तू हवीशी मला भाग ५ शेवट

राधा:",लता, किती विचित्र वागली तू.स्त्री ही स्त्रीची शत्रू असते ऐकले होते पण आज पाहिलेही .खूपच खालच्या थराला जावून वागली. मनोहरने मला लग्नाआधी तुझ्याविषयी सर्व सांगितले होते. तुझ्यावर खरं प्रेम केले होते.तुझ्यासारख्या विकृत मुलीच्या प्रेमात पडला हीच चूक झाली.तुझ्या आयुष्यात असा turn आला म्हणून तू मनोहर तुझ्या आयुष्यात यावा म्हणून ह्या थराला गेलीस.अगदी त्याचे लग्न झाले,मुल झाले ,त्याचा संसार सुखाचा चालू आहे हे सर्व माहीत असून सुद्धा इतकी खालच्या थराला जाऊन वागलीस. खरंच स्त्री च्या जातीला तू मोठा डाग आहेस
मनोहरने अलगद राधाच्या मानेवर त्याची मान झुकवली तशी राधा पटकन मागे वळली.

राधा:"काय चालू आहे मनोहर, जरा जास्तच रोमँटिक मुडमध्ये आहेस"


मनोहर:"हो आहे मी मूडमध्ये, ते सुद्धा माझ्या हक्काच्या बायकोसोबत"

राधा:"हो का,आता आठवली हक्काची बायको?"

मनोहर :"तुला विसरलोच नाही तर आठवायचा प्रश्नच नाही"


राधा:"शब्दात कसं समोरच्याला गुंतवायचे हे तुला चांगलंच जमतं बघ"


मनोहर राधाच्या जवळ येऊ लागला..

राधाने त्याला अडवलं..

म्हणाली.

"थांब मनोहर,पुरे आता ..चल उशीर होईल आपल्याला.निघुया.."


मनोहर:"जरा जास्तच भाव खातेस तू...चल बाहेर तुला बघतोच"


राधा हसली आणि रूममधून बाहेर पडली.


मनोहरही तिच्यापाठी बाहेर आला.

सासू:"काय गोड दिसत आहात दोघे, दृष्ट काढावी अशी"


सासरा:"हो ,एकदम आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर ची जोडी "


राधा आणि मनोहर एकमेकांकडे पाहू लागले..


सासरा:"बघितलं का मनोहरची आई,कसे एकमेकांना बघत आहेत?


राधाने नजर खाली केली..


सासू:"झालं ना तुमचं सुरू,जाऊ द्या ओ .सतत आपलं चिडवत राहता दोघांना.जा पोरांनो .जेवायला उशीर होईल"


राधा आणि मनोहर दोघेही गेले.


सासरा आता गंभीर होऊन बोलू लागला.

"मनोहरची आई,बरं झालं दोघांना एकांत मिळाला."

सासु:"हो ना"

सासरा.

"मीसुद्धा खूप दिवस झाले पहात होतो,मनोहर काही जास्त बोलत नव्हता.वेगळ्याच दुनियेत रमला होता"

सासू:"हो ना,मलाही काळजी वाटत होती.नवीनच संसाराची सुरवात आणि असं एकमेकांपासून लांब झाले होते"


सासरा:"राधा आहे तशीच होती गं,ह्या मनोहरचे काय बिनसले होते काय माहित?"

सासू:"हो ,मनोहर अलिप्त रहात होता,काही समजत नव्हते. त्यामुळे राधाही नाराज झाली होती.पोरीचा उदास चेहरा बघवत नव्हता मला."


सासरा

"असो आता गाडी रुळावर आली,काही चिंता नाही..तसं आपल्यातही काही कमी वाद नव्हते सुरवातीला"


सासू

"हो का,वादाचे कारण तुम्हीच होता"

सासरा:"मी?"

सासू:" हो तुम्हीच"

सासू:"आठवतं ,तुम्ही लग्न झालं होतं आपलं .महिना झाला होता..मला म्हणाला होता बाहेर नाटक बघायला जायचे आहे,मी आपली नटून थटून बसले होते आणि चक्क तुम्ही रात्री नऊ वाजता आला.वरून मला लाडात येऊन विचारत होता "इतकी का सजली आहेस?"


सासरा:"हो ते मी कामाच्या नादात विसरुन गेलो, पण दुसऱ्या दिवशी नेहलं होतं नाटकाला"


सासू:"हो नेहलं होतं, पण काय फायदा..तुमचा तो मित्र राघवसुद्धा आला होता..बसला मग त्याच्याशी कुजबुज करत.असा राग आला होता ना मला?"


सासरा

"मित्र म्हणजे जीव की प्राण, किती वर्षांनंतर भेटलो होतो माहीत आहे,त्याच्यासोबत किती नाटकं पाहिली होती..कामानिमित्त तो गेला बाहेरगावी .मी एकटा पडलो.तुला काय सांगू असा अचानकपणे तो मला भेटला .चक्क बाजूची सीट.. म्हणून आपलं बोलू लागलो..


सासू :"हो ना,मित्र भेटला म्हणून बायको बाजूला बसली हे पार विसरून गेला"

सासरा:"पण, मी काय म्हणतो, तुम्हा बायकांना काही वेगळी शक्ती दिली आहे का देवाने?.. किती जुन्या गोष्टी आजही जशाच्या तश्या आठवतात. कमाल आहे."


सासू:"ते तर आहे ,आम्ही बायका सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो..अजिबात विसरत नाही.अजून खूप काही आठवते आहे .सांगू का??

सासरा:"नको हा नको..आता जेवायला वाढ.खूप भूक लागली आहे..हे तुला जे आठवत आहे ना ते सांगण्यासाठी खास दिवस ठेवू बाजूला "


सासू आणि सासरा दोघेही हसू लागले..

सासूने ताट वाढलं..

वांग्याचे भरीत, मेथीची भाजी होती.

सासरा :"मनोहरची आई काय सुगंध येतोय.. तुझ्या हातचे जेवण म्हणजे अमृत"


सासु:"पुरे झाले कौतुक,जेवा आता"


सासऱ्याने पहिला घास घेतला आणि तिला भरवला.


सासू:"अहो काय हे ..तुम्ही तर ना आज जरा जास्तच लाडात आला आहात..


सासऱ्याने खिशातून छान मोगऱ्याचा गजरा काढला आणि पुढ्यात ठेवला.

सासू:"किती छान सुगंध येतो आहे"

तिने गजरा केसात माळला.

दोघेही मनसोक्त गप्पा मारत जेवले..


इथे मनोहर आणि राधा दोघेही हॉटेलमध्ये पोहोचले.


मनोहरने ऑर्डर दिली.


ऑर्डर येईपर्यंत .दोघेही गप्पामध्ये रंगले.


मनोहरने राधाचा हात घट्ट पकडला..


राधाही त्याच्याकडे पाहू लागली.

मनोहर तिच्या डोळ्यात डोळे घालून पहात होता.


दोघेही निशब्द झाले होते .


फक्त अनुभवत होते शांतता.मनात खूप काही होते पण शब्द काही फुटत नव्हते.


राधा:"बोल मनोहर काय बोलायचे आहे"


मनोहर:"राधा,सॉरी"

राधाने त्याचा हात हातात घेतला..म्हणाली:
"कशासाठी?"


मनोहर:"तुला मी दुखवत होतो त्यासाठी.त्यादिवशी जे पण तू म्हणालीस ते खरं होतं. तुझ्याकडे मी दुर्लक्ष करत होतो.


राधा:"का मनोहर, माझ्याकडून काही चुकलं का?का दुर्लक्ष करत होतास तू?"

मनोहर:" राधा ,तुझं काहीच चुकलं नाही.तू तर परफेक्ट आहेस.सर्वांची काळजी घेणारी.सर्वाना सामावून घेणारी अशी आहेस"


राधा:"मग का मनोहर ?इतकं विक्षिप्तपणे वागतो आहेस माझ्याशी?

राधाला आता रडू कोसळलं. किती दिवस झालं तिने मनाला आवर घातला होता ,पण आज तिला रहावले नाही.


मनोहर:"राधा,तू रडू नकोस, चूक माझी आहे.विक्षिप्तपणे मी वागलो. मूर्खपणा माझ्याकडून झाला.तुला सर्वकाही विश्वासात घेऊन आधीच सांगितले असते तर आज ही वेळ आली नसती"


राधा:"प्लिज मनोहर जे काही असेल ते सांग.मीसुद्धा हा दुरावा नाही सहन करू शकत.खूप त्रास होत आहे मला"

मनोहर:"राधा खूप दिवस झाले मी विचार करत होतो .सांगावे; तुला पण माझ्याच्याने काही होत नव्हते.मला फार कठीण वाटत होते ;पण आज मी मनाचा निर्धार केला .सांगून टाकावे म्हणून..


राधा:"मनोहर ,जे काही आहे ते सांग,मला तुझ्यावर विश्वास आहे."


मनोहर: "राधा,तुला ती लता माहीत आहे ना?


राधा:"हो ,तीच मुलगी ना ,तुला ती आवडायची. ? नंतर तिचे लग्न झाले.


मनोहर :"हो तीच,जिच्या बाबतीत मी तुला सर्वकाही सांगितले होते"

राधा:"तिचे काय झाले?"


मनोहर:"राधा,तिचे लग्न झाले होते.ती खुशसुद्धा होती.तिचे लग्न झाल्यावर मी स्वतःहून कॉन्टॅक्ट तोडला.

कालांतराने तिला कळलं की तिच्या नवऱ्याचे बाहेर अफेअर आहे.त्यामुळे ती खचून गेली.डिप्रेशनमध्ये आली.तिला एक मुलगीही आहे.एक दिवस अचानक तिने मला फोन केला आणि म्हणाली :"मनोहर,मला तू माझ्या आयुष्यात पुन्हा हवा आहेस.मी माझ्या नवऱ्याला डिवोर्स दिला आहे.आपण पुन्हा एकत्र येऊया.आपण लग्न करू. सुखाने राहू.


मनोहर:"मी तिला आपलं लग्न झाल्याचे सांगितले ,पण ती म्हणते "तू तुझ्या बायकोला डिवोर्स दे"


हे ऐकून राधाच्या पायाखालची जमीन सरकली.


मनोहर:"मी तिला खुप समजावले. मी हे असे काही करू शकत नाही.पण ती म्हणते "मी तुला अडकवेल.तुझी पोलिसात तक्रार करेल. तुझं जगणं मुश्कील करेल.तू माझा गैरफायदा घेतला हे सांगेन. तू माझा झाला नाहीस तर ,तुझं जगणं मुश्किल करेल.


राधा:"किती विचित्र आहे ही बाई,स्वतःचा संसार नीट झाला नाही म्हणून दुसऱ्याचा संसार उध्वस्त करते,थांब तिला बघतेच मी .


मनोहर:"राधा,माझं डोकं बधिर झाले आहे.मला काही सुचत नाहीये.माझी काही चूक नाही.तरी पण ही लता असे माझ्याशी वागते.सतत डोक्यात तेच चालू आहे.राधा मी पुरता वेडा झालो.लता खरंच चांगली होती.ती अश्या थराला जाईल असे कधी वाटलंच नव्हते.मी इतका खचून गेलो होतो की , मी मानसोपचारतज्ञ ह्यांच्याकडे गेलो.कौन्सिलिंग केली.ध्यान केले.खूप काही केले राधा मी ,मला ह्याच्यातून बाहेर पडायचे होते.काही केल्या मला मार्ग दिसत नव्हता.मी तिचा नंबर ब्लॉक केला.ती दुसऱ्या नंबर वरून मला त्रास देऊ लागली.तिने मला सहा महिन्याचा वेळ दिला आहे.आता एक महिना बाकी आहे..ती मला रोज फोन करते आणि पाठी पडते.कशी सुटका करू काही समजत नाही.राधा,मी ड्रिंकच्या आहारी गेलो.नशेत असलं की सर्व विसरायला होतं. हेच कारण होतं राधा.ड्रिंकच्या आहारी गेलो आणि मी तुलाही विसरलो.आपल्या नात्यात विरह आला.तुझ्यासोबत खुश राहायचे होते राधा;पण माझं डिप्रेशन इतकं वाढलं. त्या विळख्यातून बाहेर पडत असताना,मी तुझ्यापासून दूर झालो.खूप स्वार्थी झालो.सॉरी राधा,मी हे सर्व तुझ्यासाठी केले ;कारण तू मला हवी होतीस. तुझ्यापासूनच दूर गेलो राधा.तुझ्यापासून फार दूर गेलो .सॉरी राधा..

मनोहर ढसाढसा रडू लागला..


राधा:"मनोहर,तू मला आधीच का सांगितले नाही?


मनोहर:"माझी खूप इच्छा होती ,तुला सांगायचा खूप विचार केला,पण काही केल्या मला जमलं नाही"


राधा:" आपलं नातं इतकं कमजोर होतं का? मी लग्न केले आहे तुझ्याशी. तुझ्या सुख दुःखात साथ देण्यासाठी आले आहे .तुला समजून घेणार नाही असे होईल का?.मनोहर तूही हवा आहेस मला...लता सारख्या विकृत बाईसाठी तू डिप्रेशन मध्ये गेला.अगदी तुझी ट्रीटमेंट चालू आहे ,इथंवर परिस्थिती आली आणि तरीही तू सर्व सहन करत राहीला.

मनोहर, मी गेल्या अनेक महिन्यापासून कशी जगते आहे माहीत आहे. तू माझ्यासोबत असूनही नसल्यासारखा होता.तुझ्या सहवासासाठी किती आतुर झाले होते माहीत आहे. मला रोज वाटायचे तू मला मिठीत घेशील.नेहमीप्रमाणे माझ्या डोक्यावर हात फिरवशील.माझ्याशी मनसोक्त गप्पा मारशील पण काहीच होत नव्हतं रे. खूप मिस केले रे मनोहर तुला.तू तो राहिलाच नव्हता. ज्या मनोहरच्या प्रेमात पडले होते.ज्याने माझ्या आयुष्यात प्रेमाचे, सुखाचे रंग भरले. तोच आता कुठेतरी हरवून गेला होता.मनोहर हा त्रास मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.खूप त्रास झाला मला.

मनोहर जे झालं ते झालं पण आता तू मला वचन दे ,ह्यापुढे तू काहीही लपवून ठेवणार नाही..असे अनेक प्रसंग येतील आयुष्यात ,चढ उतार कायम असतील पण आपण दोघांनी एकेमकांचा हात हातात घट्ट पकडून रस्ता गाठायचा..मनोहर तुला माहीत आहे मी काय स्वप्न पाहिले आहे? " तू ८० वर्षाचा होशील आणि मी ७७ तेव्हा आपण आपल्या गावच्या वाड्यात आपल्या नातवंडासोबत खूप खेळायचे.तेव्हाही एकेमकांचा हात हातात घट्ट पकडून ,एकमेकांच्या खांद्यावर डोकं ठेवून भूतकाळातल्या गोड आठवणीत रमून जायचे..

हे सर्व बोलताना राधाच्या डोळ्यात अश्रूंच्या धारा वाहू लागल्या.

मनोहरने तिचे डोळे पुसले .
मनोहरचाही कंठ दाटून आला..


राधा पुढे बोलू लागली."मनोहर ,तुझ्यासोबत खूप दुरवर स्वप्न पाहिली आहेत,माझी साथ नको सोडू"


मनोहर:"नाही राधा,तुझी साथ मला द्यायची आहे.माझं आयुष्य आहे तू राधा.तुला वचन देतो ह्यापुढे कोणतीही गोष्ट मी लपवनार नाही"


पुन्हा दोघे वचनबद्ध झाले होते.

दोघेही जेवले आणि घरी परतीच्या प्रवासास निघाले.


मनोहर राधाला म्हणाला :",राधा,एक वचन तू मला दे .हे जे काही आहे ते आई बाबाना नको कळायला.आपल्यात जो काही संवाद झाला आहे तो आई बाबांना नको सांगू,उगाच त्यांना मनस्ताप होईल"


राधा:"ठीक आहे मनोहर हे आपण आपल्या पर्यंत ठेवूया"


मनोहर:"थँक्स राधा"


राधा:"मनोहर, आता तू मला प्रॉमिस कर,तू ह्यापुढे ड्रिंक करणार नाही..दारू प्यायल्याने प्रश्न नाही सुटत ,उलट दारू प्यायल्याने शरिरावर वाईट परिमाण होतात,मानसिक संतुलन बिघडते.जर तुला मार्ग काढायचा असेल तर धीर धरून ,कोणत्याही नशेच्या आहारी न जाता मार्ग सोडवता येईल हे लक्षात ठेव.टेम्पररी सुखासाठी तू काय करत होता माहीत आहेस ? तू स्वतःला पर्मेनंट त्रास करून घेत होतास.तू असलं काहीच करणार नाही,मी तुझ्यासोबती आहे"


मनोहर:"राधा,किती बरं वाटलं माहीत आहे ,तुझ्या तोंडातून हे ऐकून.तू माझ्या सोबत आहे हे ऐकून माझा अर्धा ताण नाहीसा झाला..


राधा:"मनोहर आता काळजी करू नको,आपण दोघे मिळून मार्ग काढू"


मनोहर:"मला माहीत आहे राधा,तू नक्कीच मार्ग काढशील"


दोघेही घरी आले होते.

सासू सासरा दोघेही झोपले होते.


मनोहर राधा दोघेही बेडरूममध्ये गेले.


मनोहरने राधाला घट्ट मिठीत घेतले.

राधा:"मनोहर सोड ना मला"


मनोहर:"आज तुझं ऐकणार नाही, तू माझ्या तावडीत चांगली सापडली आहेस"


राधाही मनोहरच्या खांद्यावर मान ठेवून विसावली. आनंद अश्रुनी दोघेही एकमेकांत रममाण झाले..


दुसऱ्या दिवशी राधाने सुट्टी घेतली..

सासूने तिला सुट्टी का घेतली विचारले असता ,मैत्रिणीला भेटायचे आहे संगीतले. तीची एक मैत्रीण वकील होती .चित्रा. तिला जाऊन भेटली. चित्राने तिला लताविषयी पुरावे गोळा करण्यास सांगितले.

लता खोटं बोलते आहे ,हे सिद्ध झाले पाहिजे..

राधाने मनोहरला फोन केला ,लता खोटं बोलते आहे हे सिद्ध करावे लागेल हे सांगितले.

मनोहर म्हणाला ठीक आहे.

मनोहरनेही ऑफिसमधून half day घेतला ..

राधाने त्याला प्लॅन सांगितला..

लताला भेटायला हॉटेलमध्ये बोलवले..

लताही आली.

मनोहर आधीच बसला होता.

मनोहरच्या शेजारीच असलेल्या टॅबलपाशी राधा मास्क घालून बसली होती.

मनोहर आणि लताचे जसे संभाषण सुरू झाले तसे राधाने video काढायला सुरू केला.लताला अजिबात doubt येऊ नये ह्यासाठी राधाने पुरेपूर काळजी घेतली होती.


लता बोलू लागली.

"काय ,मनोहर घेतला की नाही डिवोर्स बायकोकडून"


मनोहर:"लता, मी माझ्या बायकोला डिवोर्स नाही देऊ शकत"

लता:"हे ऐकण्यासाठी आले नाही मी,काहीही कर आणि तिला डिवोर्स दे.मला तू हवा आहेस बस,इतकंच माहीत मला"


मनोहर:"मी माझ्या बायकोबरोबर खुश आहे,किती वेळा मी सांगितले आहे तुला ,पण तू का नाही समजून घेत.काय वेडेपणा आहे.मला एक मुलगाही आहे"


लता:"मला माहीत नाही,मला तू हवा आहे"


मनोहर:"मी नाही तसलं काही करणार ,तू तुझा मार्ग बघ"


लता चवताळली ."तू नाही ऐकणार माझं?


मनोहर:"अजिबात नाही"


लता:"तुला बघ मी कशी तुरुंगात टाकते..चांगलं सडवते. तू माझ्याशी गैरवर्तन केले असे सांगते.मग बघ फजिती"


मनोहर:"का खोटं बोलते आहे लता, मी तुझं काय बिघडवलं आहे?असे खोटे आरोप लावून तुला काय मिळणार?


लता:"तू माझं काही बिघडवलं नाही,पण मला माझं आणि माझ्या मुलीचे आयुष्य आनंदी हवे, म्हणून मला तू हवा.माझ्या मुलीला बाबा,आणि मला नवरा हवा म्हणून मला कितीही कठीण पाऊल उचलावे लागले तरी मी उचलेल.असंही तू माझ्यावर प्रेम करायचा ना?


मनोहर:"लता, तो भूतकाळ होता ..मी तुझ्यावर प्रेम करायचो .ते अल्लड वय होतं माझं. मी खरं प्रेम माझ्या बायकोवर करतो.तुझ्या नवऱ्याने अफेअर केले ,तुला मनस्ताप झाला.तू दुःखी झाली.पण आता तुसुद्धा तेच करते आहे.चुकीचे पाऊल उचलते आहे.तूझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे.तुझी तुला कळत नाही .तू काय करते आहे.तुझं आयुष्य उध्वस्त झाले म्हणून ,तू माझेही आयुष्य उद्धवस्त करते आहेस.थोडा विचार कर.


लता:"खूप विचार केला,आता नाही विचार करणार..असंही कायदे बायकांच्या बाजूने असतात .तू अडकशील.तूच विचार कर आता.."

मनोहर:"लता ,कायदे बायकांच्या संरक्षणासाठी असतात,बायकांनी त्याचा गैरवापर करण्यासाठी नाही.तू तेच करायला चालली आहेस.तू चुकीचे वागते आहेस"


लता:"तू मला कायदे नको शिकवू,तू डिवोर्स दे बायकोला नाही तर जेल मध्ये जा"


मनोहर:"नाही,मी असलं काही करणार नाही"

लता:"मी आताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये जात आहे,तुझी तक्रार करते"


मनोहर:"जा कर"

लता:"तुला काय वाटतं ,मी खोटं बोलते आहे का??

मनोहर:"जा तू ,जा काय खोटे आरोप लावायचे ते लाव"


हे सर्वकाही राधाने रिकोर्ड केले..


राधा उठली आणि तिने लताचा हात घट्ट पकडला.तिच्या जोरात कानाखाली दिली
..


लता:"कोण आहेस गं तू?"


राधाने तोंडावरचा मास्क खाली केला.मीच आहे राधा..मनोहरची बायको"


लता चक्रावली.तिने सोंग घेतले.

लता:"ताई, तुम्ही मला मारण्याएवजी,तुमच्या नवऱ्याला मारायला हवे.ह्याने माझा गैरफायदा घेतला आहे.माझी अब्रू लुटली.."

असे म्हणून रडू लागली.


राधा:"किती नालायक आहेस गं तू?किती चेहरे लपवले आहेस..मला मनोहरने सर्व सांगितले आहे.तुझं खरं रूप कळलं आहे मला..आता जास्त ढोंग करू नकोस.तुझ्या ढोंगाला मी बळी पडणार नाही.खोटे आरोप लावायला लाज वाटत नाही का तुला??


लता हसू लागली.

"नाही वाटत मला काही,आता थांब तू .तुला पण आत टाकते. तुम्ही दोघे नवरा बायको एकत्र जा आतमध्ये. प्रश्नच मिटला..

ती मनोहरकडे पाहून म्हणू लागली.."काय मनोहर, तुझ्या बायकोला सोनं लागलं आहे का?.जे तिच्याकडे आहे तेच माझ्याकडे आहे..


राधा:"किती क्षुद्र आहेस गं तू.स्त्री ह्या नावाला कलंक.स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी झाली म्हणून दुसऱ्याचे आयुष्य उध्वस्त करते.तू दया करण्याच्या लायकीची नाहीस.."


लता:"मजा पहा तुम्ही दोघे नवरा बायको. तुम्हीच याल आता माझ्याकडे हातपाय जोडत"

मी जातेय पोलीस स्टेशन मध्ये..


लता ठसक्यातच उठली .


मनोहर:"लता, जाता जाता मोबाईलवर क्लिप आली आहे ती फक्त बघून घे एकदा"


लताने मोबाईल पाहिला तर त्यात तिचा,मनोहरचा आणि राधाचे आता जे काही बोलली होती ते सर्व विडिओ होते.


लता घाबरली,घाम फुटला ..

राधा:"लता, हे video आम्हीच देणार आहोत पोलिसांना. जा तू कर कॉम्प्लेट.

लताने आता केविलवाणा चेहरा केला
ती मनोहर आणि राधाचे पाय पकडून माफी मागू

"नको,नको असे काही करू नको.माझे आयुष्य बरबाद होईल,.माझ्या मुलीला कोण बघणार?pls delet करा ती क्लिप.

राधा:"आता ते शक्य नाही.आम्ही आताच्या आता पोलिसांना ही video पाठवतो आहे"


लताने मनोहरच्या पायावर डोके ठेवले. म्हणाली"मनोहर, प्लिज मला माफ कर. माझी बुद्धी खरंच भ्रष्ट झाली होती.मी ,माझ्या मुलीच्या प्रेमापोटी हे चुकीचे पाऊल उचलत होती.तुझ्यावर खोटे आरोप लावले, मानसिक त्रास दिला.त्यासाठी मी माफी मागते.मी पुन्हा असे करणार नाही. पाहिजे तर मी हे शहर सोडून जाते ; पण ही क्लिप नको देऊ पोलिसांना.."


मनोहर:"पाहिलेस लता, किती त्रास होतो ..तू तर माझ्यावर खोटे आरोप लावले, माझे खच्चीकरण केले.माझ्या बायकोला डिवोर्स दे म्हणून पाठी पडली. किती त्रास झाला मला हे तुला आता कळाले ना?


राधा:",लता, किती विचित्र वागली तू.स्त्री ही स्त्रीची शत्रू असते ऐकले होते पण आज पाहिलेही .खूपच खालच्या थराला जावून वागली. मनोहरने मला लग्नाआधी तुझ्याविषयी सर्व सांगितले होते. तुझ्यावर खरं प्रेम केले होते.तुझ्यासारख्या विकृत मुलीच्या प्रेमात पडला हीच चूक झाली.तुझ्या आयुष्यात असा turn आला म्हणून तू मनोहर तुझ्या आयुष्यात यावा म्हणून ह्या थराला गेलीस.अगदी त्याचे लग्न झाले,मुल झाले ,त्याचा संसार सुखाचा चालू आहे हे सर्व माहीत असून सुद्धा इतकी खालच्या थराला जाऊन वागलीस. खरंच स्त्री च्या जातीला तू मोठा डाग आहेस.

तुझ्यासारख्या विकृत बुद्धी असलेल्या बाईला चांगलं चाबकाने फोडून काढले पाहिजे.


लता:"मला माझी चूक कळली,मी मनोहरच्या आयुष्यातुन निघून जाते .नेहमीसाठी..मी माझ्या मुलीची शपथ घेते.खरंच मी पुन्हा त्रास देणार नाही..

ती खूप रडू लागली.


मनोहर:"तू असं काम केले आहेस की तुझ्यावर दया सुद्धा दाखवू वाटत नाही..चालती हो इथून, पुन्हा आमच्या आयुष्यात येऊ नकोस..कधीच तुझं तोंड दाखवू नकोस"


लता डोळे पुसतच निघून गेली..


मनोहर आणि राधा एकमेकांना बिलगून रडू लागले.


आज एका सावित्रीने ,सत्यवानाला खऱ्या अर्थाने साथ दिली होती.राधाने ,मनोहरला मोठ्या संकटातून बाहेर काढले होते..


मनोहर:"राधा,तू आज मला ह्या संकटातून बाहेर काढून खरंच मोठं काम केलंस. मी तुझे उपकार विसरू शकत नाही.."


राधा:"मनोहर, तुझा त्रास काही वेगळा का?तुला त्रास झाला तर मलाही त्रास होणारच ना?लग्नाची बायको आहे मी तुझी. लग्न हे बंधन आहे . असे पवित्र बंधन ज्याच्यात एकदा बांधल गेलं ना तर त्यातून सुटका नाही.तुझ्या सुख दुःखात साथ देण्यासाठी मी नेहमी कायम तुझ्यासोबती होती,आहे आणि राहील.


मनोहरने तिला घट्ट मिठी मारली.ती त्याच्या आयुष्यात किती महत्वाची आहे, ही त्याची करकचून मारलेली मिठी ग्वाही देत होती...


हॉटेल मध्ये गाणं हलक्या आवाजात सुरू झाले.


"तू हवीशी मला ,तू हवीशी
आज कळले तुला तू हवीशी.

भास सारे कालचे आज जे झाले खरे
तरी का हुरहूर वाटे आपुलीशी
हे नव्याने काय घडले ?पाऊले रेंगाळती
तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळती.


सोबतीने चालते .भोवताली वाहते.
बंध जुळले ह्या मनाचे त्या मनाशी.

तू हवीशी मला ,तू हवीशी.


खरंच मनोहर आणि राधाचे बंध इतके घट्ट जुळले होते, की कोणतीही गोष्ट त्याला तोडू शकत नव्हती..

असो अंत भला तो सब भला.
मनोहर आणि राधा प्रेमाच्या आणि विश्वासात भिजले ते नेहमीसाठी. सुखाचा संसार केला.हो आणि ते राधाने जे स्वप्न पाहिले होते ते गावच्या वाड्यात नातवंडासोबत खेळायचे ते सुद्धा पूर्ण झाले. किती छान ना..असाच असतो ना संसार. येणाऱ्या संकटांना तोंड देऊन,साथीदाराला पाठींबा देऊन संसाराची नौका पार करावी लागते आणि शेवटी सुंदर असे दृश्य वाट पहात उभे असते.

समाप्त.

©® अश्विनी कुणाल ओगले.
कसा वाटला शेवटचा भाग .नक्की कंमेंट मध्ये सांगा...आम्हा लेखकांना तुम्हा वाचकांचे कंमेंट नेहमीच हवेसे आहेत.कथा आवडली असेल तर कंमेंट, शेअर जरूर करा.धन्यवाद..पुन्हा लवकरच भेटू नव्या कथेसोबत.धन्यवाद.





🎭 Series Post

View all