राधा दिवसभरात कामांमध्ये असली तरीसुद्धा ती चिंतीत झाली होती . मनोहर कडे लक्ष लागून राहिले होते.
नक्कीच हा आता शब्दाला जागेल का?
दारू पिणार तर नाही ना ?असे अनेक प्रश्न तिच्या मनाला भेडसावत होते. आणि ती मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होती मनोहरने पुन्हा दारूला स्पर्श करू नये.
दारू पिणार तर नाही ना ?असे अनेक प्रश्न तिच्या मनाला भेडसावत होते. आणि ती मनातल्या मनात देवाकडे प्रार्थना करत होती मनोहरने पुन्हा दारूला स्पर्श करू नये.
राधाला वाटले की ,आपण जरा जास्तच मनोहरला कणखरपणे बोललो की काय ? चूक त्याची होतीच. तो सुद्धा कुठेतरी दुर्लक्ष करत होता .तो घरी आल्यावर, कुणाशी काही बोलत नसे. सरळ जाऊन झोपी जात असे. कुठेतरी संवाद संपला होता.नात्यात दुरावा येत होता.आणि लग्नाला फक्त दोन वर्ष झाले होते त्यामुळे राधाची अशी अपेक्षा होती की, मनोहरने ही स्वतः पुढाकार घेऊन नातं निभावण्यासाठी मदत करावी. त्यामुळे राधा अशी बोलली होती.
तिच्या खास मैत्रिणीने नेहाने तिची अस्वस्थता जाणली.
नेहाने राधाला विचारले " राधा मी खूप दिवस झाले आहे पाहते आहे. तू किती सखोल विचारात गुंतली आहेस. कोणाशी काही बोलत नाही .अगदी स्वतः मध्ये आहेस. काही प्रॉब्लेम आहे का? तुला काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग मी तुला मदत करेन.
नेहा बोलली आणि राधा जरा चमकली; कारण की खूप दिवस झाले राधाचा स्वभाव सुद्धा बदलला होता. ती सुद्धा विचारातच होती .
त्यामुळे ऑफिसवरून लवकर घरी जात असे. आल्यावर ती ही जास्त कोणाशी बोलत नव्हती .फक्त कामाकडे लक्ष देत होती आणि हे नेहाने हेरले होते.
राधाचे वेगळेच व्यक्तिमत्व होते . ती वाहत्या झऱ्याप्रमाणे होती. ऑफिसला आली की, ती सर्वांशी गप्पा मारत , मस्करी करत असे. कामंही जिथल्या तिथे करत असे. तिला माणसांमध्ये मिसळायला खूप आवडायचे. सर्वांशी बोलून चालून राहिलेलं तिला खूप आवडायचं . त्याच्यामुळे ती ऑफिसला आली की वेगळेच प्रसन्न वातावरण निर्माण होत असे आणि मनोहरच्या अशा वागण्यामुळे ती सुद्धा कुठेतरी शांत झाली होती. तिचे स्वतःच्या कामात मन लागत नव्हतं. तिच्या वागण्यामध्ये कमालीचा बदल झाला होता. हे तिला सुद्धा कळत नव्हते; पण नेहा तिची खूप खास मैत्रीण होती .प्रत्येक गोष्ट तिच्या बरोबर शेअर करत असे. त्याच्यामुळे नेहाने आज हा विषय काढला होता .तिला राधाची अशी अवस्था बघवत नव्हती.राधा नक्कीच कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये आहे हे तिला जाणवलं आणि तिने स्पष्टपणे विचारलं.
राधा विचार करू लागली नेहाला घरातलं सांगू की नको? खरं तर ती कोणालाही याबाबत सांगणार नाही हे जाणून होती. आपण जरी काही गोष्टी शेअर केल्या तरी काही ती तिऱ्हाईत व्यक्तीला सांगणार नाही.पण तरी तिने न सांगण्याचा विचार केला.
विषय टाळण्यासाठी ती नेहाला म्हणाली की, "काही नाही गं, मला जरा बरं वाटत नाही. डोकं दुखत आहे "
नेहा तिच्या डोळ्यात डोळे घालुन म्हणाली
" हे बघ राधा तू मला हा बहाना देऊ नकोस. मला माहित आहे जेव्हा तुझी तब्येत बरी नसते , तेव्हा तू कशी वागते. मी खूप दिवस झाले ही गोष्ट तुला विचारणार होती; पण आज मला राहवलं नाही बघ. तुझं असं वागणं झालं आहे की, त्याच्यामुळे माझंही कामात मन लागत नाही. सारखं तुझ्याकडेच लक्ष जाते. प्लीज राधा जे काही असेल ते सांग. मी तुला वचन देते की मी कोणाला काहीही सांगणार नाही.
जेव्हा राधाला नेहा म्हणाली की" मी कोणाला काहीही सांगणार नाही ,तेव्हा कुठे राधाला धीर आला. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आले.
राधाच्या डोळ्यात आलेले पाणी पाहून बाजूला तिची दुसरी मैत्रीण बसली होती तिने विचारले "काय झाले राधा ?"
नेहा म्हणाली "काही नाही गं तिचं डोकं दुखत आहे"
नेहा राधाला हळूच म्हणाली
" राधा , राहू दे आता काही सांगू नको, आपण संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर निवांत बोलू"
राधासुद्धा ऑफिस सुटण्याची वाट पाहू लागली. तिला सुद्धा किती तरी दिवस झाले असं वाटत होतं कोणाशी तरी दुःख शेअर करावं. ती माहेरच्या लोकांशी हे दुःख शेअर करू शकत नव्हती. कारण की तिला सासरी काही प्रॉब्लेम आहे हे माहेरच्यांना कळू द्यायचे नव्हते. उगाच जर आई बाबांना सांगितलं तर ते जास्तच काळजी करतील. त्याच्यामुळे तिने तिथे काहीच बोलली नाही.
संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर नेहा आणि राधा ऑफिसच्या जवळच असलेल्या कॅफेमध्ये गेल्या . नेहाने राधाचा हात घट्ट पकडला आणि विषय काढला.
नेहा म्हणाली
"हे बघ राधा तुला जे काही बोलायचं आहे ते तू आता माझ्याशी बोलू शकतेस. मनामध्ये कोणतीही गोष्ट ठेवू नकोस.त्याचा तुला त्रास होईल"
"हे बघ राधा तुला जे काही बोलायचं आहे ते तू आता माझ्याशी बोलू शकतेस. मनामध्ये कोणतीही गोष्ट ठेवू नकोस.त्याचा तुला त्रास होईल"
राधाच्या डोळ्यांमध्ये टचकन पाणी आले.
किती दिवस झालं ही भावना दाबून ठेवली होती. मनोहरला तटस्थपणे सर्व काही बोलून दाखवत होती; पण कुठे तरी ते स्वतः आतून कोलमडली होती .ती खूपच खचून गेली होती. फरक इतकाच होता की तिने ते दाखवून दिले नव्हते.
पण आज नेहा समोर ती घळाघळा अश्रू ढाळू लागले .
नेहाने तिला मनसोक्त रडू दिले .
राधा थोड्या वेळानंतर शांत झाली आणि बोलू लागली
"नेहा थँक यू सो मच.तु मला हा प्रश्न विचारून माझं मन हलकं केलंस. मला आतल्या आत खूप त्रास होत होता. मला समजतच नव्हतं मी कोणाला हे सर्व सांगू आणि तू तर माझी खास मैत्रीण आहेस ;पण तरीसुद्धा नवरा-बायकोमधील हे नातं खूपच विश्वासाचे असतं आणि ते त्यांच्यापर्यंत सिमीत राहिलेलं चांगलं असतं. मला माहीत आहे की तु हे कुणालाही सांगणार नाही म्हणून मी तुझ्याशी सगळं काही शेअर करते.
राधा बोलू लागली . किती गुलाबी दिवस होते . मनोहर सुद्धा किती माझ्यावर प्रेम करायचा. सर्वच अगदी एखाद्या चित्रपटाला शोभेल असं होतं. त्याची काळजी घेणं. नेहमी माझ्या सतत अवतीभवती असायचा. मला काय हवं नको ते नेहमी पाहायचा. घरातल्यांची सुद्धा विचारपूस करणं, काळजी घेणे. एकदम परफेक्ट होता. पण हल्ली काही दिवस झाले मी पाहते आहे की ,
तो स्वतःमध्ये असतो. जास्त बोलत नाही.वेळही देत नाही. मला तर चिंता लागून राहिली आहे. जर हे असेच चालत राहिले तर पुढे कसं होईल.?
तो स्वतःमध्ये असतो. जास्त बोलत नाही.वेळही देत नाही. मला तर चिंता लागून राहिली आहे. जर हे असेच चालत राहिले तर पुढे कसं होईल.?
घरामध्ये सुद्धा आला तरी तो तसाच वागतो. असे नाही की, तो माझ्याशीच तसा वागतो. तो सर्वांशीच तसा वागतो. आई-बाबांशी सुद्धा जास्त बोलत नाही . स्वतःच्या एका वेगळ्या विश्वात रमलेला असतो. मुळात त्याला सवय लागली आहे की रोज दारू पिऊन येणे .
आधी मला म्हणाला होता की, मी कधीतरी दारू पितो आणि लग्नाआधी त्याने मला वचनही दिले होते की, मी दारू सोडण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.आता असे उलट झालं आहे.तो कधीतरीच दारू घेत नाही. तो आता रोज दारू पितो .दारू पिल्यानंतर, तो मनोहर मनोहर राहत नाही; तर वेगळाच माणूस होऊन जातो. तसे मी काल त्याच्याशी स्पष्टपणे बोलली सुद्धा. मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत स्पष्ट शब्दांत सुनावले.
त्याला मी दोन ऑप्शन दिले आहे तुला परिवार हवा आहे का तुला दारू हवी आहे. तो अगदी पोटतिडकीने बोलत होता की " मला माझा परिवार हवा आहे आणि मी ह्यापुढे दारूला स्पर्श करणार नाही आणि काल तो परत दारू पिऊन आला आणि जेव्हा मी त्याला विचारलं तेव्हा तो म्हणाला की ,"मित्रांनी माझ्या ग्लासात दारू मिक्स केली होती; पण मला खरंच चिंता लागून राहते की हा नक्कीच दारू सोडेल ना?
नेहा एकही दिवस असा जात नव्हता की, मी आणि मनोहर गप्पा मारत नव्हतो. रोज रात्री कितीही दमून भागून आला तरी पण तो मला प्रेमाने जवळ यायचा.रोज माझ्यासाठी आईस्क्रीम आणायचा. किती महिने झाले तो माझ्याशी जास्त बोलत नाही. इतकं कसं तो सर्व नॉर्मली घेऊ शकतो?"
नेहा मन लावून ऐकत होती.
नेहालाही समजत होती राधाची अवस्था.तिच्यासाठी वाईटही वाटत होते.
पुढे राधा बोलू लागली
" नेहा मला ना खरच हे सगळं सहन होत नाहीये आणि मी माहेरी सांगू शकत नाही कारण की मनोहरची प्रतिमा खराब होईल. खरं तर तो खूप चांगला आहे पण ह्या एका गोष्टीमुळे हल्ली खूपच तो विचित्र वागत आहे .
नेहा म्हणाली
"हे बघ काहीही असलं तरी पण तू स्वतः तटस्थ राहणे महत्वाचे आहे. तूच गळून पडली तर कसा निभाव लागणार ?
हे बघ सर्वात आधी ,खरं तर तुला मनोहरला आधी काही टेन्शन आहे का किंवा त्या मार्गाला का जातो आहे? त्याला काही प्रॉब्लेम आहे का? हे विचारायला हवं.तुम्हा दोघांचा पगार चांगला आहे .घरात सर्व व्यवस्थित आहे. मग हे व्यसन लागण्याचे कारण काय?
आधीच अगदी टोकाला जाऊन जर तू त्याच्याशी बोलली, तर कदाचित त्याला काही प्रॉब्लेम असला तरी तो सांगणार नाही. त्याच्यामुळे तू त्याला प्रेमाने विचार.
जर खरच काही प्रॉब्लेम असेल तर तो तुला बोलून मोकळा होईल.
ही कल्पना राधाला फार आवडली. तिने विचार केला की संध्याकाळी मनोहर घरी आल्यावर ती त्याच्याशी प्रेमाने बोलेल.
राधा नेहाला म्हणाली
" थँक्यू सो मच नेहा, हे खरंतर माझ्या डोक्यात आलं नाही. अगदी मी रागाच्या भरात त्याला बोलून गेले ;पण नक्कीच मी आज घरी गेल्यावर त्याच्याशी व्यवस्थित बोलेल. त्याच्यातून मार्ग निघाला तर निघाला .
नेहा म्हणाली "ही थँक्सची औपचारिकता नको मला राधा ,आता छान अशी स्माईल दे. किती दिवस झालं चेहरा पाडून बसलेली असतेस. मला अजिबात आवडत नाही जेव्हा तू शांत बसते तेव्हा. एकही शब्द बोलत नाही माझी बोलणारी, बडबड करणारी मैत्रिण इतकी शांत कशी काय झाली?
चल छान हसून दाखव बरं..
राधा हसली.
नेहा:"ये हुई ना बात"
राधाचे डोक्यावरचं ओझं बऱ्यापैकी कमी झालं होतं.. पण तरी सुद्धा तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली खरंच काही प्रॉब्लेम असेल का? म्हणून तो इतकं सांगूनही दारू सोडत नाही. दारूच्या आहारी चालला आहे.
तिला नेहाची कल्पना फार आवडली तिने विचार केला"
घरी गेल्यागेल्या मनोहरला शांतपणे सगळ काही विचारणार आहे.
दोघीनी एकमेकींना मिठी मारली आणि निरोप दिला..
मनोहरचा फोन आला.
राधा :" हॅलो मनोहर"
मनोहर :"हॅलो राधा, माझ्या मित्राची एक पार्टी आहे मी तिथे चाललो आहे ,थोडा उशीर होईल.
राधाला प्रचंड राग आला होता. आता पार्टीला जाणार म्हणजे बरोबर दारू पिणार .
मनोहर म्हणाला " हे बघ आता मी काही तिथे गेल्यावर ड्रिंक वगैरे करणार नाही, मी फक्त तिथे पार्टीला जाणार आहे आणि शुभेच्छा देऊन येणार.
राधा म्हणाली "हे बघ मनोहर तू माझी शपथ घेतली आहेस आणि आज जर तू पिऊन आलास तर माझ्या इतकं वाईट कोणी नाही"
मनोहर समजून गेला होता .राधाला राग आला आहे.
क्रमशः
अश्विनी कुणाल ओगले.
कथा आवडत असेल तर लाईक, कंमेंट ,शेअर करायला विसरू नका..
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा