Jan 27, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 50

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 50

भाग 50

माही वरती रूम मध्ये मिराला झोपावत होती.....मिरा खेळून खूप दमली होती.......त्यामुळे तिची कुरुकुर सुरू होती......आणि तसेही अर्जुनचे लग्न माहीला बघायला त्रास झाला असता  , म्हणून ती मीराला  घेऊन वरती आली होती......तिला रूममध्ये झोपावत होती........मीराला  झोपावता झोपावता तिच्या तिच्या डोळ्यासमोर  अर्जुनाचे ते राजकुमार सारखे  रूप वारंवार  येत होते , ते आठवतच  ती त्याच्या स्वप्नात गेली होती........ आणि ते आठवत आठवत तिला सुद्धा झोप लागली होती........

इकडे घरातले सगळेच अर्जुनवर नाराज झाले होते... पाहुण्या मंडळींमध्ये थोडीफार कुजबूज सुरू होती पण अर्जुनच्या धाका पुढे कोणीच काही बोलत नव्हतं........ अर्जुनची आई सुद्धा थोडी नाराज झाली होती,  आधीच तो लग्नासाठी नाही म्हणत होता आणि आता मोठ्या मुश्किलीने तयार झाला होता तर परत लग्न मोडलं होतं.... त्यांना त्याची खूप काळजी वाटत होती.  अर्जुनच्या  डोक्यात काय सुरु आहे,  कोणाला काहीच कळत नव्हतं..... घरात सगळे नाराज असले तरी फक्त एक व्यक्ती असा होता जो खूप खुश होता आणि इकडून तिकडे उड्या मारत होता.......हो बरोबर ओळखलं आपला आशुतोष त्याला मनापासून वाटत होतं की सोनिया आणि अर्जुनचे लग्न व्हायला नको आणि तसंच झालं होतं त्यामुळे तो भयंकर खूश होता..... पण सगळे नाराज असल्यामुळे त्याला त्याचा आनंद दाखवता येत नव्हता..... तो बऱ्यापैकी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होता...... तरीसुद्धा अनन्याचे आणि त्याचं एक दोनदा वाजलंच होतं....... अनन्याला सुद्धा खूप वाईट वाटत होते........ पण काही तरी मिस होत आहे असं वारंवार तिच्या डोक्यात येत होते........ श्रेया पण थोडी नाराज झाली होती,  आकाश आणि अर्जूनच लग्न झाल्यानंतर ती स्वतःच्या लग्नाबद्दल घरात बोलणार होती पण आता अर्जूनने लग्न वेळेवर कॅन्सल केल्यामुळे तिला तिच्या लग्नाबद्दल घरात कसं बोलावं काहीच कळत नव्हते........आणि सोनिया तशी घरात सगळ्यांनाच आवडली होती त्यामुळे ती आपली वहिनी बनवून येणार, घरातली सून बनून  येणार म्हणून सगळेच लोक खूष होते पण अचानक त्या दोघांनी घेतलेल्या निर्णयामुळे सगळ्यांच्या आनंदावर पाणी फेराल्या गेले होते......

आकाश अंजली सुद्धा थोडे शॉक झाले होते......आकाश आणि अंजलीला आपापल्या परीने अर्जुन आणि माहीवर थोडा थोडा डाउट होता ,पण अर्जुन सोबत बोलणार कोण, त्याच्याशी बोलायला कोणाची हिंमत होत नव्हती, त्यामुळे ते दोघे सुद्धा चूप होती आणि त्यांच्या लग्नाच्या पुढचे  विधी करत होते......

अर्जुनने  बराच वेळ माहिची खाली मांडवामध्ये वाट बघितली...... पण माहि त्याला दिसली नव्हती.........थोड्यावेळ माहिची वाट बघून तो वरती आपल्या रुममध्ये निघुन आला होता.......आकाशचे  लग्न आहे म्हणून तो तिथे थांबला होता पण प्रत्येकाची प्रश्नार्थक नजर त्याच्यावर होती ,त्या सगळ्यांच्या नजरा बघून त्याला तिथे खूप अवघडल्यासारखे झाले होते  आणि म्हणूनच तो तिथून परत आपल्या रूममध्ये आला होता..

थोड्या वेळाने माहीला  जाग आली.... मीरा पण चुळबुळ करत होती...... माही उठून फ्रेश झाली....... तिने घातलेले सगळे हेवी ड्रेस , दागिने काढून ठेवले...... आणि सिम्पल असा सिल्कचा मोती कलरचा कुर्ता आणि खाली त्याच रंगाचा पटियाला घातला होता..... त्यावर तिने हेवी वर्क असलेली लाल रंगाची ओढणी घेतली........ गळ्यात नाजुकशी चेन, कानात सिंगल लाईन लटकन आणि हातात तिच्या फेवरेट काचेच्या ओढणीला मॅचिंग अशा बांगड्या आणि कपाळावर छोटीशी लाल टिकली , तिने थोडे समोरचे केस मागे घेऊन क्लिप मध्ये अडकवले  आणि बाकी केस मोकळे सोडले..... त्या सिंपल लूकमध्ये पण ती छान दिसत होती... आता तिला बरंच हलकं हलकं वाटत होतं .....सकाळपासून  तिला सगळच खूप भारी झालं होतं.......

फायनली अंजलीचं लग्न झालं....... तिच्या डोक्यावरचा पण ताण कमी झाला होता...... नेहमी   तिला वाटत राहायचं की माझ्यामुळे ताईच्या आयुष्यामध्ये काही वाईट व्हायला नको आणि म्हणूनच ती नेहमी टेन्शनमध्ये असायची,  आज अंजली आणि आकाशचे  लग्न झाल्यामुळे ती बरीच रिलॅक्स झाली होती........ सोबतच अर्जुन आणि सोनियाचे सुद्धा लग्न झालं असणार........ अर्जुनच्या लग्नाचे  तिला थोड वाईट वाटत होतं पण त्याच्या आयुष्यात  त्याला शोभेल अशी मुलगी आलेली होती, आता त्याचं चांगलं होईल.... याचे तिला खूप समाधान वाटत होतं......... ती खिडकीमध्ये गेली..... खिडकीमधून बाहेरचा खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता..... तिने तिचे दोन्ही हात पसरले आणि मोकळा श्वास घेतला............

" चला माही , आता येथून आपलं नवीन आयुष्य सुरू होणार..... मी,  माझी मीरा आणि माझ्या हृदयात असणारा  माझा अर्जुन.......... आपण तिघे नवीन शहरात , नवीन लोकात" ....... माही विचार करत होती.....

" माऊ ss.." ..... तेवढ्यात मिरा उठून माहीला आवाज देत होती......... माहीने मिराला फ्रेश केले आणि दोघे मिळून खाली निघून आल्या.........

खाली विहिणीची पंगत सुरू होती......... खूप सुंदर अशी राजेशाही थाटात पंगत सजवली होती........मीराने सुद्धा अंजली जवळ बसायचा हट्ट केला म्हणून माहीने तिला अंजली जवळ नेऊन बसवले........ आणि ती इकडे-तिकडे बघत होती......... काहीतरी कमतरता भासत आहे तिला जाणवत होतं....

"तू ज्याला शोधते आहेस , तो वरती त्याच्या रूममध्ये आहे"....... मागून आशुतोष येऊन माहीच्या खांद्यावर थोपटत बोलला

त्याच्या आवाजाने माहीने मागे वळून बघितले...........

"त्यांचे पण जेवण असेल ना...... मी सोनिया मॅडम आणि  सरांना बोलवून आणते" .... म्हणत ती जायला निघाली

" माही एक मिनिट" ........ म्हणत आशुतोष ने  तिला एका कॉर्नरमध्ये नेले........ आणि अर्जुन आणि सोनियाचे आतापर्यंत झालेले  आणि मोडलेल्या  लग्न बद्दल  सगळं माहिला सांगितलं.....

" काय.....????." ...... माहीला  हे अनपेक्षित होते..

"हो हे खरं आहे,  सोनिया आणि अर्जुनने पुढे येऊन त्यांचं लग्न कॅन्सल केले आहे" .........आशुतोष

" काय ....??? अस कस होऊ शकते?......... सकाळीच तर मी सरांना बघितलं होतं,  ते तर पूर्ण तयार झाले होते" ......... माही आपल्या डोक्यात काहीतरी विचार करत होती....

"सोनिया मॅडम......त्या कुठे आहेत.......??? ... त्या ठीक तर आहेत...???"....... माही

" हो ठीक आहे ती....... ती पण तिच्या रूममध्ये आहे...... आतापर्यंत येथेच सगळ्या विधी बघत होती....... आत्ताच गेली".......आशुतोष

मी त्यांना भेटायला जाते आहे बोलून ती सोनियाच्या  रूममध्ये गेली.....

तिने दार नॉक केले..... आणि आतमध्ये गेली....... सोनिया खिडकीजवळ बाहेर बघत उभी होती...........

" सोनिया मॅडम...... तुम्ही असं कसं लग्न मोडू दिले.......???...... तुम्ही तर खूप प्रेम....... प्रेम करताना अर्जुन सरांवर?...... मग कसा तुम्ही हे लग्न मोडलं.......????नक्कीच अर्जुन सरांनी,  हो नक्कीच अर्जुन सरांनी काही म्हटलं असेल........ ते असे कसे करू शकतात....???.... माही थोडी चिडतच बोलत होती

माहीच्या आवाजाने सोनिया मागे वळली..... माहीला.... सोनियाच्या डोळ्यांमध्ये पाणी दिसले..... ते बघून माहीला  खूप वाईट वाटले......

" अर्जुन सर असे कसे करू शकतात?.. मी आत्ता त्यांना जाब विचारायला जाते " ....माही दार उघडून सरळ बाहेर निघाली आणि अर्जुनच्या रूम कडे जात होती.......

" माही , अग ऐक...... असं नाही आहे....पूर्ण ऐकून तर घे" ........सोनिया..... माहिला तसे रूम मधून निघालेले बघून सोनिया सुद्धा तिच्या मागे जात होती.....

माही या गोष्टींवर कशी रिऍक्ट करेल.... हाच विचार करत अर्जुन  काऊचवर बसला होता...... विचार करता करताच त्याचा डोळा लागला होता,  तो त्याचे दोन्ही हात त्याच्या डोक्याच्या मागे ठेवत सोफ्याला टेकुन झोपला होता...... त्याला झोप कधी लागली कळलेच नव्हते त्यामुळे डोअर लॉक करायचा तो विसरला होता..........

" सर तुम्ही असं कसा करू शकता....???.... तुम्ही हे लग्न मोडू कसे शकता.......???" माही दार नॉक न करताच,  दार उघडून सरळ आतमध्ये गेली होती....... बघते तर अर्जुन बसल्या बसल्याच झोपला होता......... कसलीतरी काळजी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट तिला दिसत होती....... बडबड करता करता  ती त्याला बघून शांत झाली............

"माही ऐकून तर घे ....त्याची काही चुकी नाही"....... बोलतच सोनिया तिच्या पाठीमागे  अर्जुनच्या रूम मध्ये आली होती.......

त्या दोघींच्या आवाजाने अर्जुनची झोपमोड झाली आणि डोळे उघडले तर माही आणि सोनिया त्याच्यापुढे उभ्या होत्या.....

"काय झालं सोनिया ...??..काय झालं माही........??"...... अर्जुन आळीपाळीने दोघींकडे बघत होता....

"काही नाही अर्जुन,  तू आराम कर" ........ सोनिया माहीचा  हात ओढत तिला बाहेर नेत होती.......

"It's okay Soniya , I am fine....... Mahi what happened..??...Any problem........??" ....... अर्जुन काऊच वरून उठत उभा होत बोलला......

माहीने सोनियाचा हाथ सोडला आणि   ती अर्जुन पुढे जाऊन उभी राहिली........आणि  त्याच्याकडे रागाने बघत होती....अर्जुनला सुद्धा आता कळले होते माही रागात आहे ते, बरेच प्रश्न तिच्या डोक्यात आहे...रागात तर आहेच पण त्याहून ही जास्त तिला वाईट वाटते आहे.............तो  तिच्याकडे शांततेने बघत होता....

" बोल माही" ......,...अर्जुन शांत पणे बोलला.....त्याला माहिती होते माही आता बरेच काही बोलेल......त्याला आता शांततेने तिला ऐकायचे होते, बोलून सद्ध्या तरी काही फायदा नव्हता ....कारण ती ऐकण्याच्या मुडमध्ये नव्हती.......तो शांतपणे तिच्या पुढे उभा होता..

" तुम्ही असे कसे लग्न मोडू शकता ...??..तुम्हाला कळतेय काय एका मुलीचे लग्न मोडणे किती वाईट असते?......तुम्ही दुसऱ्यांच्या मनाचा काही विचार कराल की नाही?..........का तुम्हाला हवे तसेच तुम्ही करत असता?.......सोनिया मॅम तुमच्यावर किती प्रेम करतात......त्यांना तुम्ही असे कसे दुखावू शकता?" ............

" माही, त्याने हे काहीच केले नाही आहे".........सोनिया बोलतच होती की अर्जुनने तिला डोळ्यांनीच शांत रहा म्हणून सांगितले..........आणि  परत माहीकडे बघत होता....

"तुम्ही असे नाही करू शकत.......कुणाचं लग्न मोडणे किती वाईट असते.......त्यांचं किती प्रेम आहे तुमच्या वर...... मला माहिती, मी बघितलं आहे.......का तुम्हाला कळत नाही आहे?..........का त्रास देता असे?......... तुम्ही.....तुम्ही प्रॉमिस केले होते.........you broke my promise......you broke...... I hate you..... I hate you"........... बोलता बोलता माहीचा  आवाज थोडा कापरा झाला होता.......

"माही..........listen."............. अर्जुन

"मला काहीच ऐकायचे नाही".......... माही ...आणि  ती परत जायला मागे वळली

"माही ऐक......तुझा गैरसमज होतो आहे".......सोनिया

"अर्जुन मला बोलू दे" ......अर्जुन मध्ये बोलणार तेवढयात सोनियाने त्याला थांबवले.....

"माही..... यात अर्जुनची काहीच चूक नाही आहे........मी लग्नाला नकार दिला आहे......मला कोणी काही बोलू नये म्हणून त्याने सगळ्यांपुढे त्याच नाव पुढे केले होते"............सोनिया

"सोनिया madam , पण असे अचानक लग्न मोडायला काय झालं....???.....हे काही बोलले  काय तुम्हाला....??....mam तुम्हाला तर त्यांचा स्वभाव माहिती आहे .....ते रागात असले की मनाला येईल ते बोलतात........तुम्ही त्यांचं बोलणं इतकं मनाला नका लाऊन घेऊ".......... माही

"माही , अर्जुन मला काहीच बोलला नाही, की तो माझ्यावर चिडला पण नाहीये" ..........सोनिया

"मॅम, मग काही प्रोब्लेम असतील तर बसून , डिस्कस करून सोडवा ना.........प्रत्येक प्रॉब्लेमला सोल्युशन असते, फक्त थोड शांततेने विचार करून , बसून सोडवावे लागते......तुम्ही मला सांगा....काय प्रोब्लेम झाला आहे?.......आपण...मी बोलते यांच्या सोबत, पण असं लग्न नका मोडू"..........माही विनवणीच्या सुरात म्हणाली

"माही,  अर्जुनचे माझ्यावर प्रेम नाही..........आणि त्याच माझ्यावर प्रेम नसतांना जबरदस्ती लग्न करने योग्य असेल काय?"............सोनिया

"मॅम तुमचं आहे ना त्यांच्यावर..... आणि  लग्न झाल्यावर त्यांना पण झालेच असते".......माही

"खरंच माही.....???".... सोनिया तिच्यावर नजर रोखत बोलली............

"ह....म्हणजे....." .......माहीला आता काय बोलायचं सुचत नव्हते.........तिने एक नजर अर्जुनवर टाकली.........तो खिशामध्ये हाथ घालून शांत उभा होता....

" या.....यांनी तुम्हाला काही सांगितले काय....???" .........माही

" माही,  सांगायलाच  हवं काय सगळं.....???.....त्याच्या डोळ्यात दिसतं ना माही सगळं.........की तो कुणावर तरी खूप....म्हणजे खूप प्रेम करतो........माही मला माहिती नाही तो का लग्नासाठी तयार झाला??......कदाचित त्याने हे लग्न निभावले पण असते......पण आयुष्यभर त्याला खूप त्रास झाला असता ग.......मला जे हवे आहे ते मिळाले असते........पण मी अर्जुनला त्रासात नसते बघू शकले.......माझ्या कडून तरी मी त्याला दुःख नाही देऊ शकत............माझं प्रेम इतकं स्वार्थी नाही ग" .......... सोनिया

अर्जुन तर अवाक होत सोनियाचे  बोलणं ऐकत होता........"किती बदलली सोनिया.....ही तीच सोनिया आहे जिला मी ओळखत होतो" ......त्याला पण विश्वास बसत नव्हता इतकी ती बदलली होती.......

माही सोनियाचे बोलणे फक्त ऐकत होती......प्रेमामध्ये माणूस किती बदलतो, सोनिया कडे बघून तिला जाणवत होते ....तिला तर कळत नव्हते सोनियाला काय बोलावे.........ती चूप झाली होती......तिचे  कधी सोनियाकडे, तर कधी अर्जुनकडे बघणे सुरू होते......

" हा....coming." ....... सोनियाचा फोन वाजला......त्यावर ती बोलत होती

" Guys will catch you later....need to go......and mahi don't blame Arjun" ......... बोलून सोनिया बाहेर गेली...

अर्जुन एकटक माहीकडे बघत होता....... त्याचं काहीही ऐकून न घेता ती फक्त बोलत सुटली होती....त्याला तिच्या बोलण्याचा राग तर आलाच होता पण त्याहून ही जास्ती तिचे तीन शब्द त्याच्या जिव्हारी लागले होते.....त्याला माहिती होते तिने ते रागात बोलले होते, तिच्यामुळे सोनियाचे  लग्न मोडले म्हणून तिला वाईट वाटत होते आणि  त्यातच ती ते बोलून गेली होती........पण त्याला ते ऐकून वाईट वाटले होते.......ते तीन शब्द I hate you...... हो हेच बोलली होती ना ती.......

माही इकडे तिकडे बघत होती......अर्जुन मात्र फक्त माहीवर नजर रोखत  बघत होता........ माही पण आता त्याच्याकडे बघत होती..........

"व्हॉट....???"........ अर्जुन

" सगळी तुमची चूकी  आहे......तुम्ही सोनिया मॅडमला मनावयाला हवे होते".........माही

अर्जुन प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता.......

"हो........तुम्ही समजावले असते तर त्या समजल्या असत्या" ...........माही

" माही........सगळं कळून सुद्धा  न कळल्या सारखे का करते आहेस ?.......आणि राहिले सोनियाला समजावयचे.....मी तुला कधीच कशासाठी फोर्स नाही केला.......जेव्हा की तू फक्त माझी आहेस मला माहिती असून.......आणि जर मी तुला फोर्स केला असता तर तू सुद्धा मला नाही बोलू शकली नसती.....तरी मी तुझ्यावर माझं म्हणणं नाही लादले....तर मी सोनियाला कसे काय फोर्स करणार होतो?.......तिच्या डिसिजनचा रिस्पेक्ट करायला हवा ना?".............अर्जुन

"पण....".......... माही

"माही..... please understand.... आपण कोणालाच लग्नसाठी जबरदस्ती नाही करू शकत"........

"सगळं तुमच्यामुळे ...फक्त तुमच्यामुळेच होत आहे........कोणी सांगितले इतके चांगले असायला.?"......माही,. माहीने  शेवटचे वाक्य हळू म्हटले होते....

अर्जुन तिच्याकडे एक भुवई उंचावून बघत होता......

" कट्टी " .....तिने  हाताचे सगळ्यात शेवटचे लहान कनिष्ठ  बोट लहान मुलांप्रमाणे त्याच्या पुढे हाथ करत बोलली......

" कट्टी.....???.... व्हॉट..??.… ही....अशी...कशी " ........ अर्जुन अजब नजरेने तिला बघत होता....

तिने एक तिरपी नजर त्याच्यावर टाकली आणि बाहेर जाण्यासाठी मागे वळली ...

"सर ssss .....माझी ओढणी सोडा" ..........पुढे जाता जाता तिची ओढणी खांद्यावर तिला ओढल्यासारखी वाटली होती.....

"व्हॉट??" ............ अर्जुन

" सर, मी तुमचा कुठलाच आगाऊपणा खपावून घेणार नाही"........ म्हणतच ती मागे फिरली .. ...तर अर्जुन तिच्याकडे बघत होता......ती परत काही बोलणार तेवढयात तीचे  लक्ष त्याच्या हातांकडे गेले....तो हाथ फोल्ड करून उभा होता......बाजूला बघते तर तिची ओढणी कपाटाच्या दारात अडकली होती........

"माही.... खाल्लीस माती.......... न बघताच कशी काय तू काही बोलू शकते?? ते पण यांना?" ....... माही बिचाऱ्या नजरेने अर्जुनला बघतच कपाट जवळ जात ओढणी काढत होती.....अर्जुनकडे बघत डोक्यात विचार सुरू होते, सगळं लक्ष त्याच्याकडे ......त्यामुळे तिची ओढणी निघत नव्हती.....तिची धडपड बघून आणि  तिचा तो बिचारा चेहरा बघून अर्जुनला हसायला येत होते.....

"Wait" ....... अर्जुन तिच्या जवळ गेला , तिच्या डोळ्यातच बघत त्याने तिची ओढणी काढली होती..........आणि  हातात पकडून ठेवली........

तो जवळ आलेला बघून माहीच्या हृदयाची  धडधड वाढली होती..,.....म्हणून ती थोडी त्याचा पासून दूर जाऊन उभी राहिली......

अर्जुनने तिची ओढणीला थोडासा झटका देत  स्वतः कडे ओढली.........अचानक असे झाल्यामुळे माही अर्जुनाच्या अंगावर जाऊन आदळली......... तिचं डोकं त्याच्या छातीवर आपटलं....आणि  तिच्या ओठांचा स्पर्ष त्याचा छातीवर झाला...,.......  तिचे मऊशार केस त्याच्या गालाला स्पर्श करत होते..........

आपण अर्जुनवर आदळलो आहे तिच्या लक्षात आले तसे ती त्याच्या दूर व्हायला गेली.,......तर अर्जुनने तिच्या कंबरेमध्ये हाथ घालत तिला अजून जास्ती जवळ घेतले आणि  घट्ट पकडले..........आणि  तिच्या डोळ्यात बघत होता.......ती पण त्याच्याकडे घाबरत  बघत होती................तो तिचा चेहरा मन भरून बघत होता......जेव्हा ही तिला बघायचा....त्याला फक्त तिला बघतच रहावेसे वाटत होते........तिला बघतांना त्याच मन कधीच भरत नव्हते.......,त्याच लक्ष तिचा ओठांकडे गेले........तिला पण कळले की तो तिच्या  ओठांना बघत आहे........ती डोळ्यांनीच त्याला नाही म्हणत होती........तिला तसे करतांना बघून त्याच्या चेहऱ्यावर  खट्याळ हसू आलं.......त्याने आपला हाथ तिच्या ओठाजवळ नेला आणि  तिच्या खालच्या ओठांना त्याच्या दोन बोटांनी काहीतरी करत होता..,..त्याच्या स्पर्षमुळे माहीला तर काही सुचत नव्हते....ती फक्त त्याच्याकडे बघत होती... ....तिचे  काही दोन तीन केस तिच्या ओठांना चीपकले होते .............अर्जुन तेच तिच्या ओठांवरून बाजुला करत होता...

"मी अजून काहीच आगाऊपणा केला नाहीये........नाहीतर ही जी तुझ्या ओठांची continue  हालचाल सुरू असते ना ......ती सुद्धा होणार नाही" ..........अर्जुन हळूवारपणे  बोलला

"ध......ध........धमकी देताय मला...???........माही कशीबशी त्याचाकडे बघत बोलली....

" ह्मम......धमकी तर धमकी समज..........आणि हो आता तू फक्त माझी आहेस........नी मी फक्त तुझा......आता तिसरं कोणीही मध्ये येणार नाही.......आणि आणायचं पण नाही......लक्षात ठेवायचं........हवं तर वॉरनिंग समज माझी"............अर्जुन थोड्या कडक आवाजात तिच्या भोवतालची  आपली मिठी घट्ट करत बोलला....

"तू....तू......तुम्ही मला काही करणार नाही आहात??"............माही घाबरतच त्याच्या डोळ्यात बघत बोलली

"तुला काही करायला तू मोठी तर व्हायला  हवी.......तू तर मिरा पेक्षा पण लहान आहेस" ........अर्जुन तिच्याकडे मिश्किलपणे बघत होता.........
तिला घाबरलेले बघून त्याला खूप गंमत  वाटत होती.......

"सोडा मला"...,.... माही

त्याने त्याची मोठी सैल केली...

"हॉsss.....सोडलं पण.......एका म्हणण्यात? " ..........माही विचार करत होती

" का.....नको होत काय सोडायला.......???" .....अर्जुनने तिच्या मनातले ओळखले होते

"हा.!!"..,..ती डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती.......बघता बघता तिचे  लक्ष त्याचा शर्टवर गेले.......तिथे तिला lips shape लिपस्टीकचे निशाण  दिसले.......

" हा तर सेम मी लावलेला शेड आहे" ........मग तिला आठवले जेव्हा त्याने तिची ओढणी ओढली होती तेव्हा ती त्याच्या अंगावर जाऊन पडली तेव्हाच तिच्या ओठांचा स्पर्श झाला होता.........

" घ्या आता परत बोलणी खा" ......तिने लगेच तिच्या ओढणीचे  एक टोक  पकडले आणि  त्याचा शर्ट्वरचे लिपस्टिकचे निशाण  पुसायला   लागली..........

ती अशी का करतेय म्हणून त्याच सुद्धा लक्ष त्याचा शर्ट कडे गेले........आणि  मग त्याला आठवले तिच्या ओठांचा स्पर्श त्याच्या छातीवर झाला होता......

ती ते पुसत असताना त्याने तिचा हाथ पकडला.......

"Leave it"............ अर्जुन

तुम्ही रागावू नका.....मी स्वच्छ करते" .............माही

"It's very cute.,.....leave it" .......... अर्जुन

"सर तुम्ही पागल झाला आहात.........लोकांचं लग्न मोडते तर ते दुःखी होतात.........तुम्ही पागल झालात" ...........माही

"ह्मम.........तुझ्यामुळे"..............परत त्याने मस्करी केली

" हे खरच पागल झाले आहे......माही निघ इथून".........तिने त्याचा हातातून आपला हाथ सोडून घेतला आणि  तिथून धूम ठोकत  पळ काढला........

"वेडं आहे हे कार्टून " ............. अर्जुन

"असे व्हायला नको होते......हे लग्न व्हायला हवे होते.......मला कळते आहे सोनिया madam बोलल्या ते बरोबर आहे......पण त्यांच्या शिवाय दुसरं कोणीच अर्जुन सरांसाठी अनुरूप नाहीये..........मी......मी कसं ..,..मी कसं लग्न करू शकणार आहे त्यांच्या सोबत??..,....आणि केलेच तरी त्यांच्या घरचे , ते मला accept नाही करतील...........पण मग सर बिना लग्नाचे नाही राहू शकत, जीवनसंगिनी तर हवीच...........देवा का रे इतकी परीक्षा बघतो??.....सगळं छान सुरू होते.......हे मध्येच काय केले तू??.......... माही तुला आता सरांपासून  दूर राहावं लागेल.........आता तर त्यांना थांबवेल असे काहीच कारण उरले  नाही ........ माही तू ऐकले नाही का आता, ते काय बोलले??............खूपच गोंधळ करून ठेवला देवा तू.......आता काय करायचं?" ..........माही आपल्याच विचारात खाली जात होती...

"माही.....आता काही झाले तरी तुला माझ्यापासून कोणीच वेगळं करू शकत नाही..............तुला सगळं कळतेय.,...पण तुला का ते वळत नाहीये, पटत का नाहीये...........पण आता बास झालं.............आता तू फक्त माझी आहेस आणि  माझ्या जवळच असणार आहेस..,......आता मी तुला स्वतःपासून वेगळं होऊ देणार नाही, and it's a promise "..............अर्जुन आरसा समोर उभा होत त्याचा शर्टवर lips चे निशाण बघत मनातच बोलत होता....

*******
क्रमशः

*******

" बापरे sss .... किती तो आनंद अर्जुनचे लग्न मोडण्याचा ...????????

आपल्या सगळ्यांच्या साथीने आज कथेचे 50 भाग पूर्ण झाले आहे.....अशीच आपली साथ आणि प्रोत्साहन असू द्या...

भरभरून प्रेम, कॉमेंट्स आणि लाईक्स साठी आपल्या सगळ्यांची आभारी आहे....
धन्यवाद !!!

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️