तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 41

Arjun

भाग 41

आज संडे होता त्यामुळे  अर्जुनच्या डोक्यामध्ये आई सोबत कसं बोलायचं , काय बोलायचं विचार करत आपल्या रूम बसला होता.......... बाकी सगळे आकाशच्या रूममध्ये गोंधळ घालत बसले होते.........

माहि तीचे ड्रेस डिझायनिंगच काम आटोपून आजीजवळ रिपोर्ट करायला आली होती.........

" अरे वा किती सुंदर दागिने आहेत........... एकदम पारंपारिक" .......... माही

आजी आणि आई त्यांची जुने दागिने काढून बघत होत्या

"आवडले तुला .....???..म्हणजे अंजली आणि सोनियाला पण आवडेल ना.........???" ...आई

" हो नक्की आवडतील......... खूप सुंदर आहेत" ..........माही

" माही ...अर्जुनच्या रूममध्ये बांगड्या ठेवल्या आहेत......  त्या तेवढ्या घेऊन ये........आणि त्याला विचारून घे त्याने सोनियाचा माप ट्राय केले का??"........आजी

" हो " ......... माही अर्जुनच्या रूममध्ये बांगड्या आणायला गेली.....

"सर,  ते.... आजी बांगड्या मागत आहेत" ........माही

अर्जुनने इशाऱ्याने टेबलवर असलेला बॉक्स दाखवला.....

माहीने तो बॉक्स उचलला आणि परत जाणार तेवढ्यात तिला परत आठवले आणि ती परत वळली.......

"सर ssss.....आजी विचारत होत्या तुम्ही साईज चेक केला काय???" ....... माही

"ह्म्म.."...... तो त्याच्या जागेवरून उठला आणि माही जवळ गेला...... त्याने आपला एक हात पुढे केला....

"काय???" .......... माही

"बेंगल बॉक्स" ..........अर्जुन

महिने बॉक्स त्याच्या हातात ठेवला.... अर्जुनने त्यातून एक बांगडी घेतली....... आणि माहीचा हात हातात घेतला.......

"यांना कशाचीच भीती वाटत नाही ....घरात इतकी लोकं आहेत आणि हे बिनधास्त असे वागतात " ...... माहिला टेन्शन आलं........अर्जुनच्या असं करण्याने माहि थोडी बावरली होती........ ती घाबरत अर्जुनकडे बघत होती...

" तू काय गं मला नेहमी नेहमी सर बोलत असते...... ऑफिस मध्ये ठीक आहे मी समजू शकतो पण घरीसुद्धा???....... तू मला अर्जुन म्हणुन आवाज देऊ शकते.......किंवा तुझं फेवरेट दिलेलं नाव ......ड्रॅक्युला....... ते पण आवडेल मला" ....... अर्जुन मिश्कीलपणे हसत तिच्या डोळ्यात बघत होता...

" परफेक्ट!!" ........अर्जुन

" काय??" ...........

" साईज " ...... त्यानी डोळ्यानेच  तिच्या हाताकडे इशारा केला...... माहीने आपल्या हाताकडे बघितलं तर त्याने तिच्या हातात एक कड  घातले  होते....... माहि डोळे विस्फारतात आपल्या हातांकडे बघत होती......

अर्जुनने तिला हात पकडून स्वतःजवळ ओढले आणि थोडा खाली झुकून तिला काही कळायच्या आतच  तिच्या गालावर किस केले......

माही गोंधळलेल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती...

"ही तुझी पनिशमेंट" ........

माही आपला हात गालावर ठेवत.....प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती.....

" मला जबरदस्ती सोनिया सोबत डिनरला पाठवलं म्हणून..........   परत असे काही केलं तर अशीच पनिशमेंट मिळेल " ......... अर्जुन तिच्या डोळ्यात मिश्कीलपणे हसत बघत होता......

" माही sss"........ श्रियाचा आवाज आला तशी माही गोंधळली..... ति अर्जुनच्या हातातून आपला हात सोडवण्याचा प्रयत्न  करत होती पण अर्जुन हात सोडतच नव्हता......तिची धडपड बघून त्याने तिचा हाथ सोडला.......ती ब्यांगल बॉक्स घेऊन हातातली बांगडी काढत  पुढे जात होती.....

" माही.....this way " ....... तिला पूलसाईड दारातून बाहेर जातांना बघून अर्जुन बोलला...

" ह??" .........तिने मागे वळून बघितले नी तिची  दाराला ठोकर लागली....तिच्या हातातले कडे खाली पडले आणि घरंगळत स्विमिंग पूल मध्ये पडले....

माही पुढे जात पूल जवळ बसून खाली वाकून बांगडी काढण्याचा प्रयत्न करत होती.....पण बांगडी जरा आतमध्ये होती तर तिचा हाथ पुरत नव्हता.....

" Wait..." .... अर्जुन तिला मदत करायला जाणार तेवढयात माही पाण्यामध्ये पडली....

" वाचवा...वाचवा" ........माही पाण्यात हातपाय मारत ओरडत होती ..

तिच्या आवाजाने आकाशचा रूममध्ये बसलेले सगळे बाहेर आले .....

" माही  रिलॅक्स " ................अर्जुन तिथे खिष्यामध्ये हाथ घालून तिच्या पुढे उभा होता....

आकाश मदतीला जाणार तेवढयात अर्जुनने त्याला हाथ दाखवला.......आकाश तिथेच थांबला

"माही,  get up " .......... अर्जुन शांतपणे बोलला

" वाचवाsssss..." ........... माही ओरडत इकडे तिकडे बघत  होती....अर्जुन तिथे उभा असूनही मदतीला येत नाही हे बघून तिला खूप राग येत होता......

" माही , सरळ उभी रहा" .........अर्जुन

" सर .....मी जर पाण्यात बुडाले ना तर भूत बनून येईल..... तुम्हाला सोडणारच नाही" ....... माही पाण्यात हातपाय मारत चेहरा वर करत बोलत होती...अर्जुनला तिचे बोलणे ऐकून हसायला येत होते...पण त्याने आपला चेहरा गंभीर ठेवला.

" मला पण तेच पाहिजे आहे.... नको सोडूस...... Now come out "   ........अर्जुन

दोघांमधली चाललेली डायलॉगबाजी ऐकून बाकीच्यांना हसायला येत होतं...... पण ते तोंड दाबुन उभे होते

"अर्जुनचे  पण ना , काही समजत नाही..... त्यादिवशी तिला आग लागली तर कशाचीच पर्वा न करता तिला वाचवायला गेला....... आणि आता .....आता उभा राहत बघून राहिला" ......अनन्या

" ह्म्म....त्याच्या डोक्यात काहीतरी सुरू असेल" ......आशुतोष

" या दोघांचं ऑफिसमध्येही असच आहे..... भयंकर राडे होतात दोघांमध्ये...... दुसरी कोणी असती ना,  तर कधीच तिला काढून टाकलं असतं त्यांनी...... एक मिनिट पटत नाही यांचं, पक्के टॉम अँड जेरी आहेत " ........आकाश

" हाहाहा..... बघा काय होते ते" ......आशुतोष

" वाचवा ssss....आकाश सर वाचवा..... मी बुडते आहे , मला अजून ताईचे लग्न, तुमचे मुलं बघायचे आहेत..."..... माही

माहीचे बोलणे ऐकून आकाशने डोक्यावर हात मारून घेतला.....अनन्या श्रिया त्याला चिडवत हसत होत्या.

" माही... ते चार फूट  खोल पाणी आहे...... तू पाच फुटांपेक्षा पण जास्ती आहे....... एवढ्या पाण्यामध्ये कोणी बुडत नसते .....चल बाहेर ये" .....अर्जुन

" नाही.... मला उभे राहता येत नाही आहे...... मला माझे पाय सापडत नाही आहे....... दिसतच नाही आहे कुठे गेले ते, हरवले बहुतेक " .........माही

आता मात्र कोणालाच हसू आवरत नव्हतं........अर्जुनचा पण स्वतःवरचा कंट्रोल सुटला होता आणि तो सुद्धा गालात हसत होता......... त्याने शर्टाच्या बाह्या फोल्ड करत तशीच पाण्यात उडी घेतली..... आणि माहीला पकडून पाण्यात सरळ उभा केलं.....

" See...... कोणी बुडत नाही" ....... अर्जुन

" पाय???...."...माही अडखळत बोलत होती

" जिथे होते तिथेच आहेत......चालून बघ".....अर्जुन

माही एक पाय उचलत पुढे ठेवायला गेली तरी परत तिचा बॅलन्स गेला.......पडणारच की तिने अर्जुनाच्या शर्टला घट्ट पकडले....परत  अर्जुनने तिला पकडून घेत सरळ उभे केले....

माहि तिथे चुपचाप उभी होती...तो सुद्धा शांतपणे तिच्याकडे बघत होता ..

" बांगडी???".......... माही परत पाण्यामध्ये बघायला लागली......

" Wait...... परत बुडाली तर मला पण भुत बनवशील" ....... अर्जुन खाली पाण्यात गेला आणि थोड्या वेळातच बांगडी वर काढली..... आणि तो स्विमिंग पूलच्या बाहेर आला......

कपाळावर आलेले केस आणि पाणी त्यांनी आपल्या दोन्ही हातांनी मागे केले नि तिथे पूल जवळ खाली टोंगळ्यावर बसत त्याने हात पुढे केला....... माहीने त्याचा हात पकडला आणि त्याने तिला बाहेर खेचले..... आणि ती जाऊन अर्जुनवर आदळली....

" का घाबरतेस इतकी छोट्या छोट्या गोष्टींना??? ....... प्रयत्न तर कर???........मी आहो ना सोबत, मी तुला काहीच होऊ देणार नाही " ..... अर्जुन तिला सावरत नीट उभा करत बोलला ...

" श्रिया..... माहीचे कपडे चेंज कर" ..... बोलून तो सर्वांवर नजर टाकून त्याच्या रूममध्ये चालला गेला......माही त्याच्याकडे बघत होती...

" माही, तू ठीक आहेस???"...अनन्या

" अ.....हो....".... माही

" बरं चल, कपडे बदलून घे....थंडी वाजेल आहे नाहीतर " .... श्रीया

" हो....."....माही ... श्रिया माहीला तिच्या रूममध्ये घेऊन गेली..... माहीने कपडे चेंज केले.... केस सुकवले...

" अर्जून दादू पण ना अजब आहे......त्या दिवशी तुला आग लागली तर कावराबावरा झाला....आणि आज तू पाण्यात हातपाय मारत होती तर  शांतपणे बघत उभा होता....काहीच कळत नाही त्याचे......"...श्रिया

" ह्मम....... "....माही आपल्याच विचारात होती.

संध्याकाळचे सात वाजत आले होते पण अजूनही अर्जुनला  आई रिकामी भेटली नव्हती.... तो विचार करतच खाली सोफ्यावर आपला लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता...... आजी आई मामी मामा सगळे तिथे दागिने साड्यांचा काही काम करत टीव्हीवर न्यूज बघत बसले होते.......... आणि तेवढ्यात टीव्हीवर सामूहिक बलात्कार झालेली न्यूज सुरू झाली......

माही कपडे बदलून घरी जाण्यासाठी म्हणून खाली येतच होती की न्युजचे शब्द ऐकून ते तिथेच थांबली...... तिचे पाय थरथरायला लागले......

" किती वाईट जमाना आला आहे...... कोणीच कोणावर विश्वास ठेवू शकत नाही....... काय म्हणावं या नराधमांना??...... आपल्या थोड्याशा हव्यासा पोटी त्या बिचार्‍या पोरीचा बळी घेतला" .........आजी

" हो ना , या न्युज टीव्हीवर येतात म्हणून आपल्याला कळते ..... नाहीतर अशा कितीतरी अनेक रेप झालेल्या मुली आहेत ज्या घाबरून चूप बसलेल्या आहेत...... काय तरी चूक या मुलींची त्यात?? ......बिचाऱ्या मुलींचे जीवन उद्ध्वस्त करून ठेवली आहेत....... काय मिळते या विकृत मानसिकतेला मुलींसोबत असं वागून?" .......आई

" काय या मुलींची चुकी असते , असे छोटे-मोठे कपडे घालून फिरत असतात" ...........मामी खोचकपणे बोलली

अर्जुनच लक्ष माहीकडे गेलं...,.... माहि  त्यांच्या गोष्टी ऐकत उभी होती तिच्या डोळ्यातून अविरत पाणी गळत होते आणि तिचे पाय सुद्धा थरथर कापत होते...... तिला असं बघून अर्जुनच्या काळजात धस्स झाले......

" अरे हे काय बघत... बोलत बसले आहात तुम्ही?" .....अर्जुन

" अर्जुन बोलायची गरज आहे......प्रत्येक बाबतीत मुलींनाच दोषी ठरवायचे असते या समाजाला..........असं नसते मामी....,. तुम्ही फक्त मुलींनाच दोष देतात..... काय तर कपडे असे घातले म्हणून .....काय तर रात्रीच्या वेळी बाहेर निघाली म्हणून..... असं म्हणून म्हणून तुम्ही किती त्या पुरुषांना झाकून ठेवणार आहात??....किती त्या पुरुषांच्या गुन्ह्यांवर पांघरून घालणार आहात??...... मग लहान तीन महिन्याच्या बाळापासून ते 80 वर्षाच्या म्हातारी पर्यंत,  पूर्ण कपडे घातलेल्या बाईला सुद्धा...... दिवस असे वा  रात्र...... या राक्षसी प्रवृत्तीने सोडलं नाही आहे..... ही राक्षस आहेत,  ह्या धर्तीवर मोकाट फिरून राहिली आहेत,  यांना तर तेव्हाच्या तेव्हा जीवाने मारलं पाहिजे.....मामी वाईट वाटून घेऊ नका पण तुमच्या सारखीच मानसिकता या समाजाची आहे म्हणूनच या मुलींना न्याय मिळत  नाही, त्यांच्यावर अशी जीवघेणी अत्याचार होतात  आणि त्यांचे जीवन जगणं कठीण होऊन बसते" .........अनन्या

"सॉरी आनन्या मला माझी चुक समजली" ....मामी

" कसे सावरत असतील त्या स्वताला??...... कोण लग्न करत असेल त्यांच्यासोबत??...... किती वाईट आहे सगळे..... स्वतःला सावरत उभे राहणं किती कठीण आहे त्यांच्यासाठी" ........अनन्या

" पण कोण करेल लग्न???....... कोणी चांगल्या घरची लोकं त्यांना सून बनवून आपल्या घरात आणणार नाही" ........आई

" आजची पिढी बरीच समजदार आहेत , अजूनही बरीचशी चांगली मुल आहेत जी अशा मुलींसोबत लग्न करतात..... आणि त्या मुलींचे चुकीच काय आहे..... त्यांना सुद्धा जगायचा अधिकार आहेत" .....आशुतोष

" हो पण हे बोलणं सोपी आहे , पण खरच एक्सेप्ट करणं कठीण आहे....... समजा आपल्या घरात आपली मुल अशी वागायला गेली तर आपण तरी तयार होऊ काय??......आपण तर अशा घरातली दुसरी कुठली  मुलगी सुद्ध आणणार नाही.......... माझ्या मुलांनी असे  केले  तर मला तर सहन होणार नाही" ..........आई

" नलिनी हे काय घेऊन बसली आहेस तू ?....आपल्या मुलांची लग्न जमलेली आहेत...... उगाच अपशब्द काढू नकोस"..........आजी

" चुकलंच माझं....मी फक्त एक खरी परिस्थिती सांगत होती..."....आई

आजी आणि आईचं बोलणं एकूण माहीने अर्जुनकडे बघितलं...........तिला काही सुचतच नव्हतं .......त्यातच डोळ्यापुढे तिच्यासोबत झालेला प्रसंग तिला आठवत होता........... ती सगळं ऐकत बघत.... खूप खचली आणि कोणाचं लक्ष नसताना रडतच धावत घराच्या बाहेर पडली........

माहीला असं घराच्या बाहेर रडत जाताना बघून अर्जुन सुद्धा तिच्या मागे गेला....... माहिची गाडी तिथेच होती बहुदा ती पायीच पुढे निघाली होती...... अर्जुनने आपल्या गाडीची चाबी आणली आणि तो गाडी घेऊन बाहेर पडला

अर्जुन गाडी घेऊन  पुढे निघाला तर माहि त्याला कुठेच  दिसत नव्हती...... तो पुढे पुढे जात होता तेव्हा त्याला रस्त्याच्या एका साईडने माही आपल्याच विचारात आपले डोळे पुसत पुढे पुढे जात असताना......... अर्जुनने गाडी साईडला लावली आणि गाडीतून उतरून तो माही जवळ गेला....

" माहीsss..........."

माहीने एकदा अर्जुनकडे बघितले आणि परत ती पुढे चालायला लागली......

" माही गाडीत बस" ......अर्जुन

महिने त्याच एकूण न ऐकल्यासारखे केले आणि परत पुढे चालत होती.....

अर्जुनने तिचा हात पकडला आणि त्याने तिला जबरदस्ती गाडीमध्ये आणून बसवून तिचा सिट बेल्ट लावला......माही अधून मधून तिचे डोळे पुसत होती पण तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं काही नाव घेत नव्हतं...... तिला तसं बघुन अर्जुनचे हृदय पिटाळून निघत होतं....... त्याने गाडी पुढे नेत एका रस्त्याच्या साईडला जिथे जास्त रहदारी नाही आहे अशी बघून थांबवले......

" माही " ....... अर्जुनने तिला गाडीच्या बाहेर काढले....

" सर तुम्ही जा इथून....... मला कोणाची गरज नाही आहे...... मी  स्वतःला सांभाळू शकते" ..... ती आपल्या उलट्या हाताने आपल्या दोन्ही डोळ्यांची आसवे पुसत रडत रडत बोलत होती होती.........

" माही माझ्याकडे बघ " .......अर्जुन तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत बोलला.....

माहीने त्याच्या डोळ्यात बघितलं आणि तिचा बांध फुटला...........

" सर मी मुद्दाम नाही केलं असं काही....... माझी काही चूक नव्हती....... मी त्या मुलांना ओळखत पण नव्हती". ........

" Shsss...... माही I know that.." ....

" तुम्हाला माहिती असून त्याने काय होणार आहे???........ बाकी कोणाला तर नाही माहिती ना काही,  सगळे मलाच दोष देतील.....तुमचा विश्वास आहे माझ्यावर....पण बाकी.....मी कोण कोणाला उत्तर देऊ??.....कोण माझ्यावर विश्वास ठेवेल??.......नी मिरा??......तिचा काय दोष???......तिला घरी आता मिळते आहे,  तेवढेच प्रेम मिळेल???.........ना नाही"...... माही रडत रडत बोलत होती

तेवढ्यात तिथे अचानक जोराचा पाऊस सुरू झाला.......

" मी नाही छोटे छोटे कपडे घातले.......... मी नाही अंधारात बाहेर पडली....मी तर त्यांना ओळखत सुद्धा नव्हती........ माझी नव्हती काही चूक........ माझे नव्हती काही चूक....सर मी वाईट नाहीये.....मी नाही केली कुठली चूक " ............माहीला  तर अर्जुनचे काहीच बोलणे ऐकू येत नव्हतं,  तिच्या डोक्यात तर घरी झालेल्या गोष्टी भरल्या होत्या आणि ती तेच सतत  बडबड करत होती...

" माही " ........ अर्जुनने तिला खूप टाईट हग केले....... " " " माही शांत हो....... माही प्लीज मी तुला असं रडतांना बघू शकत नाही....... तुला असं खचलेल मी बघू शकत नाही....... प्लीज माही शांत हो,  माझ्यासाठी" .......... अर्जुन तिच्या डोक्यावर , चेहऱ्यावर पडणाऱ पाणी आपल्या हाताने  मागे करत बोलत होता.......

माहीच्या डोक्यात सगळ्या त्याच गोष्टी सुरू होत्या आणि ती हुंदके देत रडत होती.......

" माही,..... नको ना रडू.....नको असा त्रास करून घेऊ स्वतःला.....मला खूप त्रास होतोय तुला असे तुटलेले बघून .... " अर्जुन तिला आपल्या छातीशी कवटाळत बोलत होता .....माही मात्र पूर्णपणे खचली होती...

" माही प्लीज डोन्ट क्राय....... मला नाही सहन होत तुला असं बघताना.....मी काय करू म्हणजे तू शांत होशील???......I    can do anything....anything for you..... pls don't cry" ......... अर्जुन तिला आपल्या कुशीत सामावून घेण्याचा प्रयत्न करत होता...

" Promise." ..........

" हो " ......

"माझ्यासोबत लग्न करायचा नाद सोडा" .........माही

" What are you saying????....... माही तू मला एक चान्स दिला होता...... pls belive me..... मी ठीक करेल सगळं" ......... अर्जून

" तुम्ही ऐकलं नाही काय..... आई काय बोलत होत्या.... की अशा मुलीच्या घरातल्या दुसऱ्या मुलीसोबत सुद्धा त्यांना संबंध करायला आवडणार नाही......... प्लीज माझा ऐका... जर कोणालाही माझ्याबद्दल माहिती पडलं तर माझ्यामुळे अंजली ताई आणि बाकी सगळ्यांना खूप त्रास होईल......... मला परत रडतांना नसेल  बघायचं .... मला परत खचलेले  नसेल  बघायचं तर प्लीज माझं ऐका,  मी खूप मुश्किलीने स्वतःला सावरले आहे,  परत सावरणे मला खूप कठीण होईल....... प्लीज माझा एवढं ऐका" ..........माही

" माही ..... का अशी खचून जाते आहेस" .......अर्जुन

" माझ्यावर खर प्रेम करत असाल...... तर माझ्या पासून दूर व्हा" .........माही

" माझ्या प्रेमाची खूप मोठी परीक्षा घेते आहेस माहि तू" ..........माही

" हा देव माझी आयुष्याची परीक्षा घेयांना  नाही थकत नाही आहे....... तुम्ही एवढ्यातच थकलात???........ माझ्या वेदना कमी करायच्या असतील तर तुम्हाला माझ्यापासून दूर जायलाच पाहिजे" .........माही

काहीतरी विचार करून अर्जुनने एक मोठा श्वास घेतला...........


"

Promise me..... आज शेवटच रडली...... परत कधीच रडणार नाहीस....... कुणी काहीही बोललं तरी तू खचणार नाहीस.........आणि काहीही प्रॉब्लेम झाला तरी तू माझ्यासोबत शेअर करशील........ मी तुला कधीच एकटे पडू देणार नाही........ तुझ्या आनंदात नाही पण तुझ्या दुःखात मी नक्कीच सोबत असेल.......... मला तुला फक्त हसताना आणि आनंदात बघायच आहे.......promise me....."..... अर्जुन


"

नाही रडणार कधीच" ....... माहीने आपले डोळे पुसले.... आणि त्याच्यापासून दूर होत  ती पुढे जायला वळली

पल भर ठहर जाओ

दिल ये संभल जाए

कैसे तुम्हे रोका करूँ

मेरी तरफ आता हर गम फिसल जाए

आँखों में तुम को भरूं

बिन बोले बातें तुमसे करूँ

'गर तुम साथ हो...अगर तुम साथ हो
 

बहती रहती...

नहर नदिया सी

तेरी दुनिया में

मेरी दुनिया है

तेरी चाहतों में

मैं ढल जाती हूँ

तेरी आदतों में

'गर तुम साथ हो

तेरी नज़रों में है तेरे सपने

तेरे सपनो में है नाराज़ी

मुझे लगता है के बातें दिल की

होती लफ़्ज़ों की धोकेबाज़ी

तुम साथ हो या ना हो

क्या फ़र्क है

बेदर्द थी ज़िंदगी बेदर्द है

अगर तुम साथ हो

अगर तुम साथ हो

पलकें झपकते ही,

दिन ये निकल जाए

बेती बेती भागी फिरू...

मेरी तरफ आता,

हर गम फिसल जाए

आँखों में तुम को भरूं

बिन बोले बातें तुमसे करूँ

'गर तुम साथ होअगर तुम साथ हो ....तेरी…

मागूनच त्याने तिचा हाथ पकडला.......तिला स्वतःकडे वळवले...,...आवेगाने तिच्या जवळ जात स्वतहाला तिच्या मिठीमध्ये झोकून दिले......वारंवार  तिला आपल्या छातीशी कवटाळत होता....ओठातले शब्द तर वेगळेच बोलत होते नि मन काही वेगळेच.......

माहीला अर्जुनला होणारा त्रास कळत होता....तिने पण त्याच्या भोवती आपल्या हातांचा वेढा घट्ट करत त्याच्या मानेवर किस केले....तिच्या या स्पर्शाने आता मात्र त्याला सगळेच असह्य झाले होते.....

त्याच्या दिलेल्या शब्दांमुळे , वचनामुळे ती परत सावरली होती......

पण....त्याचे अश्रू मात्र पावसाच्या पाण्यातच विरले होते....

*********


क्रमशः

🎭 Series Post

View all