Jan 27, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 46

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 46

 

भाग 46

हिरवा चुडा भरण्याचा कार्यक्रम सुरू झाला होता.

बांगड्या भरणाऱ्या मावशीबाई रंगबिरंगी  बांगड्यांचे टोपले आपल्या भोवती  घेऊन बसल्या होत्या .मनमोहक रंगीत चमचमणाऱ्या बांगड्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होत्या....

 

मावशी बाईंपुढे एक पाट फुलांनी रांगोळीने सुशोभित करून मांडला होता. सोनिया अंजली दोघीही सुंदर साड्या घालून नटून आल्या होत्या. आईंनी दोघींना पाटावर बसवत त्यांचे  औक्षण केले. मावशीबाईंनी दोघींच्या हातात सोन्या हिऱ्यांच्या बांगड्या मिक्स करत हिरवा चुडा  भरला....

 


सगळे लहान मोठे

त्यांच्या समोर पाटावर एक एक जण येत  बसत होते नि त्या त्यांना बांगड्या भरून देत होत्या.......


"

ये पोरी तू पण ये की" ......... मावशीबई


"

मी........?????" .....माही


"

हो, ये............तू पण भर की तुझ्या आवडीच्या बांगड्या हातात".........मावशिबाई

 

माहीने आपल्या आईकडे बघितले.....


"

जा...." ..त्यांनी डोळ्यांनीच खुणावले.....आणि माही आनंदाने त्यांच्या समोर पाटावर जाऊन बसली.... मावशीबाईंनी माहीला बांगड्या भरून दिल्या.

 

" आज्जी , मला पण......"..... मिरा पळतच तिथे आली होती......

 

" अल्ले या छोट्याशा चिऊला  भलायच्या बांग्या.... बशा इथ ....".... मावशी बाई , मिरा चुटकन मावशी बाईच्या पुढे पाटावर जाऊन बसली.....

 

" कुठला रंग भरायचा बरं....???" .....मावशी बाई.

 

" मला ताई माई सारखं......"..मिरा

 

" तुम्हाला पण नवली बनायचं ..... अल्ले बापले.....ताईच्या बाबांना सांगायला पाहिजे या छोटया ताईशाठी राजकुमार शोधा....कसा राजकुमार शोधायचा बर????..."....म्हणत हसतच तिने मीराला हिरव्या बांगड्या भरत होत्या....

 

" अर्जून........"..... मीरा ओरडली..

 

मिराचे उत्तर ऐकून सगळे हसायला लागल्या....

 

"..सोनिया, काटे की टक्कर है....... भारी चॉईस आहे बाबा मीराची......"...अनन्या सोनियाला चिडवत होती...

 

" हा हा हा.....खूप गोड टक्कर आहे....आवडेल मला....".....सोनिया

 

" त्याचा पण खूप जीव आहे मिरावर....काय ऋणानुबंध आहे काय माहिती...."....आई

 

"मागच्या जन्मीचे बापलेक असतील....."....मावशी बाई

 

ते ऐकून माही कसंनुस हसली....." खरंच इतकं सुंदर भाग्य असते माझ्या मिराचे......बाबा नाही तर काय झालं मिरची आई आहे ना ...सगळे स्वप्न पूर्ण करेल......"....माही मिराकडे बघत मनातच विचार करत होती...

 

माही आणि मिराने आपापल्या हातात बांगड्या भरून घेतल्या.......


"

माऊ......माझे हाथ किती शुंदर दिशत आहेत" .......मिराने हाथ पुढे केले........

 

" माझे पण" .........माहीने हाथ पुढे केले.......माहीने सगळे कलर आपल्या हातांमध्ये घातले होते....

 

 

दोघीजणी एका कॉर्नरमध्ये आरश्यासमोर उभ्या होऊन बांगड्या खणखन वाजवण्याचा गेम खेळत होत्या......बऱ्याच वेळ पासून दोघींचा हसण्याचा, बांगड्या वाजवण्याचा नी आरसा मध्ये बघून वेडेवाकडे चेहरे करण्याचा खेळ खेण्यात गुंग झाल्या होत्या....

अर्जुन कानामध्ये ब्लूटूथ लाऊन फोनवर बोलत होता....बोलता बोलता त्याचे  लक्ष मिरा माहीकडे गेले.......त्या दोघींचा चाललेला खेळ बघून त्याचा चेहऱ्यावर आपोआपच स्मायल आले........त्याने मोबाईल मध्ये त्या दोघींचा चालणारा तो क्युट खेळ क्लिक केला...

" Sweethearts" .......... अर्जून मनातच बोलला

एक वाऱ्याची झुळूक आली...आणि  जसे काही अर्जुनने तिला आवाज दिला....असे तिला जाणवले नी तिने वरती इकडे तिकडे बघतीले तर अर्जुन एका कॉर्नरमध्ये फोन वर बोलत तिला दिसला.........

"अर्जून "................माही मनातच बोलली

अर्जुनने बोलता बोलतच मागे वळून बघितले......नी डोळ्यांनीच काय म्हणून इशारा केला........

" ह.....??........काही नाही"  ....माहीने मान हलवून इशाऱ्यानेच सांगितले....

" माही इकडे ये." .....श्रियाने आवाज दिला

सगळ्यांनी हिरव्या बांगड्या घातल्या होत्या नी त्यांचे फोटो काढणे सुरू होते.

 

 

" हे बघा हे अजब गजब प्राणी.........म्हणूनच अर्जुन हिला कार्टून म्हणतो.." .......अनन्या माहीच्या बांगड्या बघून हसतच बोलली....

 

"हा हा हा.....आहेच आमचं हे जगावेगळं ध्यान."......अंजलीने माहीच्या डोक्यावर टपली मारली.........आणि सगळे हसायला लागले...........

 

" काय ग ताई तू पण.??" ............माहीने अंजलीला हग केले.......

 

" बरं आपापले हाथ दाखवा....बघू तर कोणाचा नवरा जास्ती प्रेम करतो......" .....अनन्या

 

" वा अंजली..... छान खुलला आहे हा रंग" .........अनन्या

 

" हे तर होणारच होते ना.......आकाश दादा बघितला ना किती लट्टू आहे हिच्यावर" ..........श्रिया

 

" असं काही नाही.." ......अंजलीने लाजून मान खाली घातली

 

" Someone blushing!" .............. श्रिया

 

" लगेच आला ......तुला पण करमत नाही ना हिच्या शिवाय......लट्टू कुठला" .......अनन्या ने तिथे आलेल्या आकाशचा पाठीमध्ये मारले

 

"काय ग तू पण......त्याच्या बायको समोर मारते आहे त्याला" ............आशुतोष गम्मत करत होता

 

"हो तर मग.........त्याचा मुलांसमोर पण मारेल" ..........अनन्या

 

आता आकाश पण लाजला.......

 

" हो पण मग तुला बघुन ती पण मारेल त्याच काय?"........आशुतोष

 

" तुम्हाला मीच भेटतो काय??" ......आकाश

 

" माझी मेहेंदी बघ ना,  कुठे जास्ती कुठे कमी रंगलेली आहे".......अनन्या

 

" हो....तर लग्नाच्या आठ वर्ष नंतर असेच असणार आहे ना"  .........श्रिया

 

" अरे लकी आहेस ताई.....कुठे कुठे तरी आहे ना जास्ती.... झालं मग " .......आकाश

 

" मेरी बिल्ली मुझिसे म्याव.." ........आशुतोषने आकाशचा पाठीत एक बुक्का दिला ठेऊन....

 

" माझी ...माझी बघू..." .... एक्साईटेड होत  सोनियाने तिचा हात पुढे केला.....

 

"" माझी तर सगळ्यात कमी कलर आली" ..........सोनिया

 

" It's okay Soniya...expected one..... अर्जुन आहे तो,  इतक्या सहजासहजी नाही रंगणार तो कोणाच्या रंगामध्ये .......थोडे जास्ती efforts लागतील"  ....अनन्याने श्रियाला टाळी दिली......

 

" That's true ताई.......efforts जास्तीच लागणार .."....सोनिया

 

माही आपला हात पुढे करणारच होती की सोनियाचा हात पाहून तिने आपला हात मागे नेला......

 

" अरे दाखवा दाखवा ......तुम्ही काय लपवता आहात छोट्या मॅडम?" ...... माहीला हात लपवताना बघून आशुतोष बोलला.....

 

"काही नाही" ........माही

 

"अग दाखव?" ....अनन्या  तिचा हात पकडत पुढे केला

 

"Wow......... सगळ्यात जास्त तर माहीची मेहेंदी रंगली आहे..........lucky girl..... कोण आहे तो?" ......श्रिया माहीला चिडवत होती........

 

" तुला तुझ्यावर खूप प्रेम करणारा भेटू दे ...... तू खुश असशील ना तर सगळ्यात जास्ती आनंदी मी असेल" ...........अंजलीने तिला हग केले..

 

त्यांच्या बोलण्याने अर्जुनच सुद्धा लक्ष त्यांच्याकडे गेले......

 

" It's looking like someone loves her more than his life" ..........आशुतोषने एक नजर अर्जुन वर टाकली आणि त्याने सुद्धा बोलायचा एकही चान्स सोडला नव्हता.......

 

"खरंच.....अर्जुन माझ्यासाठी काय काय करतात"......आणि माहीला  अर्जुन सोबत घालवलेले सगळे गोड क्षण तिच्या डोळ्यांपुढे सरकत होते......तीच घाबरणं ,त्याचं तिला सांभाळणं...... प्रेम या संकल्पनेवर कधी विश्वास न ठेवणारा अर्जुन , तिच्यासाठी आयुष्य पणाला लावणारा अर्जुन....... तिचे अश्रू पुसत तिला हसवणारा अर्जुन ...... अर्जुनची सगळी रूपे तिच्या डोळ्यापुढे येत होती........ माही मनातच विचार  करत होती.......  आशुतोषच्या बोलण्याचा अर्थ कळून न  कळल्यासारखं करत माहीने चेहऱ्यावर कशीतरी स्माईल केली......

 

" ओ sss........who is he....????.... माही सांग ना कोण आहे तो?" ........

 

माहीने एकदा अर्जुनकडे बघितलं,  तिला कळतच नव्हतं सगळ्यांना काय सांगायचं .....सगळे तिला चिडवत होते..... तिला लपवता पण येत नव्हते.... तिला सांगता पण येत नव्हते ....... आणि तिला खोटं बोलायची इच्छा झाली नव्हती.......... त्यामुळे ती  चूप होती......पण मनोमन मात्र ती खूष होती......

 

" अरे ते जाऊ द्या ....तिचे  इम्पॉर्टंट नाही आहे .......सोनिया मॅडम तुम्ही तुमच्या हातात कडे लक्ष द्या...... जरा जाऊन जाब विचारा?? " .............आशुतोषने हळदीच्या वेळ माहीचा चेहरा बघितला होता ....... आणि अर्जुनच्या चेहऱ्यावरच्या हसण्या मागचं दुःख सुद्धा त्याला माहिती होतं....... त्यामुळे त्याने लगेच विषय बदलला

 

" हो हो अनन्या जा जा........ask him" ....... अनन्याने पण सोनियाला अर्जुनच्या विरोधात चढवले.......

 

" हो बरोबर बोलताय तुम्ही,  थांबा मी विचारूनच येते.......अर्जुन बेबी ssss....." .... सोनिया आवाज देत अर्जुनकडे गेली

 

" ओ ssss.........अर्जुन बेबी..".........श्रिया अनन्या...

 

'अर्जुन बेबी ' ऐकून... अर्जुनने डोक्यावर हात मारला

 

बाकी सगळ्यांना त्याला असं करताना बघून हसू आलं....

 

" लागली बिचाऱ्याची वाट....... तुम्हालापण ना त्याला चिडवण्यात खूप मजा येते." ......आकाश

 

" It's our right bro......chill." ..... श्रिया

 

" Don't worry...... He is so strong"  ........... हो ना माही.....??????" .. अर्जुनकडे बघत असलेल्या माहीची तंद्री आशुतोषने भंग केले....


"

अ......हो......" .. माहीने आपली नजर वळवली.


"

Baby you don't love me.......???".... सोनिया


"

सोनिया हा काय प्रश्न आहे??......... तुलाही लग्न ठरायचा आधीपासूनच माहिती होते ना मी प्रेम नाही करत" ........ अर्जून


"

हो पण तेव्हा वेगळं होतं.... आता वेगळ आहे....... आता आपलं लग्न होणार आहे....... माहीची सुद्धा मेहंदी खूप रंगली.... पण माझीच नाही रंगली"........सोनिया


"

सोनिया या सगळ्या स्टुपिड गोष्टी आहेत.......you are well educated modern girl..... मी अपेक्षा नव्हती केली की तू या सगळ्या गोष्टींमध्ये विश्वास करशील" ......... अर्जून


"

Darling........".... सोनिया


"

सोनिया it's very simple property of mehendi..... ज्यांची बॉडी हॉट असते" .............अर्जुन काही बोलतच होता की सोनिया परत मधात बोलली


"

It's means I am not hot??....... I am not looking good??"......... सोनिया

 

अर्जुनने डोक्यावर हात मारला......


"

असं काही नसते हा सोनिया.." .......मागून अनन्या ने तिला प्रोत्साहन दिले


"

Honey..... प्रपोज मी........ say l love you.." .... सोनिया


"

सोनिया उगाच कुठल्याही गोष्टीचा हट्ट करू नको".....अर्जुन


"

see now everyone looking at us only............. don't   insult me." ....... सोनिया हळू आवाजात बोलली ... सोनिया खूप आशेने  त्याच्याकडे बघत होती...

 

आता मात्र अर्जुंनला  खूप वाईट वाटत होतं...... सोनियाला काय बोलावं त्याला कळत नव्हते........ त्याला माहिती होतं या सगळ्या गोष्टींवर तिचा हक्क आहे...... पण त्याला खोटं सुद्धा बोलले जात नव्हते....... तो सोनियाकडे बघत उभा होता......... अर्जुन काही बोलत नाही आहे बघून माहीलासुद्धा सोनियासाठी वाईट वाटत होतं....... आणि या सगळ्याला ती स्वतःलाच जिम्मेदार समजत होती...

 

तो काहीच बोलत नाही आहे बघून सोनियाला  वाईट वाटले आणि ती परत जायला वळली.....


"

Soniya ........you are the only one who knows me from my very early age..... From the time when I never believe in girls...love and marriage.......you are the only one friend who is very much  close to me.......I hope you will understand me........give me some time, everything will be fine...... And most important thing is we are getting married soon.......and belive me you really very beautiful girl" ............ अर्जुन

 

सोनिया तिथेच पाठमोरी स्तब्ध उभी त्याच  ऐकत होती....

 

बाकीचे पण अर्जुन कडेच बघत होते.......अर्जुन कधी असा सगळ्यांसमोर एक्स्प्रेस होत नाही म्हणून सगळ्यांनाच त्याचा बोलायचं कौतुक ही वाटत होत.....पण काहीतरी आहे जे आपल्याला कळत नाही आहे असेही आकाश अंजली नी अनन्याला वाटत होते........


"

  Soniya you are very lovable person.. I love you my sweet friend" .............. अर्जुनचा बोलण्याने सोनियाचा डोळ्यात पाणी आले......   आधी पासूनच तिला माहिती होत की अर्जुन कधीच आपल्या फीलींग्ज कोणाला सांगत नाही, असा व्यक्त होत नाही.....जे आज त्याने तिच्यासाठी केले होते.......डोळ्यातले पाणी पुसले नी तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.....आणि तिने पळतच जाऊन अर्जुनला टाईट हग केले........

 

सगळे टाळ्या वाजवत होते........

 

तीच असं अचानक जवळ येण्याने तो गडबडला... त्याला थोड्यावेळ काहीच कळलं नाही........तो स्तब्ध उभा  सगळ्यांकडे बघत होता.....

त्याच माहीकडे लक्ष गेले तर  ...

तो सोनियाच्या मिठीला रिस्पॉन्स देत नाही आहे बघून माही आपले हाथ पुढे आणत हाथ गोल करत मिठी त घेण्यासारखे करून दाखवत  ती त्याला सोनियाचा  कुशीत घे  म्हणून त्याला सांगत होती.

माही तसे सांगताना बघून अर्जुनाच्या चेहऱ्यावर स्मायल आलं आणि त्याने आपले हाथ सोनियाचा भोवती टाकले नी तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या केसांवर किस केले.............

 

 

अर्जुनला सोनियाला जवळ घेत बघून माहीचा चेहऱ्यावर आनंद पसरला ,तिने आपल्या डोळ्यात आलेले पाणी पुसले.....आणि अर्जून कडे बघत गोड स्मायल केले...


"

Excuse me!!" ...... म्हणत आशुतोष तिथून चालला गेला

 

अर्जुन आणि माहीच इशाऱ्यांनीच सुरू असलेले संभाषण त्याच्या डोळ्यात पाणी जे देऊन गेले होते.........

 

*******
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️