तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 44

अर्जून माही

भाग 44

"काय ब्रो काय झालं??..... गुमसुम  गुमसुम.......तीकडले पण वातावरण बिघडले दिसत आहे"......... श्रिया आकाशचा डोक्यावर टपली मारत त्याच्या जवळ येऊन बसली.......

"ह्म्म.... चिडले आहे सरकार".........आकाश

बाकीचे हसायला लागले.......

"तुम्ही हसतात आहात......इकडे माझी वाट लागलीय"......आकाश

"अरे हो पण झालं काय ते तर सांगशील?".........श्रिया

"म्हणून म्हणतो मी.....पण कोणी ऐकतच नाही माझं".......आशुतोष

"अहो पण काय?".........श्रिया

"हेच की बायको समोर पार्टी नाही करायची".......अशितोष

अर्जुनने लॅपटॉप मधून डोकं वर काढत त्यांच्याकडे बघितले ...आणि त्याला त्यांचे बिचारे चेहरे बघून हसू येत होते.

"तू तर हसूच नको....तुझ्यामुळेच झालंय हे? .....तुला एखादा पेग घ्यायला काय झालं होत......???".. आशुतोष

"सिरीयसली.......???"..…... अर्जून

"हो मग नाही तर काय......सकाळपासून  ऐकून आमचे कान दुखले ....अर्जुन बघ ..त्यानं एकतरी ड्रिंक घेतले काय".......आशुतोष

"हो ना भाई.......अंजली किती चिडली आहे......म्हणत होती आधी माहिती असते तर विचार केला
असता.......ऐकतच नाहीये काही"........आकाश

"सूट दिली म्हणून त्याचा गैरवापर करायचा तरी कशाला.... लिमिट मध्ये ड्रिंक करायचं होते"...... अर्जून

"ताई मिरा कुठे आहे.  ??."..... माही आपला डोकं पकडत सगळे होते तिथे आली नि अंजली जवळ बसली

"रुही सोबत कार्टून बघतेय आजींचा रूममध्ये"..........अंजली वाकडं तोंड करत बोलली...

"यार ताई चिडू नको ना .....एकतर माझं डोकं खूप भारी होतेय"......माही

"तू बोलूच नको माझ्यासोबत..........आई आत्याबाईनना माहिती झालं तर तुला माहिती काय होईल"........अंजली

"माही मॅडम इकडे या.......सगळे हँगओव्हर वाले इकडे आहेत......तिकडे ऑप्पोझिशन्स वाले आहेत"..........आशुतोष

"हा........मला तर काहीच आठवत नाही आहे .....मी कधीच पित नाही...पण मग काल कशी पिली.......  मी रूममध्ये कशी पोहोचली...आsss डोकं दुखतेय" .......माही डोकं पकडून बसली

"वेटर..........".अर्जुनने वेटरला आवाज देऊन त्याला काहीतरी सांगितले.......वेटरने निंबू पाणी आणि हेवी ब्रेकफास्ट माहि समोर आणून ठेवला.......

"मी तर नाही केले काही ऑर्डर?"........... माही वेटर कडे बघत होती

"माही ड्रिंक इट, यू विल फील बेटर"........अर्जुन

माही अर्जुनकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती...

"अग घे ते तुला बरं वाटेल".....आकाश

"Why fear , when Arjun is hear....... काल अर्जुनने सगळ्या पिलेल्या महिलांना त्यांच्या त्यांच्या रूममध्ये पोहोचवायचं काम केले........... काय सोनिया मॅडम तुम्ही ठीक आहात ना??".......आशुतोष

"मला सवय आहे आशुतोष... मी ठीक आहे.".... सोनियाने हसतच उत्तर दिले

"बरं सगळे आराम करा आता....संध्याकाळी फुल एनेर्जी पाहिजे...... आणि होणाऱ्या नवरिंनो स्पेशली तुम्ही... आकाश अर्जुनची तर विकेटच गेली पाहिजे तुम्हाला बघून".....अनन्या

"काय ताई हा अनरोमँटिक   , स्वर्गातून अप्सरा जरी आल्या तरी ह्याची तपस्या कोणीच भंग करू शकणार नाही".......सोनिया

"होईल होईल ......मिरॅकल्स होत असतात..... होईल".......आशुतोष
 

"Hope so......anyways I am going .... need to look beautiful tonight........ Arjun baby ????????????......see you soon"....... सोनिया अर्जुनकडे बघत त्याला फ्लाइंग कीस देत तिथून पळाली....... अर्जुन मात्र सोनियकडे कसातरी चेहरा करत त्रासक नजरेने बघत होता.......

"ओ sssss.......someone getting bunch of kisses"........ श्रिया , अनन्या

" ये ना ना ना....ते काय होत...हा.......who will dare to touch me" ......... अनन्या

" ये ताई, आता ते कसं होईल माहिती काय.......who will dare to kiss me" ......... श्रिया अनन्या एकमेकींना टाळ्या देत हसत होत्या...

"श्रिया."..........अर्जुन त्यांच्याकडे नजर रोखून बघत होता.....

"आहे आहे.....डेअरिंग करणारं आहे कोणीतरी........you never know but someone is there".......... आशुतोष एकदा माहिकडे बघत अर्जुनकडे बघत बोलत हसत होता......

आशुतोषच बोलणं ऐकून माहीला खूप जोरदार ठसका लागला........त्यामुळे तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं...........

"Are you....".... अर्जून त्याच्या जागेवरून उठतच काही बोलणार तेवढ्यात आशुतोषने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे पकडला.........

"Are you okay little sister..??"...... आशुतोषने  तिच्या हातात पाण्याचा ग्लास दिला आणि तिच्या पाठीवरून हात फिरवला ........अर्जुन परत आपल्या जागेवर बसला....

"ह्म्म" ........माहीने पाणी पितच होकारार्थी मान हलवली

"इकडे अजून काही पॅचप झालेले दिसत नाही आहे रे बाबा"......आशुतोष आकाश आणि अंजली कडे इशारा करत बोलला.....

"अंजली सोडू पण नको अशी सहजासहजी..... हम तुम्हारे साथ है".......अनन्या अंजलीला एक डोळा मारत बोलली

"अरे काय तुम्ही आगीत तेल ओतत आहात......  माझी तर विकेट आधीच गेली आहे...... मला तर बॅटिंगचा पण चान्स नाही दिला.... बॉलिंग करून करूनच मला गोल केला........ यार अंजली प्लीज ऐक ना..... तू म्हणशील तर मी आता कधीच ड्रिंक करणार नाही....... ऐक ना गं" ........ अंजली पुढे पुढे गेली.... तिच्या मागे आकाश तिला मनावत  जात होता........

श्रियाचा फोन वाजला तशी ती फोन पिक्कप करत बाहेर गेली.......आशुतोषने पण काही काम सांगून अनन्याला घेऊन तिथून पसार झाला......आता फक्त अर्जुन नी माही तिथे उरले होते........अर्जुन लॅपटॉप वर काही काम करत बसला होता ..... माहि आपल्याच विश्वात नाश्ता करत बसली होती म्हणून तो मुद्दाम  तिला कंपनी म्हणून कामाचं निमित्त्य काढून तिथे बसला होता.....काम करत असताना सुद्धा त्याच सगळं लक्ष माहीकडेच होते....

"माही तू कशी काय एवढी बावळट सारखी वागू शकते..... कसं काय एवढ ड्रिंक केले की काल काय झालं ते आठवतच नाही आहे ..... काही फालतूची बडबड , धिंगाणा तर नाही केला न तू??.......हा काय प्रश्न माही, पिल्यावर तर सगळेच धिंगाणा घालतात. तो गावात बाजूचा किती धिंगाणा घालायचा.......काही पागल सारखा बोलायचा........अरे यार अर्जुन सरांना मी पागल तर नसेल वाटत ना?? .....त्यांनीच मला रूममध्ये नेऊन घातलं........माही एकदा सरांना विचारू काय....,. काल काही गडबड तर नाही केली".........माही मनातच विचार करत अर्जुन समोर येऊन उभी होती.......

"बोल माही".............अर्जुन लॅपटॉपमध्ये बघत तिला बोलला

"सर....".............तिला कसं बोलायचं कळतं नव्हते...

"Yess............

"सर ते काल मी थोड ड्रिंक........

"थोड....?...थोड नाही खूप माही...........

"हा....???"......माही डोळे मोठे करत अर्जूनंकडे बघत होती

"ह्म्म......खूप........

"सर ......तुम्ही मला रूम मध्ये पोहचवले......???

"Yess..............

"सर मी काही उलटसुलट.....फालतू......काही........

"हो खूप बडबड करत होती.........खूप म्हणजे भयंकर च......तशी तू नेहमीच बडबड करत असते "....आता अर्जुंनला तिची मस्करी करण्याचा मुड झाला होता....

"काय???.......... क.....काय......बोलली...??.......

"माझ्या चेहऱ्यावर essay केला तू..".....

"Essay.......?"

"निबंध.............आणि काय ग माझे कान इतके danger वाटतात तुला......आणि काय मी खडूस........खडूस बॉस ??.............आणि काय....काय होत ते...हा........मी तुला किस करत नाही??"...........अर्जुनने हातातला लॅपटॉप बाजूला ठेवला......नी उठत तिच्या जवळ जात होता.....माही नेहमी प्रमाणे मागे मागे जात होती..........

"तुझी कम्प्लेंट होती की मी तुला किस करत नाही.......तुला आवडेल मी तुला किस केले तर......?????"...अर्जुन तिच्या नजरेला नजर मिळवत बोलत होता......

"ह..??".......माहीचे तर डोकेच आता ब्लँक झाले होते......काय बोलावं तिला सुचतच नव्हते

"सांग ना....... आवडेल तुला ......मी किस केलेलं??"...........

"हो.......म्हणजे नाही........हा म्हणजे...........नाही...."....तो इतका जवळ आला होता की माहीला आता काही बोलल्या नव्हते जात......फक्त एकटक त्याच्याकडे बघत होती.......

" बावळट वेडाबाई......किती टेन्शन घेते........तू pure heart person आहेस.......खूप innocent , शुद्धीत नसतांनाही..तू खूप innocent होती " ........त्याने  बोटाने तिच्या नाकाला हळूच धक्का दिला नी स्मायल करत मागे वळला लॅपटॉप घ्यायला...

त्याला स्मायल करतांना बघून तिच्या पण चेहऱ्यावर नकळत स्मायल आलं.........नी काहीतरी आठवून

"सर.........

"हा माही..".....अर्जुन तिच्याकडे बघत मागे वळला

"सर.....ते....ते......"

"माही........".......

"ते.....ते....मी तुम्हाला खडूस म्हणाली तर तुम्ही मला नोकरी वरून तर नाही काढणार ना...??".........

तिच्या विचारलेल्या प्रश्न ऐकून अर्जुनने डोक्यावर हात मारला....

"माही मला आता तू खरं खरं सांग.........देव अक्कल वाटत होता तेव्हा तू काय करत होती???"...........

"हां......??""......

"आता जर परत असे प्रश्न विचारले ना तर खरंच काढेल आहे....."........

"म्म...." ...माही मान खाली घालून उभी होती

तिचा उतरलेला चेहरा त्याला बघावल्या नाही गेला .......नी तो तिच्या जवळ गेला.....

"माही..".......त्याने तिला प्रेमाने हळूवारपणे आवाज दिला..... माही चुपचाप खाली बघत उभी होती

"माही.....इकडे माझ्याकडे बघ."........त्याने त्याच्या एका बोटाने तिचा हनुवटीला पकडून तिचा चेहरा वर केला......

"का अशी नेहमी घाबरलेली असते??........का या भीतीमध्ये जगत असते की कोणी मला घरातून काढेल....जॉब वरून काढेल.......मला सोडून जाईल???.........नको अशी घाबरत जगु.......मी आहो ना नेहमीच तुझ्या सोबत....पण तुला सांगू तू खूप स्ट्रोंग आहेस....माझ्यापेक्षा पण.....तुला माझीच काय कुणाचीच गरज नाही इतकी तू स्थिर आहेस.....इतकी तू मजबूत आहेस............तू सगळ्या नात्यांना सांभाळते......घरातल्या लोकांसाठी आपलं सुख, आपला आनंद  पणाला लावतेस.........ऑफिसमध्ये पण खूप चांगलं काम करते....का कोणी तुला काढेल??" ......अर्जुन तिचा एक हाथ आपल्या दोन्ही हातात पकडत बोलत होता...... ...

"तुला माहितीये तू किती गोड आहेस???"......बोलतच अर्जुन तिच्या गालाजवळ खाली झुकला नी तिला किस करणार.... तेवढयात आपला मोह आवरून मागे आला ....नी पकडलेला तिचा हाथ वरती घेत तिच्या हातावर किस केले......

" संध्याकाळ पर्यंत पेपर्स रेडी होतील.......नमन घेऊन येईल ... साइन कर ते........कोणीच तुला ऑफिस मधून कधीच काढू शकणार नाही......मी पण नाही...... ओके" .......अर्जुन तिच्या एका गालावर आपल्या हाताने थोपटत बोलला......"जा आता आराम कर..".

माही फक्त त्याच्याकडे बघत त्याच ऐकत होती

"माही.......जा.......".

"अ.....हो...........ती मागे वळून अर्जुनकडे बघत बघत पुढे जात होती..........ती दिसेनाशी होत पर्यंत अर्जुन तिथेच तिला बघत उभा होता.....
 

******

मेहेंदी फंक्शनची सगळी तयारी झाली होती......मेहंदीचा थीम नुसार हॉल च सजावट केली गेली होती.....रंगीबिरंगी पडद्याचे  डेकोरेशन.....बसायला सगळ्यांना चारपाई.....लाइट्स नी स्लो सॉफ्ट मुझिक

....दोघी होणाऱ्या भावी वधू आपापल्या जागेवर जाऊन बसल्या.....दोघीही खूप सुंदर दिसत होत्या....एकिने हिरवा तर एकिने लाल घागरा घातला होता...त्यावर फुलांची दागिने......दोन्ही आयांनी आपापल्या मुलींची औक्षावान केले नि मग मेहंदी काढायला आलेल्या मुलींना हळद कुंकू लावून मेहेंदी काढायला सुरूवात केली.........
 

श्रिया आणि अनन्याने जबरदस्तीने आकाश नी अर्जुंनला अंजली नी सोनिया जवळ आणून बसविले होते.....आकाश तर तसा उतविळच होता अंजली जवळ बसायला पण अर्जुन मात्र खूप जबरदस्तीने तिथे बसला होता.......

"अर्जुन मी कशी दिसतेय.".....सोनिया

"Nice......"... अर्जून

"अर्जुन माझी मेहेंदी???"........सोनिया त्याला आपली मेहेंदी दाखवत होती

"नाइस सोनिया"..........अर्जुन ...अर्जुनची नजर मात्र माहीला शोधत होती....... माही एका कॉर्नरमध्ये बसून मिराचा हातावर मेहंदी काढण्यात गुंग झाली होती........ माही नजरेस पडली...तसे त्याला बरे वाटले....आणि मग तो बकीच्यासोबत बोलण्यात व्यस्त झाला....

बाकी सगळे महिला मंडळ आपापल्या हातावर मेहेंदीवाल्यांकडून मेहेंदी काढून घेत होत्या.....पुरुष मंडळींच्या गप्पा रंगल्या होत्या....

"अंजली.... लूकिंग gorgeous हा.".......आकाश

"ह्म्म"......अंजलीने आपलं चेहरा दुसरीकडे वळवला.....

"अंजली.... सॉरी ना.....इतकी रुसून बसणार आहेस काय आता?"........आकाश

"ब्रो, सॉलव नाही वाटते अजून??"......श्रिया

"हो ना......चल काहीतरी करूया म्हणत तो तिथून उठून गेला......".

"ताई किती सुंदर मेहेंदी."......माही अंजली जवळ येऊन बसत बोलली......

"अर्जुन ssss."........आवाज देत..मिरा  पळतच अर्जुन जवळ गेली.....नी आपले मेहेंदी काढलेले चुटुकले पुटुकले हाथ अर्जुनला दखवत होती

"अरे वाह ,मीराची तर मेहेंदी सगळ्यात सुंदर आहे"......अर्जुनने तिला आपल्या मांडीवर बसवले........

"माऊने काढून दिली".........मिरा

"खूप क्युट आहे ,मिरा सारखी.".....अर्जुन

आणि तेवढयात मुझिक बदललं नी आकाश आपल्या मित्रांसोबत समोर येऊन उभा राहिला......नी त्यांच्यासमोर मग सोनियाच्या मैत्रिणी , अनन्यने माहीला सुद्धा ओढत समोर उभ केले होते........

आकाशने डान्स सुरू केला..........त्याला डान्स करताना बघून अंजलीचा तर राग कुठल्या कुठे पळाला होता......ती पण हसत एन्जॉय करत होती....

ये कुड़ियाँ, नशे दियाँ पुड़ियाँ

ये मुण्डे, गली ते गुंडे

नशे दियाँ पुड़ियाँ

गली दे गुंडे

मेहँदी लगा के रखना,

डोली सजा के रखना

लेने तुझे ओ गोरी,

आएँगे तेरे सजना

सहरा सजा के रखना,

चेहरा छुपा के रखना

ये दिल की बात अपने,

दिल में दबा के रखना

आकाश अंजली जवळ जाऊन थोडा कंबरेमध्ये खाली वाकून त्याने अंजली समोर आपला एक हाथ पुढे केला.......अंजलीने वेळ न घेता आपला हाथ त्याचा हातात दिला.......

उड़-उड़ के तेरी ज़ुल्फ़ें,

करती हैं क्या इशारे

दिल थाम के खड़े हैं,

आशिक़ सभी कंवारे

छुप जाएँ सारी कुड़ियाँ,

घर में शरम के मारे

गाँव में आ गए हैं,

पागल शहर के सारे

नज़रें झुका के रखना,

दामन बचा के रखना

लेने तुझे ओ गोरी...

आकाशने आशुतोषला पण हाथ धरून मधात आणले होते....

आशुतोष अनन्या जवळ जात...

मैं इक जवान लड़का,

तु इक हसीन लड़की

ये दिल मचल गया तो,

मेरा क़ुसूर क्या है

अनन्याने आता सोनियाचा हात पकडून उठवले होते...

सोनिया अर्जुंन जवळ जात....

रखना था दिल पे क़ाबू,

ये हुस्न तो है जादू

जादू ये चल गया तो,

मेरा क़ुसूर क्या है

रस्ता हमारा तकना,

दरवाज़ा खुल्ला रखना

लेने तुझे ओ गोरी,

आएँगे तेरे सजना

अर्जुन अधून मधून माहिकडे बघत होता......

कुछ और अब न कहना,

कुछ और अब न करना

ये दिल की बात अपने..

दिल में दबा के रखना

आता मामा मामी पण जॉईन झाले होते....

ऐ मेरी जोहरजाबी

तुझे मलूम नही

तू अभी तक है हसी

Aur मै जवान

तुझपे कुरबान

मेरी जान  मेरी जान

अर्जुन मिराला घेऊन उभा होता नि सगळे त्याच्या भोवती नाचत होते....सगळ्यांनी खूप धमाल केली.

मेंहदी लगा के रखना,

डोली सज़ा के रखना

सेहरा सज़ा के रखना,

चेहरा छुपा के रखना

शाबा... ओए..ओए..ओए.. ओए.
 

"अर्जुन बघ ,ना ज्यांच्या हातांना मेहेंदी आहे , त्यांचे नवरे, आकाशसुद्धा अंजलीला खाऊ घालत आहे.....तू मला खाऊ घाल??".......सोनिया अर्जुन जवळ येत बोलली....

हाताला मेहेंदी असल्यामुळे आकाश अंजलीला, आशुतोष अनन्याला आपल्या हाताने खाऊ घालत होते, ते बघून सोनिया पण अर्जुन जवळ आली होती....

"सोनिया तुला माहिती मी अस काही करणार नाही आहे".......अर्जुन

"अर्जुन बेबी.......प्लीज".......सोनिया लाडात येत बोलली

"Seriously?".......... अर्जुन

"प्लीज प्लीज प्लीज....... ऐवढा हट्ट नाही पुरवणार माझा??.....मी कुठे तुझं लाईफ मागते आहे" .........सोनिया

"Okay....fine"........... अर्जुनने एक चमचा मध्ये राइस घेतले नि तो तिला खाऊ घालणार की त्याची आजूबाजूला नजर गेली,  तर सगळे आ फाडून स्टचू सारखे डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होते......

"व्हॉट............?????" अर्जुन

"अर्जुन......the Arjun patwardhan खाऊ घालतोय ??"........अनन्या

"ओ ssss."......श्रिया अनन्या

अर्जुन कसेनुसे तोंड करत बघत होता....त्याची नजर माहीवर गेली तर ती पण त्यालाच बघत होती....त्यांची नजरानजर झाली तशी माहीने मान फिरवली नी गपचुप आपलं जेवण करत होती......

"सोनिया this is very akward for me.....this is the last one ....ask your mother or friend to feed you........I can't handle this" ..... म्हणत त्याने तिला एक घास भरवला नी तिथून गायब झाला....

त्याला तस अवघडलेले बघून सगळ्यांना हसायला आले.....आतापर्यंत हसू दाबून बसलेले तो गेल्या बरोबरच जोरजोराने हसायला लागले.....

"बरं झोपा आता....उद्या हळद आहे....लवकर उठाव लागेल".......नलिनी

"हो ग"".......अनन्या

"मेहंदीला निंबु साखर पाणी लावा बरं बरोबर......सकाळी बघुया कोणाचा नवरा जास्ती प्रेम करतो ते" ........अनन्या

"म्हणजे??"........सोनिया

"अग म्हणजे ज्याची मेहेंदी जास्ती रंगते ना तिचा नवरा तिच्यावर जास्ती प्रेम करतो असं म्हणतात" .....अनन्या

"ओह...... ओके" .........सोनिया

"अरे हे काय माही ...तू तर काढलीच नाही मेहेंदी?"......श्रिया

"हा...ते...काम.......आता काढते ना"....... माही

"अग पण आता त्या मेहेंदी काढणाऱ्या पण गेल्या"......अनन्या

"मला येते काढता....मी काढते माझी" ......माही

"बरं ठीक आहे ......नक्की काढ पण" .....अनन्या


"

हो.." ....माही


जेवण आटोपून

सगळे आपापल्या रूममध्ये आराम करायला गेले.......

अर्जुनला झोप येत नव्हती ,तो बाहेर बालकनीमध्ये उभा होता तर त्याच लक्ष एक कॉमन असलेल्या टेरेसकडे गेले तर माही तिथे झुल्यावर बसलेली त्याला दिसली....


"

तू इथे काय करते आहेस??....... बारा वाजले झोपायच ना आता??".........अर्जुन माही होती तिथे टेरेसवर येत बोलला


"

मी हे करते आहे" ..........ती आपले दोन्ही हात त्याच्या पुढे करत आनंदाने त्याला मेहेंदी दाखवत होती, तिने एका हातावर बारीक नक्षी काढली होती तर दुसऱ्या उजव्या हातावर मेहांदीचे ठिपके लाऊन बोटांना मेहंदी लावली होती..


"

सगळ्यासोबत का नाही काढली.???".....


"

काम होती ....नी मिरा पण होती ना."......


"

ह्म्म........इथे का बसली एकटी.??"......,


"

ते लाईटमुळे ताईची झोपमोड झाली असती म्हणून......पण झालच आहे जातेच आहे मी" ......


"

त्यांनी पायांवर पण काढली मेहेंदी..........तू नाही काढली??".....


"

माझे दोन्ही हात" ....तिने आपले दोन्ही हात त्याच्या पुढे केले...,.."पायावर नाही काढायला जमणार आता..... तस पण ठीक आहे येवढेच.......त्या नवरी बनणार आहेत.....त्यांनी तर लावायचाच हवी......मी थोडी नवरी........... ब.... न..ना.... र..". ...ती बोलतच होती की अर्जुन तिच्या पुढ्यात त्याच्या टोंगळ्यावर खाली बसला होता नि हातात मेहंदीच्या कोण घेतला होता......


"

मला येत तर नाही पण मी ट्राय करतोय" .......म्हणत त्याने तिचा नाजूक पाय आपल्या हातात पकडत स्वतःच्या  मांडीवर ठेवला.....नी तिच्या पायावर मधोमध एक ठिपक्यांचे छोटेसे फुल काढले नी पायाच्या समोरच्या बाजूने सरळ दोन लाईन काढून लाइनच्याच बाजूने ठिपके काढले......नंतर दुसरा पायावर बऱ्यापैकी मॅच करत सेम डिझाईन काढत होता.......त्याला तसे करतांना बघून तिच्या डोळ्यांतून पाणी खाली गालांवर ओघळले.....नी एक अश्रू त्याच्या हातावर पडला.....


"

तुला आवडते ना मेहेंदी काढायला.....मग....??" ...त्याने तिचे डोळे आपल्या बोटांनी पुसले....


"

Don't compromise your happiness atleast with these small small things........ okay???"......

तीच मन मात्र त्याला बघून भरून आले होते......

********

क्रमशः

🎭 Series Post

View all