Jan 22, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 42

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 42

भाग 42

अर्जुन माहीला घरी सोडून परत घरी आला.......

"अर्जुन .....इतका ओला कसा काय झाला??....आणि इतक्या घाईत कुठे गेला होता??" .......आई

"ह्म्म.....महत्वाचं काम होत" ...थोडा रुक्षपणे बोलतच तो वरती जायला निघाला.......त्याला काहीतरी आठवले नी तो परत  आला......

" आई , मघाशी ते न्यूज वरून तू अस का म्हणत होती की अशी मुलगी मला आपल्या घरी सून म्हणून आवडणार नाही.......आई तू इतक्या पुढारलेल्या विचारांची म्हणजे मला तरी वाटते......मी तुझ्याकडुन अशी अपेक्षा नव्हती केली" ........अर्जुन

"अर्जुन मला पण कळते...वाईटही  वाटते.....पण ना मी माझ्या आयुष्यात सरळ आनंदी आयुष्यच  अनुभवले नाही की जगले नाही .....भीती वाटते या खडतर वाटांची......तुला तर माहिती आहेच सगळं......इतकं भोगले आहे ना की आता असं काहीच नको वाटते..... आपण जे भोगले आहे ते आपल्या मुलांच्या वाट्याला येऊ नये असे वाटते.......आता साधं सरळ सोपी आयुष्य हवे आहे ......म्हणून बोलले" ..........आई

" ह्म्म.........

अर्जुनला संध्याकाळी आईच्या बोलण्याचा राग तर आलाच होता पण त्यापेक्षा ही खूप वाईट वाटले होते.....पण आई बद्दल कुठलेही आपल मत बनवायच्या आधी तिची बाजू तिला मांडायची त्याने तिला एक संधी दिली होती........आणि आईचे बोलणे ऐकून आईच्या मनाची भीती त्याला कळली होती.......कोण बरोबर कोण चूक आता या गोष्टी त्याला ठरवायचा नवत्या..........आणि म्हणूनच आई बद्दलचा आलेला राग त्याचा निवळला होता.......

रात्री जेवण वैगरे आटोपून अर्जुन लॅपटॉप घेऊन पूल जवळ टेबलवर काम करत बसला होता...पण डोक्यामध्ये अधून मधून माही डोकावतच होती....,.. त्याला काही आठवले आणि तो मोबाईल मध्ये माहीचे असलेले फोटो काढून बघत होता.......आणि तिचे ते क्युट एक्स्प्रेशन बघून आपुसकच त्याचे ओठ सुद्धा रुंदावले........

" काय साहेब,  प्रेमात पडले वाटते??" ........आशुतोष अर्जुनला हसतांना बघून त्याचा जवळ येत बसला.....

अर्जुनने मोबाईल बंद केला......."या आशुतोष ...कसे आहात.....?".... काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून तो औपचारिक बोलला होता....

"कशी आहे ती??"......आशुतोष

"ठीक........(.काहीतरी लक्षात येऊन)......कोण?" .......अर्जुन

"तीच जी तुझ्या मनात आली आता" ........आशुतोष

अर्जुनने कसेतरी स्मायल केले.......अर्जुनला माहिती होते आशुतोष या बाबतीत भयंकर हुशार आहे .....तो लगेच गोष्टी पकडतो....

" बरं......काय म्हणते लग्नाची तयारी??कुठ पर्यंत आली???" .......तेवढयात अनन्या तिथे आली....

"काय चाललय??"  .....अनन्या

"काही नाही , गप्पा......त्याला विचारतोय हनीमूनला कुठे जातोय??"....... अशितोष

" Yeah wow..... अर्जुन कुठे चालला??" ........अनन्य खूप एक्सितेड होत होती

तो प्रश्न ऐकून अर्जुनचा कपाळावर आठ्या पडल्या....

" माहिती नाही" ............ अर्जून

अनन्या अजब नजरेने त्याच्याकडे बघत होती...

" नाही ते म्हणजे सोनिया ठरवणार आहे......तिलाच सगळी हौस आहे ना"  ......अर्जुन ने  कशीतरी वेळ मारून नेली....

"तू लग्न खरंच मनापासून करतोय ना??.......नाही म्हणजे तू प्रेम तर करतो ना सोनिया वर.......?"  .....आशुतोष

"आशू हे काय फलतूचे प्रश्न विचारतोय तू" ......अनन्या

"फालतू  काय???.....कामाचेच विचारतोय.......त्याला बोलू दे ....... आली लगेच भावाची साईड घ्यायला.....कधी नवऱ्याची पण घेत जा साईड" .......आशुतोष

" Huh.." ..... अनन्याने वाकडे तोंड केले..

" प्रेमासाठीच .....मनापासून लग्न करतोय" .........अर्जुन

" घे झालं तुझं समाधान???..... चल आता छळू नको त्याला जास्ती......त्याची फोनवर बोलायची वेळ झाली असेल......आठव आपले दिवस"......अनन्या आशुतोषचा हाथ ओढत म्हणाली...

" एन्जॉय .....आणि हो प्रेम आहे तर ते निभवायचे पण ...नी जपायचे पण"......आशुतोष जाता जाता बोलला....

अर्जुन बेडवर पडल्या पडल्या  बऱ्याच वेळ महीचा विचार करत होता.....आणि काहीतरी निश्चय करून झोपी गेला....

माहीला सुद्धा झोप येत नव्हती.....तिच्या डोक्यात असंख्य प्रश्नांनी वादळ घातलं होते.....शेवटी परिवार आणि नोकरी यावर लक्ष केंद्रित  करायचं ठरवुन ती झोपी गेली...

******

ऑफिसमध्ये अर्जुनने माहीच्या फील्ड मधली तिला सांभाळता येईल अशी बरीच कामं तिच्या अंगावर टाकली होती ....जे नाही जमेल त्याच ट्रेनिंग तिला मिळत  होते .....अर्जुनने तिला ड्रेस डिझायनिंग नी ज्वेलरी डिझायनिंगचा मीटिंग आणि प्रेझेंटेशनमध्ये सुद्धा इंवोलव करून घेतले होते..........कमीत कमी वेळात ती जसेकाही 5-6 वर्ष अनुभवी असलेल्या लोकांसारख सराईतपणे काम करायला लागली होती...

माहीचा मनात आपल्याला सगळे सोडून जातील....अशी जी इन्सेक्युरिटी होती ती अर्जुनला  घालवायची होती ....आणि त्याला माहिती होते नाव आणि पैसा असला की लोक आपोआप जवळ येतात नि मानाने वागतात.....त्या दृष्टीने तिला स्ट्रोंग करणे गरजेचे आहे ....ती हुशार पण आहे फक्त तिला योग्य संधीची गरज आहे .....त्याप्रमाणे तिला ट्रेनिंग देणे सुरू होते....लग्न..प्रेम...या सगळ्या गोष्टी त्याने डोक्यातून काढून टाकल्या होत्या......जे पुढे येईल ते तेव्हा बघायचं........आता फक्त त्याच एकच ध्येय होते.....माहीला  सक्सेसफुल स्ट्रोंग वुमन झालेले बघायचे होते........पण हे करतांना तिच्या स्वाभिमानाला कुठलाही धक्का पोहोचणार नाही याची तो पुरेपूर काळजी घेत होता....... उगाचच दया वैगरे दाखवलेले तिला आवडत नाही त्याला माहिती होते....अल्लड होती..बालिश होती..पण त्या बरोबरच फार समजदार नी.. खूप स्वाभिमानी होती...

त्याने स्वतःला सुद्धा कामात झोकून घेतले.....मोकळा वेळ मिळाला  तर उगाच त्याला माहीची आठवण यायची......आणि मग तिची आठवण आली की तो बेचैन व्हायचा.....त्यावर सोल्युशन म्हणून त्याने स्वतःची कामे खूप वाढुन घेतली होती ....

********

 

आता लग्नाला 20-22 दिवस उरले होते...तिन्ही घरांमध्ये लग्नाची घायिगडबड सुरू झाली होती.....त्यातच संगीत फंक्शनची तयारी जोर्यात सुरू झाली होती......अनन्याने तर प्रोफेशनल कोरिओग्राफअर ठेवले होते......कमी दिवस उरल्यामुळे रोज प्रॅक्टिस करण्याच गरजेचं होतं त्यामुळे माहि ऑफिस नंतर  संध्याकाळी प्रॅक्टिस साठी शांतीसदन मध्ये यायची........

अर्जुन ऑफिसमधून आलाच होता की पुढे रूममध्ये जात असताना  त्याचे लक्ष माहिकडे गेलं....... माही एका कॉर्नरच्या चेअरवर हाथामध्ये एक छोटं कुशन छातीशी कवटाळून पकडत हातावर डोकं ठेवून झोपली होती.......... तिचे काही केस तिच्या गालांवर हवे सोबत खेळत होते..... तिच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता पण त्यात ही ती खूप क्यूट त्याला वाटत होती........ आणि वरती जाता जात तो तिच्या जवळ थोड्यावेळासाठी थांबला होता...... तिचा तो लोभस चेहरा बघून त्याचं मन भरत नव्हते........ तिच्या गालांवर उडणारे केस तिच्या कानामागे करण्यासाठी  त्याने आपल्या खिशातला हात बाहेर काढला आणि तिच्या गाला पर्यंत नेला....... पण परत काहीतरी विचार करून त्याने आपला मोह आवरला आणि आपला हात मागे घेतला....... तिचा चेहरा बघत खूप गोड हसू त्याच्या चेहऱ्यावर आले होते........

" माही " .....श्रिया आवाज देत तिथे आली

" Shhh.....let her take a nap....she is tired" ....... अर्जुन खूप हळू आवाजात श्रियासोबत  बोलला.....

श्रिया अजब नजरेने त्याच्याकडे बघत होती..... अर्जुन लला कोण नाही म्हणू शकणार होत .... म्हणून ती मान हलवत तिथून चालले गेली ..... अर्जुन पण माहीकडे एकदा बघून त्याच्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेला.....

माही  या दिवसांमध्ये खूप थकायला लागली होती.... घरी लग्नाची तयारी....घरची जास्तीत जास्त बाहेरची काम तिच्यावर पडत होती,  ऑफिसमध्ये सुद्धा तिचं खूप काम वाढलं होतं..... त्यानंतर हे डान्स,  ती खूप थकत होती......पण तेवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा तिचा कमालीचा उत्साह होता..... डान्स आणि कोरिओग्राफर कोण कोणत्या गाण्यावर डान्स करणाऱ याचे  डिस्कशन सुरु होतं.... बसल्या जागी ती सगळं ऐकत होती आणि तिचा डोळा लागला होता.......

उगाच आपण लग्नामध्ये काही इंटरेस्ट दाखवत नाही आहे,  असं कुणाला वाटू नये म्हणून अर्जुन फ्रेश होऊन खाली सगळ्यांमध्ये येऊन बसला होता , सोबत तो लॅपटॉपवर आपल ऑफिसचे  काम करत होता.....

" अर्जुन ....... प्लीज चल ना एक छोटासा डान्स करू......फक्त एकच स्टांझा" ........सोनिया , अर्जुन सोफ्यावर बसून लॅपटॉपमध्ये काम करता करता बाकी सगळ्यांची डान्स  प्रॅक्टिस बघत होता तेव्हा सोनिया त्याच्याजवळ हट्ट करत होती......

" सोनिया  हट्ट नको करू" .........अर्जुन

" बेबी..... आपलं लग्न आहे आणि मग मी कोणासोबत डान्स करू??'........सोनिया

" बेबी...... ओ sss.."  ...... श्रिया अनन्या

"तुमचा एक कान का इकडेच असतो काय???.... आपल्या प्रॅक्टिसमध्ये कॉन्सन्ट्रेट करा" ........अर्जुन एक भुवई वरती करत श्रिया अनन्याकडे बघत होता.....तश्या त्या घाबरून परत आपल्या कामाला लागल्या..

" सोनिया तुला माहिती आहे मला हे डान्स वगैरे नाही आवडत......... का उगाच माझ्या मागे लागते आहे??..... ड्रेसेस सगळ तुझ्या आवडीचं घेतला आहे ना.....तुझी असलेली सगळे हाऊस तू पूर्ण कर पण या डान्ससाठी माझ्या मागे नको लागू" ....... अर्जुन लॅपटॉपमध्ये काम करत बोलला....

" Unromantic as always........ तू माझ्यासाठी काही स्पेशल करणारच नाही आहेस का??" ......सोनिया

" सोनिया तुला माहिती आहे मी असाच आहे.......... किती लोकं आहेत.... तू कोणाही सोबत डान्स करू शकते" .......अर्जुन

" कोणीपण आणि तू ....दोघांमध्ये फरक नसणार का बेबी?" .......सोनिया

" सोनिया... don't argue with me..... आणि ते बेबी वगैरे नको बोलू.....खूप इरिटेट होतं मला" .....अर्जुन

" आता तर मी बेबीच बोलणार ......अर्जुन बेबी ......कर काय करायचं ते" .... म्हणत ती  त्याला चिडवत तिथून पळाली........

" हिला काय झालं....अशी तर आधी नव्हती करत.........या सर्कसची हवा हिला सुद्धा लागली दिसतेय "  ....... अर्जुन मनामध्ये विचार करत होता....

कपल डान्स... ग्रुप डान्स ....सोलो डान्स असं सगळं डिस्कशन झालं होतं .....सॉंग सुद्धा डिसाईड झाले होते आणि सगळे आपापल्या प्रॅक्टिसमध्ये लागले होते.......

************

" या ड्रॅक्युलाला काय झालं अचानक काय माहिती ......किती काम वाढवलेत आणि आत्ताच द्यायला पाहिजे होती काय तेवढी कामं ??....... लग्न आहे,  किती काम आहेत घरी पण यांना कोण समजावून सांगणार" ..... माही आपल्याच विचारात अर्जुनच्या केबिन पुढे फाईल घेऊन उभी होती...

" मिस देसाई आत मध्ये या" ............अर्जुन

माही आपल्यास विचारातून भानावर येत आत मध्ये गेली.....

" सर ही फाईल......

" ह्म्म ठेव........ आज क्लास नाही इंग्लिशचा??" ...... अर्जुन लॅपटॉप मध्येच बघत बोलत होता

" सर... ते .....ते... मी त्यांना रिक्वेस्ट केली की मला या पंधरा दिवस सुट्टी पाहिजे" ........माही

" माही हे पण तेवढेच इम्पॉर्टंट आहे"......अर्जुन

" हो ......पण वेळ नाही पुरत आहे सध्या...... घरी पण जास्ती लोक मदतीला नाही ......बरेच काम निघत आहे.  ताई तर बाहेर नाही जाऊ शकत , तीच नवरी आहे तिला काय कामाला लावायचं........ आई आत्याबाई पण जास्ती करू शकत नाही..... म्हणून फक्त काही दिवसच , मी नंतर जास्ती वेळ थांबून कोर्स ऍडजेस्ट करून घेईल"....... माही

"Okay..... मग इतक्या वेळ का थांबली आहेस घरी गेली नाही??" .......

" ते बाहेर पाऊस पडत आहे म्हणून वाट बघत होते"......माही

"Okay...... बस.... सोबतच जाऊ"......... अर्जुन

" नाही नको जाईल मी" ......... माही

" माही मी खाणार आहे का तुला??की तुला काही करणार आहे???........... तू कम्फर्टेबल का नसते माझ्यासोबत??........ मी कधीतरी तुला कशाची जबरदस्ती केली आहे काय???....... जबरदस्तीने कुठलेच  रिलेशन नाही बनवता येत ...राईट...?.. आणि मला सुद्धा नाही आवडत........ नको घाबरत जाऊ मला,मी तुझ्यावर कशाचीच जबरदस्ती करणार नाही आहो .......... seat there ... झालंय माझं काम निघूयाच आपण थोड्या वेळात".......अर्जुन

"ह्म्म" ....... माही तिथेच काऊचवर मोबाईल हातात घेऊन काहीतरी टाईमपास करत बसली होती ......इकडेतिकडे बघता बघता  तीच लक्ष अर्जुनवर गेले....तो एका हाताने गळ्या भोवतीचा टाय लूज करत होता...... एक हाथ लॅपटॉपच्या  कीबोर्डवर सराईतपणे चालत होता..... सगळं लक्ष लॅपटॉप मध्ये..... होणाऱ्या हालचालीमुळे त्यांचे ते सिल्की केस कपाळावर एकमेकांसोबत खेळत होते....... अधून मधून एका हाताने समोर आलेले केस मागे घेण्याचा उगाचच त्याचा प्रयत्न सुरू होता......... माही अर्जुनला बघण्यात गुंतली होती.....

" किती थकलेले दिसत आहेत पण तरीसुद्धा काम करताना तेवढाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे...... रागवले नाही की किती क्यूट दिसतात ना हे ?? ........ पण नेहमी आपल्या चेहऱ्यावर खडूसवालेच  एक्सप्रेशन ठेवतात.....यांना कोणीतरी सांगितले दिसते आहे  बहुतेक हसले की हे हँडसम नाही दिसत, पण यांना कोण सांगेल हे कसेही असले तरी मला भयंकर आवडतात....रागात असले की असे वाटते जाऊन त्यांचे गालच ओढवेत..... ...... माही तू किती भाग्यवान आहे हा समोर बसलेला व्यक्ति तुझ्यावर प्रेम करतो... तुझ्यावर जीव ओवाळून टाकतो" ..... तिच्याच विचारांनी तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला...... अर्जुन कधीच  आपला  नसणार आहे माहिती होते तिला....पण तो तिच्यावर खुप प्रेम करतो याच भावनेने ती तृप्त होती,खुश होती .......
" घाबरत नाही अर्जुन सर तुम्हाला... पण जवळ यायची भिती वाटते.... तुमच्या पासून दूर होताना खुप त्रास होतो मला...... पण तुमच्या सुखी आयुष्यासाठी हेच गरजेच आहे....... तुम्ही एक नंबरचे खडूस आहात पण तुमचं ते खडूस रूप पण आवडते मला....... रागात पण कसले भारी दिसता"....... माही एकटक अर्जुनला बघत स्वतःच्याच विचारात हरवली  होती

"माही....तू मला डीस्ट्रॅक्ट करते आहेस...... I know I am very much handsome..... पण तू मला जर असेच बघत बसणार असशील तर मी माझे काम कसे करू???" ...... अर्जुन लॅपटॉप मध्येच काम करत करत बोलला...

"ह???" ........... माहि त्याचा आवाजाने  भानावर आली... " माही,  मूर्ख ....सर काय विचार करत असतील आता??..... नाही तिथे दिवे लावत असतेस तू" .........माही परत  आपल्याच विचारात गेली......

तिला तसं बघून अर्जुन गालात हसला.... "

"माही मॅडम चला आटोपलं माझं काम " ..... पण माही आपल्याच तालात होती

"माही..... चलायचं ना?" .... अर्जुनने तिच्या डोळ्यासमोर चुटकी वाजवली...

"अ... हो........ पण माझी गाडी??... मी उद्या कशी येणार ऑफिसला??".....माही

"असू दे इथेच .....मी उद्या तुला पिक करेल घरून...... ठीक आहे??"..... अर्जून

" ह्म्म.....मी रिक्षाने येऊन जाईल".....माही

"परत?????"""".....अर्जुन

" नाही ,ते उगाच तुम्हाला त्रास कशाला........"....माही

" always keep in mind...... तू सोबत असताना मला कधीच कशाचा त्रास होत नसतो .... सो नेक्स्ट टाईम पासून असे कधी बोलायचे नाही..... चल निघूया आता मंद बुद्धी ".... अर्जूनने तिची मस्करी केली..

"हा..??.. मंद बुद्धी??"....... माही मोठे डोळे करत त्याच्याकडे बघत होती.

" हाहाहा.... Look at those expressions........." ... अर्जून

" Very funny......"... माही

" इट्स नॉट फनी.....they are super cute....just loved it........".... अर्जून

" जायचं???'..... माही

"तूच तर टाइम पास करत बसलीय....मी तर कधीचाच म्हणतोय....."..... अर्जून

"मी....मी टाइमपास करते आहे???....मी..??".... माही

" हा......."... अर्जून

" Sir......... त्रास नका देऊ........".... माही

"Your highness!! Your wish is my command...... let's go.......".... अर्जून, माही अजब नजरेने अर्जूनकडे बघत होती.
 

दोघंही अर्जुनच्या गाडीमध्ये येऊन बसले..... बाहेर थोडा थोडा पाऊस सुरू होता..... आज-काल हा असाच अचानक अधून मधून केव्हाही पाऊस पडत होता........

अर्जुनने गाडी सुरु केली आणि त्याने शांतीसदनला जायचा रस्ता पकडला.....

"सर घरीच जायचं आहे.......

"आज प्रॅक्टिस नाही??.......

"नाही ,झाली आहे बर्‍यापैकी आता घरीच प्रॅक्टिस करायची.....

"ओके......... त्याने गाडी वळवत माहिचा घराकडे घेतली.....

" काय बघत होती मगाशी एकटक???"........ अर्जुन गाडी ड्रायव्ह करता करता बोलत होता

"ह??...... काही नाही".....

अर्जुनने एक भुवई वरती करून प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघितलं....

" ह ते म्हणजे... तुम्ही किती काम करता..... थकत नाहीत का??......... आराम का नाही करत??".....

" आवडते मला काम करायला...... आणि हे तर माझं आवडतं काम आहे...... आणि थकाव्याचे  म्हणशील तर तुझा चेहरा बघितला की आपोआपच सगळा स्ट्रेस आऊट होतो......"

" सर......."

" ओह.... I am sorry" ....... अर्जुनला आपण काय बोलून गेलो ते लक्षातच आले नव्हते...

"पण खरंच इतका काम करायची गरज आहे काय??" .....

"हो ....खूप गरज  आहे......... पैसा आणि पावर जवळ असला की सगळे आपल्या आजूबाजूला फिरत असतात.....आपल्याला खूप स्ट्रोंग असायला हवं....सगळ्याच बाबतीत"......

"ह्म्म......... सर एक विचारू.....?

"ह्म्म.....

"तुम्ही खुश तर आहात ना........??"

"तुला काय वाटते.......? तू खुश आहेस ना??".....

"हो...."

"मग मी पण खूप खुश आहो" ...... त्याने हसतच उत्तर दिले...

माहिचे घर आले..... ती खाली उतरणार तेवढ्यात परत वळली...

" सर खूप थकला आहात तुम्ही ...... स्वतःची काळजी घ्या .....आराम करा" ........ माहि त्याच्या नजरेला नजर देऊन बोलली......त्याला तिच्या नजरेमध्ये त्याच्याबद्दलची खूप काळजी दिसत होती.......ते बघून त्याला खूप छान वाटले.

" You too take care!!" ......... आता त्याला तिथे जास्त वेळ थांबवले जाणार नव्हते.... म्हणून तो बाय करून तिथून निघून गेला

*********

आज शेवटची डान्स प्रॅक्टिस होणार होती त्यामुळे लहान मोठे सगळेच शांती सदनमध्ये जमले होते.....एक एक करून कोरिओग्राफर सगळ्यांकडून प्रॅक्टिस करून घेत होता........तेवढयात बाहेर पाऊस सुरू झाला आणि वातावरण एकदम बदललं..... आणि सगळ्यांना गरम चहा आणि कांदे भजीची आठवण झाली....

"गरम गरम कांदा भजी आणि सोबत मस्त वाफाळलेला चहा मिळाला तर काय मज्जा येईल"....आशुतोष

"पिंकी "...... मामीने तिला डोळ्याने इशारा केला

"पिंकी मॅडम थांबा थांबा.......... अहो आम्हाला स्पेशल वाले भजे खायची इच्छा झाली आहे" ............ आशुतोषने माही कडे मोर्चा वळवला........ " माहि प्लीज तुझ्या हातचे जेवण जेवलो ना त्या दिवसापासून दुसर कोणाच्या हाताचे जेवण टेस्टी वाटत नाही आहे मला........ प्लीज तुझा तो स्पेशल वाला चहा"..........आशुतोष

" काय हो  आशूदादा तुम्हाला प्लीज म्हणायची काही गरज आहे का???...... तुम्ही फक्त ऑर्डर द्यायचा"........ माही किचनमध्ये जात बोलली

"येह हुई ना बात.......... भगवान तुम्हारी सब मनोकामना पुरी करेगा...... जुग जुग जिओ मेरी बहना"....... माही सोबत बोलता बोलता आशुतोषने एक कटाक्ष त्याने अर्जुनवर टाकला.......... अर्जुन माहि कडेच बघत होता.....

"येह नौटंकी सुरू झाली आशू तुझी...... खायचं नाव घेतलं की भयंकर नौटंकी सुरू होते याची........ काय ती दमली भागली आहे ना..... का तिला त्रास देतो आहेस" ....अनन्या

" ताई ठीक आहे मी करते "आणि  माही किचन मध्ये गेली...

" See.... बहीण आहे माझी" ....... तो दोन्ही भुवया उडवता अनन्याकडे बघत होता....

"बहिण भाऊ पूर्णच शोभता....फुल ऑफ  नोटंकी"......... अर्जुन हळुवारपणे बोलला

" काही बोललात साहेब"........ आशुतोष

" नाही.....कुठे...काय??" ......अर्जुन इकडेतिकडे बघत होता

"बराच ओळखतो तिला??" .......... आशुतोष मिश्कीलपणे हसत अर्जुनकडे बघत होता

आता काय उत्तर देऊ अर्जुन विचार करत होता की तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो एस्क्युज करून तिथून बाजूला गेला.......

" कारे ....का त्रास देतो त्याला??" ......अनन्या

" तुझ्या त्या खडूस भावाला छेडायाला मला खूपच मजा येते" ........आशुतोष

" Yeh गरमागरम भजी आणि अद्रकवाली चाय" ......श्रिया उड्या मारतच माही जवळ गेली ...माही आणि पिंकी ट्रेमध्ये सगळ्यांसाठी चहा आणि गरम भजी आणत होते........ माहीने सगळ्यांना आपल्या हाताने चहा आणि भजी प्लेट दिल्या..... प्लेट्स देताना ती इकडेतिकडे बघत होती....

"तो तिकडे आहे" ........आशुतोष

" कोण??" ......... माही न कळल्यासारखं बोलली

" तोच , ज्याला तू शोधत आहेस" .........अर्जुन बाहेर पोर्चमध्ये  फोनवर बोलत होता आशुतोषने तिकडे हात करून माहिला सांगितले....

माहीने एक चहाचा कप आणि भज्यांची प्लेट एका ट्रेमध्ये ठेवले आणि ती तिकडे जायला वळली....

" तो चहा नाही घेत आणि हे ऑइली फूड पण त्याला नाही आवडत" .......अनन्या

" अरे घेईल घेईल .... अशा पावसात , या रोमँटिक वातावरणात त्याने माहिचा हातचा चहा नाही पिला ना कधी म्हणून.... आता घेईल तो..... तु जा"  ........आशुतोष

" नाही पिणार" .....अनन्या

" लाव बेट?" .......आशुतोष

"ठीक आहे.....तू हरशिल" .......अनन्या

" बघू...........

अर्जुन फोनवर बोलत होता,  बोलता बोलता त्याने वळून बघितलं तर .... माही अर्जुन समोर ट्रे घेऊन चेहऱ्यावर गोड स्माईल घेऊन उभी होती....... दुपारी पाच वाजताची वेळ, त्यात रिमझिमरिमझिम बरसणाऱ्या  पावसांच्या सरी...... थोडेफार पावसाचे तुषार अधून मधून अर्जूनच्या अंगावर उडत होते......... आणि त्यात माही अशी गोड स्माईल ओठांवर ठेवून समोर उभी होती.... त्यामुळे त्या वातावरणात अजूनच खूप गोडवा निर्माण झाला होता अर्जुन तिच्या त्या रूपात मंत्र मुग्ध झाला होता

तिने तिच्या हातातला ट्रे त्याच्यासमोर धरला......

" मी चहा नाही घेत" ........ त्याच्या बोलण्याने तिचा चेहरा खाडकन उतरला........

" बघ मी म्हणाले होते ना......तू हरला" ......अनन्या

" पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.......बघ तिकडे" .......आशुतोष

माहीचा  उतरलेला चेहरा बघून अर्जुनला वाईट वाटले....... " अगं पूर्ण ऐकून तर घे" ....अर्जुन

" मी चहा नाही घेत पण आज घ्यायची इच्छा झाली आहे" ..... त्याने तिच्या हातातल्या ट्रेमधून चहाचा कप उचलला......... तशी तिच्या चेहऱ्यावरची ती गोड स्माईल परत  आली.........

" कोणी काही डिमांड केली तर  प्रत्येक गोष्ट करायलाच हवी का????...... किती थकली आहेस??" .........अर्जुन

" ही इथे सगळी माझी माणस आहेत...... यांच्यासाठी करायला कशी काय थकनार??........ त्यांच्या आनंदात माझा आनंद"...... माही

"It's delicious" ...... त्याने प्लेट मधला एक भजा तोंडात टाकला....

" तुम्हाला आवडला??" ...........माही खूप उत्सुकतेने त्याच्याकडे बघत होती...

" हो खूप" ..........अर्जुन

" खरंच??" ........... तिच्या चेहऱ्यावर खूप मोठी मिलियन डॉलर वाली स्माईल आली ...,...... जसं काही खूप मोठ काहीतरी जिंकल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता........

"Thank you!!" ........ ती आनंदातच आतमध्ये गेली....

" कसली पागल आहे ही ........पण गोड आहे.......love you sweetheart!" ....... बाहेर पावसाकडे बघत तो चहाचा आनंद घेत होता.......... भविष्याच्या विचारात त्याला आताचे गोड क्षण वाया घालवायचे नव्हते...... जेवढे मोती ओंजळीत येतील तेवढेच त्याला जपून ठेवायचे होते......

दुरून हे सगळ कोणीतरी बघत होत.......

********

फिफ्टी टू सीट्सची एक मोठी व्होल्व्हो आणि काही कार लोणावळ्याच्या मोठ्या निसर्गाने वेढलेल्या रिसॉर्ट समोर येऊन थांबल्या......... आणि त्यातले सगळे वर्हाडी खाली उतरले....... आणि भान हरपून आजूबाजूचे दृश्य बघत होते......... हो ही तेच जागा होती जिथे आकाश अंजली.... अर्जुन आणि सोनियाचे लग्न होणार होतं लोणावळ्याचे एक सुंदर रिसॉर्ट.....तिथून निसर्गाचे सौंदर्य भरभरून दिसत होते....

 

माही धावतच एका कॉर्नर मध्ये गेली .........आपले दोन्ही हात पसरवून .... चेहऱ्यावर येणारी समोरची थंड थंड हवा घेत....... समोरचं सुंदर दृश्य अनुभवत होती..........

आणि अर्जुन तिच्याकडे बघत  समोरच हे दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेत होता. ........

*********

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️