Jan 27, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 37

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 37

भाग 37

अर्जुनला सकाळी ताप चढला होता......सकाळीच डॉक्टर चेकप करायला आले होते.... कालच्या झालेल्या घटनेमुळे आज अर्जुनला थोडा ताप होता.....

डॉक्टरांनी चेक केले..

"डॉक्टर.??".....आई

"ठीक आहेत अर्जुन......2-3 दिवस राहील थोडी कनकन..... काल बऱ्याच वेळ पाण्यात होते...वरून थोड भाजले आहे त्यामुळे आहे ..... औषध दिले  आहेत ....आणि आराम खूप गरजेचं आहे"  ..... डॉक्टर

" धन्यवाद डॉक्टर साहेब" .....मामा

" डॉक्टर प्लीज माहीला सुद्धा चेक कराल......नाही म्हणजे ती पण काल रात्री ओली झाली होती."........अर्जुन (अर्जुनला एकदा ते पावसात भिजले होते ते आठवले...नी दुसऱ्या दिवशी दोघेही ऑफिस मध्ये आ...शी ss करत होते...... आणि माहीला पाण्यात भिजण्याचा  त्रास होतो हे आठवले होते...)

" हो........ don't worry" ..... डॉक्टर माहीला चेक करायला गेले . अर्जुनचा अंदाज बरोबर निघाला होता..... माहीला सुद्धा ताप चढला होता..... तापामुळे ती ग्लानीतच होती....डॉक्टरांनी  तिला सुद्धा मेडिसिन लिहून दिल्या नी जास्तीत जास्त आराम करायला सांगितले होते...

" अर्जुन कुठे चालला...ऐकले ना डॉक्टरांनी आराम करायला सांगितले आहे ते ?"  .....आई अर्जुन बेड वरून उठत होता तर रागवल्या

" अग हो ....मी ठीक अहो.....आता ते थोडं भिजल्यामुळे....तुला पण तर माहिती भिजायची अलर्जी आहे.....त्यात येवढे पॅनिक होण्यासारखे काही नाही"....अर्जुन

" हो ते सगळं ठीक आहे ...तरी पण इथून कुठेच जायचं नाही ...पूर्ण तीन दिवस चांगला आराम करायचा" .......आई

"मी कुठेच नाही चाललो.....फक्त त्या बाजूच्या रूममध्ये जात आहो.... डॉक्टर काय सांगतात बघायला नको का?".......अर्जुन

" तिथे माही जवळ  आकाश नी बाकीचे सगळे आहेत .....तू नको काळजी करू" .......आई

आई समोर आता जास्त काय बोलणार ..आकाश आला की त्यालाच विचारू म्हणून अर्जुन बेडवर चुपचाप पडून राहिला..

" आत्या, हे भाईचे मेडिसिन डॉक्टरांनी दिलेले.....काही खाल्ल्यावर द्यायचे आहेत" .....,..आकाश अर्जुन जवळ येत बोलला.....

" बरं.,.मी नाश्ता  घेऊन येते"  .......नलिनी अर्जुन साठी खाली नाश्ता बनवायला गेली....

" माही ठीक आहे काय ..? डॉक्टर काय बोलले.???" ......अर्जुन

" तुझं गेसिंग बरोबर होत.... तिला पण बराच ताप आहे ....ग्लानी मध्येच होती....आता झोपलिये....आता पर्यंत श्रिया होती तिथे बसलेली...माही झोपलिये तर तिला जा म्हणलो.........काजळीच काही नाही ....पण आरामाची गरज आहे...लगेच घरी पाठवायला नको तिला ..संध्याकाळी बघू....मी सोडून देईल....... आपल्या सोबत तिला अक्वर्ड वाटेल म्हणून अंजलीला फोन केलाय मी....ती येईलच" .......आकाश

" ह्म्म" ........अर्जुन उठून उभा होत होता..

" भाई तू कुठे चालला आता??....तुला पण आरामाची खूप गरज आहे" .........आकाश

" माहिला बघून येतो...लगेच परत येतो" .......अर्जुन....

अर्जुन माहीला बघायला रूम मध्ये गेला.......ती बेड वर झोपली होती...तिचा चेहरा पूर्ण उतरला होता.....तिला तस बघून त्याला थोड वाईट वाटलं........अर्जुन तिच्या जवळ गेला...त्याने तिचे पाय नी मान नी छातीजवळ भाजल होते ते चेक केले.....तर सगळा मलम निघाला होता....

अंजली येयीपर्यंत बराच वेळ होईल....तोपर्यंत तर माहीला याची जळण व्हायला लागेल नी खाजवेल सुद्धा....त्याने काही विचार केला नी दाराजवळ गेला ... त्याने इकडे इकडे तिकडे बघितले.....कोणीच नव्हते...सगळे आपापल्या कामात बिझी होते......त्याने दार बंद केले....ओल्या नॅपकिन ने त्याने तिचे घाव अलगद पणे नीट पुसले.....तीच कपाळ सुद्धा पुसले....नी मानेला छातीजवळ नी पायाला क्रीम लावले........तिच्या अंगावरचे पांघरुण नीट केले.....तिच्या डोक्याजवळ बसून तिच्या डोक्यावरून मायेनी हाथ फिरवला......तशी झोपेतच तिच्या चेहऱ्यावर गोड स्मायल आले.....ते बघून नकळतपणे त्याचे पण ओठ रुंदावले .....त्याला रात्रीचे सगळे क्षण आठवले.......तिच्या डोक्यावर थोड थोपटून तो आकाशचा रूममध्ये परत  गेला....

*****

" अर्जुन ........तू ठीक आहेस ना??"  .....सोनिया काळजीने  बोलतच आतमध्ये आली....अर्जुन आरसा मध्ये बघून त्याचा मानेला ला क्रीम लावत होता...

" हो " .........अर्जुन अजूनही आरसा मध्ये बघून त्याच क्रीम लावणं सुरू होत...

सोनियाने त्याचा हातातली ट्यूब घेतली नि आपल्या हाताने त्याला मेडिसिन लावत होती

" अर्जुनचा फोन??" .....फोनचा आवाज ऐकुन माहिने इकडे तिकडे बघितले तर अर्जुनचा फोन वाजत होता.... २-३ दा वाजला ....काही महत्वाचं फोन असेल म्हणून माही तो द्यायला आकाशचा रूमकडे गेली तर तिथेच दारा जवळ थांबली..

" अर्जुन अंग किती गरम आहे तुझं.....कसा काय रे तू असा वागू शकतोस??..... काल तू इतक्या वरून उडी घेतली ....माझे तर हार्ट बिट्सच स्कीप झालेत.....किती घाबरली होती मी.." ......तिचा आवाज खूप व्याकुळ झाला होता .... तिने अर्जुनला मिठी मारली......

" I was breathless......I can't even think..... can't  live without you" ..... ती त्याच्या मिठीत त्याला पकडत बोलत होती....बराच वेळ सरळ उभा असणारा अर्जुन.....तिच्या अशा बोलण्याने त्याला वाईट वाटले आणि त्याने आपला एक हाथ तिच्या डोक्यावर ठेवला

" I am perfectly fine Soniya." ..... बोलता बोलता त्याच लक्ष दारात उभ्या असलेल्या माहीकडे गेले.....ती एकटक दोघांकडे बघत होती......अर्जुनच लक्ष गेलेले बघून तिने लगेच आपली नजर वळवली....नी परत गेली...

" काय ग ..काय झालं??...तू इथे काय करतेय??....आराम करायला सांगितले ना??" .......श्रिया

माही परत वळत येत होती की तिथे अनन्या नी श्रिया भेटल्या होत्या...

" ते अर्जुन सरांच फोन रूम मध्ये वाजत होता खूपदा. .....त्यांना द्यायला गेले होते...तर तिथे सोनिया मॅडम...,..तुम्ही हा फोन त्यांना द्याल काय???"....आपल्या हातातला फोन श्रियाचा हातात देत बोलली..

" Oh.... रोमान्स सुरू आहे तर त्यांचा.....श्रिया चल त्यांची गम्मत घेऊया" .....अनन्या

" अग माही तू पण चल.....मज्जा घेऊ दोघांची....जरा हसून तुला पण फ्रेश वाटेल..." ... श्रिया

" नाहीत ....ते....सर" ......माही

" अगं चल ग......सर तो ऑफिस मध्ये...इथे नाही" .....श्रिया तिचा हाथ ओढत तीला  घेऊन गेली

" काय love birds ?? दार उघडे ठेऊनच रोमान्स सुरू आहे???" ......अनन्याचा आवाजानी सोनिया डोळे पुसत अर्जुन पासून दूर झाली .... अर्जुन पण दूर होत त्याच्या शर्टच्या बटन लावत सोफ्यावर जाऊन बसला ...

सोनियाला बघून वातावरण गंभीर आहे ...श्रिया नी अनन्याचा लक्षात आले.....माही बाहेरच दाराजवळ थांबली होती

" Aww..... अरे तो खूप स्ट्रॉंग आहे .....बघ ठीक आहे तो.... ये  दादा आमच्या वहिनी ला रडवायचं नाही हा" ......श्रिया सोनियाची समजूत घालत बोलले..

अर्जुनने त्यांच्याकडे बघून कसंनुसं स्माईल केलं...

" काल तर मी पण खूप घाबरले होते..... तो जर भान ठेवून असा वागला नसता तर कल्पना पण करवत नाही माहीला काय झालं असतं...... बघ ती पण ठीक आहे... हे छोटे मोठे ददुखणे आहे काही दिवसात ठीक होईल गं..... काळजी नको करू.......and you should be feel proud तो किती काळजी करतो सगळ्यांची" .........अनन्या

" ह्म्म " .... चेहऱ्यावर उसण हसू आणत सोनिया बोलली

" बरं ते झालं असेल  तर इकडे लक्ष द्या.... आज भाऊबीज आहे,  या सगळ्या प्रकरणात  मी गिफ्ट घ्यायला विसरणार नाही आहे हा...... नाहीतर असं झालं तसं झालं कारण सांगत बसाल तुम्ही" .....श्रिया

" तेच म्हटलं अजून गिफ्टचा विषय कसा काय नाही निघाला"" ..... आकाश.... अंजलीसोबत रूममध्ये आला

" तेच म्हटलं तू कुठे गायब......तुला तर अंजली वहिनी  शिवाय दुसरा कोणी दिसतच नाही...आज भाऊबीज आहे म्हटलं तर थोडं बहिणीकडे पण लक्ष द्या"  ...श्रिया

" तू तर थांबच ग.... तुझं लग्नच जमू दे मग बघ कसा पिडतो तुला.... सगळा बदला घेणार आहे मी" .....आकाश

" ते नंतर बघ....आधी गिफ्टचे  बघा" .......अनन्या...

" काय ताई तू पण" ......आकाश केविलवाणा चेहरा करत बोलला...

हाहाहाहा.....सगळे त्याला बघून हसायला लागते...आणि सगळ्यांनी ग्रुप हग केला.....

माही दुरूनच सगळं बघत होती.....

" किती खुश आहेत ना सगळे......किती छान दिसतात सगळे एकत्र" ........त्यांना बघून तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.......आणि काहीतरी आठवून ती तिथून परत गेली.....या सगळ्यामध्ये अर्जुनच लक्ष मात्र माही वरच होत ....

" बरं झालं असेल तर खाली चला.....आई सगळ्यांना खाली बोलवते आहे .....थोड्या वेळात चंद्रकोर येईल...पूजा करून भावांना ओवळायच आहे ...आकाशला अंजली माहीला घरी सोडायला सुद्धा पोहचवायचे  आहे" ......अनन्या

" ह्म्म्म तुम्ही व्हा सगळे पुढे ....मी फ्रेश होऊन येतो." ..अर्जुन

" भाई anything you need?" ...... आकाश

" No.... I am fine"  ....... अर्जुन

सगळे पुढे गेलेत...

" माही......काही मदत करू काय??.... आपल्याला निघायचं आहे" ......अंजली

" हा ताई.... तू हो पुढे मी येते आवरून" .....माही

" ठीक आहे ...ये लवकर" ....अंजली माही सोबत बोलून खाली गेली..

अर्जुन तयार होऊन खाली जाताच होता की त्याचं लक्ष रूममध्ये गेले तर  माही बेडवर बसलेली काहीतरी विचारात गुंतली  होती...

"माही" ......... अर्जुन रूममध्ये येत बोलला

"अं"............ अर्जुन च्या आवाजाने आईचं लक्ष अर्जुन कडे केला ती उठून त्याला नजर चोरत बेड ठीक करते होती..

"काय झालं??? कसला विचार करत होती एवढा??"........अर्जुन

"काही नाही".........माही चादर नीट करत होती

अर्जुनला वाटले सोनिया  आणि त्याला सोबत बघून बहुतेक तिला आवडलं नसावे........

"माही इकडे बघ"....... अर्जुन तिचा हात हातात पकडत स्वतःकडे वळवत बोलला....

"सोनिया माझ्याजवळ होती ते आवडलं नाही काय??...... बस थोडा वेळ दे मला मी घरी आपल्याबद्दल सगळं बोलतो" .......अर्जुन

"तसं काही नाही...... सोनिया मॅडमचा भावना मी समजू शकते...... तुम्हाला त्रास झालेला बघून त्यांना सुद्धा त्रास होत असेल...... त्या घाबरल्या होत्या...... त्यांच खूप प्रेम आहे तुमच्यावर....... आणि असे तुमच्या सारखं कोण वागेल तर भीती तर वाटणारच ना..... आणि तुमची होणारी बायको आहे.... त्यांचा हक्क आहे तुमच्यावर...... मला  काही वाटलं नाही" ......... माही

"ते भाऊ-बहिणीच्या गप्पा सुरु होत्या म्हणून मला माझ्या भावाबहिणीची आठवण आली.... बाकी काही नाही" .......माही

"बरं.... पण आता मी तिला आणि घरच्यांना सगळ्यांना खरं काय ते सांगणार आहे"....... अर्जून
 

"काय ??....तुम्ही घरी असं काहीच सांगणार नाही आहात.......  बघितलना माझे  नशीब किती खराब आहे ते......माझ्या जवळ सगळी नाती असून सुद्धा मी ते हक्काने सांगू  शकत नाही...भाऊ बहीण आहेत......मी एका गोंडस मुलीची आई आहे .......पण मी कोणालाच काही सांगू शकत नाही...... माझ्यावर कोणीतरी खूप प्रेम करतो ते पण मी कुणाला सांगू शकत नाही........ माझं नशीबच फुटके आहे.....

मघाशी बघितला ना.... सगळे किती खूष होते......तुम्ही सगळे एकत्र खूप छान दिसता..... मला तुम्हाला असं सगळ्यांना आनंदी बघून खूप छान वाटले.........एका नात्यासाठी मला तुमच्या पासून तुमची बाकीची  नाती हिरावून घ्यायची नाही आहेत" .....माही

" ठीक आहे .....तसं पण तुझ्याबद्दल फक्त मलाच माहिती आहे आपण कोणाला नाही सांगू" ........अर्जुन

" लग्न म्हणजे फक्त एका मुलाचे आणि मुलीचे नसते..... लग्न हे दोन परिवारामध्ये होत असते..... मी फक्त कोणाची बायको नाही होणार.... त्यासोबतच कोणाची सून, कोणाची वहिनी... कुणाची काकी , कुणाची मामी..... अशी बरीच नाती त्यासोबत जोडली असतात...... आणि कोणत पण नातं हे खोट्या गोष्टींवर उभ राहत नाही" ...... माही

"खोटे नाही बोलत आहोत ....मी फक्त लपवायचा म्हणतोय" .....अर्जुन

" अशा गोष्टी लपून नाही राहत..... कधी ना कधी त्या बाहेर येतातच" ......माही

" अग पण" ......अर्जुन

" अर्जुन तुम्ही का समजून घेत नाही आहात...... जर कुणाला आपल्या नात्यात बद्दल माहिती पडलं...... आणि त्यात पण माझी ही अशी परिस्थिती..... सगळे  दोष मला  लागतील...... की मी एका श्रीमंत मुलाला आपल्या फायद्यासाठी पटवले....... आणि मग जे  आधी झालाय त्यात पण मलाच सगळे दोषी समजतील....... तुम्ही प्लीज मला समजून घ्या.... मला सन्मानाने जगायचा आहे....आधी जे  झालं त्यात मी काही करू शकली नाही...... पण जे माझ्या हातात आहे ते तर मी करू शकते" .......माही

" तू रात्री वेगळीच होती....नी आता बदलतेय......तुला आठवत नाही काय तू माझ्यावरचं तुझं प्रेम accept केले आहेस....तरी मला डाऊट होताच सकाळ झाली की तुझ्या शब्दांवरून मागे हटणार"  .....अर्जुन

" मला सगळं आठवतेय...काहीच विसरले नाहीये........मी खूप प्रेम करते तुमच्यावर...नी करत राहील.....आणि म्हणूनच नाही म्हणते आहे" .....माही

" You are impossible." ..... अर्जुन हाताशपने बोलला..( मी हीच का ऐकतो नेहमी.... अर्जुन तिच्याकडे बघत मनातच विचार करत होता)

" And you are strong " ..... माही त्याच्या गालावर थोपटत हसत बोलली....

" हे काय तुला तर अजूनही ताप आहे??" ..... तिच्या हाताच्या स्पर्शाने त्याला जाणवले आणि मग त्याने तिच्या डोक्याला हात लावून बघितले...

"आताच मेडिसिन घेतली आहे थोड्या वेळाने होईल कमी..... काळजी नका करू"..... माही

"घरी गेली की काळजी घे स्वताची.... आणि ऑफिसमध्ये यायची काही घाई करायची नाही...... माझ्या हातात असतं तर मी तुला इथेच ठेवून घेतलं असतं.... पण तुमचे आणि तुमच्या सोसायटीचे सो कॉल्ड रुल्स ...मध्ये येतात" ...अर्जुन डोळे फिरवत बोलला.

"चला खाली जाऊया सगळे वाट बघत असतील"..... माही

"ह्म्म." ....अर्जुन

****

भाऊबीजेचा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला......श्रीया मी दोन्ही भावांना कडून चांगले पैसे उकळले होते..... कालच्या झालेल्या इन्सिडेंट मुळे कुणालाच बाहेर जाऊन भेट वगैरे घ्यायला वेळ मिळाला नव्हता...... रुहीने सुद्धा आपल्या मामा लोकांना ओवाळले होते......सगळ्यांची परत खाली मस्ती सुरू होते.. तेवढ्यात श्रिया चा फोन वाजला आणि ती बाहेर गेली...

हा देवेश बोल ना....श्रिया

"......"........पलीकडून

अरे सगळं ठीक आहे......श्रिया

"......".....पलीकडून

"दादाच लग्न होऊन जाऊ दे.... मग आपल्या बद्दल घरात सांगेल" .......श्रिया

"......"...

"हो रे.... बर चल नंतर कॉल करते घरात सगळेच आहेत" .......श्रिया

"......"

"लव यु टू..... बाय"...श्रिया

"मला तुमच्या सर्वांसोबत खूप महत्त्वाचं बोलायचं. आहे"......आजी

सगळे आजीकडे बघू लागले...... अर्जुन मात्र सुस्त... सोफ्यावर बसला होता

"आपण आठ दिवसांनी आकाश अंजली,  अर्जुन आणि सोनिया ची एंगेजमेंट ठरवली होती.... तर मला असं वाटते की आपण  इंगेजमेंट कॅन्सल करावी" .....आजी

"काय??" ....... सगळे एक साथ ओरडले आणि आजीकडे बघत होते...

"माझ्या आणि अर्जुन बद्दल तर घरात कळलं नाही??" ..... माही मनातच विचार करत होती.... तिच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन दिसत होते

अर्जुनला मात्र हे ऐकून आनंद झाला.....

आकाश आणि अंजलीला सुद्धा खूप टेन्शनमध्ये आले...

"अरे हो असे नका बघू माझ्याकडे..... काल एवढं घडून गेलं.... तर आम्ही मोठ्यांनी असा निर्णय घेतला आहे की आपण हे इंगेजमेंट कॅन्सल करूयात...... आठ दिवसांमध्ये अर्जुन आणि महिला बरं वाटणार नाही.... त्यांना डॉक्टरांनी आराम करायला सांगितलेला आहे.... तर त्यांना दगदग नको म्हणून आम्ही सगळ्यांनी असा विचार केला आहे "....... आजी

"मी.....मी ठीक आहे दोन दिवसात काम सुद्धा करू शकते" .... माही

माहिच्या अशा बोलण्यावर अर्जुन तिच्याकडे कशातरी अजब  नजरेने बघत होता....." प्रत्येक गोष्टीत बोलायलाच हवं का हिने " ...

" अग हो.... पण अर्जुनला सुद्धा बरे  नाही आहे ना... आणि त्याची इंगेजमेंट म्हटलं तर त्याची खूप दगदग होईल..... आणि सोनियाचे  आई बाबांचा पण तिकडे काहीतरी काम निघालं तर ते पण इकडे येऊ शकत नाही अस आत्ताच कळलं.... आम्ही सगळ्यांनी हा विचार केला की आपण इंगेजमेंट कॅन्सल करूया आणि डायरेक्ट लवकरात लवकर लग्न काढुया....जमेल तर एका महिन्यातच" ... आई

"हो आणि लग्नाच्या आदल्या दिवशी सीमांत पूजनच्या वेळी आपण एंगेजमेंट सुद्धा कार्यक्रम पार पाडूयात.. काय ठीक आहे ना?" ...आजी

"हो" .... अंजली आणि आकाश दोघे एकत्रच बोलले... त्यांच्याकडे बघून सगळे हसायला लागले..

हे सगळं ऐकून तेव्हा आकाश आणि अंजलीच्या जीवात जीव आला..... आणि बाकी सगळ्यांना पण आजीचा आणि आईचं म्हणणं पटलं होतं....

"काय अर्जुन ठीक आहे ना?"......आई

"तुम्हाला जे ठीक वाटते ते करा"..... अर्जुन ने एक कटाक्ष माही वर टाकला आणि आईला बोलला.....(एक महिन्याचा वेळ आहे परत एक प्रयत्न करून बघायला हवा... महिला एकदा समजावूनन बघायला हवं अर्जुन मनातच विचार करत होता...)
अर्जुनचा मात्र चेहरा उतरला होता..,....

"अंजली मी तसा तुझ्या घरी फोन करून सगळं सविस्तर सांगते पण तरीसुद्धा तुम्ही घरी व्यवस्थित समजून सांगा.... नाही म्हणजे तुम्ही एंगेजमेंट आहे म्हणून तुमचे नातेवाईक वगैरे बोलवले असाल तर त्यांना पण सांगायला बरं पडेल म्हणून सांगते आहे तसा तर मी मी तुझ्या आई आणि आत्याबाई सोबत बोलेल" ...आजी

"हो ठीक आहे" ......अंजली

*****

"का???य.... ज्वेलरी डिझाईन्स तयार नाही म्हणजे काय...... तुम्हाला काही खेळ वाटतोय का... डेडलाईन तुम्हाला पाळता येत नाहीत काय??......... आणि ज्वेलरी डिझायनर कुठे गेला??" ....अर्जुन ज्वेलरी टीमसोबत चाललेल्या मीटिंगमध्ये अर्जुन चांगलाच चिडला होता

"सर तो.......

"I don't want to hear anything .....he is fired.... दुसरा ज्वेलरी डिझाईनर शोधा"...अर्जुन रागातच उठून बाहेर येत होता...

"सर पण इतक्या कमी वेळात नवीन ज्वेलरी डिझायनर शोधणे म्हणजे सोपं नाही आहे....

"मग तुम्हाला कशाची सॅलरी मिळते आहे??...... तुम्हाला नसेल जमत काम तर सांगा" .....अर्जुन पुढे पुढे जात बोलत होता

"रिया प्लीज माझे पेपर दे"....... माही

"ना.".....रिया

"प्लीज यार दे ना" ....माही  रीयाच्या हातातले पेपर घ्यायसाठी तिच्या मागे जात होती ....तशी रिया पुढे पुढे पळत होती आणि माही तिला पकडायला मागे मागे पळत होती...

पळता-पळता रिया  अर्जुन सोबत असणाऱ्या एका स्टाफला जाऊन धडकली.... तिच्या हातातले सगळे पेपर वरती उडाले... अर्जुन तिच्याकडे खूप रागाने बघत होता अर्जुन ला बघून रिया सॉरी बोलून तिथून आपल्या जागेवर जाऊन बसली...

"मिस देसाई..ही काय पकडापकडी खेळायची जागा आहे काय??...... सगळ स्टाफ ईरेस्पोंसिबल आहे.".... अर्जुन रागातच बोलला

"आले परत आपल्या पूर्व अवतारात...... ड्रॅक्युला स्वार झाला यांच्यावर".... माही अर्जुन कडे बघत मनातच विचार करत होती.....

"झालं असेल मनातल्या मनात शिव्या देऊन....go back to your work"..... अर्जुन

"आता तर मनात बोलायची काय सोय राहिली नाही..... यांना तर सगळच ऐकू जाते".... माही खाली वाकून तिचे पेपर जमा करत होती...... तेवढ्यात अर्जुन ची नजर त्या पेपरवर गेली.... त्याने ते तिच्या हातातून घेतले....... आणि तो आश्चर्यचकित होते बघत राहिला...

 

 

 

 

 

 

 

"कोणी ड्रॉ केले आहे हे?"....अर्जुन माही कडे बघत बोलला

"सॉरी सर... ते चुकून"......माही बोलत होती की अर्जुन मध्येच बोलला

"Maahi... I am asking who draw these"..... अर्जून

"ते...ते मी..... मला आवड आहे म्हणून".....माही

"महेश ....check these"...... अर्जुन ते पेपर्स ज्वेलरी डिझाईन करणाऱ्याला देत बोलला...

******

दुसऱ्या दिवशी माही ऑफिसमध्ये आली तर तिला तिच्या डेस्कवर दुसरी कुठली तरी ती मुलगी बसलेली दिसली..

"मॅडम तुम्ही चुकीच्या जागेवर बसला आहात .....हा माझा डेस्क  आहे"..... माही

"मी बरोबरच बसले आहे.... आता मला हा जॉब भेटलेला आहे.......

"काय कसं शक्य ....कालपर्यंत मी इथे जॉब करत होते".... माही

"माहिती नाही... पण आज पासून मला इथे aपॉईंट करण्यात आलेले आहे ..... कदाचित तुम्हाला कामावरून  काढले असेल....."

"काय???..... नाही नाही असं नाही होऊ शकत".... माही टेन्शनमध्ये आली

"मी तर काही चुकी केले नाही..... काल फक्त ते पेपर्स..... तो गोंधळ... म्हणून तर मला कामावरून काढलं नाही..... पण न सांगता अर्जुन सर असं कसं करू शकतात.... माही चल त्यांनाच विचारायला हव..... ते माझ्यासोबत असं वागू शकत नाहीत."..... माही विचार करतच अर्जुनच्या केबिन पुढे उभी होती

"मिस देसाई आतमध्ये या"......अर्जुन

"सर तुम्ही असं कसं करू शकता.?"...... माही

"मी काय केलं आता?".... .... अर्जुन प्रश्नार्थक नजरेने तिच्याकडे बघत होता..

"तुम्ही मला जॉब वरून कसे काढू शकता?"..... माही

"अरे हा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे"......अर्जुन

"मला तुमच ते सरप्राईज वगैरे काही नको आहे..... मला तुम्ही फक्त एवढेच सांगा की तुम्ही मला न सांगता जॉब वरून कसे काय काढू शकता??..... तुम्हाला माहिती आहे मला या जॉब ची किती गरज आहे ते??... आणि मी काही चुकीच सुद्धा तर नाही केली...... काल ते पेपर्स, ते फक्त मला आवड आहे म्हणून मी ते काढत असते पण तुम्हाला नाही आवडणार तर मी ते पण नाही करणार"...... माही

"न ऐकताच  ही परत सुरु झाली."....अर्जुन डोक्यावर हात ठेवत कसानुसा चेहरा करत तिच्याकडे बघत होता..... त्याला माहिती होता तिचं बोलणं पूर्ण झालं शिवाय तिला बाकी कुणाचंच काही ऐकू जात नाही तो चुपचाप तिच्याकडे बघत होता

"एक मिनिट...... मी तुम्हाला लग्नासाठी नाही म्हणाले म्हणूनच तुम्ही हा बदला घेत आहात ना माझ्यासोबत...... मला माहिती आहे तुम्ही पक्के बिझनेसमॅन  आहात..... आता मला ठेवण्यात तुमचा काही फायदा नाही तर तुम्ही मला जॉब वरून काढून टाकलं".......माही

"ओ राजधानी एक्सप्रेस माझं ऐकून घेता काय?"......अर्जुन

"का...... का ऐकायचे  तुमचं .......तुम्ही नेहमी तुमच्या मताप्रमाणे करता".....माही त्याच्या जवळ जात बोलली

"बरोबर आहे मी माझ्या मताप्रमाणे करायला पाहिजे.....मी सगळं माझ्या मताप्रमाणे करत होतो तर सगळं नीट सुरू होतं ....आता तुझा ऐकायला लागलो  नी सगळी गडबड होऊन बसली आहे माझ्या लाईफमध्ये"......अर्जुन

"एकदा सुरु झाली कि थांबतच नसते तू...... थांब आता मी तुला अशी सोडणारच नाही"..... अर्जुन तिच्या हातात एक एन्वलप देत बोलला...

"काय आहे हे??.....आता तुम्ही जबरदस्ती करणार ??"....... माहि ते उघडत होती

"व्हॉट....?".... माही ते बघून शॉक झाली होती,  डोळे मोठे करत अर्जुनकडे बघत होती....

*****

Destiny... एक प्रेम कथा , अमृतवेल टीम

नमस्कार मित्रांनो,  

आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की इराणवर इरा चॅम्पियन्स ट्रॉफी ही स्पर्धा आयोजित केली आहे. तर त्यात मी सुद्धा भाग घेतला आहे. आमच्या टीम चे नाव आहे "अमृतवेल"....आणि कथेचे नाव आहे

"destiny.. एक प्रेमकथा .... "..... 

आपण सगळ्यांनी मला भरभरुन प्रेम दिले,आपल्या साथीने मी इथवर पोहचू शकले. त्यासाठी आभार, या कथेला सुद्धा मला आपल्या सगळ्यांच्या साथीची खूप खूप गरज आहे. ही कथा आपल्या आवडेल अशी आशा करते. आवडली तर नक्की लाईक करा...शेअर करा. 

नंदिनी तुहिरे चे भाग वेळेत पोस्ट करेल....दोन दिवस आड.....दुर्गा कदाचित थोडी मागे पडू शकते, पण तरीही वेळेत पोस्ट करायचं प्रयत्न असेल. 

 

परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार, नक्की वाचवत रहा destiny... एक प्रेमकथा.

 

*****

क्रमशः

*****

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️