तू ही रे...... कसं जगायचं तुझ्याविना 78

माही

तू ही रे … कसं जगायचं तुझ्याविना 78

भाग 78

नलिनीने सांगितल्याप्रमाणे आज संध्याकाळी माही जाणार होती त्या आधी ती अर्जुनला भेटायला आली होती. अर्जुन झोपला होता म्हणून त्याला डोळेभरून एकदा बघुन घेत ती परत जायला वळली होती की अर्जुन ने तिळाचा हात पकडत तिला आपल्या कुशीत ओढले होते. 

" माही , तू सांगितले नाहीस , तुझे डोळे का सुजले आहेत ?".... अर्जुन 

" काही नाही , असच झोप नाही झाली नीट ".... माही अर्जुन पासून नजर चोरत इकडेतिकडे बघत बोलली

" तेच विचारतोय , झोप का नीट नाही झाली ?"... अर्जुन 

" सर , तुमच्या औषधांची वेळ झाली असेल ".... म्हणत ती तिथून उठली आणि बाजूला टेबल वर ठेवलेले त्याचे मेडीसिन्स चाळवा चाळव करत ती बोलत होती. 

" माही , मी काहीतरी विचारतोय , ते ठेव बाजूला ".... अर्जुन तिच्या जवळ जात तिच्या हातातील मेडिसिन बाजूला ठेवत तिच्या हाताला पकडत स्वतःकडे वळवले . 

" काही नाही झालं आहे , ते तुम्ही …. हॉस्पिटल मध्ये … ठीक नव्हते तर मला खूप भीती वाटली होती , तेच सतत डोळ्यांपुढे येते म्हणून ते….ते….झोप नीट नाही झाली "..... माही 

" हम्म , तुला सोडून जातोय की काय याची भीती वाटली , right?".... अर्जुन तिचा हनुवटीला पकडत तिचा चेहरा वर करत तिच्या डोळ्यात बघत बोलला. तिला तिचे खरे कारण माहिती होते , काय बोलावं तिला कळत नव्हते तिने फक्त त्याचा कडे बघत होती. 

" Don't worry , तू माझ्या जवळच असणार आहेस आता… नेहमी करता "..... त्याने मातीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिच्या कपाळावर किस केले आणि तो तिच्याकडे बघून गोड हसला .. ती पण त्याचा कडे बघत कसणुस हसली.

 " तुम्ही आराम करा , मी येते "..... माही त्याच्या गालांवर थोपटत बोलली.   

" ह्मम "..... अर्जुन ,

ती रूमच्या बाहेर जाऊ लागली. रूमच्या बाहेर पाय ठेवणार पण तिची पावले जड झाली होती, रूमच्या बाहेर पाऊल काही पडेना, माहीचा कंठ दाटून आला होता , अर्जुन पासून दूर जाण्याची विरहाची भावना तिला सहन झाली नाही आणि ती मागे फिरत पळतच येत अर्जूनच्या मिठीत शिरली. 

" त्रास होतो आहे ना जायला ? नको जाऊ ".... अर्जुन 

" ते …. ते …. मला …."..... शब्द नीट उमलेना , तिने तिच्या ओढणी मध्ये बांधलेली गाठ सोडली आणि त्याच्या पुढ्यात काही पकडले…ते बघून तो गालात हसला. हो ते तेच मंगळसूत्र होते जे त्याने स्वतः डिझाईन केले होते आणि तिला दिले होते. 

" finally …. "..... अर्जुन 

तिने होकारार्थी मान हलवली. 

" Let's go then , चल सगळ्यांना सांगू "..... अर्जुन 

" नाही , आता नको …. ".... माही

" मग ?".... अर्जुन 

" नंतर "..... माही 

" ह्मम ".... अर्जुन 

" हे तुमच्या हाताने घालून द्याल ?".... माही मंगळसूत्र त्याचा पुढे धरत बोलली. तो प्रश्नार्थक चेहऱ्याने तिला बघत होता. 

" तुमच्यासोबत एकरूप व्हायचं , आता आणखी मला वेळ नाही करायचा "..... माही 

" पेपर वर का ना असू देत , लग्न तर झाले आहे ना आपले , आणि लग्नात देतात ती सगळीच वचने तुम्ही प्रत्येक्षात जपत पूर्ण करत आहात … मला आता तुमची बायको म्हणूनच जगायचं "..... माही 

तो गोड हसला… त्याने तिच्या हातातले मंगळसूत्र घेतले , तिच्या मागे जाऊन उभा राहिला . हळुवारपणे तिच्या मानेवरील केसं एका साइडला केले… आणि तिच्या गळ्यात ते मंगळसूत्र बांधले. तिच्या भोवती आपल्या हातांचा विळखा घट्ट करत तिच्या मंगळसूत्र जवळ मानेवर ओठांचा रेशमी स्पर्श केला. त्याचा त्या स्पर्शाने तिचं अंग मोहरुन आले… आणि ती सरकन वळत त्याचा मिठीत शिरली .

" आज तू सगळे हक्क दिले आहेस मला… ".... अर्जुन तिच्या कानाजवळ जात बोलला. 

तिने लाजून त्याच्या शर्ट मध्ये आपला चेहरा लपवला. तो क्षण असा होता की थोड्या वेळ साठी अर्जुन पासून दूर जाते आहे हेच विसरली होती. त्याने एका हाताने तिचा चेहरा वर केला…. त्याची ती मधाळ नजर बघून तिच्या हृदयाचे ठोके वाढले होते. नववधू प्रमाणे तिचा चेहरा तेजस्वी दिसत होता. त्याला तिचा मोह आवरला नाही आणि अलगद त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले , आणि तिचे डोळे आपोआप मिटल्या गेले. तिच्या क्यूट छोट्याश्या नाकावर त्याने किस केले… तसे तिचे ओठ रुंदावले…. त्या रोमँटिक मूड मध्ये तिचे रुंदावलेले ओठ बघून त्याच्या ओठांवर पण हसू उमलले… 

" कार्टून "...... तो पुटपुटला 

आणि ते ऐकून ती खळखळून हसायला लागली...तिला मनसोक्त हसतांना बघून तो स्वतः शीच हसत लाजला …

दोघंही खळखळून हसत होते तेवढयात आशुतोष ने माहीला आवाज दिला आणि आता पर्यंत स्वप्नात असलेली माही भानावर आली. आणि सत्य परिस्थितीची तिला आठवण झाली. आणि आता डोळ्यातील आनंदाश्रूचे वेदनेदायक अश्रूंनी जागा घेतली. 

" हो आले , sir काळजी घ्या , आराम करा ".... माही त्याला बऱ्याच इन्स्ट्रक्शन देत त्याचा गालावर किस करत जड मनाने रूमच्या बाहेर पडली. तिने लगेच आपल्या मानेभोवती आपली ओढणी नीट गुंडाळून घेतली म्हणजे तिच्या गळ्यातील मंगळसूत्र कोणाला दिसणार नाही. 

आत्याबाई , आई घरी जायचं म्हणून तिला आवाज देत होत्या. ती भरभर पायऱ्या उतरत खाली आली. निघायचं म्हणून तिने आजीला जाऊन नमस्कार करायला गेली , तर त्यांनी फक्त स्मित हास्य केले. नंतर ती मामीला नमस्कार करायला गेली तर त्या मागे सरकल्या. नलिनी ला नमस्कार केला तर तिने आपली मान वळावली. अनन्या पण तिच्यावर थोडी नाराज होतीच , माही श्रिया जवळ बोलायला गेली आणि सॉरी म्हणाली , श्रिया तिच्याशी काही न बोलता आतमध्ये निघून गेली. काल पर्यंत माही माही करणारे घर अचानक पराये झाले होते, आज कोणालाच माही नको हवी होती… ते बघून तिला खूप वाईट वाटले. वरती उभा अर्जुन हे सगळं बघत होता. तीच्याप्रती घरातील सगळ्यांचं वागणं बघून अर्जुनला वाईट पण वाटत होतं आणि त्याहून जास्त राग येत होता. 

माहीने मीराला उचलून घेतले आणि ती घराबाहेर पडणार तेवढयात अर्जुनने आवाज दिला. 

" माही , तू कुठेही जाणार नाही आहे , हे घर तुझं सुद्धा आहे "..... अर्जुन 

त्याचा आवाजाने माही तिथेच थांबली. आणि तिने वळून बघितले. घरातील बाकी सुद्धा त्याचाकडे बघत होते. 

" सोबत राहायचं ठरलं होते , राईट ? Wait"..... अर्जुन हळूहळू पायऱ्या उतरत खाली आला. 

" घर तिचं आहे म्हणजे ? ".... नलिनी 

" पिंकी, मिरा आणि रुही ला आतमध्ये घेऊन जा ".... अर्जुनने पिंकी ला आवाज दिला तशी पिंकी बाहेर आली आणि दोघींना वरती खेळण्याच्या रूम मध्ये घेऊन गेली. मुलांना आतमध्ये गेलेले बघून तो पुढे बोलायला लागला. 

" या घरावर जेवढा सगळ्यांचा हक्क आहे तेवढाच माहीचा सुद्धा हक्क आहे "..... अर्जुन नजर रोखत बोलत होता. 

" हे काय बडबडतोय तू ? मला ती या घरात अजिबात नको आहे ".... नलिनी 

" हे घर माझं आहे , right ?".... अर्जुन 

" मग , हीचा काय संबंध त्यात ?".... नलिनी 

" Sir , तुम्ही हे काय बोल……"..

" She is Mrs Mahi Arjun Patwardhan ".... अर्जुन माही पूर्ण बोलायच्या आताच अर्जुन गरजला. 

ते ऐकूण सगळे शॉक झाले.माही सुद्धा डोळे मोठे करत त्याचाकडे बघत होती. नलिनी रागाने माहीकडे बघत होती, तिचे डोळे जणू आग ओकत होते, ते बघून माही खूप घाबरली. 

" अर्जुन , हे काय चाललं आहे ? हा काय खेळ सुरू आहे ? आणि मुळात तुला आता आराम करायला हवा ".... आजी 

" माही 

   माझी बायको आहे , आमचं कोर्ट मरिएज झाले आहे . ".... अर्जुन 

" अर्जुन , हा काय पागलपण आहे ?"... नलिनी 

" खरं सांगतोय , papers पण आहेत , हवे असतील तर दाखवतो "... अर्जुन

नलीनीला तर तिच्या पायाखलील जमीन सरकली वाटत होती आणि हातातून सगळं निसटून चालल्या सारखं वाटतं होते. 

" हे लग्न मी मानत नाही , आणि मुळात मला ही मुलगी तुझी बायको म्हणून मंजूर नाही , आणि मला ही या घरात आता एक मिनिट सुद्धा नको आहे. ".... नलिनी चिडली होती. 

बाकी सगळे तर या माय लेकांमध्ये सुरू असलेले गोष्टी ऐकत होते, सगळंच सगळ्यांच्या डोक्यावरून जात होते. अर्जुन आणि माहीच लग्न झालंय हे बाकीच्यांसाठी पण मोठा धक्का होता. खरंच लग्न केले आहे म्हणजे घरात सगळ्यांना अंधारात ठेऊन लग्न केले आहे , आता बाकीच्यांना पण चांगलाच राग आला होता.

" माही चालती हो घरातून , विश्वासघातकी …".. नलिनी चिडत माहीला बाहेरच्या दिशेने धक्का दिला . माही पडणारच होती की अर्जुन ने तिचा हात पकडत तिला स्वतःकडे ओढत पक्क पकडुन ठेवले. 

" हे घर माझं आहे , ती कुठेही जाणार नाही ".... अर्जुन

" तुझं घर आहे म्हणून तुझी मनमानी करशील काय तू आता? आम्ही तुझं नाही ऐकले तर तू तर या मुलीसाठी आम्हाला घराबाहेर काढायला पण मागेपुढे बघणार नाहीस ".... नलिनी 

" मी फक्त येवढं म्हणतोय की हे माहीच सुद्धा घर आहे आता. "..... अर्जुन 

" मला ती या घरात चालणार नाही , नाहीतर मीच हे घर सोडून जाते"..... नलिनी

" काकी , तुम्ही प्लीज नाराज नका होऊ… sir , तुम्ही हे काय करत आहात ? " ….. माहीचे समजावणे सुरू होते मात्र नलिनी काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिचा माहीला बाहेर काढण्याचा हट्ट सुरू होता. पैशासाठी माही हे करतेय असे नलिनी तिच्यावर आरोप करत होती. अर्जुन ने ऑफिस घराचे , प्रॉपर्टी चे काही पेपर्स आधीच बनवून समान भाग करून ठेवले होते. ते त्याने आकाश च्या हातात दिले . आणि " माही , नाही तर मी पण या घरात नाही राहू शकत "..... असे सांगत अर्जुनने माहीचा हात पकडला आणि घरा बाहेर पडू लागला. अर्जूनचे हे वागणं नलिनीच्या हृदयाला टोचून गेले, एका मुलीसाठी अर्जुन आपला परिवार, आपलं घरदार सगळं सोडायला तयार झालेला बघून त्यांचं मन खूप दुखले. 

" अर्जुन , जर तिच्यासोबत गेलास तर तुझी ही आई तुझ्यासाठी नेहमी करता मेली समज. मला शेवटची अग्नी सुद्धा तू द्यायची नाहीस ".... नलिनी खूप रागावली होती. 

ते बोलणं ऐकून आपोआप अर्जुनाचा हात पकडलेला माहीचा हात सैल पडला, आणि तिने अर्जुनाचा हात सोडला. 

" काकी , असे काहीच होणार नाही , सर घर सोडून कुठेच जाणार नाही , तुम्ही रागावू नका …".... माही समजावत होती. 

" मी रागवत नाही, पण आपलं जे ठरलं आहे तेच असेल ".... नलिनी

" हो "..... माही 

" माही , बकवास नाही करायची ".... अर्जुन 

माहीने एकदा अर्जूनकडे बघितले आणि नलीनीला ती जाईल याचे आश्वासन दिले. 

" हे काय चाललं आहे , कळेल काय ?".... आजी 

" आईला माही इथे नको होती म्हणून ती तिला इथून दूर पाठवत आहे , कोणालाही न सांगता , लपून "..... अर्जुन 

" असं काही नाही , माहीला स्वतः जायचं होतं , हे सगळं जे घडत आहे ,तिला वाटते तिच्यामुळे घडत आहे , कोणाला त्रास होऊ नये म्हणून ती जाते आहे " …. नलिनी 

" Ohh , really ?".... अर्जुन 

" माहीला विचार ?".... नलिनी 

" ही बावळट तर मला माहिती आहेच कशी आहे , आणि माझ्याजवळ तुमच्या दोघींमधले सगळं संभाषण आहे "..... अर्जुन 

माही तर अवाक् होत त्याचाकडे बघत होती... 

" नलिनी , हे काय बोलतो आहे अर्जुन ?".... आजी 

" माही मला नको आहे अर्जूनच्या आयुष्यात , तिने त्याचा आसपास पण असू नये … आधीच तिच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स झाले आहेत , तिची सावली सुद्धा अर्जूनवर पडू नये … मागे दिवाळीच्या वेळ पण तिला आग लागली तर याने मागचा पुढचा काहीच विचार न करता स्वतःला पण आगीत झोकून दिले होते, आता हे देवेश चं प्रकरण , आता सुद्धा मरणाच्या दारातून परत आला आहे … हा एवढा मेहनतीने त्याने उभा केलेले बिजनेस एम्पायर , त्याचं एकुलते एक स्वप्न पण तो देऊन मोकळा झाला … उद्या तिच्यासाठी कोणी जीव मागितला तरी तो ते पण देऊन मोकळा होईल…. नको आहे मला ही , इथे कुठेच नको आहे . आज जर हा तिच्या सोबत गेला तर मी सगळ्यांसोबत असलेले माझे नाते तोडून देईल , नको त्यापेक्षा मी आपलाच जीव देईल "....... नलिनी 

नलीनीने एक एक शब्द माहीच्या जिव्हारी लागत होते… आता आणखी आपल्यामुळे परत एक घर तुटायला नको हेच तिच्या डोक्यात सुरू होते . 

" काकी , मी जात आहे "..... माही 

" Sir , एका आईचं घर तोडून मी माझं घर नाही बनवू शकत ...आपला संबंध आता येवढाच , पुढली वाट आता मी माझी एकटीने चालेल … ".... माही 

" We are married … ".... अर्जुन 

" म्हणून तुम्ही तुमची मतं माझ्यावर लादू शकत नाही , माझा निर्णय मी घेतला आहे , माझी तुमची वाट वेगळी आहे .."..... माही थोडी कठोरपणे बोलत होती. पण आता तरी असेच बोलावे लागणार होते , कारण अर्जुन आणि नलिनी दोघेही ऐकण्याचा मूड मध्ये नव्हते. 

ते ऐकून आता अर्जुनला खूप राग येत होता…तो आता चिडला होता , त्याचे पेशन्स संपत आले होते. त्याला माहिती होते माही असेच काही वागेल आहे…परिवाराची गोष्ट आली की ती कधीच स्वतःसाठी उभी होणार नाही , त्यागाची मूर्ती बनण्यात तिला धन्यता वाटते . तिने त्याच्याकडे मंगळसूत्र घालून घेतले तर त्याला थोडी होप वाटत होती, पण नाही शेवटी माहीच ती , नाही बदलली. 

" माही , निघ आता , फ्लाईटची वेळ होत आहे….".... नलिनी 

माहीने एकदा संपूर्ण घरावर नजर फिरवली आणि अर्जूनवर येऊन स्थिरावली. त्याला बघून ती जाण्यासाठी वळली. 

" माही , तुला जिथे जायचं जा , तुला थांबवणार नाही , पण तू मीराला घेऊन जाऊ शकत नाही. तू विसरत आहे , जर आपल्यामध्ये काही झाले तर मीराची कस्टडी माझ्या कडे असेल आहे , सो ती माझ्या सोबत राहील ".... अर्जुन थोड्या कडक आवाजातच बोलला. 

ते ऐकून माहीचे पुढे पडणारे पाय जागीच खिळले. ती परत माघारी फिरली. अर्जुनाचे शब्द तिच्या हृदयावर तिर मारल्यासारखे टोचले होते. अर्जुन असे काही बोलेल तिला अपेक्षित नव्हते. ती भरल्या डोळ्यांनी त्याचा कडे बघत होती. बाकीचे पण अर्जूनकडे बघत होते, कारण मिरा आत्याबईच्या नात्यातली मुलगी आहे हेच सगळ्यांना माहिती होते. 

" मीरा माहीची मुलगी आहे , आणि आता माझी . मी मीरा ला adopt केले आहे. आणि जर आमच्या दोघांमध्ये काही प्रॉब्लेम्स झाले तर मिरा फक्त माझी असेल आहे , माहीने पेपर साइन केले आहे. ".... अर्जुन 

मीरा माहीची मुलगी आहे ऐकून तर आणखीच सगळे शॉक झाले , त्यात अर्जुनने तिला अडॉप्ट केले आहे कळले तर सगळ्यांना धक्का बसला. त्याचा प्रेमाची खोली मात्र आता आजीला कळली होती. माही , मीरा अर्जूनच आयुष्य बनले आहे ते. नलीनीला मात्र ते समजून घ्यायचे नव्हते. 

" Sir , तुम्ही असे कसे करू शकता ? तुम्हाला माहिती मी मिरा शिवाय नाही जगू शकत … तरी सुद्धा तुम्ही असे… ".... माही 

" येस , मी काही करू शकतो, आणि तुला माहिती आहे मी सुद्धा … leave it …. तुला जिथे जायचं तिथे जा, तुला अडवणार नाही …. मीरा , come baby "..... अर्जुन 

अर्जुनने आवाज दिला तशी मीरा लगेच पळत अर्जूनच्या कुशीत शिरली. तिला उचलून तो आतमध्ये जाऊ लागला. 

" काकी , मी नाही जाऊ शकत , मला माफ करा".... माही 

अर्जुनला तर समजावणं कठीणच होते , तो कोणाचंच ऐकणार नव्हता… 

" नलिनी , तुझं सगळं बरोबर असले तरी माय लेकीला दूर करणं मला आवडले नाही. माही इथेच तिच्या घरी राहील …".... आजी 

" माही , तू अजिबात अर्जुन सोबत काही संबंध ठेवायचा नाही , त्याचा सोबत बोलायचं सुद्धा नाही … त्याचा ऑफिस मध्ये काम सुद्धा करायचं नाही ".... नलिनी 

" आत्या , ती कंपनी माहीच्या नावावर आहे …. अर्जुनने ऑलरेडी त्यातून आपले हात बाहेर काढले आहे , जर माही नसेल त्या कंपनी मध्ये तर तो पण ते ऑफिस बंद करेल… कंपनीचा लॉस तर होईलच , पण तिथल्या स्टाफ च पण खूप नुकसान होईल"..... आकाश घाबरत बोलला. 

अर्जुनने तिचे जाण्याचे सगळे रस्ते बंद केले होते . त्याला माहिती होते माही भावनिक आहे , आपल्यामुळे दुसऱ्याच नुकसान झालेले तिला कधीही आवडणार नाही , आणि त्याचाच फायदा त्याने उचलला होता . 

" काकी , माझ्यामुळे आधीच खूप नुकसान झाले आहे , मी त्या निष्पाप लोकांचा नुकसान नाही करू शकत , मी कंपनी नाही सोडू शकत".... माही खूप विचार करून बोलली. तिला सुध्दा हे कंपनी तिच्या नावावर आहे ऐकून शॉक बसला होता. 

" तू कुठेही जा , पण मला प्रॉमिस कर की ती अर्जुन सोबत काही संबंध ठेवणार नाही , की त्याचसोबत बोलणार सुद्धा नाही …. मीराला घेऊन जा घरी … हळूहळू तो विसरेलच ".... नलिनी

माहीने होकारार्थी मान हलवली. 

आणि हे माहीचे बाहेर जाण्याचा विषय टळला. पण अर्जुन मात्र खूप दुखावला गेला होता. तो कोणाशीच बोलत नव्हता. खूप अबोल झाला होता. ऑफिस मध्ये त्याने माहीला समजावन्याचा प्रयत्न केला पण तिने नलिनी ला प्रॉमिस केले होते त्यामुळे ती इच्छा असूनही अर्जुनसोबत बोलत नव्हती. जास्तीत जास्त ती अर्जुनाच्या दूर राहत होती. 

आजीला सगळं दिसत होते , कळत होते पण घरातील वातावरण गरम असल्यामुळे काही वेळ जाऊ द्यावा आणि नंतर बोलावं असे विचार केला. 

आशुतोष पण आपल्या परीने सगळ्यांना समजावण्याचा प्रयत्न अधून मधून करत होता. आता अनन्याची नाराजी दूर झाली होती. मामा पण ठीक होते. 

*****"

देवेशवर प्रोपर केस करण्यात आली. रेप केस आणि अर्जूनवर केलेल्या हमला असे आरोप त्याच्यावर करण्यात आले होते. त्याचा प्रोसिजर सुरू झाल्या होत्या. 

देवेशचा परिवार हतबल झाला होता. देवेश च्या मोठ्या भावाची बायको सुद्धा माहेरी चालली गेली होती. 

*******

अर्जुन ऑफिस मध्ये कामापूर्तीच बोलत होता. खूप महत्वाचं असेल तेवढेच मीटिंग तो अटेंड करत होता. तो खूप शांत झाला होता. जास्तीत जास्त काम आकाश बघत होता. मीरा आणि त्याचं बाग काम येवढ्यापुरतीच त्याने त्याचे आयुष्य मर्यादित केले होते. 

*****

क्रमशः 

कथेचे पुढील सर्व भाग ईरा पेजवर सातत्याने प्रकाशित होतील, त्यासाठी फॉलो करा खालील पेज

http://www.facebook.com/irablogs