तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 40

माही arjun

भाग 40

अर्जुन आनंदातच आपल्या केबिनमध्ये येऊन बसला .......आज त्याचं कुठल्याच कामामध्ये मन लागत नव्हतं....... तो आपल्याच विश्वात हरवला होता .....

सतीशच काम झालं नव्हतं तो घाबरतच अर्जुनच्या केबिन मध्ये आला......

"सर , आज डेटलाइन दिले होते पण थोडेच काम राहिले  आहे.........." ...सतीश

" इट्स ओके ......... कम्प्लीट इट  टुमारो....... पण उद्या म्हणजे उद्या...... गेट इट??"........अर्जुन

"येस सर.........thank you sir "..... सतीश  खूप आश्चर्यचकित झाला होता,  त्याला वाटलं होतं की आता आपल्याला सरांची बोलणी खावी लागणार आणि म्हणून तो खूप घाबरला होता,  पण इथे तर वेगळच झालं होतं , तो आनंदी होऊन बाहेर परतला होता........

आणि आतापर्यंत बाहेर सगळीकडे आज सरांचा मूड चांगला आहे असं पसरलं होतं...,

********

अर्जुन आपल्याच तालात घरी आला होता.......

" अर्जुन दादा कडे बघ ....... मला असं का वाटतं आहे आज तो ब्लश करून राहिला" .......श्रिया

" खरंच यार..... खूप खुश दिसत आहे...... आकाश आज काही घडलं का ऑफिसमध्ये?" ...........अनन्या

" माहिती नाही पण मी जेव्हा त्याच्यासोबत होतो तेव्हा तर तो चांगलाच रागात होता.... माहीवर खूप चिडला होता तो आज..... माहीची आणि त्याची चांगलंच वादावादी झाली  असणार..... आज माही डोरेमोन बघतांना अर्जुनने तिला बघितलं  ....नंतर माहिती नाही......पण आज ऑफिसमध्ये पण स्टाफ मध्ये चर्चा होती की अर्जुन सर त्यांना हसताना दिसले" ........आकाश

" हा हाहाहाहा....... खरंच काहीतरी गडबड दिसते" .........श्रिया

" व्हॉट???.......... तुम्ही सगळे मला असेच स्टएर का करत आहात???" ............अर्जुन, सगळे त्याला एकटक बघत आहे बघून अर्जुन बोलला

" तू आज इतका गुलाबी-गुलाबी का दिसतोय?" .......श्रिया

" See your lips!!!" ......... अनन्य

" ओ sss" ...... अनन्या श्रिया

अर्जुन आपला चेहरा ..lips...चेक करत होता....... त्याला एकदम माहि सोबत घालवलेले क्षण आठवले......

" असं वाटत आहे तू किस करून आलेला आहे"  .......त्याचा कावराबावरा चेहरा झालेला बघून अनन्याला  त्याची मस्करी करायचा मूड झाला

" व्हॉट????...... मी कधीच कोणाला स्वतःहून किस नाही केलेल" .......अर्जुन

"म्हणजे तुला कोणीतरी केलेले??" ........अनन्या

" ओ ssss" ......अनन्या श्रिया

" And who will dare to touch me ??" ......... अर्जुनने त्यांच्याकडे रोखून बघितलं.....

" ते पण आहे..... जाऊदे तू सिरीयसली नको घेऊ" ........श्रिया

" हे अर्जुन.......बेबी...... तू अजून रेडी नाही झाला??"  सोनिया आत मध्ये येत बोलली......

"अर्जुन बेबी..... ओ ssss." ......अनन्या श्रिया

ते ऐकून अर्जुनच्या डोक्यावर आट्या पडल्या....

" Oh my God....... सोनिया यू अर लूकिंग सो ब्युटीफूल...... एनीथिंग स्पेशल टुडे??" ........अनन्या

" Arjun is  taking me for a dinner date" ...... सोनिया

" ओह म्हणूनच आज तो पण ब्लश करतोय." .........श्रिया दोघांनाही चिडवत बोलली....

" कुठे फसवले या माहीने" ........  अर्जुनने डोक्यावर हात मारला आणि त्याला ऑफिसमध्ये घडलेले आठवलं

" Hey Arjun.... what's special today??......you look  so happy" .....सोनिया अर्जुनच्या कॅबिनमध्ये येत बोलली..... तिने सुद्धा बाहेर त्यांचा मूड खूप चांगला आहे असं ऐकलं होतं....

"नथिंग सोनिया .....बोल काय काम होत?" ......अर्जुन

" अर्जुन आपल्या लग्न जन्मल्यापासून तू  एकदाही मला बाहेर लंच... डिनरसाठी घेऊन नाही गेला.... आज मी तुला डिनर डेट साठी इंवाईट करायला आले आहे......

" सोनिया भरपूर काम पेंडिंग आहेत....... नंतर कधीतरी बघूयात" .........

" ओह यार अर्जुन ......काम तर नेहमीच असतात .....तुझी काम तर कधीच संपत नाहीत..... प्लीज थोडासा वेळ नाही काढू शकत तू माझ्यासाठी ??? ...... मला पण माहिती आहे ती तुला खूप काम असतात.......त्यामुळे मी पण तुला फार जास्त काही विचारत नसते........ पण आज एक तास नाही देऊ शकत तू मला??....... मी तुझ्याकडे कधी काही मागत असते काय??..........आता तर आपलं लग्न पण होणार आहे..... it's my right now......otherwise I will complaine  to Aaji.....

"Soniya...... don't blackmail.."

" अर्जुन........."

" सोनिया,  तुला माहितीये मला बाहेरचं फूड आवडत नाही........ का हट्ट करतेस" ....... अर्जुनला तिला नाही म्हणायला खूप जड जात होतं ,  तिच्या मनासोबत कुठेतरी आपण खेळ करतोय असं त्याला वाटत होतं आणि म्हणून तो या ना त्या कारणाने तिच्यासोबत बाहेर जायला टाळत होता........ माहिला केलेल्या प्रॉमिस प्रमाणे लावण्याला सध्या काही सांगू पण शकत नव्हता ... तिला लग्नासाठी नाही सुद्धा म्हणू शकत नव्हता,  अशा द्वंद्वमध्ये तो फसला होता....

" हॅलो लावण्या मॅम...... कशा आहात??" ........ माही काही पेपर्स सबमिट करायसाठी म्हणून अर्जुनच्या केबिन मध्ये आली होती.....

" हे माही कशी आहेस??" .........सोनिया

" मी ठीक आहे .......काहीतरी सिरीयस डिस्कशन सुरु होता वाटते ...मी डिस्टर्ब तर नाही केलं ....?" .....माही  अर्जुन आणि सोनियाच्या चेहऱ्याकडे बघत बोलली....

" नाही ग........हा तुझा बॉस.... याला मी डिनर देट साठी इन्व्हाईट करायला आले तर फारच भाव खात आहे" ........ माही

" का?? ......काय प्रॉब्लेम झाला....... मी काही मदत करू शकते काय......????".....माही

" त्याला बाहेरचं फूड नाही आवडत खायला........ दॅट्स द बिग प्रॉब्लेम आणि म्हणून तो नकार देतोय बाहेर यायला" .......सोनिया

" अरे बस,  एवढेच काय" .......... माही सोनिया जवळ गेली आणि तिच्या कानात काहीतरी सांगितले......

तिला बघून अर्जुनने डोके त्यावर आठ्या पडल्या......."  मी सोनिया सोबत जायचं नाही म्हणून काही तरी बहाणा बनवतोय आणि या मॅडम त्यांना आयडिया देत   आहेत......... काय करू मी हीच......."

" Yeah superb....... आता तर तू नाही बोलू शकत नाही" ........ माहिची आयडिया ऐकून सोनिया एक्साइट झाली......

अर्जुन क्वेश्चन मार्क चेहऱ्याने माहीकडे बघत होता......

" एन्जॉय युवर डेट mam.............. अँड सर" ........ माहीने अर्जुनला बघून एक स्माईल दिली आणि ती तिथुन निघून गेली.....

*" अर्जुन तू आता मला नाही म्हणू शकत नाही ......तुला बाहेरचं फूड नाही आवडत ना,  तुला तिथे घराचे फूड मिळेल....... घरी बनवलेले स्पेशल फूड तुझ्यासाठी....... आता तू नाही म्हणू शकत नाही, नाहीतर खरच मी तुला धमकावेल" .........सोनिया

" Okay" ....... अर्जुन कसातरी रेडी झाला

******

आधी आईसोबत बोलून आईला समजावतो,  नंतर घरच्या बाकीच्यांची बोलावं असा विचार करून अर्जुन एक-दोनदा त्याच्या आईशी माहिबद्दल बोलायचा प्रयत्न केला होता,  पण बोलताना नेहमीच कोणी ना कोणी मध्ये येत होते  त्यामुळे त्याने बोलायचं टाळलं होतं आणि संडेला आरामात बोलू असा प्लॅन केला होता

********

लग्नाचे डिस्कशन करायला आणि लग्न जमल्या पासून कधीच बोलावले नव्हता म्हणून आज माहीच्या घरच्यांनी अर्जुनच्या फॅमिलीला घरी जेवायला म्हणून बोलावले होते.......

" Wah...... आता स्वयंपाक तर खूपच टेस्टी झाला .... काकू इट्स व्हेरी डिलिशियस" ........आशुतोष

" तुम्हाला आवडला !!! ......खूप छान वाटलं.......... आमच्या महिने बनवलं........ तिला खूप आवड आहे कुकिंगची" .......आई

अर्जुनला जेवतानाची चव  ओळखीची वाटली होती ....... आणि मग त्याच्या लक्षात आलं की सोनिया सोबत डिनरला गेला होता त्या जेवणाची चव नी या जेवणाची चव सारखी आहे.......... आणि तो जेवता जेवता अधून मधून माहिकडेच बघत होता..........त्याच्या चेहर्‍यावरचे हावभाव बघून माहीच्या लक्षात आलं की अर्जुनला समजल आहे की सोनिया आणि अर्जुन डेटला गेले होते त्यादिवशी माहिनेच जेवण बनवून दिले होते.......

घरातील बाकी गप्पा करत होते... माही किचनमध्ये आवराआवर करत होती..... अर्जुनची नजर माहीवर होती.....तो जागेवरून उठला..

"काही हवे आहे काय अर्जुन सर तुम्हाला???"....छाया ( अंजलीची आई)

" हो.....पाणी.........".....अर्जुन

"थांबा मी आणून देते......"...छाया

"नाही ....नको.....तुम्ही बसा...,मी घेतो......"....अर्जुन

" नको....बसा तुम्ही .... मी आणते....."....छाया

"पाणी तर बहाणा होता......माहिसोबत बोलायला".....अर्जुन मनातच बोलत कसानुसा चेहरा करत  त्यांच्याकडे बघत होता..

आशुतोष अर्जुनची गंमत बघत होता...

" काकी , जाऊ द्या त्याला ... घेईल तो आपल्या हाताने पाणी.....नाहीतर माही आहेच तिथे ती देईल आहे.........तुम्ही नका काळजी करू....आपण इथे लग्नाचे ते काय ठरावतोय......ते बोलू"....आशुतोष

अर्जुन एक भूवयी उंचावत अशितोषकडे बघत होता.

"बरं........तुम्ही आतमध्ये जावा.... माही आहेच तिथे.... ".....छाया

" आरामात पी हा पाणी.....मी आहो इथे......"....आशुतोष हळूच अर्जुनला म्हणाला... अर्जुनने एक कटाक्ष टाकला आणि आतमध्ये आला. 

माहिने सगळं किचन स्वच्छ केले होते...आता ती भांडे घासत सिंक जवळ उभी होती .. केस वरती क्लचमध्ये अडकवले होते....दोन चार बटा तिच्या गालांसोबत मानेवर फेर धरून नाचत होत्या.....ओढणी एका खांद्यावरून घेत कंबरे भोवती गुंडाळून बांधली होती....काम करत असल्यामुळे तिच्या बांगड्यांचा लयबद्ध खणखणनारा आवाज............. माही आपल्याच विश्वात गुंग आपले काम करत होती....अधूनमधून समोर येणाऱ्या केसांच्या बटा आपल्या उलट्या हाताने कानामागे सारत होती ....अर्जुन एका भिंतीला टेकून तिला बघत उभा होता..... त्याचं लक्ष तिच्या पाठीकडे गेले तर तिच्या ड्रेसची गळ्याजवळची डोरी सुटली होती......तो हळूहळू चालत तिच्या जवळ गेला....तिचे समाओर आलेले केस हळूच हात लावत कानामागे सरकवले.....त्याच्या स्पर्शाने माही एकदम दचकली.....

" तू...तू.....तू....तुम्ही....इथे ......????".... माही अडखळत बोलत इकडे तिकडे कोणी आहे काय बघत होती.....

"Don't worry....... कोणी नाही आहे....सगळे बिझी आहेत.....".....अर्जुन

" तुम्हाला काही पाहिजे आहे काय???? नाही म्हणजे तुम्ही इथे????"...... माही

" तू..........".....अर्जुन

" हां?????....."....माही

" तू.....तू हवी आहेस....."....अर्जुन हळूवारपणे तिच्या कानाजवळ जात बोलला...तसे तिच्या अंगावर शहारे आले.....

"सर......कोणी.......".....माही काही बोलतच होती की तिच्या कंबरेवर तिला त्याचे हात जाणवले.....ती घाबरून त्याच्याकडे बघत होती.....त्याने तिच्या कंबरेवर तिला पकडत, उचलून ओट्यावर बसवले.....

" किती काम करते???? थकत नाही???....".... त्याने बाजूचे नॅपकिन घेत तिचे ओले हात पुसत तिच्याकडे बघत बोलत होता.....ती फक्त तो काय काय करतोय ते बघत त्याच्याकडे बघत होती....तो असा जवळ हवाहवासा पण वाटत होता...त्यात तिला कोणी बघेल, त्यांच्या नात्या बद्दल काय विचार करेल याचि भीती सुद्धा.....

पहला पहला प्यार है

पहली पहली बार है

जान के भी अन्जाना

कैसा मेरा यार है

उसकी नज़र, पलकों की चिलमन से मुझे देखती

उसकी हया, अपनी ही चाहत का राज़ खोलती

छुप के करे जो वफ़ा, ऐसा मेरा यार है

पहला पहला प्यार है...

अर्जुनने त्याचे हात तिच्या कंबरेजवळ नेत तिची कंबरेवर बांधलेली ओढणी सोडली.....ती सारखी करत तिच्या दोन्ही खांद्यावर नीट ओढून दिली.....त्याच्या होणाऱ्या स्पर्शाने तिला मोहरुन जायला होत होते........दोन्ही हात तिच्या बाजूने घेत तिच्या मानेजवळ झुकला.....त्याला इतके जवळ आलेले बघून तिच्या हृदयाची धडधड वाढली होती.....तिचे डोकेच ब्लँक झाले होते ....तिने त्याचा शर्टची कॉलर आपल्या हातात घट्ट पकडून धरली...नी आपोआप तिचे डोळे मिटल्या गेले.....तिने आपला श्वास रोखून धरला होता.....त्याने तिच्याकडे एकदा बघितले...तिला बघून तो गालातच हसला....तो तिच्या मानेजवळ झुकला आणि तिच्या ड्रेस ची सुटलेली डोरी बांधत होता....आता ती पूर्णपणे त्याच्या मिठीत लपली होती..... डोरी बांधून झाली होती...त्याने तिचे वरती बांधलेले केस मोकळे केले...... त्यातले थोडे केस आपल्या हातात घेत थोडेसे पुढे आणले.....

" Now.....perfect.....!!"... अर्जुन

अर्जुन थोडा दूर व्हायला गेला तर माहीने त्याची कॉलर पकडली होती... तर तो तिथेच थांबला....

" Always with you my sweetheart......".... कॉलरला पकडलेल्या माहीच्या हाताला पकडत बोलला.

त्याचा आवाजाने माही भानावर येत डोळे उघडून त्याच्याकडे बघत  त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत होती. तसा त्याने तिचा हात सोडला..

" कारल्याची भाजी खूप टेस्टी होती, अगदी मला आवडते तशी...."....तिच्या बांगड्यांवरून आपला एक बोट फिरवत तो बोलत होता...

" हां????आज तर नव्हती के........"......माही प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे बघत होती...

"आणि या खणखणाऱ्या आवाजावर फक्त माझा अधिकार आहे......."...तिचा हात हातात घेत बांगड्या घातल्या होत्या तिथे त्याने किस केले.....एकदा तिच्याकडे गोड हसून बाहेर निघून आला.....

" आता तर यांना माझ्या हातची चव सुद्धा कळायला लागली......काहीच लपवता येत नाही यांच्या पासून".... माही मनातच बोलत त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत स्वतः तच विचार करत होती...

त्या दिवशी अर्जुन सोनिया सोबत डिनर साठी गेला होता तेव्हा माहीने त्याच्या आवडीचे सगळे बनवून दिले होते....घरी अधूनमधून नालिनिसोबत काम करतांना तिला अर्जुनच्या आवडी निवडी कळल्या होत्या...

" बराच वेळ लागला पाणी प्यायला....." ..आशुतोष अर्जुनला तिथे येऊन बसत बघतांना हळूच बोलला.

" ते.... माहीसोबत  ऑफिस चे बोलत होतो......"... अर्जून

आशुतोष त्यावर हसला..

"बरं तुमच्या पाहुण्यांना वगैरे निरोप सगळं झालं काय??..... पत्रिका वगैरे पाठवल्यात ??....... खूप कमी वेळ राहिला आता.??" .......आजी काहीतरी बोलायची सुरुवात केली......

" पाहुणे तसे फार नाही  आमचे....... अंजलीला एक मामा आहे,  पण त्याची  तब्येत सध्या नरम-गरम सुरू आहे त्याच्यामुळे त्यांना कोणाला यायला जमत नाही आहे आणि माझं म्हणाल तर.... हे गेले आणि मूलबाळ पण नाही काही,  त्यामुळे काही जास्ती सासरच्यांनी कॉन्टॅक्ट ठेवला नाही....... या पोरीच काय माझ कुटुंब" ......आत्याबाई थोड्या भाऊक झाल्या....


"

मग कन्यादान कोण करणार आहे???" .......मामी

आत्याबाई , आई आणि अंजली ,माही एकमेकांकडे बघत होत्या.....

वातावरण थोडे भाऊक झालेल बघून आशुतोष पुढे आला...


"

अरे वा , आपण सेम टू सेम की!!" .........आशुतोष

सगळे आशुतोषकडे बघत होते


"

तुम्हाला माहिती आहे मी  अनाथ आहो..... मी माझ्यासाठी फॅमिली शोधत होतो....... भेटली की मला" ......आशुतोष

आत्याबाई , आई प्रश्नार्थक नजरेने त्यांच्याकडे बघत होते...


"

अहो हे बघा जसं आकाश,  अर्जुन आणि अनन्या श्रेया भाऊबहीण आहेत तसंच या नात्याने मी अंजली यांचा भाऊ लागतो की....... तुमची काही हरकत नसेल तर मला तुमच्या फॅमिलीत यायला आवडेल...... " ...आशुतोष

आशुतोषचे बोलणे ऐकून सगळ्यांना खूप आनंद झाला.......तसही इतक्या दिवसात आशुतोषच्या लाघवी स्वभावामुळे तो सगळ्यांमध्येच खूप चांगला मिसळला होता.......


"

बाळा , सगळी काळजी मिटली बघ" .....आई त्याच्या डोक्यावरून हात फिरवत बोलली...... आशुतोषला पण अशा मायेच्या स्पर्शाने गहिवरुन आले.....


"

चला मग ठरलं तर अंजलीचं कन्यादान मीच करणार" .....आशुतोष  अंजलीला जवळ घेत बोलला......

" ओ लहान्या  मॅडम तुम्ही पण या इकडे........ तुमचं पण कन्यादान मीच करणार बर का!!" .......... दूर माहि डोळ्यात पाणी घेऊन उभी होती तिला बघत आशुतोष बोलला........ "आणि माझ्या साल्यांनी काही त्रास दिला ना तर मला सांगायचं , एकेकाला ठिकाणावर आणील" ..... आशुतोषने एक कटाक्ष अर्जुनवर टाकला............. अर्जुनाने बरोबर तो हेरला.....


"

What happened to my princess??" ...... एका कोपऱ्यात रुसून बसलेल्या मीराकडे बघत.... अर्जुन मीरा जवळ जात तिला कडेवर उचलून घेतले.....


"

बघ ना ताई माईचं दग्न आहे...... कोणालाच माझ्यासाठी वेळ नाही.... मला नवीन ड्रेस कोणीच घेऊन देत नाही आहे."  .......मिरा कुरकुर करत बोलली......


"

घ्या ......लहान फिमेलला पण शॉपिंगची हाऊस....... मला तर वाटते बायका फक्त शॉपिंग साठीच आणि मटकण्या साठीच जन्मलेल्या आहेत" ........ मामा मामीकडे बघत बोलले......मामीने तोंड वाकड केले

तसेच तिथे एक हशा पिकला.......


"

बस येवढच....... चल आपण दोघे जाऊ या...... माझ्याजवळ भरपूर वेळ आहे" ........अर्जुन


"

खरंच"  .....मीरा टाळ्या वाजवायला लागली


"

माऊ......... मी जाऊ??" ...... मीरा माहीकडे बघत बोलली


"

तिला काय विचारते आहे ....... मी तिचा बॉस आहे ......मी जे म्हणेल तेच होईल .....चलो" .......अर्जुन


"

हा???" ........ माहि डोळे मोठे करत अर्जुनकडे बघत होती...

अर्जुनला तिचं बघण्याने हसू आलं.......


"

मी तुला बाबा बोलू का??" .......मिरा

मीराच्या अशा बोलण्याने परत सगळे प्रश्नार्थक नजरेने अर्जुनकडे बघत होते......


"

तू मला काही पण बोलू शकतेस,  मी तुला त्यादिवशी बोललो होतो ना....... पण मी काय म्हणतो तू मला अर्जुनच म्हण..... आपण दोघ बेस्ट फ्रेंड आहोत"  .......अर्जुन


"

अर्जुन......  अर्जुन ??" .......मिरा


"

हो....... चल मग आपण जाऊन शॉपिंग करून येऊन....... तुम्ही सगळे करा डिस्कशन मी बाहेर जाऊन येतो" .......अर्जुन

अर्जुनला तसापण यांच्या लग्नाच्या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नवता.... तो मिराला घेऊन शॉपिंगसाठी गेला....

बाकी सगळ्यांनी  लग्नातल्या राहिलेल्या गोष्टी डिस्कस केल्या

अर्जुन आणि मिरा शॉपिंग करून परत आले तेव्हा मीरा अर्जुनच्या खांद्यावर झोपली होती....... अर्जुन तिला आतमध्ये बेडरूममध्ये झोपायला गेला त्याच्यापाठोपाठ माहिसुद्धा गेली......


"

हे काय , एवढी  ड्रेस??" ...........माही


"

हा ......मला काही कळलं नाही म्हणून" .......अर्जुन

अर्जुनला शॉपिंगच्या काही अनुभव नव्हता ....मीराने ज्या ड्रेसवर हात ठेवला ते सगळे ड्रेस त्याने घेतले होते.....


"

पण एवढे??" ..........माही


"

हा ........my princess deserve these all....and who will dare to stop me........ you??????" ..... अर्जुन माहीच्या खूप जवळ जात बोलला......


"

ना........नाही" ...... माही मागे मागे जात अडखळत बोलत होती


"

त्रास नाही दिला ना मीराने??" ..........माही


"

अह.........तस पण एक जण सोडलं तर बाकी कोणामध्ये हिम्मत नाही मला त्रास द्यायची??" .... अर्जुन मिश्कीलपणे हसत माहिच्या नाकावर आपल्या एका बोटाने मारत बाहेर गेला......

माही त्याच्याकडे बघत उभी होती....

"अर्जुन नका इतकं प्रेम करू.... घरचे नाही मानले तर खूप त्रास होईल तुम्हाला........"...

******

क्रमशः

🎭 Series Post

View all