Jan 22, 2022
प्रेम

तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 25

Read Later
तू ही रे... कसं जगायचं तुझ्याविना 25

भाग 25

आज आजीने  घरी सत्यनारायणाची पूजा ठेवली होती.... खूप दिवसांनी घरात आनंदाची न्युज आली होती.... आकाश आणि अर्जुनचे  लग्न  जुळल्यापासून  घरात काहीच शुभ कार्यक्रम झाला नव्हता,  म्हणून आजीने पूजेचे आयोजन केले होतं...... माही आणि सोनियाच्या घरच्यांना बोलावलं होतं .... त्या निमित्ताने ओळख सुद्धा वाढेल आवडी-निवडी सुद्धा कळेल ... आणि तेवढेच एक प्रकारचे  गेट-टुगेदर होईल असा प्लॅन त्यांनी केला होता..

" अग काय सारखे सारखे साडी घालायला लावते  .माझे थोडी लग्न जमले आहे....जीचे जमले तिला सांग  ना घालायला ......माझ्या काय नेहमी मागे लागते?" ..... माही

" हे बघा लग्न कुणाची जमलं असू द्या.... आपण आपल्या मुलीच्या सासरी जात आहोत आणि तिथे पूजा आहे आणि पुजेमध्ये आपण नेहमीच आपले साडी वगैरे घालतो... ते मला काही माहिती नाही,  मला तुम्ही दोघांनी साडी घातलेली हवी आहे" .....आई

माही आणि अंजली साडी घालून तयार झाल्या..... अंजलीने छान सिल्कची काठापदराची साडी घातली होती,  मात्र माहीने सिम्पल शिफॉनची  लाईट आकाशी कलरची साडी घातली होती तसेच मॅचिंग ब्लाऊज..... हातात कडं गळ्यामध्ये चेन त्यात लॉकेट कानांमध्ये आकाशी कलरचे स्टड.... तसेच मॅचिंग टिकली डोळ्यात काजळ ....मेकअप केला नव्हता... त्या सध्या लूक मध्ये ती खूप सुंदर दिसत होती.... अंजलीने पिवळी जांभळे काठ असलेली साडी घातलली होती...... मीराला सुद्धा तिने  परकर पोलके घालून दिले होते... मीरा त्या वेषात खूप गोड दिसत होती...

सोनीया सुद्धा  चॉकलेटी कलरची हेवी वर्कची साडी घातली होती ...ती पण खूप सुंदर दिसत होती , मात्र तीला साडी फार काही सांभाळता येत नव्हती.  तिला अशी साडी घालून मिरवायची कधीच सवय नव्हती , त्यात वर्कची  साडी म्हणजे तिला फार भारी झाली होती..... तरीसुद्धा अर्जुनच्या घरी सगळ्यांना आवडते म्हणून ती त्यांना आवडेल अशा गोष्टी माही कडून शिकत होती...

सगळेच लोक शांतीसदन   पोहोचले होते.... घरी सगळी पूजेची छान तयारी केली होती.... सगळं घर फुलांनी सुशोभित केले होते...... सगळी पारंपारिक वेशात तयार झाले होते फक्त अर्जुन सोडून.... अर्जुनला असे ट्रॅडिशनल कपडे कधी आवडायचे नाही त्यामुळे त्याने आपला साधा कॉटन चा लाईट आकाशी फिटिंग शर्ट आणि जीन्स घातला होता..त्यात तो फारच हँडसम  दिसत होता.. योगायोगाने माही आणि अर्जुनचे कपडे मॅच झाले होते.....

" अरे वाह आज छोटे पिल्लू खूप गोड दिसत आहे"  ...आई मिराचे  गाल पकडत म्हणाली.....

" मी मिरा आहे"  .......मिरा

" अरे हो मी तर विसरलेच..... मीराला पिल्लू म्हणटलेले आवडत नाही" ....आई हसतच म्हणाली

माहीच्या आईने काही प्रसाद बनऊन आणला होता .... त्यांनी तो नलिनीच्या हातात दिला...

मामी मात्र नाराजितच होती.....पण आजीने डोळे दाखवले म्हणून चुपचाप होती...

आकाश आणि अंजली खूप खुश होते....एवढ्या सगळ्या लोकांमध्ये त्यांचे  एकमेकांना चोरून बघणे आणि लाजन सुरू होतं..... माहीचे त्यांना अधून मधून चिडवणे सुरु होतं... मीरा आणि रुही दोघी खेळण्यात मग्न होत्या....

आजीने माहीचा घरच्यांची ओळख सोनियाचा आईवडिल सोबत यांना करून दिली ...ते लोक एंगेजमेंटचा गोष्टी करत बसले होते......

आकाश आणि अंजली दोघं सोबत गप्पा करत होते,  एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेत होते...... तिकडे सोनिया सुद्धा अर्जुन सोबत गप्पा करत होती..... ती त्याच्या समोर उभी होती...

" अर्जुन मी कशी दिसते आहे?? .....आज फर्स्ट टाइम मी साडी घातली आहेत .... तू काही सांगतच नाही" .....सोनिया

" ब्युटीफूल" ...... अर्जुन बोलत तर सोनिया सोबत होता मात्र त्याची नजर माहीवर स्थिरावली होती..... आणि हा कमेंट  सुद्धा त्याने महिला बघूनच केला होता..... सोनिया मात्र त्याच्या कमेंटने खुश झाली होती   ...तिला वाटलं तो तिलाच बोलतो आहे...

अर्जुन तिलाच बघतो आहे हे बघून माही ला ऑकवर्ड वाटत होतं.... आणि उगाच सोनियाला आणि बाकी कुणाला काही वेगळं वाटायला नको म्हणून माही किचनमध्ये मदत करायला चालली गेली.....अर्जुन सुद्धा सगळ्यांशी औपचारिक बोलून वरती आपल्या रूममध्ये ऑफिसचं काम करायला निघून गेला ....त्याला तसं पण या पूजा वगैरे फंक्शनमध्ये काहीच इंटरेस्ट नसायचा .... घरचे फॉर्स करायचे म्हणून तो थोडा वेळ तिथे बोलायला आला होता.

पंडित आले होते,  पूजेला सुरुवात झाली... मामा मामी पुजेसाठी  बसले होते..... मीराचा मात्र खूप गोंधळ सुरु होता.....कंटिन्यू मस्ती सुरू होती ...इकडून तिकडे पळणं सुरू होतं आणि पळता पळतच ती धपकन खाली पडली आणि तिने तिथे भोंगा पसरला...... तिच्या आवाजाने तिथे सगळ्यांना डिस्टर्ब होत होते आणि ती पण  अनकम्फर्टेबल होत होती....

" माही.. तिला इथे गोंधळ वाटत असेल....  तू मिराला  माझ्या रूम मध्ये घेऊन जा... काही खाऊ घालून दे,  पूजा व्हायला वेळ लागेल,  इतका वेळ ती छोटीशी पोर उपाशी नाही राहू शकणार" .......आजी

माहीने  किचनमधून गरम गरम वरण भाताची प्लेट घेतली आणि मिराला एका साईडला कडेवर घेत  वरती गेली..... मीरा मात्र पडल्यामुळे रडत होती...... माहि तीला पुल साईडला घेऊन गेली..... आणि तिला फिरवून ...गप्पा मारत शांत केले.... तिथेच टेबलवर बसून तिला वरण-भात खाऊ घातला...... आता मात्र मीरा छान खेळायला लागली,  तिथे तिचा पळापळीचा खेळ सुरु होता आणि माही तिच्या मागे मागे धावत होती..... दोघीही खळखळून हसत पळापळी करत होत्या....... आणि एक व्यक्ती या दोघींना बघण्यात गुंतला होता..... हो तो म्हणजे अर्जुन...अर्जुन तिथेच त्याच्या रूममध्ये बसून  लॅपटॉपवर ऑफिसचं काम करत होता आणि त्याच्या रूम मधून बाहेरचा त्याला सगळं दिसत होतं.......आणि तो त्या दोघांना असा खळखळून असतांना,  त्यांची निरागस चेहरे बघण्यात हरखून गेला होता........थोड्या वेळ खेळून झाल्यावर मीरा मात्र दमली , खूप खेळल्यामुळे आणि जेवण झाल्यामुळे आता तिला झोप येत होती.  पण ती झोपायला काही तयार नव्हती,  तिची चिडचिड सुरू झाली होती...... माहि तीला कडेवर खांद्यावर घेऊन झोपवायचा प्रयत्न करत होती.... मात्र ती झोपत नव्हती......

अचानक दोन हातांनी मिरा आपल्या हातात घेतलं... अचानक झालेल्या स्पर्षाने माहीने दचकून बघितले तर समोर अर्जुन उभा होता आणि त्यानेच मिरा त्याच्या खांद्यावर घेतले होते......

" सर ......तुम्ही..... इथे.... अचानक.... असे?" ...... माही  अडखळत बोलत होती

" तू नेहमीच कशी काय विसरते ग.... हे माझं घर आहे,  मी कधीही कुठेही जाऊ शकतो" .....अर्जुन

" मीराला  द्या इकडे .... अनोळखी लोकांचा जवळ ती रडत असते.... द्या तिला.... मी झोपवते तिला.. नाहीतर उगाच गोंधळ घालेल" ...... माहीने मिराला  घ्यायला हात पुढे केला...

" Shhhhhh" ....... अर्जुनने  तिला थांबवले . आणि शांत राहायला सांगितलं

अर्जुन  तिच्या पाठीवर प्रेमाने थोपटत गोष्ट सांगत होता... मीरा पण त्याच्या जवळ जाऊन शांत झाली होती आणि त्याचे गोष्ट ऐकत होती.... गोष्ट ऐकता ऐकता ती त्याच्या खांद्यावर झोपी गेली.....

त्या दोघांना बघून महिला खूप आश्चर्य वाटले , कारण मीरा कधीच कुणा दुसऱ्या जवळ झोपायची नाही....

अर्जुनला सुद्धा स्वताच आश्चर्य वाटत होतं की त्याने कसाकाय लहान या मुलीला जवळ घेतलं...... कारण त्याला मुलं फार काही आवडायची नाहीत ...... त्यांच्या रडण्याने कुरकुरीने  त्याचे डोकंच सटकायचे...... रुही सोबत तो थोडाफार खेळायचा मात्र फार काही रमायचा नाही....

* झोपली ती,  द्या आता तिला माझ्याजवळ ....आजीच्या रूममध्ये झोपून येते" ....माही

" नाही नको इथेच माझ्या रूम मध्ये झोपव.... तिकडे कोणी नाही आहे तर लक्ष राहणार नाही..... इथे मी ऑफिसचं काम करतो आहे,  तर माझं लक्ष राहील" .....अर्जुन

माहीने मान डोलावली...आणि मीराला अर्जुनच्या बेडरुम मध्ये बेडवर झोपवलं...... आणि ती  खाली जायला निघाली....

" माही" .......अर्जुन ने आवाज दिला

" मीरा खूप जवळ आहे ना तुझा?" .....अर्जुन

" हो.... माझा जीव की प्राण आहे ती" .......माही

" ह्म्म...... तिचा बाबा येत नाही काय तिला भेटायला?" ......अर्जुन

" ह्म्म" .......... माही

" तिचे डोळे" .........अर्जुन

" तिचे डोळे तिच्या आईसारखी आहेत" ......माही

माही जसे काही अर्जुनच्या मनातलेच बोलली होती......

" हमम... तिचे डोळे खुप सुंदर आहे ....एवढंच म्हणायचं होतं मला"....अर्जुन

" ह्म्म.." ...माही   परत जायला वळली...

" माही ..... अंजली तुझी बहिण आहे ना...... तु देसाई आणि ती राणे ?" .......अर्जुनने  परत आवाज दिला

आता मात्र माहि थोडीशी घाबरली होती..... तिने घाबरूनच अर्जुन कडे बघितलं.....तर अर्जुनच्या डोळ्यात तिला बरेच प्रश्न दिसत होते...

" हो.....ती माझी बहीण आहे... फक्त आम्ही सख्ख्या बहिणी नाहीत..... पण त्याहून जास्त आहे" ..... बोलताना तिचा आवाज कापरा झाला होता

" इट्स ओके तुला नाही आवडला हा विषय नको बोलूया" .........अर्जुन

" माही तुझं आणि अंजलीच लग्न झाल्यावर मीराला कोण बघणार?" .....अर्जुन

" आई आणि आत्याबाई आहेत ना...... आणि मी लग्न नाही करणार आहे" .......माही

" काय.....?" ..... अर्जुन आश्चर्यचकित नजरेने तिला बघत होता.

" का बरं?? .....का बरं ....तू लग्न नाही करणार आहे??..... सुंदर आहेस..... नोकरी करते......... तुला नाही करावेसे  वाटत का लग्न???.....म्हणजे मला सुद्धा या लग्न वगैरे गोष्टींमध्ये विश्वास नाही आहे.. पण माझी गोष्ट वेगळी आहे.... तुम्ही मुली तर खूप excited असता ना ... लग्न ...तुमची मुलींची तर खूप स्वप्न असतात असं करायचं तसं करायचं" ........अर्जुन

" माझं स्वप्न फक्त मिराला मोठे करणे आहे.... तिला सगळं द्यायचं आहे .... तिचे शिक्षण पूर्ण करायच आहे .. तिला खूप चांगलं आयुष्य द्यायचं आहे" ...... माही

" आणि तुझं काय??...... तुला नकोय का कोणी लाईफ पार्टनर..... I can't beleive कोणी दुसऱ्यांच्या मुलीसाठी असे काही करू शकते?" .....अर्जुन

"दुसरी कोणाची नाही...... ती माझी मुलगी आहे" .... माही

"काय.???"....अर्जुन तिच्या उत्तराने उडालाच

"म्हणजे..... म्हणजे   ..तिला दत्तक घेते आहे..... मी तिच्या शिवाय जगू शकत नाही.  तीसुद्धा माझ्या अंगावरची खूप आहे म्हणून मी तिला आता दत्तक घेतले आहे" ..... माही अडखळत बोलली.... तिला आठवलं होतं आत्याबाईंचचे बोलने,  की कुठल्याही गोष्टीमुळे अंजलीच्या लग्नावर आयुष्यावर परिणाम झाला नाही पाहिजे , म्हणून तिने ही गोष्ट सांभाळून नेली...

" ओके" .....अर्जुन

" तुला आजपर्यंत कोणी  आवडलं नाही काय??...... तुला कोणावर प्रेम नाही झालं??" ........ अर्जुन तिच्याजवळ जात एकटक तिच्या डोळ्यात बघत बोलत होता..... ती मागे मागे जात होती  आणि भिंतीला जाऊन धडकली.  अर्जुनसुद्धा तिच्या आता खूप जवळ आला होता.

त्याच्या अशा प्रश्नाने माहिचा हृदयातून  एक जोरदार कळ गेली.... आणि तिच्या डोळ्यात आता  पाणी साचायला लागलं.... आणि ती पाणी भरल्या नजरेने त्याच्याकडे बघत होती.....

" माही...... मी काहीतरी विचारतोय??"  ......तो अगदी तिच्याजवळ जात हळू आवाजात बोलला...... आणि तिचे एक्सप्रेशन्स बघू लागला..... त्याला तिच्या डोळ्यात त्याच्यासाठी प्रेम दिसत होते.....

तिने मानेनेच नाही म्हणून सांगितले........ " अर्जुन मला तुम्ही सुखी हवे आहेत...... मी माझ्या भावना नाही सांगू शकत कोणाला"  ..... माही  त्याच्याकडे बघत मनातच  बोलत होती

" माही.....तुझे डोळे वेगळेच बोलत आहे...... तू प्रेमात पडली आहे........ तू का बरं नकार देते आहेस??......माही एक्सेप्ट कर" ....... म्हणतच तो खूप तिच्याजवळ गेला.... त्याचे ओठ तो तिच्या जवळ नेत होता...... माहीने  डोळे बंद करून घेतले...... ती आज त्याला अडवू शकत नव्हती.... तिच्या मनाची पण चलबिचल सुरू झाली होती......... तो तिचे ते घाबरलेलं रूप बघण्यात मग्न झाला.....त्याने एक हात तिच्या मानेतून मागे टाकून तिचे वर बांधलेले केस खाली सोडले...... आणि तिचे हेअर पिन
आपल्या खिशात ठेवून घेतले..

" माही.....you are looking so gorgeous .... घाबरू नको..... तुझ्या संमतीशिवाय मी काहीच करणार नाही आहो" ........ म्हणतच  अर्जुन बाजूला झाला आणि मागे वळून त्याने तिच्याकडे पाठ केली..... त्याला खूप वाईट वाटत होते की ...का बरं माही तिचे प्रेम मान्य करत नाही.....

माही तशीच तिथे  भिंतीला टेकून उभी होती.....

" माही जा आता इथून...... माझे पेशंस नको चेक करू...... please go damn it.....before I loose my controls"  ...... अर्जून  मोठ्या आवडत तसाच पाठमोरा तिला बोलला....

ती त्याच्या आवाजाने भानावर आली आणि तिथून निघून गेली...... अर्जुनने आपला लक्ष कामात घातलं

आरतीची वेळ होत आली होती....... आई अर्जुनला बोलवायला त्याच्या रूम मध्ये आल्या.... मीराला तिथे झोपलेले  बघून त्यांना  आश्चर्य वाटले

" अरे ही इथे झोपली आहे?" ......आई

" हो ........येवढे आश्चर्याची काही गरज नाही..... मी माहीला सांगितले इथेच झोपव..... मी येथेच होतो म्हणून,  इथे वरती कोणीच नाही..... तुम्ही सगळे तिथे पूजेमध्ये बिझी होता.. ती उठली आणि घाबरली असती ...रडली असती  म्हणून मी तिला म्हणालो कि इथे झोपव.......मी  इथेच काम करतो आहे तर" ......अर्जुन

" ठीक आहे...... पण काय रे तू असा इथे एकटा का बसला आहेस??...... तो आकाश बघ त्याचं लग्न जमलं तर किती आनंद ओसांडून वाहत आहे त्याच्या चेहऱ्यावर...... तू का असा  दिसतो आहेस??........ तू असा वागतोस,  त्या  सोनियाला किती वाईट वाटेल?" .....आई

" आई तिला माझ्याबद्दल सगळं माहिती आहे,  तिला माहिती आहे मी कसा आहे ते ..... तिला नाही काही वाटणार .... ऑफिसचे काही महत्वाचे मेल चेक करायचे होते म्हणून ते करत बसलो होतो" .....अर्जुन

" बरं...... चल आरतीची वेळ झाली आहे" ......आई

" तुम्ही करा आरती..... मीरा इथे  झोपली आहे..... मी इथेच थांबतो ......तशी पण माझी इच्छा नाहीये तुला तर माहिती मला हे  काहीही आवडत नाही .....नको फोर्स करू" .....अर्जुन

त्याचं बोलणं ऐकून आई निघून गेली.....
अर्जुनने एकदा मीराकडे बघितलं...... आणि त्याने परत आपल्या कामावर कॉन्स्टंट केलं....

आरती छान तालासुरात झाली..... अर्जुन नसल्यामुळे सोनिया थोडी नाराज झाली होती पण तिला माहिती होतं की अर्जुनाला पूजापाठ मध्ये काही इंटरेस्ट नाहीये म्हणून तिने त्याकडे लक्ष दिले नाही ......आता ती सुद्धा त्याच्या घरात सगळ्यांसोबत छान मिसळली होती.... आजीला आईला सगळ्यांना तिचे घरासाठी होणारे प्रयत्न दिसत होते..... त्यामुळे आता घरच्यांना सुद्धा ती आवडली होती.  काही काही गोष्टी तिला येत नव्हत्या.... बऱ्याच ठिकाणी तिचा मॉडर्न पणा  ती दाखवत होती ......तरीसुद्धा ती स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत होती........

बराच वेळ झाला म्हणून नाही  वरती मीरा ला उठली की  नाही म्हणून बघायला आली...... समोर बघते तर ती दारातच स्थिरावत एकटक आत मध्ये बघत होती...

अर्जुन आणि मीरा दोघेही बेडवर बसून खूप मस्ती करत होते......अर्जुन तिला गुदगुली करायचा आणि ती त्याच्यावर खळखळउन हसायची, असा काय तो त्यांचा गेम सुरु होता.....

माही ते सिन  बघून खूप सुखावली...... मीरा पहिल्यांदा अशी कुठल्यातरी पुरुषासोबत खेळत होती.... ती रमली होती.... अर्जुनचे पण तिला आज हे वेगळंच रूप दिसत होतं.. त्यांना बघून तिच्या चेहऱ्यावर छोटीशी छान स्माईल आली..

"माऊ....माऊ...... हे बघ , हे अंकल मला खूप आवडले..... आता ते माझे फ्रेंड झाले आहेत" ...... मीरा माहीला  आवाज देत होती...... मीराच्या आवाजाने माहि भानावर आली आणि ती आत मध्ये गेली....

" अरे माझं पिल्लू उठल काय?" ..... म्हणत माहीने मिराला  उचलून घेतले.....

"मला आवाज का नाही दिला , मी तिला खाली घेऊन गेले असते..... उगाच तुम्हाला तुमच्या कामांमध्ये डिस्टर्ब झाले" ....माही

" आम्ही  आता फ्रेंड आहोत आणि फ्रेंड डिस्टर्ब करत नाही..... होना मिरा?" .... अर्जुन तिचे गाल ओढत बोलला

" हो" ..... मीरा परत त्याच्याजवळ गेली आणि तिने त्याच्या गालावर छोटीशी किशी केली.... तो तिला बघून गोड हसला...

"बर चला आता..... मीरा आजी खाली वाट बघते आहे." ...माहीने परत तिला त्याच्याकडून स्वतःच्या कडेवर घेतले...

" माऊ एक मिनिट,  किती घाई करते" .....मिरा
" अंकल मी तुला किसी  दिला ना..... मग आता तू पण मला दे ना" ......मिरा

तिचं असं चुरुचुरु बोलताना बघून अर्जुनला खूप हसू आलं..... त्याने एकदा माहिकडे बघितलं आणि मीराजवळ वाकुन तिच्या गालावर एक छोटीशी किस केली......

पूजेनंतर जेवण,  प्रसाद सगळं आटोपले होते.... मोठी लोकं इकडच्या-तिकडचकचे  बोलत त्यांच काहीतरी प्लानिंग करत बसले.... यंग मंडळी मात्र त्यांच्या गोष्टी ऐकून बोर झाले होते....

" दादू आपण अंताक्षरी खेळूया काय??" ..... श्रेया आकाश आणि अर्जुनकडे बघत बोलली.

" तुम्ही सगळे खेळा , मी चाललो,  मला ऑफिसचं काम आहे" ....अर्जुन

" काय रे भाई तू पण .....ऑफिस मध्ये काम.... घरी काम जेव्हा बघावं तेव्हा नुसतं काम काम करत असतो....... ये सोनिया वहिनी बघ हा याला.. लग्नानंतर हा असाच वागत राहिला तर तुझं मात्र कठीण आहे हा" ..... श्रेया अर्जुन आणि सोनियाला चिडवत बोलली.....आमचा आकाश दादा  बघ , आतापासूनच आपल्या होणाऱ्या बायकोच्या मागे मागे फिरतो आहेत...... अर्जुन दादू काही शिक रे  या आकाश दादा कडून" ...... तिच्या बोलण्याने बाकी सगळे हसायला लागले....

अंजलीला तिचा ऐकून  लाजायला झालं..... आकाशने श्रेयाचा कान ओढला..... " फारच समजायला लागलं नाही तुला??...... आईला सांगतो आता तुझं लग्न कराव लागते" ....आकाश

अंजलीला बघून सोनिया सुद्धा लाजल्यासारखे करत होती.......

" आता तुला काय झालं???.... तू आशि कधीपासून लाजायला लागली?" ..... अर्जुन डोक्यावर आठ्या पाडतच बोलला...

" ते मी प्रॅक्टिस करते आहे" ....सोनिया

तिच्या बोलण्याने अर्जुनने डोक्यावर हात मारून घेतला,.... सगळे खूप खळखळून हसत होते...... अर्जुनची नजर माहीवर गेली..... माहि सुद्धा छान हसत होती..... तिला असं हसताना त्याला बघतच राहावसं वाटलं..... पण आजूबाजूला सगळे होते म्हणून त्याने त्याची मान वळवली...

"सोनिया तू बोल त्याला तुझं ऐकेलं तो." .... अनन्या बोलली

" एस्क्युज मी.... मी अर्जुन पटवर्धन आहो.... मी कोणाच ऐकत नसतो.....आणि  काय बोर गेम,  मला नाही खेळायचा" ....अर्जुन

त्याचा असं बोलणं ऐकून सोनियाचा  मात्र चेहरा उतरला होता,  ते माहीचा लक्षात आले...

" असं सांगा ना... द अर्जुन पटवर्धन हरायला घाबरतात ते?" ... माही त्याला चिडवत बोलली

सोनिया.. अनन्या... श्रेया... आकाश सगळे आ फाडून  माहीकडे बघत होते......

"वा.... माहि मानलं तुला.... याच्या समोर कोणीच बोलायची हिम्मत करत नाही....... द ग्रेट अर्जुन पटवर्धनला कोणीतरी चॅलेंज केलं..... वा वा" ..... अनन्या

" How dare are you?" ..... अर्जुन माहीकडे बघत बोलला

त्याच्या रागीट वागण्यावर सगळे हसायला लागले...

" दादू प्लीज आता तरी खेळ ना ....आता तर माहिने सुद्धा चॅलेंज केले आहे तुला .....आपल्याला जिंकलच पाहिजे" .......श्रीया

" काय रे तू तर सोनिया सोबत मॅचींग असायला पाहिजे होता..... तू तर  महिला मॅचिंग झालास?" .... अनन्या त्याला चिडवत बोलली

आता सगळ्यांचे लक्ष त्या दोघांकडे गेले.... महिला मात्र ऑकवर्ड फील  झालं....

" मी काही नाही केलं ....ते योगायोगाने झालं" ...अर्जुन

" अरे हो हो.... चिडत का  आहेस मी गंमत करत होती" ...अनन्या

" बरं चला आता आपण सगळ्यांनी खेळूया , दोन-टीम  बनवूया" .....श्रीया

" बर आपण आपली बहिण भावाची एक टीम  बनवू आणि या तिघींची तिघींनी एक टीम .... बघूया होणाऱ्या सूना जिंकतात की   की आपण"  ....अनन्या

" ओके"  ....सोनिया

सोनिया , अंजली आणि माही एका साईडला बसल्या आणि आकाश , अर्जुन , श्रेया आणि अंजली यांच्या अपोजिट साईडला बसले...

रुही आणि मीरा तिथे मध्येच खेळत होत्या .

श्रेयाने बैठे बैठे क्या करना है करना है कुछ काम सुरू करू अंताक्षरी लेके प्रभू का नाम , म्हणत आकाश टीम कडे हात दाखवला आणि म अक्षर आले असं सांगितलं.

मैने प्यार है तुम्ही से किया है
मैने दिल  तुम्ही को दिया है
अब चाहे जो हो जाये
मै दुनिया से अब ना डरू
तुझसे मैं प्यार करू...

आकाश ने पण चान्स नाही सोडला आणि टिपिकल म  गाणं म्हटलं

" वा....दादा वहिनी आली तर खूपच हिम्मत आली तुला..... आई दिसली नाही वाटते तुला अजून आजूबाजूला" ...... श्रेया त्याला चिडवत बोलली....

" ये गप ग...... र आला तुमच्यावर "....आकाश अंजलीकडे बघत बोलला...

राजा को राणी से प्यार होगाया
पहली नजर मे पहला प्यार होगाया...

अंजली आकाशकडे बघत र वरून गाणे म्हणत होती.

" वा वावा." .... अनन्या आणि  श्रीया त्यांना चिडवत होते....

असेच काही कपल सॉन्ग आले की अनन्या आणि श्रेया दोन्ही कपला एकमेकांकडे बघत चिडवायचे.....
सगळे अंताक्षरी खेळण्यात खूप रमले होते....माही तर अगदी लहान मुलंसारखी करत होती ........

अर्जुनने  मात्र आतापर्यंत एकही गाणं म्हटलं नव्हतं.... आता त्यांच्या टीम वर  म आला होता..... म वरची बरीच झाली म्हणून झाली होती , त्यामुळे आता कोणालाच गाणं आठवत नव्हतं....

टिक टिक १
टिक टिक २
.
.
.
माहीने गिनती सुरू केली......
अर्जुन मात्र एकटक तिच्याकडे बघत होता..

टिक टिक १०.....

" ये ss...... आपण जिंकलो" ....माही उड्या मारतच होती की...

मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लागदा जी
मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लागदा जी
तू की जाने प्यार मेरा
मैं करूँ इंतजार तेरा
तू दिल तूयों जान मेरी
मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लागदा जी
तू की जाने प्यार मेरा
मैं करूँ इंतजार तेरा
तू दिल तूयों जान मेरी.....तू जान मेरी...

सगळे आश्चर्यचकित झाले.....आणि त्या गाण्यात मग्न झाले होते......खूप emotions जाणवत होते ऐकताना...

" तुला येत होते.....आधी का नाही म्हणाला.....आपण हरलो ना .यार दादा" .......श्रीया कुरकुर करत अर्जुनला म्हणाली...

अर्जुनने एकदा माहीकडे बघितले. .... डोळ्यावर गॉगल लावला..... काहीच न बोलता तिथून निघून गेला...

******

क्रमशः

*****

 

नमस्कार फ्रेंड्स, 

थोडी बिझी असल्यामुळे नंदिनी...श्वास तुझा या कथेचा पुढला भाग यायला थोडा वेळ लागेल. तू ही रे .....चे एक दिवसाआड भाग येतील आहेत. नंदिनी कथा लिहून नाही झाली, त्यामुळे जसे जसे लिहून होईल, भाग पोस्ट करेल आहे . Thank you 

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Megha Amol

उडणाऱ्या पक्षासारखं बेधुंद होता यावं...!! आणि हे जगणं सुंदर व्हावं...!!!❤️