तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 47

माही अर्जुन

भाग 47

"अर्जून ".........आशुतोष डोर नॉक करत अर्जुनचा रूम मध्ये आला....

"या ना आशुतोष.."........अर्जुनने हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला नी उठून उभा राहिला...

"काय रे उद्या लग्न आहे तुझं नि ती अजुनही काम करतोय........"

"ह्म्म .... थोड महत्वाचं होत तेवढच करत होतो......तसेही सगळे आरमाच करत आहेत .....म्हणून काम काम करत बसलो होतो .."..

"मग तू पण करायचा ना आराम थोडा.........किती काम करशील.?".....

"It's okay Ashutosh, आवडते मला ते.."....

"ह्म्म...... मला तुझ्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं..."....

"हो बोला ना" ........अर्जुनला कल्पना आली होती की आशुतोष काय बोलायला आला असेल ते...

"मला तुझ्याबद्दल आणि माहिबद्दल बोलायचं आहे".....

"ह्म्म..".........

"मला माहिती नाही तुमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे पण तुम्ही दोघ एकमेकांशिवाय राहू शकत नाही हे मला कळतंय".........

"ह्म्म."......

"तू तो अर्जुन पटवर्धन आहेस काय... ज्याला मी ओळखत होतो??........ जो त्याला जे पाहिजे ते भेटवण्यासाठी आकाश पाताळ सुद्धा एक करतो....... माझ्या समोर असलेला अर्जुन पटवर्धन इतका हतबल का आहे???...

अर्जुन मान खाली घालून चुपचाप ऐकत उभा होता.......

"मगाशी हळदीच्या वेळेस बघितले आहे मी तुला.... माही थोड्या वेळासाठी तुझ्या नजरेच्या दूर काय झाली होती,  तू तर किती कासावीस झाला होता........ तिला शोधताना तू तुझा नव्हतास......... सगळं बघितला आहे मी  तिचा त्रास, तुझी व्याकुळता.......... आज पहिल्यांदा मला तुझी काळजी वाटते आहे..... का देतो आहे स्वतःला इतका त्रास??".........

आशुतोषचा एक एक शब्द त्याच्या काळजाला भिडत होता......... तरीसुद्धा तो चुप होता

"सांग काय प्रॉब्लेम आहे ??आपण मिळून त्याच्यावर सोल्युशन काढू"........

अर्जुन अजूनही चुपचाप खाली बघत होता.....

"तू बोलणार नाही आहेस काय?....... सांगणार नाही काही?...... ठीक आहे मग मी सोनियाला आणि घरी सगळ्यांना सांगतोय".........म्हणतच आशुतोष बाहेर जाण्यासाठी मागे वळला....

अर्जुनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या......

"आशुतोष"........... अर्जुनने आशुतोषला थांबवले......

"ग्रेट...... आता मला सगळं सांगायचं".........आशुतोष

"ह्म्म.."..... अर्जुनने अलगद आपल्या डोळ्यांच्या कडा एका बोटाने पुसल्या आणि आशुतोषला माही ला भेटल्यापासुन ची आतापर्यंतची सगळी कथा सांगितली.......

ते सगळं ऐकून आशुतोषचे डोकं एकदम सुन्न झाले........ त्याला काय बोलावं ते कळतच नव्हतं....... थोड्यावेळ दोघांमध्ये खूप शांतता होती.......

"घरच्यांना समजून सांगू आपण.".........आशुतोष

"Mahi is not ready for anything,  and I can't  force her"

"अरे पण.......,.... तिला आपण समजावू शकतो."......

"I tried my level best....... ..... तिला वाटते तिला सगळे सोडून जातील...ती एकटी पडेल ......ती जर माझ्या आयुष्यात आली तर तिच्यामुळे माझी नाती माझ्यापासून दूर जातील.......खूप भीती वाटते तिला......नात्यांचे महत्त्व जाणते ती......नी खरंच आहे तिच्या सख्ख्या असणाऱ्या नात्यांनी तिला एकटे सोडले....ती कशी आहे कुठे आहे कोणीच जाणून घेण्याचे पण महत्वाचे नाही समजले.......आणि ती आता ज्यांच्या सोबत आहेत ती तिची प्रेमाची नाती आहेत......ज्यांनी तिला सावरले......तिच्या पाठीशी उभे आहेत....तीच तिच्या परिवारावर खूप प्रेम आहे......आणि तिच्या प्रेमावर माझं प्रेम" .........

" पण मग सोनिया सोबत लग्न का..........???" ...आशुतोष

" मी आधीपासूनच लग्न वैगरे नाहीच म्हणत होतो पण घरचे खुप मागे लागत होते....त्यात सोनिया माझी गर्लफ्रेंड आहे असं कुठून आजी आणि घरच्यांना कळले.....तेव्हा तर त्यांनी मला हैराण करून सोडलं......तेव्हाच माही माझ्या माझ्या आयुष्यात आली......तिच्या सोबत काहीतरी कनेक्शन आहे वाटत होते....मला ती आवडते आहे ,हे माझं मन मानायला तयार नव्हते.....अशातच मी तिला लग्नासाठी विचारले.....तेव्हा जरा घाईच झाली...माझं मलाच कळत नव्हते.....तिच्या काय भावना आहेत मी जाणून नाही घेतले.......तेव्हा संयमाने घेतले असते तर कदाचित आज ही परिस्थिती नसती.......तिने नकार दिला नी मी भयंकर चिडलो.....मला कोणीतरी नकार देत आहे , माझं कोणी ऐकत नाही आहे बघून मला खूप राग आला.....मी माहीला तिच्या status वरून आणि बरच खूप वाईट बोललो.....आणि त्यातच मी सोनिया सोबत लग्नासाठी आजीला होकार सांगितला.......ती माझ्यासोबत तुटक तुटक lच वागायची ...पण तिच्या डोळ्यात मला माझ्या बद्दल प्रेम दिसायचं........ माही माझ्यापासून दूर असायची...आणि ती माझ्या जितकी दूर जायची तितका मी तिच्या जवळ जात होतो......पण मी तिच्यावर प्रेम करतो हे कळे पर्यंत फार उशीर झाला होता......आणि तीच तर आधीपासून ठरलेच होते तिला माझ्या आयुष्यात कधी यायचेच नव्हते....माझ्यामुळे तिला त्रास होत होता आणि म्हणून मग ठरवले की तिच्या दूर राहायचे.....माझ्यामुळे तिला होणारा त्रास मला आवडत नव्हते......सोनिया सोबत बोलून लग्न नको म्हणून बरेचदा विचार केला पण या काळात सोनिया घरी सगळ्यांच्या आवडती झाली होती नि त्यातच माझं लग्न जमले म्हणून मग  आकाशच पण लग्न जमलं........आणि इथून सगळच कठीण झालं.......मी जर लग्नाला नकार दिला तर आकाशच पण लग्न थांबेल नी योगाने अंजलीच लग्न मोडेल......जे माहीला नको होते.........ती कधीच लग्न करणार नाही कारण मिराचा आयुष्याचा प्रश्न आहे......तिच्या सोबत झालेले नी त्यात मिरा..या  सगळ्या गोष्टी स्वीकारणारा असा मुलगा भेटणे कठीण आहे ,तिला माहिती.........नी  माझ्यावर असणारं तिचं प्रेम तिला माझ्या आयुष्यात येऊ देत नाही आहे.........तिला असे वाटते की ती जर माझ्या लाईफमध्ये आली तर माझं लाईफ खराब होईल.....सगळी माझी चूक आहे...मी स्वतः तर तिच्या प्रेमात पडलोच...आणि तिच्या पण मनात मध्ये प्रेमाच्या भावना जागवल्या...आणि आता तिला होणारा त्रास मला होतोय..." .....

" अरे पण एकदा घरी बोलून तर बघायचं होते ना ." ....

" त्या दिवशी टीव्ही न्यूजवरून जो काही गोंधळ झाला घरी....तेव्हा ती तिथेच सगळं ऐकत बघत होती........तिच्या मनाला ठेच पोहचली..... तिला कळलं होते घरचे तिला accept करणार नाही........आणि तिच्या बद्दल घरी माहिती झालं तर अंजलीला पण accept करणार नाही.......मी तिला खूप समजावले पण नाही समजली ती....नाही ऐकले तिने माझे ......तिला वाटते माझ्या लाईफमध्ये चांगली मुलगी असावी............ तिला माहिती आहे सोनिया loves me ...... आणि सोनिया सोबत मी खुश राहील.....आणि मी हे लग्न मोडवे नाही असं पण तिने माझ्याकडून प्रॉमिस घेतले.......मी सोनिया सोबत लग्न केले तर ती खुश असेल...नी तिच्या आनंदासाठी मी काहीपण करू शकतो" ..........

"सोनिया.???......she deserves love"....

" मला पण त्यासाठी खूप वाईट वाटत आहे......पण काय करू , माहीवरच्या प्रेमापुढे सेल्फिष झालोय मी......तिला सांगावं वाटतेय मला...पण कसं सांगायचं कळत नाही आहे.....पण तिला मी नक्की सांगेल.....कधी केव्हा माहिती नाही....... hope she will understand me .... माहीला त्याबद्दल बोललो तर ती म्हणाली...

Soniya madam deserves best......so she deserves you......"...

"सोनियाच प्रेम आहे तुझ्यावर... घेईल ती तुला समजून......पण तुम्ही दोघं एकमेकांपासून दूर राहू शकाल काय??........आज सकाळी पण....माहीची अवस्था बघितली  मी ......तुझ्यात जीव अटकला आहे रे तिचा.." .....

" मी हे लग्न accept केले आहे.....आणि  मी मनापासून प्रयत्न करेल हे लग्न निभवण्याचा .......मी माहीचा दूर पण राहण्याचा प्रयत्न करतोय.......पण तिच्या डोळ्यातलं एक पण अश्रू मी बघू शकत नाही........it's hurt  me a lot.......तिच्या डोळ्यात एक जरी थेंब पाणी दिसलं की मी विसरून जातो हे सगळं...हे लग्न.....मला कळते हे बरोबर नाहीये......but .. I can't control myself....... I can't......" .... अर्जून

" नव्हते आवडत मला कधीच हे प्रेम वैगरे.......नव्हते पडायचे मला प्रेमात कधी ....खूप स्ट्रोंग होतो......कुठल्याच मुलीला जवळ सुद्धा भटकू नाही दिले.......पण माही आली नि कधी प्रेमात पडलो कळलेच नाही..... ती कधी माझा प्राण झाली कळलच नाही....तिच्यात स्वतःला हरवून बसलोय मी कळलेच नाही ......पण प्रेमात कोणालाच जबरदस्ती बांधता येत नाही.....इतकं तर नक्कीच कळले आहे..............this love is not easy.....it's  really very painful....... what should I do??"........ अर्जुन बोलता बोलतच डोळ्यांवर हाथ ठेवत खाली बेड lवर बसला......

आशुतोषला पण कळत नव्हते काय बोलावे ते.......सगळच इतकं कठीण होत........

" For me,  the most important thing is Mahi's happiness..........if they say I am selfish then yes I am selfish.." ..... अर्जून

"अर्जुन..... सेल्फिष नाहीये तू...." ....

" ह्म्म....... तुम्हीच सगळे म्हणता ना लग्नाच्या गाठी आधीच देवाने बांधून पाठवल्या असतात.......तर कदाचित देवाने माझी नी सोनियाची जोडी बनवली असेल........so don't worry,  everything will be fine." ........ अर्जुन

" ह्म्म......काळजी घे" ......आशुतोष त्याच्या रूम मधून बाहेर पडत होता....

" आशुतोष....मला सांगायची गरज तर नाही....तुम्ही मला नक्कीच समजून घ्याल आहात.....तरी पण......प्लीज अनन्या ताईला सुद्धा यातले काहीच सांगू नका....... माही चा respect माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे" ...........अर्जुन

" ह्म्म.....don't worry......go take a rest now......संध्याकाळी संगीत आहे" .........अशितोष त्याला बाय करून निघून गेला........

*******

संगीतसाठी हॉल सजून धजून सज्ज झाला होता.....आता वाट होती सगळ्यांच्या येण्याची...

दुपारी सगळ्यांचा चांगला आराम झाला होता...आता सगळे आपापल्या तयारीमध्ये लागले होते......

" अर्जुन मला खूप भीती वाटते आहे" ........सोनिया
पाठमोऱ्या असणाऱ्या अर्जुन ...... जो बऱ्याच वेळ पासून आरसा समोर उभा स्लीवचे बटन लावत आपल्याच विचारांमध्ये हरवला होता.......त्याला पाठीमागून हग करत बोलली....

आज सोनियाला खूप अस्वस्थ वाटत होते...तिचे कशातच मन लागत नव्हते......आणि म्हणूनच तिची तयारी आटोपल्यावर ती अर्जुनाच्या रूममध्ये आली होती........पण इकडे अर्जुन सुद्धा आपल्याच विचारामध्ये हरवला होता.......वारंवार त्याच्या डोळ्यांपुढे आशुतोषच बोलणं ...माहीला होणारा त्रास येत होते........

"माही everything will be fine...don't worry" ......... अर्जुन

"It's Soniya Arjun" ..........

सोनियाने अर्जुनला मागून मारलेली मिठी सैल झाली
माहीच नाव ऐकून सोनियाचा काळजात धस्स झाले होते

" Oh...shit..... मी काय बोलून गेलो?" ......अर्जुनचा डोक्यात एकदम प्रकाश पडला......तो मागे वळला....

" सॉरी....सो..निया.....ते मी ऑफिसचा विचार" .....

" It's okay........ तयार झाला की ये माझ्या रूम मध्ये...सोबतच जाऊ खाली." .........सोनिया

" Okay..." ...... अर्जून

********

क्रमशः

🎭 Series Post

View all