Jan 22, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 38

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 38

भाग 38
 
"यार.....हे कार्टून......काय करू हीच???....हीचे लाड करू...प्रेम करू...की राग करू.......हिच्यासाठी काहीतरी वेगळी इमोशनस शोधायला पाहिजे???.......अर्जुन तुझ्या पूर्ण विरुद्ध आहे ही....... एवढी हुशार पण फुल बावळट" .......अर्जुन काऊचवर झोपलेल्या माहीकडे बघत डोक्यातच विचार करत होता....

थोड्या वेळाने माही शुद्धीत आली.....आणि ती इकडे तिकडे बघत होती.....परत तिची नजर हातात असलेल्या कागदावर गेली.....

"एक ...एक मिनिट......काय होत आहे तुला??" .......माही परत चक्कर आल्यासारखी करत असताना बघून अर्जुन तिच्याजवळ जात बोलला...

"हे????" ............माही त्याच्या पुढे कागद धरत बोलली

अर्जुनने डोक्यावर हात मारला......

"लोक आनंदित होतात ......नी तू बेहोश......माही"...........अर्जुन

" सात लाख पॅकेज????........नी तीन महिन्यांनी दहा लाख.....तुम्ही नक्कीच डिझाईनिंगच च काम कराऊन घेणार आहात ना???......नाही म्हणजे ते अश्या डिझाईन्सचे येवढे पैसे कोण देत??".............माही अडखळत बोलत होती...

"You are impossible!!!!" ........ अर्जुन आपल्या चेअरवर जाऊन बसला....

" Senior designer ची पोस्ट आहे ती.......तरी सॅलरी कमिीच आहे....त्या पोस्टला जास्ती असते....पण तू नवीन आहेस म्हणून तुला कमी आहे ......management ने घेतलेले डिसिजन आहेत ते , सो मी मधात बोललो नाही....आठ दिवस तुला ट्रेनिंग देतील.........आणि तू  हे काय फलतूचे प्रश्न घेऊन बसलीस???....आणि  हे असं कोणाला चक्कर येते काय???" .....अर्जुन

"तुम्ही खूप भयानक भयानक शॉक देत असता मला.....हार्ट अटॅक तर येणारच ना?" .......माही

"हा हार्ट अटॅक होता???" .......अर्जुन तिच्याकडे कसानुसा चेहरा करत बघत होता..

"हो मग....तो मायनर हार्ट अटॅक होता ना " ......माही

"माही.........रिक्वेस्ट करतो येवढे डोकं नको ना वापरू".........अर्जुन बिचारा फेस करत तिला बघत होता...

"बरं....रोज तुझं ऑफिस दोन तास आधीच सुटेल....इंग्लिश क्लासेस मध्ये तुझं एडमिशन झालंय ..रोज तिथे जायचं आफ्टर ऑफिस"......अर्जुन

"का????......ड्रॉइंग इंग्लिशमध्ये काढायचं आहे काय???".......माही

"Why I am giving her explanations....... माही जेवढे सांगतोय चूप चाप तेवढे करायचे........खूप डोकं खाल्ले आहेस तू....जा आता".....अर्जुन

"पण मला तर बसायला जागाच नाही???.....ती मैना बसलीय ना तिथे.....मला खाली बसून नाही काढता येत.....म्हणजे येते पण मी फार वेळ खाली नाही बसू शकत".....माही

"ह्म्म..... चल एक surprise आहे तुझ्यासाठी" .......अर्जुन

"परत.???"....माही डोळे मोठे करत बघत होती..

अर्जुनला आता तिला कोणतेच उत्तर द्यायचे नव्हते.....तो तिला एक केबिनमध्ये घेऊन आला.......

"इथे बसायचं तू"......अर्जुन

" वाह.....किती छान...मी तिकडे खिडकी जवळ बसते"  ..........माही

" तुला जिथे वाटते तिथे बस" ......अर्जुन

"वाह !!!!! खूप आवडली मला जागा....पण बाकीचे लोक कुठे आहेत??"...... माही

"माही....हे फक्त तुझं कॅबिन आहे आता" ....अर्जुन

"काय??? ..... मी एकटी..... इथे???....... मग मी बोलणार कोणासोबत???" ......माही

"तू इथे काम करायला येतेस की बोलायला???........and now no more questions..... माझं खूप डोकं दुखायला लागलंय..... केबिनमध्ये काही चेंजेस हवे असेल तर राजूला सांग आणि तुझ्या मनाप्रमाणे करून घे" ......अर्जुन

" पण सर" ....... माही

"बाय" ......अर्जुन

" चला, माही मॅडम कामाला लागा ......प्रमोशन मिळालं की शिक्षा मिळाली आहे .....काही कळत नाहीये...."

******

" रुही .... रूही....... "

"बाबा............ तु आला" ......... रुही धावतच आशुतोषचा गळ्यात जाऊन पडली....

अनन्याचा नवरा आशुतोष आज जवळपास सहा महिन्यांनी परदेशातून परत आला होता..... आकाश त्याला एअरपोर्टवर रिसीव करायला गेला होता....... त्यामुळेच आणि  लग्नाचे डिटेल डिस्कस करायला म्हणून घरी छोट गेट-टुगेदर प्लॅन केलं होतं..... माहीची पूर्ण फॅमिली... सोनियाची आई वडील असे सगळे बोलवले होते....

" हॅलो everyone" ......... आशुतोष.

आशुतोषची सगळ्या मोठ्यांसोबत औपचारिक ओळख झाली होती..,..

" जिज,  तुझ्यासोबत खूप गप्पा करायच्या आहेत.......जिज,  चल वरती जाऊया..... इथे सगळे ज्येष्ठ नागरिक बसले आहेत आपण सगळे वरती धम्माल करूयात" .......श्रिया

" Yeah let's go" ....... आशूतोष

" प्रवासातून आले आहेत ते  .....आराम तर करू दे त्यांना,  नंतर करा काय ते करायचं" ......आई

"आई , डोन्ट वरी , आता तर मी फ्रेश झालो आहे...... फॅमिली मेंबर तर माझ्यासाठी एनेर्जी ड्रिंक सारखे आहेत..... चलो श्रिया.."...…. आशुतोष

मोठी लोकं सोडून सगळे वरच्या हॉलमध्ये निघून आलेत.....

"काय साल्यांनो,  मी नव्हतो तर तुमची खूपच प्रगती झाली??" ...,... आशुतोष

साला शब्द ऐकून अंजली माही आणि सोनियाचा चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशनस बदले  ....ते सगळे डोळे फोडून आशुतोषकडे बघत होते........

" अरे असे काय बघताय माझ्याकडे..... ते माझे साले I mean साळे  आहेत ना...... इतना तो हक बनता है" .....आशुतोष

" Hey girls chill..... जिज खूप कूल आहेत" ....श्रिया

"आकाशचे तर समजू शकतो....तो एक नॉर्मल मुलगा ......पण अर्जुन????" .......आशुतोष

"नॉर्मल नाहीत ना ...????"...... माही पटकन बोलून गेली

"काय.....? ......Are you mad??" ..... अर्जून माहीकडे अजीब नजरेने बघत होता..

त्या दोघांचे रिअँक्शन बघून सगळे हसायला लागले....

" सॉरी..,...म्हणजे मला  तसे नव्हते म्हणायचे.".........अति उत्साहात आपण काय बोलून गेलो...माहीला मात्र आता अक्वर्ड वाटत होते.... माहीने अर्जुनकडे बघितले....नी नजर चोरत इकडे तिकडे बघत होती..

" अरे कूल.....अर्जुन पण नॉर्मलच आहे......मला म्हणायचं होत प्रेम नी लग्न ...अर्जुन कसा काय रेडी झाला.....म्हणजे मी अजुनही शॉक आहो तो लग्न करतोय??" .......आशुतोष

" काय रे आशू ...तू पण ना.....प्रेमात पडायला एक क्षण पण पुरेसा असतो......आणि आता तो तयार आहे ना.....उगाच फालतू काही लाऊ नको बाबा आता" ......अनन्या

" खरंच म्हणते आहे अनन्या...प्रेमात पडायला एक क्षण पण पुरेसा असतो....कधी या कार्टूनच्या प्रेमात पडलो....मलाच माझे कळले नाही...."....अर्जुन दूर बसलेल्या माहीकडे बघत मनातच विचार करत होता.

"बरं जिजाजी ....मी तुमची सगळ्या सोबत ओळख करून देतो...तूम्ही पहिल्यांदाच भेटत आहेत यांना.." .....आकाश

" ये दादा थांब......जिजलाच ओळखू दे इथे  कोण कोण कपल आहे ते  .....मी अनन्या दी ला पण जिज ला काही सांगू दिले नव्हते...... तुम्हाला माहितीये जिज खूप छान फेस रीडिंग करतात.....let him guess" ..... श्रिया

"हो हो त्याला ओळखू दे.......खूप बढाया मारत असतो की आजपर्यंत हरला नाही... गेसिंग बरोबर निघते म्हणून...बघुयाच" ......अनन्या

" अरे यार हे काय फालतू गेम्स खेळत आहात तुम्ही???.....मला काम आहेत ...मी चाललो" ...अर्जुन

"ये फालतू वैगरे काही नाही....इथेच थांब चुपचाप हा" ....अनन्या

अर्जुन तोंड वाकडं करत चुपचाप तिथे एका साईडला बसला

" Okay.....as you wish pretty ladies" ..... आशुतोष एक एक करून सगळ्यांचे चेहरे बघत होता......बघतांना त्याच्या चेहऱ्यावर इतके अजीब अजीब एक्स्प्रेशन येत होते की त्याला बघून बाकीच्यांना हसू येत होत.....

" So guys......the first couple is......."

तसे सगळ्यांचे कान त्याचाकडे टवकारले...

" The first sweet couple ....who agree with each other for everything is......... आकाश and this pink dressed girl (अंजलीने पिंक ड्रेस घातला होता)" ...आशुतोष

" वाह सही  जिज.... बघा म्हणाली होती ना जिज फेस and eye reading करतात" ....... श्रिया

सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या.........

" नेक्स्ट कपल???"........अनन्या भुवया उडवत आशुतोषला विचारात होती

" हे खूप सोपं आहे.....
The next love birds ..who are very much  deeply in  love with each other but who never agreed with eachother for  a single thing is....."

माहीची धडधड वाढली होती....आणि तिला भीती पण वाटत होती....... कारण पहिली जोडी त्यांनी अगदी बरोबर सांगितली होती....

सोनिया सोबत सगळ्यांचं लक्ष आशुतोषकडे लागले होते......अर्जुनला माहिती होते तो काय सांगणार आहे आणि म्हणूनच त्याला तिथे थांबायचे नव्हते...

" Arjun ... Arjun and this green dressed girl...."

आणि सगळे शॉक झाले....

" शिट...... I knew it" ..... अर्जुनने डोळे बंद करत बसल्या जागेवर मुठ्ठी आपटली....

माहीच्या तर काळजात धस्सच झालं.... ...तीच हृदय खूप जोऱ्याने धडधड करत होते...ती आळीपाळीने अर्जुन...सोनियाकडे बघत होती

सोनियाचा मात्र चेहराच उतरला.....तिला हृदयातून कळ गेल्यासारखी वाटली........ती अर्जुन कडेच बघत होती....

" This time you are wrong baby...... हरलास तू"... अनन्या खुश होत बोलली....

"कसं काय?" .....आशुतोष

"जिजाजी दुसरं कपल अर्जुन - माही नाही ......अर्जुन - सोनिया आहे".....आकाश

तस माहिने सुस्कारा सोडला...

" पण हा ते एक बरोबर बोलला हा तू....... ड्रॅक्युला नी या बावळट काकूबाईच एका मिनिट साठी पटत नाही हा".......अनन्या हसत बोलत होती...

आशुतोष ने सगळ्यांकडे बघितले .... सगळ्यांनी होकारार्थी मान हलवली..

"असं कसं होऊ शकते....??..I still belive Arjun loves maahi" .... तो मनातच विचार करत गोंधळला सारखा माही, सोनिया ,अर्जुनकडे आळीपाळीेने बघत होता.

"येस baby.,.... आकाश बरोबर बोलतोय..... हवं तर अर्जुनला विचार?".....अनन्या

" You love Soniya??"...... आशुतोष अर्जुनकडे बघत होता

अर्जुनने एक कटाक्ष माहीवर टाकला .... माही खूप टेन्शनमध्ये दिसत होती....

"सर.....नको....नको.....काही सांगायला.....खूप गडबड होईल....."....माही मनातच बोलत अर्जूनकडे केविलवाण्या नजरेने बघत होती.

" माझं नी सोनियाचे लग्न होणार आहे" .....अर्जुन

" पण...".......आशुतोष काही बोलणार तेवढयात अर्जुनचा फोन वाजला नी तो फोन रिसिव्ह करत त्याचा रूम मध्ये गेला...

"सॉरी सोनिया.....होतात कधी कधी चुका" ...आशुतोष सोनियाचा पडलेला चेहरा बघत बोलला..

*******

" महाराज आजोबा लवकरात लवकरची डेट काढाल"......श्रिया

"तुला एवढी कसली ग घायी??".......अनन्या

"मी आकाश दादाचा मनातलं सांगतेय".....श्रिया चिडवत बोलली..

महाराज लग्नाची डेट काढायला आले होते...आणि सगळे त्यांच्या अवतीभोवती बसले होते....

"26 नोव्हेंबर आणि 1डिसेंबर निघते"......महाराजांनी बोटांवर काहीतरी मोजमाप केले नि पंचांगात बघून दोन तारखा सांगितल्या...

"1 डिसेंबर.... 1 डिसेंबर......ठराऊया......अर्जुनाचा वाढदिवस पण आहे " ......अनन्या

"हो....चालेल " ....सगळ्यांना तारखा पटल्या

"अरे काय त्याला प्रगट दिनाच्याच दिवशी पारतंत्र्यात पाठवत आहात??'...... आशुतोष मस्करी करत बोलला....

"लग्न म्हणजे पारतंत्र काय??.....थांबच तू"...अनन्या त्याला मारत बोलली...

त्यांना बघून सगळे हसले

"ठीक आहे.... चला तर मग 1 डिसेंबर फिक्स करूया".....आजी

" हो...चालेल"....आत्याबाई

महाराज दक्षिणा पाणी नाश्ता घेऊन निघून गेले

आता सगळे लग्न कुठे करायचं....कसे करायचे..... डिस्कस करत होते......माही रूही नी मिरा सोबत  वरती ग्रील जवळ जिथून खालचं सुद्धा दिसत होते तिथे आशुतोष नी आणलेले खेळणे खेळत बसली होती

"लग्न एकदाच होते तर मला ना सगळे फंक्शन एन्जॉय करायचं....आणि फार गर्दी नको.......नाहीतर येणाऱ्या जाणाऱ्या सोबतच वेळ जातो" ......सोनिया

"बर .....   तुमच्या काही इच्छा??".......आई आकाश अंजलीकडे बघत बोलली

"त्यांना फक्त लवकरात लवकर लग्न झालेलं पाहिजे, एवढीच इच्छा आहे" ....अनन्या श्रियाला टाळी देत बोलाली

"अर्जून......तुझी काही इच्छा??".....आई

"माझी काही इच्छा नाही".......त्याच्या बोलण्यावर सगळे त्याच्याकडे बघत होते...." I mean Soniya ला जे आवडते ते बघा".....अर्जुनने केलेली गडबड सांभाळली

अर्जुनला आता  तिथे बसायची अजिबात इच्छा नव्हती ...पण असं मध्येच उठून जाणे योग्य दिसत नाही म्हणून तिथे बसला होता....आणि अधूनमधून वरती माही नी मुलांना बघत होता

"मी एक सुचऊ काय??"....सगळ्यांचे ऐकून आशुतोष बोलला...

"हो हो.".....आजी

"मी काय म्हणतो आपण डेस्टिनेशन वेडिंग  प्लॅन केले तर??......म्हणजे बघा फक्त जवळचे नातेवाईक.....त्यामुळे फार गर्दी होणार नाही.....चांगलं वन विक औटींग प्लॅन करू....एखादे मस्त रिसॉर्ट बुक करूयात, एखाद्या मस्त रम्य ठिकाणी......सगळं functions सुद्धा एकत्र एन्जॉय करता येईल" .......आशुतोष

"Yeah..... superb idea!!!"..... Soniya

"हो छान आहे आयडिया".....आजी

" नाही म्हणजे....आम्ही काय म्हणतोय......तेवढा खर्च आम्हाला जमणार नाही हो"........आत्याबाई विचार करतच बोलत होत्या...

आत्याबाई आणि अंजलीचा आईला मात्र टेन्शन आले......

आजी ना त्यांचं टेन्शन समजले...."अहो काळजी नका करू....आम्ही आहोत ना"......आजी

" नाही हो असे कसे??....आमच्या मुलीचे लग्न आहे...आम्हाला पण तिच्या लग्नाचा खर्च करायचा आहे......आम्हाला पण सुख अनुभवायचं कन्यादानाचे".....आत्याबाई

माही वरती सगळं ऐकत होती....पिंकीला तिथे बसवून ती खाली आली...

"आत्याबाई तुम्ही काही काळजी नका करू....तुम्हाला जी हौस करायची ती सगळी करा.....काहीच कमतरता नाही ठेऊ आहेत आपण ताईच्या लग्नाची ......मला आता  लोन मिळते ......मी लोन घेईल,  तुम्ही काळजी करू नका." .........माही

माहीच्या बोलण्याने आत्याबाई नी आईचे डोळे पाणावले.......

"गुणाची पोर ग बाई माझी" ...माहीच्या गालावरून हाथ फिरवत हातानेच गालाची पप्पी घेत आत्याबाई बोलल्या.......

माही खूप आनंदी होत आत्याबाईंच्या गळ्यात पडली... ..... तिच्या चेहऱ्यावर खूप समाधान होते नि डोळ्यामध्ये खूप चमक होती....... तिच्या चेहर्‍यावर असा आनंद बघून अर्जुनसुद्धा मनातून खूप सुखावला होता...... आणि नकळतच त्याच्या चेहऱ्यावर तिला बघून स्माईल आले....

आत्याबाईंच्या गळ्यात पडून तिने अर्जुनकडे बघत  आत्याबाईंच्या गालावर एक छोटेसे कीस केले .....
अर्जुन तिकडे दूर बसला होता....बाकी सगळे इकडे गोल करून लग्नाचा डिस्कशन करत होते त्यामुळे माहीची सगळ्यांकडे पाठ  होती फक्त अर्जुनकडे ती बघत होती....

"अर्जुन सर , खूप थँक्यू!!!! हे सगळे तुमच्यामुळेच पॉसिबल झाले आहे...... तुम्ही मला प्रमोशन दिलं नसतं तर मला एवढी मोठी रक्कम लोन म्हणून सुद्धा मिळाली नसती...,.. खूप खूप धन्यवाद!!!!..... ती अर्जुनकडे बघत मनातच बोलत होती... आनंदाने तिचे डोळे पाणावले होते.......

अर्जुन सुद्धा तिच्याकडे एकटक बघत होता....... डोळ्यांनीच त्याने तिला नाही म्हणून सांगितले..... तसे तिने आपले डोळे अलगदपणे पुसले.......

"पागल आहे ही.......स्वतःपेक्षा दुसऱ्यांचाच आनंद हिच्यासाठी महत्वाचा आहे "...तो मनातच बोलत होता....

"बरं पण डेस्टिनेशन वेडिंगसाठी फार दूर नको जाऊयात.... इथे महाराष्ट्रातच ठिकाण शोधा".....आजी

"Okay boss.... आपका हुकुम सारांखोपर"...... आकाश सर्वांसमोर कमरेत वाकत बोलला....

"हो आता तर तू सगळेच हो म्हणशील......."

सगळीकडे फक्त आणि फक्त आनंद पसरला होता.....

मोठे लोक  आता  रितीभाती, काय काय कार्यक्रम करायचं ते डिस्कस करत बसले होते.....

"बर आता यांचं हे खूप वेळ चालणार आहे..... आपण सगळे टेरेसवर जाऊयात??...... काहीतरी मस्त गेम खेळुया... आपल्या गप्पागोष्टी करूया".......अनन्या...

सर्वांना अनान्याची आयडिया आवडली आणि ते सगळे टेरेस वर गेलेत...... अर्जुन हो नाही करता करता त्याला सुद्धा सगळे जबरदस्ती वर घेऊन गेले होते....

संध्याकाळ होत आली होती...... मावळतीचा सुर्य खूप छान दिसत होता..... गार हवा सुटली होती.....वरचे वातावरण खूप प्रसन्न झाले होते........ एका साईडला शेड मध्ये काही चेअर...काऊच होते...बाजूलाच परत वरती जाण्यासाठीचा  पायर्‍या होत्या....... सर्व जागा मिळेल  तसे तिथे जाऊन बसले..... आता त्यांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या.... आकाशच्या लव स्टोरी पासून माहिचा दिलेल्या वेगवेगळ्या आयडिया.... दिवाळी असं सगळं आशुतोषला सांगत होते....माही बाजूला असणाऱ्या पायऱ्यांवर जाऊन बसली होती..... तिच्यापुढेच असलेल्या चेअरवर अर्जुन बसला होता....... सर्वांच्या खूप गप्पा सुरु होत्या,  हे दोघे मात्र शांत बसली होती.... अर्जुनचे  अधून मधून लक्ष माहीकडे जात होते......

"Guys,  एक मिनिटात आलो जाऊ नका कुठे" ..... म्हणत आशुतोष खाली गेला आणि तो गिटार घेऊन आला......

ती गिटार बघून सगळे अर्जुनकडे बघत होते..... गिटार बघून अर्जुन काय रिऍक्ट करेल हेच सगळे बघत होते.... ती अर्जुनची गिटार होती आणि त्याने बऱ्याच वर्षापासून ती वाजवणे बंद केले होते....

"अर्जुन एक साँग....प्लीज!!!".........आशुतोष

"No Ashutosh...... मी कधीच गाणं गाने बंद केलं आहे".....अर्जुन

"बंद केले तर परत सुरु सुद्धा करता येते ना?" .....आशुतोष

" हा!!!!!........ यांना गाणं पण म्हणता येते???"....... माहीच्या नकळतपणे तोंडातून निघून गेले आणि ती डोळे मोठे करत अर्जुनकडे बघत होते...

"हो अर्जुनला खूप छान  गाणं म्हणता येते...... कॉलेजमध्ये असताना तो चांगलाच फेमस होता गाण्यासाठी".......सोनिया

"बापरे.....भारीच हुशार दिसतात आहेत हे ".....माही आश्चर्य चकित होत बोलली.

" Yess...... तुझा बॉस फक्त खडूसच नाहीये......बाकी पण बरेच चांगले गुण आहेत त्याच्यामध्ये.....कळेल हळूहळू....."... अनन्या

"बापरे....अजून काय कळायचे बाकी राहिले आहे......"... माही हळू आवाजात पुटपुटली..

" Excuse me!!!!! काही बोलली???" .... अर्जून माहीकडे बघत एक भुवई उंचावत बोलला...

"कुठे काय.....???....तुम्ही खूप हुशार आहात म्हणाली...."....माही घाबरत बोलली

" Okay....okay.... प्लीज तुम्ही दोघं सुरू नका होऊ आता....."... अनन्या

"अर्जुन , प्लीज आता नाही नको म्हणून......atleast for your love one" ..... आशुतोष.... आशुतोषला आज कुठेतरी वाटत होतं की अर्जुन त्याला नकार देणार नाही....

" अर्जुन अर्जुन...अर्जुन....अर्जुन" .... आता सगळे अर्जुंनला चिअरअप करायला लागले होते....

सगळ्यांना बघून अर्जुनला सुद्धा ना म्हणणे जड गेलं आणि त्याने हातात गिटार घेतली..... तो समोर दूर जात  एका पायरीवर सगळ्यांसमोर  बसला..... माही सगळ्यात मागे बसली होती त्यामुळे सगळ्यांची  पाठ माहिकडे होती...... आता बऱ्यापैकी अंधार पडत आला होता.....अर्जुनला पाडवाचा दिवशी घडलेला प्रसंग आठवला........नी भयानक दुखरी अशी कळ त्याच्या हृदयातून  गेली......त्याने माहीकडे बघितले..... नी ती ठीक आहे बघून एक मोठा श्वास घेतला........ती जशी आहे तशीच त्याला ती राहायला हवी होती....तिचा आनंदच त्याचा साठी खूप होत....

त्याने सगळ्यांवर एक नजर टाकली आणि शेवटी एक कटाक्ष माहीवर टाकला.....आणि त्याने गिटारची तार छेडली.......

" ओ.. ना वो अखियाँ रूहानी कहीं
ना वो चेहरा नूरानी कहीं
कहीं दिल वाली बातें भी ना
ना वो सजरी जवानी कहीं
जग घूमेया थारे जैसा ना कोई
जग घूमेया थारे जैसा ना कोई
ना तो हंसना रूमानी कहीं
ना तो खुशबू सुहानी कहीं
ना वो रंगली अदाएं देखीं
ना वो प्यारी सी नादानी कहीं
जैसी तू है वैसी रहना

(जग घूमेया थारे जैसा ना कोई
जग घूमेया थारे जैसा ना कोई )

त्याचा तो सूर संध्याकाळच्या त्या गार वातावरणात सगळीकडे घुमत होता......त्याचा आवाजात खूप गेहराई होती.....जसे काही तो खूप मनापासून कोणालातरी आवाज देतोय...त्यांचा मनातले सांगतोय.......
सगळे खूप तल्लीन होतात गाणे ऐकत होते.......

त्याचा आवाज ऐकला आणि महीच्या अंगावर शहारे उमटले..... थंडी सुद्धा होतीच........त्यात  त्याचा एक एक शब्द तिच्या हृदयाला भिडत  होता......तिन्ही आपले दोन्ही हात स्वतः भोवती पांघरून घेत एकटक अर्जुनला बघत होती........ ते गाणं ऐकताना आपोआप तिच्या डोळ्यातून पाणी तिच्या गालांवर ओघळू लागले......... तिच्या डोळ्यात पाणी बघून अर्जुनच्या हृदयात मात्र एक जोराची कळ गेली......... त्याने त्याच्या खिशातून गॉगल बाहेर काढला आणि त्याच्या डोळ्यांवर लावला....... आता तो फक्त आणि फक्त माहीकडे बघत गाणं गात होता ....

बारिशों के मौसमों की
भीगी हरियाली तू
सर्दियों में गालों पे जो आती
है वो लाली तू
रातों का सुकून..
रातों का सुकून भी है
सुबह की अज़ान है
चाहतों की चादरों में मैंने
है संभाली तू कहीं
आग जलती है
बने बरखा का पानी कहीं
कभी मन जाना चुपके से यूँ ही
अपनी चलानी कहीं
जैसी तू है वैसी रहना
(जग घूमेया थारे जैसा ना कोई
जग घूमेया थारे जैसा ना कोई )

अपने नसीबों में या
होंसले की बातों में
सुख और दुखों वाली सारी सौगातों में
संग तुझे रखना है..
संग तुझे रखना है
तूने संग रहना
मेरी दुनिया में भी
मेरे जज्बातों में तेरी मिलती निशानी कहीं
जो है सबको दिखानी
कहीं तू तो जानती है
मरके भी मुझे आती है निभानी
कहीं वो ही करना जो कहना
(जग घूमेया थारे जैसा ना कोई
जग घूमेया थारे जैसा ना कोई )

गाणं संपलं तरी सगळीकडे एक नीरव शांतता पसरली होती..... सगळेच त्या गाण्यांमध्ये खूप हरवले होते ......त्याचा आवाज सगळ्यांच्याच मनाला जाऊन भिडलं होतं

गाणं म्हणता म्हणतात त्याचा आवाज खुप जड झाला होता.......

"Guys I am thirsty....will be back in few minutes " ... अर्जुन बोलला आणि त्याने बाजूला गिटार ठेवली आणि तो भरभर बाहेर गेला.......

"Why this is so unbearable.........this paining a lot" ......... अर्जुनी डोळ्यांवरचा गॉगल काढला आणि आपले डोळे पुसले.......

********

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️