सोनिया madam पण तिकडे कुठे लंडनला जातंय .....काहीं खरं नसते बाबा या मोठ्या लोकांचं" ......आत्याबाई

" तुम्हाला माहिती आहे काय त्यांच्या बद्दल काही...???तुम्ही ओळखता काय त्यांना..........??...?" माहीला आता अर्जुन बद्दल उलटे काही ऐकायला आवडलेले नव्हते.... आता अर्जुन बद्दल उलटे काही ऐकायला आवडले नव्हते, आणि म्हणूनच ती त्या दोघींच्या मधात बोलली, 

त्या दोघी चूप झाल्या आणि माहीकडे बघत होत्या........

" आपण ज्यांना पूर्णपणे ओळखत नाही....त्यांच्याबद्दल काहीही वेडेवाकडे बोलायचा आपल्याला अधिकार नाही आहे.......आणि आता आपली ताई त्याच घरी चालली आहे ना.........मग हे मोठी लोकं,  अशी नी तशी आपल्याला आता बोललेले शोभत नाही......ताई पण आता मोठ्या घरची झालिये.......आता तिचं ते सासर आहे , तीच ते घर आहे, आपल्याला प्रत्येक शब्द सांभाळून बोलायला हवा......तिची ती फॅमिली आहे आता.......आणि अर्जुन सर आणि  सोनिया मॅडम खूप चांगले आहेत.........असेल त्यांचा काही प्रोब्लेम..........आपल्याला कुनाबद्दलच असे काही न माहिती असता ,कसे काय आपण कोणाला काही म्हणून शकतो?.........आपण शिकलेली समजदार लोक आहोत ना?........मग काहीतर आपल्या शिक्षणाचा समजदारीचा उपयोग करावा ना?..........आणि मुळातच त्यांच्या वागण्याने तुमच्या आयुष्यावर काही परिणाम होतो आहे काय......??....मग उगाचच काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं"...........माही.....
 

अर्जुन बद्दल तर तिला काही ऐकून घाययचे नव्हते, पण त्यातही तिला अशा विचारसरणीची भयंकर चीड होती......काही गरज नसतांना सुद्धा उगाचच दुसऱ्यांच्या आयुष्यात तिला कालवाकालव केलेली आवडत नव्हती......उगाचच दुसऱ्यांना काहीतरी बोलत राहणं,दुसऱ्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवलेले तिला आवडत नव्हते........आत्याबाई आणि  आईला हे माहिती होते म्हणून मग त्या काही न बोलता चुपचाप आपले काम करत होत्या..... त्यांना पण तिचे बोलणं पटलं होते......

संध्याकाळचे सात वाजत आले होते.........फुलांनी सजवलेली कार समोर येऊन उभी होती.......अंजलीने तिच्या वडिलांच्या फोटोला नमस्कार केला.......आणि तिचे डोळे खुप भरून आले.....आपले लग्न मोडल्याचे किती टेन्शन घेतले होतें बाबांनी......त्यातच त्यांचा जीव गेला होता....ती स्वतःला त्यासाठी कारणीभूत मानत होती.......आणि तिला तिच्या बाबांच्या आठवणी आठऊ लागल्या.......आज बाबा असते तर आकाशला त्यांचा जावई बघून किती खुश झाले असते.......ती आईचा गळ्यात जाऊन रडू लागली.......

" नाही बाळा..... असं रडायचं नाही, तुझा काहीच दोष नव्हता.......आणि बघ ते....तिथून बघत आहेत तुझे बाबा तुला......खूप खुश असतील तुझ्यासाठी........इतका छान जीवनसाथी भेटले आहे तुला.........तुला रडतांना बघून त्यांना वाईट वाटेल ना?" .......आई तिला समजावत होती......

" ये ताई.....रडू नको ग........तुला बघुन ते आकाश सर पण रडतात आहे , बघ" ..........माही , तसे सगळे आकाशकडे बघायला लागले...........आणि खरंच आकाश sad वाटत होता......रडत नव्हता पण sad होता........मामींनी तर डोक्यावर हाथ मारला.......आणि बाकी हसायला लागले....

" बदमाश" ........अंजलीने माहीच्या पाठीवर मारले........

" भलाई का तो जमाना ही नही रहा...... हसवण्यासाठी  पण मार खावा लागतोय राव".........माही आपलं खांदा चोळत होती.......

" नौटंकी.." .......अर्जुनच्या ओठांची   काठ रुंदावली......अर्जुन थोडा दूर कारला टेकून उभा होता नि माहीची मस्ती बघत होता.......

" बस बस.....पुरे कर आता." .......अंजली जाऊन आत्याबईंच्या गळ्यात पडली........." आत्या काळजी घे ग......औषध सगळं वेळेवर घे......आणि या नौटंकीला थोड कमी रागव" .......अंजली

"बस बस......आता आमची काळजी करायची नाही.......छान सुंदर समजदार जोडीदार आणि  घर भेटले आहे......त्यांच्याकडे लक्ष द्यायचे" .........आत्याबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होत्या.....

" हो तू आपलं घर बघ.......यांना बघायला मी आहे.....आणि आता या दोघी फक्त माझा लाड करणार.....कित्ती मस्त ना?" ............माही आई आणि अत्याबईंच्या मध्ये उभी होत त्यांच्या खांद्यावर हात ठेवत बोलली...

" आई ss "........ अंजली

" तुला तुझा पर्मनंट व्यक्ती  भेटला आहे ना......तुझे लाड पुरवायला" ..........माही तिची मस्करी करत होती...

"बदमाश " .....आत्याबईंनी माहीच्या पाठीत परत एक चापट मारली.....

" आऊच " ................माही परत पाठ चोळत होती.......अंजली परत सगळ्यांच्या जवळ येत मिठीत गेली..........

अंजलीची आई आणि आत्याबाईन्नी आजी, नलिनी, मामी सगळ्यांसोबत बोलून घेतले...

आकाश आणि अंजलीने सर्वांना नमस्कार केला.......आई, आत्याबाई, माहीने प्रेमाने तिची पाठवणी केली.....आकाशने फुलांनी सजवलेल्या कारचे  दार उघडले...........अंजली आत जाऊन बसली........आकाश तिच्या बाजूला बसला.........आणि  सर्वांना बाय करून कार पुढे निघाली........त्याच्याच मागे पाहुण्यांनी भरलेली बस निघाली.....

माही , आई, आत्याबाई वेगळ्या गाडीतून निघणार होत्या......आजी, नलिनी, मामा मामी सुद्धा थांबले होते, ते सुद्धा दुसऱ्या गाडीतून जाणार होते......सगळे आपापल्या गाडीमध्ये जाऊन बसले.......

मीरा अर्जुन जवळ होती........माही मिराला घ्यायला गेली

" मीरा चला , आता आपल्याला घरी जायचे" ....... माही

" ना.....मी नाही येणार.......मला अर्जुन सोबतच जायचं" ......मिरा

" मीरा हट्ट नाही करू बाळ, बघ उशीर होतोय ना सगळ्यांना.........अर्जुन  पण थकले ना आता.....त्यांना पण आराम करायला हवा ना?...... चल" ......माहीने तिला घेण्यासाठी हाथ पुढे केला तर मिराने अर्जुनच्या गळ्यात हाथ टाकत त्याला घट्ट पकडले.....

" मीरा चल ना आता......आजी रागवेल आपल्याला.....आपण उद्या सकाळी जाऊ परत....यांच्या घरी" ......माही

" यांचं घर....???" ....अर्जुन  एक भुवई वर करत माहीकडे  बघत होता...... माहीला कळत नव्हत आपण काही चुकीचं बोललो की काय......

" नाही......मी नाही येणार.......मला अर्जुन सोबतच राहायचं" ..........मिरा हट्ट करत होती....

" माही.... it's okay....... मी सोडतो तिला नंतर" ....... अर्जून

" ती त्रास देईल.....रस्त्यात झोपेल सुद्धा.......मिरा बाळा चल ना आता......मी रात्री एकटी झोपू काय?......अंजली ताई पण नाही.....मला भीती वाटली एकटीला तर?" .........माही

माहीचा बोलण्याने तिला काय कळलं काय माहिती , मिरा लगेच माही जवळ गेली.....

" अर्जुन तुला माहिती माऊला ना bad ड्रीम्स येतात......आणि ती ना मग खुप घाबरते......तिला ना खूप घाम येतो........मी ना बघितल तिला.....ताईमाई तिला पाणी देत तिच्या पाठीवर असे करत होती" ........मिरा निरागसपणे सांगत होती.......अर्जुन माहीकडे बघत होता....त्याला ते ऐकून खूप वाईट वाटले......अजूनही रात्रीतून हिला जुन्या गोष्टींचा त्रास होतो....आणि  आपण काहीच नाही करू शकत.....त्याला खूप हतबल झाल्यासारखे वाटत होते.......

ती  गोष्ट घडून इतके दिवस झाले होते...तरी सुद्धा रात्री ती अजूनही नीट झोपली नव्हती.......दिवसभर तर आजूबाजूला लोकांच्या गरड्यात तिचा दिवस जायचा......पण रात्र.....रात्रीची , अंधाराची तिला अजूनही खूप भीती वाटत होती......वारंवार ती वाईट स्वप्न तिला पडत असायची........ती खूप घाबरायची........तेव्हापासून अजूनही ती रात्रीची स्वस्थ झोपली नव्हती......त्या एका घाणेरड्या प्रसंगानंतर तिच्या शरीरावर, मनावर, डोक्यावर.....तिच्या संपूर्ण आयुष्यावर वाईट परिणाम झाला होता........कितीही प्रयत्न केला तरी तो प्रसंग तिचा पिच्छा सोडत नव्हता........तीच आयुष्य तर बरबाद केलेच होते....पण तिच्या नशिबी सुखाची झोप ही नव्हती सोडली होती.......

माही अर्जुनकडे बघत होती.....आणी तिला त्याच्या नजरेतून समजले होते की तो स्वतहाला किती हेल्पलेस फील करतो आहे....

" मीराची माऊ खूप स्ट्राँग आहे , हो ना....आणि मिरा सोबत असली की माऊला कशाचीच भीती वाटत नाही....हो ना मिरा?......आणि मिरा तुझ्या अर्जुनला सांग आम्ही उद्या येणार आहोत त्यांच्या घरी.....मग मिरा दिवसभर खेळेल" .......माही

" हो.... माऊ स्ट्राँग आहे......अर्जुन आम्ही उद्या येऊ" .......मिरा

" ओके.....प्रिन्सेस.......take care" ......... अर्जुन माहीकडे बघत बोलला

" ठीक आहे , उद्या वाट बघतो मी माझ्या प्रिन्सेस ची" ......अर्जुन मिराच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला.....त्याने त्या दोघींना त्यांच्या गाडी पर्यंत नेऊन सोडलं........सगळ्यांच्या गाड्या निघाल्या......तशी अर्जुनची ही गाडी सगळ्यांच्या मागे निघाली....

******

शंतिसदन एकदम नव्या नवरी प्रमाणे सजले होते....नवीन सूनबाईचे खूप धूमधडाक्यात गृहप्रवेश झाला होता.........थोडीफार थट्टामस्करी करून ,जेवण आटोपून सगळे आराम करायला निघून  गेले होते.....दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा होती....म्हणून सगळे लवकर झोपायला गेले होते.....अंजली आज श्रियाच्याच रूम मध्ये होती...

एवढया सगळ्यातही आशुतोष सोडून बाकी घरातले कोणीच अर्जुन  सोबत फार काही बोललं नव्हते......अर्जुनला थोड वाईट वाटले होते, खास करून आईसाठी....पण त्यांना त्यांचा वेळ घेऊ द्यावा असे त्याला वाटत होते..कारण आता बोलून काहीच फायदा नव्हता...सगळ्यांची डोकं फार तापली होती म्हणून कोणालाच त्याच बोलणं समजनार नव्हते.....तो पण जास्ती काही न बोलता आपल्या रूम मध्ये निघून गेला..

********

सकाळी सगळीकडेच धावपळ सुरू होती... आज अंजली आणि  आकाशच्या लग्न नंतरची पूजा होती......जवळेचेच असे काही नातेवाईक बोलावले होते....आणि अंजलीच्या घरच्यांना, सोनियाच्या घरच्यांना बोलावले होते.....सोनियाच्या घरच्यांनी मात्र काहीतरी कारण देऊन येण्याचे टाळले होते.....

" अर्जुन sss" ....... मिरा धावतच अर्जुनाच्या मिठीत शिरली......त्याने पण तिला आपल्या कुशीत वर उचलून घेतले........त्याने एकदा माही कडे ती ठीक आहे काय चेक केले ....नी मिराला घेऊन एका कॉर्नर मध्ये गप्पा मारत बसला...

थोड्या वेळाने बरीच पाहुणे मंडळी जमली होती......अर्जुन थोड औपचारिक बोलून तिथून आपल्या रूम मध्ये चालला गेला होता...उगाच समोर राहू तर प्रश्न विचारून घरच्यांना परेशान करतील असे त्याला वाटत होते....आकाश अंजलीच्या इतक्या चांगल्या कार्यक्रमात काही गोंधळ नको म्हणून तो तिथून चालला गेला....तसे तर तो ऐकून घेणाऱ्या मधला नव्हता....पण घरचाच कार्यक्रम....कोणी काही बोलले तर त्याला सहन पण झाले नसते.....शांतता राहावी म्हणून त्याने तिथे न राहणे च पसंत केले होते....

अनन्याने अंजलीला खूप सुंदर तयार केले होते.......आकाश तर नेहमीप्रमाणे तिला बघून ब्लँकच झाला होता.......सत्यनारायणाची पूजा, नंतर जेवणं सगळं व्यवस्थित पार पडली होती...... माही घरात सगळ्यांना मदत करण्यात बिझी होती.......जवळपास दोन अडीच वाजत आले होते.....

" बापरे माझं मिरा कडे  काहीच लक्ष नाही, तिला भूक लागली असेल.....अशी कशी विसरले मी......पण मिरा पण  नाही आली काही त्रास द्यायला" ..... माही मिरा ला  शोधत होती....बऱ्याच वेळ शोधून झाल्यावर तिला काहीतरी आठवले आणि ती अर्जुनच्या रूम मध्ये गेली.......तर मिरा बेड  वर झोपली होती आणि अर्जुन सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये  काहीतरी करत होता......

" मीरा." ...........माही

" जेवण झाले तिचे ... don't worry" ......... अर्जुन

" Thank you........ माझं तर लक्षच नव्हते" ..........माही

" ह्मम.......तुझं तसे पण कुठे लक्ष राहते स्वतः कडे......तुला समाजसेवाच करायची असते" ............अर्जुन

" माझं असते लक्ष स्वतः कडे" ...............माहीला तो काय बोलतोय ते कळले होते...पण उगाच काहीतरी बोलायचं म्हणून ती बोलली

" Oh... really.?" .......... अर्जुन तिच्या जवळ जात बोलला

" मला तुमच्या सोबत वाद नाही घालायचा आहे......
मुळात मला तुमच्या सोबत काहीच बोलायचं नाही आहे......मला काम आहे, मी चालली" ......... माही

" माही, घरात काम करायला बरीच लोक आहेत......त्यांना त्या कामाचे पैसे मिळतात........अनन्या, श्रिया पण घरात इतकी काम करत नाहीत , जितकी तू करते" ........अर्जुन

" मला कोण काय करते नाही बघायचं.......मला आवडते......... माझंच घर आहे, माझीच लोक आहेत" ......माही

" काल तर यांचं यांचं घर करत होती.......तेव्हा नाही आठवलं हे तुझं घर आहे ते?" ..........अर्जुन

" अरे यार यांनी बरोबर तो एक शब्द पकडून ठेवलाय" .....माही मनातच विचार करत होती.....

" हा.....म्हणजे काल तुमचंच होत घर......म्हणजे आज पण आहे........पण आता माझ्या ताईच पण झालंय ना हे घर......तर माझ्या घरासारखे पण झाले ना" ........माही

" अच्छा.......मी या घराला लवकरच तुझं घर बनवणार आहो" ...........अर्जुन

" काय....???......तुम्ही पागल झालात काय...???....बघितले ना घरातले सगळे किती नाराज आहेत........त्यांची नाराजगी दूर करायची सोडून तुम्ही हे काय फालतू बोलत आहात?" ............माही

" I don't care........ मी तुझ्यासोबत लवकरात लवकर लग्न करतोय" ........... अर्जुन.... काल जेव्हा त्याने ऐकले होते की माही अजूनही रात्री घाबरते.....त्याचे त्याला खूप फील झाले होते...... आणि त्यावर आपण काय करू शकतो हाच विचार तो करत होता.....पण त्यासाठी त्याला काहीच सोल्युशन सापडत नव्हते........दिवसभर तर काही करून तो तिच्या सोबत राहू शकत होता....लक्ष देऊ शकत होता.....पण रात्री....रात्री काय करणार......रात्री तिच्या सोबत राहूनच तिची भीती घालवता येणार होती......म्हणून माही सोबत लवकरात लवकर लग्न करण्याचा विचार तो करत होता.....

" क..... क.....काय..,..??...तुमचं डोकं काम करणे बंद केले वाटते.....आणि तुम्हाला कोणी सांगितले की मी लग्न करणार आहे ,..,.......अजिबात नाही ...... मी लग्नच करणार नाही आहे" .........माही

" मी तुला विचारत नाही आहो......सांगत आहो" .........अर्जुन

" मी स्वप्नातही लग्न नाही करणार" ........ माही

" It's okay...... आपण असेच राहू.....मला काही प्रोब्लेम नाही आहे.........मला फक्त सोबत राहायचं आहे.....लग्न करून राहायचं की लग्न न करता ते तू ठरव.......मला कुठलाही ऑप्शन चालेल" ..............तिचा चिडलेला चेहरा बघून अर्जुन तिची मस्करी करत होता.....पण तो इतक्या सिरीयसली बोलत होता की ती बरीच घाबरली होती...

" तुम्ही डोक्यावर पडला आहात काय.....???.....काहीतरी बडबड करताय......डोक्याच्या ट्रीटमेंटची मला नाही तुम्हाला गरज आहे.......जाऊन या डॉक्टर कडे" ......

" माझी डॉक्टर तर तूच आहेस" ........अर्जुन हसू दाबत बोलत होता...

माही त्याच्याकडे अजब नजरेने बघत होती....

" सर तुम्ही ना फार  आगा........" .........परत तिला कालच त्याला आगाऊ म्हटलेले आठवले.....आणि  परत तो काय करेल याची तिला कल्पना आली होती, आणि ती बोलता बोलता चूप झाली होती............अर्जुन तिच्याकडे बघून हसत होता...

" शी बाबा." ..... पाय आपटतच ती तिथून जात होती

" माही.........." .

माही जाता जाताच दारात थांबली....

" तू ठीक आहेस ना............??" .…अर्जुन

" हो." .......माहीने त्याच्याकडे वळून बघत उत्तर दिले.......पण त्याचा डोळ्यात तिला तिच्याबद्दल खूप काळजी दिसत होती......तिला कळत होते की काल जेव्हा मिरा त्याला मला अजूनही भीती वाटते, मी घाबरते असे सांगत होती तेव्हा त्याला किती वाईट वाटत होते.....आणि त्यासाठीच तो हे लग्नाचं खुळ डोक्यात घेऊन बसला आहे.......,त्याला तिला त्याच्या प्रेमाची साथ द्यायची होती आणि झालेल्या गोष्टीतून बाहेर काढायचं होत......

" Don't worry....... I am prefectly fine Mr Arjun Patwardhan" ........... माही त्याच्या जवळ जात त्याच्या नाकावर आपल्या एका बोटाने हळूवारपणे मारत बोलली......अगदी तसेच जसे हळदीच्या दिवशी अर्जुनने केले होते.....आणि खाली निघून आली......तिच्या तसे करण्याने त्याच्या चेहऱ्यावर स्मायल आले होते.....

पाहुणे गेले असतील असा अंदाज घेऊन सोनिया थोडी उशिरा घरी सगळ्यांना भेटायला आली होती, पाहुण्यांसमोर आली असती तर उगाच त्यांना बोलायला विषय मिळाला  असता....म्हणून थोडी उशिराने आली होती...... आणि तसेही  आजच रात्री ती लंडनसाठी निघणार होती.......त्यामुळे जायच्या आधी सगळ्यांना तिला भेटायचे होते...आजी आई तिच्यावर पण नाराजाच होते......पण ती जाते आहे आणि तिने त्यांची बऱ्यापैकी समजूत काढली म्हणून आजी नी आईने तीच्यावरची नाराजी दूर केली.....

घरातील सगळे  लोक जेवायला बसली होती......अर्जुन आल्यामुळे सगळे शांत झाले होते.........शांततेत जेवणं सुरू होती.......सोनियाचे  सगळीकडे निरीक्षण सुरू होते......अर्जुनचे जेवण लवकर आटोपले.....तो असल्यामुळे सगळे चूप बसले आहे त्याच्या लक्षात आले म्हणून तो तिथून उठून लिव्हिंग रूममध्ये गेला.......बाकीच्यांना मोकळेपणाने बोलत यावे म्हणून..

" माऊ........दूध"  ............मिरा माही जवळ गेली....

" मीरा पाच मिनिट .....बघ माझं झालेच आहे जेवण...... मग देते" ...........माही

" नाही.....मला आताच पाहिजे" ..........मिराने भोंगा पसरला.......

" Mira , see lots of butterflies are there in garden....... let's go we will see" .........म्हणत अर्जुनने मिरा उचलून घेतले..........त्याच ऐकून मिरा पण एक्साईट झाली होती........

" पिंकी......one glass chocalatemilk with very less chocalate powder........ बाहेर आण" ...... अर्जून मिराला घेऊन बाहेर गार्डन मध्ये गेला.......

" He loves Mira , a lot........... I really never seen him before like this.........it's really a very good change" ........ सोनिया तो गेला तिकडे बघत बोलली.......

" लग्न केले असते तर त्याचं स्वतःच मुल.." ...........आई बोलता बोलता थांबली

" लग्न करेल तो.....आता जरी नसेल तयार तरी नंतर करेलच तो........... I am sure ....... आई तुम्ही ते बघण्यापेक्षा हे का नाही बघत आहे की त्याने लाईफ एंजॉय करायला सुरुवात केली आहे.....आधी फक्त तो काम करायचा.....त्या शिवाय त्याचा लाईफमध्ये दुसरे काहीच नव्हते.....आता तो गप्पा करतो, हसतो, लहान मुलांसोबत खेळतो आहे.......त्याचा लाईफकडे बघायचा दृष्टिकोन बदलत आहे .......हे चांगले नाही काय??, लग्न किंवा स्वतःच बाळ यापेक्षाही तो खूश आहे हे महत्वाचं नाही काय??.........आणि त्याला जेव्हा खरंच वाटेल लग्न करायला हवे तो करेल आहे......खुश राहू द्या त्याला" .........सोनिया

" अगं पण तू........तू आम्हाला आवडते ग" ........आई

" आई मला पण तुम्ही सगळे खूप आवडता.....माझं आणि अर्जुनचे लग्न नाही झाले तर काय झालं.......ते एकच थोडी रिलेशन थोडी होत आपलं, जे आता संपेल......तुम्ही सगळे माझी फॅमिली आहात......मी फोन करेल....भारतात आली की भेटायला येत जाईल  " ...........सोनिया

सोनियाच्या बोलण्यावर सगळे अवाक होत तिच्याकडे बघत होते.....लग्न मोडले तरी ही मुलगी अर्जुनवर रागवायचे सोडून त्याची साईड घेत आहे......सगळ्यांनाच तिचे  खूप कौतुक वाटत होते.....

माहीला पण तिचा खूप अभिमान वाटला......ती पण अर्जुनच सुख, आनंद बघतेय....... अर्जुनसाठी आपली निवड चूक नव्हती तिला वाटून गेले.......पण सरांना कळेल तर ना.........माही मनातच विचार करत होती....

जेवणं आटोपली.....सगळे वरती अनन्याच्या रूममध्ये गप्पा गोष्टी करत होते.....आकाश अंजली नवीन जोडपं तिथे होत पण आपल्याच विश्वात होते....माही रुही आणि मिरा सोबत खेळत होती..
 

" सोनिया, असे अचानक वेळेवर लग्नाला का नकार  दिला तुम्ही दोघांनी...???अर्जुनला तर विचारता पण येत नाही.....तू तरी सांग.....??" .....अनन्या

" ताई , अग आमचं वर्कआऊट नाही झालं.........लग्न म्हणजे लाईफचे  खूप इंपॉर्टन्ट डिसिजन  असते ना...... मला असे वाटलं आम्ही दोघं एकमेकांसाठी नाही बनलो आहे" .......सोनिया काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी बोलली

" मला तुम्ही सांगितलेलं कुठलेच कारण पटत नाही आहे." ......अनन्या

" ताई, झालं न आता, असू दे ना.......काय तोच सब्जेक्ट......God having some more better plan for us.......just trust on him..... everything will be better" ......... सोनिया

" ठीक आहे.....नाही काढत परत तो विषय" .......अनन्या

" ताई आणखी एक रिक्वेस्ट आहे ..... प्लीज अर्जुनला यासाठी ब्लेम करू नका ......आम्ही दोघंही सारखेच जबाबदार आहोत या गोष्टीला...... इनफेक्ट मीच.......त्याने मला साथ दिला........आणि घरच्यांना पण समजवा ना.....आई, आजी त्याच्या सोबत बोलत नाहीये....नाराज आहेत त्याचा वर..........मला माहिती आहे तो तेव्हडा स्ट्राँग आहे हे सगळं हॅण्डल करायला........ पण मलाच असे बघून चांगले नाही वाटत आहे......आता जेवतांना पण तो किती शांत होता....कोणीच बोलत नव्हते" ........सोनिया

" सोनिया....इतकं प्रेम करते त्याच्यावर, इतकी काळजी वाटतेय तर का जाते आहेस?" ..........अनन्या

" प्रेमासाठीच" ..............सोनिया

" मला तर तुमचं काहीच कळत नाहीये....सगळं डोक्यावरून जाते आहे" ...........अनन्या

" जाऊ दे मग.......जाते तर डोक्यावरून" .........आशुतोष जो त्यांचं बोलणं ऐकत बसला होता त्यांच्या जवळ येत बोलला.....

" सगळ्यात जास्ती हा खुश आहे .....तुमचं लग्न नाही झालं तर.... असच दिसतेय" .........अनन्या

" हो......तसे पण तुझ्या त्या खडूस भावा पेक्षा सोनिया derservs more better more romantic person........ हो ना सोनिया??........त्याला तर साधं I Love you पण म्हणता येत नाही.......बाकी तर दूरच"  ........आशुतोष

सोनिया त्याच्या बोलण्यावर कशीबशी हसली....

" बरं चला आता मला निघायला हवे.......पॅकिंग पण करायची आहे.......अर्जुनला भेटून येते" ......सोनिया

सोनिया अर्जुनच्या रूम मध्ये आली....तो लॅपटॉप घेऊन बसला होता.......

" अर्जुन" .............सोनिया

" सोनिया......ये......how r you ???" ....... अर्जुन जागेवरून उठत बोलला...

" मी ठीक आहे, आज रात्री लंडनला जाते आहे तर भेटायला आले होते" ........सोनिया

" Okay " ........... अर्जुन

दोघांना पण पुढे काय बोलावं काहीच कळत नव्हते......थोड्या वेळ दोघेही इकडे तिकडे बघत होते.....

"अर्जुन....काम कमी कर.....आणि स्वतःची काळजी घे...... कामा पुढे तू सगळं विसरतो"..........सोनिया

अर्जुनने स्मायल केले........" you too take care" ...

त्याला सोडून जातांना तिला खूप वाईट वाटत होते....तिचा गळा दाटून आला होता.......तिच्या डोळ्यात आता पाणी जमा व्हायला लागले होते........तिला बघून अर्जुनला पण वाईट वाटले....

" Arjun, can I hug you......... please" ........ बोलता बोलता सोनियाचा आवाज कापरा आणि जड झाला होता....

अर्जुनने होकारार्थी मान हलवली........तसेच सोनियाने जाऊन त्याला हग केले......... त्याने पण मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला.......आता पर्यंत डोळ्यात साचलेले पाणी तिच्या गालावर ओघळले.......मन भरे पर्यंत तिने त्याला सोडले नाही......थोड्या वेळानी तिला मन हलके झाल्यासारखे वाटले तशी ती त्याचा दूर झाली......

" बरं येते अर्जुन........आणि हो हसतांना खूप छान दिसतोस......हसत राहा" .......बोलतच ती डोळे पुसत रूमच्या बाहेर पडली...........तर पुढे माही दिसली

" मॅम खूप आठवण येईल तुमची.........काळजी घ्या स्वतःची.......आणि काही पण लागलं तर आम्ही आहोच सोबत" ........माही

" ह्मम..........माही........मला तसे तर तुझ्या आयुष्यात बोलायचा अधिकार नाही पण तरीही तुला मैत्रीण मानते म्हणून बोलते.........अर्जुनच्या प्रेमाचा स्वीकार कर.......खूप नशीबवान आहेस तू,  तो तुझ्यावर इतके जीवापाड प्रेम करतो........ज्याचा प्रेमावर विश्वास नव्हता.......जो बऱ्यापैकी कठोर मनाचा होता.....तो बदलला आहे माही........आणि जितके मी त्याला ओळखले आहे.....तो पहिल्यांदाच आणि  शेवटचा प्रेमात पडला आहे........तो तुझ्या शिवाय मनात आणूनही दुसऱ्या कोणावरच प्रेम करू नाही शकणार..........तुला माहिती अर्जुन सारखी मुलं एकतर प्रेमात पडत नाही......आणि पडलीच तर शेवटच्या श्वासापर्यंत फक्त त्यांचेच बनून राहतात" ................सोनिया

माही डोळे मोठे करत शॉक मध्ये सोनियाकडे बघत होती..........

" ना....ना.....नाही......मला अर्जुन काहीच बोलला नाही........त्याने मला तो प्रेमात आहे किंवा तुझं किंवा कोणाचं नाव नाही सांगितले.........पण कसं आहे ना आपण ज्याच्यावर प्रेम करतो , त्याचे  न बोललेले शब्द पण कळतात..........तुला आग लागली होती तेव्हाच मला कळले होते......तसा तर तो नेहमीच मदतीला धाऊन जाणारा आहे.....कॉलेज पासून तो असाच आहे......पण तुला लागलेली आग बघून त्याचा जीव तळमळला होता.......ते तर लकीली खाली स्विमिंग पूल होते.......पण नसते ना तरी त्याने तुला एकटे सोडले नसते........वेळ आलीच असती तर त्याने तुझ्यासोबत आगीत स्वतः ला सुद्धा सामावून घेतले असते..........तुला लागणारे चटके त्याने आनंदाने वाटून घेतले असते..............तो रुड आहे.........आतापर्यंत त्याला आलेल्या  अनुभवा मधून तो तसा बनला आहे...........पण मनाने खूप चांगला आहे.......बघ ना आमचं लग्न ठरले असून सुद्धा तो कधीच माझ्या जवळ नाही आला........त्याने माझा  कुठलाच गैरफायदा नाही घेतला..........आजकालची मुल तर एंगेजमेंटची सुद्धा वाट बघत नाही......अर्जुन साठी तर कुठलीही मुलगी आनंदाने सगळं करण्यास तयार होईल......पण तो तसा नाहीये............ कळते आहे ना तुला मी काय बोलते आहे तर??...........जास्ती उशीर नको करू........प्रेम वारंवार आपले दार ठोठावत  नाही?.................सोनिया

माहीला तर काय बोलावं काहीच कळत नव्हते.........ती फक्त तिच्याकडे बघत होती......

" बरं जाऊ दे जास्ती विचार करू नको......कळेलच तुला सगळं.........आणि हो जशी आहेस तशीच रहा......खूप स्वीट आहे तू........काकूबाई आहेस.....पण छान आहे आहेस.....आवडते मला ही अशी बावळट काकूबाई......कदाचित अर्जुनला पण तेच आवडलं तुझ्यात.....तुझा निरागसपणा........काळजी घे" ........सोनिया बोलून निघून गेली......

माही तिला जातांना बघत होती.........नी तिच्या डोक्यात तिचेच बोलणे येत होते...........अर्जुनने तुला एकटे सोडले नसते......तुला  लागणारे चटके सुद्धा त्याने  आनंदाने वाटून घेतले असते............नी नकळतच तिच्या डोळ्यातून एक थेंब तिच्या गालावर ओघळला......

********
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️