Jan 22, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 27

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 27

भाग  27

 

कॉन्फरन्स रूम मध्ये प्रेझेन्टेशन सुरू होते..... एक फाईल मिसिंग होती ..... ती फाईल माहि कडे आहे असं कळलं होते.  माही वेळ झाली तरी अजून ऑफिसमध्ये पोहोचली नव्हती....,.... क्लायंटला कसेतरी समजावून मीटिंग पोस्टपोन केली होती............... म्हणून अर्जुन बराच चिडला होता......  प्रोजेक्ट हेडवर सुद्धा त्याचं ओरडून झालं होतं..तो रागातच तिथे बसला होता.......

 

माही धावत पळतच कॉनफरन्स रूममध्ये आली........ ओढणी वगैरे नीट सावरत ती दारात उभी झाली..... अर्जुन तिला खूप रागात दिसला...... त्याचा चेहरा बघूनच तिची घाबरगुंडी उडाली होती..... ती हळूहळू पाय मोजताच आतमध्ये त्याच्या समोर येत उभी राहिली....... तिने तिच्या बॅगमधून काढून फाईल समोर टेबलवर ठेवली...

 

" ऑफिसचे रूल्स तुम्हाला माहिती नाही वाटते.....ऑफिसमधले कुठलेच कागदपत्र , फाइल्स घरीं न्यायचे नाहीत हे कोणी यांना सांगितलं नाही का??........ आणि हे काय..  जेव्हा वाटलं तेव्हा आलं ??"  ............. अर्जुन तिच्यावर नजर रोखून ओरडला

 

" सर सॉरी..... मी  वेळेतच घरून निघाली होती....पण" ..... माही काही बोलतच होती तेवढ्यात

 

" You shut up.....I don't like excuses" ...... त्याने एक जाड  बुक  तिच्या समोर टेबलावर टाकलं...... " हे बुक आजच्या आज मला टाईप करून हव आहे" ........ अर्जुन

 

तिने चुपचाप बुक उचललं आणि उघडून बघितलं तर ते सगळं इंग्लिशमध्ये लिहिलं होतं.....

 

" सर हे तर इंग्लिश मध्ये आहे?" ........ मााही

 

" Then what? .....it's your punishment ".... अर्जुन

 

तिने मानेनेच काही नाही म्हटलं.....

 

" तुम्हाला ऑफिसमध्ये कसं यायचं माहिती नाही काय??...... हा काय अवतार आहे.???... मिस रिना यांना जरा एकदा परत आठवण करून द्या ऑफिसमधल्या रुल्सची?" ....... अर्जून

 

" सॉरी" ........माही ..

 

अर्जुनने तिला  सगळ्या लोकांसमोर रागवला होता त्यामुळे तिला खूप वाईट वाटले होते आणि त्याने तिचे काही ऐकून सुद्धा घेतले नाही... न ऐकताच तो इतका चिडला होता....

 

अर्जुन  आपल्या केबिनमध्ये चालला गेला......

 

माही ऑफिससाठी यायला वेळेतच निघाली होती पण रस्त्याने येता येता तिच्या गाडीसमोर एक लहान मुलगा आला..... त्याला वाचवता-वाचवता म्हणून तिचा बॅलन्स गेला आणि ती समोरच्या गाडीला जाऊन तिची ठोस लागली होती.... तिचा एक छोटासा एक्सीडेंट झाला होता .... थोडसं पायाला हाताला लागलं होतं त्यामुळे तिचा ड्रेस मातीभरला झाला होता आणि केस पण थोडे विस्कटले होते ......कसेबसे तिने सगळे कपडे झटकून नीट केले आणि ऑफिस मध्ये पोहोचली होती..... पण ती पोहोचायच्या आतच मीटिंग संपली होती..... त्यामुळे अर्जुन तिच्यावर भयंकर रागावला होता... रागाच्या भरात त्याने तिला खूप मोठे जाड असे इंग्लिश बुक टायपिंग करण्यासाठी दिलं होतं . ते एक दिवसात काय 5 दिवस ही टाईप करत बसली तरी पूर्ण होणार नव्हतं..... वरून टायपिंग  इंग्लिशमध्ये , सगळाच झोल होता.... ती तिच्या डेस्कवर जाऊन बसली आणि टायपिंगचा काम सुरू केलं.....थोड्या वेळाने तिचा हात दुखायला लागला म्हणून सहज तिने हात वर करून बघितला तर तिच्या हाताला चांगलंच खरचटलं होतं आणि थोडं फार त्यातून रक्त सुद्धा आले होते.....

 

अर्जुन बाहेरून एक मीटिंग आटपून ऑफिसमध्ये आला होता....... तर  सगळ्या स्टाफ मेंबरसाठी रेस्ट करायला म्हणून एक रूम होती,  तिथे गर्दी दिसली आणि आवाजही येत होता ..... हे काय सुरू आहे म्हणून तो तिथे बघायला गेला..... बाहेर  स्टाफ मेंबर कुजबूज करत हसत उभे होते.....

 

अर्जुनने आतमध्ये बघितलं तर त्याने डोक्यावर हात मारून घेतला........ " यार सगळे कार्टून माझ्याच नशिबात लिहून ठेवलेले दिसतात...... पण ही सोनिया का अशी करते आहे??....... हा पण काय प्रश्न झाला???.... माझ्यापेक्षा अजून कोणाला चांगलं माहिती असेल ,  त्या कार्टून सोबत राहिले की  सगळेच कार्टूनसारखे वागायला लागतात...... या माहिने माझेच  तर डोकं फिरवून ठेवलय.... तर बाकीचे काय??"  ......अर्जुन मनातच  विचार करत त्यांच्याकडे बघत होता..

 

आतमध्ये सोनिया माहिला हातावर मेडिसिन लावायचा प्रयत्न करत होती..... पण सोनिया जेव्हाही मेडिसिन लावायला हात पुढे करायची,  माही जोराने ओरडायची..... आणि माहीचा  आवाज ऐकून सोनिया सुद्धा ओरडायची.... जवळपास पाच दहा मिनिटात पासून त्यांचा हाच कार्यक्रम सुरू होता..... मेडिसिन मात्र अजून पर्यंत लावून झाले नव्हते........ त्यांचा आवाज ऐकूनच बाकी स्टाफ मेंबर तिथे जमा झाले होते......पण सोनिया आतमध्ये असल्यामुळे कोणाचीच आत मध्ये जायची हिंमत झाली नव्हती,  त्यामुळे सगळे बाहेरच उभे होते आणि त्या दोघींना असं बघून त्यांना हसायला येत होतं.....

 

अर्जुनने सगळ्यांवर एक नजर फिरवली, तसे सगळे त्याला बघून आपापल्या जागेवर चुपचाप जाऊन बसले

 

" काय चाललंय इथे.....?" ........अर्जुन रूमच्या आतमध्ये येत बोलला.... त्याचे लक्ष माहीकडे गेलं तर तिच्या हाताला लागलेलं बघून तो पण काळजीत पडला......

 

" हे कसं काय लागलं आणि कधी लागलं?"  ........अर्जुन माहीकडे बघत बोलला.

 

माहीने नजर वर करून एकदा त्याच्याकडे बघितले आणि परत तिने नजर वळवली.....

 

" सकाळी किती ओरडला अर्जुन तू तिच्यावर..... एकदा तरी तिचं बोलणं ऐकून घ्यायचं होतं??..... तुला ना राग आला की काहीच कळत नाही..... आणि जर ते ऑफिसशी  रिलेटेड असेल तर मग तर विचारायलाच नको" ........म्हणत सोनियाने त्याला माहि सोबत घडलेला सकाळचा प्रकार सांगितला,......

 

सोनिया बोलत होती तेव्हा अर्जुन माहिकडे बघत होता पण माहिने मात्र त्याच्याकडे बघायचं टाळले होते....... त्याला आता त्याची चूक कळली होती,  पण आता काय फायदा जो व्हायचा होता तो प्रकार तर घडून गेला होता....

 

" तुम्ही दोघी असा आरडाओरडा का करत आहात??".....अर्जुन

 

" मी माहिला  मदत करत होती" ........सोनिया

 

" ओरडण्यामध्ये......?"...अर्जुन डोळे मोठे करत डोक्यावर आठ्या पाडत बोलला

 

" काय........?.... मी तीला मेडिसिन लावण्यासाठी मदत करते आहे" .......सोनिया

 

" पण तुम्ही दोघी तर किती वेळ झाला फक्त ओरडताना दिसत आहात...... मेडिसीन तर कुठे लागलेली दिसत पण नाही आहे?"..... अर्जुन

 

" अरे या माहिला खूप भीती वाटते या मेडिसिनची...... मी कधीची तिला लावायचा प्रयत्न करते  .....पण ती जोरजोराने ओरडते .......ती ओरडली की मला पण भीती वाटते ....... मला पण असं लागलं की खूप भीती वाटते" .........सोनिया

 

" ग्रेट." .....अर्जुन तिच्या हातातून मेडिसीन आणि कॉटन घेत बोलला..

 

" ओके .... अर्जुन माझी मिटींग आहे , मी जाते तू बघ ........ माही येते मी थोड्या वेळात" .......म्हणत सोनिया तिथून बाहेर  गेली.

 

अर्जुन तिच्या हाताला मेडिसिन लावायला गेला....

 

" सर ....... मी करेल आहे" ..... माहि त्या काऊचवरून खाली उतरत बोलली.

 

" Yeah I know you are so strong and  independant"  .....म्हणत  तिच्या हाताला धरून त्याने परत तिला काउचवर  बसवले...... तिने त्याच्या हातातून आपला हात झटकून काढून घेतला.....

 

" माही ssss....shssss......शांत बस ....नाहीतर मला जबरदस्ती सुद्धा करता येते" .....अर्जुन तिच्यावर नजर रोखत बोलला...तो तिच्या जवळच काऊचवर बाजूला बसला....जास्ती जागा नसल्यामुळे तिला त्याचा स्पर्श झाला ....तसे तिने अंग चोरले नी बाजूला सर्कण्याचा प्रयत्न केला पण जागा नव्हती .....आणि ती..तशीच .....माही चुपचाप बसली....

 

त्याने तिच्या हाथ आपल्याला हातात घेतला आणि फुंकर मारत अधून मधून तिच्याकडे बघत medicine लावलले....रूमच दार उघडं होतं....तो उठला नी त्याने दार बंद केले नी परत माहीकडे आला.

 

" हे....हे काय करताय तुम्ही??......दार का बंद केले?? .....हे बघा तुम्ही माझ्यासोबत असे  करू शकत नाही??....तुम्ही माझ्यासोबत कालचा बदला घेऊ शकत नाही??' ....ती घाबरतच,  पण घाबरत नसल्याचे नाटक करत बोलली.....तिला वाटले काल घरी ती त्याच्यासोबत नीट नव्हती वागली म्हणून तो आज तसा वागतोय.

 

" बदला.......? तुला सरळ सोप विचारलेले ,सांगितलेले कळत नाही......आणि नाही त्या फालतू गोष्टी मात्र बरोबर तुझ्या डोक्यात येतात......गोल गोल फिरवत बसतेस......तुला सरळ पद्धतीने विचाराच करता येत नाही काय??? .......आणि तसे पण मला जर काही करायचे असेल ना मी कधी पण .... कुठे पण करू शकतो..काहीपण करू शकतो.......तुझी परमिशन घेत नाही बसणार मी"  ........तिच्या पायाकडे बोट दाखवत तो बोलला.......

 

ती चुपचाप त्याच ऐकत होती.....आणि तिने तिच्या पायाकडे तो बोट दाखवत होता तिकडे बघितले ..... तर तिच्या टोंगळ्याजवळ तिचा सलवार पुर्ण रक्ताने लाल लाल झाला होता........ तिथे बरच लागलेल दिसत होतं......

 

अर्जुनने  तिच्या पायाला पकडत  तिचा पाय काऊचवर सरळ केला...... सलवारला गोल गोल करत फोल्ड करत वर नेत होता......

 

" सर.... प्लीज .......मी करते ते" ....... माहिला थोडं अवघडल्यासारखे झाले होते....असा एकदम पाय कुणासमोर ........तिला अक्वरड झालं होतं.

 

अर्जुनला तिच्या मनातले भाव समजले होते...

 

" डोन्ट वरी , मी काही बघणार नाही..... मी डोळे बंद करून करेल" ......... म्हणत त्याने आपले डोळे मिटले..... आणि हाताने हळू तिचा सलवार टोंगळ्या वर पर्यंत नेत  अलगदपणे फोल्ड केले...... कॉटनवर डेटॉल घेऊन क्लीन करू लागला........

 

माही मात्र त्याच्या त्या रुपाकडे एकटक बघत होती....... त्याच्या अशा वागण्याने ती स्तब्ध झाली होती...... त्याच्या प्रामाणिकपनावर.... निरागसतेवर ती भाळली होती........ तिला त्याच्यावर पुर्ण विश्वास होता पण कधीकधी बोलण्याच्या नादात ती काही पण बोलून जायची.


"

तोंड तर तुझं फार चालत असतं....... डोकं तर त्याहुनी फास्ट पळते....... आणि अशी कशी तू घाबरट...... या एवढ्याशा जखमेला घाबरते......... पूर्ण नमुना आहेस तू...... आज पर्यंत मी तुझ्या सारखी मुलगी बघितली नाही......... बघ काही होत नसतं...... दुखलं का तुला कुठेतरी......... उगाच घाबरते....... लहानशा गोष्टीचा मोठा बाऊ करते " ........ अर्जुन बोलत बोलतच तिच्या पायावर डेटॉल लावत होता......


"

सर " ...........माही


"

काय झालं??.... दुखतय का??" ...... अर्जुन


"

नाही " ......... माही


"

मग?" ......अर्जुन


"

सर तुम्ही डोळे उघडू शकता" ........माही


"

Are you sure ....?"  ...... अर्जुन


"

ह्म्म्म" ........ माही

 

अर्जुन डोळे उघडले ......तिच्या पायाला खूप लागलं होतं....... त्यांनी तिच्याकडे बघितलं... त्याला तिच्या चेहऱ्यावर पेन दिसत होतं....


"

दुखत आहे काय खूप?" .....अर्जुन

 

माहिने नाही म्हणून मान हलवली......


"

असे कसे ग सगळे तुझ्यात गाडी पुढे येत असतात??..... तुला नीट बघून गाडी चालवता येत नाही काय??... तू लहान आहेस का आता???...... अशी कशी तू पडत असते???...... दर दोन दिवसा आड तू कुठे ना कुठे जाऊन धडकत असते..,.... स्वतःची काळजी घेता येत नाही काय??" ....... बडबड करतच अर्जुनने तिची जखम क्लीन करून त्यावर मेडिसिन लावून बँडेज लावून दिले..... ती मात्र चुपचाप त्याची बडबड ऐकत होते....


"

सगळ्यांसमोर चिडायचं आणि आता काळजी घ्यायची..... मगाशी सांगत होते तर ऐकून घ्यायला तयार नव्हते...... नेहमी सगळ्यांसमोर चिडत  असतात" ...... माही मनातच विचार करत होती...


"

थँक्यू " ..... एक कटाक्ष अर्जुनवर टाकून.,. माही रूममधून निघून आपल्या डेस्कवर जाऊन बसली आणि आपलं काम करत होती.


"

बापरे .....अजूनसुद्धा  राग आहे तर..... गेला नाही???" ...... अर्जुन स्वतः शीच  हसत माहिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता......

 

माही आपलं टायपिंग करत बसली होती......लंच करायला सुद्धा वेळ नव्हता इतके काम तिला अर्जुनने  दिलं होतं.  ते आजच्या आज घरी जायच्या आधी पूर्ण करायचे होते .... तिचा  हात दुखत होता... पण ती  आपल्या कामामध्ये मग्न झाली होती........ अर्जुन त्याच्या केबिन मधून तिला बघत होता....

 

संध्याकाळ झाली होती,  सगळे आपापली कामं आटोपून घरी जायला निघाले होते ......माही मात्र आपलं काम करत बसली होती..... अर्जुन तिच्याजवळ आला......


"

माही राहू दे ते , जा आता घरी" ....अर्जुन


मा

हिने ऐकून न ऐकल्यासारखे केले आणि परत आपल्या कामावर कॉन्सन्ट्रेट केले...


"

माही.... मी काय म्हणतो आहे,  बस झाले  आता , घरी जा" ....अर्जुन


"

माझी पनिशमेंट आहे ती..... मी पूर्ण केल्यावरच घरी जाईल" ....माही


"

माहि ते  इतका इम्पॉर्टंट नाही आहे ....तू ते नंतर कर ....घरी सगळे वाट बघत असतील" ..... अर्जुन


"

मी घरी कळवले आहे,  मला उशीर होणार आहे" ....माही


"

माहि तू आज  लंच पण केला नाही आहेस...,. तुझ्या हाताला पण लागले आहे , राहू दे ते" .... अर्जुन


"

सर तुमचा प्रॉब्लेम काय आहे??.... आधी काहीच ऐकून घ्यायचं नाही...... आणि मग सगळ्यांसमोर रागवायचे......आणि मग  आपला राग काढण्यासाठी काहीतरी ही अशी कामे द्यायची.... .. तुम्हाला फार आवडतं ना असं पनिशमेंट द्यायला???....... सगळ्यांनाच आवडतं मला पनिशमेंट द्यायला.....  घरी ....बाहेर...तुम्ही...... देवाने सुद्धा काही कमी सोडले नाही आहे..... पण मी हरणार नाही...... लक्षात ठेवा तुम्ही...... मी हार मानणार नाही" .. बोलता-बोलता तिचा आवाज आता कापरा झाला होता..........


"

Shssss" ........अर्जुन

 

पण तिचं बोलणं कंटिन्यू सुरू होतं...

 

तिचं बोलणं त्याच्यावर हृदयाच्या आर पर गेले  होतं....... त्याच्या मनाला खूप लागलं होतं.....त्याने ऑफिसमध्ये नजर फिरवली ऑफिस मध्ये कोणीच नव्हतं सगळे घरी गेले होते........ तो तसाच तिच्या जवळ गेला आणि त्याने तिला खूप टाइट हग केले......पायाला लागल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते....... त्याने तिला त्याच्या दोन्ही हातावर त्याच्या मिठीत उचलून घेतले आणि तिला  आपल्या केबिनकडे घेऊन जात होता ...


"

सर.... तुम्ही हे काय करत आहात ???.....सोडा मला." ...... ती त्याच्या मिठीत स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत हलचल करत होती.....

 

त्याने तिला अजून घट्ट पकडले.... केबिनमध्ये येऊन तिला  सोफावर  बसवले....


"

चुपचाप बस इथे बिलकुल हलायचं नाही " .....अर्जुन.... त्यांनी कॅन्टीनमध्ये फोन करून जेवण ऑर्डर केले.....

 

पिऊनने जेवण आणून दिले..... आणि  चालला गेला....


"

माही जेवण कर" ..... अर्जुन


"

नाही....... मला नाही खायचं." ...... माही

 

अर्जुनने  आपल्या हाताने एक भाजी पोळीचा घास हातात घेतला आणि तिला भरवायला गेला....... महिने त्याच्या हाताला धक्का मारला........ त्याने परत हात तिच्या तोंडासमोर धरला........ तिने परत धक्का दिला....... असे  तीन-चारदा झालं.......तो शांतपणे तिच्याकडे बघत तिच्या पुढे घास धरायचा, आणि ती हात मारायची.


"

का त्रास देत आहात मला? ....... जाऊ द्या मला" .....माही


"

मला तुमची सहानुभूती नको आहे..... मला कोणाचीच सहानभूती नको आहे....... नका त्रास देऊ मला...... का माझ्या आजूबाजूला असता.... मला त्रास होतो तुमचा....... तुम्हाला कळत नाही आहे का,  तुम्ही आजूबाजूला  असलेले मला सहन होत नाही..... नका करू माझी इतकी काळजी..... मला सवय नाही ह्या सगळ्या गोष्टींची......मी जशी आहे तशी खुश आहे,  मी जशी जगत आहे तसच मला जगू द्या , नका प्रयत्न करू माझे आयुष्य बदलण्याचा.......... प्लीज दूर राहा  माझ्यापासून" .......... आता मात्र ती रडायला लागली होती...... तिच्या रडण्याने मात्र त्याच्या सुद्धा हृदयात दुखायला लागले....... त्याने तिला आपल्या कुशीत घेतले...... ती मात्र आता रडायला लागली होती.......त्याने तिला  अजून तिला घट्ट पकडले........तिच्या मनात खूप काही गोष्टी साचल्या आहे..... त्याला जाणवत होतं आणि म्हणून तो तिला रडू देत होता...... कदाचित रडून तिचा मन हलकं होईल असं त्याला वाटत होतं........ ती रडत  होती...... तो तिला अजून अजून अजून घट्ट पकडत होता......


"

I will stay away from you...... नाही देणार तुला त्रास....जे तुला आवडेल तसेच करेल.... don't cry now .....please"  ...... अर्जुन तिच्या डोक्यावर थोपटत  बोलत होता

 

थोड्यावेळाने तिला बरं वाटलं .....ती  त्याच्यापासून दूर झाली..... " सॉरी माझ्या लक्षात नाही राहिले "  .... माही


"

ठीक आहे..... आता पहिले जेवण करून घे" ......अर्जुन

 

माही त्याच्याकडे बघत होती....


"

मला खूप भूक लागली आहे....... मी सुद्धा आज लंच घेतले नाही....... चल जेव पटापट" ......अर्जुन केविलवाण्या चेहरा करत बोलला

 

माहीने त्याची प्लेट बनवली आणि त्याच्या हातात दिले....

 

जेवण आटपून माही घरी जाण्यासाठी म्हणून निघाली.... चालताना तिचा बॅलन्स गेला,  ती पडणार तेवढ्यात परत अर्जुन येऊन तिला सांभाळले....


"

मी सोडतो तुला घरी आज" ...अर्जुन


"

नको मी जाईल" .....माही


"

माही तुला चालायला सुद्धा त्रास होत आहे..... हट्ट करू नको" ..... तिचा हात पकडून तिला तो बाहेर पार्किंग जवळ घेऊन गेला आणि गाडीमध्ये बसवलं....... गाडीमध्ये शांतता होती...... माही खिडकीतून बाहेर बघत होती...... अर्जुन ड्राईव्ह करताकरता मधून मधून माहिकडे बघत होता....... त्याने एफएम सुरू केले.........

 

पल भर ठहर जाओ

 

दिल ये संभल जाए

 

कैसे तुम्हें रोका करूँ

 

मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए

 

आँखों में तुम को भरूं

 

बिन बोले बातें तुमसे करूँ

 

गर तुम साथ हो

 

अगर तुम साथ हो

 

तेरी नज़रों में है तेरे सपने

 

तेरे सपनों में है नाराज़ी

 

मुझे लगता है के बातें दिल की

 

होती लफ़्ज़ों की धोखेबाज़ी

 

तुम साथ हो या ना हो

 

क्या फर्क है बेदर्द थी ज़िन्दगी बेदर्द है

 

गर तुम साथ हो

 

अगर तुम साथ हो

 

पलकें झपकते दी दिन ये निकल जाए

 

बैठी बैठी भागी फिरूँ

 

मेरी तरफ आता हर ग़म फिसल जाए

 

आँखों एमीन तुम को भरूं

 

बिन बोले बातें तुमसे करूँ

 

गर तुम साथ हो

 

अगर तुम साथ हो

 

तेरी नज़रों में है तेरे सपने

 

तेरे सपनों में है नाराज़ी

 

मुझे लगता है के बातें दिल की होती

 

लफ़्ज़ों की धोखेबाज़ी

 

तुम साथ हो या ना हो

 

क्या फर्क है बेदर्द थी ज़िन्दगी बेदर्द है

 

अगर तुम साथ हो

 

दिल ये संभल जाए

 

अगर तुम साथ हो 

 

हर ग़म फिसल जाए

 

अगर तुम साथ हो  दिल

 

ये निकल जाए

 

अगर तुम साथ हो

 

हर ग़म फिसल जाए


मा

ही गाणं ऐकण्यात गुंग झाली होती.....घर आले तरी तिला समजलं नाही......


"

माही" ........अर्जुन


"

ह " ....... माही


"

घर आले"  ...... अर्जुन


"

अ........ हो" ....... म्हणत ती गाडीतून उतरली आणि जायला लागली....


"

माही" ........अर्जुन


"

ह ?" ........ माहीने अर्जुनकडे वळून बघितले


"

तुझी बॅग " ....... तिची बॅग देत तिला अर्जुन बोलला


"

थँक्यू"  ......माहीने  बॅग हातात घेतली आणि परत जाण्यासाठी वळली...


"

माही " .......अर्जुन

 

ती परत मागे वळली...

 

" I always there with you..... Anytime....everywhere .......Take care " ........ अर्जून

 

माहीने फक्त मान हलवली आणि ती आत मध्ये निघून गेली......माही आत मध्ये जाईपर्यंत अर्जुन तिथेच उभा होता...... ती आतमध्ये गेलेली बघून तो पण तिथून निघून गेला....

 

*****


"

जाऊ की नको....... बोलू काय सरांसोबत??..... ऐकतील का सर???......की ओरडतील???....."

माही अर्जुनच्या केबिन पुढे उभी काहीतरी विचार करत होती.....


"

मॅडम झाल्या नॉर्मल" .........अर्जुन तिला त्याच्या केबिन समोर बघून मनातच हसत बोलला.


"

माही तू आत मध्ये येऊ शकते" .....अर्जुन

 

अर्जुनच्या आवाजाने माहि भानावर आली आणि आतमध्ये गेली..


"

बोल काय काम आहे?" .....अर्जुन


"

सर मला जुन्या ऑफिसमध्ये परत पाठवून द्या " ......माही


"

का........?".... अर्जुन


"

सर मी तिकडे राहील तर सगळं नॉर्मल राहील...... समोरासमोर आलो कि उगाच आपली वादावादी होते........ माझ्यामुळे तुम्हाला त्रास होतो,  मला कळते आहे " .......माही


"

तुला जास्तीचे  सगळं कळते...... जे कळायचे ते मात्र कळत नाही...... इथे तुला प्रमोशन भेटले आहे.... तुझ्या करिअरच्या दृष्टीने येथे सगळे व्यवस्थित आहे..... प्रत्येक गोष्ट पर्सनल लेव्हलवर जाऊन विचार करायची नसते..... आणि काल मी तुला बोललो आहे की मी तुझ्या दूर राहील.... तुला त्रास होईल असं काही वागणार नाही" ......अर्जुन


"

पण सर" .....माही


"

मी बॉस आहे .... कोण कुठे राहणार ते मी डिसाईड करेल...... तू जाऊ शकते आता" .......अर्जुन फाईलमध्ये डोकं घालत बोलला

 

ती मान खाली.  घालून वळली आणि जायला निघाली..... तिची ओढणी ओढली गेली....


"

सर?" ......... ओढणीला गळ्याजवळ पकडत ती मागे वळून ओरडली..

 

तिच्या आवाजाने अर्जुनने मान वरती केली आणि तिच्याकडे बघत होता......


"

सर जे बोलता,  ते वागत पण जा...... नुसतच बोलायचं म्हणून  बोलत असतात तुम्ही...... आत्ताच बोलले नी आत्ताच विसरले....... म्हणून मला जुन्या ऑफिसमध्ये जायचं होतं....... तुम्ही बदलणारे नाहीत....... तुम्हाला जे वाटते तेच तुम्ही करता...... स्वार्थी आहात तुम्ही" .........माही


"

व्हॉट.....?... मला पण कळलं , तू पागल होतीस आणि पागल राहशील.....बावळट" ......अर्जुन


"

काय....? ..... पागलपणा तुम्ही कराल आणि मला बोलता?" ....... माही डोळे मोठे करत बोलली


"

माही.....mind your language....... तू कोणाशी बोलत आहे आधी बघत जा " ........अर्जुन चिडत बोलला


"

उगाच बडबड करते तू..... तुझी फालतू बडबड मी ऐकणार नाही" ....अर्जुन


"

मी फालतू बडबड करते??..... माझी ओढणी का पकडली ??" ..... माही


"

व्हॉट....?" ..अर्जुन..

 

डोळे आहेत ना??? मग डोळ्यांचा वापर कर...... डोक्याचा तर वापर करत नाही तू" .....अर्जुन डोळ्यांनीच तिला खाली बघायचा इशारा केला

 

तिची ओढणी खाली टेबलजवळ अटकली होती...... आता मात्र माहीची  घाबरगुंडी उडाली....


"

माही तू खरच पागल आहे..... सर म्हणतात ते काही खोटं नाही...... तुझं डोकं टाळ्यावरच नसते कधी...... नाही तिथे नको ते बोलून जाते." ...... ती  हाताने ओढणी  ओढत मनातच बोलत होती.... अर्जुन तिच्याकडे अजीब नजरेने बघत होता


"

माही पळ इथून सर परत भडकायच्या आधी" ...... तिने  तिची  ओढणी थोडी जोरात  ओढली...... तिच्या ओढणीचा काठ फाटलं......


"

माही मी तुला खाणार नाही आहो" .......अर्जुन


"

तुमचा काही भरोसा नाही"  .....माही ओढणी हातात घेऊन पळायला लागली आणि समोर जाऊन दरवाजाला धडकली....


"

माही आता जर थोडसुद्धा नुकसान झालं ना ऑफिसच तुझ्यामुळे ......तर मी तुझ्या पगार  मधून पैसे कट करेल" ....अर्जुन

 

तिने एकदा अर्जुनकडे बघितलं आणि दार उघडून बाहेर पळाली.....

 

*****


"

आज घर शांत शांत वाटत आहे??.........काय झालं तुमची गोंधळ घालणारी मेन बॉस  दिसत  नाही आहे ?" ...... अर्जुन खाली सगळे शांत बसलेले बघून बोलला


"

अर्जुन , मला तर कळत नाही तुला तिच्या येण्याचा प्रॉब्लेम आहे की तिचा न येण्याचा प्रॉब्लेम आहे??...... गोंधळ केला तर का गोंधळ करता , शांत असले तर का शांत असता?" .......सोनिया


"

अरे हो ...हो ....मी सहज विचारत होतो?" ...... अर्जुन


" मीराला

बर नाही म्हणून आज ती आली नाही आहे " ....आई


"

काय.???......काय झालं??" ....अर्जुन


"

काही नाही जास्ती.....ताप आहे म्हणाली....ठीक आहे"  ....आई


"

Okay." ...... अर्जुन

 

अर्जुनने  माहिला फोन करून मीरा बद्दल चौकशी केली....


"

अंकल मला ताप आला....... तू येतो का मला खूप बोर झालं???...... ही माऊ आणि ताई माई मला खेळू सुद्धा देत नाही आहे...... तू येतो का मला तुझी आठवण येते आहे??........ तू गोष्ट सांगतो का मला येऊन??" ......मिरा अर्जुन सोबत फोनवर बोलत होती..


"

हो पिल्लू येतो मी...... तू जेवून घे आणि औषध पण घे म्हणजे तुला मी येईपर्यंत छान शक्ती येईल,  मग आपण मस्त गप्पा करू आणि खेळू" ...... अर्जुन


"

सर ठीक आहे ती ......अशीच बडबड करत आहे" ......माही


"

It's okay..... आम्ही येतो संध्याकाळी" .....अर्जुन


"

सर तुम्हाला काम असतील,  असू द्या" ......माही


"

मला काम आहे की नाही आहे हे तू ठरवणार  आहे का आता?" .......अर्जुन


"

नाही तसे नाही" ........माही


"

मीराला सांग अंकल येतोय म्हणून" ...... अर्जुन ने बोलून फोन ठेवून दिला

 

अर्जुन आणि आकाश दोघेही  मीराला भेटायला म्हणून त्यांच्या घरी गेले....... त्यानिमित्ताने आकाशला अंजलीसोबत भेटता आले.....

 

अर्जुन दिसल्याबरोबर मीराने त्याच्या अंगावर उडी मारली,  त्यांनासुद्धा तिला कडेवर उचलून  घेतले...... ते बघून आकाश आश्चर्यचकित झाला.......

 

अर्जुन मिरा सोबत खूप गप्पा करत होता..... तो तिच्यासाठी खूप सारे खेळणे घेऊन गेला होता...... ते सगळं बघून मिराला खूप आनंद झाला होता ..... अर्जुन आणि मीरा  तिच्या रूम मध्ये गप्पा करत खेळत बसले..... तसे पण अर्जूनला या बाकी मोठ्या लोकांमध्ये गप्पा करण्यामध्ये काहीच इंटरेस्ट नव्हता..... तो फक्त मीरासाठी तिथे गेला होता......

 

माहीचे  अधून मधून त्या दोघांना बघणं सुरू होतं...... ति लपून छपून त्यांना बघत होती....... मीराचा आनंद बघून तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले.. पण लगेच तिला वास्तवाची जाणिव झाली...

 

मीरा त्याला घरी जाऊ देत नव्हती...... अर्जुन बराच वेळ तिथे थांबला होता .... मीरा झोपल्यावर ते घरी जायला निघाले..... आकाश अंजली सोबत बोलत होता.


"

सर तुम्ही असं मीराच्या खूप जवळ येऊ नका...... तिला सवय नाही....... नंतर मग त्रास होईल" ......माही


"

काय.....?" ..... अर्जून


"

सर आता तुमचं लग्न होईल ....तुमचे मुलं होतील...... तुम्ही नेहमी नेहमी असं मीराला भेटत राहिला तर तिला तुमची खूप सवय होईल आणि मग नंतर ती आठवण काढत राहील...... त्रास होण्याआधीच काळजी घेतलेली बरी ना" ...माही


" You shut up Mahi ,

मीरा आता माझी सुद्धा फॅमिली मेंबर होणार आहे...... सो मी तिला कधीही भेटू शकतो आणि ती सुद्धा मला कधी भेटू शकते....... कळले???....... हे बघ मला तुझ्याशी वाद घालण्यात काहीही इंटरेस्ट नाही आहे....... मी काय करायचं काय नाही करायचं ते मला तू शिकाऊ नको...... it's better नेक्स्ट टाईम मला हे असले विषय नको आहेत...... मिराची काळजी घे" .... तो गाडीमध्ये जाऊन बसला आणि आकाशची वाट बघत होता....

 

अर्जुन ला गेले बघून आकाशने सुद्धा अंजलीला बाय केले आणि तो गाडीमध्ये जाऊन बसला...


"

भाई it's magic" ....... आकाश

 

अर्जुनने कसेनुसे चेहरा करत त्याच्याकडे बघितलं...


"

भाई तू बदलतोय" .....आकाश


"

Oh come on Akash" ..... अर्जुन

 

मीरा आता आपली पण फॅमिली मेंबर आहे .....आपण पण तिची केअर करायला हवी....and she is very sweet girl.....

 

******

क्रमशः

******

 

 

 

 

 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️