Jan 22, 2022
Kathamalika

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 45

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 45

भाग 45

सकाळची प्रसन्न वेळ....बाहेर लॉनमध्ये हळद कार्यक्रमाची  तयारी सुरू होती.....सगळीकडे लाईट येलो आणि पांढरे झिरझिरीत पडदे लागले होते....सोबत फुलांच्या माळा..... एका साईडला दोन चौरंग.... नवरदेव साठी.. त्यांच्या अपोजिट साईडला परत दोन चौरंग नवरीसाठी.... आणि मधोमध  हळद सजवून ठेवली होती..... अधुनमधून हवेची झुळूक येत होती त्यामुळे पडदे  एकमेकांसोबत खेळ खेळत होते....... सॉफ्ट असे म्युझिक सुरु होते...... हिवळ्यातली थंडी.  ...त्यात सकाळचं कोवळ उन.......सगळं कसे सोनेरी सोनेरी दिसत होते.......लहान मोठे सगळे हळदीच्या तयारी मध्ये लागले होते......

"जा ग पोरींनो सोनिया आणि अंजलीला घेऊन या" ......आजी

" ताई ss... झाली काय तू तयार??....बोलावतात आहेत खाली" .....माही आवाज देतच रूममध्ये आली...

"अरे वाह ....काय सुंदर दिसते आहे तू" ........माही

"माही ,सॉरी ग राणी ,काल मी तुझ्यावर नी आकाशवर चिडली होती......माझं तुझ्याकडे लक्षच नाही राहिले ग तू मेहेंदी काढली की नाही काहीच नाही........मला खूप टेन्शन आले होते.....तू ड्रिंक घेतले त्यात शॉर्ट ड्रेस.....तुला तर माहीतच आहे आत्याबाईचा स्वभाव....त्यात सगळं असे वाईट घडले आहे ना.......मला तर आवडते तू खूप खुश असावी... आनंदी असावी.....पण...........सतत वाटत होत आत्याबाई आई नि बघितले तर किती बोलतील तुला.......सतत तिकडेच लक्ष लागून होते माझं"..........अंजली

"ये ताई सॉरी काय सॉरी.......तुझं बरोबर आहे , मलाच तर किती टेन्शन  होते, बरे झाले कोणाला काही कळले नाही ......आणि हे बघ मी लावलीये मेहेंदी" ...... माही अंजलीला आपले हाथ दाखवत होती.....

" रात्री तू इथे नव्हती, किती शोधले तुला , मग बाहेर त्या टेरेसवर दिसली ....मी येणारच होते की अर्जुन सर तिथे येताना दिसले ....म्हणून मग आले नाही"......अंजली

"अग तुझी झोपमोड होऊ नये म्हणून मी तिकडे जाऊन बसली होती मेहेंदी काढायला..... अर्जुन सरांचे लक्ष गेले... एकटी बसली होती म्हणून ते तिकडे आले होते" .......माही

"माही अर्जुन सर  तुझी खूप काळजी करतात ना...... काल सकाळी पण ते बरीच काळजी घेत होते तुझी.... ब्रेकफास्ट निंबुपाणी वगैरे मागवले तुझ्यासाठी....... तुझ्या डोळ्यात पण"........ अंजली काही बोलणार तेवढ्यात माहीने तिला थांबवलं

"ह्म्म.... खूप रिस्पेक्ट करते मी त्यांचा..... वेळोवेळी मला मदत केली.... माझा जीव वाचवला ......आज त्यांच्यामुळे मी ऑफिसमध्ये चांगल्या पदावर काम करते आहे" ........माही

"हो पण मला काहीतरी वेगळेच फिलींग येत आहे".........अंजली

" ये हे पण बिन काय लावत बसली आहे .......चल तुझी सगळे वाट बघत आहे"  .......माहीने विषय बदलला आणि तिला घेऊन ती खाली येत होती......

इकडे अर्जुन आणि आकाश मांडवामध्ये आले होते..... आकाशने लाईट येलो कलरचा कुर्ता त्यावर फ्लावरच वेस्टकोट जॅकेट घातला होता तर इकडे अर्जुनने मलमल कॉटनचा   फिटफिटिंगचा व्हाईट शर्ट आणि ट्राउजर घातले होते.... दोघेही त्यांच्या गेटअपमध्ये खूप हंड्सम दिसत होते..... दोघेही आलेल्या पाहुण्यांचा सोबत बोलत उभे होते.......

गोऱ्या गोऱ्या गालांवरी
चढली लाजंची लाली
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली

मधुर आवाजात गाणं सुरू झालं....तसे आकाश आणि अर्जुनचे  लक्ष अंजली आणि सोनिया येत होते तिकडे गेले...... दोघीजणी अप्सरे पेक्षा कमी दिसत नव्हत्या...... सोनियाने पिवळ्या रंगाचा घागराचोली तर अंजलीने पिवळ्या रंगाची साडी घातली होती......

आकाश तर अंजलीला बघण्यात मग्न झाला होता ....... अर्जुनचे मात्र लक्ष अंजलीच्या मागे येणाऱ्या माहीवर टिकलं होतं......... माही सुद्धा खूप गोड दिसत होती..... तिने येलो कलर लॉन्ग फुल फ्लेयर  अनारकली ड्रेस घातला होता.... वन साईड प्लेन शिफॉनची ओढणी....दोन्ही साईडने थोडे केस वरती घेऊन तिने  कीलीपांमध्ये अडकवले होते आणि बाकीचे मोकळे सोडले होते.... कपाळावर छोटीशी टिकली........ त्यात ती फारच क्युट दिसत होती....

अनन्या आणि श्रियाने पुढे येत दोघींचे हात पकडून त्यांना चौरंगावर नेऊन बसवले.......

"आकाश तोंड बंद कर माशी जाईल" ..... आशुतोष आकाशची गंमत घेत त्याला अंजलीच्या अपोझिट साईड ठेवलेल्या चौरंगावर नेऊन बसवलं........

" अर्जुन साहेब तुमची होणारी राणी ईकडे आहे तिकडे नाही"...... माहीला बघत असलेल्या अर्जुनची तंद्री भंग करत आशुतोष बोलला....

"अ....... हो..."....... अर्जुनने आपली मान वळवली

"ये दादा चल ना ....वेळ होतोय ."....श्रियाने अर्जुनचा हात पकडा त्याला ओढत नेत  सोनियाच्या अपोजिट ठेवलेल्या चौरंगावर बसवलं......आता अंजली आणि सोनिया तिकडे आकाश आणि अर्जुन अगदी एकमेकांच्या अपोजिट बसले होते त्यामुळे ते एकमेकांना आरामात बघू शकत होते.......

" सुंदर दिसत आहेस"...... आकाशने हाताने अंजलीला खुणावले,  त्याला तसं करताना बघून अंजली लाजली आणि खाली बघायला लागली....

इकडे सोनियाने साईड पोज .....वेगवेगळे एक्सप्रेशन्स करून अर्जुनला हातानेच विचारले की मी कशी दिसते आहे....

" नाइस.." .......... अर्जुनने  मान हलविली

सोनियाने तिथूनच हाताने त्याला फ्लाईंग किस दिले.......
तिला बघून अर्जुनने इकडे तिकडे बघत कसातरी चेहरा केला.......माहिचे मात्र सगळं लक्ष सोनिया आणि अर्जुनवर होते......... ती केविलवाण्या नजरेने त्यांना बघत होती.....

" भाई......you are so lucky yar.......नाहीतर आमचं ध्यान लाजण्यातच पूर्ण दिवस घालवते" ....... सोनियाला फ्लाईंग किस देताना पाहून आकाश बोलला.

" खरंच....?????.......किती अक्वरड आहे हे सगळं." ......अर्जुन

" अर्जुन साहेब जरा स्माईल आणा चेहऱ्यावर , असं वाटत आहे जबरदस्ती बसवले तुम्हाला." ....... आशुतोष त्याचा खेचायचा एकही चान्स सोडत नव्हता...

" हो आणि हा...... अतिउत्साही माणसा .....जरा कमी.... फारच हर्षवायू झाल्यासारखा दिसत आहेस तू" ........श्रिया आकाशला चिडवत होती.....

" या सगळ्यांचे  ना वेगळेच प्रॉब्लेम्स...... हसले तरी प्रॉब्लेम..... शांत बसले तरी प्रॉब्लेम....... मला तर असं वाटत आहे कुठल्या तरी सर्कस मध्ये आलो  आहे आपण" ........ अर्जून

* हाहाहाहा....... लग्न म्हणजे आयुष्यभराची सर्कस असते ..... कळेल कळेल तुम्हालाही कळेल..... पण आता जरा आनंदाने सहभागी व्हा........ फोटो वगैरे बीघडायचे नाही तर" .......आशुतोष

मामीने अर्जुन आणि आकाशचे औक्षण केले...... नंतर आजी-आई अनन्या श्रिया....जमलेल्या बायका...... सगळ्याजणी एकेक करून दोघांनाही हळद लावत होत्या......

इकडे अंजली आणि सोनियाचा आयांनी सुद्धा त्यांचे औक्षण केले........ आणि हळद लावायला सुरूवात केली.... सगळ्यांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.....

अर्जुनने माहीचा आनंदासाठी सोनिया सोबत होणारे लग्न स्वीकारले होते....आणि म्हणूनच ..कोणाला फालतू काही डाऊट नको म्हणून..अर्जुन सुद्धा चेहऱ्यावर स्मायल करत हळद लावणाऱ्यांचा मान ठेवत होता.....पण तेवढेच त्याचे माहीकडे सुद्धा लक्ष होते.... अर्जुनची हळद बघून माहीचे हृदय मात्र खूप जड झालं होतं...... ती एका साईडला जाऊन उभी राहिली....

सजणी मैत्रीणी
जमल्या अंगणी
चढली तोरणं मांडवदारी
किणकिण कांकणं
रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली

गोऱ्या गोऱ्या गालांवरी
चढली लाजंची लाली
गं पोरी नवरी आली
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी
गं पोरी नवरी आली
 

" माहि..... तिकडे काय करते आहेस,  इकडे ये आकाशला हळद लावायला.......तू त्याची होणारी साळी आहेस.....तुझा तर  पहिला हक्क बनतो....... तू तर त्याला हळद लावायला हवी" .........आजी

" अ.....हो." ........ माही तिथे आकाशजवळ आली......तिने त्याला हळद लावली.......आणि मागे जाताच होती की अनन्याने आवाज दिला....

" अग अर्जुनला पण लाव.........त्याला बिचाऱ्याला साळी नाही.....त्याची हाऊस पूर्ण करावी लागेल ना...... आफ्टर ऑल तुझा खडूस  बॉस पण आहे तो, तुझा हक्क आहे त्याच्यावर " ...........अनन्या
 

" हा..??" ............माही  कधी अर्जुनकडे कधी अनन्याकडे बघत होती.........अर्जुन सुद्धा माहीकडेच बघत होता......

अनन्याच्या वाक्याने माहीचा कंठ दाटून आला.....तिच्या डोळ्यात पाणी जमायला लागले होते....तिची पुढे जायची हिंमत होत नव्हती.....ती खूप असह्य नजरेने अर्जुंकडे बघत होती.

माहीने नजरेनेच अर्जुनला ' नाही जमत आहे "  म्हणून सांगितले........
तिची ती पाणावलेली  नजर... तिचं ते नाहीच इशारा...तिला होणारा त्रास बघून कोणीतरी  त्याच्या हृदयावर  घाव घालत आहे असे त्याला वाटत होते...   अर्जुनने २ सेकंदसाठी डोळे बंद केले नि एक श्वास घेतला.....नी मग डोळ्यांनीच तिला जवळ ये म्हणून खुणावले.........

" माही.....जा..... वाट कशाची बघतेय." ......आई

" हो...." .......माही अर्जुनकडे जात होती पण तिची पावले खूप जड झाली होती.......मन खूप भरून आले होते.....हृदय जोरजोराने धडधडायला लागले होते.......ती अर्जुनचा पुढ्यात जाऊन खाली आपल्या टोंगळ्यांवर बसली........आणि अर्जूनचा डोळ्यांमध्ये बघत होती.......अर्जुनला तिला होणारा त्रास कळत होता.....तिला आपल्या जवळ घेऊन तिचं मन शांत करावे त्याला वाटत होते पण त्याचा नाईलाज होता..... तो शांत  बसला होता ...... माहीने आपली नजर खाली केली......हळदीच्या भांड्याजवळ खाली झुकून हळद घेत होती.....हळद घेतांना तिचे हात थरथर कापत होते.......... आता तिला तिचा त्रास सहन झाला नाही आणि  आतापर्यंत डोळ्यात  जमा झालेले पाणी....एक अश्रू बनून तिच्या गालावर ओघळत...... खाली अर्जुनचा पायावर पडला......... तिच्या अश्रूच्या स्पर्शाने अर्जुनचा काळजातून असह्य अशी एक दुखरी कळ गेली....... पण तो कमजोर पडू शकत नव्हता......तो जर कमजोर पडला तर माही स्वतःला सावरू शकणार नव्हती........आणि त्याने आपल्या चेहऱ्यावर स्मायल आणले.......माहीने हळद आपल्या हातात घेतली आणि  मान वर करत  भरल्या डोळ्यांनीच अर्जुनकडे बघितले.........

"माही नाही.."........अर्जुनने मान हलवली नी डोळ्यांनीच तिला रडू नको म्हणून खुणावले.....नी हातातली हळद लाव सांगितले........

तिने तिचा हात अर्जुनाच्या गाला जवळ नेला.......तिचा हाथ जवळ येताना बघून  त्याचे डोळे आपोआप  मिटल्या गेले .........माहिने हातातल्या हळदीच्या आपल्या तीन बोटांनी त्याच्या गालाला स्पर्श केला.....तिच्या त्या स्पर्शाने त्याच्या ओठांवर गोड हसू पसरले......तो तिच्या हाथाचा तो गोड  स्पर्श अनुभवत होता..... त्याने आपले डोळे उघडले ..........माही तिचा हाथ मागे घेणार तोच अर्जुनने हसतच त्याचा दुसरा गाल समोर केला....त्याला तसे करतांना बघून माहिचे ती  गुलाबांच्या पाखाळ्या सारखे  ओठ थोडे  रुंदावले..... माहीने त्याच्या दुसऱ्या गालाला पण हळद लावली............अर्जुनने आपल्याच गालावरची एका बोटाने हळद घेऊन माहिच्या नाकाला हलकाच स्पर्श केला......त्याच्या त्या एका स्पर्शाने माहीच्या डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू उमटले  होते......

" अगं काय झालं तुझ्या डोळ्यात पाणी का??..... हळद लावली म्हणून अर्जुन तुला रागावणार नाही,  don't worry" ......... माही उभी होत बाजूला जात होती की अनन्याने तिला अडवलं....

" ना...ही....ते......डोळ्यात.......बहुतेक .....हळद..." ..... माहिच्या गळ्यातून आवाज निघत नव्हता .....ती कसतरी अर्धवट बोलून  बाजूला होत, बाकीच्यांचे लक्ष चुकऊन तिने तिथून पळ काढला.....

सासरी मिळू दे तुला माहेराची माया
माहेराच्या माये संगं सुखाची ग छाया
भरुनीया आलं डोळं
जड जीव झाला
जड जीव झाला
लेक जाय सासराला
किणकिण कांकणं
रुणझुण पैंजणं
सजली नटली नवरी आली
आनंदाच्या सरी तुझ्या बरसु दे घरी दारी...
ग पोरी सुखाच्या सरी...
सनईच्या सुरांमंदी
चौघडा बोलतो दारी
ग पोरी नवरी आली

आता हळद लावून झाली होती......... हळदीचे खेळ सुद्धा खेळून झाले होते,  आता वेळ झाली होती फोटो सेशनची....... आकाश आणि अंजली  फोटोग्राफर सांगेल तसं फोटोशुट सुरु होता.....

तिकडे सोनियाने सुद्धा फोटोग्राफरला भारी भारी आयडीया देऊन त्यांचे फोटो काढून घेत होती........ अर्जुन मात्र निर्विकारपणे उभा होता ..... माही त्याला कुठेच दिसत नव्हती,  त्याची नजर इकडे तिकडे माहिला शोधत होती.......... सोनिया अर्जुनला पकडून वेगवेगळे पोझ देत फोटो काढत होती......तिने फोटोग्राफरच्या कानात काहीतरी सांगितला. दोन मिनिटातच सोनिया आणि अर्जुनच्या डोक्यावरून त्यांच्या अंगावर पाणी पडलं..... आणि हे इतक्या अचानक झाले होते की काय झालं ते अर्जुनला कळलेच नाही.....आणि अर्जुनने सोनियाकडे बघितलं....हळदीचे अंग, आजूबाजूचा पिवळा सोनेरी परिसर आणि वरतून पडणार पाणी.....खूप छान असा तो देखावा झाला होता... आणि हाच डाव साधून फोटोग्राफरने पटापट त्यांचे फोटो क्लिक केले........

आता तिथे डीजेचे , हाय म्युझिक सुरू झाले.  सगळ्यांनी एक गलका केला आणि त्या गाण्यांवर नाचायला सुरुवात झाली...... मोठी लोक आपापले आवरायला आपल्या रूममध्ये निघून आले  , बाकी सगळे तिथेच लॉनमध्ये नाचत मस्ती करत होते..........

" I am feeling cold.......I am going to change "  .......... अर्जुन

" Oh Arjun ,join us here.........you will not feel cold" ......... सोनिया त्याला तिथे डान्समध्ये जॉईन करायला सांगत होती...

" Soniya I am leaving now.......you enjoy..."... अर्जुन थोड्या कडक आवाजात बोलला........तसं पण त्याला माही  बऱ्याच वेळा पासून दिसली नव्हती तर त्याचे   तिथे मन लागत नव्हतं आणि तो तिथून माहिला शोधायला बाहेर पडला............ त्याने आजूबाजूला बघितलं पण माही त्याला कुठेच दिसत नव्हती आणि मग अचानक त्याला एक जागा आठवली आणि  पळतच तो तिथे आला..........

माही रिसॉर्टच्या मागच्या भागात एका कॉर्नरला जिथून लोणावळ्याच्या सुंदर  सौंदर्य दिसते तिथे उभी होती........

" Mahi...... are you okay........?????." .. अर्जुन

अर्जुनच्या आवाजाने माही तंद्रीतून बाहेर आली आणि ती मागे वळली.........

अर्जुनचे  डोकं आणि शर्ट पाण्याने पूर्ण ओले झाले होते आणि तो त्याच अवस्थेत तिथे उभा होता.......... आधीच थंड हवेचे ठिकाण, सकाळची वेळ ......त्यात अधून मधून  थंड वार्‍याची झुळूक येत होती.

" सर तुम्ही इथे आणि हे काय तुम्ही ओले कसे काय झाले?? आणि तुम्ही इथे का आले?? ......इथे किती हवा सुरू आहे....... तुम्हाला थंडी वाटत नाहीये काय??" .......... माहीने आपली ओढणी हातात घेतली आणि त्याच्या डोक्यावर टाकली आणि त्याचे केस डोकं पुसु लागली.........  तिच्या डोळ्यात त्याला त्याच्याबद्दलची काळजी दिसत होती......

" माही........I am perfectly fine......... तू ठीक आहेस ना........."

तिने त्याचा हात पकडला आणि त्याला सूर्याची किरणे येत होती तिथे घेऊन गेली आणि उन्हामध्ये त्याला उभं केलं.........

" फाइन म्हणे....... अंग किती थरथरते आहे ते कळत नाही आहे......अशी कधी  हळद असते काय??....इतक्या थंडीमध्ये कोणी अस पाणी टाकत असत काय??" ..........माही बडबड करतच त्याच्या ओल्या शर्टाच्या एक एक करून  बटन काढत होती.......ओला झाल्यामुळे त्याचा शर्ट त्याच्या शरीराला  चीपकला होता.......तिने त्याचा शर्ट काढला होता......

" किती त्रास देतात आहे तुम्हाला??........मला कळत नाही काय.......का देतात आहे तुम्हाला त्रास??......अशी कुठे हळद असते काय???" .......माहीला हळदीच्या वेळेचे  सगळं  आठवत होते,  नि ती  बडबड करत आपल्या ओढणीने त्याच अंग पुसत होती........तो फक्त तिच्याकडे बघत होता.....त्याने एक दोनदा तिला आवाज दिला पण ती आपलीच एकटी बोलत होती.......त्याच तिला ऐकूच जात नव्हते.....

" माही.!!!" .....त्याने तिचा हाथ पकडला........तशी ती अंग पुसायची थांबली.....

"माही वरती बघ माझा कडे........" ......

माहीने वरती त्याच्याकडे बघितले...........नी तिच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले...........

"कोण देताय मला त्रास..........????."....अर्जुन

" मी........"........रडक्या आवाजात माही बोलली

" Shhss!!!" ........तिचे डोळे पुसत त्याने तिला आपल्या मिठीत ओढले...........नी तिच्या डोक्यावरून हाथ फिरवत होता......

" माही.....तू जर अशी करशील तर मला लग्न करायला खूप जड जाईल ग.........तुझ्याकडे बघून मी हे लग्न करतोय......तुझ्या डोळ्यातला एक थेंब सुद्धा.....it break my heart , are you getting me???.....your one drop of tear.....it's breaking me" .......... अर्जून

" माही....सोनिया deserves better....... तिला माहिती असायला हवं......atleast माझ्या बद्दल तरी" .........अर्जुन

माही अजूनही त्याचा मिठीत त्याला घट्ट पकडून रडतच होती.........थोडा वेळ तो तिला घेऊन तसाच उभा होता...

" माही मी शर्टलेस आहो.........तशी मला थंडी वाजत नाही........आणि तुझी जर इच्छा असेल तर मी पूर्ण आयुष्य असेच कायमचे तुला माझ्याजवळ पकडून  राहायला सुद्धा तयार आहो......तुला मी आवडतोय काय असा शर्टलेस???" ..........माही रडणं थांबवत नाहीये बघून तो तिला हसावण्यासाठी काहीतरी बोलला....

" काय........???."......माही

" मी शर्ट घातलेला नाहीये......नी तू मला तशीच चीपकलिये.." ...

" हा.....?"........ माहीने आपल्या हाताकडे बघितले तर त्याचा शर्ट तिच्या हातात होता........ती पटकन त्याच्या दूर झाली....डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती......नी आपला चेहरा पलीकडे वळवला......तिला तसे करतांना बघून त्याला हसायला आले........

"Anyways I got my wedding gift"....... अर्जून

" काय.....???" ..... माही

" Look at me." .......... अर्जुन

माहीने वळून बघितले.....त्याने तिची मऊसूत ओढणी आपल्या गळ्यातून पुढे घेतली होती......

" माझी ओढणी........तिने हाथ पुढे केला....." ...

" No....... I already told you....now this is mine......" ..

" बरं चल आता इथून...." .....अर्जुन

" तुम्ही जा पुढे, मी आलेच....." ..

" Sure ..........

" हो........

" Okay..." .... तो जायला मागे वळला....

" आणि हो, soniya madam dersves best,  she deserves you....." .....

तिच्या त्या वाक्याने तो जायचा जागीच तसाच पाठमोरा थांबला.....

" मी आता कमजोर नाही पडणार.....आणि तुम्ही सोनिया मॅडमचा मनाला लागेल अस काही करणार नाही आहात......त्यांना जे सांगायचं ते सांगा पण हळूहळू त्यांना विश्वासात घेऊन......तुम्ही लग्न करणार आहात..".......माही

" ह्म्म्म........" ....अर्जुन तीच ऐकून तिथून निघून गेला...

*****
क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️