Aug 16, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 39

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 39

 

 

भाग 39

 

"आकाश मिस्टर मल्होत्रा सोबतची मिटिंग फिक्स झाली आहे , ते तू अटेंड कर ,  मला थोडे काम आहेत...... आणि आपले जे पण नोव्हेंबर टार्गेटचे काम आहेत,  ते येणाऱ्या पंधरा दिवसातच कम्प्लीट करायचा प्रयत्न करा...... कारण नंतर घरचे लोक आपल्याला शांतीने काम करू देतील की  नाही,  मला तर डाऊट आहे ऑफिसमध्ये सुद्धा येऊ देतात  की नाही त्यामुळे लवकरात लवकर पूर्ण केलेले बरे" ....... अर्जुन

 

"हो भाई तू बोलत आहे ते बरोबर आहे.... मी आताच सगळ्यांना टार्गेट देतो आणि काम स्पीडअप करायला लावतो.... तू काळजी नको करू मी मिस्टर मल्होत्राची मीटिंग अटेंड करतो." ....आकाश

 

अर्जुन आणि आकाश एक मिटींग संपवून बोलत-बोलत ऑफिस केबिनकडे निघाले होते.....

 

" काहीतरी आवाज येतोय.... कोणीतरी काहीतरी व्हिडीओज बघत आहे" ......... अर्जुन आवाजाचा कानोसा घेत बोलला

 

" भाई , हा इथून येतोय आवाज.." ...... आकाश माहिच्या केबिनकडे हात दाखवत बोलला...

 

माहिच्या केबिनचे दार उघड होतं आणि सगळा आवाज बाहेर येत होता..... तिथे  माहि तीच्या केबिन जवळजवळ येत होते तसतसा आवाज स्पष्ट होत होता....

 

"हे तर लहान मुलांसारखा काहीतरी आवाज येतोय" ....... अर्जुन आणि आकाश माहीच्या केबिनच्या दाराजवळ थांबले ..... आतमधे बघतात तर अवाक् झाले

 

माहीने तिचा टेबल पलीकडे खिडकीजवळ ठेवला होता आणि ती खिडकीकडे तोंड करून बसली होती त्यामुळे दरवाज्याकडे तिचं पाठ होती आणि तिच्या कॉम्प्युटर सिस्टीमचे सुद्धा तोंड दरवाज्याकडे होतं,  त्यामुळे त्यावर चालणारे  सगळं व्हिडिओ बाहेरून दिसत होते

 

" Can't believe.......... हि कार्टून सिरीज बघते आहे " .....अर्जुन

 

" डोरेमॉन!!" .........आकाश

 

" व्हॉट???" .........अर्जुन

 

" त्या कार्टूनचे नाव डोरेमॉन" .........आकाश

 

अर्जुन आकशकडे अजब नजरेने बघत होता.....

 

"रोजच बघत असते" .....आकाश

 

"काय??" ......अर्जुन

 

" तुझं केबिन आधीच येते ना...तुझं इकडे जास्ती येणं नाही होत...मी रोजच बघतो" ......आकाश

 

" काय??".......अर्जुनने आकाशला एक लुक दिले आणि ते दोघं आतमध्ये आले

 

"मिस देसाई,  हे काय चाललंय?? ....हे काय बघत आहे??" ..... अर्जुन थोड्या मोठ्या आवाजात बोलला

 

त्याच्या आवाजाने माहि थोडी दचकून मागे वळली...

 

" डोरेमॉन!!!" ......... माही अडखळत बोलली

 

अर्जुनने परत एक हार्ड लूक माहीला दिले

 

" ते....ते....म्हणजे ......मला.... टॉम अँड जेरी बघायचं होतं पण इथे ते  लागलच नाही म्हणून मग हे बघत आहे".......... माही बोलता-बोलता आळीपाळीने कधी अर्जुनला तर कधी आकाशला बघत होती.......

 

आकाशच्या लक्षात आलं की आता हा प्रकार काही लवकर निपटनारा नाही..... अर्जुनला ऑफिस टाइमिंग मध्ये टाईमपास केलेला चालायचा नाही.....त्यामुळे माहिचा आता चांगला क्लास लागणार आहे तो समजला..... तो कामाचं बहाणा सांगून तिथून सटकला....

 

" इथे काम करायला येतेस की टाईमपास करायला??" ........अर्जुन

 

" काम" ..... माही

 

" मग हे काय सुरू आहे??" ........अर्जुन

 

"काम" ........माही

 

"तुला मी मूर्ख वाटतोय का??" ........अर्जुन

 

" हो.....नाही.....नाही" ..... माही अडखळत बोलत होती

 

" व्हॉट रब्बिश........ काय बोलते आहे तू??" .....माही

 

" कार्टून बघते आहे ते पण दार उघड ठेऊन..... काय शिस्त राहिल बाकीच्या स्टाफमध्ये....... एकाने सुरु केले की दुसऱ्याला सुरू करायला चान्स मिळतो.... तू हुशार आहेस म्हणून तुला प्रमोशन मिळालं , तुला तुझं सेपरेट केबिन देण्यात आलं...... तू त्याचा दुरुपयोग करते आहेस..... तुझ्या बाबतीत माझे सॉफ्ट इमोशन्स आहेत म्हणून तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस........ मला ऑफिसमध्ये अजिबात हे असं केलेलं चालणार नाही...... कामाच्या वेळी मला फक्त कामाच हवं..... पुढल्या वेळ पासून मला हे असं दिसायला नको" ......अर्जुन

 

माही मान खाली घालून त्याचं बोलणं ऐकत होती.....

 

" Am I clear???"........ अर्जुन

 

तरी माही मान खाली घालूनच उभी होते....

 

" Speak up now" ......... अर्जुन

 

" ते...... ते..... मी कामच करत होते" ....... माही

 

" परत बावळटासारखे उत्तर देते आहेस तू...... मला हे अजिबात चालणार नाही आहे" ........अर्जुन

 

माहीने तिच्या टेबल वरून काही पेपर्स जमा केले आणि त्याच्या हातात दिले.......

 

ते बघून अर्जुन शॉक झाला...... ती खरंच काम करत होती........ आणि तो तिच्याकडे एकटक बघत होता

 

" मला .....बंद खोलीत....... एकट्यामध्ये  खूप भीती वाटते" ....... माहीचा आवाज कापरा झाला होता..... ती खाली इकडे तिकडे बघत बोलत होती....

 

तिचं बोलणं ऐकून अर्जुनला त्याची चूक कळली होती, तिच्या सोबत झालेल्या वाईट घटनेमुळे तिला एकट्याने भीती वाटते हे माहिती असून सुद्धा तो विसरला याचेच त्याला वाईट वाटत होते... तिला काय बोलावं त्याला  काहीच सुचत नव्हतं...... थोड्यावेळासाठी दोघांमध्ये एक वेगळीच शांतता पसरली होती,...

 

" सॉरी.... परत अशी चूक होणार नाही" ........ माही आपल्या चेअरवर जाऊन बसली.... सिस्टिम ऑफ केले  आणि तिने पेपर घेऊन आपला परत काम सुरू केले......

 

अर्जुनला त्याची चूक समजली होती...... त्याला वाटलं माही अजुन जास्ती बडबड करेल , काहीतरी बोलेल,  त्याच्यावर चिडेल पण तिने असं काहीच केले नव्हते......ती चुपचाप  आपलं काम करत होती...... तिची चुप्पी त्याचा मनाला लागली होती....... तो तिच्या पुढे टेबलाच्या दुसऱ्या साईडला चेअर ओढून तिच्या समोर जाऊन बसला...... आणि तिला ' सॉरी '  कसे म्हणायचं याचा विचार करत होता , कारण आजपर्यंत त्याने कधीच कोणाला सॉरी म्हटलं नव्हतं आणि त्याला सॉरी म्हणायची सवय सुद्धा नव्हती,  त्यामुळे त्याला सॉरी शब्द बोलणं खूप जड जात होता..... अर्जुन थोड्यावेळ मोबाईलमध्ये आणि अधूनमधून तिच्याकडे बघत होता...

 

थोड्या वेळ दोघेही शांत होते......

 

" मी काम करते आहे...... माझ्यावर पाळत ठेवत इथे बसण्याची काही गरज नाही .....तसा पण तुमचा इंपॉर्टन्ट वेळ वाया जाईल" ........ कोणीच काही बोलत नाही बघून माहीने शांतता भंग केली...

 

" माझं ऑफिस आहे , मी कुठेही बसू शकतो.....आणि माझा इंपॉर्टन्ट वेळ कुठे घालवायचा माझं मी ठरवेल" ......अर्जुन खोडासरपणे बोलत होता

 

" खडूस !!!" ....... माही त्याच्याकडे बघत मनातच बोलत होती.

 

" ड्रॅक्युला!!! ........" ....अर्जुन

 

"ह??" ......माही

 

" ड्रॅक्युला........खडूस पेक्षा चांगलं नाव आहे .... I mean सुट होते मला....right???.." .....अर्जुन

 

" या खडूस सोबत तर मनातसुद्धा बोलता येत नाही.....कसे काय  सगळे ऐकायला जाते काय माहिती?" ..... माही काम ड्रॉइंग काढता काढता कधी अर्जुनकडे बघत कधी पेपरमधे बघत तिची   मनातच बडबड सुरू होती.......अर्जुन आता चेअरला रेलून तिच्याचकडे बघत बसला होता.....प्रत्येक सेकंदाला बदलणारे तिचे हावभाव बघायला त्याला फारच मजा वाटत होती...

 

"मला खूप अवघडल्या सारख होते आहे.....प्लीज तुम्ही माझ्याकडे असे बघू नका.....मला काम करता येत नाही आहे"  ......... माही

 

" नको करू मग" ........अर्जुन

 

"काय???" ........ माही

 

" तू जे करते आहे ते" .......अर्जुन

 

" आज सर पागल झाले दिसतय" .......माही मनातच

 

" का ???आता नाही होत काय टाईमपास???"......माही

 

" मी जिथे असतो तिथे टाईमपास कधीच होत नसतो......तिथे फक्त महत्वाची कामच होत असतात" ........अर्जुन

 

" तुम्ही स्वतःला खूप ग्रेट समजता ना?" .......माही

 

" हो!!!!!........." ......अर्जुन

 

"तशी मला तू पण ग्रेट च वाटते..."....अर्जुन मिश्कीलपणे हसत तिच्याकडे बघत होता

 

"काय....??".... माही

 

"क्यूट!!!!!".... अर्जून

 

"Sir???......"....माही

 

"स्वीट!!!!!!"........अर्जुन

"तुम्ही ना....??"......माही

"ब्युटीफूल......."....अर्जुन

 

आता महिला काय बोलावे कळत नव्हते....." जाऊ दे माही आपलं काम कर.......यांना बोलण्यात कोण हरवणार..."...माही परत शांत बसत आपले काम करत होती.

 

" यार ... सॉरी बोलणं इतकं कठीण का असते??...... कसं बोलू सॉरी??" .......अर्जुन मनातच विचार करत होता...

 

" ह्म्म....बोलतांना मनाला येईल तसे बोलायचे....आणि आता सॉरी बोलायचं तर शब्द निघत नाही आहेत तोंडातून" ......माही मनातच बोलत होती नि अचानक तिला काही आठवले....

 

" मी तुमच्या भावनांचा, आपल्यातला  नात्याचा  कुठलाही गैरफायदा घेत नाही........आधी तरी कधी घेतला आहे काय??"........माही

 

" मला तसे नव्हते म्हणायचे" ........अर्जुन

 

" तुम्ही असे बोललातच कसे???.........तुम्ही मला इतकेच ओळखता काय??.......आता मात्र तुम्ही माझ्या भावना खूप दुखावल्या आहेत"...........माही

 

" अरे यार...... माही आता बरीच तापली दिसत आहे ...आता तर सॉरी बोलावच लागेल" ......आणि तो विचार करत होता...

" बोलू नाही शकत पण लिहू तर शकतोच ना.....येस"......आणि त्याला काहीतरी सुचले

 

 

 

 

त्याने एका पेपरवर सॉरी लिहिले नी तो पेपर तिच्या पुढे सरकवला..... माही ने तो पेपर बघितला ....तो पेपर बघून ति गालात हसली असं अर्जुनला वाटलं......

" Hush!!!....."...... अर्जुन

माहीने तो पेपर हातात घेतला.... त्याच्यावर एक नजर टाकली आणि चुराळून तो खाली फेकला...

"हा??" ....... अर्जुन डोळे मोठे करत तिच्या कृत्याकडे बघत होता..... " तिची इतकी हिम्मत... माझा पेपर फेकला तिने???.......".....अर्जुन तिला तसे करतांना बघून मनातच चिडत होता.

"  अर्जुन , calm down...... आपण तिला येथे मनवायला, तिचा राग घालवायला  बसलोय,  विसरू नको......" ...अर्जुनने स्वतःला शांत केले.

 

 

त्याने परत एका पेपरवर सॉरी लिहिले, त्याखाली एक sad स्मायली काढली  आणि तो पेपर तिच्यासमोर सरकवला........ परत तिने सेम तो हातात घेतला त्याच्याकडे बघितले आणि तो चुराळून खाली फेकला

" अर्जुन हिम्मत नको हारू!!!" ...... अर्जुन स्वतःलाच मोटिवेट करत होता

 

 

 

 

आता त्याने एका पेपरवर खूप सारे  सॉरी लिहून तो पेपर तिच्यापुढे केला...... तिने परत तो वाचला.... चुराळला आणि फेकला..

" अरे यार , हिला माझी हँड रायटिंग आवडत नाही आहे की  काय???....... बऱ्यापैकी क्लिअर तर लिहितो  आहे..... हिला समजत नाहीये की काय......."

 

 


आता त्याने परत एक पेपर तिच्यासमोर केला त्यावर त्याने सॉरी सोबत असे मेसेज सुद्धा लिहिला.....

" ......because I hurt you, I hurt me to....."
          ............. I am Sorry............
                      ☹️

आणि परत तो पेपर तिच्यापुढे केला..... तिने परत तो वाचला आणि खाली टाकला....

" तुला इंग्लिश वाचता नाही येत काय??....... की समजत नाही आहे???" ...... अर्जुन आता थोडासा चिडला होता

माहीने त्याच्यावर एक नजर टाकली आणि परत आपल्या कामात लागली.....

" अर्जुन राग कंट्रोल कर.... अर्जुन कंट्रोल" ....... आणि तो परत शांत बसला......

" मुलींना मनावने इतके कठीण का आहे??....... अर्जुन तू पण ना,  सुखी जीव टेन्शनमध्ये घातला....... असं तर मी कधीच वागलो नव्हतो........ ही अशी का करते आहे??... ऐकत का नाही आहे??" ........ अर्जुन तिच्याकडे बघत  मनातच विचार करत होता

" सर तुम्ही उगाचच तुमचा वेळ वाया घालवत आहात....... जावा तुम्ही आता इथून..."

" हा???.....तू मला इथून हकालते आहेस??.....how dare are  you??....."

" मी कुठे तुम्हाला हकालते आहे.... फक्त सांगते आहे आणि तसे पण तुमच ऑफिस आहे .....तुम्हाला हाकलण्याची कोणामध्ये एवढी हिंमत......."

" ह्म्म्म...... मग ठीक आहे.... थोडा वेळ शांत बस मला विचार करू दे...." आता तो भयंकर विचारग्रस्त झाला होता.

माहीला  त्याच्याकडे बघून आता खूप हसायला येत होते पण तिने आपल्या हसण्यावर कंट्रोल केला होता......

" आयडिया!!!!......." त्याला एक युक्ती सुचली आणि त्यांनी इंटरकॉम फोन उचलला....

" टू  कॉफी......"

कॉफी शब्द एकूण माहीने त्याच्याकडे एक भुवई उंचावत बघितले

" परत काहीतरी गडबड  झाली वाटते???..".... परत त्याने काहीतरी आठवले

" एक कॉफी आणि एक चहा अद्रकवाला.... आणि सोबत गरम गरम जिलेबी.., पाठवा लवकर" ........ अर्जुन कसेनुसे तोंड करत ऑर्डर देत होता..,.... त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन खूपच गरीब दिसत होते......ऑर्डर देताना त्याला किती त्रास झाला हे माहिला त्याच्या चेहऱ्यावरून कळत होते....... आणि आतापर्यंत कंट्रोल करून ठेवलेले तिचे हसू बाहेर निघाले आणि ती जोर जोराने हसायला लागली.......

हसताना चेहऱ्यावरचा आनंद , तिचं ते गोड हसणं बघून तो पुरताच ब्लाँक झाला होता...... आणि थोड्यावेळासाठी तिच्यातच हरवला होता......

डोअर नॉकच्या  आवाजाने तो भानावर आला...... पिउनने  कॉफी चहा आणि जिलेबीचा ट्रे त्यांच्या समोर आणून ठेवला..... आणि तो सर्व्ह करणार की तेवढ्यात अर्जुनने त्याला थांबवले आणि जायला सांगितले...

अर्जुनने स्वतः उठून तिच्या समोर चहाचा कप आणि जिलेबी ठेवले.....

" माही,  प्लिज आता नाही नको म्हणू.... मला माहिती आहे हे  तुझे फेवरेट कॉम्बिनेशन आहे" ....... तो खूप बिचारे तोंड करत बोलला

तिने हसतच त्याच्या हातातून चहाचा कप घेतला....

"फायनली!!!!!" .......... त्याने एक मोठा श्वास सोडला आणि तो आपल्या चेअरवर जाऊन बसला.......

"हुश sss.....  खूपच डेंजर असते बाबा मुलींना मनावने..... पहिल्यांदा अनुभव घेतला..,..... आता समजलं ज्यांना गर्लफ्रेंड असतात का बरे ती लोक सतत टेन्शनमध्ये असतात.........इतक्या वेळात तर माझी presentations,
मीटिंग , प्लॅनिंग.....सगळं झालं असते...."

" Excuse me!!!!...... मी गर्लफ्रेंड नाही तुमची...... "

" हो .... माहिती आहे..... परत परत का वाईट गोष्टी आठवण करुन देतेस???....... जिलेबी कशी आहे ते सांग....."

" मस्त........ पण तुमचे हँड रायटिंग खरच खूप खराब आहे......"

" हाहाहाहा.... I know..... तरी मी बेटर काढायचा प्रयत्न केला...... साइन शिवाय इतर दुसरे कुठे काय काम असतं मला लिहायचं........ हे सगळेच कार्टूनकी जीवनात  पहिल्यांदा करतोय...." ...

" ह्म्म..... कार्टून दिसत होता तुम्ही..........."

आता अर्जुन हसायला लागला.......

"असेच नेहमी हसत रहा .....छान दिसता...."

"ह्म्म.." .... त्याने परत इंटरकॉमवर फोन करून राजूला आत मध्ये बोलावले...

"राजू,  मिस देसाईना पूर्ण ऑफिस मध्ये जिथे पाहिजे तिथे.....जसा पाहिजे तसा..... त्यांचा डेस्क अरेंज करून दे....... त्या आता इथे केबिनमध्ये नाही बसतील....." ....अर्जुन

" हो सर" ..... आणि तो निघून गेला

" खरंच???" .......... माही आश्चर्यचकित होत अर्जुनकडे बघत होती

"हो..." ....अर्जुन

"ये ssss" ...... तिथेच उड्या मारायला लागली.....

"You are the best Boss...."...... माही

" I know !!!! ..... thanks!!!....... बरं चल तुझा राग गेला असं समजतो आणि निघतो मी." ...... अर्जुन बोलतच होता पण माही कुठे काय ऐकत आहे..... ती आपलं सामान गोळा करण्यात बिझी झाली......

अर्जुन ने  एकदा तिच्याकडे बघितलं..... आणि हसला,  तो केबिनच्या बाहेर गेला....

तो गेलेला बघून माहीने त्यांनी लिहिलेले सॉरीचे चुराळलेले पेपर्स खालून उचलले आणि ते एक-एक सरळ करत आपल्या डायरीमध्ये नीट लावून ठेवत होती.... आणि शेवटचा पेपर हातात घेऊन ती बर्‍याच वेळ त्याच्याकडे बघत होती .....त्याच्या वरचा मेसेज वाचून तिच्या डोळ्यात पाणी आले....... तिने सगळे पेपर व्यवस्थित सरळ करून आपल्या डायरीमध्ये लावून ठेवले....

बाहेरून अर्जुन तिचा हे सगळं बघत होता......त्याचा फोन माहिच्या केबिनमध्ये राहिल्यामुळे तो परत घ्यायला आला होता आणि बाहेरून माहिचं हे चाललेल्या सगळं काम बघत होता.......... काही तरी विचार करुन तो परत आत मध्ये गेला आणि त्याने केबिनचे दार बंद केले..... दार बंद करण्याच्या आवाजाने माहीचे लक्ष तिकडे गेले.... अर्जुनला  बघून तिने लगेच आपली डायरी लपवण्याचा प्रयत्न केला...... त्याला जवळ येत बघून ती स्तब्ध एका जागेवर उभी राहिली....

अर्जुन तिच्याजवळ आला आणि त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला....

" माही , आय एम सॉरी...... मी खरच रागाच्या भरात कधी कधी नकळत बरच काही बोलून जातो..... मी तुझे खूप मन दुखावले मला प्लीज माफ कर...."....

माहीने त्याच्या तोंडावर बोट ठेवला आणि मानेनेच नाही बोलली......... " तुम्ही तर प्रत्येक वेळ माझं आयुष्य वाचवल आहे..... हे मन वगैरे दुखणं त्यापुढे काहीच नाही...... तुमच्यावर मी कधीच नाराज होऊ शकत नाही........"

"माही माझी एक गोष्ट ऐकशील......." अर्जुन

" नाही......" माही

" प्लीज......"

"नाही......"

" माही , माझा पुढच्या महिन्यात वाढदिवस पण येणार आहे,  मला एक माझ्या आवडीचा गिफ्ट नाही देणार तू....."

"तुमच्यासाठी तर मी माझा जीव सुद्धा देऊ शकते....."

" तुझ्या जीवात तर माझा जीव आहे...... तो तर तुला खूप सांभाळून ठेवावे लागेल.... पण मला दुसरा काही हवे आहे...... मी मागेल ते प्लीज देशील मला???......"

"नाही......."

" हे काय नाही नाही  लावून ठेवलाय??....... मी काही किस वगैरे नाही मागत आहे तुला....."

माही हळूहळू त्याच्या जवळ गेली..... त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती

" पप्पीसे डर नही लगता सहाब..... प्यार से लगता है.... "

" माही हा खुपच फालतू डायलॉग होता...."

अर्जुन भाऊक झालेला बघून ...... माही फक्त त्याला हसावण्यासाठी अशी बोलली होती.....

" माही तू माझ्या आयुष्यामध्ये नसेल याची कल्पनासुद्धा मला करवल्या  जात नाही आहे....... तू नसेल आहे हा विचार करून मला श्वास सुद्धा नाही घेता येत आहे...... मी नाही जगू शकत आहो ग तुझ्याशिवाय...... मी खूप प्रयत्न करतो आहे... पण नाही जमत आहे मला काहीच....... तूच सांग ना ...कसं जगायचं तुझ्याविना......."

त्याचे शब्द न शब्द माहीचा काळजाला चिरत होते.....त्याचे बोलणे ऐकून ती भावनिक पातळीवर खूप कमजोर पडत होती.......आणि फक्त त्याचाकडे बघत होती...

" माही त्यादिवशी तुला आग लागली..........थोड्यावेळ साठी माझं डोकं....माझे हातपाय....माझं ह्रदय सगळंच बंद पडलं,  थांबलं होत ....तुला तस बघून मला किती त्रास होत होता मी तुला सांगू सुद्धा शकत नाहीये........आणि तू मात्र कशाचीच भीती नसल्याप्रमाणे माझ्या या हातांवर आपलं अंग टाकून दिलेस.........आणि काय म्हणत होती आता मरण आले तरी आनंद आहे....खुश आहे.......किती जीव तुटत होता माझा तेव्हा......." ....अर्जुन

" माझा विचार कर  थोडा........मला जास्ती काहीच नको आहे......मला फक्त एक संधी दे ......फक्त एकच.....मी घरच्यांना तुझ्यासाठी... तुझ्या माझ्या रीलेशनशीपसाठी एकदाच समजवण्याचा प्रयत्न करेल.....हवं तर मी तुझं नाव सुद्धा बाहेर येऊ देणार नाही,  जोपर्यंत घरातले सगळे तयार होणार नाही तोपर्यंत......मला आयुष्यभर हे regret नाही ठेवायचं की मी एक प्रयत्न नाही केला......मला फक्त एकदाच प्रयत्न करू दे......प्लीज येवढेच ऐक माझं...... हव तर माझं वाढदिवसाचं गिफ्ट मागतोय समज......कधीच परत काहीच नाही मागणार"........अर्जुन खूप कळवळून माहीचे दोन्ही हात आपल्या हातात पकडुन बोलत होता......

"आणि घरातले नाही मानले तर....."....माही

"तर मी तु म्हणशील ते सगळं करेल......"...अर्जुन

"प्रॉमिस???........"

"हो पक्क प्रॉमिस.........मी आपला शब्दांवरून मागे फिरणार नाही.....आणि मी कधीच फिरत सुद्धा नाही"...

"ठीक आहे........"

"काय???"..........अर्जुन आनंदाने तिच्याकडे बघत होता...

"सर , कोणाला नाही आवडणार तुमची बायको बनायला......आणि त्यात जी जीला माहिती आहे की तुमचं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे......माझी पण खूप स्वप्न आहेत.....मला पण नवरी बनायला आवडेल.....पण ना माझं नशीब ना फारच खराब आहे......खूप भीती वाटते मला , जे आहे ते सुद्धा हरवण्याची........म्हणून मी नाही म्हणत होती.....ठीक आहे एक संधी मी स्वताला सुद्धा देऊन बघते.......पण माझ्या काही अट आहे".... माही

" काय???....."

" घरातला प्रत्येक व्यक्ती मनाला पाहिजे
तुम्ही प्रेमाने समजवाल, कुणालाही कुठल्याही गोष्टीवरून ब्लॅकमेल किंवा धमकावणार नाही
जोपर्यंत घरचे सगळे मानत नाही तोपर्यंत सोनिया mam ला काहीच कळता काम नाहीं
आणि जर घरतले नाही मानले तर तुम्ही सोनिया mam सोबत लग्न कराल.......
आणि तुमच्याकडे 15दिवस आहेत...."..... माही

" बापरे.....
इतके भयंकर terms and conditions तर आमच्या बिस्नेसमध्ये पण नाहीत"......अर्जुन

" ठीक आहे मग राहू द्या..."....माही

" अरे नाही......मी नाही कुठे म्हणालो......"....अर्जुन

" मग मान्य आहेत सगळ्या अटी???...".....माही

" काही दुसरा ऑप्शन सोडलाय काय??....."....अर्जुन

" आपल्या बोलण्यावर टिकून राहायचं ह...".....माही

" तुला पाहिजे असेल तर बोंड पेपरवर लिहून देतो...... ऑर तू म्हणशील तिथे साइन करून देतो....."....अर्जुन

"नाही ठीक आहे......तेवढा विश्वास आहे माझा तुमच्यावर....".....माही

"तेवढा???" .......अर्जुन एक भुवई उंच करत तिच्याकडे बघत होता...

" पूर्ण......."....माही

अर्जुनला हसू आलं......त्याला खूप आनंद झाला होता.....तो खूप खुश होता.....त्याला बघून माही पण आनंदली होती

" थॅन्क्स " ........अर्जुनने तिचे दोन्ही हात आपल्या हातात पकडले आणि खाली वाकून तिच्या दोन्ही हातावर किस केले........त्याने तसे केल्यामुळे माही खूप लाजली होती...ती ब्लश करत होती.......

आता उगाच त्याला तिची मस्करी करायची इच्छा झाली आणि तो तिच्या गालाला किस करणार होताच की तिने त्याला दूर ढकलले...

" अरे हे काय???.....आताच तर म्हणत होती ना पप्पी से डर नाही लगता सहाब वैगरे काही".....अर्जुन

" हा....पण तुम्हीच बोलले ना खूप बकवास,  फालतू डायलॉग होता म्हणून आता कॅन्सल...." .....माही

" हा हा हा....... ठीक आहे....बर चल येतो .... बाय..."...अर्जुन

" ह्म्म " .....ती परत आपल्या कामात लागली....तीच लक्ष नाही बघून अर्जुन तिच्या जवळ आला नि हळूच तिच्या गालावर किस करून पळाला......

" The Arjun patwardhan पागल झालेत....."

त्याने जाता जाता तिचा डायलॉग ऐकला होता....आणि त्याचा चेहऱ्यावर हसू पसरले.......

दिल क्यों ये मेरा शोर करे
दिल क्यों ये मेरा शोर करे
इधर नहीं
उधर नहीं,
तेरी ओर चले

दिल क्यों ये मेरा शोर करे
इधर नहीं
उधर नहीं,
तेरी ओर चले हम्म… हे… हे… हो…

(जरा देर में ये क्या हो गया नज़र मिलते ही कहाँ खो गया)

अर्जुन ला तर अगदी तो आकाशात असल्या सारखा भास होत होता.....आज तो खूप खुश होता....

*****


क्रमशः

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️