Jan 22, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 32

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 32

भाग 32

" आकाश तू ना  इम्पॉसिबल आहेस." ....अर्जुन

" भाई प्लीज ना..... पहिल्यांदा प्रेमात पडलोय.... काही आयडिया नाहीये.... थोड्या चोईसस तर विचारतोय अजून काय" ......आकाश

" Go ahead.... Hope it will help you ...... I really don't know .... तिला डोअर नॉक करण्यात काय प्रॉब्लेम आहे....... मिस देसाई.... तुम्ही आत मध्ये येऊ शकता" ......अर्जुन

माही अर्जुनच्या केबिन समोर विचार करत उभी होती तेव्हा अर्जुनने तिला आवाज देऊन आत मधे बोलावले....

" सर काही काम होतं...,...wow... चहा आणि जिलेबी" .......ती आनंदी होत बाजूला टेबलवर ठेवलेल्या चहा आणि जिलेबीकडे बघत बोलली...

" माही ये.... बस इकडे..... तुझ्यासाठीच मागवली आहे...... आपली छोटी स्नॅक्स पार्टी" ....आकाश

" ह्म्म....रिश्र्वत" ....अर्जुन कॉफीचा मग हातात घेत बोलला..

" काय.??.....काय म्हणाले ते???" .... माही

"भाई ssss....प्लीज" ..... आकाशने अर्जुनला  डोळ्याने खुणावले..... तसा अर्जुन लॅपटॉप मध्ये आपलं काम करत बसला...

" माही काही नाही.... तू बस ना इकडे...... मला काही बोलायचं होतं तुझ्याशी....... घे चहा थंड होईल" .....आकाश

माही आकाश बसला होता तिथे बाजूला सोफ्यावर जाऊन बसली.

" माहि मला अंजलीबद्दल जास्त माहिती नाही.... म्हणजे तिला काय आवडते.., वैगरे..... जेव्हा पण आम्ही भेटत असतो , ती  जास्ती काही बोलत सुद्धा नाही..... आणि जास्त भेटी होत नाही..... तर प्लीज मला तिला काय आवडते सगळ सांग " ..... आकाश

" पण अचानक आवडीनिवडी कशासाठी??? " .....माही जिलेबी खात बोलली...

" मला तिला डेटवर न्यायचे आहे ....तिला मी व्यवस्थित प्रपोज सुद्धा केला नाही,  तर मला तिला प्रॉपर वे ने प्रपोज करायचे आहे.... पण तिला काय आवडेल मला माहिती नाही.,... तिच्यासाठी डायमंड रिंग घेऊ,  तिला  हॉटेलमध्ये सरप्राइज प्लॅन करू काय ?" .......आकाश

" ओह...अच्छा...अस आहे तर..... पण ते डायमंड रिंग वगैरें काम नाही करणार...... तुमची आयडिया बोर् आहे"  ....माही

" मग तू सांग..त्यासाठीच तर बोलावले आहे तुला " ....आकाश

" उम...थांबा विचार करू द्या"  ..... माही डोक्याला बोट लावत विचार करत होती..

अर्जुनला तिची एक्टिंग बघून हसायला येत होतं...... आकाशने अर्जुनच्या चेहरा बघितला तर अर्जुनला बघून त्याला पण हसायला येत होते.

"भाई ...प्लीज .....नको ना" ..... आकाश हसतच शांत राहायला सांगत होता ...

" ओके" ......अर्जुन

" आयडिया!!!!" ............ माही टिचकी वाजवत बोलली 

" काय.......??"  आकाश खूप एक्साईटेड होत तिच्याकडे बघत होता...

" पूर्ण एक दिवस ताई सोबत" ...... माही

" काय???" .....आकाश

" पूर्ण एक दिवस ताई सोबत घालवायचा...... सकाळी पाच वाजल्यापासून...... सकाळी गरम गरम चहा आल, गवती चहा  घातलेला..... बाजूच्या एका फुलाच्या बगीच्यामध्ये.... तिथे खूप फुल असतात.... ती तोडायची..... मग तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं...... सकाळी सात वाजता एक आरती होते,  ती  करायची..... खुप छान फ्रेश वाटते तिथे.... आहा sss........ जोशी वडापावच्या ठेल्यावर  गरम गरम भजी आणि वडापाव........ मग एखादं लहान मुलांचे  आश्रम...... तेथे लहान मुलांसोबत खूप दंगामस्ती....... मग मालतीताईची फेमस खानावळ........ तिथे झणझणीत वर्हाडी जेवणाचा थाट..... मग एक मस्त अक्षय कुमारचा ढश्युम धिश्युमवाला मूवी...... मग सुप्रसिद्ध अंबाबाई शॉपिंग गल्लीतून शॉपिंग.... खूप बांगड्या.... खूप वर्क केलेल्या ओढण्या...... वाह....... मग एका जंगलात टेकडीवर एका बाकड्यावर बसून सूर्यास्त बघायचा..... मग तिथे एक पांढरेशुभ्र  टेंट..... तिथेच बाजूला एक शेकोटी..... तिथे बसून भविष्याच्या गोष्टी..... किती मुलं,  किती मुली..... घर कसं बांधायचं,  कुठे बांधायचं....... तुम्ही थकून-भागून ऑफिसमधून येणार..... मग ती तुमच्यासाठी गरम चहा करून आणणार.....मग  छोटा बाळ राहणार , त्याला  तुम्ही सांभाळणार , मग ती स्वयंपाक करणार.....असं सगळं भविष्याचा प्लॅनिंग तिथे टेकडीवर बसून करणार" ......... माही स्वप्नात गेल्यासारखी सांगत होती.........आकाश खूप अजब नजरेने तिच्याकडे बघत होता आणि तिच्या गोष्टी ऐकत होता.  त्याच्या चेहर्‍यावरचे हावभाव कसेनुसे झाले होते .......माही मात्र आपल्या स्वप्नात गेली होती...

अर्जुनला तिच्या गोष्टी ऐकून आणि आकाशाचे हावभाव बघून खूप हसायला येत होते .....तो आकाश जवळ गेला....

" हे कार्टून या ग्रहावरचे  नाही...... दुसऱ्याला जगातून  आलेले  आहे." ........ अर्जुन हसतच आकाशला बोलत होता आणि हाताने चूप बसण्याचा इशारा करत होता...

" मग अंधार पडेल.... रात्र होईल..... मग तिथे वाघ येईल......"

" हो " .......माही

" वाघाला बघून ती घाबरेल...... मग ती  घाबरून त्याचा हात  घट्ट पकडेल........"

" हो......."

" मग वाघ तिच्यावर झडप घालेल..... मग तो तिला संकटात बघून वाघावर तुटून पडेल..... आणि वाघासोबत फाईट करेल....... आणि मग वाघ हरेल आणि पळून जाईल......"

" हो........"

" आणि मग ती खूप खुश होईल, आणि आनंदाने त्याला मिठी मारेल  " ......... अर्जुन तिच्या अगदी चेहर्यासमोर जाऊन बसला होता....

" हो........"

आकाशला  ते बघून खूप हसायला येत होते......

" आणि मग वाघोबा मस्त डिनर करून निघून जाईल....."

" हो........."

" काय हो ?? ........silly girl" .... अर्जुन थोडा जोऱ्याने बोलला...

अर्जुनच्या  आवाजाने माही भानावर आली.....

" आ.sss" ..............माही , अर्जुनला आपल्या चेहऱ्या समोर बघून दचकली....

" या सगळ्या या अँटिक पीसच्या आवडीनिवडी आहेत "  ......अर्जुन

" अँटिक पिस ??" ..........माही काही समजलं ना सारखी अर्जूनकडे  बघत होती

" प्राचीन ,  दुसऱ्या ग्रहावरची" ........अर्जुन

" कोण???" .....माही

" तू.." ........ अर्जुन आणि आकाश आता  हसायला लागले होते.....

आता मात्र तिला कळलं होतं की अर्जुन तिची खूप मजा घेत आहे....... माहिला त्याचा राग आला ती रागाने त्याच्याकडे बघत होती....

" आकाश सर पुढल्यावेळी पासून तुम्हाला मला काही विचारायचं असेल ना, तर  यांच्या केबिनमध्ये अजिबात बोलवायचं नाही.  त्यांच्यासमोर मी काही पण सांगणार नाही" ...... माही अर्जुनकडे बघत बाहेर जाण्यासाठी पुढे पुढे जात होती....

" पाल" ........ अर्जुन तिच्या पायाकडे बोट दाखवत ओरडला..

तशी माहि तिथेच उड्या मारायला लागली आणि अर्जुनच्या केबिन मध्ये धावायला लागली........

तिला बघून आता अर्जुनला मात्र हसू अनावर झालं नाही...... तो तिला बघून जोर जोराने हसायला लागला त्याला पाहून आकाश सुद्धा त्याचे  हसू कंट्रोल करू शकला नाही.....

त्याला हसताना बघून माहीला समजलं की तो तिची मस्करी करतो आहे,  पाल वगैरे असं काहीच नाही आहे......माहिने  रागाने त्यांच्यावर ती एक कटाक्ष टाकला , वाकड तोंड केले आणि तिथून बाहेर पडली........

" She is so cute bhai" ...... आकाश हसत हसत माहिचे एक्स्प्रेशन बघून बोलला...

" ह्म्म " .........अर्जुन

" माही तुझ्या अवतीभोवती  असली की,  तू वेगळाच असतो भाई..... तू ...तू नसतो" ...... आकाश त्याला हसताना बघून बोलतो

अर्जुन त्याच्याकडे 'म्हणजे काय?'  या नजरेने बघत होता ...

" म्हणजे तू द फेमस बिझनेसमॅन अर्जुन पटवर्धन नसतो...... तू वेगळाच काही असतो..... एक वेगळा अर्जुन, एक अवखळ , एक खोडकर , एक हसरा अर्जुन " .....आकाश

त्याच्या बोलण्याने अर्जून नॉर्मल होत भानावर येतो....

" कोण वेगळे आहे??? ...... आणि या महिला काय झालं,  एवढी रागात बाहेर गेली" ...., सोनिया अर्जुनच्या केबिनमध्ये घेत बोलली..

" नथींगी" ........अर्जुन

" काही नाही सोनिया..... मला अंजलीला डेटवर न्यायचं होतं तर सहज काय करायचं म्हणून डिस्कस करत होतो" ......आकाश

" आणि तुला आयडिया कोण  देतोय????....... जो स्वतः  इतका अनरोमॅण्टिक आहे तो ??? ............ त्यालाच गरज आहे ट्रेनिंगची" ......सोनिया

" अरे यार तुम्ही परत सुरू होऊ नका....... माझी मिटींग आहे.... मी चाललो" ..... बाय करत अर्जुन निघून गेला..

*****

" आजी मी काय म्हणते दिवाळीच्या आधी आपण सगळ्यांनी मिळून एक गेट-टुगेदर करूयात का?? ....... म्हणजे बघ दिवाळी,  मग एंगेजमेंट , मग लग्न , मग आपण सगळे कामात बिझी होऊन जाऊ........ तर म्हटलं एखादं गेट-टुगेदर केला तर मजा येईल" ...... अनन्या आकाशकडे बघत आजी सोबत बोलत होती .

" मला पण आवडली अनन्या ची  आयडिया..... तेवढेच थोडा चेंज रोजच्या रुटीन मधून" .....आई

" काय मजा आहे त्या मिड्डलक्लासवाल्यांसोबत ?"  .....तोंड वाकडं करत मामी बोलली.

" मोहिनी.... जरा विचार करून बोलत जा" .....आजी

" माझं तर कोणाला काही पडलंच नाही आहे......काय  करायचे ते करा"  .... म्हणत मामी तिथून चालली गेली....

" आजी खूप मजा येईल करूया ना गेट-टुगेदर,  सोनिया वहिनी तर इथेच आहे,  अंजली वहिणीच्या फॅमिलीला बोलूयात...... काय आकाश भाई चालेल ना?" ......श्रिया

" ठीक आहे तुम्ही सगळे म्हणतात तर करुयात  गेट-टुगेदर..... असं करा आता शरद पौर्णिमा येत आहे तर शरद पौर्णिमेची रात्र आपण सोबत घालावुया .....आपला सन पण होईल आणि तुमच गेट-टुगेदर पण होईल" ....आजी

" आजी तू ग्रेट आहेस." .... आकाश आजीला मिठी मारत आनंदाने बोलला..

" ठीक आहे,  मग ठरलं तर.... तुम्ही तयारी करा....... मी फोन करून त्यांच्या घरी कळवून देते...... सोनिया तर इथेच आहे... तिची आई बाबा अजून आले नाहीत .....अंजली आणि अंजलीच्या घरच्यांना कळवते" .....आई

*******

शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेची सगळ्यांनी तयारी केली...... लहान मंडळी तर जास्तीच उत्साहात होती.... .. सगळ्यात वरती टेरेसवर सगळ्या अरेंजमेंट केल्या होत्या.....बसण्यासाठी चौकोनी स्टाईल मध्ये गादी टाकल्या होत्या.... साइडला काही चेअर आणि काऊच ठेवले होते...... टेरेसवर बर्‍याच ठिकाणी रोषणाई केली होती....... खूप उत्साहाचे  वातावरण होतं...

सगळ्यांनी ट्रॅडिशनल कलर्स,  कॅज्युअल असा गेटअप केला होता.  मोठ्यांनी मात्र आपलं ट्रॅडिशनल कपडे घातले होते...... आकाशने टी-शर्ट आणि जीन्स घातलं होतं,  अंजलीने लाईट ग्रीन कलरचा  सलवार कुर्ता घातला होता.  मीराने पण कॉटनचा कंफटेबल असा फ्रॉक घातला होता.... रुहीने डांगरी..... श्रिया जीन्स आणि कुर्ता....  अनन्याने  फ्लोर लेंथ  a-line  ड्रेस घातला होता....... सोनीयानी सुद्धा indo-western असे मिक्स अंड मॅच केले होते.....अर्जुननि वाईट कॉटन फिटिंग शर्ट त्यावरच्या दोन बटन लावल्या नव्हत्या आणि खाली लाईट ब्ल्यू कलर जीन्स असा गेटअप केला होता.... सगळे आतमध्ये आले होते... माही मात्र यायची होती........ सगळ्यांचे हाय-हॅलो सुरू होते.... अर्जुनची नजर मात्र  मेन डोअरवर  खीळली होती....... त्याला वाटले ती आली नाही... त्याचा मन थोड खट्टू झाल....

" अरे माही नाही दिसत आहे?"  ....आजी

" हो येतच आहे , ते ऑटोवाल्या सोबत काहीतरी पैशांची गडबड झाली.... ते बोलून येत आहे ती" ....आत्याबाई

आत्याबाईचे बोलणे ऐकून अर्जुनच्या जीवात जीव आला...... आणि त्याला काहीतरी जाणवले,  त्याने दरवाज्याकडे बघितला तर माही तिचे केस वरती घेऊन कल्चरमध्ये बांधत होती,... काही चुकार बटा तिच्या चेहऱ्यावर खेळत होत्या.  बाहेर हवा बरीच होती त्यामुळे तिची  ओढणी  सुद्धा हवे  सोबत नाचत होती..... अर्जुन तिचे ते रूप बघतच राहिला..... तिने बेबी पिंक कलरचा लॉंग कुर्ता...... सेम मॅचिंग लेगिन्स..... आणि सेम बेबी पिंक कलरची हेवी वर्क केलेली ओढणी घेतली होती..... बांगड्या  जसं काही तिचा जीव की प्राण,  तिच्या  हातामध्ये मॅचिंग   बांगड्या नेहमीच असायच्या....... कानामध्ये लाईट पिंक कलरच एक छोटसं लटकन होतं.... ती केस वर बांधत होती तेव्हा ते सुद्धा तिच्या हालचाली सोबत लय साधत होते.....ती  खूप सुंदर दिसत होती,  जसे  काही चांदण्यारात्री चंद्र खाली उतरून आला होता,  असा अर्जुनाला भास होत होता आणि तो तिला बघण्यात मग्न झाला होता......आणि अर्जुनला असे बघतांना  मात्र एकाजनाची  नजर अर्जुनवर खिळली होती......

" अरे ये माही बघ तुझीच वाट बघत होतो.." ... अनन्या नाहीला दारात बघून बोलली , अनन्या च्या  आवाजाने अर्जुन भानावर आला आणि तो सुद्धा सगळे होते तिथे आला.....

" अंकल"......... अर्जुन दिसताच मिरा त्याच्या जवळ पळत पळत त्याच्या पाया जवळ जाऊन बीलगली......

" लूकिंग व्हेरी क्युट,  माय प्रिन्सेस.." ..... म्हणत अर्जुनने तिला कडेवर उचलून घेतले..... आणि तिकडे थोडा लांब काऊचवर तिला घेऊन बसला आणि तिच्या सोबत गप्पा करत होता.....

"अर्जुनला लहान मुलं इतकी कधी आवडलीच नव्हती,  नेहमी तो त्यांच्यापासून दूर राहतो पण माहिती नाही मीरा सोबत त्याचं कसं काय जुळले" ....आई

" हम्म.... पूर्व जन्माचे काही ऋणानुबंध असतात." ...आजी

"असतील असतील ...चला पूजा करून घेऊयात" ... आई

माहिची नजर मात्र अर्जुन आणि मीरावर अडकली होती..... "किती खुश असते मिरा अर्जुन सरांसोबत" ..... त्या दोघांना बघून नकळत तिच्या गालात पण हसू आले...

सगळ्यांनी मिळून देवाची पूजा आरती केली.... महाराजांनी बाहेर बासुंदी आटावयाला घेतली होती.... आई अधून-मधून त्यांच्याकडे लक्ष देत होती...

" चला चला तुमच्या सगळ्यांचा झाले असेल तर वरती सगळ्या अरेंजमेंट करून ठेवल्या आहे.... आज रात्री 12 पर्यंत कोणी झोपणार नाही.... गेम्स गप्पागोष्टी सगळे तुमची वाट बघत आहे,  चला पटापट." .... श्रीया एक्साईटेड होत बोलत होती आणि सगळ्यांना ओढत वरती नेत होती.....

" हुः हू.... हू हू."...... अनन्या आपला घसा खाकरत आकाश आणि अंजली जवळ आली , ते दोघं एकमेकांना बघण्यात गुंतले होते , अनन्याच्या आवाजाने आकाश इकडे तिकडे लाजत बघत होता , अंजली सुद्धा तिथून वरती जायला पळालि...

वरती जाऊन सगळ्यांनी थोडाफार नाश्तापाणी घेतलं आणि त्यांच्या गप्पा सुरु झाल्या....

" सगळ्यांनी इकडे लक्ष द्या , तुमच्या सगळ्यांच्या गप्पा झाल्या असतील तर आता आपण येथे सगळे गेम खेळणार आहोत , सगळे म्हणजे सगळे,  नो एक्सक्यूज" ..... श्रीया ऑर्डर सोडत होती

"एक्सक्युज मी,  मला काम आहे " ..... अर्जुन

"दादू , मी बोलली ना नो इस्क्यू..... सगळेजण खेळणार आहेत".....श्रिया

" तुम्ही खेळा हे गेम..... मला काही यात इंटरेस्ट नाही.".... अर्जुन

" Please Arjun.... don't spoil the mood....see your I mean my sissy law's are so excited....so please" ...... सोनिया

अर्जुन सगळ्यांवर एक नजर फिरवली..... आणि तो परत तिथे बसला....

" वा sssss....... भाई तू तर आत्तापासून सोनिया वहिनीचं ऐकायला लागला .......... वाह यार सोनिया वहिनी मानलं तुला" ....श्रिया अर्जुनची मजा घेत बोलली.... तिच्या बोलण्यावर सगळे हसायला लागले..... अर्जुन मात्र कपाळावर आठ्या पाडत सगळ्यांकडे बघत होता...... सोनिया मात्र लाजत होती......

" बरं तर सगळ्यांचे लाजणे मुरडणे झालं असेल तर मी गेम्स काय आहे  सांगते" ......श्रिया.

सोनीया आणि अंजली श्रीयाकडे बघायला लागले....

" बरं गेम खूप सोपा आहे  , ऑल टाइम फेमस गमे आहे . लहान मोठ्यांना सगळ्यांना झेपेल असा आहे..... गेमचे नाव आहे पासिंग पार्सल.... इथे आपण सगळे सर्कल करून बसणार आहोत.... तिकडे रामदादा म्यूझिक वाजवतील आणि तेव्हा आपण हे पिलो एकेक करून सगळ्यांना पास करणार.... हो म्युझिक थांबेल तेव्हा पिलो ज्याच्याजवळ असेल त्याला बाकीचे सगळे जे बोलतील ते करून दाखवावे लागेल..... आणि हे सगळ्यांसाठी कंपल्सरी आहे..... कोणीही मधातून उठून जाऊ नये..... कोणतेच एस्क्युज चालणार नाही....... तर असा हा अगदी सोपा ,  सगळ्यांना माहिती असणारा  मूवी फेमस गेम आहे... तर चला सुरु करूया, सगळे येथे सर्कलमध्ये येऊन बसा" ......श्रिया

खाली सर्कल शेपमध्ये गाद्या मांडल्या होत्या,  त्यावर सगळेजण जाऊन बसले.....

"आकाश डोन्ट वरी , तुझ्याजवळ बसणार आहे ती" ......आकाश बसला होता तिथे साईडला जागा रोखून बसला होता आणि इशाऱ्याने अंजलीला इथे जवळ येऊन बस म्हणून सांगत होता ......तसे करतांना बघून  त्याच्याकडे अनान्याचे लक्ष गेलं......

" तुम्ही काय  फक्त आमच्याकडे बघत असतात काय???..... यार ताई थोडी तरी प्रायव्हसी देना" ..... आकाश अनन्याला गयावया करत बोलत होता....

" हाहाहा...... बरे दिली जा..... पण यासाठी जे मागेल ते द्यावे लागेल हा" ........अनन्या

" त्या अर्जुन भाईला  पकडा... त्याचे  पण लग्न जमल आहे..... त्याच्याकडे तर कंपन्यांची चेन आहे ,  डायरेक्ट तुला जे पाहिजे ते भेटल" .....आकाश

" तो कुठे आपल्याला काही देतोय ....इथे बसला तेच खूप आहे .....आपण काही बोलायला गेलो तर चालला जाईल उठून..... तूच आमचा लाडका भाऊ नाही का?" ....अनन्या

"हाहाहाहा... हो ते पण बरोबर आहे,  बरं चल जे म्हणशील ते देईल , आता प्लीज डिस्टर्ब नको करू" ....आकाश

"ओके."... अनन्या श्रिया हसत होत्या...

सगळे गोल करून बसले अंजली आकाश जवळ जवळ  बसले होते...,. सोनियाने  सुद्धा अर्जुनच्या जवळची जागा पकडली होती... माहिला अर्जुनच्या समोर अपोझिट जागा भेटली होती..... अर्जुन अधून मधून माहिकडेच बघत होता.... महिला मात्र खूप अवघडल्यासारखे होत होते ती नजर चोरत... आजूबाजूला बघत मीरा सोबत खेळत होती

गेम सुरु झाला..... गाणे वाजायचे तसे मीरा आणि रुही सर्कलमध्ये नाचायला यायच्या...... त्यांना सुद्धा खूप मजा वाटत होती....... पहिलाच नंबर आजीचा लागला..,.सगळ्यांनी आजीला शरद पौर्णिमा का बरं साजरी करतात त्याची कहाणी विचारली.....आजीने पण छान रंगवून समजून सगळ्यांना शरद पौर्णिमेची कहाणी सांगितली....... नंतर मामाचा नंबर लागला आणि मामांना मामीची तारीफ करायला सांगितले...... त्यांना ते खूप जड गेले , पण कसेबसे त्यांनी आपलं चॅलेंज निभावून नेलं....... आणि मग आला  माहिचा नंबर....... आणि सगळ्यांनाच माहिला काहीतरी चांगले करायला  सांगायचे  होते

" माही एक्टिंग छान करते." ...आत्याबाई

माही  डोळे मोठे करत आत्याबाई कडे बघत होती....

" अरे वा एक नंबर...... मग तुझ्या कुठल्या फेवरेट अक्टर ची......"

" एक मिनिट एक मिनिट." ....... आकाश काही बोलणार तेवढ्यात अनन्या बोलली....

" अक्टरची कशाला..... तुझ्या बॉसची.... हँडसम डॅशिंग ड्रॅक्युलाची  एक्टिंग करून दाखव ".....अनन्या अर्जुनकडे बघत डोळा मारत माहिला बोलली....

"हा ssssss!!!" ......... माहिने डोळे मोठे केले आणि ती ती सगळ्यांकडे बघत होती..,..

" नाही ....मी असं काही करू शकत नाही .....माझा जॉब जाईल" ......माही

" नाही नाही काही नाही होणार" ........ आणि आता सगळ्यांनी ही  एकच री ओढली.......

" Come on Mahi you can do it"  .... अनन्या श्रिया आकाश सोनिया तिला चिअरअप करत होते......माहीने अर्जुनकडे बघितले  तर अर्जुन तिच्याकडे हसत बघत होता.....

सगळ्यांसाठी म्हणून  माही कशीबशी तयार झाली आणि ती  सर्कल मध्ये येऊन उभी राहिली....

तिने आपली नसलेली कॉलर टाइट केली आणि आवाज थोडा कडा केला..

" What the hell going on here..... हे गार्डन आहे की तुमचं घर आहे???....... सगळा बाजार चालवला तुम्ही......
आ ss च्ची.... राजू टिशू पेपर प्लिज.....(त्याच्या सारखी टिश्यू पेपर (ओढणी) पकडत बोलायची अक्टिंग करत)
मिस्टर सचिन मला ही फाईल आत्ताच्या आत्ता कम्प्लीट करून पाहिजे आहे त्याशिवाय तुम्ही घरी जाऊ शकणार नाही...... आदरवाइस यु विल गेट पनिशमेंट.......
मिस देसाई...... तुमचा वरचा मजला रिकामा आहे काय???...... देव जेव्हा बुद्धी वाटत होता तेव्हा झोपला होता काय???...... येथे तुमचे काका मामा नाही आहेत की तुम्ही रिलेशन बनवायला आहात , की काम करायला आले आहात??? ............... सगळे पागल लोक माझ्याच नशिबात लिहिली आहेत".............. माही अर्जुनच्या आवाजात बोलत त्याची ॲक्टींग करत होती....

"ही तर माझ्या मनातले पण डायलॉग बोलते आहे" ..... अर्जुन आवासून तिच्याकडे बघत होता...

" सिरियसली..., इम्पॉसिबल" .........माही

तिची ॲक्टींग बघून सगळेअर्जुन कडे बघत हसायला लागले.....

" माही...... आता सोनीयाची नकल कर"  .......अनन्या

माही अर्जुनच्या पुढे गेली..... एकदा तिने सोनियाकडे बघितले आणि अर्जुनवर कॉन्सन्ट्रेशन करत थोडीशी लाजत लाडात येत......

" Oh Arjun sass... baby.... You are so unromantic" ....... माही त्याच्या डोळ्यात बघत बोलत होती , ती  नाक मुरडत तिथून मागे आपल्या जागेवर जाऊन बसली........... तिला बघून तर अर्जुनचं डोकं ब्लँक झालं होतं.....

" Arjun baby.... हा " ........ अनन्या सोनियाकडे बघत तिला चिडवत बोलली , तशी सोनियाने लाजून मान वळवली आणि सगळे खूप हसायला लागले...... आणि माहि साठी सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या......

माहिच्या या ॲक्टींग नंतर अर्जुनची तर पूर्ण नजर माही वरच अडकली होती..... मीरा माहीच्या मांडीवर बसली होती.... अधूनमधून तो मीराला बघत स्माईल देत होता मीरा सुद्धा तिथून त्याला हातवारे करत होते

गेम परत सुरू झाला आता आत्याबाईचा नंबर आला होता..... त्यांनी त्यांच्या आवडत्या जुन्या अभिनेत्रीची एक्टिंग करून दाखविली....,. मग आईचा नंबर आला आईने त्यांच्या गोड आवाजात भजन गायले...... आणि आता नंबर आला अर्जुनचा......

अर्जुनचा नंबर आला तर,  जसं काही लॉटरीच लागली ,  असे सगळ्यांची एक्सप्रेशन्स झाले..... सगळ्यांनाच त्याला काही ना काही करायला सांगायची होते कारण तो कधीच कोणाच्या हाती लागायचं नाही......

" मी मी मी." ....श्रिया मध्येच आली......"  दादू तू इथे सगळ्यात जास्ती तुझ्या आवडत्या एका मुलीला प्रपोज करून दाखवायचं." ......

" No way." ...... अर्जुन

" भाई आणि प्रपोज..,.. हे इक्वेशन्स मॅच नाही होत." ...आकाश....

" I am not doing this..... I am going now" ......अर्जुन

" द अर्जुन पटवर्धन काही पण करू शकतो ना.... मग त्याने हे पण करून दाखवावे....... तेव्हाच मानू" ......अनन्या

" हो हो आम्हाला पण बघायचं."....नलिनी .. तिला माहित होतं अर्जुनला कधीच असं बोलता येत नाही किंवा त्याने असं कधी आधी केलं नव्हतं...

सोनीयाची पण उत्सुकता खूप वाढली होती......

अर्जुनने सगळ्यांवर एक नजर टाकली आणि त्याची नजर एका ठिकाणी स्थिर झाली

"  There's no one
as adorable and innocent like you

You yourself don't know who you are

There are millions here but
there's no one like you

My heartbeat, my heart,
my life are spread around

You don't know that you're my life

Will you be mine forever " ....... अर्जुन

सगळे लोक अवाक् होत   त्याच्याकडे  बघत होते.....

अर्जुन  आपला एक हात पुढे करत आपल्या टोंगळ्यांवर माहि समोर बसला होता...

*****

क्रमशः

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️