Jan 27, 2022
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 49

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 49

भाग 49

 

" Love you sweetheart " ........ अर्जुन जाणाऱ्या माही lकडे बघत मनातच बोलला....

 

माही जाता जाता जागीच थबकली.....  मागे वळून बघितले आणि अर्जुनकडे बघत  गोड स्मायल केले......... दार उघडून बाहेर आली......आता मात्र तिला तिच्या भावना कंट्रोल होत नव्हत्या....हळू हळू चालता चालता तिची स्पीड आता वाढत होती.......ती एका हाताने डोळे पुसत जात होती....पण डोळ्यातले पाणी थांबायचं नाव च घेत नव्हते ......तीच मन खूप भरून आले होते......ती पळतच एका साईड ला असलेल्या ओपन टेरेस मध्ये गेली.......तिथं एका कोपऱ्यात जाऊन शेवटी ती जोराने रडली........

 

"सॉरी अर्जून........मला माफ करा.......माझ्यामुळे तुम्हाला किती त्रास होतोय कळते आहे मला.....पण मला तुमच्या पासून दूर जावं लागेल......तुमच्या समोर राहील तर वारंवार तुमचं मन दुखावत राहील.......माझ्यामुळे  तुमच्या सांसारिक आयुष्यावर  फरक पडू शकतो......मला हे नको आहे ....मला तुम्ही तुमच्या married life मध्ये खूप खुश हवे आहात......म्हणून मी हा निर्णय घेतला आहे ......तुम्हाला नाही आवडणार मला माहिती होते, पण तुम्हाला न सांगता कशी जाणार होते??.......... सॉरी अर्जुन पण काय करू नही राहू शकत मी तुमच्या शिवाय........तुम्ही मला समोर दिसाल तर नाही कंट्रोल करू शकत मी माझ्या भावना........माझ्यामुळे मला तुमच्या आयुष्यात आता कसलेच प्रॉब्लेम नको आहेत" ..........माही रडत रडतच बडबड करत होती......आणि  आपल्या हाताने डोळे पुसत होती.........तिने तिथे मन मोकळं पणे रडून घेतले.........तिला आता थोड बर वाटत होते.......

 

"माही .....मला माहिती होते तू आपल्या बंगलोरच्या ब्रांचला शिफ्ट व्हायचं प्लॅन करत होती ते......खर तर मला नको हवे होते तू कुठेही गेलेली.....मला तू माझ्या डोळ्यांसमोर हवी होती.......तेवढेच मला समाधान असते......पण दोन दिवसांपासून मी तुला बघतोय , खूप त्रास होतोय तुला.....मी समोर असलो की जास्ती होतो.....मला नाही बघवत तुला त्रासमध्ये..... काल रात्रीच ॲप्रोव केले आहे मी तुझी ट्रान्स्फर.........पण तरीही मन मानत नाहीये ग.......मी नसतो  हो म्हणालो तरी तू गेलीच असती मला माहिती आहे ......माझ्या आणि सोनियामध्ये काही प्रॉब्लेम्स येऊ नये म्हणून तू हे सर्व करतेय........इतका त्रास होतोय तुला, बघू शकतो आहे मी" ..........अर्जुन,

 

त्याचा बाल्कनी मधून ते टेरेस दिसत होते.....तिथून ती माहीला बघत होता...........तिला रडतांना बघून त्याला तिच्या जवळ जावसे वाटले होते.....पण मग त्याने स्वतःला कंट्रोल केले..........तीचे  तिला स्वतहाला सावरू द्यावे , तिला तिचा वेळ घेऊ द्यावा.....म्हणून तो इथूनच दुरून ती ठीक आहे की नाही बघत उभा होता......

 

रडल्यामुळे माहीला आता बरेच हलके,  मोकळे वाटत होते.......तिने डोळे पुसले, स्वतःचा अवतार ठीक केला आणि  खाली लग्न मांडावा मध्ये गेली....

 

एकाच दिवशी जरी लग्न असले तरी आकाश आणि अंजलीच्या लग्नाचा मुहूर्त आधीचा म्हणजे सकाळी 9 वाजता  होता........आणि अर्जुन सोनियाच्या लग्नाचा मुहूर्त 11.30 चा होता....त्यांच्या नावा प्रमाणे दोघांचे मुहूर्त वेगळे निघाले होते..........

 

सगळे खाली मांडावामध्ये जमले होते.......नाचत गाजत आकाशची वरात निघाली होती.....आकाश घोडीवर बसला होता... तो पण एकदम राजबिंडा दिसत होता.....पुढे मामा, मामी, श्रिया, अंजली, आशुतोष आणि  बाकी सगळे  धमाल नाचत होते......

 

अर्जुन मात्र त्याच्याच रूममध्ये होता......तिथूनच खिडकीतून तो आकाशची वरात बघत होता........

 

दारात आत्याबाई, आई, माही आरतीचे ताट घेऊन उभे होते.........

 

आज मेरे यार की शादी है

 

आज मेरे यार की शादी है

 

यार की शादी है मेरे

 

दिलदार की शादी है

 

आज मेरे यार की शादी है

 

आज मेरे यार की शादी है

 

लगता है जैसे सारे

 

संसार की शादी है

 

आज मेरे यार की शादी है

 

आज मेरे यार की शादी है

 

नाचता नाचता श्रियाने येऊन माहीचा हाथ पकडून तिला नाचायला  घेऊन गेली.....मिरा पण रुही सोबत नाचत होती......आधी माही नाही म्हणत होती, पण अनन्या श्रियाने तिला जबरदस्ती  ओढलेच....आणि मग तिने पण त्यांना जॉईन  केले..

 

आशुतोष तर फुल टपोरी डान्स करत होता.....मस्तीच्या मूडमध्ये माही पण त्याला जॉईन झाली....तिने पण डोळ्यांवर गॉगल चढवला सेम टू सेम आशुतोष सारखा....आता दोघांच्या ही अंगात आकाशचे लग्न  खूप आले होते.....नागीण डान्स काय, पैसे उडवायचा स्टाईल काय, भांगडा काय..........माही सगळं टपोरी स्टाईल मध्येच करत होती......तिच्या चेहऱ्यावरचे भाव पण पूर्ण टपोरी झाले होते......आशुतोष अनन्यावर पैसे उडवायची स्टाईल करत होता तर माही श्रियावर.........अर्जुन वरतून हे सगळं बघत होता.....आणि  माहीला बघून त्याला हसू आले........

 

"कार्टून"..............अर्जुन पुटपुटला........

 

आकाशचे औक्षण करण्यात आले ,  त्याच्या सोबत सगळे आतमध्ये आले..........आकाश स्टेजवर जाऊन उभा राहिला.......समोरून माही अंजलीला घेऊन येत होती......आकाश तर नेहमीच प्रमाणे अंजलीला बघून आ फडूनच हँग झाला होता.........अंजली खूप सुंदर दिसत होती.....लाल काठाचे पिवळा केसरी आंबा  रंगाची नऊवारी त्यावर काठा सारखाच रेड मरून शेडचा शेला घेतला होता.....पारंपरिक सोन्याचे दागिने, नाकात नथ, केसांचा आंबडा , त्यावर गजरे.....साजेसा मेकप ....खूप सुंदर दिसत होती ती.........

 

"आकाश तू ना ...पूर्ण इज्जतीची  वाट लावतोस यार. जरा सभ्य मुलासारखा वाग, तू नवरदेव आहेस ....सगळे तुझ्याच कडे बघत आहेत" ........अनन्या त्याच्या हनुवटीला खालून हाताने वर करत म्हणाली......

 

"ह..??"..........आकाश

 

"साहेब तुमचीच होणार आहे ती.....जरा धीर धरा...नी समोर बघा"........आशुतोष

 

आकाशने मान वळवली...... आंतरपाट धरण्यात आले.....पलीकडल्या बाजूने अंजली येऊन उभी राहिली.....आणि मंगलाष्टकं सुरू झाली.........

 

कुर्यात सदा मंगलाम , सावधान..............सनई चौघडा वाजयाला सुरुवात झाली.......अंजलीच हृदय धडधडाया लागले.......... आंतरपाट निघाला...... फायनली आकाशला अंजलीला जवळून बघायला मिळाले........अंजलीला  तर काहीच सुचत नव्हते....तिने आकाशकडे बघितले....त्याने तिला छानसी स्मायल देत डोळ्यांनीच आश्वस्त केले........त्याला बघून अंजलीला बरे वाटले......दोघांनी एकमेकांना फुलांचे  हार घातले..........आकाश तिलाच बघत होता.......ती मात्र लाजून खाली बघत होती......

 

" गेला....गेला.....माझा मुलगा..........माझ्या हातातून....... ती चुडेल आता त्याला आपल्या मुठीत ठेवेल".......मामी दुःखी स्वरात बोलत होती

 

" सासूचा गुण घ्यायला नको का?" .....मामा

 

सगळे हसायला लागले........

 

"तुम्ही......तुम्ही थांबाच, बघते तुम्हाला नंतर" ........मामी तोंड फुगौन निघून गेली...

 

नंतर होमहवन, कन्यादान, सप्तपदी ...पार पडले.......आशुतोष आणि अनन्याने कन्यादान केले.......... लग्न अगदी छान संपन्न झाले......

 

वधूवराने सर्व मोठ्यांना नमस्कार करून सगळ्यांचा आशीर्वाद घेतला..........

 

*********

 

"काय..........??? लग्न नाही करायचे म्हणजे.....?? लग्न म्हणजे काय तुम्हाला खेळ वाटला काय?.......आधी म्हणायचे करायचे.......आता नाही.....ते  पण हे असे  वेळेवर ,जेव्हा सगळे बाहेर वाट बघत आहेत ? " .........आजी चिडली.....बाकी मोठेपण काळजीने बघत होते.........

 

घरातले फक्त....आजी, आई, मामा, मामी, सोनियाचे आई वडील.. सगळे एका रूममध्ये जमले होते.....तिथे अर्जुनने सगळ्यांना सांगितले....की ते दोघं लग्न करत नाही आहे.....म्हणून सगळे चिडले होते....

 

" आजी , तुम्ही त्याला नका रागावू.......खरतर हा माझा निर्णय होता......त्याने माझ्या निर्णयाला होकार दिला आहे " .....सोनिया

 

"सोनिया......बेटा...... असं अचानक काय झाले आहे की तुम्ही अचानक असा निर्णय घेत आहात?" ........सोनियाचे बाबा

 

" Dad.......मला अस वाटतेय की मी आणि  अर्जुन नवरा बायको  म्हणून सक्सेसफुल होऊ  शकत नाही"  .........सोनिया

 

" आणि तुला हे आता कळत आहे.......लग्नाच्या दिवशी?" ......सोनियाची आई चिडत बोलली

 

" हे बघा तुम्ही चिडू नका....तिचा एकटीच दोष नाही यात.....मी पण आहो" .......... अर्जून

 

" अर्जून.......हे काय ...हे काय ऐकतेय मी?......लग्न म्हणजे तुम्ही लहान मुलांचा खेळ समजले काय,  मनात आले तेव्हा करायचं आहे ,मनात आले तेव्हा नाही करायचं?" ......नलिनी अर्जुंची आई

 

" हे बघा चिडू नका.....आपण बसून विचार विनिमय करून मुलांचा प्रॉब्लेम सॉलव करू" .......सोनियाचे बाबा

 

" Dad......आमचा निर्णय झाला आहे" ..........सोनिया

 

"मी बाहेर हे लग्न होणार  नाही आहे , हे सांगायला चाललो आहो....."...अर्जुन

 

" अर्जूनsss" ..................नलिनी

 

" आई....this is final..... no more questions" ...... अर्जुन थोड्या कडक आवाजात बोलला....तसे सगळे चूप झाले........जे कारण सांगितलं होते त्यावर कोणाचा विश्वास बसत नव्हता........पण अर्जुनपुढे कोणाला बोलायची हिंमत होत नव्हती......

 

थोड्या वेळ पूर्वी.........

 

अर्जुनाच्या रूमचे  डोअर नॉक झालं..

 

" Come in" .......... अर्जुन खिडकी मधून आकाशची वरात बघत होता....

 

"किती funny  आहे ना माही" ..............

 

" हो" ...........अर्जुन, आणि अचानक त्याचा लक्षात आले आणि त्याने बाजूला बघितले तर सोनिया उभी होती....

 

" सोनिया तू इथे?.......आणि हे काय तू तयार नाही झाली?" ........अर्जुन अवाक होत तिच्याकडे बघत होता...

 

"तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट द्यायला आले"..........सोनिया

 

"काय....??? अग ते नंतर पण देऊ शकतेस, आता थोड्या वेळात मुहूर्ताची वेळ होईल... बोलावणं येईल....आणि तू अजूनही तयार झाली नाही आहेस..."........अर्जुन

 

" पडला ना प्रेमात.....???....finaly the Arjun Patwardhan is  in love" .......... सोनिया त्याचाकडे बघत बोलली....

 

" सोनिया.............,. आपलं लग्न आहे आता......हे काय बोलते आहे तू?........जा तयार हो" .......अर्जुन

 

" अर्जुन तुला माहिती .....मला नेहमीच तुझ्या डोळ्यात प्रेम बघायचे होते......जसे माझ्या डोळ्यात आहे तुझ्यासाठी........आणि तुला माहिती मला  तुझ्या डोळ्यात प्रेम दिसले, पण " ..............सोनिया

 

अर्जुन प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता.....

 

" तुझ्या डोळ्यात मला खूप प्रेम दिसतय.......मी तुझ्यावर करते कदाचित त्या पेक्षा ही जास्ती..........पण माझ्या साठी नाही.....तुझे प्रेम माझ्यासाठी नाही.....कदाचित दुसऱ्या कोणासाठी"......

 

" सोनिया, आपलं लग्न होणार आहे हेच खर आहे आता" .......अर्जुन

 

" अर्जुन तुला माहिती , आधी तू मला हवा होता, तुला मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार होती....आजीचा स्वभाव बघता तू आणि  मी गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आहोत ,  त्यांच्या कानावर जाईल याचा  मीच प्लॅन केला होता.......पाहिले मी बदलायच नाटक करत होते पण नंतर तुझ्या घरच्यांच्या प्रेमामुळे आणि माही....येस माहीनी मला खूप मदत केली.........आणि नंतर खरंच मनापासून मी बदलत गेले, मला सगळं आवडायला लागलं" ........सोनिया

 

" ठीक आहे ..........तू एक चांगली मुलगी आहे..........जा आता तयार हो" ........अर्जुन

 

" अर्जुन मला माहिती नाही तू का लग्न करतोय.....पण मला असे वाटते तू जिच्यावर प्रेम करतो तिच्या सोबत लग्न करायला हवे" .......सोनियाचा आवाज कापरा झाला.....

 

" सोनिया.....

 

" Let me finish Arjun......... मला माहिती आहे तू माहीवर प्रेम करतो, खूप प्रेम करतो........त्या दिवसापासून मला डाऊट होता ज्या दिवशी आपल्या लग्नाची डेट फिक्स झाली........मी बघितले होते तुझ्या डोळ्यातले प्रेम........नंतर तू मिराला प्रपोज केले तेव्हा....ते मिरासाठी नसून माहीसाठी होते......दिवाळी पाडवाला माहीला आग लागली.......तू तुझ्या जीवाची परवा न करता तिला वाचवत होता.......तिला गमवण्याच दुःख दिसले होते मला तुझ्या डोळ्यात......तुझं टेरेसवर आपण सगळे असताना 'जग घुमेया थारे जैसा ना कोई '  साँग म्हणताना तुझ्या डोळ्यात आलेले पाणी , जे तू शिताफीने गॉगलच्या मागे लपवलं......त्या दिवशी तुला आवडत नसतांना पण माहीच्या हातचा चहा घेतला तू ........सगळं मी बघत होते....मला कळत होते......पण मन मानायलाच तयार होत नव्हते........मला तुला गमवायची खूप भीती वाटत होती......मी सगळं कळून पण नकळल्या सारखे करत होती.........लग्न झाल्यावर सगळं ठीक असेल असाच विचार करत होते..........पण इथे लग्नाला आल्यापासून तुझ्या डोळ्यात मला खूप वेदना  दिसतंय रे........तुला होणारा त्रास दिसतोय.........नाही बघू शकत आहे रे मी तुला त्रासामध्ये"....

 

"तुला माहिती जेव्हा माही तुझ्या आसपास असतो ना तू तुझा नसतो , तू  खुश दिसतो..... तू हसतो.......तू खळखळून हसतो........तुला तसेच हसतांना बघत रहावेसे वाटते.....माझ्यासोबत पण तू असा कधीच नव्हता........खूप आनंद होतो मला तुला  असे आनंदी बघून.......कित्येक वर्षात तुला मी हसतांना बघितले नव्हते....... काल संगीत मध्ये  तू मला हसतांना दिसला , मनापासून.,.....म्हणून मला वाटते तुला तीच मिळायला हवी जीच्यासोबत तू खुश आहेस" ............सोनिया

 

तिचे बोलणं ऐकून अर्जुन चेअरवर बसला.....तो ब्लँक झाला होता....त्याला कळतच नव्हते काय करावं.........

 

" अर्जुन,  तू आधी माझ्यावर प्रेम नव्हता करत, मला काहीच प्रॉब्लेम नव्हता........तेव्हा तू दुसऱ्या  कोणावर प्रेम नव्हता करत........त्यामुळे कधीतरी तू सुद्धा माझ्यावर प्रेम करशील ही होप होती......पण ती आता नाही........म्हणून मी हे लग्न नाही करू शकत." ......

 

" सोनिया.....अग सगळ्यांना माहिती आहे आपल लग्न होते आहे.......हे असं अचानक........कोण काय म्हणेल?" .......अर्जुन

 

" अर्जुन,  तुला कधी पासून कोण काय म्हणेल किंवा लोक काय म्हणेल असे प्रश्न पडायला लागलेत?" .......सोनिया

 

" ते आता पण पडत नाही......पण तू सोनिया?" ......अर्जुन

 

" अर्जुन प्रेम म्हणजे घ्यायचे नाही....द्यायचे असते.......हो ना.....??" ...सोनिया अर्जुनाच्या डोळ्यात बघत होती

 

अर्जुन फक्त तिच्याकडे बघत होता, त्याच्या जवळ तिला द्यायला उत्तर नव्हते.....तो पण तर तेच करत होता ना .....

 

"मला माहिती नाही,  माही का तुला ॲक्सेप्ट करत नाही आहे...........ती का तुझ्यापासून दूर जाते आहे , मला नाही माहिती.......पण तिला एक ना एक दिवस तुझं प्रेम कळेल मला विश्वास आहे." ........

 

" सोनिया......पण तू .....तुझं लाईफ..........मी स्पॉइल केले तुझे लाईफ" ........अर्जुन निराश होत बोलला

 

" नाही अर्जुन........तू माझं लाईफ अजिबात स्पॉइल नाही केले आहे.........तू मला खरं प्रेम करणे शिकवले आहे........ तुझ्यामुळे मला थोड्या दिवस का होईना पण परीवराचे  प्रेम मिळाले ......परिवार काय असतो ते कळले......माझे आई बाबा तर नेहमीच बिझनेस , टूर्स, बाहेरच असायचे , एका आयाने मला मोठ केले......पाहिजे ते मिळालं पण परिवार नव्हता मिळाला  कधी......तुझ्यामुळे मला तो मिळाला आहे........माही सारखी खूप गोड मैत्रीण.....तिच्यामुळेच तर मला आयुष्यातले हे सगळे विविध रंग अनुभवायला मिळाले  आहे........माझं आयुष्य नव्याने सुरुवात होते आहे.....माझा लाईफकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.,.......आणि मला पण माझ्यावर प्रेम करणारा भेटेलच ना .........आणि मी इथे नाही राहणार आहे......मी लंडनला जायचा प्लान केलंय.......माझं राहिलेले एज्युकेशन मी पूर्ण करणार आहे......so don't feel  guilty" ......... सोनिया

 

" सोनिया ...... मला नाही कळत आहे मी काय करू"........अर्जुन

 

"अर्जुन,  एकच करायचे आहे,  बाहेर जाऊन सगळ्यांना सांगायचे आहे की आपण हे लग्न कॅन्सल केले आहे ते......

 

" Sorry Soniya" ........... अर्जुन

 

" Oh wow.... चक्क अर्जुन पटवर्धन सॉरी बोलतोय.......प्रेम माणसाला बदलून टाकते ना" ........सोनिया

 

"हमम."......दोघे बाहेर आले......

 

आकाश,  अंजली, आशुतोष,  अनन्या , श्रिया....अंजलीची आई आत्याबाई ....यांना कोणालाच आतमध्ये काय चाललं आहे माहिती नव्हते....सगळे बाकीचे प्रोग्रॅम्स एन्जॉय करत होते....... माहीला तर अर्जुनचे लग्न बघावल्या  गेले नसते म्हणून मिराला झोप आलीय बहाणा करून ती वरती रूममध्ये गेली होती.......

 

"Ladies and gentlemen......may have attention please" ......... अर्जुन स्टेजवर उभा होता....

 

त्याचा बाजूला सोनिया उभी होती.......

 

"आज इथे फक्त एकच लग्न होत आहे आकाश आणि अंजलीचे.......आमचं लग्न काही पर्सनल रिझंसमुळे होत नाही आहे.......तुमचा वेळ घेतल्या बद्दल माफ करा....... आकाश आणि अंजलीला आपले blessings द्या आणि लग्न एन्जॉय करा".........अर्जुन

 

अर्जुनच्या या बोलण्या ने सगळे डोळे मोठे करत बघत होते....सगळे शॉक झाले होते.........कोणाला काय चालले आहे काहीच कळत नव्हते.........

 

"See I told you....... miracles होते हैं साले सहाब".........आशुतोष मनातून खूप खुश झाला होता....

 

अर्जुन फक्त त्याच्याकडे बघत होता.....

 

"ये हसणं बाबा आता तरी.....इतकी छान न्यूज दिली आहेस तू"...........अशितोष

 

"छान न्यूज.....???....आशुतोष.....???....अर्जुन हे काय.....काय करतोय तू?"......अनन्या

 

"ताई नंतर सांगतो......आता नको".......अर्जुन

 

अर्जुन इकडे तिकडे बघत होता........

 

"तू जिला शोधतोय ती इथे नाही........तुझं लग्न होतांना कशी बघू शकणार होती ती?" ...........आशुतोष

 

" पण काय पण म्हण बाबा.....पोरगी एकदम सॉलिड निवडली आहे तू...........नाहीतर हा ड्रॅक्युला नेहमी फक्त फुत्करायाचा"  .......आशुतोष

 

अर्जुनने आशुतोष ला एक लूक दिले....

 

" Thank you म्हणून यावं सोनिया मॅडमला "........अर्जुन त्याला बघतोय बघून आशुतोषने तिथून कल्टी मारली.....

 

आकाश आणि  अंजलीचे राहिलेले लग्नाचे काही विधी कार्यक्रम  सुरु होते....

 

अर्जुनच्या मात्र डोक्यात माही कशी react करेल हेच सुरू होते..........कारण ती सहजासहजी  ही गोष्ट मान्य करेल... त्याला वाटत नव्हते....

 

********

 

क्रमशः

 

नमस्कार मित्रांनो

 

Hope तुम्हाला हा पार्ट आवडला असेल.....

 

अर्जुन आणि सोनियाचे लग्न होत नाहीये........ माही आणि अर्जुनचे  काय होते हे बघुया पुढे......

 

भाग कसा वाटला नक्की सांगा.....

 

कथेला भरभरून प्रेम दिल्या बद्दल खूप खूप धन्यवाद

 

काळजी घ्या, आनंदी राहा

 

Thank you

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️