Aug 16, 2022
कथामालिका

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 28

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 28

भाग 28

 

" यार बघ ना माही हा  अर्जुन , किती बोर आहे...... मिटींगला घेऊन चाललाय सोबत..... कामाशिवाय तर कुठेतरी फिरायला सुद्धा येत नाही हा " ......सोनिया

 

" ठीक आहे ना मॅम,  तेवढीच सोबत , तुम्हाला वेळ घालवता येतो एकत्र " ....माही

 

" अग हा कामाशिवाय दुसरे काहीच बोलत नाही..... बघत सुद्धा नाही माझ्याकडे तर..... नुसतच गाडीमध्ये बाजूला बसून राहायचं,  त्याला काय सोबत वेळ घालवणे म्हणतात का?" .....सोनिया

 

 

" ह्म्म..... ते पण आहे" .....माही

 

" ये माही.. प्लीज सांग ना काही आयडिया??..... बघ उद्या संडे पण आहे" ........सोनिया

 

माही विचार करत बसली.......

 

" ये सांग ना  लवकर , किती वेळ लावते आहेस" ......सोनिया

 

" थांबा हो मॅडम,  घाई नका करू.....तुमचे अर्जुन सर अशा छोट्या-मोठ्या आयडिया मध्ये थोडी फसत असतात.... त्यांच्यासाठी काहीतरी स्पेशल आयडिया काढावी  लागेल" ....माही

 

" हो ते पण आहे" ......सोनिया

 

" आयडिया." ..... माही चुटकी वाजवत सोनियाच्या कानामध्ये काहीतरी बोलत होती.....

 

" पण माही मीटिंग.???.. अर्जुनला जर काही माहिती पडलं तर खूप ओरडेल तो आपल्यावर." ....सोनिया

 

" सोनिया मॅडम तुम्हीच बोलताना मीटिंग अर्जुन सरांनीच अटेंड केली पाहिजे असं काही नाही,  तुम्ही नमन सरांना सुद्धा तिकडे पाठवून द्या....... मग काही प्रॉब्लेम होणार नाही..... मीटिंग पण होईल आणि तुमची आउटिंग पण..... काय...?" ....... माही

 

" अगं पण सगळं नीट होईल ना?" .......सोनिया

 

" सोनिया मॅडम सोबत जर वेळ घालवायचा असेल तर थोडीतरी रिस्क तर घ्यावीच लागेल ना...... आणि बाकीचं तुम्ही माझ्यावर सोडा.... मी करते सगळी तयारी .....त्यांना माहिती सुद्धा पडणार नाही काही" .....माही

 

अर्जुनची आज मुंबईपासून दूर एका ठिकाणी एक मीटिंग होती.... सोनियाच्या आग्रहामुळे अर्जुन तिला मीटिंगसाठी सोबत घेऊन जाणार होता...... दुपारी निघून रात्रीपर्यंत परत यायचं त्याचं प्लॅनिंग होतं...... आणि याच मिटींगचे माही आणि सोनिया मिळून बारा वाजणार होत्या...

 

****

 

माहिला होश आला..... तिने हळूहळू डोळे ओपन केले.... आणि तिला सगळीकडे अंधार दिसत होता...... आपण कोठे आहोत तिला थोड्यावेळासाठी काहीच कळत नव्हते..... नंतर तिला जाणवलं की आपण एका गाडीमध्ये आहोत........... आणि मग तिला आठवलं..... की आपणच गाडीच्या डिक्की मध्ये काहीतरी सामान ठेवायला आलो होतो आणि आपल्या डोक्याला लागल्यामुळे आपण बेहोष झालो आणि गाडीतच पडलो....

 

" वाचवा ...वाचवा.... वाचवा ..... कोणी आहे का इथे ???.......प्लीज मला वाचवा..... वाचवा" .... कारच्या डिकीमध्ये बसलेली माहि कारला  ठोकत ओरडत होती....

 

" माझे कान वाजायला लागली की काय आजकाल..... सगळीकडे माहीचाच आवाज कसा काय येतो.???..... ही मुलगी मला पागल करून सोडेल" ....... अर्जुन कार ड्राइव्ह करत विचार करत होता..... आणि परत त्याने ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं

 

 

" सोनिया मॅडम.... कोणी आहे का???...... मॅडम ......प्लीज वाचवा ... इथे तर श्वास घ्यायला पण हवा नाही येत आहे..... थोड्यावेळ इथेच राहिली तर मी मरुन पण जाऊ शकते...... देवा कुठे फसवलं येथे..... वाचवा वाचवा." ...... माही ओरडत होती

 

 

अर्जुनला  परत आवाज आला...... त्याला आता कार ठोकण्याचा  सुद्धा आवाज येत होता.......

 

" आवाज तर मागच्या साईडने  येत आहे........ म्हणजे माहि कारमध्ये आहे काय??" ........ त्याने करकचून कारला ब्रेक मारला आणि कार थांबवली.... आणि तो मागे डिक्कीजवळ आला..... त्याने डिक्कीला 

नॉक केलं..

 

" Maahi....are you there....? "....अर्जून

 

" अर्जुन सर ..... हा अर्जुन सरांचा आवाज आहे..... सर प्लीज दार उघडा मी आत मध्ये आहे" ....माही

 

" तू इथे काय करत आहेस??? .....ते ते पण येथे डिकी मध्ये?" ....अर्जुन

 

" अर्जुन सर ......पहिले मला इथून बाहेर काढा ......नाहीतर तुम्हाला माझ्या आत्म्या सोबत बोलाव लागेल" ......माही

 

" काय...?.... तू पागल आहे का ग...... काहीपण बोलत असते" .....अर्जुन

 

" सर तुम्हाला सगळा इतिहास इथूनच कसं काय कळेल.... पहिले मला बाहेर काढा...... इथे खूप अंधार आहे,  मला खूप भीती वाटत आहे..... जर मी थोड्या वेळ इथे  अजून राहिले तर माझं राम नाम सत्य होईल" ....... माही

 

अर्जुनने लगेच डिक्की ओपन केली......

 

" हुश." ....... माही डोक्याला हात लावत तिथेच  उठून बसली आणि तिने मोकळा श्वास घेतला......

 

" काही काय बोलते......मनाला येईल तसं बोलत सुटते..... आत्मा आणि काय काय....... आणि तू इथे काय करते आहेस.?" ......अर्जुन

 

" तुम्हीपण तुमचं डोकं वापरत नव्हते....तुम्हाला कळायला पाहिजे ना आत मध्ये हवा नाही जात..... मी किती वेळापासून इथे बंद आहे...... होता नव्हता तो सगळ्या प्राणवायू आता संपत आला होता तिथला........आणि तुमचे प्रश्न मात्र काही संपत नव्हते ....मग काय बोलायचं मी" ......माही

 

 

" तू इथे काय करते आहे..?.....मला आधीच निघायला उशीर झाला आहे .....तिथे माझी महत्त्वाची मीटिंग आहे आणि तू काय इथे टाईमपास करत बसली आहेस?" ... ...तिचं सगळं लेक्चर ऐकून झाल्यावर अर्जुन डोक्यावर आठ्या पाडत बोलला

 

" मला इथे तुमच्यासोबत यायची  काही हाऊस नव्हती..... मी तर ते तुमच्यासाठी आणि सोनिया मॅडम साठी" ........ बोलता बोलता तिला काहीतरी आठवलं........ " सोनिया मॅडम.... सोनिया मॅडम..... या इकडे.... सांगा अर्जुन सरांना माझी काही चुकी नाही आहे , मी तर ते तुमच्यासाठी..... उगाच मला हे ऐकून राहिले" ...... माही अर्जुनच्या मागे इकडेतिकडे बघत बोलली

 

" सोनिया....... सोनियाच काय..... सोनिया नाही आली आहे..... मी एकटाच चाललो आहे" .....अर्जुन

 

" काय.....??" ...... माही.. डोळे मोठे करत डिकीमधून खाली उडी मारत समोर सोनियाला बघायला गेली

 

" सोनिया मॅडम कुठे आहेत.?" ......माही

 

" मग मी काय सांगत होतो तुला...?.. पानिपतच्या युद्धाचा इतिहास?" .....अर्जुन

 

" सर मस्करी करू नका..... खरं सांगा... सोनिया मॅडम कुठे आहेत?.... त्या तुमच्यासोबत येणार होत्या ना?" .......माही

 

" हो .....ती येणार होती पण वेळेवर तिला काही महत्त्वाचं काम आलं म्हणून तिने कॅन्सल केले" .......अर्जुन

 

" काय.......?... आता प्लॅनचे कसं होणार?" ..... माही स्वतःचे डोकं खाजवत हळू आवाजात एकटीच बोलत होती...

 

" काय.??....... कशाचा प्लॅन.??" ....अर्जुन

 

" अ...... काही नाही .....काही नाही" .......माही

 

" सर मला घरी सोडा" ......अर्जुन

 

" Are you mad???..... मी आणि तुला घरी सोडू..... मला आधीच खूप उशीर झाला आहे..... त्यात ही तुझी नवीन नाटकं" ......अर्जुन

 

" मग मला पैसे द्या ...... माझी पर्स तेथेच ऑफिसमध्ये राहिली , माझ्याजवळ काहीच नाही आहे आता........मी इथून टॅक्सी मिळते  काय  बघते आणि जाते" ......माही

 

" आज तुला टॅक्सी मिळणार नाही...... त्यांचा संप आहे आज सगळ्या गाड्या बंद आहेत" ......अर्जुन

 

" काय.....? ... मग मी आता घरी कशी जाणार?" .....माही

 

" तू माझ्यासोबत चल आता....... मिटिंग आटोपली की  मी तुला घरी पोहचवेल " .....अर्जुन

 

" नाही .......तोपर्यंत तुम्ही मला कच्च खाऊन घ्याल." ... माही परत स्वतःशीच बडबड करत होती

 

" ओके..... मग बघ तुला काही रस्ता भेटतोय काय??..... मी चाललो" ...... अर्जून

 

"नाही .....मी इथे एकटी कुठे जाऊ..".... माही

 

" मग चल माझ्यासोबत" ...... अर्जुन

 

" पण मी तुमच्या सोबत एकटी..... काही झालं तर?" 

......माही

 

"माझ्यावर विश्वास नसेल तर थांब इथे... इथे तुला वन्य प्राणी कंपनी देतील....... मी ऐकलंय त्यांना मुलगी खायला आवडत असते.... खास करून जीचे नाव म वरून सुरू होते" ..... अर्जुनला  आता तिची मस्करी करायची इच्छा झाली होती. 

 

 

माही विचार करत बसली थोड्यावेळासाठी तिला  अर्जुन काय बोलत आहे ते कळलं नव्हतं..... " म वरून माही...... नाही...... मी येते तुमच्या सोबतच" ........माही

 

" ठीक आहे चल मग बस कारमध्ये" ..... अर्जुन पुढे जात ड्रायव्हिंग सीटवर बसला....... पाच मिनिट झाले तरी माही येऊन बसली नव्हती .... तो परत उतरून बाहेर आला आणि तिला शोधू लागला तर बघतो काय की ती परत जाऊन डिकी मध्ये बसली होती....... तिला बघून त्याने डोक्यावर हात मारून घेतला

 

" इथे काय करते आहे?" .....अर्जुन

 

" तुम्ही बोलले गाडीमध्ये बस" ....... माही

 

" तू इथे बसून येणार आहेस माझ्यासोबत?" .......अर्जुन

 

" काय झालं इथे?? .....छान आहे की जागा." ......माही

 

" माही" ..... अर्जुन जोरात ओरडला

 

" देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा तू झोपली होती का गं? ............ गेट आउट फ्रॉम माय कार.... राईट नाव." ....अर्जुन

 

" एक मिनिटात तु मला कारमध्ये पाहिजे,  नाहीतर तू इथे थांब .......मी चाललो" .......अर्जुन

 

माहीने परत उडी मारली आणि सरळ समोर जाऊन चुपचाप बसली.....

 

अर्जुनसुद्धा  ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला आणि गाडी सुरु केली .  ते पुढे जायला निघाले......

 

 

माहीला  आता टेन्शन आलं होतं...... तिने केलेला प्लांन तिच्यावरच उलटला होता....

 

" हॅलो नमन मला यायला थोडा उशीर होत आहे , तू तिथे पोहोचला आहेस तर मी येईपर्यंत सगळं सांभाळून घे" ..... अर्जुन फोनवर नमनला  काही इन्स्ट्रक्शन्स देत होता....

 

" उशिरा काय तुम्ही पोचायला तर पाहिजे...... माही कसं होणार तुझं" .........मनातच महीची बडबड सुरु होती

 

" सुहाना सफर और ये मौसम हसी

हमे डर है हम खो न जाये कही

सुहाना सफर और ये मौसम हसी 

हमे डर है हमको ना जाये कही....

सुहाना सफर.............

 

माहि तीच्या ओढणी सोबत खेळत खेळत खिडकीतून बाहेर बघत...... अधून मधून अर्जुन कडे बघत गाणं म्हणत होती......

 

" काय झालं...... इतकी टेन्शनमध्ये का आहेस?" ....,अर्जुन अशी काय विचित्र वागत आहे......" माही विचित्राच नाव ठेवायला पाहिजे होते हीचे".... अर्जुन तिच्याकडे बघत मनातच बोलत होता....

 

" काय नाही..... ते घरी माहिती नाही ना मी इथे तुमच्यासोबत आली आहे.... घरी सगळे वाट बघतील" .....माही

 

" ओके..... घरी फोन करून कळवून दे उशीर होईल पोहोचायला" ...... अर्जुन तिला फोन देत बोलला

 

महिने घरी फोन करून कळवलं की काही मिटिंगच्या कामाने ती  अर्जुन सोबत बाहेर जात आहे .....तर घरी यायला उशीर होईल वाट बघू नका......

 

तेवढ्यात अर्जुनचा फोन वाजला..... आईचा फोन येत होता...... अर्जुन ड्राईव्ह करत होता म्हणून त्याने माहिला फोन स्पीकरवर टाकायला सांगितला.......

 

" हॅलो आई बोल." ....अर्जुन

 

" कुठपर्यंत पोहोचला?" .....आई

 

" अर्धारस्त्यात  पोहोचलो,  बस आता..... एक दीड तासात पोहोचतो आहे" ....अर्जुन

 

" अर्जुन औषध घेतले ना...... सकाळी तुला ताप होता .....तुला जाऊ नको म्हटले तरी तू ऐकत नाहीस...... काळजी घे स्वताची" .......आई

 

" अगं हो आता मी ठीक आहो..... काळजी नको करू....... बरं आई उशीर होईल कदाचित आज , तू वाट नको बघशील" .......अर्जुन

 

" ठीक आहे आरामात ये" .....आई

 

आईला बाय करुन त्याने फोन ठेवला...

 

" काय तुम्हाला ताप होता?....... आधी का नाही सांगितलं?" ......माही

 

" एस्क्युज मी....... मी तुला का सांगू?" ......अर्जुन

 

" अरे यार सोनिया मॅडमला सुद्धा माहीत नव्हते वाटत." ....माही मनातच विचार करत होती

 

" सर म्हणजे तुम्हाला बरं नव्हते  तर तुम्ही का आलात..... उगाच काही त्रास व्हायचा..... म्हणून म्हणत होती"...माही 

 

अर्जुनने  एक कटाक्ष तिच्यावर टाकला आणि परत ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेट केले..

 

कार जंगलाच्या वाटेने निघाली होती....... संप असल्यामुळे रस्त्यावर फार गाड्या नव्हत्या..... रस्ता बराच सामसुम होता....... आणि अर्जुनची गाडी बंद पडली......

 

" सत्यानाश" ........ माही मनातच बोलली

 

अर्जुन दोन-तीनदा गाडी सुरू करून बघितली....... त्याच्या लक्षात आलं की पेट्रोल संपलं आहे.......

 

" व्हॉट द हेल..... मी तर ड्रायव्हरला फुल करायला सांगितलं होतं ..... कस काय बंद पडलं........तू पण ना अर्जुन  निघायच्या आधी चेक करायला पाहिजे होतं......पण या सोनियाने वेळेवर सगळा घोळ घातला आणि मी काही चेक न करता तसाच परत निघालो...... अरे यार......." 

 

" माही कार मधला पेट्रोल संपला आहे...... आपण पुढे जाऊ शकत नाही" ...... अर्जुन

 

" ह्म्म...... मला माहित आहे" ...... माही

 

" काय....?" .....अर्जुन

 

" नाही......ते इथे दिसला आता" ......माही ने बोलणं सांभाळून  नेले......

 

माहीने कार मधलं पेट्रोल काढलं होतं....... माहि आणि सोन्याचा प्लॅन झाला होता तसा  गाडी बंद पडेल मग ते दोघं समोर जाऊ नाही शकणार आणि त्यानिमित्ताने ते दोघं आजूबाजूला फिरून सोबत वेळ घालवता येईल,  असा त्यांचा प्लान होता.......... पण आता तो सगळा माहीवरच उलटला होता

 

त्याने फोन काढला तर फोन मध्ये सिग्नल सुद्धा नव्हते........ आता काय करायचं...... अर्जुन विचार करत होता

 

आभाळ पण दाटून येत होते...... बहुतेक वादळ येणार होतं.......

 

" हे आज अचानक असं काय होत आहे....... सर काहीतरी करा नाहीतर आपण येथेच अडकून राहू" .....माही

 

" फोन बंद झाला आहे माही , येथे सिग्नल नाही आहेत थोडावेळ थांबून गाडी दिसते का बघूया काही" ......ती दोघं तिथे बर्‍याच वेळ थांबली होते पण एकपण त्यांना गाडी दिसली नव्हती......... आणि आता ढग बरेच काळवंडून आले होते......

 

" माही चल..... आजूबाजूला काही आहे का बघुयात..... बहुतेक वादळ येणार आहे...... कुठे हॉटेल भेटते काय  शोधूया.... आपल्याला इथेच राहावे लागेल कुठेतरी आता" .......अर्जुन पुढे जात मोबाईलचे नेटवर्क चेक बोलत होता 

 

आजूबाजूला पूर्ण जंगल होते , जवळपास कुठेच काही नजरेला पडत नव्हते........ ते दोघेपण आतमध्ये गेले त्यांना तिथे एक छोटीशी पायवाट दिसली,  त्या पायवाटेवरून रस्ता शोधत आत मध्ये जाऊ लागले........ माही त्याच्या मागे मागे येत होती.....

 

" सर इकडे काही नाही दिसत आहे....... माझे पाय पण दुखायला लागलेत....... सर तुम्हाला एक्स्ट्रा  पेट्रोल ठेवता नाही येत का गाडीमध्ये?" ....... माही बडबड करत त्याच्या मागे येत होती.....

 

" शट अप माही" ........ अर्जुन

 

" पण सर." .....माही

 

" डोकं नको खाऊ माझं..... आधीच मला काही कळत नाही आहे हे असं कसं घडलं ते...... आजपर्यंत असे कधी झाले नव्हते......... बरोबर आहे मी कसा विसरलो....... तू जिथे असली तिथे गडबड व्हायलाच हवी ना?".......अर्जुन

 

सर करत माही जोरात धावत येत होती , ती जाऊन अर्जुन बिलगली.... आणि त्याला पकडून उड्या मारत होती

 

" माही..... काय झालं???  माझा अजिबात मस्करी ऐकायचा मूड नाही आहे........ मला आधीच खूप राग आलेला आहे" ......अर्जुन

 

" सर....... सर........ ते..... बकरी माझ्या मागे लागली"..... तेवढ्यात एक बकरी मे मे करत तिथे येत होते...... तिच्या तोंडात माहिची  ओढणी होती.....

 

 

अर्जुनला आता खूप हसायला येत होतं........

 

" सगळे प्राणी तुझ्याच मागे कसे काय लागतात ग.???...... तू  नक्कीच मागच्या जन्मात यांची  काहीतरी खोड काढली असेल" .......अर्जुन

 

" सर प्लीज,  माझी ओढणी"  .....माही... तिच्या गळ्याभोवती आपले हात झाकत बोलली

 

आता अर्जुनचा तिच्याकडे लक्ष गेले आणि त्याला कळले काय झाले ते...

 

अर्जुनने बकरीला हाकलले आणि तिच्या तोंडात पकडलेली माहिची  ओढणी काढून घेतली आणि माहिला गळ्यावर पांघरूण दिली...

 

बरीच संध्याकाळ होत आली होती...... अर्जुनला आता खूप वीकनेस जाणवत होता..... तो चालता चालता एका खडकावर जाऊन बसला.....

 

" सर काय झालं तुम्हाला?? " .....म्हणत तिने त्याच्या डोक्याला हात लावून बघितला तर त्याला खूप ताप भरला होता......

 

आता पावसाला सुरुवात झाली होती...... सगळीकडे खूप अंधारून आले होते..... पाऊस सुद्धा चांगलाच जोराने पडायला लागला होता...... आता माहीला अर्जुनची खूप काळजी वाटायला लागली...... अर्जुनला पुढे चालायलाही होत नव्हते..... त्याला खूप दम लागला होता....... माही खूप घाबरली होती..... माही आजूबाजूला बघत होती..... तर तिला थोड्या दूरवर एक झोपडी सारखं छोट घर दिसले....

 

" सर ते बघा,  तिथे एक घर दिसत आहे .....आपल्याला तिथे काही मदत मिळेल..... चला सर तुम्हाला खूप ताप चढला  आहे ,  ते.... पावसात आपण बसून राहू शकत नाही" ..... माहीने त्याला त्याच्या कमरेत हात घालून उठवले.... तो मात्र आता मान टाकत होता.... त्याच्यात काहीच स्त्रान नव्हता....... ते दोघेही आता पुर्ण ओलीचिंब झाली होती...... माहिने त्याला पकडून कसेबसे  ती दोघं त्या घरासमोर आली...... माहीने दरवाजा खटकावला..... एका आजीबाईने   दार उघडले. 

 

" आजी आम्ही इथे पुढे जात होतो पण आमची गाडी बंद झाली आणि आम्ही इथे मध्येच फसलो... पाऊस पण खूप येतो आहे...... आजूबाजूला काहीच दिसत नाही आहे..... यांना पण बरं नाही आहे......... प्लीज आम्हाला थोडी मदत करा" ......माही काकुळतीने त्या आजी सोबत बोलत होती

 

" तुम्ही दोघं नवरा-बायको आहात?" ........आजी

 

" हो....... हो आम्ही नवरा-बायको आहोत" .....माही

 

माहीचा लक्षात आलं होतं की त्या आजीबाईशिवाय आपली आता इथे कोणीच मदत करू शकणार नाही..., आणि अर्जुनची तब्येत पण बिघडत चालली होती...... तिला त्याच्यापुढे काहीच दुसरे ऑप्शन दिसले नाही...... आणि म्हणून तिने खोटे उत्तर दिले होते....

 

" ये.....आतमध्ये........ पोरी माझ्या प्रश्नाचं वाईट वाटून घेऊ नगस....... हिकडं अशी बरीच पोर्या तुमच्या वयाची फिरत अस्त्यात...... मी अशी कुनालाबी मदत कशी काय करायची...... म्हणून तसे बीचारले....... ये त्यासणी आत  घेऊन" .....आजी

 

" ठीक आहे आजी....... तुमचं पण बरोबर आहे" ....... माही अर्जुनला आत मध्ये घेऊन गेली ..

 

ती एक छोटीशी दोन खोल्यांची झोपडी होती.... आजी तशी गरीब दिसत.... घरात फार काही सामान नव्हते..... एक छोटा स्वयंपाक घर आणि एक उठबस करायची खोली होती..

 

एका साईडला  एक सतरंजी टाकली होती,  माहीने तिथे अर्जुनला झोपवले.....

 

" पोरी हे घे..... त्याचे कपडे काढून..... त्याच अंग पुसून दे नाहीतर त्यांनी खूप थंडी वाटेल"  ....आजी तिच्या हातात एक पंचा देत बोलली.....

 

माही तिथे विचार करत उभी होती.....

 

अर्जुन थरथर कापत होता......आजीने त्याच्या डोक्याला हात लावून बघितले तर त्याचा अंग चांगलंच तापलं होतं....

 

" पोरी काय विचार करते....अग त्यो बघ किती थरथर कापत आहे..... त्याचे पटकन कपडे बदल मी त्यासणी काढा बनवून आणते....." ...आजी 

 

" माही आता काय करू..... मी कसे कपडे बदलू  सरांचे... अर्जुनला आवाज दिला...... त्याच्या गालावर थोपटले..... पण तो ग्लानी मध्ये जात होता.......

 

" माही आता तुलाच हे करावं लागेल....... तुझ्याच मुळे  त्यांच्यावर ही अशी वेळ आली आहे." .......महिने तिथे बाजूला असलेली एक चादर त्याच्या अंगावर टाकली आणि  त्याचा शर्टाचं बटन काढायला गेली.... त्याच्या झालेल्या स्पर्शाने तिच्या हृदयाची धडधड खूप वाढली होती....... तिला त्याच्या अंग खूप गरम वाटत होतं.... तिने डोळे बंद केले,  कसलाही फालतूचा विचार डोक्यात येऊन न देता तिने त्याचे कपडे काढले... त्याला चादर नीट गुंडाळून दिली... आजीने दिलेल्या पंचांनी तिने त्याचे डोके कोरडे केले.......

 

" पोरी त्याला तस खाली नको झोपू ...थंडी भरल.....तिकडे बघ थोडं तनिस पडला आहे..तो आण इकडे,  त्याची गादी कर आणि त्यावर ती सतरंजी टाक म्हणजी खालून थंडी वाटणार नाही" ........ आजी काढा बनवता बनवता बोलली

 

माहीने   कोपऱ्यात पडलेले तनिस उचलून आणले आणि त्याची नीट गादी सारखी अरेंजमेंट केली..... त्यावर सतरंजी टाकली अर्जुनला काही टोचनार नाही याची तिने पुरेपूर काळजी घेतली....... आणि अर्जुनला त्यावर झोपवले....

 

आजीने ताप कमी होण्यासाठी  म्हणून काढा बनवून आणला....

 

" पोरी घे.... हे त्यास्नी पाज.... म्हणजे त्यासणी बरं वाटेल" ..... आजीने एक ग्लास महीच्या हातात दिला

 

माहीने अर्जुनला स्वतःच्या आधाराने उठवून पकडले... एक हात त्याच्या मानेमागून डोक्यामागून घेत खांद्यावर ठेवत दुसऱ्या हाताने त्याला काढा पाजला....... त्याची मान तिच्या खांद्यावर  पडली..... तिने त्याला परत खाली नीट झोपवले

 

"पोरी,  हे घे तू पण कपडे बदलून घे .....नाहीतर तूलाबी थंडी वाटल"  ......आजीने तिच्या जवळची एक साडी माहीला घालायला दिली......" तुमच्या दोघांचे कपडे  दे..... मी इथे वाळत घालते म्हणजे  उद्या सकाळपर्यंत ते सुकून जातील"  ......

 

माहीने साडी घातली आणि बाकीचे कपडे वाळत टाकले.....

 

संध्याकाळ झाली होती आजीने देवाजवळ दिवा लावला...

" सांजाच्या वेळेला,  ना गळ्यात मंगळसूत्र.... ना भागांत कुंकू अशी कोणती फॅशन करता तुम्ही लोका??.... लग्न झालेल्या पोरिस्नी असा बरं दिसत नाय........ एवढ्या चांगल्या सोन्यासारखा नवरा दिलंय देवाने...... त्याच्या नावाच मंगळसूत्र ... भांग भरायला काय लाज वाटते व्हय?"......आजी

 

" खरंच अर्जूनसरखा नवरा मिळणे म्हणजे किती भाग्य लागते...... आपलं नशीब असं कुठे" .....माही स्वतःच्या नशिबावरच हसली.....थोड्यावेळ साठी का होईना ....आजीच बोलणं तिला सुखावून गेले होते.....

 

आता काय बोलू विचार करत माही बसली होती...... एक खोटं बोलले की त्याच्यावर चार खोटे जास्ती बोलावं लागतात ते कुठे तिला आता कळत होतं..

 

" आजी तसं काही नाही......आजी ते आम्ही आता येत होतो तर झाडाला अडकून ते मंगळसूत्र तुटला आणि खाली कुठेतरी पडलं..... आणि भांगाच्या म्हणाल तर ते पावसाने सगळे पुसून गेलं" ....... माहीने  कसबस   आजीला समजावून सांगितलं.....

 

" अस हाय तर........  हे घे कुंकू ....लाव आपल्या भांगे मध्ये....  सांजाच्या वेळला असंच राहू नये सवाष्ण पोरीने."... आजीने तिच्या हातात एक कुंकू'ची डब्बी दिली ....

 

आता मात्र माहिजवळ काहीच पर्याय उरला नव्हता......लग्न नाही झालं सांगितलं तर आजी घराबाहेर काढतील,  जे आता तिच्यासाठी आणि अर्जुनसाठी अगदीच हिताचे नव्हते....... कुंकू लावले तर माझं काही अर्जुन सोबत लग्न होणार नाही......विचार करत  तिने आजीच्या हातातली डबी घेतली आणि त्यातलं थोडं कुंकू काढून आपल्या भांगे मध्ये घातल......

 

तिचे ते रूप तिला खूप सुंदर वाटत होतं.... ती स्वतःलाच बऱ्याच वेळा समोर ठेवलेल्या आरशामध्ये बघत बसली होती........" काय माहिती असे  आपण कधी स्वतहाला बघू ....." 

 

" पाय म्हणलं होतं ना , कशी साजरी दिसून राहिलीस आता." ... आजी तिच्या चेहऱ्यावरून दोन्ही हात फिरवत बोटे मोडत बोलली....... " आता रोज असच राहायचं...".

 

माहीने होकारार्थी मान हलवली...

 

आजीने थोडीशी पेज बनवली आणि माहीजवळ आणून दिले आणि तिला अर्जुनला खाऊ घालायला सांगितले...... माहीने अर्जुनला उठवायचा प्रयत्न केला... त्याचे डोळे खूप जड झाले होते....... तिने तसं त्याला 3 4 चम्मच पेज खाऊ घातली...... आता मात्र तो खायला तयार नव्हता.... त्याला बरं वाटत नव्हते,  त्याची खायची काही इच्छा नव्हती...

 

माही आणि आजीने पण थोडं थोडं खाऊन घेतलं.....

 

आजीच्या घरी इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती....... सगळीकडे अंधार पसरला होता..... तिने देवाजवळ दिवा लावला होता त्याचाच काय तो थोडासा प्रकाश पडला होता

 

"पोरी मी येथे स्वयंपाक घराच्या आडोशाला झोपते..... तुम्ही झोपा तिथे"..... म्हणत आजीने एक सतरंजी स्वयंपाक खोलीच्या भिंतीजवळ घातली आणि तिथे पडली....अंथरायला पांघरायला म्हणून नावासाठी तिथे  2 3 गोधड्या होत्या आणि एक चादर....

 

माही अर्जुनच्या थोडी दूर जाऊन झोपली..... अंधार असल्यामुळे तिला झोप येत नव्हती,  तिला खूप भीती वाटत होती..... थोड्या वेळाने तिला अर्जुनचा कन्हण्याचा आवाज आला...त्याच्या आवाजाने ती ताडकन उठून त्याच्याजवळ गेली हात लावून बघते तर ....... त्याचे  अंग खूप थंड पडलं होतं..... बाहेर सतत पाऊस पडत होता त्यामुळे थंडी पण खूप वाढली होती   ....... थंडीमुळे तो खूप थरथरत होता...... तिने तिची गोधडी सुद्धा त्याच्या अंगावर घातली..... तरीसुद्धा त्याचा अंग थरथरायचं कमी होत नव्हतं...... तिने त्याचे तळपाय ....हाथ.....तिच्या हाताने बऱ्याच वेळा चोळले...... तिचे  हात गरम करून त्याच्या डोक्याला कानाला लावत होती..... तरीसुद्धा त्याचे थरथरणे बंद होत नव्हते...... आता तो जोरजोराने श्वास घ्यायला लागला होता......... आता मात्र  माहीला खूप भीती वाटायला लागली..... ती धावतच आजीजवळ गेली.....

 

" आजी ......आजी बघाना,  यांना काय होत आहे...... मला खूप भीती वाटत आहे" ..... ती रडक्या आवाजातच आजीला उठवत बोलली....... आजी लगेच उठून त्याच्याजवळ येऊन त्याला बघू लागली....

 

" पोरी त्याच्यात खूप थंडी भरली आता...... इथे काही दवाखाना  सुद्धा नाही की आपण जाऊ शकतो...... बाहेर पण खूप पाऊस पडत आहे" ......आजी

 

" आजी , तुम्ही काढा दिला होता ना...... तसाच परत काहीतरी बनवून द्या ना" ......माही

 

" मी बनवून देते , पण मला माहिती नाही तो किती काम करेल तर." .... आजीने परत तिला काढा बनवून दिला....... 

 

" पोरी तू त्याची बायको आहेस ना....... जवळ घेऊन झोप...... शरीराची ऊब दे..... आता दुसरी कोणतीच सोय उरली नाही आहे......... त्याला खूप थंडी भरली तर त्यासणी काही पण होऊ शकते..... त्याला बेहोश नको होऊ देशील........ घे धर...वेळ नको करू आता जास्ती..... बाकी सगळ् देवाच्या हातात सोडून दे" ......आजी

 

आजीचे बोलणे ऐकून तिचे डोकं सुन्न झालं...... आजी तिला ग्लास देऊन स्वयंपाक खोलीच्या भिंतीच्या तिकडे आडोशाला जाऊन झोपली....

 

माहिला काही कळतच नव्हते काय करावे...... तिने त्याच्या गालावर मारून त्याला थोडे जागं केलं.... आणि आजीने बनवून दिलेला काढा दिला........... अर्जुनची तब्येत चांगलीच बिघडत चालली होती.....

 

" देवा किती परीक्षा पाहतो माझी........ प्लीज अर्जुन सरांना काही होऊ देऊ नको...... सगळे माझे लोक तू माझ्यापासून हिरावून घेतले....... आता यांना हरवण्याची माझ्यामध्ये हिम्मत नाही आहे" ............. ती एकटक अर्जुनकडे बघत होती......आता तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागले होते....... तिचं हृदय आता चांगलंच दुखायला लागलं होतं......... तिचा  गळा सुद्धा दाटून आला होता...... ती बसल्याबसल्या हळू हळू त्याच्या जवळ सरकत गेली...... तिने प्रेमाने अर्जुनच्या डोक्यावरून हात फिरवला.........

 

"  सर मला माफ करा... माझ्यामुळेच तुमची ही हालत झाली आहे....,.... पण आता माझ्याजवळ दुसरा कुठलाच पर्याय उरलेला नाही आहे........ मी तुम्हाला असं बघू नाही शकत...... मी तुम्हाला हरवू नाही शकत...... मी तुमच्या शिवाय जगू नाही  शकत...... मी तुम्हाला काहीच होऊ देऊ नाही शकत" ......... ती अर्जुनच्या पांघरूण मध्ये गेली....... तिने आपले डोळे मिटले........ त्याला अगदी आपल्या जवळ स्वतःच्या कुशीत घेतले.............. त्याच्या हात आपल्या हातात घेऊन चोळत होती....... अर्जुनचा श्वास अचानक कमी झाल्यासारखा तिला वाटला.......ते बघून ती खूप घाबरली.... तिने  तिचे ओठ त्याच्या ओठावर टेकवले............ तेवढ्यात अर्जुनची पकड घट्ट झाली.....सगळं कडे निरव शांतता होती फक्त माहीच्या बांगड्यांचा खणखन्याचा मधुर आवाज ..... जसेकाही सुंदर गोड आवाजात संगीत सुरू आहे ........... ती पुढे जाणार तेवढ्यात अर्जुनने तिला त्याचा हात मारून दूर केले.........

 

" Stay away from me"  ....... अर्जुन

 

माही अर्जुनकडे बघत होती... तिच्या डोळ्यात अश्रू  होते...... अर्जुनने  बऱ्यापैकी डोळे उघडले होते....... तो तिच्या डोळ्यात बघत होता......... तिच्या डोक्यावर त्याला कुंकू दिसले ... ते बघून त्याला आश्चर्य वाटले...ती अगदी नववधू सारखी दिसत होती...खूप सुंदर...थोड्या वेळसाठी का होईना ,  त्याने तिच्यासोबत सुंदर आयुष्याचे स्वप्न रंगवले.......तो भानावर आला ....तिच्या चेहऱ्यावर त्याला काळजी, प्रेम , दुःख सगळं दिसत होतं.....

 

" तु ठीक आहेस??" ......अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलला

 

तिच्या चेहऱ्यावर स्माईल आली....... तिने पाणी भरले डोळ्यानेच स्माईल करत मान हलवली......

 

तिला स्मायल देत अर्जुन झोपी गेला...... माही पण त्याच्या बाजूला पडली..... आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती......  त्याला बघताबघता कधीतरी तिचा डोळा लागला....

 

*****

 

क्रमशः 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️