Jan 27, 2022
Love

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 36

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 36

भाग 36

अर्जुनने माहीला आपल्या मिठीत घेतले, इकडेतिकडे बघत मनाशी काही ठरवले.

" माही I love you"  .... अर्जुन

या सगळ्या प्रकाराने माही खूप घाबरली होती...ती थरथर कापत होती.......अर्जुन सुद्धा खूप घाबरला होता..... तिला गमावण्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती...पण भिऊन त्याला चालणार नव्हते ...सोबतच माहीला ....काळजी नको  करू...घाबरु नको " तिला आश्र्वासित पण करायचे होते पण तिला समजावण्यासाठी त्याच्या कडे वेळ नव्हता .....आणि मग त्याने तिच्या डोळ्यात बघितले  आणि फक्त येवढाच बोलला.... ' I love you '  .... ज्यात सगळं आले होते ....

अर्जुनने जेव्हा माहीला आपल्या जवळ घट्ट पकडले होते तेव्हा तिला त्याचे हार्ट बिट्स खूप जोराने धडधडत होते, ते  क्लिअरली ऐकू येत होते...... त्याची भीती,  त्याच्या मनाची अवस्था , तिला सगळं कळतं होते....

"तुझी मिठी ही सगळ्यात सुरक्षित जागा आहे माझ्यासाठी.....तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे .....तू सगळं ठीक करशील.....आणि नाही जरी मी...तरी तुझ्या मिठीत शेवटचं श्वास घेणे याशिवाय दुसरी आनंदाची गोष्ट नाही माझ्यासाठी......'  I love you अर्जुन' " ........माही मनातच बोलत होती आणि तिने त्याच्याकडे बघून खूप सुंदर स्मायल केले...  ज्यात अर्जुनला तिच्या त्याचावरचा विश्वास दिसत होता , तिच्या डोळ्यात  कशाचीच भीती दिसली नव्हती....जणूकाही त्याला तिच्या मनातले ऐकू आले होते ज्यामुळे त्याच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या ......तिने खूप सकारात्मक स्म्याल केले आणि त्याच्या छातीवर तीच डोकं पडलं.......

तिच्या केसांची आग त्याच्या गळ्याजवळ...छातीजवळ लागत होती...त्याच ही शरीर बरच भाजत होत.....आणि एक क्षणाचा ही विलंब न करता त्याने खाली उडी घेतली........

' धप्प '  आवाज झाला....जवळपास 17-18 फूट उंची वरून त्यांनी उडी मारली होती.........झालेल्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष गेले .....तर अर्जुन आणि माही खाली स्विमिंग पूलमध्ये पडले होते.......

पाण्यामुळे सगळी आग विझली होती..... अर्जुनने माहीला आपल्याजवळ घेतले......

" माही.... माही" ....... अर्जुन तिच्या गालावर चापट मारत होता पण माही  उठत नव्हती....... त्याला आता थोडी भीती वाटत होती..,.. त्याने घाबरतच  एक बोट तिच्या नाकाजवळ नेऊन बघितले आणि मोठा सुस्कारा सोडला....... तिचे समोर आलेले सगळे केस हाताने मागे सारले आणि तिच्या कपाळावर किस केलं..... आणि आनंदाने तिला आपल्या हृदयाच्या जवळ घट्ट धरले.....

सगळे घावत खाली स्विमिंग पूल जवळ आले.....

" Are you okay bhai??" ...... आकाश

" ह्म्म " ...... अर्जुन माहिला स्विमिंग पूलच्या बाहेर काढणार तेवढ्यात त्याला काही आठवले....... " श्रिया.... टॉवेल.... बेडशीट.... एनीथिंग " .......अर्जुन

" माही ठीक आहे ना???" ...... अंजली घाबरतच बोलली..

" ह्म्म " ......अर्जुन

श्रियाने अर्जुनला टॉवेल दिला...... अर्जुनने टॉवेल माहीच्या अंगाभोवती गुंडाळला.......आणि तिला स्विमिंग पूलच्या काठावर बाहेर काढून झोपवले.......... अर्जुन लगेच स्विमिंग पूलच्या बाहेर आला.... आणि माही जवळ जाऊन तिच्या नाकात तोंडत वगैरे पाणी गेलं नाही आहे ना ते चेक करत होता....... तिच्या छातीवर आपल्या दोन्ही हातांनी दाबून थोडाफार पाणी बाहेर काढलं होतं....... कारण जेव्हा ते पाण्यात पडले तेव्हा थोड्यावेळासाठी माही  पाण्यात गेली होती..... पण अर्जुनने लगेच तिला उचलून धरले होते....

आता घरातल्या सगळ्यांनाच झालेली घटना  कळली होती ....तिथे आजी आत्याबाई मामा-मामी सगळेच धावत आले होते.......

माही अजूनही बेशुद्ध होती ....आकाशने माहीला उचलून तिथे जवळच असलेल्या अर्जुनच्या रूममध्ये बेडवर झोपवले...... अंजलीने तिचे कपडे चेंज केले..,.. तिला बऱ्याच ठिकाणी भाजले होतं.....

एवढ्या वेळात काय प्रकार झाला हा,  सगळं मोठ्या लोकांना सुद्धा माहिती पडलं होतं......

" अर्जुन तुला काही झालं असतं तर??" ......नलिनी... झालेला प्रकार एकूण अर्जुनची आई थोड्यावेळासाठी खूप घाबरली होती.,

" I am alright" ...... अर्जून

तेवढ्यात डॉक्टर सुद्धा आले........ डॉक्टर चेक करायला रूममध्ये गेले त्यांच्या मागे सगळेच गेले..

अर्जुन तसाच ओल्या कपड्यांमध्ये उभा होता.... त्याचं सगळं लक्ष माहिवर होतं..... त्याची आई...अनन्या... त्याला बरेच प्रश्न विचारत होत्या,  मात्र त्याचं कोणाकडे काहीच लक्ष नव्हते . तो फक्त डॉक्टर आणि माहीकडे बघत होता...... तो मनामध्ये हीच प्रार्थना करत होता की माहि ठीक असावी ....

" माही ठीक आहेत आता..... बीपी थोडा वाढला आहे..... अंग थोडे भाजले आहे........ पण सिरीयस असं काही नाही........ झालेल्या प्रकारामुळे त्या खूप घाबरल्या दिसत आहे..... शॉकमुळे त्या सध्या बेशुद्ध झाल्या आहेत.... शुद्धीत यायला वेळ लागू शकतो....... त्यांना झोपू द्या.... आराम करू द्या......... मी इंजेक्शन दिलेल आहे...... आणि हे काही औषध आणि क्रीम आहेत..... जिथे जिथे जळले आहे तिथे हे लावून द्या..... मे बी त्यांना जळल्या मुळे अंगाची थोडी आग होईल.... तर थंड पाण्याने पुसून त्यावर हे क्रीम लावत राहा" ...... डॉक्टर

डॉक्टरांच्या बोलण्याने अर्जुनचा  जीवात जीव आला..,... आता मात्र झालेला सगळा प्रकार त्याला परत त्याच्या डोळ्यासमोर दिसायला लागला..... आणि त्यांच्या भावना अनावर होत होत्या...... एक नजर माहीला बघून तो तिथून निघून गेला.......

आकाशच्या रूममध्ये येऊन दार बंद करून अर्जुन दाराजवळ खाली बसला, आतापर्यंत धीर एकवटून होता तो पण आता मात्र त्याचे अवसान गळाले होते ...... आता त्याचा स्वतःवरचा कंट्रोल सुटला होता...,.. आणि नकळत त्याच्या डोळ्यातून  पाणी वाहायला लागले...... ' माहीला  काही झाले असते तर???'  वारंवार त्याच्या डोक्यात तेच विचार येत होते....

" ठीक आहे,  काळजी घ्या आणि काही लागलं तर मला कॉल करा" ......डॉक्टर आणि डॉक्टर जायला निघाले

" डॉक्टर एक मिनिट..... भाईला सुद्धा चेक करा " ...... आकाश डॉक्टरांना रूमकडे घेऊन गेला.... आकाशीने डोर नॉक केले..... त्या आवाजाने अर्जुन भानावर आला.... त्याने डोळे पुसले आणि दार उघडले....

" भाई डॉक्टरांना तुला पण चेक करू दे एकदा" .....आकाश

" I am fine Akash" .... अर्जून

" तरी पण एकदा आमच्यासाठी चेक करून घे " ....आई तिथे येऊन बोलली

" ह्म्म... पाच मिनिट , मी चेंज करून येतो" ....अर्जुन

डॉक्टरांनी अर्जुनच check-up केले..... त्याचा सुद्धा बीपी थोडा वाढला होता........ पण बाकी सगळं नॉर्मल होतं...... अर्जुनचे दोन्ही हाताचे तळवे चांगलेच भाजले होते..... आणि त्याच्या गळ्याजवळ छातीजवळ थोडसं भाजलेले होतं.......

डॉक्टरांनी काही  मेडिसिन, आणि  हाताला लावायला एक क्रीम दिले........

"  यांना पण आरामाची गरज आहे,  तर जास्तीत जास्त आराम करू द्या..... आणि पॅनिक होतील असं काही विचारू नका.... बीपी थोडा हाय आहे" ...... डॉक्टर बाहेर येत आकाश आणि बाकी फॅमिलीला बोलले.....

" थँक्यू डॉक्टर" ..... आकाश डॉक्टरांना गेटपर्यंत पोहोचवायला गेला......

" ठीक आहेस बाळा??" ....... आजी अर्जुनच्या केसांमधून हाथ फिरवत विचारत होती

" ह्म्म "......अर्जुन

" पण हे असं सगळं अचानक कसं काय झालं.??" ......मामी

" ममता डॉक्टरांनी त्याला आराम करायला सांगितला आहे तर त्याला आराम करू दे......... हे बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर सुद्धा विचारू शकतो" ...... मामांनी सगळ्यांना रूमच्या बाहेर जायला सांगितले.......

" तुमचे आभार व्यक्त करायला शब्दच अपुरे आहेत...... माहिला वाचवून तुमचे आमच्यावर खूप उपकार झालेत..... काळजी घ्या ......तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत" ..... माहीची आई अर्जुनच्या डोक्यावर हात ठेवत बोलल्या....

सगळे रूमच्या बाहेर निघून गेले.....

" अर्जुन स्वतःचा जीव धोक्यात घालायची काही गरज होती का??....... तुला काहि झालं असतं म्हणजे??" ........ अर्जुनची आई त्याच्या हातावर औषध लावत बोलत होते...

" आई माही आता आपल्या घरचीच मेंबर झाली आहे ना.... आणि मी ठीक आहो....... काळजी करू नकोस" ......अर्जुन

" आराम कर ....नंतर बोलु" .....आई

" ह्म्म" .......अर्जुन...

अर्जुन बेडला टेकून विचार करत बसला होता..... तेवढ्यात त्याला बोलायचा आवाज आला म्हणून तो बाहेर माहिच्या रूम मध्ये गेला...

" ताई माई .... माऊ का बरं झोपली आहे??.... तिला उठाव ना" .... मीरा माही  जवळ बसली बोलत होती.... "मला माऊ पाहिजे" ,  ती रडायला लागली.....

" माऊला बरं नाही आहे ना म्हणून ती झोपली आहे .....तिला डॉक्टरांनी मोठे इंजेक्शन दिलं...... तिला बरं वाटले कि ती उठेल आहे " ..... अंजली मीराला समजवत होती...

माहीला डिस्टर्ब होऊ नये म्हणून अर्जुनने  मीराला जाऊन आपल्या खांद्यावर हाताला धक्का न लागता अलगत घेतला..... आणि तिला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन गेला..... थोड्या वेळ फिरवल्याने ती त्याच्या खांद्यावर गाढ झोपी गेली...

रात्र बरीच झाली  होती.....   घरी जायला हवे म्हणून......आत्याबाई महिला उठायचा प्रयत्न करत होती.....

" महिला इथेच आराम करू द्या...... ती अजून शुद्धीत सुद्धा आली नाही आहे........ तुम्हाला हव असेल तर आकाश घरी सोडून देईन ......नाहीतर तुम्ही सुद्धा इथेच थांबा" ....अर्जुन थोड्या कडक आवाजात बोलला

" नाही तसं काही नाही... उगाच तुम्हाला त्रास??.....म्हणून" ....आत्याबाई

" त्रास काही नाही .....ती इथेच राहील...... उद्या नॉर्मल झाली की घरी सोडून देऊ" ......अर्जुन

अर्जुन पुढे कोणाचीच काही बोलायची हिंमत नव्हती....

" ठीक आहे मग आम्ही घरी जातो...... मीराला सुद्धा घेऊन जातो.... मीरा जर उठली  तर उगाच माहीला त्रास देईल..... माही डोळ्यासमोर नसली तर ती शांत राहते" ......आई

" आम्ही सगळे आहोत तुम्ही काहीच काळजी करू नका,  माही  आता आमच्या घरचीच एक सदस्य  आहे " ......आजी

" तुम्ही आहात म्हणून तर काही काळजी नाही..... ठीक आहे मग आम्ही सगळे घरी जातो" ....आत्याबाई

*****

रात्र बरीच झाली होती..... दिवाळी आणि झालेल्या प्रकारामुळे सगळेच दमले होते . सगळे आपापल्या रूममध्ये जाऊन झोपी गेले....... माही अर्जुनच्या रूममध्ये झोपली होती....... अर्जुन आकाशच्या रूममध्ये आराम करत होता......

" भाई कुठे चालला ??....काही पाहिजे काय ??" ..... आकाश अर्जुन आकाशला रूमच्या बाहेर जात असताना दिसला...

" No..... माही एकटीच झोपली आहे..... रात्रीतून घाबरून उठली तर?? .....नवीन जागा आहे...... कोणी ओळखीचे नाही दिसले तर.... आणखी घाबरेल..... पॅनिक होईल....... मी तिथे जाऊन काऊचवर झोपतो" .......अर्जुन

" भाई.... तू आराम कर.....श्रियाला सांगतो तिच्याजवळ जायला" ......आकाश

" नको..... ती झोपली आहे...... झालेल्या प्रकाराने सगळेच घाबरले आहे...... झोपू दे तिला..... तशी पण मला झोप येत नाही आहे..... मी  माझा लॅपटॉप बघत बसतो तिकडे" ......अर्जुन

" ह्म्म.......bhai , you like Mahi ??? "  ...... आकाश ...काही दिवसांपासून आणि आज झालेल्या प्रकारापासून आकाशच्या डोक्यात बरेच वेगवेगळे विचार येत होते...

" I care for her.  ..... आणि हो  पुल साईडच दार उघडे ठेवशील मी सकाळी इकडे येईल" ...... अर्जुन बोलून तिथून निघून गेला.... अर्जुनला खोटं  सुद्धा बोलल्या  गेले नव्हतं आणि खरं सुद्धा सांगता आलं नव्हतं.....

अर्जुन रूम मध्ये आला...... त्याने दाराची कडी लावून घेतली उगाच कोणी आला तर कोणाला काही शंका नको.....
माही शांत बेडवर झोपली होती........ खालून तिचे पाय उघडे होते आणि वरतून मोठ्या गळ्याचा ड्रेस घातला होता..... तिच्या पायाला आणि गळ्याजवळ बरंच भाजलेलं होतं त्यामुळे तेवढा भाग उघडा राहील याची काळजी घेऊन पांघरून घातलं होतं..... अर्जुन तिच्या डोक्याजवळ जाऊन बसला...... अर्जुनने  मायेने तिच्या डोक्यावरून त्याचा उल्टा  हात फिरवला....... तशी ती झोपेतच गोड हसली...... तिच्या चेहऱ्यावरची स्माईल बघून अर्जुनच्या सुद्धा चेहऱ्यावर स्माईल आले.... थोड्यावेळ तिच्याजवळ बसून तो बाजूला त्याच्या आवडत्या काऊचवर जाऊन टेकला...... आणि माहीकडे बघत बसला......... आणि बघता बघता कधीतरी त्याचा डोळा लागला........

जवळपास रात्रीचे दोन वाजले असावे...... माही झोपेतून खाड्कन जागी झाली..... बहुतेक तिला काहीतरी वाईट स्वप्न पडले होते...

माहीने डोळे उघडले  ,  तिने आजू बाजूला बघितले तर तिला अर्जुनची रूम दिसली.... अर्जुनची रूम बघून  ती खाडकन  उठून बसली , तिला समोर काउचवर टेकून झोपलेला अर्जुन दिसला......... आणि मग तिला संध्याकाळी घडलेला प्रकार आठवला.......  तिला डोळ्यांसमोर अर्जुन दिसायला लागला आणि अर्जुनचा  जीव तोडून तिला वाचवण्याचा प्रयत्न आठवत होता...... त्याचं ते रूप आठाऊन तिला भरून आलं........ तिने अंगावरचं पांघरूण काढलं.... तर तिचा स्वतःकडे लक्ष केलं तिने टोंगळ्या पर्यंत असलेली वरतून मोठ्या गळा फक्त स्ट्रिप्स असलेली नाइटी घातली होती....... तिचं पायांकडे लक्ष गेलं तर तिचे पाय चांगलेच भाजलेले दिसत होते......... तिने पाय खाली ठेवले.... तिला चालताना थोडे दुखत होतं पण ती हळूहळू चालत अर्जुन जवळ येऊन बसली......... अर्जुन झोपेत फारच निरागस आणि क्युट दिसत होता.....पण त्याचा चेहऱ्यावर आज झालेल्या गोष्टीचं पेन, थकवा  दिसत होत...... माही त्याचं ते रूप बघत बसली........ अर्जुनच्या शर्टच्या वरच्या चार-पाच बटण उघड्या होत्या त्यामुळे माहिला त्याच्या गळ्याजवळ भाजलेला सहज दिसल....... नंतर तिला एकदम काहीतरी आठवलं आणि तिने त्याचे हात बघितले....... तिने त्याचे हात आपल्या हातात घेतले....... त्याचे हात भयानक भाजले होते....... त्याचे हात बघून तिच्या डोळ्यात खूप पाणी आले...... त्याने आपल्या हाताने तिला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला होता.......

" किती प्रेम कराल अर्जुन.....स्वतःच्या जीवाची ....स्वतःची काही काळजी नाही??? .............. तुम्हाला काही झालं असतं तर??..... तुमच्याविना कस जगायचं मी??........ तुम्ही जरी माझ्याजवळ नाही , तरी मी तुम्हाला बघून जगत होते..... तुम्ही माझ्यासमोर आहात इतकेच माझ्यासाठी पुरे होतं....... का कळत नाही तुम्हाला??....... का आपला जीव धोक्यात घातला??........ नाही बघू शकत तुम्हाला त्रासात??...... तुम्हाला त्रास झाला तर माझ्या सुद्धा काळजात खूप दुखते......... मलासुद्धा सहन होत नाही....... तुम्ही बोलून तरी दाखवता..... मी तर ते सुद्धा करू शकत नाही........ नाही जगू शकत मी तुमच्याशिवाय....... I love you Arjun" ....... माही रडत रडत बोलत होती........ आणि तिने त्याच्या दोन्ही हातांन्ना जवळ घेत थोडी खाली  वाकली आणि त्याच्या दोन्ही हातांवर कीस केले.......... ती हळूहळू त्याच्याजवळ सरकत होती........ त्याच्या छातीवर भाजलेल्या ठिकाणी बाजूने तिने हात फिरवला...... आणि हळूच पुढे जाऊन भाजलेल्या ठिकाणावर फुंकर घालत  होती........ फुंकर घालता घालता हळूहळू ती त्याच्या मानेजवळ खुप जवळ गेली....... आणि हळुवार पणे भाजल होतं तिथे फुंकर घालू लागली .......त्याला न्याहाळू लागली .......कारण अर्जुन जागा असताना ती तिच्या भावना त्याच्या पुढे सांगू शकत नव्हती .......तिने हळूवारपणे त्याला भाजले होते तिथे छोटेसे किस केलं ..... तेवढ्यात तिच्या कमरेवर अर्जुनच्या हातांची पकड घट्ट झाली........

." I love you too sweetheart" .......त्याच्या हाताची पकड घट्ट करत त्याने माहिला स्वतः जवळ ओढले......... माहीने तिची मान वरती करून अर्जुनकडे बघितले....... अर्जुन तिच्याकडे बघत होता......... अर्जुनला तिच्या डोळ्यात पाणी बघावल्या गेले नाही......... तो नीट उठून बसला......

माही रडत होती......

"Shsss........"  अर्जुन तिच्या ओठांवर आपले एक बोट ठेवत मानेनेच नाही म्हणाला......... तरीसुद्धा तिच्या डोळ्यातलं पाणी बंद व्हायचं नाव घेत नव्हतं...... ती उठून दूर जायला वळली......

" आता दूर नको जाऊस....... किती दिवसांनी आज माझं मन शांत झालं आहे......... तुला माहिती मी असा कधीच नव्हतो....... माहिती नाही मला काय व्हायला लागलं...... तू हवीहवीशी वाटते........आजची रात्र जगू दे तुझ्यासोबत......उद्या काय होणार काहीच माहिती नाही.....तू परत मला तुझ्या दूर करणार......आज फक्त तुझं बनायचं आहे....... तुझंच बनून राहू दे......परत काही नाही मागणार" .......तो तिचा हाथ पकडत बोलला

मिला हूँ अब जो तुम से
है दिल को मेरे कसम से
सुकून मिला, सुकून मिला..
तुझे है पाया रब से है
दिल को मेरे कसम से
सुकून मिला, सुकून मिला..
हर पल हसीं सा हुआ है
साँसों को तूने छुआ है
बढ़ी तुझसे नज़दीकियाँ
सुकून मिला, सुकून मिला.
. हम्मम..
मिला हूँ अब जो तुम से
है दिल को मेरे कसम से
सुकून मिला, सुकून मिला..
हम्मम..
जब से जुड़ा तुझसे जिया
चैन-ओ-क़रार दिल को मिला
जब से जुड़ा तुझसे जिया
चैन-ओ-क़रार दिल को
मिला जब भी रहूँ संग तेरे
भूलूँ हर ग़म शिक़वा गिला
तेरे इश्क़ का ही नशा है
मेरी रूह तक में बसा है
तूने आँखों से जो छुआ
सुकून मिला, सुकून मिला..
हम्मम..
मिला हूँ अब जो तुम से
है दिल को मेरे कसम से
सुकून मिला, सुकून मिला..

अर्जुन उभा राहात त्याने तिचा हात पकडला आणि तीला स्वताकडे वळवलं...... आणि स्वतःच्या  जवळ घेतलं..... एक हात तिच्या कंबरेत घालून तिला स्वतःला जवळ ओढले.... आणि... आपला हात तिच्या माने मागे टाकून तिचा चेहरा आपल्याजवळ घेतला....... तिने डोळे मिटले...... त्याने  तिच्या कपाळावर किस केले....

 

 

 

 

"Ssss" ..........माही
अर्जुनचा हात तिच्या गळ्याला भाजलेल्या ठिकाणी लागल्यामुळे तिला थोडं दुखलं........

तिच्या आवाजाने त्याचे लक्ष तिच्या माने कडे गेलं........., त्याच्या लक्षात आलं की तिला तिथे दुखत आहे..,.... एका हाताने तिच्या मानेवरचे केस बाजूला सारून त्भाजल होतं तिथे फुंकर तो  घालत होता.......... त्याच्या अशा वागण्याने तिच्या अंगावर रोमांच उठत होते...... तिला करंट लागल्या सारखं वाटत होतं....

" अर्जुन sssss." ..... माहीच्या तोंडातुन अस्पश्ट आवाज निघाला आणि तिने आपले दोन्ही हात त्याच्या कमरेतून घालून पाठीवरून पकडत त्याच्या मिठीत गेली.......... "अर्जुन इतक प्रेम नका करू...... कशी सांभाळू स्वतःला...... मी जर नसेल कधी तर........"

" तू नसेल तर ......मी पण नसेल...... माझे श्वास बंद होतील".......अर्जुन

त्याचं बोलणं ऐकून तिच्या काळजात दुखायला लागलं.......

अर्जून......... तिने मान वर केली आणि त्याच्या डोळ्यात बघत होती......... त्याच्या डोळ्यात तिला खूप प्रेम आणि तिला गमवायचं दुःख दिसत होतं......... ते बघून तिला असह्य झालं........  आपले दोन्ही हात त्याच्या मानेभोवती घेत एका हाताने त्याचं डोकं पकडलं......तिने आपल्या टाचा उंचावल्या,.... आणि त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवले..... त्याने सुद्धा आपले डोळे बंद करून घेतले... ....

अर्जुन ने तिला आपल्या हातावर उचलून बेडवर झोपवले......तिच्या अंगावर पांघरून घालून परत वळला.....तेवढयात माहिने त्याचा हात पकडला.....अर्जुनने तिच्याकडे वळून बघितले.......

माहीने मान हलाऊन त्याला जाऊ नको इशारा केला....

तिला बघून अर्जुन गोड हसला.......

" माही असाच तुझ्या जवळ राहिलो ना तर मला माहिती नाही मी काय करेल आज.......इतकं पेन अनुभवलं आहे ना आज,  की माझा माझ्या मनावर काहीच कंट्रोल नाहीये" .......अर्जुन

" I trust you.........I blindly trust you.......तुमच्या मांडीवर डोकं ठेऊन झोपायच आहे.......खूप वर्ष झालीत इतक्या काळजीने ...लाडाने मला कोणीच जवळ घेतले नाही आहे .......आणि आजचीच रात्र मला भेटलिये मनाप्रमाणे जगायला".......माही

अर्जुनने तिला  बघून स्मायल केले नि तिच्या जवळ जाऊन बसला......आणि तीच डोकं आपल्या मांडीवर घेतले.......तिच्या डोक्यावरून प्रेमाने हाथ फिरवत होता....त्याच प्रेम अनुभवत तिचा डोळा लागला.....
 

*****

मिला हू जो तुम्से ....माझे fav singer Arijit Singh यांचे साँग आहे ....खूप छान आहे ...नक्की ऐका...

******

क्रमशः 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️