तू हवीशी मला भाग ३

राधाचा सासरा हा फार मस्करी करणार्‍या स्वभावातला होता तो म्हणाला "असेही आपण काही आता म्हातारे झालो नाही, तू म्हणत असशील तर उद्याच्या उद्या आपण फोटो शूट करायला जाऊ " हे ऐकून राधाची सासू वीस वर्षाच्या तरुणी सारखी लाजली आणि म्हणाली "काय हो तुम्ही पण ना, बघत नाही सून बाजूला बसली आहे, काहीही बोलता .तुमच्या जिभेला काही हाड" दोघांचे बोलणे ऐकून राधाला हसू आवरेना. तीसुद्धा खळखळून हसायला लागली आणि ती मुद्दामून म्हणाली "हो बाबा , तुम्ही बरोबर बोलत आहात. तसा हा तुमचा चांगलाच विचार आहे. करूया का व्हिडिओ शूट ? सासरा सासुकडे बघत म्हणाला "का नाही मी तर एका पायावर तयार आहे आहे"सासू म्हणाली:"तुम्ही सून आणि सासरा दोघेही माझी मस्करी करत आहात ना?येऊ दे माझ्या लेकाला,नावच सांगते तुमच्या दोघांचे.सासरा म्हणाला:"माझी सून आणि मी खंबीर आहोत तुम्हा माया लेकांचा सामना करायला"
राधाने  फोन कट केला. मनोहरला कळून चुकले राधा रागावली आहे, तर उगाचच नको तिचा अजून रोष ओढवून घ्यायला. त्याने पार्टीला जाणं कॅन्सल केलं .

राधाला त्याने आज सरप्राईज द्यायचा विचार केला .असेही काल राधा जे काही बोलली होती ते त्याच्याही मनाला लागलं होतं , आपण नकळतपणे आपल्या बायकोला त्रास दिला याची त्याला मनोमन खंत वाटत होती. त्याने विचार केला आज राधाला छान डिनरला घेऊन जाऊया आणि मुव्हीचा प्लॅन करूया .


राधाला पुन्हा सॉरी बोलण्यासाठी फोन केला ;पण राधाने फोन काही उचलला नाही; म्हणून त्याने राधाच्या व्हाट्सअप वर मेसेज पाठवला "आय एम सॉरी बायको" राधाने तो मेसेज पाहिला आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आले.


तिने मेसेज पाहिला पण त्याला काहीच रिप्लाय दिला नाही. तिला असेच वाटत होते की तो आजही पार्टीला जाणार .त्याचे मित्र म्हणजे त्याचा जीव की प्राण होते .आपण तर त्याच्या आयुष्यामध्ये दुय्यम स्थानावर आहोत.


मनोहर सतत काहीना काही मॅसेज पाठवून तिचा मूड फ्रेश करण्याचा प्रयत्न करत होता. मनोहर मॅसेज पाठवत असला तरी राधा काही एकाही मेसेजचा रिप्लाय देत नव्हती. मनोहर मॅसेज पाठवतो आहे हे पाहून राधाचा काही अंशी राग निवळला होता; पण तरीही तिची मनोमन इच्छा होती की मनोहरने पार्टीला जाऊ नये.


राधाला कुठे तरी समाधान वाटले. आपण मनोहरला जे काही म्हणालो ते बरंच झालं कमीत कमी त्याला जाणीव करून दिली की त्याच्यामुळे किती त्रास होत आहे ते .आणि म्हणूनच आज त्याचा हा खटाटोप चालू आहे. नाहीतर कित्येक दिवस झालं साधं जेवलीस का? काय करते आहेस ?असा मॅसेज सुद्धा पाठवत नव्हता.


मनोहर ने जणू आज निश्चयच केला होता वेगवेगळे मजेशीर इमोजीस पाठवून तो राधाला खुश करत होता. मनोहरला आजही आपल्या न बोलण्याचा ,आपल्या रागाचा परिणाम होतो हे कळून चुकलं होतं. म्हणजे आजही त्यांच्या आयुष्यामध्ये माझे स्थान आहे आणि तो दारूच्या आहारी गेला असला तरीसुद्धा त्याच्यासाठी मी महत्त्वाची आहे हा विचार राधाला सुखावून गेला.

ती मनोमन स्वामींकडे प्रार्थना करत होती "स्वामी माझ्या नवर्‍याला सद्बुद्धी दे आणि त्याने चुकीच्या मार्गावर जाऊ नये हीच माझी इच्छा आहे. स्वामी माझ्या संसाराचे रक्षण करा. मला मनोहर सोबत सुखाचा संसार करायचा आहे."

रस्त्याने चालत असताना तिला नवरा बायकोची एक जोडी दिसलली . ते दोघे एकमेकांचा हात घट्ट पकडून , ठेवून बसले होते . त्या बाईच्या हातामध्ये एक लाल गुलाबाचं फुल होतं नक्कीच तिच्या नवऱ्याने दिले असणार. किती खुश होते दोघे .किती प्रसन्न होता त्या बाईचा चेहरा आणि तो सुद्धा किती प्रेमाने तिच्याकडे बघत होता. तिच्या गालावर आलेली बट किती प्रेमाने त्याने बाजूला केली होती ,ती किती लाजली होती. दोघे एकमेकांच्या डोळ्यांमध्ये जणू विसरून गेले होते की आजूबाजूला जग आहे. हे किती पवित्र नातं नवरा-बायकोचं आपलेही अगदी तसंच होतं ना?


आता तर असं काहीच उरलं नाही. या दुखी भावनेने ती पुन्हा निराश झाली.
विलक्षण होते मागचे दिवस.

लग्न जमले होता तेव्हा मनोहर किती खूश झाला होता. अगदी त्याची इच्छा असायची की रोज भेटावं म्हणून ;पण ऑफिसच्या कामामुळे ते कधीही शक्य झाले नाही. आठवड्यातून एकदाच भेटायचो पण किती तन्मयतेने बोलायचा. तो वेळ ,काळ सगळं काही विसरून फक्त माझ्यामध्ये विरघळून जायचा. त्याचं ते बोलणं, त्याचे ते डोळ्यातले हावभाव सर्वकाही किती सुखाऊन जायचं. रात्रीचे एक वाजले तरीसुद्धा तो मला घरी जाऊ देत नसे आणि मुद्दामून उशीर करत असे आणि घरी सोडण्याच्या बहाण्याने जितका वेळ घालवता येईल एकमेकांसोबत तितका तो प्रयत्न करायचा.


लग्नानंतर पहिल्यांदा जेव्हा माहेरी जात होते तेव्हा किती चेहरा पाडून बसला होता. मी फक्त चार दिवसांसाठी माहेरी जाणार होते तरीपण लहान मुलागत त्याने मला मिठी मारली होती. आणि म्हणाला होता " राधा लवकर ये" .

त्याच्यासाठी मी फक्त दोन दिवसात परत आले होते. किती खूष झाला होता, अगदी सर्वांसमोर त्याने मला मिठी मारली होती. किती लाजल्यासारखं झालं होतं. आई बाबा दोघेही हसत होते आमच्याकडे पाहून. त्याचा वेडेपणा मला प्रेमात पाडण्यासाठी भाग पाडत होता. त्याचे असं वागणं मला हवंहवंसं वाटत होतं. एक दुजे के लिये झालो होतो . त्याच्या शिवाय मी आणी माझ्याशिवाय तो एक मिनिट सुद्धा राहू शकत नव्हतो. मी जेवले नसेल तर तोही जेवत नसे .सुरुवातीला एका ताटात जेवायचो. सासू-सासऱ्यांचं लक्ष नसेल तर तो अगदी स्वतः मला घास ही भरवत असे आणि आता मात्र विचारतसुद्धा नाही जेवली का म्हणून? माझ्यासोबत वेळ घालवण्यासाठी त्याची धडपड नेहमीच पाहत होती अगदी सगळेच दोघांची मस्करी करायचे. नणंद नेहमीच म्हणायची "वहिनी तू खूप लकी आहेस तुला दादा सारखा नवरा भेटला आहे".


मी नशीबवान होते , जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला होता. आई वडीलांसारखे प्रेम करणारे सासू सासरे होते. सासरी आली तरी मला कधी माहेरची आठवण आली नाही. माहेरी गेली तर कधी एकदाची सासरी येते असे व्हायचे. माहेरी जरी गेली तरी फोन वरच्या गप्पा काही संपता संपत नव्हत्या. सतत फोन करून विचारायचा काय करते? जेवलीस का नाही? ज्या दिवशी मी माहेरी जायचे लगेच दुसऱ्या दिवशी मला भेटायला यायचा. म्हणायचा तू घरात नसली की माझे मनच लागत नाही .तुला पाहिल्या शिवाय माझं मनच भरत नाही.अगदी एकेक फिल्मी डायलॉग फेकून मारायचा. आता तर तसा बोलत नाही पण नॉर्मलसुद्धा राहात नाही. किती ओढ होती मलाही आणि त्यालाही. माझी ओढ तर अशीच कायम राहिली पण मनोहर ची ओढ कुठे हरवली?



इथे मनोहरने पटकन रात्रीच्या शोची दोन तिकिटं काढली आणि घरी आईला सांगितले राधा आणि मी आज बाहेर जेवायला जाणार आहे. तिला ह्यातलं काही सांगू नको .


राधाची सासूही पाहत होती की, मनोहचे राधाशी वागणं बदललं आहे. राधा काही महिने झाले शांत शांत झाली आहे. पहिल्यासारखी वागत नव्हती . तिच्या चेहर्‍यावरचे हास्य मावळले होते. सासूने निरक्षण केले होते .शेवटी एक स्त्रीच स्त्रीला समजून घेऊ शकते . राधा दमून भागून घरी येत असे आणि त्यात तिची मनस्थिती ही पहिल्या सारखी राहिली नव्हती . म्हणून सासू राधा घरी येण्याच्या आधीच अर्ध्यापेक्षा जास्त कामं आवरून घेत असे, जेणेकरून तिला मनोहर सोबत थोडातरी वेळ घालवता येईल. आज तर मनोहरने फोन करून सांगितले होते त्याच्यामुळे राधाच्या सासूने आधीच त्यांच्यापुरते जेवन बनवले होते. मनोहर आणि राधाचे जेवण बनवले नव्हते; कारण की ते लोकं दोघेही बाहेर जाणार होते .


राधा कामावरून आली .

सासूने विचारले कसा गेला "आजचा दिवस राधा?"

राधा स्मितहास्य करत म्हणाली " छान गेला आई"

ती रूम मध्ये फ्रेश होण्यासाठी निघून गेली. फ्रेश होऊन ती रूम मधून बाहेर आले आणि किचनमध्ये जायला निघाली.

सासू म्हणाली "राधा आज मी सर्व जेवण बनवलं आहे"

राधा म्हणाली "आई हल्ली तुम्ही रोज रोज जेवण बनवता , उगाच तुम्हाला त्रास. मी आल्यावर करत जाईल जेवण."

राधाची सासू म्हणाली "ठिक आहे गं राधा. जितकं मला जमतं आहे तितकं करत जाईल. जोपर्यंत हात पाय चालू आहे .तोपर्यंत हालचाल करत राहायची आणि असंही मला एका ठिकाणी बसायला आवडत नाही तुला तर माहीतच आहे ना".


राधाच्या सासूने मनोहर आणि राधाच्या लग्नाचे विडिओ लावले आणि पाहत बसली.राधा हॉलमध्ये आली पाहते तर त्यांच्या दोघांच्या लग्नाचे व्हिडिओ पाहत होत्या.

राधाला पाहून सासू म्हणाली "राधा ये ना बस, किती दिवस झाले तुमच्या लग्नाचे व्हिडिओ पाहिले नाही. राधा बाजूला जाऊन बसली.

अर्णवसुद्धा आज लवकर झोपून गेला होता.त्यामुळे आज सासू सुना आरामात व्हिडिओ पहात बसल्या होत्या.

मनोहर जेव्हा राधाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालत होता किती सुंदर क्षण होता. ती अगदी भरल्या डोळ्याने पाहत होती. तिच्या भांगामध्ये कुंकू भरत असताना त्याने अलगद तिच्या हनुवटीवर हात ठेवला होता .एकेक करून सर्व क्षण आज जसेच्या तसे आठवू लागले. फोटोग्राफर जेव्हा म्हणाला होता दोघांनी एकमेकांच्या डोळ्यात पहा तेव्हा राधा आणि मनोहर दोघेही लाजले होते .मनोहरच्या खांद्यावरती अलगद डोकं ठेवत असतानाचा क्षणही काही निराळाच होता.त्या क्षणाला तिने स्वतःला त्याच्या पूर्णपणे स्वाधीन केले होते. तिच्या डोळ्यांमधून नकळत पाणी आले .लगेच तिने डोळ्यातील पाणी पुसले.

सासूही अगदी मन लावून व्हिडिओ पाहत होती. व्हिडिओ पाहत असताना राधाला ती म्हणाली "खरंच तुम्ही आज कालची पोर किती नशीबवान आहात, किती साऱ्या आठवणी आहेत ,प्री वेडिंग फोटो ,लग्नातले फोटो, बाहेर हनिमूनला फिरायला गेल्यावरचे फोटो.बाळ होण्याच्या आधीसुद्धा फोटोशूट करता..विडिओ काढता . आमच्या वेळेला एकच फोटो आणि तोसुद्धा ब्लॅक अँड व्हाईट तेच पाहून मनाचे समाधान करून घ्यावे लागते..असं वाटतं पुन्हा पाठी जावं आणि सर्व काही क्षण नव्याने वेचावे.

तेवढ्यात राधाचे सासरे बाहेरून आले आणि म्हणाले काय चालू आहे दोघींच्या गप्पा? सासू म्हणाली काही नाही हो.मी राधाला म्हणत होते " तुम्ही पोरं किती नशीबवान आहेत, किती साऱ्या आठवणी आहेत आणि आपल्या वेळेला तसं काही नव्हते"


राधाचा सासरा हा फार मस्करी करणार्‍या स्वभावातला होता तो म्हणाला "असेही आपण काही आता म्हातारे झालो नाही, तू म्हणत असशील तर उद्याच्या उद्या आपण फोटो शूट करायला जाऊ "

हे ऐकून राधाची सासू वीस वर्षाच्या तरुणी सारखी लाजली आणि म्हणाली
"काय हो तुम्ही पण ना, बघत नाही सून बाजूला बसली आहे, काहीही बोलता .तुमच्या जिभेला काही हाड"

दोघांचे बोलणे ऐकून राधाला हसू आवरेना. तीसुद्धा खळखळून हसायला लागली आणि ती मुद्दामून म्हणाली "हो बाबा , तुम्ही बरोबर बोलत आहात. तसा हा तुमचा चांगलाच विचार आहे. करूया का व्हिडिओ शूट ?
सासरा सासुकडे बघत म्हणाला "का नाही मी तर एका पायावर तयार आहे आहे"


सासू म्हणाली:"तुम्ही सून आणि सासरा दोघेही माझी मस्करी करत आहात ना?

येऊ दे माझ्या लेकाला,नावच सांगते तुमच्या दोघांचे.

सासरा म्हणाला:"माझी सून आणि मी खंबीर आहोत तुम्हा माया लेकांचा सामना करायला"


सासू:"थांबाच आता ,येईलच तो पाच मिनिटात"

राधा मनातल्या मनात म्हणाली कसला येतो आहे पाच मिनिटात ,त्याला तर पार्टीला जायचे आहे.


ती असा विचार करायला आणि मनोहर दारात उभा.


सासू म्हणाली:"आता होऊन जाऊ द्या लढाई"

मनोहर:"कसली लढाई?"

राधाने मनोहरला पाहिले आणि ती आतल्या आत खुश झाली .


क्रमशः

अश्विनी कुणाल ओगले.
कथा आवडत असेल तर नक्की लाईक, कंमेंट ,शेअर करा...धन्यवाद.





🎭 Series Post

View all