तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 26

माही अर्जुन

भाग   26

माही काम आटोपून घरी जायला निघाली होती ....तेवढ्यात सोनियाने तिला आवाज दिला.

" माही एक मिनिट ये रूम मध्ये" .... सोनियाने  नाराजीच्या सुरात माहीला  आवाज दिला. 

" काय झालं सोनिया म्याम???...आणि तुम्ही तर आता बाहेर जायला हवं होतं .....तुम्ही इथे काय करत आहात?" ..... माही सोनियाच्या रूम मध्ये येत बोलली..

" तोच तर इशू झाला आहे..... अर्जुन आधी डिनर डेट साठी हो बोलला होता..... आता मध्येच काय त्याचं काम निघाल आहे , की आता तो नाही म्हणतोय"  .....सोनिया

" काय ......आज तर संडे आहे , आज कोणतं काम निघालं.?" ... माही

तु" ला माहिती आहे ना अर्जुन पटवर्धन,  त्याला 24*7 फक्त काम असतं काम असतं.." .....सोनिया

"ह्म्म.... ते पण आहे..... पण करू तरी काय शकतो ना...... तुम्हीच तर निवडले एवढ्या अनरोमॅण्टिक व्यक्तीला....... भोगा आता" .......माही

" हो ना यार आता काय करू?"  ..........सोनिया सॅड होत बोलली

" विचार कर ना काही .....काहीतरी आयडिया दे.?" ..सोनिया

" तुमचे ते अर्जुन सर आहेत ना  त्यांच्यापुढे कोणाच्याच आयडिया चालत नाही..... आतापर्यंत आपण किती आयडिया केल्यात .....त्यांनी सगळ्यांवर पाणी फिरवलं" ...माही

" हो ना ... He is so smart ..... म्हणून तर आवडतो तो  मला" .....सोनिया

" मग झेला त्यांच स्मार्टनेस" ..... माही हसतच बोलली

" तुला इथे हसायला येत आहे...... माझा किती हिरमोड झाला" ......सोनिया

" माझ्याकडे एक आयडिया आहे तुमचा मूड ठीक करायचा..... " माही 

****

सोनियाचे आई-वडील काही कामाने देशाच्या बाहेर गेले होते..... घरी एकटं काय राहायचं म्हणून आजीने तिला तिकडे शांतीसदन मध्ये राहायला बोलावले होते.... त्या निमित्ताने ती घरातल्या रितीभाती सुद्धा शिकेल आणि एकटीला राहायचं सुद्धा काम पडणार नाही असे आजीला वाटत होते...

अर्जुनने सोनियाला बाहेर डिनरला जायचे प्रॉमिस केले होते...,ऍक्च्युली त्याला जायचं नव्हतं पण घरच्यांनी सगळ्यांच्या बोलण्यावरून आणि सोनिया सुद्धा त्याच्या खूप मागे लागली होती.... म्हणून तो रेडी झाला होता.... पण त्याचे ऑफिसचे काही महत्त्वाचे काम आले आणि तो कामात मग्न झाला आणि तो पूर्णपणे डिनरचे  विसरला होता..... त्यामुळे सोनियाचा हिरमोड झाला होता...

अर्जुनचे  ऑफिसचे  काम सुरू होते .... काही आवाजामुळे त्याचे  कॉन्सन्ट्रेशन जात होते........ त्याला कसलातरी गाण्यासारखा आवाज येत होता,  म्हणून तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला..... त्याने दरवाजा उघडून बघितला तर तो तिथेच अचंबित होऊन उभा ही होता..

हा भार सोसेना

जड झालाय पिकावानी

अंगात ज्वार भरलं

तुझ्या प्रितीच पाज पाणी

घुमाजी राव माझा सांगा

होणार का धनीरात्रीला 

झोप नाही दावी लाव्तीया 

पापणीचंद तु पुनावाचा

तु ग रूपान गोजिर वाणी

जीव माझा जळतोया 

होत काळजाचं पाणी पाणी

कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली....

महिने नाचायला सुरुवात केली...... सुरुवातीला सोनिया नाही नाही म्हणत होती...पण नंतर हळू हळू माहिला बघून तिच्या अंगात पण यायला लागलं आणि दोघे मिळून धमाल डान्स करत होत्या.... 

माही आणि सोनिया पूर्णपणे नाचात मग्न झाल्या होत्या.... त्यांचे बेडवर उड्या मारणं सुरू होतं..... त्या बेडवर चढून कुशनसोबत डान्स करत होत्या..... उशांची हालत पूर्ण खराब करून टाकली होती..... तिच्यातलं कापूस उडवत उडवत डान्स मध्ये रमल्या  होत्या..... तेवढ्यात माहिचे  लक्ष समोर दारात उभा असलेल्या अर्जुनकडे गेले..... तो रागाने बघत होता... आणि त्याला बघून ती नाच करायची थांबली..... आणि सोनियाला सुद्धा हाताने इशारा करत होती आणि ती बेडच्या खाली उतरली...

" काय यार माही...... किती मजा येते आहे , तू काय थांबली तिकडे?"  ..... सोनिया तिचा हात ओढत बोलली......

" सोनिया मॅम ....सोनियामॅम " .....म्हणती सोनियाला डोळ्यानेच अर्जुनकडे बघ असा इशारा करत होती.... सोनिया मात्र आपल्यास तालात नाचत होती

" Stop it"  ...... अर्जुन जोराने ओरडला कशी सोनिया शांत उभी झाली ....

" हे काय चाललंय......अर्जुन माहीकडे एक कटाक्ष टाकत सोनियाला बोलला

" अर्जुन ...come on...you also join us ...it's very refreshing ...... तुझं पण स्ट्रेस कमी होईल" ....सोनिया

अर्जुनला रागात बघून माहीने हळूच तिथून कल्टी मारली.... ती हळू हळू भिंतीजवळ सरकत सरकत दारा जवळून बाहेर गेली ..

" हे एक कार्टून कमी होतं...... की तू पण सुरु केलं....... आणि हे काय अवतार केला आहे ...हे काय कपडे घातले आहे ....... तुलाही तिच्यासारखं मिडलक्लास बनायचे आहे का?" ..... ....अर्जुन बराच चिडला होता   ..त्यांच्या आवाजाने त्याच्या कामात त्याला खूप डिस्टर्ब होत होते.... आणि त्यात त्या दोघींना अशा अवतारात बघून त्याचा राग अनावर झाला आणि तो मनाला येईल तसं बोलत होता

सोनियाने सुद्धा माही सारखा सलवार कुर्ता घातला होता,  तिच्यासारखी वेणी वगैरे घातली होती.....

" जा...चेंज कर." ....म्हणत अर्जुन त्याच्या रूमकडे  परत जायला निघाला तेवढ्यात पुल साईडचा  दरवाजातून त्याच्या हाताला पकडून कुणीतरी त्याला ओढले... तो पण बेसावध असल्यामुळे तिकडे ओढला गेला....

माहीने त्याला ओढून एका कोपऱ्यात नेले होते..... 

" काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा middle-class होण्याचा??...... स्वतःचं आयुष्य सन्मानाने जगायची हिम्मत ठेवतो........ वाट्टेल ते कष्ट करायला तयार आहोत..... आम्ही प्रामाणिकपणे आपले आयुष्य जगतो.......मिडल क्लास आहे म्हणजे काय आम्हाला मान-पान काही नाही काय? ...आम्ही जगायचं नाही काय की आम्हाला जगायचे काही अधिकार नाहीत??...... आणि हे सांगणारे तुम्ही कोण होता???..... तुम्ही समजता काय स्वतःला.???....... तुमच्याजवळ पैसे आलेत.... तुम्ही श्रीमंत झालेत म्हणून तुम्ही काहीही करू शकता???...... आणि काय वाईट आहे माझ्या कपड्यांमध्ये??....... माझ्या अवतारामध्ये??" ........ माही खूप रागात होती.... ती अर्जुनला त्याच्या छातीवर दोन्ही हाताने ढकलत ढकलत  रागाने त्याच्याकडे बघत पुढे पुढे जात होती..... तिचा तसा अवतार बघून अर्जुन सुद्धा मागे मागे जात होता........ आणि मागे भिंतीला जाऊन धडकला,  आता त्याला मागे जायला  जागा नव्हती,  तो तिथेच उभा राहून एकटक माहिला बघत होता.... तो पहिल्यांदाच महिला असा बघत होता... त्याने तिला middle-class म्हटल्यामुळे तिला खूप राग आला होता,  ते वाक्य तिच्या डोक्यात गेलं होतं . 

" How dare are you to touch me like this?  ....माझा बोलायचा तसा अर्थ नव्हता......मी फक्त तिला एवढेच सांगत होतो की तू आणि ती वेगळी आहे" .......अर्जुन तिच्या डोळ्यात बघत बोलला

" इतकाच राग येतो ना माझा,  नाही येणार मी तुमच्यासमोर..... पण परत असं काहीही बोलायची हिम्मत करू नका." .........माही

" अरे बाबा माझा असं बोलायचा अर्थ नव्हता....... तेव्हा मी कामाच्या लोड मध्ये होतो.....मे बी चुकून निघाले असेल काही" ..... तो तिचा हात पकडत बोलला

" मला स्पर्श सुद्धा करायचा नाही......... माझ्या दूर राहायचं हा." ...... माहीने त्याचा  हात झटकला

" माही हे बघ तू माझ्यासोबत अशी  बोलू शकत नाही...... मी तूला सांगतोय ना माझा तसा काहीच अर्थ नव्हता" ........ बोलतच तो पुढे पुढे येत होता...... त्याला पुढे येताना बघून आता माही मागे मागे जात होती....

" हे बघा माझ्या जवळ येऊ नका.... मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे" ....माही

" येईल .......काय करशील?" ......अर्जुन पुढे जात होता

आता मात्र माहिला मागे  जायसाठी जागा नव्हती , ती पुलाच्या एकदम काठावर येऊन उभी होती...... एक जरी  पाय तिने मागे टाकला तर ती स्विमिंग पूलमध्ये पडली असती....ती तेथेच उभी राहिली आणि केविलवाण्या नजरेने अर्जुनकडे बघत होती...... " राग तर आपण खूप दाखवला... पण आता काय करायचं फसलो  ना.... आता कशी निघून इथून." .... ती मनातच विचार करत होती

आता मात्र त्याला तिला तसे बघून  तिची मस्करी करायची इच्छा झाली...... आणि तो अजून थोडा पुढे गेला....

" खबरदार हा मिस्टर अर्जुन पटवर्धन पुढे आला तर? " ..... ती हात पुढे करत  एक बोट दाखवत त्याला बोलत होती..... 

" खूप छान वाटले माझं नाव तुझ्या तोंडून ऐकून.....तर काय करणार मिस माही देसाई..... इथून कसे निघाल..... तुम्हाला माझी मदत तर घ्यावीच लागेल" ......अर्जुन मस्करी करत  बोलला

" मदत आणि तुमची......पूर्ण दुनिया बुडाली आणि तुम्हीच उरले ना,  तरीसुद्धा मी तुमची मदत घेणार नाही" ..... ती तोंड वाकडं करत बोलली

त्याने परत एक पाऊल पुढे केलं..... आता तो तिच्या खूप जवळ आला होता..... आणि ती  हळूहळू आपला पाय मागे करत होती.... आणि या सगळ्यात तिचा बॅलन्स गेला.... आणि ती पाण्यात पडणारच होती की त्याने तिच्या हाताला धरून घेतलं.... ती मात्र तशीच अर्धी वाकली होती..... आणि अर्जुनकडे बघत होती...... अर्जुन मिश्कीलपणे तिच्याकडे बघत होता

" बोल आता .....आता सुद्धा नको आहे तुला माझी मदत?" ....अर्जुन

"नाही" .....माही

" ठीक आहे...... मग सोडतो मी हाथ" .....म्हणत त्याने त्याचा हाथाच एक बोट ओपन केला...

" आता आपल्याला कोणी वाचवू शकत नाही" या भावनेने तिने डोळे बंद करून घेतले...." बाप्पा वाचावं" 

आणि थोड्याच क्षणात तिला जाणीव झाली की ती  कोणाच्यातरी मिठीमध्ये आहे ....

अर्जुनने तिला घाबरवले होते ....पण तिच्या हाताला पकडत स्वतःकडे ओढले होते.... आणि माही त्याच्या अंगावर आदळली होती.... तिने घाबरूनच एका हाताने त्याच्या कॉलरला पकडले होते आणि एका हाताने त्याच्या कमरेत हात घालून उभी होती.

तो मात्र दोन्ही हात खिशात घालून उभा होता.....

" मी काही तुझा  नाही आहे,  ऑल टाईम बिलगून उभ राहायला...... हा पण तुझी इच्छा असेल तर तू या शोल्डर ला तुझा परमनंट एड्रेस बनवू शकते" .......अर्जुन मस्करी करत बोलला. 

त्याच्या आवाजाने ती भानावर येत लगेच आपला कॉलरचा हात सोडत ती त्याच्या दूर झाली....

" तुम्ही आज मला खूप दुखावले आहे..... आता मी तुमच्या आजूबाजूला ...समोर सुद्धा येणार नाही" .... माही तिथून निघून गेली

त्याने डोक्यावर हात मारून घेतला.......

सगळे खाली हॉलमध्ये जमले होते...

फोनवर काही बोलून आजीनी फोन ठेवला

"एक खूश खबर आहे" .......आजी

सगळ्यांचे कान आजीच्या बोलण्याकडे टवकारले....

" आत्ताच माझं महाराजांसोबत बोलणं झालं...... त्यांनी एंगेजमेंट साठी आणि लग्नासाठी शुभ मुहूर्त सांगितले आहे....... इंगेजमेंट दिवाळीच्या दहा दिवसानंतर आणि लग्न जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात" .....अजी

"काय.???.....yipiee" .... आकाश ओरडला..... ओरडता ओरडता त्याचे लक्ष त्याच्या आईकडे गेले आणि तो शांत बसला....

माही अर्जुनकडे बघत होती..... अर्जुनचे सुद्धा लक्ष माही कडे गेले..... माहीने त्याला बघून मान वळवून घेतली. 

" पण आजी लग्नाचा मुहूर्त जरा उशीराच नाही का??..... होणारे  आकाश??"  .....अनन्या आकाशाकडे बघत त्याला  चिडवत बोलली

" हो ना ताई खरं आहे." ....आकाश

" What?........it's too early......... आपण खूप घाई करतोय असं नाही वाटत आहे काय??...... म्हणजे आत्ता आत्ताच तर भेटली आहे हे आकाशान नी  अंजली.... यांना एकमेकांना समजून घ्यायला वेळ नको का द्यायला?" ..... अर्जुन

त्याच्या या बोलण्यावर सगळे त्याच्याकडे डोळे मोठे करत उभे होते..

" हे एवढं समजदारीने  कोण बोलतोय?" .......आई

" सगळं क्रेडिट सोनियाला जायला पाहिजे.... अर्जुन बदलतोय हा" ..... मामी त्याची खेचत गम्मत करत बोलली

या वाक्यावर सोनिया मात्र गोड लाजली...... अर्जुनचे  मात्र सगळं लक्ष्य माहीवर होतं... तिचे  प्रत्येक मिनिटामिनिटाला बदलणारे एक्स्प्रेशन तो बघत होता....

" ओsss..... सोनिया वहिनी sss..... किती गोड लाजते आहे" ........अनन्या तिच्या खांद्याला आपल्या खाल्ल्याने धक्का देत बोलली

सोनियाने  आपल्या दोन्ही हातांमध्ये आपला चेहरा लपवून घेतला....

" चला चला एक तर सुनबाई आहे इथेच,  दुसऱ्या सुनबाईला आणायची तयारी करूया" .....अनन्या....  

त्यांनी ही न्यूज सांगायला अंजलीला  व्हिडिओ कॉल लावला.....तसा आता आकाश ब्लश करायला लागला.....

मोठे लोक तिकडे सोनियाच्या घरी आणि अंजलीच्या घरी कळवायला म्हणून दुसऱ्या रूम मध्ये गेले. 

इकडे सगळ्यांचे एकमेकांना चिडवणं सुरू होतं.....

" कुठे फसलो मी इथे" ....अर्जुनने दोन्ही हात त्याच्या चेहऱ्यावरून डोक्यावरून फिरवला आणि हताशपणे सगळ्यांना बघत होता

सैय्याँ छेड़ देवे, 

ननद चुटकी लेवे

ससुराल गेंदा फूल

सास गारी देवे, 

देवर समझा लेवे

ससुराल गेंदा फूल

छोड़ा बाबुल का अंगना

भावे डेरा पिया का हो

सास गारी देवे...

सैय्याँ हैं व्यापारी,

चले हैं परदेस

सुरतिया निहारूँ, 

जियारा भारी होवे

ससुराल गेंदा फूल

सास गारी देवे...

बुशट पहिने, 

खाईके बीड़ा पान

पूरे रायपुर से अलग है

सैय्याँ जी की शान

ससुराल गेंदा फूलसैयां छेड़ देवे...

श्रियाने dj suru केले आणि सगळे धमाल मस्ती करायला लागले..... सगळे एक गोल धरून एकत्र त्यामध्ये नाचायला लागले

माही मात्र त्यांच्यापासून दूर एका जागेवर उभी होती....तिच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या होत्या.. पण त्या ती सगळ्यांपासून लपवत होती... आणि तिने त्या हलकेच पुसून घेतल्या... 

तिकडे तिच्या अपोझिट साईडला अर्जुन उभा होता..... का माहिती नाही पण त्याचा सुद्धा हृदयात  दुखत होते....

अनन्या आणि श्रेयाने त्या दोघांना आत मध्ये नाचायसाठी ओढले.... तसे ते दोघे एकमेकांवर आदळले...... बाकी सगळे वाचण्यात गुंग झाले होते...... अर्जुन मात्र एकटक महिला बघत होता......माही मात्र चेहऱ्यावर स्माईल आणत सगळ्यांकडे  बघत होती...... आणि हाताने टाळ्या वाजवल्यासारखे करत त्यांच्या मस्ती मध्ये शामिल झाली होती..... तिला असे आनंदी बघून आता मात्र अर्जुनचा त्रास  अनावर झाला होता....कोणाचे लक्ष नाही बघुन त्याने तिच्या हाताला पकडून तिला ओढतच बाहेर मागच्या साईडला घेऊन गेला..... आणि तिला  भिंतीवर भिरकावलं....... आणि तिच्या अगदी जवळ जाऊन दोन्ही हात तिच्या आजूबाजूला भिंतीवर टेकवत रागाने तिच्याकडे बघत होता.

" का करते आहेस असं..... सांग ना.....? ..... मी काय वाईट केलं तुझे? ... का त्रास देते आहेस मला.?" ........ त्याला बोलतांना सुद्धा त्रास होत होता...

" अर्जुन सर प्लीज बाजूला व्हा....मला उशीर होतोय ....मला घरी जायचं" .....माही 

" माही काय प्रॉब्लेम आहे तुझा??..... प्लीज सांग ना??....... मी सगळं ठीक करेल" .....अर्जुन

" ............"  माही चुपचाप उभी होती. 

" मी हे लग्न करणार नाही .....मी आत्ताच सोनियाला जाऊन सांगतोय" .....अर्जुन

" सर तुम्ही असं काहीही नाही करणार आहात...... सोनिया मॅडम परफेक्ट मॅच आहे तुमच्यासाठी" ......माही

" माझ्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात कुठलाच आनंद भेटणार नाही आहे...... प्लीज माझ्या पासून दूर राहा....... मी कुणाच्या आयुष्यात आनंद घेऊन जाऊ शकत नाही....... माझ्या ताईचं लग्न जमल आहे....,. तिचा आनंद मला घालवायचा नाही आहे........ माझ्या घरचे खूप खुश आहे..... मी त्यांना दुःखात बघू शकत नाही...." ..... माही 

" तुम्हाला माझ्यासारख्या मिडलक्लास मुलीसाठी असं वागणं शोभत नाही" ......माही

" Oh...yaar तू अजूनही तेच डोक्यात घेऊन बसली आहेस." .......अर्जुन

" सर तुम्हाला माझी शपथ आहे , तुम्ही लग्न मोडणार नाही" ..... माही

" मी हे असं काही मानत नाही" ....अर्जुन

" सर तुम्ही जर असं काही केलं तर मी खरंच तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यातून दूर कुठे तरी निघून जाईल...... आणि कधीच परत येणार नाही" ....... ती ठामपणे त्याच्या डोळ्यात बघत बोलली..

" तु मला धमकी देतेस..... समजते काय ग स्वतहाला??...... निघायचं इथून आणि माझ्या डोळ्यासमोर यायचं नाही...आता तर बघ मी सोनिया सोबत लग्न सुद्धा करेल आणि तिच्या सोबत खुश सुद्धा राहून दाखवेल" ....

आता मात्र अर्जुनचा राग अनावर झाला होता........त्याचा ईगो तिने दुखावला होता. 

" थँक्यू" ....... माहीने छोटीशी स्माईल दिली आणि ती तिथुन निघाली....

******

" अर्जुन सर,  प्लीज माझ्या कडून काहीच अपेक्षा ठेवू नका...... मला त्या हयवानाने कोणाच्याच लायक सोडलं नाही...... मी कोणाशी लग्न करू शकत नाही..... मला माफ करा सर,  वारंवार मला तुमचं मन दुखवावे लागते..... मला तुमचा त्रास कळतो आहे....पण मी काय करू माझ्याकडे दुसरा कोणताच पर्याय नाही....... आता फक्त मला माझ्या ताईचं सुख हवे आहे बाकी काही नाही" ....... माही बेडवर पडल्या पडल्या विचार करतच झोपी गेली. 

" मी खरच तिच्या प्रेमात पडलो आहे .... आई बरोबर म्हणत होती प्रेमात पडलं की कळेल सगळं...... पण तिला का कळत नाही आहे...... का तिला  माझे प्रेम कळत नाही आहे माही...,. अशी कशी तू मला धमकी देऊ शकतेस..... मी पाहिजे ते काही पण करु शकतो...... पण मला तुझा मन दुखवुन काही करायचं नाही आहे म्हणून मी चूप आहो" ..... बेडवर पडल्या पडल्या त्याच्या डोक्यात विचार सुरु आले आणि डोळ्यातून एक पाण्याचा थेंब खाली ओघळला..... पहिल्यांदा तो कोणाच्या तरी इतक्या प्रेमात पडला होता.....

*******

क्रमशः

*******

नमस्कार मित्र मैत्रिणींनो 

नवीन वर्षाच्या आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा . 

धन्यवाद 

🎭 Series Post

View all