तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 48

माही अर्जुन

भाग 48

संगीत कार्यक्रमची  हॉलमध्ये सगळी सोय केली होती...सगळे हॉलमध्ये जमा होत होते.....

अर्जुन तयारी करतच आता सोनिया येऊन गेली ते आठवत होता....तिच्या समोर आपण तिला माही म्हणून हाक मारली.........तिला वाईट वाटले असेल याचेच तो विचार करत होता.....सोनिया  नी आपले उद्या लग्न होणार आहे आणि म्हणून तिला आपल्या बद्दल माहिती असायला हवे असे त्याला वाटत होते, पण माहीला दिलेल्या प्रॉमिसमुळे काय करावं त्याला कळत नव्हते.......जरी माहीच नाव नाही पण आपण कुणावर तरी प्रेम केलेय ते तरी सोनियाला कळायला हवे असे त्याला वारंवार वाटत होते........आणि आज तिच्यासोबत बोलायचं विचार करतच तो सोनियाचा रूम मध्ये गेला......

" सोनिया." .........अर्जुन

" हा.......झाला तू तयार, चल जाऊया खाली, मघापासून दोन तीनदा बोलावणं येऊन गेले" ............सोनिया

" सोनिया मला तुला काहीतरी सांगायचं." .....अर्जुन

अर्जुनचा या वाक्याने सोनियाचा हृदयाची धडधड वाढली.............ती विचार करतच होती की तेवढयात परत सोनियाची कझिन त्यांना आवाज द्यायला आली...

" हो रेवा...येतोयच" .........सोनिया

" अर्जुन सगळे वाट बघतात आहेत...... चल जाऊया" ......सोनिया

" सोनिया मला महत्वाचं काही बोलायचं आहे......ऐक माझं थोड" ........अर्जुन

" अर्जुन उद्या लग्न आहे.......आता कार्यक्रमाची धावपळ सुरू आहे ......आता नको, लग्न होऊन जाऊ दे मग आरामात बोलूया" ........सोनिया ,कदाचित तिला कळलं होत अर्जुनला काय बोलायचं.......तिला ते आता नको होते बहुतेक आणि म्हणूनच ती त्याला टाळत होती...

अर्जुनचा नाईलाज झाला.....आणि ते दोघं हॉलकडे जायला निघाले....

" आ sssss................. धडsssम."..........माही ओरडतच मागे बघत पुढे पळत येत धडकली.........
 

पडायच्या भीतीने तिने डोळे बंद केले ..........नी कुणाची तरी कॉलर तिच्या हातात आली होती,  ती तिने घट्ट पकडली होती.......

"हा हा हा हा.." ....छोट्या मुलींचा हसायचा आवाज येत होता.........सोबत त्यात एका मोठ्या मुलीचा पण आवाज मिक्स झाला होता.........आवाजाने माही भानावर आली आणि तिला कळले की आपण पडलो नाही आहो......कोणीतरी तिला कंबरतून धरून ठेवले आहे ......तिने हळूच एक डोळा उघडला ...तर समोर अर्जुन......तो हसतोय असं तिला जाणवले.....तिचे ओठ रुंदावतच होते की....ती परत ओरडायला लागली......नी तिथेच उड्या मारायला लागली.....

" Sh sss........ काय झालं ओरडायला...????.." .... तिला सरळ उभ करत अर्जुन बोलला, पण ती ऐकते कुठेय, मागे बघत होती नि ओरडत होती....

" मनिमाऊ पडलंय तिच्या मागे." ........ रूही जोरजोराने हसायला लागली.....तिच्या सोबत मिरा पण....

जशी मागून ती मांजर परत म्याव म्याव करत माही जवळ आली , तसे माही घाबरतच डोळे मिटत दोन्ही हातांनी अर्जुनची कॉलर पकडत घाबरून  त्याच्या शर्टमध्ये आपलं चेहरा खुपसत  होती.......अर्जुनला हसायला पण येत होते....पण ती घाबरली आहे बघून त्याने त्याच हसू कंट्रोल केले नी एक हाथ तिच्या डोक्यावरून घेत तिला जवळ घेतले........

रुही नी मिरा त्या मांजरी ला हड हड करत होते.......

" सॉरी म्याम, सॉरी सर" .........एक कर्मचारी येऊन मांजरीला हातात उचलून घेतले .....

अर्जुनला तर त्या कर्मचाऱ्यावर खूप ओरडायचे मन करत होते, पण त्या मांजरी मुळे माही त्याचा कुशीत होती.....तीच जवळ असणे तो अनुभवत होता.....म्हणून मग तो काही बोलला नाही....

" It's okay, make sure this should not happen again." ........ अर्जुन

" Yess sir.." .... आणि तो मांजरीला घेऊन तिथून निघून गेला....

" माऊ गेली ती म्याव" ...........मिरा

माहीने डोळे उघडले..........काही बोलणार तेवढ्यात तिला  अर्जुनचा बाजूला सोनिया दिसली ....सोनियाला बघून तीने  झटकन अर्जुनचा कॉलर वरून हाथ काढला नी त्याचा दूर झाली......

" सॉरी."........ माहि मान खाली घालून बघत होती...

" तस.....काय झालं होत...??? पण काही म्हण हा मिरा, तुझी माऊ आणि ती म्याव सारख्याच होत्या नाही काय?" .......... माहीच सोनियाला बघून आलेला  अवघडपना घालवायला अर्जुन  बोलला

माहीने एका डोळ्याने अर्जुनकडे बघितले.....

" अरे मामा.......ती म्याव बाहेर होती......माहीचा पाय पडला तिच्या शेपटीवर, तीच लक्षच नव्हते......मग ती म्याव हिच्या मागे लागली आणि ही घाबरली......आम्ही तिथे बसलो होतो....ही काहीतरी काम करायला गेली होती....".... रुही

सोनिया , मिरा,  रूही पोट धरून हसत होत्या.......

" आता मला वाटते भीती , मी काय करू?"......माहीचा रडवेल्या घाबरट चेहरा होता

" माही तू मिरा पेक्षा पण लहान वाटते आहेस आता" .......सोनिया

हा हा हा हा.... परत त्या हसायला लागल्या......

" शी बाबा आजचा दिवसच खराब आहे.......या मांजरीला पण मलाच त्रास द्यायचा होता....." ......माही लहानसे तोंड करत तिथून निघून गेली.....

" बरं आता हसतच राहणार की चलणार पण, उशीर होत आहे ना" ......अर्जुनने मिराला कडेवर उचलले नी सोनियाने रुहीचा हाथ पकडला आणि संगीत होते तिथे आलेत....

सुरुवातीला श्रिया आणि सगळे कझिन मिळून धमाकेदार डान्स करत सुरुवात केली....

नंतर आशुतोषने हातात सूत्र घेतले....
आशुतोष नी अनन्याने कार्यक्रमाला सुरुवात केली.....

" सुनोजी दुल्हन एक बात सुनोजी, अपने नये परिवार से मिलोजी
तुम्हे मिलाए सबसे आज, सुनो सुनाए सबके राज
है तुम्हे मिलाए सबसे आज, सुनो सुनाए सबके राज"

आजी पासून श्रिया पर्यंत एक एक करून त्यांची अक्टिंग करत त्यांची ओळख करून देत होते.....

आता वेळ आली आकाशची.....श्रिया हातात एक डायरी घेऊन आली नि त्यात लिहिलेल्या शायरी आणि फोटो दाखवत होती......

मैं शायर तो नहीं
मैं शायर तो नहीं
मगर ऐ हसीं
जब से देखा मैंने तुझको
मुझको शायरी आ गयी
मैं आशिक तो नहीं
मगर ऐ हसीं
जब से देखा मैंने तुझको
मुझको आशिकी आ गयी

अंजली तर लाजून पार पाणी पाणी झाली होती.......

साला मैं तो साहब बन गया
  अरे, साला मैं तो तो साहब बन गया, हैं
  रे, साहब बनके कैसा तन गया
  ये बूट मेरा देखो, ये सूट मेरा देखो
  जैसा गोरा कोई लनढन का, हा!

एक मुलगी अर्जुन बनली होती नि एक सोनिया....

हो माहीच.....ती अर्जुन सारखी हुबेहूब तयार झाली होती नि त्याची नक्कल करत होती..........आणि श्रिया सोनियाची

अर्जुन डोक्यावर आठ्या पाडत माहीकडे बघत होता......त्याच असे बघणे बघून आता माहीला खूप टेन्शन आले होते.....

" Mera baby, Mera shona, Mera bacha, Mera janu
Mera baby, Mera shona, Mera bacha, Mera janu
Mere babu ne khana khaya
Mere babu ne khana khaya"
( YouTube वर बघा खूप funny song आहे...).

सोनियाचे बेबी, हनी वैगरे बोलतांनाचे अर्जुनचे एक्स्प्रेशन माहिने खूप शिताफीने नकल केले होते....

सोनिया तर डोळे मोठे करत अवाक होत बघत होती......

आता पर्यंत शांत बसलेला अर्जुन त्याला खूप हसायला येत होते......तो खूप मन मोकळेपणाने हसत होता.........आणि  माहीकडे बघत होता....

सगळे आश्चर्य चकित होत अर्जुनकडे बघत होते.....कारण तो असा मनमोकळे पणाने सर्वांसमोर खूप वर्षांनी हसला होता.........

हसता हसता अर्जुन समोर स्टेजवर असलेल्या महिकडे बघत होता..............हळद झाल्यापासून  त्याला किती त्रास होतोय माहीला जाणवत होते...त्यामुळे त्याला असे मनमोकळेपणाने हसतांना बघून माहीला खूप आनंद झाला होता........सगळ्यांसमोर त्याची मजा उडवली म्हणून हळूच माहीने त्याच्याकडे बघत आपला एक कान धरला आणि हळूच  सॉरी म्हणाली.......तिच्या ओठांचा हालचाली वरून माही काय बोलली त्याला कले होते...अर्जुनने पण तिला एक छानसे छोटेसे स्मायल केले....

" काही पण म्हणा , अर्जुनला हसवायच नी त्याच्या सोबत पंगे घ्यायची हिम्मत फक्त माही मध्येच  आहे" ..........आकाश

आकाशचे  वाक्य ऐकून हसता हसता अचानक सोनिया शांत झाली....

नंतर सोनियाच्या काही फ्रेंड्सनी ग्रुप डान्स केला......

आता आकाश आणि अंजली स्टेजवर आले होते......

धुप से निकल के
छाँव से फिसल के
हम मिले जहां पर
लम्हा थम गया

आसमां पिघल गया
शीशे में ढल के
जम गया तो तेरा
चेहरा बन गया

दुनिया भुला के तुमसे मिला हूँ
निकली है दिल से ये दुआ
रंग दे तू मोहे गेरुआ
रांझे की दिल से है दुआ
रंग दे तू मोहे गेरुआ
हाँ निकली है दिल से ये दुआ
हो रंग दे तू मोहे गेरुआ

आकाश आणि अंजलीने  खूप छान असा रोमँटिक डान्स केला.....

आता स्टेज वर रुही आणि मिरा होत्या.....

जो दिल से लगे
उसे केह दो हाय हाय हाय
जो दिल न लगे
उसे केह दो बाय बाय बाय
आने दो आने दो
दिल में आ जाने दो
केह दो मुस्कराहट को हाय हाय हाय हाय
जाने दे जाने दो दिल से चले जाने दो
केह दो घबराहट को बाय बाय बाय बाय बाय बाय..
लव यू ज़िन्दगी
लव यू ज़िन्दगी
लव यू ज़िन्दगी
लव यू ज़िन्दगी

छोटीशी मीरा रुहीला बघून खूप आनंदात डान्स करत होती......गान पूर्ण हॉलमध्ये इतके घुमत होते...एक वेगळाच सेलिब्रेशनचा  माहोल तयार झाला होता......  आशुतोष पळतच स्टेजवर गेला नि त्याने रुहीला आपल्या कुशीत कडेवर उचलून घेतले आणि तिला घेऊन नाचत होता.........आता मात्र आता पर्यंत आनंदी असलेली  मिरा एकदम शांत होत एका जागेवर उभी रूही आणि आशुतोषला बघत होती.........

तिला तसे शांत झालेले बघून माहीला कळले की ती पण तिच्या बाबाला मिस करते आहे.......माहीला खूप वाईट वाटले , ती  तिला एकटीला बघून तिच्या जवळ जाणारच होती की दोन मजबूत हातानी मिराला आपल्या कुशीत उचलून  घेत तिच्या डोक्यावर किस केले नि तिच्या सोबत गाण्यावर स्टेप्स करत होता........त्याचा येण्याने मिराचा चेहऱ्यावर खूप आनंद पसरला  होता....हो तो अर्जुन होता .....मिरा आणि अर्जुनला बघून माहीच्या डोळ्यात आनंदाश्रु आले होते....हसतच तिने आपले डोळे पुसले....

आता शेवटचा  डान्स होता......सोनिया आणि माही स्टेजवर होत्या.........खर तर माही तयार नव्हती झाली, पण अर्जुनने सोनिया सोबत डान्ससाठी नाही म्हंटले होते म्हणून सोनियाने माहीला सोबत डान्स साठी रेडी केले होते.....
 

तेरी आँखों के मतवाले
काजल को मेरा सलाम
ज़ुल्फ़ों के काले-काले
बादल को मेरा सलाम

घायल कर दे मुझे यार
हो तेरे पायल की छनकार
हे सोह्णी सोह्णी
तेरी सोह्णी हर अदा को सलाम
सलाम ए इश्क इश्क इश्क
सलाम ए इश्क
सलाम ए इश्क...

आता सोनिया पुढे आली........

हो तेरी मस्तानी अंजानी
बातों को मेरा सलाम
रंगों में डूबी-डूबी
रातों को मेरा सलाम
ख्वाबों में खो गयी मैं
दीवानी हो गयी मैं
ओ सोह्णी सोह्णी
तेरी सोह्णी हर अदा को सलाम
सलाम ए इश्क...

माही सोनिया जवळ गेली......आणि तिचा हात हातात घेतला

हो तेरी हत्था विच मेहंदी का रंग खिला है
तुझे सपनों दा चंगा महबूब मिला है
मेरी बन्नो प्यारी-प्यारी सारी दुनिया से न्यारी
इसे डोली में तू लेजा डोलिया

नाचता नाचता सोनिया अर्जुनकडे बघत होती.....पण अर्जुन....तो माहीकडे एकटक बघत होता.........

तेरी मेरी नज़र जो मिली पहली बार
हो गया हो गया तुझसे प्यार
दिल है क्या दिल है क्या
जाँ भी तुझपे निसार
मैंने तुझपे किया एतबार
हो मैं भी तो तुझपे मार गई
दीवानापन क्या कर गई
मेरी हर धड़कन बेताब है
पलकों विच तेरा ख्वाब है
हो जान से भी प्यारी प्यारी
जाणिया को सलाम
सलाम ए इश्क...

माहीचे लक्ष अर्जुनकडे गेले, तर अर्जुन तिच्याकडेच बघत होता... तिने सोनिया कडे बघितले तर सोनिया त्याच्याकडे बघत होती........माहीला अवघडल्यासारखे झाले ....... माही खाली उतरली आणि ती सगळ्या लहान मोठ्यांना मध्ये घेऊन आली....आता सगळेच एकत्र डान्स करत होते....

रब से है इल्तिजा माफ़ कर दे मुझे
मैं तो तेरी इबादत करूँ
ऐ मेरी सोह्णीए ना खबर है तुझे
तुझसे कितनी मोहब्बत करूँ
तेरे बिन सब कुछ बेनूर है
मेरी माँग में तेरा सिंदूर है
साँसों में यही पैगाम है
मेरा सब कुछ तेरे नाम है
हे धड़कनों में रहने वाली
सोह्णिये को सलाम
सलाम-ए-इश्क
तेरी आँखों के मतवाले...

संगीत खूप छान आटोपले, सगळ्यांनी खूप एन्जॉय केले होते.....सगळ्यांनी आता जेवण आटोपले होते.....गप्पा करतच सगळे आपापल्या रूममध्ये जात होते की सगळे लाइट्स बंद झाल्या.........सगळे काय झालं म्हणून इकडे तिकडे बघत होते....

" Happy birthday to you!" ......... एक आवाज आला.....आणि मग नंतर त्या आवाजाला अजून दोन आवाज जॉईन झाले होते.....

" माही" ..........अर्जुनचा एक अस्पष्ट आवाज आला...

रात्रीचे बारा वाजले होते....आज अर्जुनाचा वाढदिवस....

आणि लाइट्स ऑन झाले....तर समोर आशुतोष नी श्रिया मोठा पाच लेयरचा केक   समोर उभे होते.........सगळे मागे फिरले.......आणि आश्चर्याने बघत होते, अर्जुन कधीच आपला वाढदिवस सेलिब्रेट करत नव्हता....... आता काय होईल म्हणून सगळ्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टेन्शनमध्ये बदलले होते.........अर्जुन ही विचित्र नजरेने सगळ बघत होता..........त्याला तसे बघतांना बघून आता श्रिया आशुतोषकच्या चेहाऱ्यावरचे भाव  पण बदलले होते.........

" मी नाही..........हे" .........श्रियाने अर्जुनला बघून बाजूला उभ्या असलेल्या आशुतोषकडे हाथ केला.....

आता अर्जुन आशुतोषकडे बघत होता........

" कुठे फसवल मला तू" ...........आशुतोष महीच्या कानात बोलत  त्याने " मी नाही " हातवारे करत माहीकडे हाथ दाखवला.........

आता अर्जुनने नजर माहीकडे वळवली...........त्याला तसे बघतांना बघून माहीने एकच आवंढा गिळला....आणि तिने पण त्या दोघांना कॉपी करत " मी नाही,  हे"  ......हातवारे करत बाजूला हाथ दाखवला...........

आता मात्र सगळे डोळे मोठे करत या तिघांना बघायला लागले होते...

" माही sss...... तू असे कसे करू शकते.??.....लक्ष ठेवून करत जा ना जे करते ते" ........आशुतोष माही जवळ कुजबुजला......

" हा ड्रॅक्युला समोर असला की माझं डोकं बंद होते.......यांच्या मधला खडूस अर्जुन जागला दिसतोय, खाऊ की गिळू नजरे ने बघत आहेत " .......माही कुजबुजली

" वागतेच तशी... बाजूला बघ जरा " ........श्रिया

का ... काय... झालं म्हणत तिने बाजूला बघितले तर तिला कोणीच दिसले नाही......

" कोणीच नाही" ........माही, तिला टेन्शन आले बाजूला कोणीच नाही बघून आपण फसलो

" खाली बघ" ......आशुतोषने नजरेने खुणावले......

" हाssss" ..........माही डोळे मोठे करत तोंडावर हाथ ठेऊन बघत होती तर बाजूला मिरा गोड हसत उभी होती......"अरे देवा हे काय केले मी..........मिरा थोडी ना तेवढा मोठा केक आणू शकणार आहे............माही खा आता शिव्या" .......माही मनातच बोलत होती....

" Aappy badde  Arjun" .......,....सगळे शांत बघून नी सगळेच आपल्याकडे बघत आहेत बघून मिरा अर्जुनला  फ्लायींग किस देत बोलली

" Thank you sweetheart" ....... म्हणत अर्जुन माहीकडे एक कटाक्ष टाकत मिराला आपल्या मिठीमध्ये उचलून घेतले.........माहीचा पाहिले wish आवाज ऐकुन आणि मीराला  बघून त्याचा राग कुठल्या कुठे पळाला होता.....

" अर्जुन.......आपण केक कट करू??" ......मिरा त्याला केक दाख्वत बोलली

" ह्म्म.." ....अर्जुनने मान हलवली..........तसे बघून सगळ्यांना आनंद झाला होता......

" हुश्श........कसे काय हॅण्डल करता बाबा तुम्ही या खडूसला?" ........ आशुतोष

" हो ना....खूप भारी आहे.....असेच भयंकर घाबरवत असतात....."...माही

" जिज??" .........श्रिया

" Okkkk .....माहिती तुझा दादा आहे ते." ......आशुतोष

सगळे केक जवळ आले......music player वर Birthday song सुरू झाले....

अर्जुनने मीराला सोबत  घेऊन केक कट केला......आणि त्यातला छोटा तुकडा काढून मिरा आणि रुहीला भरवला.......

सोनियांनी त्यातला छोटा तुकडा अर्जुन जवळ नेला.....पण तो बऱ्याच वेळ फक्त बघत बसला होता......उद्या आपलं सोनिया सोबत लग्न आहे हे लक्षात घेऊन त्याने तो खाल्ला.......

रात्र बरीच झाली होती आणि उद्या लग्न म्हणून आराम पण गरजेचं होता......सगळे आपल्या रूममध्ये निघून गेले......

सगळे थकून झोपले होते, मात्र अर्जुन, माही, सोनिया ला झोप येत नव्हती....

*******

सकाळी सगळीकडे लगीनघाई सुरू झाली .......सगळे आपापल्या तयारीमध्ये लागले होते........सनई चौघडाचे सुर आसमंत दुमदुमत होते.....आणि होणाऱ्या नवरी नवरदेवाचे  हृदय धडधडायला सुरू झाले होते......

माही आपल्याच विश्वात बऱ्याच वेळ आरसा समोर बसली होती.......

" माही ..... अग हे आकाशचे  उपरणे इथेच राहिले बघ..... प्लीज देऊन ये ना त्यांना " ........अंजली

" ह??" ..........माही

" अग हे आकाशला देऊन ये, शोधत असतील ते"......तिच्या हातात उपरणे देत अंजली म्हणाली

" अ......हो" ..... ती आकाश रूममध्ये गेली तर तो तिला तिथे भेटला नाही......

" आकाश सर?" ..........माही

" अर्जुनकडे गेलाय" ........तिथला एक बोलला...

अर्जुनच नाव ऐकताच तीच हृदय धडायला लागले.......ती त्याचा रूमकडे जायला वळली........तिची पावलं जड झाली होती.....

इकडे  अर्जुनाचे तर हाथ पाय काहीच काम करत नाहीये त्याला वाटत होते.......तो स्वतःची तयारी करत स्वतःच्याच विचारात हरवला होता..

माहीने अर्जुन चा रूमचे  दार ठोठावले.....

" Come." ............. अर्जुन आरसामध्ये बघत स्वतःची तयारी करत उभा होता...

माही आतमध्ये गेली , तर अर्जुनला बघतच उभी होती.......एखाद्या राजकुमार प्रमाणेच दिसत होता तो.......तिची नजर त्याच्यावरून हटत नव्हती ...

बऱ्याच वेळ काही बोलण्याचा आवाज नाही आला ,अर्जुनला  काहीतरी जाणवले ,  त्याने बाजूला वळून बघितले तर त्याच्या समोर माही उभी होती........... माही पण आज खूप सुंदर दिसत होती.........दोघंही एकमेकांच्या नजरेत हरवले होते.........सनई , ब्यांडचा आवाज झाला तसे दोघांची ही तंद्री तुटली........अर्जुन आपल्याकडे बघतोय बघून माहिने मान खाली घातली आणि  इकडे तिकडे बघायला लागली......

" माही.............."

" अ....... मी...... त......ते........" ...माहीला काहीच बोलता येईना....

"माही.......बोल......काही हवे आहे काय.....???" ......अर्जुन प्रेमळ आवाजात बोलला

"आकाश सरांना शोधत होती.......ते हे द्यायचे होते त्यांना"........हातातले उपरणे दाखवत बोलली

" ठेव तिथे , तो येईलच , देतो मी" .....अर्जुन खिडकीकडे तोंड करून माहीला पाठमोरा उभा होता........ माहीला जातांना त्याला बघावल्या जायचे नाही म्हणून तो नेहमीच असा चेहरा फिरून उभा असायचा.......

थोडा वेळ असाच शांततेत गेला....

" माही......."........बऱ्याच वेळ माही तिथे असलेली बघून त्याने आवाज दिला

"क........काय??".......

"काही बोलायचं आहे काय?" .......... अर्जून

माही बऱ्याच दिवसापासून काहीतरी विचार करत होती......पण तिला त्याच्या सोबत  बोलायचं धाडस होत नव्हते....

"हो........म्ह्णजे.......नाही.....हो.."

"बोल....."........ खिश्यामध्ये दोन्ही हाथ घालून तो उभा होता....

"मला तुमच्याकडून काही हवे होते?".........माहीने घाबरतच एका दमात बोलून टाकले......

तिचं बोलणं ऐकून त्याच काळीज दुखायला लागले.......कदाचित त्याला समजत होते, ती काय बोलणार आहे.......आणि तो मागे फिरला....

त्याचा डोळ्यात पाणी बघून माहीच मन हेलावले......पण आता कमजोर पडून चालणार नव्हते.........तिने आपली सगळी शक्ती एकवटली.........

" सर ....मला शेवटचं काहीतरी हवे आहे तुमच्या कडून" ........

" No...." ..........

" सर हे शेवटचे.......परत कधीच काही नाही मागणार" .......आता तिचा आवाज कपरा झाला होता......

अर्जुनने नाही म्हणून मान हरवली.......त्याचा डोळ्यात कटोकाठ पाणी भरले होते............आणि त्याने मान वळवली

"अर्जुन..............."

तिचा आवाज ऐकुन त्याचे मन खूप जड झालं होत...........तिला जे हव होते ते तिला  द्यायला त्याला खूप त्रास होणार होता.............जणूकाही  ती त्याची आत्माच मागत होती

"अर्जुन ........... प्लीज!!" ...........ती केविलवाण्या रडक्या चेहऱ्याने त्याचाकडे बघत होती..........

तिच्या डोळ्यातले अश्रू बघून इच्छा नसतानाही तो हो म्हणाला......त्याचा कंठ दाटून आला होता आणि खाली मान घालून स्तब्ध उभा होता

तिला हव होत ते मिळाले होते......तरी त्याचं उत्तर ऐकून तीच काळीज दुखलं होत.......

" Thank you......"

पण अर्जुन वरती बघत नव्हता.......त्याला तिच्याकडे बघणे सुद्धा आता जड होत होते.........

माहीने आपले अश्रू पुसले......रूमचे दार बंद केले....आणि  त्याचा जवळ गेली......

तिचे जवळ येणे तो अनुभवत होता...........तिने आपल्या दोन्ही हातानी त्याचा गालवर हाथ ठेवत त्याचा चेहरा वरती केला.........

"अगदी राजकुमार दिसत आहात." ....त्याचा पाणी भरल्या डोळ्यात बघत ......आपल्या टाचा उंचावत त्याच्या कपाळावर आपले ओठ टेकवले..........तिच्या स्पर्शाने आपोआपच त्याचे डोळे मिटले गेले......आणि आतापर्यंत रोकुन धरलेले अश्रू त्याचा गालांवर ओघळले............त्याचे गालावर ओघळलेले  अश्रू बघून तिच्या हृदयावर कोणी मोठे घाव करत आहे असे तिला वाटत होते आणि आता  तिचा पण स्वताहवरचा ताबा गेला..... तिने हळूवारपणे आपल्या ओठांनी त्याचा डोळ्यावरचे  अश्रू टिपले...........त्याचे डोळे मिटले होते..........तो स्तब्ध खिशात हात घालून उभा होता.......जसे काही त्याने पूर्णपणे स्वतहाला तिला अर्पण केले होते असे भाव त्याचा चेहऱ्यावर होते.......बऱ्याच वेळ माही त्याचा चेहरा न्याहाळत  होती , त्याला आपल्या डोळ्यांमध्ये साठाऊन घेत होती.......परत तो तिला दिसणार नाही तिला माहिती होते......आणि म्हणूनच ती त्याला मन भरे पर्यंत बघत होती ,त्याचे केस, त्याचे डोळे बघता बघता ...........तिची नजर त्याच्या ओठांवर गेली........शांत मिटलेले ओठ........तिने तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंफले.........ती पुढे जात होती........पण अचानक जवळ जाऊन ती थांबली........कारण आता जर स्वतःला थांबवले नाही तर पुढे कठीण होईल.......भावना सांभाळू शकणार नाही......... ओठांजवळ जाता जाता तिने त्याचा गालांवर आपले ओठ टेकवले......आपोआप त्याच्या हातांची गुंफण तिच्या भोवती घट्ट झाली.........

तुम मेरे हो
इस पल मेरे हो
कल शायद ये आलम ना रहे
कुछ ऐसा हो
तुम तुम ना रहो
कुछ ऐसा हो हम, हम ना रहें..
ये रास्ते अलग हो जाए
चलते चलते हम खो जाएँ..

(मैं फिर भी तुमको चाहूँगा..)

इस चाहत में मर जाऊँगा
मैं फिर भी तुमको चाहूँगा
मेरी जान में हर ख़ामोशी ले
तेरे प्यार के नगमे गाऊंगा मम्म..
मैं फिर भी तुमको चाहूँगा
मैं फिर भी तुमको चाहूँगा
इस चाहत में मर जाऊँगा
मैं फिर भी तुमको चाहूँगा

त्याला तिच्या भावना कळल्या होत्या , आणि त्याने पण  स्वतःच्या मनाला कठोर केले.....

"खुश रहा अर्जुन..."....माही

" ह्म्म."......त्याने  तिच्या डोक्यावर केसांवर किस केले....

"अर्जुन.......एक स्मायल......फक्त एक स्मायल"........

मान हलवत  त्याने  तिच्याकडे बघत एक खूप  गोड स्मायल केले.....

"काळजी घ्या स्वतःची............."

"ह्म्म"............त्याने मान हलवली.......

"येते.............."

"ह्म्म........"

आणि डोळ्यांनीच ते दोघं एकमेकांना निरोप देत होते...........

"तू कुठेही , किती ही दूर जा माही ......पण माझं तुझ्यावर नेहमीच प्रेम राहील.......तू नी मी एक आहोत.....आपली शरीर वेगळी असली तरी आपण  एक आहो.......जिथे जाते आहे .....खुश रहा"......अर्जुन माहीकडे बघत मनातच बोलत होता.......
 

माही परत जायला वळली...........आणि तो तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता........

"Love you sweetheart" ........ अर्जुन जाणाऱ्या माहीकडे बघत मनातच बोलला....

माही जाता जाता जागीच थबकली....  मागे वळून बघितले आणि  अर्जुनला गोड स्मायल केले......... दार उघडून बाहेर आली......आता मात्र तिला तिच्या भावना कंट्रोल होत नव्हत्या....हळू हळू चालता चालता तिची स्पीड आता वाढत होती.......ती एका हाताने डोळे पुसत जात होती....पण डोळ्यातले पाणी थांबायचं नाव घेत नव्हते .....तिचे मन खूप भरून आले होते......ती पळतच एका साईडला असलेल्या ओपन टेरेसमध्ये गेली.......तिथं एका कोपऱ्यात जाऊन शेवटी ती जोराने रडली........

*************

क्रमशः

*************

शेवटचे साँग एका वाचक मैत्रिणीने सुचवले आहे.......half girlfriend मधील Arijit Singh यांनी गायले आहे.....नक्की ऐका खूप सुंदर आहे........

🎭 Series Post

View all